Thursday, 25 July 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा !!
राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!
महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!
महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!
वाडा, प्रतिनिधी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना महाराष्ट्रात नवीन नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी वसईतील भास्कर आळी नजीक नऊ वर्षाच्या मुलाचा खेळताना डीपी बॉक्सला हात लागून जागीच मृत्यू झाला. तर अशीच घटना खरिवली येथील शेतकरी शिवाजी अधिकारी यांच्या स्वतःच्या शेतात चिखल करत असताना अचानपणे लाईट चा पोल ट्रॅक्टर चालू असताना पोल ट्रॅक्टर वर पडून नुकसान झाले.
पावसाळ्यापूर्वी तब्बल अनेक तासांचे शट डाऊन करून वीज दुरुस्त्या केल्या जातात. विज व्यवस्था निर्धोक, सुरळीत राहील असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तक्रारी देऊनही योग्य कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. अशा पद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने शहरात उघड्यावर असलेल्या वीजतारा, सैल झालेले पोल, डीपी बॉक्स यांची काळजी घ्यावी, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सामान्य नागरिक यांच्याकडून सातत्याने होते. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, किंबहुना त्यात हलगर्जीपणा दाखविला जातो.
अपघात झालेल्या घटनांची चौकशी करून अपघातास जबाबदार महावितरणचे अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे, अशी कारवाई झाली तर पुढील घडणाऱ्या अनर्थ घटनांना आळा बसेल.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम देण्याचे आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांचे श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन !
Wednesday, 24 July 2024
ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना - विशेष लेख
आयटीआय औंध येथे मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ !!
मुद्रांक शुल्क अभय योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !!
गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....
गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...
-
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !! *डोंबिवली शिक्षण प...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...