Sunday, 29 November 2020

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपताच माजी उपसरपंच विनायक जामघरे यांनी मानले सर्वांचे आभार !

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपताच माजी उपसरपंच विनायक जामघरे यांनी मानले सर्वांचे आभार !           --


मुरबाड - (मंगल डोंगरे) :  नुकताच मुरबाड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ  संपला असून 'सरपंचांच्या जागेवर   प्रशासक बसले असुन आता गावच्या विकासाच गावगाडा प्रशासक बघणार आहेत.राज्य निवडणूक आयोग निवडणूकीची घोषणा करत नाही तो पर्यत गावचा कारभार प्रशासक पाहणार आहेत. मागील पाच वर्षात तालुक्यातील काही सरपंच /उपसरपंच यांनी गावातील लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामधे काही ठिकाणी सरपंच  /उपसरपंच / सदस्य यांची ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली होती .                                       यातिल मुरबाड तालुक्यातील जामघर -खांदारे ही एक ग्रामपंचायत होती. या मध्ये  २०१५ मध्ये जामघर गावातून विनायक जामघरे या सुशिक्षित तरुणाची प्रथम बिनविरोध सदस्य व नंतर बिनविरोध पाच वर्ष उपसरपंच पदी निवड झाली होती. या पंचवार्षिक मध्ये त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन  त्या लोकांपर्यत नेऊन त्यांची यशस्वी  अंमलबजावणी करुन घेतली. हे सर्व करत असताना त्यांना खांदारे - जामघर येथिल ग्रामस्थ , ग्रामपंचायतचे सदस्य , सरपंच , ग्रामसेवक, तालुक्याचे सभापती , गटविकास अधिकारी व तहसिलदार मुरबाड या सर्वांनी  यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले असल्याने 'ग्राम पंचायतचा कार्यकाळ संपताच उपसरपंच विनायक जामघरे यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत. 
                 या सर्वांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभल्याने आपण पाच वर्षे जनतेची सेवा करु शकलो असे भावनिक उद्गार विनायक जामघरे यांनी काढले.

Friday, 27 November 2020

प्रख्यात भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची माणगांव तहसीलदार पदी नेमणूक ही तमाम माणगांव करांसाठी अभिमानाची बाब !

प्रख्यात भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची माणगांव तहसीलदार पदी नेमणूक ही तमाम माणगांव करांसाठी अभिमानाची बाब ! 


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणुन माणगांव येथे नेमणूक झाली असुन स्पोर्ट्समन या कोट्यातून त्यांची निवड झाली आहे. त्या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत. 
        सातारा जिल्हय़ातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटय़ाशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर जागतिक स्तरावर पिटी उषा व कविता यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू आहेत. शेतमजूर कुटुंबातील या खेळाडूने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला.
        फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्‌स पर्सन ऑफ दी ईयर असे म्हटले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. आंतराष्ट्रीय खेळाडू आपल्या माणगांवला तहसिलदार म्हणुन लाभल्याने माणगांवचे नाव उंचावले आहे. माणगांव तालुक्याच्या तहसीलदार पदी त्यांची नियुक्ती म्हणजे तमाम माणगांव करांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे नवनियुक्त प्रभारी तहसिलदार ललिता बाबर यांचे माणगांव तालुक्याच्या सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन व स्वागत होत आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी "डॉ.भाऊसाहेब दांगडे" !

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी "डॉ.भाऊसाहेब दांगडे" !


ठाणे दि. २७ : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी ते रायगड येथे जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. 

प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.भाऊसाहेब दांगडे हे भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे रहिवासी आहेत. त्यांनी मुंबई येथून बी.व्ही.एस. सी.अँड एच. ही पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे. 

त्यांनी यापूर्वी जळगाव आणि श्रीरामपूर प्रांत अधिकारी, उप जिल्हाधिकारी (रो.ह.यो) धुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, निवासी उप जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक म्हणून सेवा बजावली आहे. २०११ साली त्यांना पदोन्नती मिळून ते अप्पर जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे सेवा बजावली. त्यानंतर उपायुक्त (महसूल) कोकण विभाग, आणि अध्यक्ष जात पडताळणी समिती म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. आता ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झाले आहेत. 

प्रशासकीय कार्यकाळात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून १ ऑगस्ट २००२ रोजी पहिल्या महसूल दिनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात  आले.

आमदार किसन कथोरे यांचे हस्ते मुरबाड न.प.हद्दीतील विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण संपन्न !!

आमदार किसन कथोरे यांचे हस्ते मुरबाड न.प.हद्दीतील विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण संपन्न !!    


मुरबाड - {मंगल डोंगरे} : 
मुरबाड विधानसभेचे  आमदार मा. किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभहस्ते आज मुरबाड शहरातील विविध प्रभागातील भुमीपूजन व लोकार्पण सोहळे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडले.. यात प्रामुख्याने   आंबेडकर नगर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दाराचे उद्घाटन, संभाजी नगर येथिल समाजसेवक गोविंद हरी भोईर यांच्या नामफलकाचे उद्घाटन, माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी प्रभाग क्र. १५ मधिल रस्ते काॕंक्रीटिकरण सह विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रभाग क्र. १७ मधिल रस्त्यांचे भुमीपुजन, स्व. मनुबाई महादु कार्ले यांनी मुरबाड नगरपंचायतसाठी दिलेल्या जागेचं दानपत्र फलकाचे उद्घाटन तसेच 
बागेश्वरी तलावाचे सुशोभिकरणाचा भुमिपूजन सोहळा असे विविध कामांचे लोकार्पण व भुमीपुजन आज करण्यात आले. 
या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार कथोरे म्हणाले की मुरबाड नगरपंचायत भविष्यात महाराष्ट्रात एक रोल माॕडेल असेल राज्यात नंबर वन नगरपंचायत बनविण्याचा आपला मानस आहे.          
आज संपूर्ण मुरबाड शहरात काॕंक्रीटिचे रस्ते, गटारे, पथ दिवे, हाय मास्ट, शौचालये, व महत्त्वाचे म्हणजे मुरबाडकरांना मुबलक स्वच्छ पाणी मिळत आहे. या पाच वर्षात मुरबाड शहराला एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच घनकचरा सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प तयार होणार आहे. बागेश्वरी तलाव येथे मुरबाडकरांना पर्यटनाचा आनंद मिळणार आहे. त्या ठिकाणी बोटींग व्यवस्था झाली आहे. भविष्यातिल मुरबाड हा खूप वेगळा असेल तेव्हा मुरबाड शहराच्या विकास कामांसाठी निधि कमी पडू देणार नसल्याचे आमदार महोदयांनी ग्वाही दिली. 
या उद्घाटन प्रसंगी नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, भाजपा पार्टीचे तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, नगराध्यक्षा छायाताई चौधरी ,उपनगराध्यक्षा अर्चना विशे, शहराध्यक्ष सुधिर तेलवणे, लियाकत शेख सर, सुरेश कार्ले, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नारायण गोंधळी, तालुका सरचिटणीस सुरेश बांगर, जयवंत कराळे, माजी, स्विक्रुत नगरसेवक सुरेश (नाना) साबळे, नगरसेवक रविंन्द्र देसले, संतोष कोळेकर, मुकेश विशे, अतुल देशमुख, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मुरबाड शहर नगरसेविका साक्षी चौधरी, स्नेहा चंबावणे, उर्मिला टोले- ठाकरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरबाड मध्ये 16/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण..** !

मुरबाड मध्ये 16/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण..** !


मुरबाड (मंगल डोंगरे) :
मुरबाड भारतीय जनता युवा मौर्चा च्या वतीने २६ /११ २००८ रोजी झालेल्या भ्याड हल्लातील शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम मुरबाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी संपन्न झाला.
 
या कार्यक्रमासाठी भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा शितलताई तोंडलिंकर, जिल्हा सरचिटणीस नितीनजी मोहपे, तालुकाध्यक्ष जयवंतजी सूर्यराव,शहराध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, भाजप जेष्ठ नेते लियाकत शेख सर,मा.नगराध्यक्ष वैभव भोसले,नगरसेवक विकास वारघडे,नगरसेवक मोहनजी दुगाडे, मा.उपनगराध्यक्ष नारायणजी गोंधळी मा.शहराध्यक्ष रुपेशजी गुजरे, बाबू चौधरी, सागर चंबवणे, दर्शन शेटे, अनिल ठाकरे, अनुसूचित जमातीचे तालुकाध्यक्ष आण्णा साळवे, शिवाजी चन्ने, सुनिलजी घागस, अशोकजी शिंदे, सचिन सूर्यराव, वसंत जाधव, ज्योतीताई गोडांबे, जयवंत हरड, संकेत शहा, आयुष पुरोहित, अभिजित तेलवणे, ओबीसी मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष मनोज देसले,नंदकुमार जाधव, अमोल कथोरे, रमीझ पानसरे, मुश्ताकीन सय्यद, सूरज तेलवणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा मुरबाड शहर अध्यक्ष अतुल देशमुख यांनी केले होते.

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जेष्ठ नागरिक संघास प्रदान !

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जेष्ठ नागरिक संघास प्रदान !



मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
        यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्रातर्फे चव्हाण साहेबांच्या ३६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून " जेष्ठ नागरिक संघ नेरुळ" यांना 'यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार - २०२०', नेरुळ येथील जेष्ठ नागरिक भवनातील श्री गणेश सभागृहात प्रदान करण्यात आला. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचे सामाजिक भान ठेवून अनौपचारिक व साधेपणाने प्रतिष्ठानचे नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी संघास मानपत्र व रुपये १५०००/- चा धनादेश गौरवार्थ प्रदान केले. संघाच्या वतीने अध्यक्ष अरविंद वाळवेकर, कोषाध्यक्ष विकास साठे, उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते व नंदलाल बैनर्जी, सल्लागार प्रकाश लखापते यांनी त्याचा स्वीकार केला. 

        जेष्ठ नागरिकांचे स्वास्थ्य आणि सर्वांगीण विकासासाठी गेली २५ वर्षे अविरतपणे कार्य करत असलेले तसेच जेष्ठ नागरिकांचे प्रेरणास्थान व आधारस्तंभ ठरलेल्या या संघास हा पुरस्कार मिळाल्याने एक वेगळाच उत्स्फूर्त उत्साह कार्यक्रमात होता.

       जेष्ठ नागरिक संघाचे रुग्ण सेवा केंद्राचे कार्य लक्षात घेऊन आवश्यक त्या विविध प्रकारच्या वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी रुपये एक लाख ( रु. १,०००००/- ) चा धनादेश प्रतिष्ठान तर्फे देण्याचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी जाहीर केले व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी सदर धनादेश संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. या छोटेखानी समारंभाला मा. सभागृह नेते व नगरसेवक रविंद्र इथापे, प्रा. व्रुषाली मगदूम,  सुभाष हांडे देशमुख, आबा रणवरे, भालचंद्र माने, आदी मान्यवर व मोजकेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

          प्रतिष्ठानच्या अमरजा चव्हान यांनी संघास दिलेल्या मानपत्राचे सुंदरपणे वाचन केले. शेवटी अजीत मगदूम यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले.

          कोरोनाच्या प्रादुर्भावाचे भान ठेवून आणि योग्य ती काळजी घेऊन सर्वश्री दत्ताराम आंब्रे, दिपक दिघे, दिलीप जाधव, विलास सावंत, दत्तात्रय म्हात्रे, सीमा आगवणे, सुचित्रा कुंचमवार यांनी अपूर्व मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांकडून जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी, सदस्य व सभासद यांना अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या. 

एन.जी पार्क येथील मुलांनी उभारलेल्या तोरणा किल्ला बघण्यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद !

एन.जी पार्क येथील मुलांनी उभारलेल्या तोरणा किल्ला बघण्यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद !


मुंबई (समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर) :
        दिवाळीची चाहूल लागताच लहानग्यांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्व जण अनेक जण फटाके फोडण्याचे फराळावर ताव मारण्याची त्यासोबत किल्ले बांधण्याचे वेध लागते. दिवाळी निमित्ताने किल्ले बांधण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. दिवाळी किल्ले बांधण्याची परंपरा आजही जीवत आहे.  मुंबई उपनगरात ठिकठिकाणी किल्ले बांधण्यात आले आहे.दिवाळी म्हणजेच आनंद मांगल्याचा आणि रोषणाईचा सण परंतु या सोबतच आपली प्राचीन परंपरा प्राचीन इतिहास जपण्याचा प्रयत्न देखील या सणाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे. खरे तर दिवाळीच्या काळात ज्या सुट्ट्या पडतात त्या वेळेला लहान मुलांना वेध लागतात ते किल्ले बनवायचे आणि सुट्टीत फावल्या वेळेत ही मुले एकत्र जमून किल्ले बनवताना ठीक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या महाराष्ट्राची शहान असलेले जंजिरा, शिवनेरी, राजगड आदी किल्ले बच्चेकंपनी सकारतात.

             मुंबईतील बोरीवली पूर्व विभागातील  एन.जी पार्क संकुल येथेही तोरणा किल्ला उभारण्यात आला होता. शिवाजी महाराज यांचा इतिहास व गडकिल्ले यांची सखोला माहीती येणाऱ्या पिढिला मिळावी शिवाय आपली संस्कृती पिढ्यान पिढ्या जपली जावी हा एकमेव उद्देश किल्ले उभारण्यामागचा असतो.एन.जी पार्क संकुल येथील तोरणा किल्ला उभारण्यासाठी तेजश सोड्ये, हेमंत नेवगी, हेमंत गुप्ता, शुभम आरेकर, दिपक सोड्ये, सुशील सिंह ,हर्षद निकुले, हर्षल हिलेकर, आदेश आनगरे, संदेश डोके, यश गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवाय यासाठी एन.जी पार्क संकुल पदाधिकारी व रहिवाशी यांनी मोळाचे सहकार्य केले. हा तोरणा किल्ला पहाण्यासाठी नागरिकांकडून व स्थानिक रहिवाश्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. किल्ले हे महाराजांचे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. यामुळे प्रत्येकांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीला या किल्ला बांधणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगता येतात. किल्ला बांधणीमुळे आम्हाला महाराष्ट्रतील किल्ल्याचा अभ्यास करायला मिळतो. गेल्या  ४ वर्षांपासून आम्ही हे किल्ले बनवत आहोत असे मुलांनी सांगितले.

कोकण विभागातील घरकुलांच्या कामांचे दिलेले उद्दिष्टय विहीत कालावधीत पूर्ण करावे - 'विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ'

कोकण विभागातील घरकुलांच्या कामांचे दिलेले उद्दिष्टय विहीत कालावधीत पूर्ण करावे - 'विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ'
   
      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : सर्वांसाठी घरे-2022 हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांना घरकुलांच्या कामांचे दिलेले उद्दिष्टय विहित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज येथे दिले.
       “महा आवास अभियान-ग्रामीण”  अंतर्गत आयोजित व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित विभागस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
       यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) सर्जेराव म्हस्के पाटील तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आदिवासी विभाग पेण, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन उपस्थित होते.
       विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, सर्वांसाठी घरे-2022 हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पूरक पंडित दीनदयाळ  उपाध्याय घरकुल जागा खरेदी, जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना अशा जवळपास आठ योजना एकत्रित राबविण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. यासाठी लाभार्थ्यांने दि.31 डिसेंबर 2020  पर्यंत घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या घरकुलाचे काम दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्ण करता येईल. राज्य स्तरावरुन या अभियानास सुरुवात झाली असून मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनांनुसार कामकाज करावे. तसेच गवंडी प्रशिक्षणाचे काम दि.15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक डेमो हाऊस तयार करावयाचे असून ते शक्यतो पंचायत समितीच्या आवारात करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. गवंडी प्रशिक्षण व पंचायत समितीमध्ये डेमो हाऊससाठी जागा उपलब्धतेचे काही प्रश्न असतील तर तसे प्रस्ताव सादर करावेत. शहरी भागात राबविण्यात येणाऱ्या घरकुलांच्या योजनासंदर्भातजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची त्यासंदर्भात आढावा बैठक घ्यावी.  
    यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, जिल्ह्यातील रोहा, पेण, श्रीवर्धन तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असून यासाठी अनुदान उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्याप एकही घरकुलाचे बांधकाम झालेले नाही. केंद्र शासनाकडे पाठविलेल्या या प्रस्तावांना अनुदानाच्या उपलब्धतेसह मंजूरी  प्राप्त होताच त्याची कार्यवाही जलदगतीने करण्यात येईल. तसेच रमाई योजनेच्या घरकुलांसाठी वैयक्तिरित्या पाठपुरावा केला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्याकडून प्रस्ताव मागवून घेतले असून ते समाज कल्याण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. शबरी घरकुल योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत आढावा बैठक घेतली असून आदिवासी लोकांचे घरकुलांचे प्रस्ताव घेण्यात आले आहेत. 
       मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जिल्ह्यात 466 घरकुलांची प्रकरणे प्रलंबित असून यामध्ये रमाई आवास योजनेतील सन 2019-20 मधील 350 प्रकरणांसाठी अनुदान उपलब्ध झालेले नाही. प्रलंबित प्रकरणासाठी अनुदान उपलब्ध होताच त्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

Thursday, 26 November 2020

जास्त अंगावर आला तर हात धुवून मागे लागेल - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे !

जास्त अंगावर आला तर हात धुवून मागे लागेल - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे !


मुंबई, प्रतिनिधी - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला असून संजय राऊत उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा यापलीकडे काय सांगणार असा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, ठिक आहे, हात धुतोय, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल असा इशारा त्यांनी या प्रोमोमधून दिलाय. 

या प्रोमोमध्ये संजय राऊत मुख्यमंत्र्यांना हे सरकार आपल्या ओझ्यानं कोसळेल असे भाकीत अनेक ज्योतिषांनी वर्तवले आहे असा प्रश्न विचारतात. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैली वापरत सरकार पडेल असं म्हणणारांचे दात पडत आलेत असे उत्तर दिले. तुम्हाला सुड काढायचा असेल तर तुम्ही एक सुड काढा आम्ही दहा सूड काढतो असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलाय.

या प्रोमोमध्ये मध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे आणि उघडपणे महाराष्ट्रात हे अघोरी प्रयोग सुरू झाले आहेत असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणतात, आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना मूलबाळ आहेत त्यांना मी सांगु इच्छितो की मुलबाळ तुम्हालाही आहेत. तुम्ही धुतल्या तांदळाचे नाही. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी या प्रोमोमधून दिला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार दाखल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार दाखल !


पुणे, प्रतिनिधी - कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचे जगभरात कौतुक होत आहे. भारतीय शास्त्रज्ञांची ही कौतुकास्पद कामगिरी पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी (दि.२८) हजर राहणार आहेत.

जगभरातील संशोधक शास्त्रज्ञ कोरोना महामारीवर मात करू शकणारी लस शोधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लस तयार झाली असून त्याच्या मानवावरील प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून, चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या संशोधनाचे कौतुक जगभरातून केले जात आहे.

शनिवारी दुपारी १ ते २ दरम्यान पंतप्रधान मोदी कोविशिल्ड लसीचा आढावा घेणार आहेत. मात्र या भेटीमध्ये पंतप्रधानांसमवेत १०० देशांचे राजदूत उपस्थित राहणार नसून ते ४ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे.

सर्व १०० राजदूत २७ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येऊन सीरम आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला भेट देणार असल्याने प्रशासनाकडून या पुणे दौरा यशस्वी करण्यासाठी प्रचंड तयारी सुरू आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षासह ५ जणांना अटक !

माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षासह ५ जणांना अटक !

म्हाळुंगे,पुणे -आमच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीत नेमल्याचे दाखवून त्याच्या पगाराचे २२ हजार रुपये दरमहा हप्ता द्या, अशी खंडणीची मागणी करणा-या एका कामगार संघटनेच्या अध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

वेदांत एंटरप्रायजेस नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय शंकर कौदरे (वय ३९, रा. खरोशी, ता. खेड), प्रदीप रामचंदनरा सोनवणे (वय ३२, रा. खरोशी, ता. खेड), गणेश दशरथ सोनवणे (वय ३३, रा. कुरुळी, ता. खेड), स्वप्नील अजिनाथ पवार (वय २९, रा. एकतानगर, चाकण), धोंडिबा उर्फ हनुमंत विनायक वडजे (वय ३२, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कुरुळी येथील एका कंपनीच्या अधिका-यांना कंपनी चालवायची असेल तर आरोपींच्या वेदांत एंटरप्रायजेस नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीत नेमल्याचे दाखवून प्रत्यक्ष त्याला कामावर न घेता त्याचा पगार आणि इतर चार्जेस असा एकूण २२ हजार रुपये हप्ता आम्हाला द्या. नाहीतर तुमच्याकडे बघून घेईन. तुमची विकेट काढीन, अशी धमकी दिली.

याबाबत म्हाळुंगे चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत पोलिसांनी खंडणी स्वीकारण्यासाठी आरोपी कंपनीत येण्याची वेळ गाठून कंपनीत सापळा लावला. आरोपी कंपनीत खंडणीची रक्कम नेण्यासाठी येताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

संविधान दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन !

संविधान दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन !


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : जागतिक विद्वान, थोर कायदेपंडित, घटनातज्ञ, संविधान निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस निरंतर अथक परिश्रम घेऊन तयार केलेले भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेच्या माध्यमातून देशाला अर्पण केले. या निमित्ताने संविधान निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली आणि आपल्या भारत देशाचा कारभार ज्या भारतीय संविधानानुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या विषयी भारतीय नागरिकांत तथा जनमानसात जनजागृती व्हावी या करीता संपूर्ण भारत देशात सर्वत्र दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 
       या संविधान दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
      यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते.

** संविधानिक अधिकार मिळण्यासाठी श्रमिकांचे केंद्र सरकारला साकडे तहसीलदारा मार्फत निवेदन सादर **

** संविधानिक अधिकार मिळण्यासाठी श्रमिकांचे केंद्र सरकारला साकडे तहसीलदारा मार्फत निवेदन सादर **


मुरबाड (मंगल डोंगरे) : भारतीय संविधानात सर्व धर्म समभाव आणि धर्म निरपेक्ष प्रशासकीय यंत्रणा राबविण्याची तरतुद केलेली असताना ग्रामीण भागातील आदिवासी कष्टकरी व श्रमिक हा स्वातंत्र्या नंतर ही उपेक्षित असल्याने आपणाला संविंधानिक अधिकार मिळावेत म्हणुन संविधान दिनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा इंदवी तुळपुळे दशरथ वाघ, प्रभाकर देशमुख, गणपत मेंगाळ यांनी शेकडो श्रमिकासह तहसीलदार कार्यालयावर धडक देत आपणाला सविंधानिक अधिकार आणि हक्क मिळावेत म्हणुन तहसीलदारां मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देत आपला संताप व्यक्त केला. 


              केंद्र सरकारने प्रथम नोटबंदी करुन गोरगरीब जनतेला वेठीस धरले शिवाय सध्या कोरोना कोविड 19 या महामारीने अनेक कष्टकऱ्यांच्या रोजगारावर संक्रांत आणली असल्याने नागरिकांना उपासमारीला समारे जावे लागले. तसेच या काळात अवलंबलेले लोकशाही विरोधी धोरण हे श्रमिक कष्टकरी आदिवासी व अल्पसंख्याक यांचे शोषण करणारे असुन भांडवलदार धार्जिणे आहे. शिवाय लाँकडाऊन मध्ये छोटे उद्योग बंद पडल्याने अर्थव्यवस्था कोलमडली व बेकाराची लाट पसरुन उपासमार होऊ लागली. त्यामुळे संविधानिक तरतुदी नुसार शेतकरी कष्टकरी व आदिवासी यांना विशेष पँकेज देणे अपेक्षित होते.परंतु केंद्र सरकारने संविधनानुसार यांना संरक्षण देणारे कायदे हे लोकशाही चे मार्गाने अमलात आणले नाहीत. ते रद्द करुन वंचित व शोषित घटकांनी केलेल्या मागण्यांचा विचार करुन व जनहित याचिकेवरुन गरिब कल्याण योजनेला सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी, गरिबांना मिळणारे पाच किलो धान्य हे दहा किलो करावे तसेच त्यामध्ये डाळ व तेलाचा समावेश करावा, तालुक्यातील आदिवासी वर लादण्यात येणारे शाई काळु धरण रद्द करावे 73 वी घटना दुरुस्ती व आदिवासी स्वशासन कायदा आणि ग्रामसभांना प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्या चे निवेदन तहसीलदार अमोल कदम यांचे मार्फत पंतप्रधानांना सादर केले.

Wednesday, 25 November 2020

शासकीय कर्मचाऱ्यांनो उद्याच्या संपात सहभागी होऊ नका, अन्यथा कारवाई !

शासकीय कर्मचाऱ्यांनो उद्याच्या संपात सहभागी होऊ नका, अन्यथा कारवाई !

मुंबई, २५ नोव्हेंबर - राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या (गुरुवारी) पुकारलेल्या संपात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याकडेही सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

*संप मागे घेण्याचे सरकारचे आवाहन!*

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

मुंबई शहरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन !

मुंबई शहरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन !
*जिल्हाधिकारी राजीव निवतकर*

       मुंबई दि.२५:- भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.
  दिनांक १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२० या दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. त्या नुसार मोहिमे दरम्यान मुंबई शहर जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघस्तरावर दिनांक ५, ६,१२ व १३ डिसेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्टयांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. 
    या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येतील. 
सर्व नागरिकांनी कुटूंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरीत झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्यावेळी फॉर्म क्रमांक ७ भरुन देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.तसेच http://www.nvsp.in या ठिकाणी देखील मतदार आपली आँनलाईन नोंदणी करू शकतात.
असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत  करण्यात येत आहे.
....................................

आमदार कालिदास कोळंबकर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी संपन्न !

आमदार कालिदास कोळंबकर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी संपन्न !


वडाळा, (नितीन कदम) ; भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार श्री.कालिदास कोळंबकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना योद्धयांस दीपावली निमित्त दिवे वाटप, आंतर बीडीडी क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन आधार कार्ड चे रूपांतर स्मार्ट कार्ड  मोफत वाटप, नेत्रचिकित्सा व मोफत चष्मा वाटप, अनाथ मुलींच्या आश्रमाला महिन्याभराचे  रेशनींग साहित्य वाटप, बौध्द धम्मगुरू भिक्षु यांना चिवरदान व स्नेंह भोजनदान करून साप्ताहिक कार्यक्रमाचा समारोप यानिमित्ताने करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कार्यसम्राट आमदार श्री.कालिदास कोळंबकर, श्री.राजेश शिरवाडकर अध्यक्ष द.म.मुंबई भाजपा श्री.नीरज उभारे महामंत्री द.म.मुंबई भाजपा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून  कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भाजपा द.म.मुंबई उपाध्यक्ष श्री. गजेंद्र भगवान धुमाळे यांनी केले होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कदम, हर्ष छेडा, योगेश कांबळे, अमोल गायकवाड, मयूर जाधव, चित्तरंजन हिरवे, सौरभ दळवी, अक्षय पवार, अंकुर गायकवाड, प्रथमेश होसमणी, संदीप संकपाळ, विजय चव्हाण, अरुण धुमाळ, सुनील गायकवाड, विक्रांत धिवर किरण प्रभाणे, राहुल मोटरे, चेतन सोलंकी, मनोज सोलंकी, शिवम राणावत, प्रणव सिंग, विक्की कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Monday, 23 November 2020

नाट्यगृहाचे भाडे २० ते २५ टक्केच आकारण्याची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी !

नाट्यगृहाचे भाडे २० ते २५ टक्केच आकारण्याची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मागणी !


मुंबई - कोरोना काळात मराठी नाट्य निर्मात्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या नाट्यगृहांची भाडे फक्त २० ते २५ टक्के आकारून ७० ते ७५ टक्के सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांची भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी भेट घेऊन निवेदन सादर केले.
         
याप्रसंगी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष श्री. संतोष काणेकर,उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे, सिने अभिनेते श्री.शरद पोंक्षे, सुशील आंबेकर,अशोक नारकर, दिगंबर प्रभू हे मान्यवर उपस्थित होते. 
       
महापौर किशोरी पेडणेकर मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या की,आपली मागणी रास्त असून  याबाबत संबंधित महापालिका अधिकारी व इतर नाट्य संस्थांचे पदाधिकारी वआपण यांची संयुक्त बैठक २८ नोव्हेंबर २०२० रोजी घेऊन हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन महापौरांनी यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांना दिले. 
         
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृहे नाट्यप्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियमावलीच्या अंतर्गत राहून खुली करण्याचा निर्णय ०५ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर केला. तथापि, पूर्वीच्या हिमतीने नाट्यप्रयोग लावण्याची शक्ती नाट्यनिर्मात्यांमध्ये आता राहिली नसल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

टाळेबंदीच्या काळात  नाट्यनिर्माता  यांना आपल्या नाटकाचे प्रयोग व नवीन नाट्य निर्मितीची तयारी थांबवावी लागली,त्याचा मोठा फटका नाट्य निर्मात्यांना बसला असल्याचे नमूद केले आहे.
      
तरीही नाट्यनिर्माते नाट्य व्यवसाय नव्याने सुरू करण्याची हिंमत बाळगून आहे.यासाठी नाट्य निर्मात्यांना शासनाच्या सहकार्याची आणि आर्थिक साह्याची गरज आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली व महाकवी कालिदास नाट्यमंदिर,मुलुंड या महापालिकेच्या नाट्यगृहाचे व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठीचे भाडे ७० ते ७५ टक्के माफ करून फक्त २० ते २५ टक्केच   करावे, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौरांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट अनिवार्य !

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट अनिवार्य !


मुंबई – मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या वतीने नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान ४ दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

चार राज्यातून ट्रेन व हवाई मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागेल. रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल.

‘ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल’ असे एसओपीमध्ये म्हटले आहे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावील लागेल.

विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.अशाच प्रकारची नियमावली रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुरबाड नगरपंचायतीवर लेबर फ्रंट फेरीवाल्यांचा धडक मोर्चा... !!

मुरबाड नगरपंचायतीवर लेबर फ्रंट फेरीवाल्यांचा  धडक
मोर्चा... !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड शहरातील रस्त्याच्या कडेला बसून फळभाजी विविध खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले, पथविक्रेते, टोपली धारक, छोटे दुकानदार यांनी बुधवारी मुरबाड नगर पंचायतीवर लेबर फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुका युनिट प्रमुख रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मुरबाड नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करीत धडक मोर्चा काढून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध केला.


मुरबाड मधील सर्व फेरीवाल्यांचे वर्गीकरण करण्यात यावे व त्यांची नगरपंचायत दप्तरी नोंद करण्यात यावी. फेरीवाला, पथविक्रेता कायदा लागू करावा, दैनंदिन कर वसुली कमी करण्यात यावी. मुख्य बाजारपेठ मधील फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यात यावी, दैनंदिन बाजारकर वसुली रक्कम अन्यायकारक आहे ती कमी करावी, गटई कामगारांची नोंदणी करून त्यांना बॉक्स देण्याची तजवीज करावी, फेरीवाल्यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना लागू करावी, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करावी अशा मागण्यांसाठी लेबरफ्रंटच्या फेरीवाल्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपंचायत कार्यालयावर घोषणाबाजी करीत हल्लाबोल धडक मोर्चा काढला.


अनेक मागण्याचे निवेदन यावेळी नगरपंचायतीला देण्यात आले.या सर्व मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

या लेबर फ्रंटच्या हल्लाबोल धडक मोर्चाला रिपाइं सेक्युलर, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पाठिंबा दिला होता. वेळी मुरबाड तालुका युनिट प्रमुख रविंद्र चंदणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक वाघचौडे, रिपाइं सेक्युलरचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, तालुका युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, दिलीप धनगर, शरद धनगर, निखिल आहिरे, किशोर गायकवाड, फेरीवाला महिला प्रतिनिधी गीता पवार या पदाधिकारी वर्गासह शेकडो फेरीवाले या मोर्च्यात सामील होते.

या प्रसंगी लेबर फ्रंटच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येणार असून फेरीवाल्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन या वेळी लेबर फ्रंटच्या शिष्ट मंडळाला मुरबाड नगर पंचायतीचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.

राज्याचा मुख्यमंत्री कोण ते आधी जाहीर करा - 'ॲड. प्रकाश आंबेडकर'

राज्याचा मुख्यमंत्री कोण ते आधी जाहीर करा - 'ॲड. प्रकाश आंबेडकर'


"सवलत दिल्याशिवाय वीज बिल भरू नका प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन"

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : राज्याचे मुख्यमंत्री कोण ते आधी जाहीर करा असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली.    
     भाजपच्या काळात वीज बिलाची वसुली न झाल्याने सरकारवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडला आहे. राज्य सरकारने ग्राहकांना वीज बिल माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. 
      विज बिल माफ केले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ५०% विज माफी करण्यात यावी हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले असून तसा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे दिला होता. मात्र हा प्रस्ताव राज्यातील एका मंत्र्याने दाबून ठेवल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण आहे अजित पवार की उद्धव ठाकरे हे सरकारने जाहीर करावे असा खोचक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

एप्रिल ते जून २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडून व मतदारयादीचा का

एप्रिल ते जून २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडून व मतदारयादीचा कार्यक्रम रद्द ! 

"जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील फक्त एका ग्रामपंचायतीचा समावेश"
     
       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्याचा  कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
            राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दि.३१ मार्च २०२० रोजी जिल्ह्या त एप्रिल  ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम दि.१७ मार्च २०२० रोजी करोना महामारीमुळे आहे त्याय टप्यारवर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्याेत येवून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरण्या त आलेली मतदारयादी व चालू निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
            यानुसार एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी त.अष्टमी या ग्रामपंचायतीसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे.

मुरबाड मध्ये वाढीव विज बिलाची होळी करत भाजपाने केला सरकारचा निषेध !!

मुरबाड मध्ये वाढीव विज बिलाची होळी करत भाजपाने केला सरकारचा निषेध  !!


मुरबाड-(मंगल डोंगरे) : आज संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढीव वीज बिलाची होळी करून सरकरचा निषेध करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मुरबाड येथील वीज कार्यालयासमोर विज बिलाची होळी करत सरकार विरोधात आंदोलन  करण्यात आले. लाँकडाऊनच्या काळात महावितरणच्या वतीने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून अव्वाच्या सव्वा वीजबिल देऊन गोरगरीब जनतेला संपूर्ण वीजबिल माफ करण्यात येईल असे आश्वासन देऊन फसवणूक केली गेली. म्हणून एकतर सरकारने संपूर्ण वीजबिल माफ करावे.अन्यथा खुर्ची खाली करावी. असा सज्जड दम देत आज आंदोलन करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी मुरबाड शहर व तालुका वतीने विज बिलात सवलत मिळण्यासाठी हे आंदोलन केले.


या आंदोलनासाठी  मुरबाड विधानसभेचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ठाणे ग्रामिण "श्री किसनजी कथोरे" यांच्या सह 'तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव' 'नगराध्यक्षा छाया चौधरी 'अर्चना विशे उपनगराध्यक्षा ''नगरसेविका साक्षी चौधरी' 'स्नेहा चंबावणे' 'शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे 'शिल्पा देहरकर 'भाजपा सरचिटणीस जयवंत कराळे 'सुरेश बांगर 'दिलीप देशमुख आण्णा साळवे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
     **भविष्यात सरकारने वाढीव वीजबीला बाबत सकारात्मक विचार न केल्यास रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन करणार -आमदार किसन कथोरे **

Sunday, 22 November 2020

लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे'

लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे'



कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर !!


मुंबई दि २२: महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.आज ते समाज माध्यमांवरून  राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

*वारकऱ्यांना आवाहन* 

ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही  आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.

यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. 

 *आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी*

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे. 

*दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल* 

मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे.  गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

*ज्येष्ठ नागरिक , सहव्याधीना सांभाळा*

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे.‌ आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल.  
त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. 

कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.

संविधानाच्या मार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे !!

संविधानाच्या मार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे !!


'प्रबोधनाच्या परंपरामुळेच पुरस्कारास पात्र ठरले:डॉ. नीलम गोर्हे यांची भावना"

पुणे/मुंबई दि २७: ७१ व्या संविधान देण्याच्या निमित्ताने पुण्यातील विविध २० संघटनाच्या वतीने संविधान रत्न पुरस्कार देण्यात आला. या वर्षीचा संविधान रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे आणि कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देण्यात आला. 
२६ नोव्हेंबर या ७१ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर २०२० रोजी  पुण्याच्या भारतीय संविधान व संरक्षण समितीने संविधान रत्न पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी ना.डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्र व पुण्यात काम करणाऱ्या वीस संघटना या निमीत्ताने एकत्र येऊन मला हा 'संविधान रत्न' पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे. आज २१ नोव्हेंबर, २०२० हा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांचा स्मृतीदिन आहे.२१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी प्रचंड जनआंदोलन उभे करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी गोळीबाराचे आदेश दिले होते त्यात १०६ जणांनी प्राण गमावले होते व ३०० हुन अधिक जखमी झाले होते. या सर्व ज्ञात- अज्ञात हुतात्म्यांना ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी अभिवादन केले. 

संविधानाच्या इतिहासात भारतीय लोकशाहीची बिजे रोवलेली आहेत. वैचारिक सुधारणा,जीवन मूल्यांचा संघर्ष, जन्मजात भेदभावांना झुगारून समानतेचे मूल्य स्विकारणे हा संविधानाचा मूलभूत भाग आहे. त्याचसोबत धर्मस्वातंत्र्य, जीविताचा अधिकार, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य या मान्य केलेल्या आहेत. त्याचसोबत नागरिकांवर काही जबाबददारीही सोपविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी कायद्यांचे उल्लंघन केल्यास सरकारला अटक व कैदेचेही अधिकार आहेत. शोषणाविरोधात संरक्षण, बालमजुरी व मानवी तस्करी यापासून सरंक्षणचा अधिकार आपल्याला  प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे मूलभूत अधिकारांनुसार कलम १४, १५, १६ नुसार सर्व नागरिक समान स्त्रीपुरुष व सर्व नागरिक हे समान अधिकार व समान संधी प्राप्त करण्यास पात्र आहेत. त्यासाठी धोरणे व कायदे बदलण्याचा अधिकार सरकारांना असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

या वाटचालीत सुधारणावादी प्रागतिक विचार व स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी शक्ती यांचा प्रवास काहीवेळा समांतर पण  त्यात परस्परांशी पूरकही झाला आहे. ब्रिटिशांनी काही चौकटी करायचा प्रयत्न केला तरी त्यांना स्व:त:च्या  कारभारातून देशावर वेसण घालून शांतता ठेवण्याच्या ईरादा  होता याउलट भारतीय राजकिय सामजिक संविधान निर्मिती प्रयत्नात  देशवासियांचे हित, समानतेचे मूल्य व सर्व संमतीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा होती.

सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती यासाठी समोर दिसतात. पर्यायी घटनेला तयार करून जातपंचायतीच्या नावाने कायद्याच्या चौकटीला हरताळ फासणाऱ्या प्रवृती, जातींच्या चौकटी बाहेरच्या स्वेच्छा विवाहांना विरोध करून "ऑनर किलिंगच्या घटना, सामाजिक माध्यमांवरील स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन मुलांचे लैंगिक शोषण, व्यापार, महिलांची फसवणूक-ब्लॅकमेलिंग, झुडबळी ही आव्हाने आहेत. तर सशक्त व जागरुक न्यायसंस्था, पोलीस यंत्रणेतील सेवाभावी व निरपेक्ष पोलीस अधिकारी कर्मचारी, शिक्षण-वैद्यकीय सेवा- समाजसेवा- उद्योग आदी क्षेत्रात निरपेक्ष कामालाच महत्व देणारे व्यक्ती, प्रवृत्ती, ही सामाजिक शक्तीस्थाने आहेत. 
राजकीय क्षेत्रात सर्वांचा विचार ऐकून घेऊन महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन देशातील-राज्यातील प्रबोधनांच्या परंपरांना बळ देण्याचे काम केले आहे. संविधानाचा विचार हा अनेक तत्त्वांना समावणारा आहे. म्हणूनच शक्तीस्थानापासून नव्या कायद्यांना अवकाश प्राप्त झाले आहे. कायदे बदलच स्त्रिया, कामगार, दलित, आदिवासी, शेतकरी यांना आशेची किरणे  दाखवतात.

कोरोनाच्या संकटातून सामाजिक अंतर एका बाजूस वाढणे क्रमप्राप्त झाले पण मनाच्या जवळिकीचे माणुसकीचे भावबंध किती महत्त्वाचे आहेत हे जाणवले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २०२० ते २०३० हे दशक शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसाठी व ११९९५ च्या विश्व राहिला संमेलनास रौप्य महोत्सव साजरा करतांना *कृतीदशक* म्हणून जाहीर केले आहे. २०३० पर्यंत प्रत्येक शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या १) सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे २) भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. ३) आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. ४) सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे. ५) लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे. ६) पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे. ७)     सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे. ८) शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे. ९) पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे. १०) विविध देशांमधील असमानता दूर करणे. ११) शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे. १२) उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे. १३)   हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे. १४) महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे. १५) परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे. १६) शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे. १७) चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे. म्हणजेच या १७ क्षेत्रात प्रगतीचे मापदंड प्रत्येक देशाने निश्चित करायचे आहेत. सर्वक्षेत्रात ५०% स्त्रिया व " *नो बडी शूट बी लेफ्ट बिहाईंड* म्हणजेच विकासाच्या अधिकाराहून कोणालाही वगळायचे नाही, पाठीमागे सोडून द्यायचे नाही हे त्यात मूलभूत तत्व स्वीकारले आहे. आपणासही संविधानाच्या विचारातून हेच साध्य करायचे आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने आभार  व्यक्त करून भावी काळाच्या  संकल्पना मी आपल्यसमोर अधोरेखित केले आहेत. अशा सविस्तर भावना ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

डॉ. सबनीस म्हणाले, राजकीय व्यवस्था सोयीचा आणि स्वार्थाचा विचार करते देशाचा विचार करत नाही म्हणून जनता जागरूक असायला हवी." अभिनेत्रीसाठी राजभवनाचे दरवाजे उघडले जातात परंतु एखाद्या पीडितेसाठी ते उघडले जात नाहीत असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

यावेळी संविधान रत्न दुसरे  पुरस्कार सन्मानमुर्ती बाबा कांबळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष अँड.प्रमोद आडकर, साहित्य कला प्रसारणी सभेचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष सचिन इटकर, नगरसेविका  लता राजगुरू, रवींद्र माळवदकर, अविनाश बागवे, डॉ.गौतम बेंगाळे, दादासाहेब सोनावणे, विठ्ठल गायकवाड, अमोल देवळेकर, शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे, विवेक चव्हाण, आशा कांबळे, किरण साळी आदी उपस्थित होते.

बौद्धजन पंचायत समिती माणगांव माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ कासारे यांना पत्नी शोक !

बौद्धजन पंचायत समिती माणगांव माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ कासारे यांना पत्नी शोक !

     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुका बौद्ध समाजाच्या सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अनमोल असे योगदान प्रदान करणार्या माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ जयराम कासारे यांच्या सौभाग्यवती पत्नी सुरेखा काशिनाथ कासारे यांचे गुरूवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या पार्थिवावर आमडोशी येथील स्मशानभूमीत त्यांचे कुटुंबिय, आप्त परिवार, सगेसोयरे, आमडोशी बौद्धजन सेवा संघ स्थानिक आणि मुंबईकर भावकीचे पदाधिकारी, सभासद, आमडोशी, बोरघर, पेण, खरवली पंचक्रोशीतील नागरिक, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभाग शाखेचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगांव चे पदाधिकारी, सभासद, माणगांव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि समाज यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
   त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुली जावई, मुलगा सून, दीर, जावा, नंनंद असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदानविधी कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी आमडोशी येथे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे.

बौद्धजन पंचायत समिती माणगांव माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ कासारे यांना पत्नी शोक !

बौद्धजन पंचायत समिती माणगांव माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ कासारे यांना पत्नी शोक !


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुका बौद्ध समाजाच्या सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अनमोल असे योगदान प्रदान करणार्या माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ जयराम कासारे यांच्या सौभाग्यवती पत्नी सुरेखा काशिनाथ कासारे यांचे गुरूवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या पार्थिवावर आमडोशी येथील स्मशानभूमीत त्यांचे कुटुंबिय, आप्त परिवार, सगेसोयरे, आमडोशी बौद्धजन सेवा संघ स्थानिक आणि मुंबईकर भावकीचे पदाधिकारी, सभासद, आमडोशी, बोरघर, पेण, खरवली पंचक्रोशीतील नागरिक, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभाग शाखेचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगांव चे पदाधिकारी, सभासद, माणगांव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि समाज यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
   त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुली जावई, मुलगा सून, दीर, जावा, नंनंद असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदानविधी कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी आमडोशी येथे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे.

भांबेडमधील लांबोरे कुटुंबाला समीर खाडिलकर यांचा मदतीचा हात !

भांबेडमधील लांबोरे कुटुंबाला समीर खाडिलकर यांचा मदतीचा हात !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
        रत्नागिरी  जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड येथील दारीद्ररेषेखाली जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष संजय लांबोरे यांचे दि. २९ ऑक्टोबर सर्पदंशाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कुटूंबात वयस्कर वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. घरातील एकमेव कमावत्या पुरषाचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कै. संजय लांबोरे यांचे साधे कच्चे घर असून सध्या हे घर कुटूंबाला राहण्यासाठी धोकादायक आहे. कुटूंबाचा कर्ता अचानक निघून गेल्याने व राहाण्यासही योग्य निवारा नसल्याने तसेच घरी अन्नधान्याची टंचाई असल्याने अनेक संकटांचा सामना करत कै. संजय लांबोरे यांचे कुटुंब जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. कै. संजय लांबोरे यांच्या संकटग्रस्त कुटूंबाला आधाराची आवश्यकता आहे अशी माहीती मिळताच समाजसेवक व महाराष्ट्र हरित सेना वन विभाग (महाराष्ट्र शासन)चे सदस्य समीर खाडिलकर यांनी खारीचा वाटा उचलत आर्थिक मदतीचा हात दिला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने समीर खाडिलकर यांनी लाँकडाऊन काळावधीत अनेक कुटूंबांना अन्नधान्य वाटप तसेच जेष्ठ नागरिक/पत्रकार, गरजवंत कुटूंब यांना अन्नधान्य वाटप केलेले आहे. अनेक संस्था, मंडळ व प्रसिद्धी माध्यम यांनी समीर खाडिलकर यांना "कोरोना योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. सतत गरजवंतांच्या मदतीला धावणे हा त्यांचा ध्यास आहे. सर्वांनी थोडाफार मदतीचा हातभार लावल्यास कै. संजय लांबोरे यांच्या कुटूंबाला आधार देऊन त्यांना आपण आनंद देऊ शकतो, अशी भावना समीर खाडिलकर यांनी व्यक्त करत होईल ती मदत यापुढेही आपण करु असे आश्वासनही दिले. समीर खाडिलकर यांनी केलेल्या मदतीबद्दल लांबोरे कुटूंबीयांसह स्थानिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

वाघाची वाडी मढ येथे महिला साक्षरतेचा उपक्रम !

वाघाची वाडी मढ येथे महिला साक्षरतेचा उपक्रम ! 


कल्याण (संजय कांबळे) : काही दिवसांपूर्वी पंधराशे रुपये चे अज्ञान, एक महिला व दोन मुलांमधील विडिओ सोशलमिडयावर व्हायरल झाला होता. यातून आजही समाजामध्ये विशेष करून महिलांमध्ये किती निरक्षरता /अज्ञान आहे हे समोर आले होते. त्यामुळे हे लक्षात घेऊन 'अंगठा मी नाही देणार, सही मी करणार ही नाविन्यपूर्ण संकल्पनेतून वाघाची वाडी (मढ) येथील महिलांना साक्षरतेचा धडा गिरवण्यात आला. 

     मुरबाड तालुक्यातील वाघाचीवाडी (मढ) येथे *"अंगठा मी नाही देणार, सही मी करणार"* या नाविन्यपूर्ण महिला साक्षरतेचा साईनाथ बोंबे सामाजिक कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतुन व जयवंत सावळा प्राथमिक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपक्रमातंर्गत छोटेखानी सभा आयोजित केली होती.
       सभेस मढ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व साक्षरता उपक्रमातील माताभगिनी उपस्थित होत्या.
       या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन महिलांना बँक व्यवहार , आपल्या मुलांचे शिक्षण , सरकारी लाभाच्या योजना , आरोग्य शिक्षण, एकीची भावना, आपल्या कुटुंबाचे व्यवस्थापन, मतदानाचा अधिकार, बचत गटांचा आर्थिक व्यवहार, सामाजिक जणिव, अंधश्रद्धा निर्मुलन व महत्वाचे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे , असा हा अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी व परिसराला अनुकरनिय उपक्रम दिसुन आला.
      या उपक्रमाचे संयोजक साईनाथ बोंबे व जयवंत सावळा गुरुजी यांचे विशेष अभिनंदन व या उपक्रमात साक्षर होण्यासाठी उस्फूर्त सहभागी माताभगिनींचे अभिनंदन व या नाविन्यपूर्ण उपक्रमास मनापासून शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण समितीचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत आणि सोनावळे चे केंद्रप्रमुख उल्हास घोलप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Saturday, 21 November 2020

कल्याणच्या पत्री पूलाचा ७०० मेट्रीक टन गर्डर ३९ मीटर पुढे सरकविला गेला !!

कल्याणच्या पत्री पूलाचा ७०० मेट्रीक टन गर्डर ३९ मीटर पुढे सरकविला गेला !!


कल्याण, ॠषिकेश चौधरी, २१ नोव्हेंबर - कलाणच्या पत्री पूलाचा ७०० मेट्रीक टन वजनाचा भला मोठा गर्डर आज चार तासाचा रेल्वे मेगा ब्लॉक घेऊन ३९ मीटर पुढे सरकविला गेला आहे. उद्या उर्वरीत भाग ४ तासाचा मेगा ब्लॉक घेऊन पुढे सरकविला जाणार आहे. या कामाच्या पाहणीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यांनी कामाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आहे.


या कामाची सुरुवात करण्यापूर्वी खासदास शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह कल्याण पूव्रेतील जरीमरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर खासदार शिंदे हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आले. याठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण  मंत्री ठाकरे यांनी सांगितले की, पत्री पूलाचा प्रश्न मोठा होता. तो आत्ता मार्गी लागत आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत  शिंदे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. विकासाची कामे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. राज्यभरातील जी काही रखडलेली पूलाची आणि रस्तायीची कामे आहेत. ती मार्गी लावली जातील. येत्या वर्षभरात समृद्धी महामार्गाचेही काम मार्गी लावण्याचा सरकारकारचा प्रयत्न आहे. 

पूत्री पूलाच्या कामला आधीच विलंब झाला आहे. त्याच्या  गर्डरचने लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पूलाच्या कामातही लक्ष घालावे अशी टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
या पूलाला जोडणारा 9क् फूटी रस्ताच्या अप्रोच अद्याप अपूर्ण आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडी सूट शकत नाही. त्यामुळे गर्डर टाकून उपयोग नाही. या रस्त्याच्या कामाचा जाब विचारायला आम्ही आयुक्तांना भेटायला आलो होतो. आमची पोलिसांनी अडकवणूक केली हे चूकीचे आहे असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. पत्री पूलावरुन शिवसेना मनसे वाद पेटणार आहे.
कल्याणमधील पत्री पूलाचे गर्डर लॉचिंगचे काम आज सुरु झाले. दोन दिवसा लॉचिंगचे काम होणार आहे. या कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या पूलासाठी खासदार शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र पूल तयार व्हायला विलंब झाला. आज लॉचिंगचे अर्धे काम झाले आहे. या दरम्यान कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील हे पूला जवळ अलेल्या 9क् फूटी  रस्त्यावरील अर्धवट असलेल्या अप्रोच रोडची पाहणी करण्यासाठी आले होते. त्याठिकाणी कशा प्रकारे रस्ता अर्धवट आहे याचा जाब अभियंत्याला विचारला. तसेच त्याठिकाणी रस्त्यासाठी भांडणा:या एका जागरुक नागरीक काशीनाथ गुरव याची भेट घेतली गुरव यांनी त्यांची व्यथा आमदाराकडे यावेळी मांडली. यावेळी आमदारांनी आयुक्तांना भेटण्याचे ठरविले. आयुक्त हे पत्रीपूलाजवळ थांबले होते. राजू पाटील मनसे कार्यकत्र्यासोबत पत्रीपूल परिसरात आले. याठिकाणी पोलिसांनी आमदारांसह कार्यकत्र्याना आडविले. त्यानंतर त्यांना पूलाजवळ जाण्याची परवानगी दिली गेली. या ठिकाणी आयुक्त नसल्याने मनसे आमदार भडकले. त्यानंतर फोनवर आयुक्तांशी संपर्क साधून आयुक्ताशी बोलणी केली. आत्ता सोमवारी भेट घेतली जाणार आहे. यावेळी राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि आयुक्तांवर जोरदार टिका केली. 
भाजपच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी सांगितले की, पत्री पूलाचे काम हे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले‌ आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी हे काम होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्याने त्यांनी शिवसेनाला श्रेय दिले नाही. अन्य पूलही मार्गी लावले जावेत. कल्याण डोंबिवलीकर चारही बाजूने पूल कोंडीत सापडले असल्याची टिकाही चौधरी यांनी केली.

कल्याण स्टेशन परिसरातील शहीद स्मारक झाले गायब

कल्याण स्टेशन परिसरातील शहीद स्मारक झाले गायब !


"पोलिस व कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन उदासीन"



कल्याण-मुंबईवर 26-11 चा अतिरेकी हल्ला झाला. त्यात सैनाचे जवान, पोलिस व नागरीक अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले. त्यांच्या स्मरणार्थ कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील फुले चौकात शहीद स्मारक उभारले होते. हे स्मारक गायब झाले आहे. त्यामुळे शहीदांच्या स्मारकाविषयी पोलिस व कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन किती उदासीन आहे हीच बाब उघड झाली आहे.
शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेविका अस्मीता मोरे यांच्या पुढाकाराने हे स्मारक उभारले होते. या स्मारकाचे स्वरुप शहीदाच्या हातातील बंदूक व त्यावर शहीद जवानाची टोपी असे होते. या स्मारकाची देखभाल महापालिकेकडून केली जात नव्हती. त्या स्मारकाच्या चबुत:यावर भटकी कुत्री बसत होती. वर्षभरापूर्वी जागरुक नागरीकांनी स्मारकाच्या दुरावस्थेविषयी लक्ष वेधले होते. स्मारकाच्या बंदूकीवरील टोपी गायब होती. पोलिसानी ही टोपी दुरुस्तीकरीता काढून ठेवल्याचे त्यावेळी स्पष्ट केले आहे. आत्ता स्मारकाची बंदूक व टोपीच गायब झाली आहे. त्याठिकाणी केवळ चबूतराच आहे. पोलिसांकडून याविषयी काही एक माहिती दिली जात नाही. शेजारीच सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे. रात्रीच्या वेळी त्याठिकाणी पोलिस व्हॅन उभी असते. तर हे स्मारक चोरीला कसे काय जाऊ शकते असा सवाल उपस्थित केला जात आहे. चोरीला गेले नाही तर गेले कुठे असा प्रश्न आहे. महापालिकेच्या अधिका:यांनी हे स्मारक आम्ही उभारले नव्हते असे बोलून हात वरती केले आहेत. स्मारकांची सुरक्षितता जपणो ही जबाबदारी पोलिसांची तर देखभाल महापालिकेची असते. त्यांनी हात वरती केल्यावर स्मारकाचे काय होणार असा हे उघड आहे. या स्मारकाच्या नजीक महात्मा फुले यांचा पुतळा आहे. या पुतळ्य़ाला गदरुल्ल्यांचा वेढा असतो. नशाबाज व गदरुल्ले त्याठिकाणी झोपून असतात. त्याठिकाणी कपडे वाळत टाकतात. त्याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष आहे. आत्तातर शहीद स्मारक गायब झाल्याने पोलिसांना काही एक पडलेली नाही हे यातून स्पष्ट होत आहे. तर माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी सांगितले कि सहा महिन्या पूर्वी स्मारकाची बंदूक व त्यावर शहीद जवानाची टोपी पालिकेने कडून नेली ...

भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली, पालकमंत्र्यांची भेट, सज्ज राहण्याच्या सूचना ?

भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली, पालकमंत्र्यांची भेट, सज्ज राहण्याच्या सूचना ? 


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात आज सुरू होईल उद्या सुरू होईल असे करुन तब्बल आठ महिने सुरू न झालेल्या भिवंडी तालुक्यातील सावज आणि कल्याण तालुक्यातील वरप येथील कोव्हीड केअर सेंटर आता पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार आहे असे सुतोवाच   वर्तवून प्रशासनाला सज्ज आणि सतर्क राहण्याच्या सूचना आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वरप येथील भेटी दरम्यान कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांना दिल्या.
राज्यातील वाढत्या कोरोनोच्या धसक्याने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊण लागू केले होते. त्यामुळे गेल्या ७/८ महिने राज्यातील नागरिक मोठय़ा भितीने घरात बसले होते. पण ५/६महिन्यानंतर कोरोना चा प्रभाव थोडा कमी झाला व एक एक व्यवहार हळूहळू सुरू झाला. परंतु तोपर्यंत या कोरोना ने लाखो नागरिकांचा बळी घेतला. यातून मुंबई शहरा सह शेजारील ठाणे, कल्याण अगदी मुरबाड शहापूर हा ग्रामीण पट्टा देखील यातून वाचला नाही.
हे रोखण्यासाठी भिवंडी व कल्याण तालुक्यातील सावज आणि वरप येथे कोरोना कोव्हीड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक वेळ अशी होती की ग्रामीण भागातील कोरोना पाॅझिटिव रुण्गांना कल्याण, ठाणे या शहरी भागात बेड मिळत नसल्याने त्यांचेवर जीव गमावण्याची वेळ आली होती. त्यामुळे हे कोव्हीड केअर सेंटर सुरू व्हावे म्हणून तालुक्यातील पत्रकार लोकप्रतिनिधी यांनी भंयकर प्रयत्न केले. परंतु आज अखेर पर्यंत हे काय सुरू झाले नाही. त्यातच कोरोना चे पेंशंट कमी झाल्याने याकडे सर्वाचेच दुर्लक्ष झाले.
गेल्या दहा पंधरा दिवसांपासून कल्याण तालुक्यात कोरोनाचा एकही पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. कल्याण ग्रामीण भागात १०८८, केडिएमसी ३८८०, घरी विलगीकरण केलेले ३५हजार १२७ तर हायरिस्क विलगीकरण १५हजार ७९९ इतके पेंशंट आहेत यामध्ये आतापर्यंत ४हजार ३३२ पेंशंट ना डिसचार्ज दिला आहे. अॅक्टिव केसेस ५१६ तर आतापर्यंत १२० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे वाटत असतानाच युरोपियन देशात पुन्हा एकदा लाॅकडाऊण लागू करण्यात आले आहे. तर दिल्ली शहरात परत एकदा कोरोना ने डोके वर काढले आहे. त्यामुळे तेथे लाॅकडाऊण लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्याच पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारने आरोग्य विभागासह सर्व प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यातच दिवाळी काळात मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली. धार्मिक स्थळे उघडली आणि भोळ्या भाबड्या भक्तांची एकच झुंबड उडाली व कोरोनाला आमंत्रण दिले. गणेशोत्सवात झालेली चूक सुधारण्यासाठी प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाची आपत्ती आलीच तर संपूर्ण तयारी असावी म्हणून आज जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी तालुक्यातील सावज येथील कोव्हीड केअर सेंटर ला भेट दिली. येथे सुमारे १हजार बेड व सर्व सोईसुविधा कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच कल्याण तालुक्यातील वरप येथील कोव्हीड केअर ला देखील पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्याच्या समवेत कल्याण तहसीलदार दीपक आकडे उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना ची दुसरी लाट येणार आहे असे लक्षात घेऊन सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून आपले कोरोना कोव्हीड विरोधातील युद्ध जिकांयचे असेल तर यापुढे देखील सोशलडिस्टींग चे पालन करुन, मास्क, सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे. 

Friday, 20 November 2020

मुरबाड संजय गांधी निराधार योजनचे अनुदान मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन !!

मुरबाड संजय गांधी निराधार योजनचे अनुदान मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन !!
  

मुरबाड, (मंगल डोंगरे) :
   मुरबाड तालुक्यातील निराधार विधवा  महिला व दिंव्यांग व्यक्तींसाठी संजयगांधी निराधार योजना मार्फत मिळणारे मासिक अनुदान गेले दोन महिने न मिळाल्यामुळे मुरबाड तालुक्यातील निराधार महिला व दिंव्यांग व्यक्तीना आर्थिक अडचण येते असल्याने सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या वतीने मुरबाड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
  तहसीलदार साहेबांनी सदर निवेदनाची दखल घेऊन त्वरित कार्यवाही आदेश संबंधित यंत्रणेस दिले असुन लवकरच अनुदान दिले जाईल असे आश्वासन दिले. 
  सदर निवेदन देताना सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव राज्य जेष्ठ सल्लागार राजाभाऊ सरनोबत राज्य सचिव लक्ष्मण पवार ठाणे जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव मुरबाड तालुका अध्यक्ष महादु भोईर प्रथमेश सावंत चिंतामण माळी अदि पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, 19 November 2020

जिल्हा रुग्णालयाचा वापर नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्याच्या जागेची पाहणी प्रक्रिया पूर्ण !

जिल्हा रुग्णालयाचा वापर नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्याच्या जागेची पाहणी प्रक्रिया पूर्ण !


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील अलिबाग येथे नियोजित नवीन शासकीय महाविद्यालयासाठी वापर  करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. 
    त्यानुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचाही पाठपुरावा सुरूच हाेता. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर करण्यास शासन मान्यता दिलेल्या जागेची आज मुंबई जे.जे.रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय विभागाचे प्राध्यापक डॉ.गजानन चव्हाण, सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद शिनगारे, अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी पाहणी करुन याबाबत सकारात्मक चर्चाही करण्यात आली. 
         यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी घाबरून वाढीव वीजबिलं भरु नयेत आम्ही ग्राहकांसोबत मनसे आवाहन !

नागरिकांनी घाबरून वाढीव वीजबिलं भरु नयेत आम्ही ग्राहकांसोबत मनसे आवाहन !


मुंबई, १९ नोव्हेंबर:- कोरोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, वाढीव वीजबिलं भरु नयेत, असं आवाहनं देखील नांदगावकर यांनी केलं आहे.

‘वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सरकारला सोमवारपर्यंतची मुदत देत आहोत. त्यांनी हा प्रश्न सोडवावा. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे नेऊ. मनसेकडून राज्यभर तीव्र आंदोलनं छेडली जातील. मनसेची आंदोलनं काय असतात, याची राज्याला कल्पना आहे. नागरिकांनी वीज बिलं भरू नयेत, असं आमचं त्यांना आवाहन आहे. वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास येऊ नये. कर्मचारी वीज कापण्यास आल्यास मनसैनिक त्यांना सामोरे जातील. त्यानंतर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल,’ असा स्पष्ट इशारा नांदगावकर यांनी दिला.

मुरबाड शहरातील आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी !!

मुरबाड शहरातील आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड कृषि उत्पन्न बाजार समितिच्या मुख्य बाजार आवारात दर शुक्रवारी शेती उत्पादित मालाचा व भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरत होता. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार लाँकडाऊन सुरु झाल्या पासून आजपर्यंत बंद आहे. त्यामुळे शेतकरी, छोटे व्यापारी यांचे व बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. मुरबाड तालुका हा शेती उपजीविकेवर अवलंबून असलेला शेतकऱ्यांच्या तालुका आहे. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण मुरबाड तालुका असून समितिच्या कार्यक्षेञातील तसेच कार्यक्षेञा बाहेरील शेतकरी ,व्यापारी व ग्राहक यांचे सोयीसुविधे साठी समितिच्या मुरबाड बाजार आवारात शेतीउत्पादित माल, सर्व प्रकारचा भाजीपाला, कांदा, बटाटा ,फळे, फुले इत्यादी खरेदी -विक्री करिता तसेच शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना एकाच ठिकाणी  ताजा भाजीपाला, सुकी मच्छी व शेती उत्पादित माल मिळावा म्हणून आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी समितिच्या वतिने मुरबाड नगरपंचायत प्रशासना कडे मागणी केली आहे. कोरोना विषाणू  संबंधी शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन मुरबाड बाजार समिती तयार असून शासनाने आता अनलाॕक प्रक्रिया सूरु केले आहे. राज्यातील अनेक महत्त्वाचे व मोठ्या बाजासमित्या सूरु झाल्या असल्याने मुरबाड आठवडी बाजार सूद्धा सूरु करण्याची परवानगी द्यावी अशी लेखी मागणी बाजार समितिच्या वतीने केली आहे. 

**बाजार समितीच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन त्यावर चर्चा करुन पुढिल निर्णय घेतला जाईल - 'परितोष कंकाळ, मुख्याधिकारी' नगरपंचायत मुरबाड**

मुरबाड तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीवर प्रशासकांंचा ताबा !!

मुरबाड तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीवर प्रशासकांंचा ताबा !!                     

**अधिकारी डॉक्टर आणि केंद्र प्रमुख  पाहणार गावचा कारभार **

मुरबाड, (मंगल डोंगरे ) - कोरोना कोविड 19 या महामारीला सामोरे जाण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आपला पाच वर्षाचा कालावधी संपलेल्या सरपंचाला पदावरून दुर करत, मुरबाड तालुक्यातील सुमारे 41 ग्रामपंचायतीवर केंद्र प्रमुख, शाखाअभियंता, विस्तार अधिकारी, व पशुधन अधिकारी ह्यांची प्रशासक म्हणुन   नियुक्ती करत असल्याने ते आज पासुन प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारत आहेत.

               ग्रामीण भागातील गावचा प्रथम नागरिक म्हणून संपुर्ण गावाची जबाबदारी असणारा सरपंच तो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित मात्र तो गावच्या विकासासाठी जो निर्णय घेईल तो सर्वानी मान्य करायचे. आणि तो ठराव प्रस्ताव ग्रामसेवकांनी पुढे मंजुरीसाठी पाठवायचा मग ती योजन असो किंवा कोणते विकास काम असो ते मंजुर केव्हा झाले. त्याचा निधी कुठे खर्च झाला हे ग्रामसेवक आणि सरपंच यांनाच माहीत. म्हणुन सरपंच पदाची खुर्ची मिळावी यासाठी वडलोपार्जित मिळकतीचा विचार न करता ती निवडणुक लढण्यासाठी कवडीमोलाने विक्री करणाऱ्या सुमारे 41 सरपंचाची मुदत 19 नोव्हेंबर 2020 रोजी संपल्याने कोरोना कोविड 19 या राष्ट्रीय आपत्तीमुळे त्या ग्रामपंचायतीच्या मुदतपूर्व निवडणुका घेणे निवडणुक आयोगाला शक्य झाले नसल्याने आपला काळावधी संपल्याने सरपंचाला आपल्या पदापासून दुर व्हावे लागत आहे. मात्र सरपंच नसेल तर गावच्या विकासकामांचा व वेगवेगळ्या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी पुर्वी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची नेमणुक प्रशासक म्हणून करण्यात येत होती. आणि ते सरपंच पदाची जबाबदारी पार पाडत होते. कारण त्यांना ग्रामपंचायत चे कारभाराचा पुर्णतः अभ्यास होता. मात्र या ग्रामपंचायतीच्या कारभाराचा कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसणाऱ्या केंद्र प्रमुख, शाखा अभियंता, पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे प्रशासनाने ग्रामपंचायत चा कारभार सोपविला असला तरी पंचायत समितीकडे सुमारे 50% अधिकारी वर्गाची कमतरता असल्याने एकेका अधिकाऱ्याकडे दोन- तीन  कार्यभार आहेत. शिवाय त्यांचेकडे आता ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने आठवड्याचे पाच हि दिवस  त्यांना सतत कामाचे तणावात काम करावे लागणार असले तरी अशिक्षित सरपंचापेक्षा एक उच्चपदस्थ अधिकारी ती जबाबदारी पार पाडत असल्याने सध्या गटतट आणि राजकीय वादावर पडदा पडला असुन सुशिक्षित नागरिकाकडुन  आयोगाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

**पंचायत समिती च्या सर्वच विभागात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकेका अधिकाऱ्याकडे दोन तीन पदभार आहेत. शिवाय शासनाचे आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या प्रशासकाचा कार्यभार देखील त्यांचेवर सोपविण्यात आला असल्याने अधिकारी तणावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यांचेशी चर्चा करणार आहे. संघरत्ना खिल्लारे. गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड.

       ** ग्रामपंचायत चे प्रशासक **

आगाशी-चंद्रशेखर भालेकर.पशुधन पर्यवेक्षक

आंबेगाव-काशिनाथ हिरु शेलवले.केंद्रप्रमुख

आंबेटेभे- दिलीप धानके.पशुधन पर्यवेक्षक

आसोसे- राजेंद्र पाटील. पशुधन पर्यवेक्षक

कान्हार्ले- विसावले .शाखा अभियंता

खांदारे- परमेश्वर पोटे.पशुधन पर्यवेक्षक

बांधिवली -ललित सुभाष बडगुजर.विस्तार अधिकारी क्रुषी

भुवन-सुभाष वाघचौरे.पशुधन पर्यवेक्षक

बोरगाव -संजय धनगर -केंद्र प्रमुख

धानिवली-रविंद्र चौधरी विस्तार अधिकारी क्रुषी

चिरड-आनंद मुरेकर.विस्तार अधिकारी

डेहनोली-एस एम महाजन .शाखा अभियंता. ल.पा.

देवपे- उल्हास घोलप.केंद्रप्रमुख

देहरी-जयवंत धलपे.केंद्रप्रमुख.

फणसोली-बाबाजी धनगर. केंद्रप्रमुख 

कलमखांडे-जे.पी.बनकरी.शाखा अभियंता. पा.पु

करवेळे-शंकर भोईर. केंद्र प्रमुख

केदुर्ली-पी.एम बालोडे.शाखा अभियंता. बांधकाम

खानिवरे-चेतन महाला.शाखा अभियंता. बांधकाम

खांडपे- भागवत दौड.पशुधन पर्यवेक्षक

खाटेघर- पराग भोसले.विस्तार अधिकारी.

माल्हेड-ए.ए.सैय्यद शाखा अभियंता बांधकाम

मानिवली.बु।।लता निकम केंद्र प्रमुख

मानिवली शि।।ए.ए.सय्यद शाखा अभियंता बांधकाम

मासले- तुकाराम जंगम.शाखा अभियंता. बांधकाम

म्हसा- आनंद मुरेकर.विस्तार अधिकारी

मोहोप- गजानन सुरोशे .विस्तार अधिकारी.

नागाव- ए.सी.बडगुजर. शाखा अभियंता लपा

नारिवली- चेतन महाला. शाखाअभियंता

पाटगाव- रविंद्र चौधरी.विस्तार अधिकारी क्रुषी।

पोटगाव- गजानन सुरोशे

सरळगाव-पराग भोसले

शिदगाव-के.के.सासे.

शिरवली मा।। जे.पी.बनकरी.

शिरगाव-विसावले.शाखा अभियंता

शिवळे-पराग भोसले.विस्तार अधिकारी

तुळई-सुरेखा बंदसोडे.केंद्र प्रमुख

उचले-ए.सी.बडगुजर शाखा अभियंता 

विढे- परमेश्वर पोटे.पशुधन पर्यवेक्षक

वाघिवली-रविंद्र चौधरी 

गवाळी - दिलीप धानके.

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार !

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार !


ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मार्फत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील फिडरवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

     शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत( रूपादेवीपाडा, केनीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं. २, वागळे फायर ब्रिगेड) माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत( कोलशेत गाव, बाळकूम), तसेच वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा इत्यादी भागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे.

     या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

शहापूर मध्ये काँग्रेस तर्फे स्व इंदिरा गांधी यांची जयंती साजरी !

शहापूर मध्ये काँग्रेस तर्फे स्व इंदिरा गांधी यांची जयंती साजरी !


शहापूर (एस.एल.गुडेकर) :

           देशाच्या माजी पंतप्रधान व भारताला विकासाच्या उंबरठ्यावर  घेऊन जाणाऱ्या स्व इंदिराजी गांधी यांची १०३ वी जयंती शहापूर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने शहापूर येथे साजरी करण्यात आली,यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके,आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की या देशाला नवी दिशा देण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले आहे,गांधी नेहरू ही देशाची विचारधारा असून त्यांच्या विचारानेच देश क्रांतिकारक विकास करू शकतो,यावेळी जेष्ठ नेते नारायण वेखंडे,ओबीसी विभागाचे अध्यक्ष जितेश विशे, युवा नेते देवेन भेरे, झिपा वीर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रम प्रसंगी सोगाव येथील राहुल आत्माराम देसले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असून त्यांना युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

            कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष आबा देशमुख, लक्ष्मण घरत,जेष्ठ नेते गजानन बसवंत,महिला अध्यक्षा संध्याताई पाटेकर,लक्ष्मण निचिते,जयकुमार करण, संतोष साळवे,निखिल मोंडूला,बाळा घरत,गजानन घरत,बापू विचारे, जगताप,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !! **इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन  पुणे,...