Tuesday, 6 October 2026

कल्याणच्या वरप-कांबा येथे राष्ट्रवादीचा भव्य महिला मेळावा; खा. सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती !!

कल्याणच्या वरप-कांबा येथे राष्ट्रवादीचा भव्य महिला मेळावा; खा. सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती !!

*कल्याण, संजय कांबळे : कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप-कांबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता कांबा येथील मोनालिसा हॉल येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती आयोजक भरत (भाऊ) गोंधळे यांनी दिली.

या मेळाव्यास संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, भिवंडीचे खासदार तथा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, कल्याण लोकसभा प्रभारी महेश तपासे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत (भाऊ) गजानन गोंधळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले असून कल्याण, मुरबाड, शहापूर परिसरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या तयारीची पाहणी भरत (भाऊ) गोंधळे यांनी केली असून ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून अनंता ठाकरे, रवींद्र परटोले, निलेश कडू, संतोष म्हसकर, सागर राठोड, ज्योती वाघमारे आणि आम्रपाली लोखंडे कार्यरत आहेत.

.वन्य-जीव सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व्याख्यान संपन्न !

वन्य-जीव सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व्याख्यान संपन्न !

      द इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर आणि रिसर्च, शिवाई बालक मंदिर विद्यालय, प्लॅन्ट अँड ॲनिमल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्ताने व्याख्यान आज मंगळवारी शिवाई बालक मंदिर विद्यालय (डोंबिवली) येथे आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वन्यजीव संदर्भात माहिती व्हावी हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता. पॉज (Plant and Animel welfare Society) या संस्थेचे वन्यजीव रक्षक श्री ऋषिकेश सुरसे यानी स्लाईड शो द्वारे सर्व विषारी/बिनविषारी सापांच्या विविध जाती व त्यांच्या नावासहीत सर्व माहिती सांगितली. 
           सदर कार्यक्रमास श्री अविनाश कुबल (माजी डेप्युटी डायरेक्टर - महाराष्ट्र नेचर पार्क, सायन, मुंबई), श्री राजीव तायशेटे  (अध्यक्ष द इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर अँड रिसर्च), श्री विजय घोडेकर (सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तज्ज्ञ), डॉ सुनील पुणतांबेकर (अध्यक्ष, नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास), सौ मिताली इनामदार (मुख्याध्यापिका शिवाई बालक मंदिर विद्यालय), सौ रेखा पुणतांबेकर (माजी मुख्याध्यापिका टिळकनगर विद्या मंदिर), राजू नलावडे (सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी), राज मारू (संचालक,पॉज PAWS संस्था) तसेच शिवाई बालक मंदिर विद्यालय याचे शिक्षक व विद्यार्थी वर्ग इत्यादी उपस्थित होते.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

अंबरनाथमध्ये रंगला "सुरों का कारवां" – सोनाली साउंडवेव्हजचा संगीतमय सोहळा !!

अंबरनाथमध्ये रंगला "सुरों का कारवां" – सोनाली साउंडवेव्हजचा संगीतमय सोहळा !!

अंबरनाथ (प्रतिनिधी): सोनाली साउंडवेव्हज प्रस्तुत "सुरों का कारवां" हा लाईव्ह संगीत कार्यक्रम रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता अंबरनाथ (पूर्व) येथील वडवली सेक्शनमधील रोटरी क्लब हॉलमध्ये उत्साहात पार पडला. संगीतप्रेमी रसिकांच्या उपस्थितीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाच्या आयोजिका व गायिका सोनाली यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मैफलीत जुनी आणि नवी हिंदी-मराठी गीते सादर करण्यात आली. सुमारे तीस हौशी गायकांनी आपली कला सादर केली. त्यात पापिया, निलीमा, नयना, कांचन, मंगला,इंद्रनील, धनंजय, अतुल, विजय, प्रियेश, , महेशकुमार, अखिल, श्रीकांत, विजय एस., हेमंत, स्नेहा, संतोष, अंजया, ओमकार, योगेश, मनोज, सुरेश, प्रथमेश, डॉ. ललित आणि करण यांचा समावेश होता. याशिवाय सुनील डी., शोभराज के., , सोजी एस. आणि रोहित जे. या पाहुण्या गायकांनी आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.सिओना सर्व्हे या चिमुकल्या, गुणी पियानो कलाकाराने आपल्या अप्रतिम वादनाने सर्वांची मनं जिंकली.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती के., अनन्या के.. यांनी प्रभावीपणे केले. संगीत साथ अभिषेक जहागीरदार (कीबोर्ड) आणि त्यांच्या सहकारी वादकांनी केली. प्रकाश जी., प्रथमेश एम., सुरेन एन., किरीट टी. आणि राहुल के. यांनी संगीत, ध्वनी व्यवस्था आणि व्हिडिओग्राफीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली.

या कार्यक्रमाला श्रीनिवास व्ही. आणि अजय एम. यांचे सहकार्य लाभले. तसेच विजय क्लासेस आणि सी१० एज्युकेअर यांनी प्रायोजकत्व दिले. कार्यक्रमादरम्यान सर्व कलाकार, पाहुणे आणि मान्यवरांचा पुष्प  देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन उपस्थित रसिकांचे आभार मानले. संगीताच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे आणि नवोदित व हौशी कलाकारांना व्यासपीठ देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजिका सोनाली यांनी सांगितले. रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहून भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

रसिकांच्या उपस्थितीने आणि कलाकारांच्या सादरीकरणाने "सुरों का कारवां" हा कार्यक्रम अंबरनाथच्या संगीतप्रेमींसाठी एक संस्मरणीय संध्याकाळ ठरला.

Monday, 5 October 2026

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथे "मतदार नोंदणी व मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न"

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर  महाविद्यालय महालण विभाग फुंडे   येथे  "मतदार नोंदणी व मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न"

उरण, (विठ्ठल ममताबादे) : दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात शासन आपल्या दारी  निमित्ताने "मतदार नोंदणी व मतदार जनजागृती हा उपक्रम  तहसीलदार उरण ह्यांच्या मार्फत घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख यांनी करताना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले. नायब तहसीलदार  प्रभाकर नवाले ह्यांनी मतदार जागृती व मतदार नोंदणी विषयी तपशीलवार माहिती दिली व १८ वर्ष पूर्ण करण्याऱ्या  सर्व   विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी असे. त्यासाठी फॉर्म कसा भरावा त्यासाठी जोडावी लागणारी कागदपत्रे, भरावयाची माहिती तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याची सखोल माहिती दिली.  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आप आपल्या गावात मतदार नोंदणी साठी जनजागृती करावी असे आवाहान करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे  मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्म चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. 

कार्यक्रमास श्री. शैख महसूल सहाय्यक हे उपास्थित होते. कार्यकर्माचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा पंकज भोये ह्यांनी केले. प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. राहुल पाटील डॉ. जावळे आर एस, डॉ. श्रेया पाटील उपस्थित होते

मेंढ्यांची संख्या वाढली कि लोकर उत्पादनात वाढेल...संजय वाघमोडे

मेंढ्यांची संख्या वाढली कि लोकर उत्पादनात वाढेल...संजय वाघमोडे

 लोकर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि मेंढपाळ चर्चासत्र रांजणीत संपन्न

 
ईश्वरपूर, प्रतिनिधी 

मेंढपाळाच्या समोरील सर्वात मोठी समस्या दिवसेंदिवस चराऊ कुरणे कमी होत असल्याने  मेंढ्यांसाठी चारा पाणी आणि सुरक्षित चराई क्षेत्र मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे मेंढपाळ आपल्या मेंढ्या विकुन रोजंदारीवर जावू लागल्याने मेंढ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मेंढ्यांसाठी पुरेशी चराईची व्यवस्था नसेल, तर मेंढीपालन टिकणार कसे? मेंढी पालन टिकले नाही तर लोकर मिळणार नाही. लोकरीचे उत्पादन वाढविण्यासाठी पारंपरिक चराई क्षेत्रांचे संरक्षण व एस ई जेड  धर्तीवर मेंढपाळासाठी  पुरेशी चराई व्यवस्था निर्माण करून त्यांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या तर  मेंढपाळ आणि मेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊ लोकर उत्पादनात  वाढ होईल. असे प्रतिपादन यशवंत क्रांती चे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केले. ते महाराष्ट्रातील लोकर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि मेंढपाळ बांधवांना लोकर व्यवसायातून अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर पेस्टोरलिझम, नवी दिल्ली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणी (कवठेमहांकाळ) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे आयोजित ‘मेंढपाळ चर्चासत्रात बोलत होते.  

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. विक्रम साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर पेस्टोरलिझमचे रमेश भट्टी, वीणा सिंग, यश केतकर व नंदिनी जयस्वाल उपस्थित होते.

      महामंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन टेकाडे, देवानंद लोदे, यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष मा. संजय वाघमोडे, माणदेशी फाऊंडेशनचे शेळीसखी प्रतिनिधी, मित्रा संस्थेचे प्रतिनिधी, मेंढपाळ आर्मीचे अध्यक्ष व कार्यकर्ते, महुद प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. पोपट कारंडे आणि रांजणी प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. सचिन दडस यांची प्रमुख उपस्थिती होती.

      कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. रांजणी प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. सचिन दडस यांनी उपस्थित मान्यवर व मेंढपाळ बांधवांचे स्वागत करून चर्चासत्राची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला  महामंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन टेकाडे यांनी मृतप्राय होत चाललेल्या लोकर व्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठीच्या उपाययोजना, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वस्तूंच्या पर्याय म्हणून लोकरीचा वापर कशा प्रकारे वाढविता येईल, याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. सेंटर फॉर पेस्टोरलिझमचे रमेश भट्टी यांनी दैनंदिन जीवनातील लोकरीचे महत्त्व, लोकरीचे विविध फायदे तसेच लोकरीला अधिक चांगला दर्जा व बाजारमूल्य मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर मार्गदर्शन केले. वीणा सिंग यांनी लोकरीचा वापर केवळ जेन व घोंगडीपुरता मर्यादित न ठेवता ऑटोमोबाईल क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये कशा प्रकारे करता येऊ शकतो, याबाबत माहिती दिली. मशीनद्वारे लोकर कातरणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मशीनद्वारे लोकर कातरणीचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण लोकरीबाबत डॉ. सचिन दडस यांनी उपस्थित मेंढपाळांना सविस्तर माहिती दिली.

     दुपारच्या सत्रात मेंढपाळ बांधवांच्या सहभागातून लोकर संकलन, विक्री, उपयोग, मूल्यवर्धन आणि व्यवसायातील अडचणी यावर सखोल चर्चा झाली.  अंकुश मुढे यांनी ही मेंढपाळाच्या प्रश्नावर भाष्य केले. 

     डॉ. विक्रम साळवे यांनी महामंडळ हे मेंढपाळ आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करते, असे सांगितले. लोकर कशा पद्धतीने संकलित करता येईल, आगामी लोकर उपयोगिता केंद्रासाठी आवश्यक असलेली लोकर, तसेच या प्रक्रियेतून मेंढपाळ बांधवांना होणारे संभाव्य फायदे याबाबत त्यांनी माहिती दिली. मेंढपाळांच्या लोकर तसेच इतर विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महुद प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. पोपट कारंडे यांनी महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रांच्या माध्यमातून लोकर संकलनासाठी मेंढपाळ बांधवांना कशा प्रकारे सहकार्य करता येईल, याबाबत माहिती दिली.  महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या पारंपरिक व्यवसायाला नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण ठरले. चर्चासत्रास यशवंत क्रांती चे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, आष्टा शाखाध्यक्ष भिमराव गावडे याच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

कल्याणच्या भावार्थ दौंड यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड !!

कल्याणच्या भावार्थ दौंड यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड !!


मुंबई, प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी मा. श्री. सुनील राणे आणि भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भावार्थ भागवत दौंड यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाने सोपविलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना संघटित करणे, युवकांमध्ये राष्ट्रहिताची भावना रुजविणे, केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ युवकांपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी श्री. भावार्थ दौंड कार्यरत राहतील.

भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रसार, युवा नेतृत्वाची जडणघडण, युवकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे आणि युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे, या उद्दिष्टांसाठी ते विशेष प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीमुळे भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल आणि महाराष्ट्रातील युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल श्री. भावार्थ दौंड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले असून, पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने, समर्पणाने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Sunday, 4 October 2026

आ. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा 'शिक्षक हृदयसम्राट' पुरस्काराने होणार विशेष गौरव !!

आ. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा 'शिक्षक हृदयसम्राट' पुरस्काराने होणार विशेष गौरव !!

*ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथे १ नोव्हेंबरला सोहळ्याचे आयोजन*

शिक्षण क्षेत्रात तळमळीने आणि अविरत कार्य करणारे, शिक्षकांचा बुलंद आवाज बनलेले आ. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना ईगल फाऊंडेशनच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील *'शिक्षक हृदयसम्राट'* पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

म्हात्रे सरांचे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्य, त्यांची नीती आणि अखंड गती लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याला शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते म्हात्रे सरांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*हा सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंहगड कॉलेज, कोर्टी-पंढरपूर येथे पार पडणार आहे,* अशी माहिती ईगल फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर व पदाधिकाऱ्यांनी निवड पत्राद्वारे दिली आहे.

डहाणू तालुक्यातील हर्षित चुरीची दिल्लीपर्यंत भरारी !!

डहाणू तालुक्यातील हर्षित चुरीची दिल्लीपर्यंत भरारी !! ‘कॅम्पस से संसद’ उपक्रमासाठी पालघर जिल्ह्यातून निवड; संसद भवनासह विविध राष्ट्रीय व ऐति...