Thursday, 24 February 2022

"बातमीदार माझा" व "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" कल्याण तालूक्याच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त *"विजय दरेकर"* यांचे केले स्वागत. .!

"बातमीदार माझा" व "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" कल्याण तालूक्याच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त *"विजय दरेकर"* यांचे केले स्वागत. .!


कल्याण, (सागर शिंदे) - सहाय्यक पोलीस आयुक्त "आदरणीय विजय दरेकर" यांची कल्याण जीआरपी येथील रिक्त पदावर नुकतीच नियुक्ती झाली असुन काही दिवसांपुर्वी त्यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. सपोआ विजय दरेकर हे कोकण भुमीपुत्र असुन आतापर्यंत त्यांनी पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.


अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या कल्याण जीआरपी सहाय्यक पोलीस आयुक्त पदी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विजय दरेकर यांची वर्णी लागल्याने "बातमीदार माझा" चे मुख्य संपादक *सचिन बुटाला,* स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय निरीक्षक आणि अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत.* अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कल्याण तालूकाध्यक्ष *सचिन गाडे* यांनी *सहाय्यक पोलीस आयुक्त मा. विजय दरेकर* यांचा त्यांचे कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस मंगलमय सदिच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

हिंदूंचा पराक्रम, शौर्याचा इतिहास नव्या पिढीला सांगणं आवश्यक असून त्याला सावरकर चरित्राची जोड देणं गरजेचे आहे - स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक व वक्ता पार्थबावस्कर

हिंदूंचा पराक्रम, शौर्याचा इतिहास नव्या पिढीला सांगणं आवश्यक असून त्याला सावरकर चरित्राची जोड देणं गरजेचे आहे - स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी...