Saturday, 23 January 2021

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदर्श मित्र मंडळ रायते यांच्या तर्फे ब्लॅंकेट व खाऊचे वाटप !

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदर्श मित्र मंडळ रायते यांच्या तर्फे ब्लॅंकेट व खाऊचे वाटप !


नारायण सुरोशी, कल्याण : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदर्श मित्र मंडळ, रायते यांनी परिसरातील गरजू व गोरगरीब जनतेला ब्लॅंकेट व खाऊचे वाटप केले.


कोरोना काळानंतर सर्व सामान्य जनतेला अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे रायते येथील आदर्श मित्र मंडळ यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या गरजवंत नागरिकांना ब्लॅंकेट व खाऊचे वाटप केले. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन सुदाम भोईर, राम सुरोशी (सामाजिक कार्यकर्ते), मनोज सुरोशी, संतोष कान्हा सुरोशी, गणेश केमारे, विजय कार्ले, नितीन भोईर, विशाल घावट, बाळू सुरोशी, संतोष भोईर, तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिकांनी व गरजवंतानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कल्याण मध्ये भव्य रोजगार मेळावा !

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कल्याण मध्ये भव्य रोजगार मेळावा !


ऋषिकेश चौधरी, कल्याण : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांनी बेतूरकर पाडा विभाग - प्रभाग क्रमांक 22, 23 व 27 येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. 


शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवले 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याच प्रेरणेंने साहेबांच्या जयंती निमित्त कोरोना काळात अनेक तरून-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या अशा परिस्थिती या रोजगारांना रोजगार मिळावा. या हेतूने विजया पोटे यांनी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यात 20 पेक्षा अधिक कंपन्या सहभाग होता. 1000 हुन अधिक तरुण तरुणींची नोंदणी झाली. यावेळी ज्यांची नियुक्ती झाली त्यांना कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक अरविंद पोटे, शाखा प्रमुख संतोष भोईर, सुनील वायले, विद्याधर भोईर, प्रियंका भोईर, जयवंत भोईर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि.प., पं.स प्रमाणे राज्यातील ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढा !!

जि.प., पं.स प्रमाणे राज्यातील ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढा !!


**सभापती श्रीकांत धुमाळ यांची नाना पटोळे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी**

मुरबाड (मंगल डोंगरे) : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण जसे अडीच वर्षाच्या मुदतीनंतर सोडत पद्धतीने काढले जाते.त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील ग्राम पंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण दर अडीच वर्षानी नव्याने काढले जावे.तशी तरतूद करण्यात यावी.जेणे करून जास्तीत जास्त नवतरुणांना त्याचा फायदा होवून गावचा विकास साधला जाईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी एका लेखी निवेदनाद्वारे विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांचेकडे मागणी केली आहे.


                     गावचा विकास काय असतो,तो कसा करावयाचा असतो. याचा प्रत्यक्ष 10  ते 15 वर्षाचा अनुभव असलेले मुरबाड शहरा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवपे ग्राम पंचायत चे अनुभवी सरपंच श्रीकांत धुमाळ यांनी घेतला असुन, सर्वसामान्यांच्या समस्या व गावाच्या समस्या काय असतात. ज्यामध्ये आपल्या गावातील रस्ते, पाणी, गटारे, रोडलाईट, शाळा, स्मशानभुमी, ग्राम सचिवालय, गणेश घाट, स्वच्छता मोहीम, तंटामुक्त गाव, हागणदारी मुक्ती साठी घरोघरी शौचालय मोहीम, राबवुन गावातील बारीक सारीक हालचाली व अनुचित प्रकार रोखण्यासाठी तालुक्यातील सर्वप्रथम नामाकंन मिळवलेली सी.सी.टी.व्ही. युक्त ग्राम पंचायतीला अनेक पुरस्कार मिळविणारे सरपंच म्हणून ख्याती असलेले मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी सभापती पदी विराजमान होताच, आता तालुक्यातील गावांचा आपला गावाप्रमाणे विकास साधण्यासाठी कंबर कसली असुन, त्यासाठी त्यांनी पाडाळे धरण कालवा प्रकल्प बाधितांना धनादेश वाटपासाठी आलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. श्रीकांत धुमाळ हे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक असुन, कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रत्येक कामाचे नियोजन असते. तालुक्यातील विविध समस्या सोडविताना कुठल्याही प्रकारचा हलगर्जी पणा खपवुन घेतला जात नाही. व कुठल्या प्रकारचे मतभेद मानले जात नाहीत. गोरगरीबांना आपलाच वाटणारा आतापर्यतंचा एकमेव सभापती असल्याची नागरिकांत नेहमीच चर्चा असलेल्या सभापतींच्या या मागणीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे किती गांभीर्याने लक्ष देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामुळे बोरघर गावातील वातावरण अत्यंत मांगल्यपुर्ण आणि भक्तीमय !

अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामुळे बोरघर गावातील वातावरण अत्यंत मांगल्यपुर्ण आणि भक्तीमय  ! 


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : वै. हभप गोपाळ महाराज कांगणे व वै. हभप डॉ महाराज कळसे यांच्या कृपाशीर्वादाने आणि हभप महेश माधव महाराज कळसे यांच्या शुभहस्ते माणगांव तालुक्यातील बोरघर येथे वारकरी संप्रदाय मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ बोरघर यांच्या सहयोगाने शुक्रवार दिनांक २२ जानेवारी २०२१ ते गुरुवार दिनांक २८ जानेवारी २०२१ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय बोरघर आणि बोरघर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गेली ३३ वर्षे नियमित सालाबादप्रमाणे बोरघर येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे शानदार आयोजन केले जाते. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे हे ३४ वे वर्ष आहे. गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण गावातील वातावरण भक्तीमय झाले असून या अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत अखंड पणे हरिनामाचा गजर आणि नामसंकीर्तन, हरिपाठ, भजन,  प्रवचन, किर्तन, हरिजागर सुरू आहे. 
       सदर कार्यक्रमाची रूपरेषा :- पहाटे ४ ते ६ काकड आरती, शुक्रवार दिनांक २२ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत सकाळी ८ ते ११ हभप पंडीत महाराज शेडगे बोरघर, हभप नारायण महाराज पतारे चरई, हभप महेश महाराज कळसे लातूर, हभप गजानन महाराज शेडगे बोरघर,यांचे प्रवचन , दुपारी अन्नप्रसाद, दुपारी ३ ते ४ गाथेवरील भजन, हरिपाठ आणि हरिजागर अनुक्रमे जय हनुमान भजन मंडळ राजाराम बुवा, वारकरी संप्रदाय आमडोशी, वारकरी संप्रदाय बोरघर, आदिमाया भजन मंडळ बुवा नामदेव भागडे,श्री विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ बोरघर, जय हनुमान भजन मंडळ बुवा नथुराम साखरे, मोहेआळी महिला भजन मंडळ बोरघर यांच्या माध्यमातून हरिपाठ, भजन आणि हरिजागर. 
      रात्री ९ ते ११ किर्तन अनुक्रमे हभप पंडीत महाराज शेडगे बोरघर, हभप नारायण महाराज पतारे चरई, हभप महेश महाराज कळसे लातूर, हभप सुंदर महाराज निमन कविळवहाळ, हभप महेश महाराज कळसे लातूर आणि हभप पंडीत महाराज शेडगे बोरघर यांचे किर्तन. 
       गुरुवार दिनांक २८ जानेवारी अर्थात सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सकाळी ८ ते १० दिंडी सोहळा, सकाळी १० ते १२ हभप महेश महाराज कळसे यांचे काल्याचे किर्तन दुपारी १२ ते २ महाप्रसाद अशा प्रकारे बोरघर येथे सदर अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अाहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

Friday, 22 January 2021

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला आपली जागा कळेल - "नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष"..

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य  निवडणुकीत भाजपला आपली जागा कळेल - "नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष".. 


कल्याण, ऋषिकेश चौधरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा समजून येईल असा गर्भित इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या घरी पटोले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला. 


भाजप कसा आहे हे आता जनतेला कळू लागले आहे. खोटं बोला पण रेटून बोला अशी भाजपची भूमिका असल्याची टीकाही पटोले यांनी यावेळी केली. भाजपने आता जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहीजे. जनतेच्या मनात काय सुरू आहे आताच्या निवडणुक निकलावरूनही त्यांना समजत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा कळून येईल असे पटोले यांनी सांगितले. 

तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असून त्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ असेही त्यांनी सांगितले. तसेंच आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकत्र लढायचे किंवा वेगवेगळे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. 

या सदिच्छा भेटीवेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष ब्रिज दत्त, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी भाषेची जागतिक साहित्याशी तुलना गैर - शशिकांत सावंत !

मराठी भाषेची जागतिक साहित्याशी तुलना गैर - शशिकांत सावंत !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

           जागतिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याची तुलना करणं सोपं नाही. याचे कारण सगळ्या जगाची भाषा मराठी असती तर इंग्लंडमधल्या नव्हे तर फ्रेंच, रशियन, अमेरिकेतल्या मराठी पुस्तकांची महाराष्ट्रातील मराठी पुस्तकांशी तुलना करता आली असती. किंवा सर्व जगाची भाषा इंग्रजी असती तर इंग्रजीतल्या साहित्याशी तुलना आपल्याशी करता आली असती असे मत ग्रंथसखा शशिकांत सावंत यांनी दादर येथे व्यक्त केले. दादर सार्वजनिक वाचनालय, धुरु हॉल ट्रस्ट आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, दासावाच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती शुभा दत्ता कामथे, राजन भालिंगे, सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवियित्री शांताबाई शेळके यांचे साहित्य आणि कर्तृत्व यावर प्रा.हेमंत सामंत यांनी विचार मांडले. संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम आणि श्रीनिवास डोंगरे यांना कोरोना विषयावर पत्रलेखन केल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दासावाचे कार्यवाह यतीन कामथे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख ग्रंथपाल अश्विनी पाठक, सर्व सेवकवर्ग, राष्ट्रकूट मासिकाचे कार्यकारी संपादक राजन देसाई, प्रशांत भाटकर यांनी विषेश मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर साळवी यांनी तर आभार प्रदर्शन अरुण खटावकर यांनी केले. जागतिक साहित्याच्या तुलनेत मराठी भाषा या विषयावर 

जगभरातील काही श्रेष्ठ साहित्यिक - कलावंतांची तुलना करत हा विषय सावंत यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडला. ते पुढे असेही म्हणाले की, भारतात शेकडो भाषा आहेत. अगदी महाराष्ट्रात मालवणी पासून ते इराणी पर्यंत इतक्या बोलीभाषा आहेत व त्यांचे साहित्य एका विशिष्ट मराठी भाषेत तयार होतं. आपल्याला श्रेष्ठ साहित्याची परंपरा आहे ती तुकाराम ज्ञानेश्वरांपासून ते नवकथेचे प्रवर्तक गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे,मोकाशी इथपासून ते किंचित पुढची पिढी ज्याच्यात भालचंद्र नेमाडे, अरुण कोल्हटकर, चित्रे ,नामदेव ढसाळ, खानोलकर यांसारखे खणखणीत कवी निर्माण झाले. त्यानंतरच्या साहित्यात अगदी आतापर्यंत बालाजी सुतार किंवा प्रणव सुखदेव यांसारख्या नव्या लेखकांचे साहित्यही कसदार आहे आणि त्याला चांगला वाचकवर्गही आहे. पण दोन तीन गोष्टी यात आहेत एक म्हणजे साहित्य जरी चांगलं असलं तरीही त्याचं उत्तम अनुवाद इंग्रजीत व्हायला हवेत, बनगरवाडी पासून ते कोसला पर्यंत अनेक पुस्तकांचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे. मात्र ज्याप्रकारे  मारक्वेन्स चे अनुवादक दिवस-रात्र केवळ तेच काम करतात त्यामुळे मारक्वेन्स, मिलन कुंदेरा यांच्यासारख्या लेखकांचे अनुवाद वाचताना ते त्यांनीच लिहिले आहेत असे वाटतात.

विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते पाडाळे धरणग्रस्तांना नुकसानभरपाई धनादेशाचे वाटप !

विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते पाडाळे धरणग्रस्तांना नुकसानभरपाई धनादेशाचे वाटप !


"GST वरून ना. पटोले यांनी केंद्र सरकारचे काढले वाभाडे"

मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील पाडाळे धरणाच्या कालव्यात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात नुकसान भरपाई पासून अनेक वर्षे शेतकरी हे वंचित राहिले होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रयत्न करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. आणि आज त्यांच्याच हस्ते शेतकऱ्यांच्या गावात येवून त्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशांंचे वाटप करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.यावेळी मोदी सरकारने जी.एस.टी. लावून सर्वसामान्य व गरीब जनतेचे कंबरडेच मोडल्याचा ना. पटोले यांनी केंद्र सरकारवर घणाघात करून चांगलेच वाभाडे काढले.
          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील आर्थिक धोरणानुसार जी एस टी म्हणजे श्रीमंतांंकडून कर वसुल करून त्या पैशाचा गोरगरीब, मजूर, कष्टकरी जनतेला रोजगार फायदा व्हावा हा मूळ उद्देश असतांंना केंद्र सरकारच्या या जी एस टी धोरणात यांच्या उलट झालं या देशातील भिकाऱ्यांंसह प्रत्येक माणूस टॅक्स भरू लागला. तर अंबानींना तासाला 90 कोटींचा फायदा वाढु लागला. तर मुंबईच्या लागुन असलेल्या ठाणे जिह्यात कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणाने बालकं मरतात. आपल्या जमिनींंसाठी आपल्यालाच आंदोलन करावी लागतात.11वर्षे प्रश्न सुटत नाही ही खरी शोकांंतीका आहेअसे ना. पटोले यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

**कालव्याच्या बाधितांना उशिरा का होईना मदत मिळाली "पण मिल्हे हद्दीतील इनामदाराच्या कुळांच्या जमिनी गेल्या "त्यांची कोणीही दखल घेतली नाही ? ना कोणी कधी घेणार आहे.भुमिहिन होवून शासनदरबारी कुठलीही दखल नाही. त्यांना कोणी न्याय देईल का ? खोपिवली येथील एक पीडित शेतकरी "व कुळ 'मयत देऊ दामा डोंगरे' यांचे वारसदार नातु मंगल डोंगरे यांची खंत **
             मुरबाड तालुक्यातील पाडाळे येथे लघु पाटबंधारे योजनेतून बंधारा बांधण्यात आला. यानंतर कालव्याचे काम सुरू झाले. परंतु जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे भुसंपादन न करताच कालव्याचे काम सुरु केले. यावेळी पत्रकार संतोष गायकर यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त शेतकरी गुरूनाथ पष्टेंंसह इतर शेतकऱ्यांनी लढा देऊन मुंबई येथे उपोषण देखील केले. यानंतर कॉंग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे कालव्याच्या नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न नेला. अनेक वर्षे या धरणबाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले असल्याने ना.पटोले यांनी चेतनसिंह पवार यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकोशचंद्र व इतर अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी इ.अधिकाऱ्यांची एक बैठक विधानभवनात बोलावून नुकसानभरपाई संदर्भात निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आज पाडाळे धरणाच्या कालव्यात गेलेल्या जमिनींच्या नुकसान भरपाईचे धनादेश शेतकऱ्यांच्या गावात जाऊन त्यांना देण्यासाठी आज स्वतः ना.नाना पटोले बांदलपाडा येथे येऊन धनादेशांंचे वाटप केले.दरम्यान ना.नाना पटोले यांनी चेतनसिंह पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असता पवार यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही उशिरा मिळाली असल्याने त्यांना सन २००९ पासून भुईभाडे देण्यात यावे व कालव्याच्या रस्त्याचे शासनाने भुसंपादन करून मजबुतीकरण करावे अशी मागणीही केली .यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे,उपाध्यक्ष सुभाष पवार, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राजेश घोलप, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर,महिला आघाडी अध्यक्ष संध्या कदम,ठाणे शहर उपाध्यक्ष नितीन घोलप, नगरसेवक रवींद्र देसले, आरपीआय सेक्युलर जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदणे इ. मान्यवर व पाडाळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...