Wednesday, 17 April 2024

रविवार २१ एप्रिल रोजी कल्याणात बौद्ध वधू वर मेळाव्याचे आयोजन !!

रविवार २१ एप्रिल रोजी कल्याणात बौद्ध वधू वर मेळाव्याचे आयोजन !!

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या जयंती निमित्ताने..

कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळणे हि आज भीषण समस्या निर्माण झाली असून एकाच छताखाली स्थळे मिळून वेळ आणि मोठ्या संख्येने पैसा वाचावा ह्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे रविवार २१ एप्रिल रोजी कल्याण येथे आयोजन करण्यात आले आहे.
      कल्याणातील महापालिकेसमोरील शंकरराव चौक येथील स्वामी नारायण हॉल येथे सकाळी १० ते २ ह्या वेळेत  बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय व्यवसायातील सुवर्णसंधी ह्या विषयावर धम्मपाल थोरात  मार्गदर्शन करणार असून अखिल भारतीय समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष सिताराम गायकवाड हे बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करणार असून ज्येष्ठ पत्रकार दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे हे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई वाघ उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री शुक्राचार्य गायकवाड, रविंद्र गुरचळ, केतन रोकडे, रमेश बर्वे , मनोज जाधव, सुभाष शेंडगे, कल्पना खरात, कमल भडांगे, सिंधू मेश्राम, भारती जाधव, दिपा गांगुर्डे इत्यादी मान्यवर तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. प्रकाश जगताप, ॲड. मंगेश निकम, सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. संजीव कांबळे, श्रद्धा केदार, रूपाली वानखेडे, सुप्रसिद्ध पत्रकार सिद्धार्थ गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे, राजू काऊतकर, सुप्रसिद्ध कर्मचारी नेते शशीकांत पवार उपस्थित राहणार आहेत. 
       गरिब महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अनिता शिंदे, सुवर्णा गायकवाड, सुषमा अहिरे, ज्योती जाधव, सुषमा गायकवाड, गणिता आठवले, शुभांगी धायगुडे, इत्यादी महिलांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक अनिल काकडे यांनी दिली असून अधिक माहितीसाठी 9324552963,  8104211818 ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Tuesday, 16 April 2024

मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मालाटेची शक्यता : बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मालाटेची शक्यता : बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

मुंबई, प्रतिनिधी  :- उद्या बुधवार दि. 17 एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार व्यक्त करण्यात आलेली आहे. या  सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.

यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांनी काय करावे व काय करू नये या अनुषंगाने माहिती दिली आहे.

*** काय करावे 

     पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.  दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.  हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.  शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. 
         पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.  सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.  पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

*** काय करू नये

        उन्हात अती कष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

▪️आर्थिक राष्ट्रवाद वाढीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता

▪️भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

▪️सुनिता मिणा ठरल्या ५ सुवर्ण पदकांच्या मानकरी

नागपूर, प्रतिनिधी : जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगातून  आज प्रत्यक्ष कर क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीत  सरकारी सेवक म्हणून शिस्तपूर्ण आचरण, कामातील सचोटी, नम्रता, नैतिकता आणि वचनबद्धतेच्या भावनेतून आपल्या कार्याचे  आदर्श मापदंड निर्माण करा अशी साद उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घातली.  

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या ७६व्या प्रशिक्षण तुकडीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, राज्यसभेचे महासचिव प्रमोदचंद्र मोदी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, प्रत्यक्ष कर विभागाच्या प्रशिक्षण महासंचालनालयाचे प्रधान महासंचालक सिमांचल दास, एनएडीटीचे महासंचालक आनंद बैरवार मंचावर उपस्थित होते. 

जग कागदी दस्तांपासून तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करते झाले आहे. या बदलांमुळे करदात्यांसाठी सुलभ व पारदर्शी व्यवस्था उभी राहीली आहे. कर भरणा करणे अधिक सोपे झाले आहे. सर्व आर्थिक व्यवहार डिजीटाईज झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे कर प्रशासनात सुधारणा होत असून कर चोरीला आळा घालण्यास मोठी मदत होत असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डेटाबेस यंत्रणा उभारली जात आहे. यातून प्रत्यक्ष कर संकलन व कर भरण्याच्या व्यवहारात पारदर्शकता येत असून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. यामुळे करदात्यांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास दृढ झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  ही विश्वासार्हता अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय महसूल सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे असे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.

स्कर उत्पन्नासमवेत थानिक  उत्पादनांना जागतिक बाजारपेठ कशी उपलब्ध करुन देता येईल याबाबत महसूल सेवेतील अधिकाऱ्यांनी उद्योजकांशी उत्तम समन्वय साधने आवश्यक आहे. त्यांच्यात आर्थिक राष्ट्रवादाची भावना जागृत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. देशांतर्गत उद्योजकतेला मोठी भरारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

देशाच्या विकासात प्रत्यक्ष कराचे महत्व विषद करुन या यंत्रणेत काम करतांना घ्यावयाची काळजी  व गांभीर्य राखत प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडण्याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.   
 
एनएडिटीच्या १६ महिन्यांच्या  प्रशिक्षण कालावधीदरम्यान विविध क्षेत्रात सर्वोत्तम ठरलेल्या ७ प्रशिक्षणार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते एकूण ११ सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले. सर्वोत्तम प्रशिक्षणार्थ्याच्या सुवर्ण पदकासह सुनिता मिणा यांनी सर्वाधिक ५ सुवर्ण पदक पटकाविली. उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सुनिता मिणा यांचे कौतुक केले.   

तत्पूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी स्वागतपर भाषणात मंडळाच्या प्रगतीचा आलेख मांडला. एनएडीटीच्या प्रशिक्षण कार्यक्रम संचालक लैना बालन यांनी ७६व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. प्रशिक्षणार्थी झेबाखान मन्सुरी आणि धोनेपुडी विजयबाबू यांनी प्रशिक्षण कालावधीतील अनुभव कथन केले. प्रशिक्षणार्थी प्रिया सिंह यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

एनएडीटी ही भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेमधून प्रशिक्षण घेवून बाहेर पडणाऱ्या ७६ व्या तुकडीमध्ये भारतीय महसूल सेवेचे ५६ अधिकारी आणि रॉयल भुटान सेवेचे २ अशा एकूण ५८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एनएडीटी मध्ये दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये २४ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना सेवेत रुजू होण्यापूर्वी एनएडीटीमध्ये १६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन !!

बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन !!

पुणे, प्रतिनिधी : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग व मुस्कान या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय भवनात आयोजन करण्यात आले. 

कार्यशाळेस सहायक आयुक्त विशाल लोंढे, विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, सहायक लेखाधिकारी इंदल चव्हाण, फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेच्या समन्वयक श्रीमती किर्ती दिनी, प्रशिक्षक श्रीमती शुभांगी घरबुडे, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर, समाजकल्याणच्या वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल आदी उपस्थित होते. 

श्री. लोंढे यांनी वसतिगृहाचे गृहप्रमुख, मुख्याध्यापक, गृहपाल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांबाबत व बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याच्या अनुषंगाने कायद्याची माहिती घ्यावी असे आवाहन करुन संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

प्रास्ताविकात श्री. हरसुरे यांनी  समाज कल्याण विभागाच्या पुणे कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृह, निवासी शाळांमध्ये ११ ते १४ एप्रिल या कालावधीम  घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली. श्रीमती दिनी यांनी फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन संस्थेमार्फत चालणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली. श्रीमती घरबुडे यांनी बाल लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याच्या अनुषंगाने उपस्थित कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड !!

**** सध्याच्या खासदारांविषयी असलेली नाराजी, महाविकास आघाडीला असलेली सहानुभूती 

भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात, यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड यांचा समावेश आहे. आगरी, कोळी, कुणबी, मुस्लिम, आदिवासी अशा मतदारांचा भरणा असलेला मतदारसंघ आहे.

या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती.

या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेस तर्फे इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी घोषित केली असून वंचित बहुजन आघाडीतर्फे पाठिंबा जाहीर झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक खात्यावरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचेही आव्हान उभे टाकले आहे. निलेश सांबरे यांचे शैक्षणिक, आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रात गेले पंधरा वर्षे  मोठ्या प्रमाणावर कार्य असून मतदारसंघात प्रत्येक गावागावात तसेच शहरातील जवळपास सर्वच प्रभागात कार्य पोहोचले आहे.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे आगरी समाजाचे असून या समाजाचे मोठे प्राबल्य या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात परिचित असे नाव असून आगरी, कोळी समाजामध्ये सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) लोकप्रिय आहेतच पण इतर समाजातही नेहमीच कुणाच्याही अडचणीत मदत करणारे अशी प्रतिमा आहे, याव्यतिरिक्त महाविकास आघाडीचा परंपरागत असलेला मुस्लिम मतदार तसेच उध्दव ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, मतदारसंघातील सध्याच्या खासदार यांच्या विषयी पक्षांतर्गत दिसत असलेली नाराजी व मतदारसंघातील सत्ताविरोधी वातावरण महाविकास आघाडीला असलेली सहानुभूतीची लाट या सर्वांचा परिणाम निकालात दिसून येऊ शकतो.

तशातच या मतदारसंघात उभे असलेले जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उमेदवारी मुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल पाटील याचेच नुकसान होताना दिसत आहे.

सध्या आमच्या प्रतिनिधीनी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला असता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचे पारडे जड वाटत आहे.

ओम हॉस्पिटल च्या सुसज्य नवीन वास्तूचा शानदार उद् घाटन सोहळा उत्साहात संपन्न !!

ओम हॉस्पिटल च्या सुसज्य नवीन वास्तूचा शानदार उद् घाटन सोहळा उत्साहात संपन्न !!

पाचोरा, प्रतिनिधी : पाचोरा शहरांमध्ये रुग्णांना अद्यावत आरोग्यदायक सेवा सुविधा उपलब्ध होण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विवेकानंद नगर आर के जिम जवळ रिंग रोड पाचोरा येथे डॉक्टर अजय सिंग परदेशी, नेहा परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नवीन भव्य अद्यावत वास्तूचा ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर ओम स्पीच अँड हियरिंग क्लिनिक चे उद्घाटन पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार भाऊसाहेब श्री दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते दिनांक १०/०४/२०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील होते याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार डॉक्टर अजय परदेशी व मित्र परिवाराच्या शुभ हस्ते करण्यात आला आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात डॉक्टर अजय सिंग परदेशी व सौ नेहा परदेशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परिसरातील रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळावी या हेतूने प्रेरित होऊन गेल्यादहा वर्षापासून आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली पाचोरा भडगाव परिसरातील रुग्णांची चांगल्या प्रकारे या परदेशी दाम्पत्यांनी सेवा केल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या सेवेमुळे रुग्णांचे आजारपण दुरुस्त होत असल्याने त्यांना या व्यवसायात यश मिळाले आणि म्हणून भूतकाळापेक्षा भविष्य काळामध्ये रुग्णांना अद्यावत माफक योग्य दरात सेवा मिळावी यासाठी त्यांनी आज भव्य दिव्य असे ओम हॉस्पिटल ही वास्तू रुग्णसेवेसाठी निर्माण केली आहे.

डॉक्टर अजय परदेशी यांच्या धर्मपत्नी सौ नेहा परदेशी यांनीही जळगाव जिल्ह्यामध्ये इतरत्र कुठेही होम स्पीच् अँड हियरिंग क्लिनिक नसताना पाचोरा शहरात मतिमंद मुलांना कर्णबधिर रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल डॉक्टर अजय परदेशी असो नेहा परदेशी यांचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो भविष्यकाळात त्यांच्या हातून अशाच प्रकारची रुग्णांची आरोग्यदायक सेवा घडो अशा शुभेच्छा देतो आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ म्हणाले की डॉक्टर अजय परदेशी व सौ नेहा परदेशी यांनी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्राचा वारसा नसताना डॉक्टर अजय स्नेहा यांनी डॉक्टर ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी आपल्या या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाचोरा शहरातच गेल्या दहा वर्षापासून रुग्णसेवेला सुरुवात केली म्हणजे 2014 ते 2024 या काळामध्ये पाचोरा भडगाव मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यातील रुग्णांची या दाम्पत्याने चांगल्या प्रकारे रुग्णसेवा केली आणि त्याचे आज फलित म्हणून नवीन भव्य अद्यावत वास्तूचे म्हणजे ओम स्पीच हॉस्पिटल अँड हियरिंग क्लिनिकचे उद्घाटन माझ्या शुभ असते संपन्न होत आहे डॉक्टर अजय परदेशी हा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थी होता आपल्या संस्थेने आज पर्यंत असे अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आणि या गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या परिसरातच वैद्यकीय सेवाला सुरुवात केलेली आहे याचे मला सार्थ अभिमान वाटतो डॉक्टर अजय परदेशी व सौ नेहा परदेशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या हातून गोरगरीब रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा घडो त्यांना या वैद्यकीय क्षेत्रात यश मिळो अशा शुभेच्छा देतो याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादासाहेब सचिन सोमवंशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी नगरसेवक विकास पाटील यांनी यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर अजय परदेशी व सौ नेहा परदेशी यांच्या वैद्यकीय कार्याचा गुण गौरव केला डॉक्टर अजय परदेसी व सौ नेहा परदेशी यांच्या जीवन कार्याचा परिचय डॉक्टर विलास पाटील यांनी करून दिला याप्रसंगी व्यासपीठावर आमदार किशोर आप्पा पाटील माजी आमदार दिलीप वाघ नानासाहेब संजय वाघ ताईसाहेब वैशाली सूर्यवंशी दादासाहेब सचिन सोमवंशी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक गणेश पाटील पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब सतीश शिंदे, नगर सेवक विकास पाटील, आर के जिमचे संचालक राजेंद्र काळे, श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथील पर्यवेक्षक ए बी अहिरे, कुवरसिंग परदेशी, प्रताप परदेशी उपस्थित होते. ओम हाॅस्पीटल शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सी.एन.चौधरी यांनी केले, आभार डॉ. नेहा परदेशी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रीन ॲपल इव्हेंटने परिक्षम घेतले कार्यक्रमासाठी शहरातील डॉक्टर असोसिएशनचे मान्यवर डॉक्टर व पदाधिकारी परदेशी परिवाराचे नातेक आप्तेष्ट प्रेमीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 15 April 2024

श्री स्वामी समर्थ कोकण वधु-वर मेळावा विरार येथे संपन्न !!

श्री स्वामी समर्थ कोकण वधु-वर मेळावा विरार येथे संपन्न !!

मुंबई, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
       सध्या लगीन सराई जोरात चालू असून वधू आणि वर यांचा योग्य जोडीदार मिळणे देखील कठीण परिस्थितीत निर्माण झाली आहे. मुला -मुलींचे करिअर मध्ये वय निघून जात असताना आई वडिलांना देखील आपल्या मुलांना योग्य जोडीदार शोधणे कठीण झाले आहे. याच निमित्ताने श्री स्वामी समर्थ कोकण वधूवर सूचक मंडळाच्या वतीने विरार येथे भव्यदिव्य असा वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला. हे मंडळ गेले दहा वर्षे ही सेवा अविरतपणे चालवत असताना संस्थापक सौ. साक्षी ताई परब यांनी सर्वात मोठं योगदान दिले आहे. या मंडळात आता पर्यंत शेकडो वधू-वरानी आपले नाव नोंदणी केली तर आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त लग्न जुळवून आणण्याचा इतिहास या मंडळाने केला आहे. 

              रविवारी (दि. १४ एप्रिल) झालेल्या मेळाव्यात वधू वरानी चांगला प्रतिसाद दिला. तर संस्थापक साक्षी ताई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपले कार्यालय विरार पूर्व येथे शॉप न १, विरार पोलीस स्टेशनच्या बाजूला, सागर झेरॉक्स, विरार पूर्व दर रविवारी सकाळी ११ ते ८ वाजे पर्यंत सुरू असते तर नालासोपारा येथील कार्यालयात हे दर शनिवारी सुरू ठेवण्यात आले असून या मंडळाच्या वेबसाईटवर- sskokanvadhuvar.com या मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन आपण आले नाव नोंदणी करावी व 9607068820, 9637068820 या संपर्क नंबर व आपले माहिती द्यावी असे सूचित करण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात त्याचक्षणी चार लग्न जुळवून पुन्हा एकदा विश्वासाचे नाते जोडले गेले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...