Tuesday 1 October 2024

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षण निरीक्षक मा. श्री. मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!!

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षक निरीक्षक मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!!
दै बातमीदार आज ता. 1, संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम या शाळेचा शंभर टक्के निकालाबद्दल माननीय श्री मुस्ताक शेख साहेब, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, उत्तर विभाग, चेंबर मुंबई यांच्या शुभहस्ते रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. केलेला सन्मान मुख्याध्यापकांचा नसून रात्र शाळेशी संबंधित संपूर्ण घटकांचा आहे असे मत राऊत सरांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम एल विभाग माध्यमिक शाळा समूह व आदर्श शैक्षणिक संस्था यांच्या सौजन्याने मायकल हायस्कूल कुर्ला पश्चिम येथे 30 सप्टेंबर 2024 रोजी पार पाडला. या कार्यक्रमांमध्ये नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व 90% पेक्षा जास्त माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजचा निकाल लागणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 
या कार्यक्रमास शिक्षण विभाग बृहन्मुंबई उत्तर विभागाचे सर्व  पदाधिकारी तसेच एल वार्डमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित होते.

कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार, स्मित हरी प्रॉडक्ट्शन मुंबई, मा.आमदार श्री.किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती "नटसम्राट" श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे जल्लोषात संपन्न !

कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार, स्मित हरी प्रॉडक्ट्शन मुंबई, मा.आमदार श्री.किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती "नटसम्राट" श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे जल्लोषात संपन्न !

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :

              नटसम्राट' नाटकाचे नाव घेतले की सर्वप्रथम बि.वा.शिरवाडकर अर्थाच श्रद्धास्थानी असलेले कुसुमाग्रज आठवायला लागतात.मग हे नाटक सादर करण्यासाठी ज्या कलाकारांनी आपले योगदान दिले त्यांची नावे एक 'एक करून आठवायला लागतात.

              यशवंत दत्त, श्रीराम लागू, दत्ता भट,उपेंद्र दाते, राजा गोसावी असे कितीतरी कलाकार सांगता येतील त्यांनी ही नटसम्राटची भूमिका साकार करून प्रेक्षकांच्या हृदयात कायम मानाचे स्थान मिळवलेले आहे. त्यामुळेच या आजारामर कलाकृतीवर अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटत आहे. नाना पाटेकर
यांनी हा नटसम्राट चित्रपटांमध्ये साकार केला होता. नवोदित कलाकारांना सुद्धा या नाटकापासून काही अलिप्त राहाता आले नाही. भालचंद्र उसगांवकर यांनी आपल्या दिग्दर्शनात हे नाटक मुंबईकरांना विनामूल्य दाखवण्याचे ठरवले आणि सोमवारी (दि.३० सप्टेंबर २०२४) रोजी कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार आणि स्मित हरी प्रॉडक्ट्शन मुंबई, मा.आमदार शिवसेना सचिव, प्रवक्ता श्री.किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत दादर पश्चिम येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती "नटसम्राट"चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जेष्ठ सिने -नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक मान. अरुणजी नलावडे, मा.आमदार शिवसेना सचिव, प्रवक्ता श्री. किरण पावसकर, पत्रकार डॉ.समीर वि. खाडिलकर (माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना -मुंबई विभाग जन संपर्क अधिकारी )आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमची सुरुवात झाली. यावेळी मुंबई -गोवा मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती, कलाकार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाटकात भाग घेणारे सर्व कलाकार हे गोव्यातील आहेत तेथील सांस्कृतिक केंद्राने प्रेक्षकांनी या "नटसग्नाट" नाटकाचे कौतुक केल्यानंतर हा कलाकार संच मुंबईत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होऊन त्यांनी हा विनामूल्य प्रयोग मुंबई मधील रसिकांसाठी सादर केला. गोव्याच्या कला व संस्कृती संचालनालय,पु. ल. देशपांडे कला अकादमी,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा विनामूल्य नाटकाचा प्रयोग झाला.
नटसम्राट नाटकात अप्पासाहेब गणपतराव बेलवलकर यांची मुख्य भूमिका श्री. भालचंद्र उसगावकर यांनी केली.  

         भालचंद्र उसगावकर यांनी ही भूमिका एवढी प्रभावीपणे साकारली की जणू अप्पाराव यांचे जिवंत जीवन चरित्रच त्यांनी डोळ्यासमोर उभे केले. गोव्यातील असूनही शुद्ध मराठीत बेलवलकरांची भूमिका करणे कठीण असून त्यांनी त्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्या भूमिकेत कुठेही over acting किंवा कृत्रिमपणा जाणवले नाही. खास म्हणजे नाना पाटेकर यांनी केलेला नटसम्राट चित्रपट गाजल्यावर प्रेक्षकांच्या मनावर त्याचे स्मरण होणे व तुलना होणे साहजिक आहे. यांचे संवाद अप्रतिम होते. आवाजाचा चड उतार, भावना, या नाटकातील लांबलचक संवाद हे उसगावकर यांनी सुंदर सांभाळले आहे. त्यांनी एकट्याने पूर्ण नाटक आपल्या खांद्यावर सांभाळले आहे. त्यांचा एकल दृश्य दर वेळेला सुपरहिट गेला. त्यांचे नाती सोबत होणारे एक दृष्यही खूप सुंदर झाले आहे. बालकलाकार मुलीने सुंदर अभिनय करून श्रोत्यांचे मन जिंकले. 

           नाटकात आपल्या अभिनयाने सर्वात उत्कृष्ट असा अभिनय अजून कोणी केला असेल तर शेवटच्या दृश्यात बूट पॉलिश करणारा मुलगा. या बाल कलाकाराने दिलेल्या सहकार्याने शेवटचा दृश्य खूपच मनाला भिडतो व अप्पांच्या परिस्थितीला पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येणे हे नाटक अप्रतिम झाल्याचे द्योतक आहे. नटसम्राट सारखा गाजलेला नाटक करणे हे दुहेरी. पण कालच्या या नाटकात मुख्य कलाकारांच्या अभिनयाने सर्व रसिकांचे मन जिंकले.
           याशिवाय या नाटकात नम्रता गडेकर, मनाली प्रियोळकर, सेजल पार्सेकर, हरीष अडकोणकर, सयोग मडकईकर, महेंद्र बांदोडकर, कु.मायरा कुबल, कु.नेहाल अडकोणकर, दादू पार्सेकर, वासुदेव मुळगांवकर, रुपेश शिरगांवकर, पुंडलीक धुळापकर व प्रेमानंद कलशांवकर यांचा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग आहे.खेमराज पिळगांवकर, सत्यवान शिलकर व संतोष नाईक यांनी तांत्रिक बाजू 'सांभाळलेली आहे. नविता उसगांवकर हे या नाटकाच्या निर्मात्या आहेत.

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान !!

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान !!

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :
            साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान कार्यक्रम करण्यात आला.

            यावेळी मुलांना सकाळचा नाश्ता जेवण व खाऊ वाटप करण्यात आले. 

            याकामी श्री.मंगेश अंकुश रासम, सौ.मनीषा मंगेश रासम, श्री.अंकुश रासम, सौ. ममता तन्मय सांवत, श्री.अनिल वडके, श्री.प्रकाश राशिंगकर, श्री.महेश वर्मा, कु.समीर सागवेकर, श्री.शरद नाक्ती, श्री.हरीश गवळी, श्री.तन्मय सांवत, सौ.नंदा सांवत, रजनी हुमरस्कर, कु.प्रशांत पिले,  कु.हिरन टेलर, श्री.विनायक सावंत, सौ. दिपीका सावंत, श्री.राम किरत गुप्ता, श्री.महेश मेहता, श्री.संतोष बडंबे व मित्र आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश माळी, श्री.यंशवत वातास सर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. तुलसीदास तांडेल, अधीक्षक श्री.बाबुराव बाबू धांगडा, श्री.मंजुळा मालजी गावित व कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षण निरीक्षक मा. श्री. मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!!

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षक निरीक्षक मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!! दै बातमीदार आज त...