Friday, 21 May 2021

राज्यात दिवसभरात नवे कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा कोरोनामुक रुग्णांची अधिक ! मृत्यू दर कायम !!

राज्यात दिवसभरात नवे कोरोनाबाधीत रुग्णांपेक्षा कोरोनामुक रुग्णांची अधिक ! मृत्यू दर कायम !!


मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी उतरणीला लागली आहे. त्यातच दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत असल्यामुळे राज्याला थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे. राज्यात आज 44493 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर 29644 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 5070801 कोरोनाबाधित बरे झाले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.74% एवढे झाले आहे.

त्याचबरोबर आज राज्यात 555 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32441776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5527092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2794457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 20946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 367121 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत मोफत शिवभोजन थाळीची मुदत आता १४ जून पर्यंत ! "योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण"

ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत मोफत शिवभोजन थाळीची मुदत आता १४ जून पर्यंत !

"योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण" 


मुंबई : राज्यात सुरु असलेल्या 'ब्रेक द चेन' या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत
मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जून २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय दि. १४ मे २०२१ रोजी निर्गमित केला आहे. 'ब्रेक द चेन' प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.

१५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु आहेत.

ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी ATS प्रमुख जयजित सिंग यांची नियुक्ती.!

ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी ATS प्रमुख जयजित सिंग यांची नियुक्ती.!


अरुण पाटील, भिवंडी :
 .        दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. आता ठाणे पोलीस आयुक्त पदावर राज्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसच्याच पथकाने सचिन वाझेच्या साथीदारांना जयजीत सिंग यांच्या नेत्रृत्वात अटक केली होती.
             आता त्याच जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे.इतकेच नाही तर सचिन वाझे याला गुजरातमधून सिमकार्ड देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एटीएसच्याच पथकाने अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि त्याच दरम्यान जयजित सिंग यांची बदली ठाणेपोलीस आयुक्तपदावर करण्यात आली आहे.तर विनित अग्रवाल यांची एटीएस प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
            ठाणे पोलीस आयुक्तपदी असलेले विवेक फणसाळकर यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. विवेक फणसाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदावर कुणाची वर्णी लागणार याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यात जयजीत सिंग यांच्या नावाचाही समावेश होता. अखेर हे वृत्त खरे ठरलं असून जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण, 49 जणांच्या मृत्यू या प्रकरणात कॅप्टनवर गुन्हा दाखल, बेपत्ता कर्मचाऱ्यांचा अजूनही शोध सुरु. !

P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण, 49 जणांच्या मृत्यू या प्रकरणात कॅप्टनवर गुन्हा दाखल, बेपत्ता कर्मचाऱ्यांचा अजूनही शोध सुरु. !


अरुण पाटील, भिवंडी :
         P-305 बार्ज दुर्घटना प्रकरणात 49 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण बेपत्ता आहे. हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
           तौत्के चक्रीवादळाचा  मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. या चक्रीवादळात  समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P-305 बार्ज  बुडाले. या अपघातामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण बेपत्ता आहे. हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये या बाबतची तक्रार दाखल केली आहे.
              चक्रीवादळाची सूचना असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या  मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कॅप्टन बल्लव यांच्या विरोधात कलम 304 (2), कलम 338 आणि कलम 334 अन्वये सदोष मनुष्यवध तसेच बेजबाबदारपणे वैयक्तिक सुरक्षिततेस धोको पोहोचवणे, गंभीर दुखापतीला जबाबदार असणे आणि विशिष्ट हेतू न ठेवता हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            हा अपघात झाला तेव्हा बार्जमध्ये उपस्थित असलेले कर्मचारी रेहमान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, " चक्रीवादळाच्या धोक्याच्या संदर्भात सूचना देऊनही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कंत्राटदार एफकॉन्स कंपनी आणि कॅप्टन बल्लव जबाबदार आहेत.
           बार्जवर चीफ इंजिनिअर असलेले रेहमान शेख यांना नौदलाच्या जवानांनी खोल समुद्रात जखमी अवस्थेत तरंगताना वाचवलं आणि सुखरूप मुंबईत आणलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेहमान शेख यांचे भाऊ आलम शेख हे सुद्धा दुसऱ्या बोटीवर इंजिनिअर आहेत.
          आलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी बार्ज परत आणण्याची विनंती केली होती. मात्र या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले.'
P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. या  पैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले.ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन या सर्वांचा जीव वाचवला आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अजूनही सुरु आहे.

Thursday, 20 May 2021

महाराष्ट्रात दिलासादायक चित्र; रुग्णसंख्येत घट ! बरे होण्याचे प्रमाण अधिक !!

महाराष्ट्रात दिलासादायक चित्र; रुग्णसंख्येत घट ! बरे होण्याचे प्रमाण अधिक !!


मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आजच्या आकडेवारीत रुग्णवाढीपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 29 हजार 911 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात तब्बल 47 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 83 हजार 253 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आज राज्यात 738 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.55 टक्के एवढा आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 85 हजार 355 एवढी झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लाख 26 हजार 308 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात दिलासादायक चित्र; रुग्णसंख्येत घट ! बरे होण्याचे प्रमाण अधिक !!

महाराष्ट्रात दिलासादायक चित्र; रुग्णसंख्येत घट ! बरे होण्याचे प्रमाण अधिक !!


मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आजच्या आकडेवारीत रुग्णवाढीपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 29 हजार 911 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात तब्बल 47 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 83 हजार 253 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आज राज्यात 738 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.55 टक्के एवढा आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 85 हजार 355 एवढी झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लाख 26 हजार 308 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमान तळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाने केले जिल्हाभर आंदोलन !

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमान तळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाने केले जिल्हाभर आंदोलन !


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : नवी मुंबई येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असून या विमान तळाला स्वर्गीय दि .बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी समाजातून उठत आहे. आज या मागणीचे रूपांतर आंदोलनात झाले असून रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना भारत मुक्ती मोरच्या च्या वतीने निवेदन देण्यात आले. ज्या जमिनीवर आज आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे ती जमीन आमची भूमीपुत्रांची असून या भूमीत जन्मलेल्या किसान पुत्र दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. अशी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
       रायगड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, सिडको आणि जेएनपीटी बंदर न्हावा शेवा प्रकल्प ग्रस्तांचा बुलंद आवाज असलेले लोकनेते दि बा पाटील अर्थात दिनकर बाळू पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील उपरोक्त प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पोलीसांच्या लाठीचार्ज चा सामना करावा लागला होता. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले लोकनेते दि बा पाटील पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार तर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. दि बा पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. सन १९९९ साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या लोक नेत्याचे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या करीता भारत मुक्ती मोर्च्याने संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करून दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. 
      नवी मुंबई येथील भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कोळी कोपर येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. तेथील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात भारत मुक्ती मोर्चाचा मोठा वाटा आहे. 
     त्यामुळे आता या विमानतलाला दि बा पाटील यांचे नाव देण्यास सरकारने टाळाटाळ केली तर जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री विजय आवासकर यांनी दिला आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...