Friday, 29 November 2024

राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी !!

राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी !!

राजापूर, (केतन भोज) : २६७ राजापूर,विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर निकालावरती संशय निर्माण झाल्यामुळे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदविला असल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन साळवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. दि.२६ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक निकाल लागल्यानंतर ७ दिवसाच्या आतमध्ये EVM व VVPAT च्या पडताळणीची मागणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करु शकतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने  मतदान केंद्र क्रमांक २- चाफवली व २०० - तुळसवडे चे  EVM मायक्रो कंट्रोलर व VVPAT ची पडताळणी करुन निर्माण झालेला संशय दूर करावा असे निवेदन दिल्याची माहिती माजी आमदार राजन साळवी यांनी केली आहे.

Wednesday, 27 November 2024

देवरुख एस.टी आगार व्यवस्थापक पदी रेश्मा मधाळे यांची नियुक्ती !!

देवरुख एस.टी आगार व्यवस्थापक पदी रेश्मा मधाळे यांची नियुक्ती !!

कोकण (शांताराम गुडेकर) :
 
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरूख एस. टी.आगाराच्या आगार व्यवस्थापक पदी रेश्मा दिपक मधाळे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांची सातारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी रेश्मा मधाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
           रेश्मा दिपक मधाळे या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील असून त्यांच्या एसटी महामंडळा तील सेवेची सुरुवात सन २०११ मध्ये कोल्हापूरमधील कागल आगारात वाहतूक निरीक्षक पदापासून झाली. यानंतर त्या सन २०१६ मध्ये देवरुख आगारात सहाय्यक वाहतूक अधिक्षक म्हणून रुजू झाल्या. याठिकाणी त्यांनी ४ वर्षे सेवा बजावली तर २०२० मध्ये दापोली आगारात आगार व्यवस्थापक म्हणून त्यांची बदली झाली. त्यांनी सर्व ठिकाणी उत्तम कामगिरी केली आहे. आता त्यांची देवरुख आगारात आगार व्यवस्थापक पदी नियुक्ती झाली आहे. 
           याबद्दल त्यांना विचारले असता आगारातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय ठेवून आधीच तोट्यात असणाऱ्या या आगाराला तोट्या तून बाहेर काढून आगाराचे उत्पन्न वाढवण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. तसेच प्रवाशांना जलद व सुरक्षित सेवा देण्यावर आपला भर राहणार आहे. लांबपल्ल्या च्या गाड्या वाढविण्यात येणार आहेत. मद्यप्राशन करून कर्मचारी आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत आगाराला नवीन गाड्याही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवरुख एस. टी आगार व्यवस्थापक म्हणून त्या नव्याने रूजू झाल्याने त्यांचे देवरुख आगार मधील अन्य  अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून स्वागत करण्यात आले.

श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह निमित्त रथयात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन !!

श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह निमित्त रथयात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन !!

घाटकोपर, (केतन भोज) : श्री स्वामी समर्थ सेवा बालसंस्कार व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित घाटकोपर (पूर्व) केंद्र, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आयोजित श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह निमित्त रथयात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन रविवार दि.१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. यावेळी रथयात्रा व पालखी सोहळा प्रस्थान मार्ग सोन्या मारुती मंदिर (गौरीशंकरवाडी नं.२) - श्री दत्त मंदिर, इंद्रायणी सोसायटी - श्री भवानी माता मंदिर - श्री स्वामी समर्थ मठ पंतनगर - श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर - ९० फिट रोड (गणेश मंदिर) - पॉप्युलर हॉटेल - रामदुत हनुमान मंदिर (रायगड चौक) - यशवंतशेठ जाधव मार्ग - निलकंठ बिल्डिंग - रामेश्र्वर कॅफे - जैन मंदिर (गौरीशंकर वाडी नं.१) असा असून सांगता - श्री दत्त मंदिर (गौरीशंकरवाडी नं.१) या ठिकाणी होणार आहे. तरी या सदर पालखी सोहळ्यामध्ये व सेवेमध्ये सर्व स्वामी भक्त सेवेकऱ्यांनी सहकुटुंब, मित्र मंडळी परिवारासह उपस्थित राहून दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा बालसंस्कार व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित घाटकोपर (पूर्व) केंद्र यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शहापूर विधानसभेतील राष्ट्रवादी (अप) उमेदवार दौलत दरोडा यांच्यासाठी वाडा तालुक्यातील 3 हजार 946 मतांची आघाडी ठरली निर्णायक !!

शहापूर विधानसभेतील राष्ट्रवादी (अप) उमेदवार दौलत दरोडा यांच्यासाठी वाडा तालुक्यातील 3 हजार 946 मतांची आघाडी ठरली निर्णायक !!


वाडा, प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यांच्यात चुरशीचीची लढत पाहायला मिळाली. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा हे 1671 मतांनी निवडून आले आहेत. दौलत दरोडा यांच्या विजयात वाडा तालुक्यात येणाऱ्या 49 बुथवर मिळालेल्या 3 हजार 946 मतांची आघाडी निर्णायक ठरली असून या मतांच्या निर्णायक आघाडीने दौलत दरोडा यांना तारले आहे.

लोकसभेतील आघाडी टिकवण्यात निलेश सांबरेना अपयश -
तर लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या निलेश सांबरे यांच्या रंजना उघडा या उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या असून त्यांना वाडा तालुक्यातील एकाही बुथवर मतांची आघाडी घेता आली नाही तर पांडुरंग बरोबर यांना फक्त 9 बुथवर किरकोळ आघाडी घेता आली आहे.

शहापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 329 बूथ असून यात वाडा तालुक्यातील 49 बुथचाही समावेश आहे. शहापूर विधानसभेत येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटात अजित दादांचे राष्ट्रवादीच्या या विद्यमान सदस्य आहेत तर याच गटातील गारगाव गणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूनम पथवा या पंचायत समिती सदस्य तर दुसऱ्या डाहे गणात रघुनाथ माळी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य आहेत. मोज गटात शिवसेना (उबाठा)चे अरुण ठाकरे तर मोज पंचायत समिती गणात शिवसेना (शिंदे) चे सागर ठाकरे हे पंचायत समिती सदस्य आहेत. अबिटघर जिल्हा परिषद गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भक्ती वलटे या जिल्हा परिषद सदस्य असून अभिर गणात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जगदीश पाटील हे विद्यमान सभापती व पंचायत समिती सदस्य आहेत. तर कुडुस पंचायत समिती गणातील कोंढले ग्रामपंचायतमधील म्हसवल गाव व पाडे शहापूर विधानसभेत जोडलेले आहेत. वाडा तालुक्यातील 49 बूथमधील राजकीय परिस्थिती अशा प्रकारे असताना वाडा तालुक्यातील 49 बुध मध्ये 3 हजार 946 एवढी निर्णायक आघाडी देऊन आमदार दरोडा यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये राष्ट्रवादी (अप) चे उमेदवार दौलत दरोडा यांना 14069 राष्ट्रवादी (शप) चे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना 10153 तर निलेश सांबरे यांच्या उमेदवार रंजना उघडा यांना 4705 एवढी मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत.

प्रतिक्रिया :
वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये येणाऱ्या गाव - पाड्यात आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून मी स्वतः जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेल्या कामांचाही आम्हाला फायदा झाला आहे. 
रोहिणी शेलार
सभापती : महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर
------------------------
वाडा तालुक्यातील मताधिक्य मिळविण्यासाठी विरोधकांनी आमच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र वाडा तालुक्यातील 49 बूथ मधील सुज्ञ मतदार राजाने आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांची पोच पावती आमदार दौलत दरोडा यांना दिली आहे.
- जयेश शेलार
- अध्यक्ष : राष्ट्रवादी (अजितदादा) वाडा तालुका

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील जनतेचीच इच्छा - आमदार विश्वनाथ भोईर यांची भावना‌

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील जनतेचीच इच्छा - आमदार विश्वनाथ भोईर यांची भावना‌

कल्याण, सचिन बुटाला, दि.27 नोव्हेंबर :
राज्यामध्ये महायुती निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी राज्यातील जनतेचीच इच्छा असल्याची भावना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या सस्पेन्सबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना भोईर यांनी ही भावना व्यक्त केली. 

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या संख्येने  निवडून येण्यामागे या शासनाचे, महायुतीचे काम किंवा सरकारने जे निर्णय घेतले, ज्या योजना राबवल्या होत्या त्याचा एकत्रीत परिणाम आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची  मेहनत असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. 

तसेच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा शासनाने राबवलेल्या योजनांपैकी सर्वात महत्वाची योजना लाडकी बहीण योजना आहे. पूर्ण महाराष्ट्रात ही योजना उचलून धरली गेली राज्यातील लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या पारड्यात भरघोस मतदान टाकले.  महायुती भरघोस मतांनी निवडून येण्यामागे लाडकी बहीण योजनेचाही मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची, लाडक्या बहिणींसह शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवक आणि जेष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच घटकांची हीच इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच व्हावे. जेणेकरून महाराष्ट्राचा गाडा सुरळीतपणे चालेल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आपल्यासह सर्वांची इच्छा असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

व्हर्टेक्स आग दुर्घटनेवरून केडीएमसी प्रशासनावर आमदार विश्वनाथ भोईर यांची आगपाखड...

 
व्हर्टेक्स आग दुर्घटनेवरून केडीएमसी प्रशासनावर आमदार विश्वनाथ भोईर यांची आगपाखड...

** महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुमती जाखर यांनी जबाबदारी घ्यावी - आमदार विश्वनाथ भोईर 

कल्याण पश्चिमेतील हायफाय सोसायटी असलेल्या व्हर्टेक्स इमारतीमधील आगीच्या घटनेवरून आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. बहुमजली इमारतीमधील आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी उंच शिडीची गाडी ही बंद असून तिच्या दुरुस्तीची फाईल ही केडीएमसी अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिने रखडवून का ठेवली? या गाडीच्या दुरुस्तीचे गांभीर्य या अधिकाऱ्यांना नव्हते का? जर या आगीच्या दुर्घटनेत लोकांचे जीव गेले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असे संतप्त सवाल विचारत हे पूर्णपणे केडीएमसी प्रशासनाचे अपयश असल्याची टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली.

केडीएमसी प्रशासनाच्या प्रमुख म्हणून आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. जर आपण नागरिकांकडून कर गोळा करतो तर नागरिकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करणे हे केडीएमसी प्रशासनाचे आद्यकर्तव्य असल्याची सांगत आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला आपल्या जबाबदारीबाबत आठवण करून दिली. तसेच यापुढे तरी अशा घटना घडू नये यासाठी केडीएमसी प्रशासनाने तत्पर राहावे अन्यथा सत्तेमध्ये असूनही आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल असा सज्जड इशाराही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला आहे.

Monday, 25 November 2024

साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी संविधान दिवस केला साजरा !!

साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी संविधान दिवस केला साजरा !!

** समता विद्या मंदिरात संविधान रॅली

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी संविधान दिवस साजरा केला. सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी संविधान प्रत हातात घेत, तिरंगी झेंडा फडकावत परिसरातून संविधान रॅली काढली. शाळेचे सचिव राजेश सुभेदार, संचालिका ज्योती सुभेदार यांच्या संकल्पनेतून संविधान रॅली आयोजित करण्यात आली. इयत्ता चौथी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अश्या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थांनी यावेळी रॅलीत बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान, नको राजेशाही, नको ठोकशाही संविधानाने दिली मजबूत लोकशाही अशी घोषवाक्य या रॅली द्वारे देण्यात आली. यावेळी २६/११ हल्यातील पोलीस अधिकारी, कुटुंबातील व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

Sunday, 24 November 2024

निष्ठेने लढलो तसं,निष्ठेने जनसेवा करत राहणार - संजय भालेराव !!

निष्ठेने लढलो तसं,निष्ठेने जनसेवा करत राहणार - संजय भालेराव !!

घाटकोपर, (केतन भोज) ; राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदासंघात ५९.६५% इतके मतदान झाले. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उबाठाचे संजय भालेराव, भाजपचे राम कदम आणि मनसेचे गणेश चुक्कल यांच्यात तिरंगी लढत झाली. तर याठिकाणी मतमोजणीत खरी टक्कर संजय भालेराव आणि राम कदम यांच्यात झाली. भाजपचे राम कदम यांना एकूण ७३१७१ मते भेटली तर उबाठाचे संजय भालेराव यांना ६०२०० इतकी मते मिळाली यात भाजपचे राम कदम हे १२९७१ मताने विजयी झाले. तर मनसेचे गणेश चुक्कल यांना फक्त २५८६२ एवढी मते पडली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय भालेराव यांचा यावेळी निसटता पराभव झाला असला तरी त्यांनी बऱ्यापैकी चांगली टक्कर विरोधी उमेदवार यांना याठिकाणी दिलेली दिसली. यावेळी शिवभक्त संजय भालेराव यांनी बोलताना म्हटले की माझा निसटता पराभव झाला असला तरी ज्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांच्यासाठी मी माझे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे. जसं मी निष्ठेने लढलो तसं निष्ठेने जनसेवा करत राहणार. निवडणूक म्हणलं की जय - पराजय हा आलाच, त्याला काही अपवाद नाही. परंतु या पराभवाने खचून न जाता त्याच जोमाने जनतेसाठी उभा राहणारच असतो तो " सच्चा शिवसैनिक " हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी माझ्या घाटकोपरसाठी, घाटकोपर करांसाठी ताकदीने संघर्ष करत राहणार असा विश्वास यावेळी शिवभक्त संजय भालेराव यांनी व्यक्त केला.

"कोकणचा साज,संगमेश्वरी बाज" लोकनाट्य २७ नोव्हेंबरला (बुधवारी) विलेपार्ले येथील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात !!

"कोकणचा साज,संगमेश्वरी बाज" लोकनाट्य २७ नोव्हेंबरला (बुधवारी) विलेपार्ले येथील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात !!

कुटूंबासह पहावे असे "५००" व्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे लोकनाट्य "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज " 

मुंबई (शांताराम गुडेकर)

          बोली भाषेमधील गोडवा आगळाच असतो. प्रमाणभाषेची गरज मान्य करूनही त्याचे सतत तुणतुणे वाजवणा-यांना बोलीभाषेचा गोडवा कळत नाही. त्यातील थेट भाव आणि व्यक्तहोण्याचा रोखठोकपणा शिवाय लडिवाळपणा ही गंमत असते. ‘संगमेश्वरी बोली’मध्ये हे सारे एकवटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ते खेड भागातील या बोलीभाषेला तसे दुय्यमच मानले जात होते. मात्र, आधी आनंद बोंद्रे यांच्या एकपात्री प्रयोगातून आणि आता ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाटय़ातून ही बोली प्रवाही होते आहे. याच संगमेश्वरी बोलीतून जाकडी, नमन, भजन अशा कोकणी लोककला लोकनाटय़ाच्या फॉर्ममधून सादर करणा-या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ लोकनाटय़ाने अवघ्या तीन वर्षात ४६४ प्रयोग सादर केले आहेत. कोकणी लोककलेचा हा ख-या अर्थाने सन्मानच म्हणावा लागेल.
             कोकणला मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. निसर्गसौंदर्य, आंबा, काजूसारखी फळे, अनेकविध सण, उत्सव, प्रथा यांच्यासोबत बोलीभाषा ही कोकणची वैशिष्टय़े आहेत. विशेष उल्लेख करता येईल तो ग्रामीण ढंगाच्या संगमेश्वरी बोलीचा. समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या टीमने ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाटय़ाची निर्मिती करताना संगमेश्वरी भाषेला लोकमान्यता मिळवून देण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. तात्या गावकर हा या कथासूत्राचा तथा लोकनाटय़ाचा प्रमुख आहे.कोकणातील लोककला, संस्कृती जाणून घेऊन त्यावर ‘डॉक्युमेंटरी’ करण्याच्या इराद्याने येणारा मुंबैकर गावातील इरसाल पात्रांना कसा सामोरा जातो, हे पाहणे खूपच मजेशीर आहे. विविधरंगी पात्रांच्या संगतीने मुंबैकर गावातील प्रथा, परंपरा, कला, संस्कृती जाणून घेताना भारावून जातो. विनोदी संवादांतून कोकणातील लोकांच्या मनातील सलही तात्या गावकर आणि मंडळी लोकांपुढे मांडण्यात यशस्वी झाले आहेत. बक्कळ पैसा कमावण्याच्या ओढीने गावातील तरुण मंडळी मोठय़ा शहरांकडे धावतेय.

             त्यामुळे गावातील संस्कृती, कला लोप पावतेय की काय, ही प्रबोधनात्मक संवादांतून प्रखरपणे मांडलेली ही गावक-यांची मनातील भीती अंतर्मुख करून जाते. गावातील जमीनजुमला येईल त्या किमतीला विकून पैसा कमावण्याचा फंडा सध्या सर्वत्र आहे. मात्र, त्याच जमिनीवर उभ्या राहणा-या उद्योगावर मजुरी करण्याची पाळी स्वत:वर येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती करताना ही गावकर मंडळी भविष्यातील कोकणाचे भयान रूपच जणू रसिकांसमोर मांडतात आणि सगळे स्तब्ध होतात.
              ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ला मुलुंड येथे झालेल्या ९८ व्या मराठी नाटय़ संमेलनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले. त्यावेळी उपस्थित रसिक आणि कलावंतांनी उभे राहून या टीमला दाद दिली, कौतुक केले.त्यानंतर कोकणमध्ये एका पाठोपाठ एक प्रयोगांचा सिलसिला सुरू झाला. तीन वर्षात सुमारे ३६४ प्रयोगांचा टप्पा गाठणा-या या लोकनाटय़ाचा पहिला व्यावसायिक प्रयोग परळ (मुंबई) येथील दामोदर हॉलमध्ये मुंबईकर रसिकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात झाला.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी ४६५ वा प्रयोग सादर होणार असून त्या नंतर सतत मुंबई सह कोकण आणि अन्य भागात पुढील काही प्रयोग होणार आहेत. मुंबईकर कोकणवासीयांनी या लोकनाटय़ाचे कौतुक केले आहे.
             कोकणी लोककला टिकाव्यात.त्या नव्या पिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात. बोलीभाषा टिकावी. तसेच भाषा बोलण्याचा संकोच दूर व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन ह्या लोकनाट्य मधील तात्या गावकर, उत्तम गायक/कलाकार सुनील बेंडखळे यांनी केले आहे. म्हणूनच या  दर्जेदार प्रयोगाचे आयोजन साई श्रद्धा कला पथक मुंबई प्रस्तुत, श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) संकल्पित व व कलाप्रेमी व्यक्तीमत्व तसेच शक्ती -तुरा, नमन चे प्रयोग हाऊस फुल करणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार श्री.दिपक धोंडू कारकर आयोजित बुधवार दि २७ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ०८ : ३० वा. (प्रयोग क्र. ४६५) सादर होणार आहे.
अधिक माहितीसाठी दिपक कारकर -९९३०५८५१५३/९६५३३२३७३३ यांच्याशी संपर्क साधून, मनोरंजनाची परिपूर्ण हमी असणाऱ्या ह्या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद द्या असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ठाणे - पालघर जिल्ह्यातून पाचव्यांदा निवडून आलेले एकमेव आमदार दौलत दरोडा यांना मंत्रिपद देण्याची मागणी ; कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे !!

ठाणे - पालघर जिल्ह्यातून पाचव्यांदा निवडून आलेले एकमेव आमदार दौलत दरोडा यांना मंत्रिपद देण्याची मागणी ; कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे !!

शहापूर, प्रतिनिधी : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून शहापूर विधानसभेची वाट्याला आलेली जागा दौलत दरोडा यांनी जिंकली असून त्यांनी तब्बल पाचव्यांदा शहापूर विधानसभेतून निवडून जाण्याचा विक्रमही केला आहे. त्यामुळे पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेले अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून निष्कलंक कामगिरी केलेल्या दौलत दरोडा यांना नव्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्याची मागणी आता करण्यात येत आहे. याबाबत कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

दौलत दरोडा हे अनुभवी, निष्कलंक व सर्वसामान्य जनतेला भावणारे लोकप्रतिनिधी असून त्यांनी 1995 पासून आत्तापर्यंत सात वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे त्यात त्यांनी पाच वेळा विजय संपादन केला आहे. सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील असणारे आमदार दरोडा हे उच्चशिक्षित असून ठाणे व पालघर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील समस्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. आमदार दरोडा यांना मंत्रीपदाची संधी दिल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटन वाढीसाठी होणार असून त्यांच्या माध्यमातून दुर्गम भागातील जनतेच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आमदार दरोडा यांना मंत्रिपदाची संधी देऊन ठाणे व पालघर जिल्ह्यासह ग्रामीण दुर्लक्षित व दुर्गम भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी सर्व समाजातील घटकांकडून करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन आमदार दरोडा यांना मंत्रिपद द्यावे यासाठी साकडे घातले आहे.

दरम्यान आमदार दौलत दरोडा यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यास आगामी काळात होणाऱ्या ठाणे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला व महायुतीला चांगले बळ मिळणार असून त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच वेळा निवडून आलेले ज्येष्ठ व अनुभवी आमदार दौलत दरोडा यांच्याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Saturday, 23 November 2024

कल्याण पश्चिमेत घडला इतिहास; महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर सलग दुसऱ्यांदा विजयी !!

कल्याण पश्चिमेत घडला इतिहास; महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर सलग दुसऱ्यांदा विजयी !!

** 42 हजारांहून अधिक मतांनी विश्वनाथ भोईर विजयी

कल्याण, सचिन बुटाला, दि.23 नोव्हेंबर :
ठाणे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला. शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिमेतील मतदारांनी राजकारणामध्ये नविन अध्याय रचल्याचे दिसून आले. महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 42 हजार 454 मतांनी आपल्या विजयाची भगवी पताका फडकवली. कल्याणातील जनतेनं विकास करणाऱ्या महायुतीच्या आणि तिच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानेच कल्याण पश्चिमेत हा इतिहास घडल्याची प्रांजळ कबुली विश्वनाथ भोईर यांनी आपल्या विजयानंतर दिली. 

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता याठिकाणी प्रत्येक वेळी मतदारांनी नविन व्यक्तीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली होती. त्यामूळे यंदाच्या निवडणुकीत कल्याण पश्चिम कोणाच्या बाजूने कल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यातच निवडणुकीमध्ये प्रथमच 55 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने ही वाढीव मते कोणाला जिंकवतात याची उत्सुकता लागली होती. मात्र कल्याणकारांनी यावेळी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनाच केवळ पसंती दिली नाही तर गेल्या वेळेपेक्षा उच्चांकी मतांनी निवडूनही दिले. तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपल्याला दर्शविलेल्या पाठिंब्यामुळे मतांचे विभाजन टळले आणि इतक्या मोठ्या मतांनी आपण निवडून आल्याचेही विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच विश्वनाथ भोईर यांनी कायम राखलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखली, यावरुनच कल्याण पश्चिमेतील मतदारांनी त्यांना दिलेल्या पसंतीची कल्पना येऊ शकते. विश्वनाथ भोईर यांना 1 लाख 26 हजार 20 इतकी मते, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांना 83 हजार 566 अधिक मते आणि मनसेचे उल्हास भोईर यांना 22 हजार 114 अधिक मते मिळाली. 

दरम्यान विश्वनाथ भोईर यांच्या या दणदणीत विजयानंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा यांनी मोठा जल्लोष केल्याचे दिसून आले. ढोल ताशे, फटाके आणि गुलालाची उधळण करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला विजय साजरा केला. यावेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, विधानसभा संघटक संजय पाटील, मयूर पाटील, श्रेयस समेळ, माजी नगरसेवक गोरख जाधव यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 21 November 2024

उद्या निकाल, तिन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली, घाटकोपर पश्चिमचा गड कोण करणार सर ?

उद्या निकाल,तिन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली, घाटकोपर पश्चिमचा गड कोण करणार सर ?

घाटकोपर, (केतन भोज) : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदासंघात ५९.६५% इतके मतदान झाले आहे. उद्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, ९० फिट रोड कैलाश कॉम्प्लेक्स विक्रोळी पश्चिम येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल आणि महायुतीचे राम कदम हे तिन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या मतमोजणी  असल्यामुळे या तिन्ही उमेदवारांची धाकधूक आता वाढली आहे. त्यामुळे घाटकोपर पश्चिम मधील मतदारांनी कोणाला कौल दिला आहे हे उद्या स्पष्ट होणार असून हा बालेकिल्ला कोण सर करणार हे उद्या स्पष्ट होणार आहे आणि याठिकाणी कोणाचा झेंडा फडकणार हे उद्याच निकालातून समोर येणार आहे.

Wednesday, 20 November 2024

घाटकोपर पश्चिम मध्ये मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

घाटकोपर पश्चिम मध्ये मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

** उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद 

घाटकोपर, (केतन भोज) : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. घाटकोपर पश्चिम मध्ये ही मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून याठिकाणी एकूण ५६.३६% मतदान झाले आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे संजय भालेराव आणि मनसेचे गणेश चुक्कल आणि महायुतीचे राम कदम हे तिन्ही उमेदवार रिंगणात आहेत यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं आहे त्यामुळे घाटकोपर पश्चिम मध्ये मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे आणि हा बालेकिल्ला कोण सर करणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री स्व. विष्णूजी सवरा साहेब यांचे पुत्र विद्यमान खासदार डॉ. हेमंत सवरा साहेब यांच्या परिवारासह मतदान केले..

माजी केंद्रीय मंत्री स्व. विष्णूजी सवरा साहेब यांचे पुत्र विद्यमान खासदार डॉ. हेमंत सवरा साहेब यांच्या परिवारासह मतदान केले..


वाडा, प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात आज २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.  सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, अनेक आजी / माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच सेलिब्रिटी, उद्योगपती, मतदान करण्यासाठी पोहोचत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हेमंत विष्णू सावरा यांनी सुध्दा आज कुटुंबासह मतदानासाठी जात मतदान केले. मुलगी सारा तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर सोबत सचिन तेंडुलकर दिसला. 


मतदान केल्यानंतर खासदार डॉ हेमंत विष्णू सावरा यावेळी त्यांनी निवडणुकीत महायुतीला विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मतदान केल्यानंतर संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की सर्वांनी मतदान करावे. लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे.

Tuesday, 19 November 2024

कल्याण पश्चिमेत इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडताहेत - महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर

कल्याण पश्चिमेत इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडताहेत - महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर 

कल्याण दि.20 नोव्हेंबर :
आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान होत असून आपण सहकुटुंब मतदान केले आहे यावेळी सोबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.  मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि नरेंद्र पवार यांची साथ पाहता कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचा विश्वास कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला. 

भोईर यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते __

कल्याणचा विकास करणे महायुती शिवाय कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे एवढ्या सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. जनता महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणार हे जनतेकडून अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या २३ तारखेला महाराष्ट्रात महायुती मोठ्या ताकदीने महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल. आणि सर्वसामान्यांचे सरकार या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येणार आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला. 

तर मतदान जनजागृती साठी सर्वच स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तसेच महायुती सरकारने केलेले काम पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते मतदारसुद्धा मोठ्या संख्येने मतदानाला उतरलेले पाहायला दिसत आहेत. महायुतीने ज्या पद्धतीने काम केलं आहे लोकांना आशा आहे की हे जनतेचे सरकार सर्व सर्वांचे भलं करू शकते. त्यामुळे मतदारराजा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर रंग लावून मतदानासाठी उभा असल्याचेही ते म्हणाले. 

यावेळी विश्वनाथ भोईर त्यांच्या पत्नी वैशाली भाईर, मुलगा वैभव भोईर, विशाखा भोईर मुलगी, मानसी भोईर मुलगी बंधू प्रभूनाथ भोईर, सुप्रिया भोईर या सर्व कुटुंबियांनीही एकत्रितपणे आपला मतदानाचा हक्क बजावला.

Monday, 18 November 2024

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भव्य शोभा यात्रेने गणेश चुक्कल यांच्या प्रचाराची सांगता !!

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भव्य शोभा यात्रेने गणेश चुक्कल यांच्या प्रचाराची सांगता !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल तर भाजपचे राम कदम यांच्यात तिरंगी लढत होत आहे. 

या विधानसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शेवटच्या क्षणी प्रचारांचा धुरळा उडाला आहे. मनसेचे अधिकृत उमेदवार गणेश चुक्कल यांची भव्य परिवर्तन शोभा यात्रा सोमावारी काढण्यात आली. 

यावेळी घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये मतदारांची भेट घेत विधानसभा क्षेत्रामध्ये गणेश चुक्कल यांनी भव्य शक्तिप्रदर्शन केले. यावेळी या परिवर्तन शोभा यात्रेला कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून घाटकोपर पश्चिम मधील विविध चौकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गणेश चुक्कल यांच्या शोभा यात्राचे स्वागत करण्यात आले. यावेळी या भव्य परिवर्तन शोभा यात्रे मध्ये महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे व परंपरेचे दर्शन घडून आले.

महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड प्रचंड बहुमताने निवडून द्या - खासदार रवी किशन

महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड प्रचंड बहुमताने निवडून द्या - खासदार रवी किशन 


कल्याण, सचिन बुटाला : कल्याण पूर्वेत खासदार रवी किशन यांच्या भव्यदिव्य प्रचार फेरीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या फेरीत खासदार रवी किशनजी यांनी आपल्या भोजपुरी शैलीत सर्व उत्तर भारतीय समाज बांधवांना सुलभाताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.


कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती. प्रचार फेरीची सुरवात अवध रामलीला समिती येथून म्हात्रे नाका, काटेमानिवली नाका, नाना पावशे चौक, जनता बँक, काली माता मंदिर येथे समारोप करण्यात आली.  प्रचार फेरीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता.


माझ्या सर्व उत्तर भारतीय बांधवांना आणि माझ्या फॅन्सना आवाहन करतो की माझ्या सुलभाताईला प्रचंड बहुमतांनी आपण सर्व निवडून द्याल याची मला खात्री आहे. यावेळी खासदार रवी किशन यांच्या सोबत सुलभाताई गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा नागेंद्र फौजदार शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोज राय,उत्तर भारतीय आघाडी कल्याण जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Sunday, 17 November 2024

आमदार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित, वार्ड क्रमांक २३, मधील भाजपा कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्णय !!

आमदार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित, वार्ड क्रमांक २३, मधील भाजपा कार्यकर्त्यांचा जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्णय !!

कल्याण, (सचिन बुटाला) -
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीतील शिवसेना पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन बासरे, मनसेचे उल्हास भोईर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारांचा धुरळा उडाला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक २३ मधील कार्यकर्ते कल्याण पश्चिम सरचिटणीस निता देसले, वार्ड अध्यक्ष दिपक दोरलेकर, वार्ड अध्यक्षा भारती बुटाला, स्वाती चौधरी, मनिषा ठाणगे, शालिनी मेंढे, किरण सिंग हे गेले पाच दिवस कल्याण पश्चिमचे भाजपचे अध्यक्ष वरुण पाटील, मा. आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ वैशालीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घराघरात जाऊन प्रचार करत असून त्यावेळी त्यांना प्रभागात भरपूर प्रतिसाद मिळत आहे. 

यावेळी वार्ड क्रमांक २३ मधील भाजपा कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळवून देणार असा विश्वास व्यक्त केला.


गणेश चुक्कल यांचा विजय निश्चित, दिपक करगुटकर यांचा रामनगर मधून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्णय !

गणेश चुक्कल यांचा विजय निश्चित, दिपक करगुटकर यांचा रामनगर मधून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्णय !

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल तर भाजपचे राम कदम यांच्यात तिरंगी लढत होत आहे.या विधानसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारांचा धुरळा उडाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२३ मध्ये मनसे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ वीर संभाजी तरुण मंडळ पटांगण (घाटकोपर ची आई जगदंबा) रामनगर(ब) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी रामनगर मधील मतदारांचा या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी दिपक करगुटकर (मनसे उपशाखा अध्यक्ष १२३) यांनी रामनगर(ब) मधून गणेश चुक्कल यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊन विजय करण्याचा निर्धार केला. दिपक करगुटकर यांनी गणेश चुक्कल यांच्या विजयासाठी रामनगर मध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन कठोर मेहनत घेत प्रचार केला.

शिवभक्त संजय भालेराव यांच्या प्रचार बाईक रॅलीला घाटकोपर पश्चिम वासियांचा प्रचंड प्रतिसाद !

शिवभक्त संजय भालेराव यांच्या प्रचार बाईक रॅलीला घाटकोपर पश्चिम वासियांचा प्रचंड प्रतिसाद !

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल तर भाजपचे राम कदम यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारांचा धुरळा उडाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार शिवभक्त संजय भालेराव यांची भव्य प्रचार बाईक रॅली रविवारी काढण्यात आली. शिवभक्त संजय भालेराव यांनी नेहमीप्रमाणे अमृत नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या बाईक रॅलीला सुरुवात केली. या बाईक रॅलीच्या माध्यमातून घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये मतदारांची भेट घेत विधानसभा क्षेत्रामध्ये शिवभक्त संजय भालेराव यांनी भव्य शक्तिप्रदर्शन केले. यावेळी या प्रचार बाईक रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून घाटकोपर पश्चिम मधील विविध चौकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवभक्त संजय भालेराव यांच्या बाईक रॅलीचे स्वागत करण्यात आले. हाती मशाल मनात निष्ठा आणि बदलाचा ध्यास घेऊन निघालेली ही रॅली विजयाची ग्वाही देत असल्याचे मत यावेळी शिवभक्त संजय भालेराव यांनी व्यक्त केले.

राम कदम यांच्या समर्थनात आई माऊली प्रतिष्ठान मैदानात !!

राम कदम यांच्या समर्थनात आई माऊली प्रतिष्ठान मैदानात !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल तर भाजपचे राम कदम यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मतदार संघातील महायुती भाजपचे अधिकृत उमेदवार राम कदम यांच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले. यावेळी विक्रोळी पार्कसाईट येथील आई माऊली प्रतिष्ठानचे सर्व सदस्य पदाधिकारी भाजपचे घाटकोपर मंडल अध्यक्ष अनिल निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली राम कदम यांच्या प्रचारार्थ प्रचंड मेहनत घेत आहेत. राम कदम यांना कोणत्याही स्थितीत निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. यावेळी या आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये आई माऊली प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पदाधिकारी राम कदम यांच्या समर्थनात त्यांच्या प्रचारार्थ प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

आळंदी येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

आळंदी येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

【 मुंबई:उदय दणदणे 】

शनिवार दिनांक १६ व १७ नोव्हेंबर २०२४ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संतांची नगरी पुणे आळंदी येथील मुंबई फ्रुटवाला धर्मशाळा मध्ये महाराष्ट्र योगशिक्षक संघचे महायोगोत्सव २०२४ हे संपन्न झाले !
 
महाराष्ट्र योगशिक्षक संघ हे राज्यातील योगशिक्षकांच्या हिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. योगशिक्षकांच्या अनेक अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे महाराष्ट्र संघाचे मुख्य हेतू आहे. दरवर्षी महायोगोत्सव साजरा करण्याचा मुख्य हेतू हाच असतो की राज्यातील सर्व योगशिक्षक एकाच छताखाली येऊन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील सदस्यांची ओळख होईल. 

ह्या दोन दिवसीय महायोगोत्सव मध्ये योग संबंधी अनेक व्याख्याने व योग आसनांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. या महायोगोत्सवात एकूण ९०० योगशिक्षक सदस्य उपस्थित होते, तसेच मुंबई जिल्ह्यांमधून रिद्मिक योग माध्यमातून योग आसनचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले, यावेळी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा साक्षी कलगुटकर, हेमवंता जिजाबाई, महासचिव कृष्णकुमार शिंदे, सचिव सुषमा माने, अमित चिबडे, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, संघटन सचिव विकास ओव्हाळ, मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, मुंबई जिल्हा सदस्य विजयालक्ष्मी शर्मा, प्रसाद काठे, अर्निका बांदेलकर, हिरा गणवीर, मनुजा चव्हाण, प्रियंका भोसले, भारती कावनकर, श्वेता पिसाळ, केशर कुलाबकर, सुनीता कांबळे व महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल उपस्थित होते.

घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या भेटी घेण्यावर उमेदवारांचा जोर !!

घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या भेटी घेण्यावर उमेदवारांचा जोर !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल तर भाजपचे राम कदम यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारांचा धुरळा उडाला आहे. मतदार संघातील भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रविवारी रॅलीच्या माध्यमातून घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये मतदारांची भेट घेण्यावर जोर देत विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून विविध चौकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उमेदवारांच्या रॅलीचे स्वागत करण्यात आले. तर मनसेचे गणेश चुक्कल यांची भव्य परिवर्तन प्रचार रॅली आज सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस असून सायंकाळी ५ नंतर सर्व राजकीय पक्षांचा प्रचार बंद होणार आहे. ( छाया: केतन भोज)

जनतेचा विश्वासाला खरे उतरणार - सुलभा गायकवाड

जनतेचा विश्वासाला खरे उतरणार - सुलभा गायकवाड 


कल्याण, सचिन बुटाला : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी प्रभागात रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली श्रीराम टॉकीज, टाटा कॉलनी, आंबेडकर चौक, हनुमान नगर, काटेमानिवली नाका, विजयनगर नाका ते तिसाई हाऊस या मार्गावर काढण्यात आली. या रॅलीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. रॅलीत भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर, उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा सविता देशमुख, माजी नगरसेवक मनोज राय, विक्रम तरे, महादेव रायभोळे, अनंता पावशे, माजी नगरसेविका सारिका जाधव, हेमलता पावशे, संगीता गायकवाड, माधुरी काळे, मनोज माळी, दीपक गुप्ता, एकनाथ म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संतोष केंदळे, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. 


मतदारांशी संवाद साधताना उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दादांच्या पाठी जनतेने दाखविलेला विश्वास आणि प्रेम सार्थ ठरविण्याचा विश्वास व्यक्त केला. नुकतीच कल्याण पूर्वेत सुलभा यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. या वेळी हा देवाभाऊ सुलभाताईंच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच कल्याण पू्र्व मतदारसंघातील गेल्या १५ वर्षांत विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी उभारलेली विकासाची परंपरा अधोरेखित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या अनुपस्थितीत हा विकासाचा प्रवाह अखंड राखण्यासाठी मतदारांनी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.


जनसामान्यांचे हिंदुत्ववादी महायुती सरकार पुन्हा येऊ दे - विश्वनाथ भोईर यांची बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना !!

जनसामान्यांचे हिंदुत्ववादी महायुती सरकार पुन्हा येऊ दे - विश्वनाथ भोईर यांची बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना !!

*शेवटच्या टप्प्यातही विश्वनाथ भोईर यांचा झंजावती प्रचार*

कल्याण, सचिन बुटाला दि. १७ :
जनसामान्य, महिला, कष्टकरी, शेतकरी आणि हिंदुत्वाचा विचार करणारे महायुतीचे हे सरकार पुन्हा येऊ दे आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलाय त्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार चालू दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी केल्याची भावना कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त भोईर भगवा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी नतमस्तक झाले. आजच्या आपल्या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी दर्शन घेतले. 

तर प्रचार रॅली आणि जाहीर सभांना सामान्य नागरिकांसह प्रतिष्ठीत नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता डॉक्टर्स, इंजिनियर्स यासारखे उच्च पदस्थ सहभागी होत असल्याबद्दल आपल्यालाही आश्चर्य वाटत आहे. न सांगता ही सर्व लोकं प्रचारात सहभागी होत असून याचाच अर्थ महायुतीचा विजय अंतिम टप्यात आहे. आता जनतेनी लोकांनीच पुन्हा महायुतीला निवडून देण्याचा निर्धार केल्याचा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला. 

तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रणधुमाळी थांबायला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनीही अखेरच्या टप्प्यात झंजावती प्रचार कायम ठेवला आहे. आजच्या अखेरच्या टप्प्यात आधारवाडी, अन्नपूर्णा नगर,  वाडेघर, साई बाबा मंदिर, सापर्डे, हिऱ्याचा पाडा आदी परिसरी भव्य अशी रॅली काढण्यात आली. आधी काढलेल्या रॅलीप्रमाणेच आजही ठिकठिकाणच्या चौकांमध्ये या रॅलीचे जल्लेषात स्वागत करण्यात आले. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, भाजपचे वरुण पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, भाजपच्या हेमा नरेंद्र पवार, प्रिया शर्मा, माजी नगरसेविका वैशालीताई भोईर, महिला संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, रामदास कारभारी यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Saturday, 16 November 2024

साहित्य संघात "मुक्काम पोस्ट शाळा" नाट्यप्रयोगाचे आयोजन !!

साहित्य संघात "मुक्काम पोस्ट शाळा" नाट्यप्रयोगाचे आयोजन !!

** अनाथ - गरजू विदयार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी निधीसंकलनाचा उपक्रम

मुंबई - ( दिपक कारकर  )

कोकणातील एका नवोदित नाट्यलेखकाने अतिशय उत्कटपणे लिखाण करत एक नवा विषय रसिक प्रेक्षकांच्या समोर आणला आहे. शाळेतील प्रेम खरंच असतं कां? हे प्रेम शेवट पर्यंत टिकते कां? की प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर ह्या नाट्यकृतीतील पाहायला मिळणार आहे. शालेय जीवनावर आधारित विनोदी व समाजप्रबोधनपर दोन अंकी नाटक "मुक्काम पोस्ट शाळा" रविवार दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ०४. ०० वा. मुंबईतील साहित्य संघ रंगमंच, गिरगाव ( चर्नी रोड ) येथे सादर होणार आहे. कलासंगम व दिलीप डिंगणकर प्रस्तुत मंगेश गावणंग लिखित व गंगाराम गोताड दिग्दर्शीत सदर नाटकाचा ३ रा प्रयोग सादर होणार आहे. नाट्यप्रयोगातील सर्व सहाय्यक टीम व कलावंत यांची प्रचंड मेहनत यामागे आहे. सदर नाट्यप्रयोगातून मिळणारा निधी पंचक्रोशीतील सामाजिक/शैक्षणिक उपक्रमकरिता उद्देशीय आहे. सर्व नाट्यप्रेमी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी - ९७६६४९२५५५ यांच्याशी संपर्क साधावा.

गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ भव्य परिवर्तन प्रचार रॅलीचे आयोजन !!

गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ भव्य परिवर्तन प्रचार रॅलीचे आयोजन !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा वर्षा नगर पासून ही रॅली चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृत नगर सर्कल पर्यंत या रॅलीचा मार्ग असणार आहे आणि याठिकाणी या प्रचार रॅलीची सांगता करण्यात येणार आहे.समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय-हक्क,आणि अधिकार मिळवून देण्यासाठी परिवर्तनाची ही रॅली आयोजित करण्यात आली असून या परिवर्तन रॅलीत सर्व महाराष्ट्र सैनिकांनी व घाटकोपर पश्चिम वासियांनी हजारो लोकांची एकजूट यांचा संगम अनुभवण्यासाठी अवश्य मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन मनसे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या वतीने करण्यात आले आहे.सोमवारी सायंकाळी ५ वाजेर्यंत प्रचाराचा शेवटचा दिवस असून यादिवशी प्रचाराचा धुरळा उडताना दिसणार आहे.

Friday, 15 November 2024

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ? 

** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडवणार - संजय भालेराव

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन अमृत नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी उमदेवार संजय भालेराव यांनी घाटकोपर पश्चिमच्या समस्यांचा पाढाच मतदारांना समोर वाचला. २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण अपक्ष उभे राहून आपल्याला ४२ हजार मत मिळाली होती, तर आता आपल्या सोबत आता संपूर्ण महाविकास आघाडी आहे तर यावेळी आपण ८० हजार मतांचा आकडा पार करणार असल्याचा विश्वास त्यांनी जाहीर सभेत मतदारांसमोर व्यक्त केला. सद्या गेली काही दोन तीन वर्ष मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक नसून प्रशासकराज्य आहे. या काळात नगरसेवक नसल्यामुळे प्रशासक यांच्याकडून मंजूर होणारा निधी हा तेथील स्थानिक आमदारांना मिळत आहे. फक्त या वर्षी मुंबई महानगरपालिकेकडून घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिमच्या विकास कामांसाठी दोन हजार एक कोटीचा निधी आला आहे. तसेच २०२६ कोटी रुपयाचा निधी म्हाडा कडून आला आहे. एकूण यावर्षी घाटकोपर पश्चिम मधील विकासकामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी पूर्ण पणे पास झाला आहे. मग हा मंजूर निधी गेला कुठे ? यामध्ये विकास कामे किती झाली. मी जर आमदार असतो आणि मला हा निधी भेटला असता तर मी आज या व्यासपीठावर नसतो घरी झोपलो असतो. आणि तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं असत एवढी कामे  मी या निधी मधून घाटकोपर पश्चिमसाठी केली असती. या विधानसभा क्षेत्रात जे आजी माजी नगरसेवक होते त्यांच्या फक्त कामांच्या पाट्या बदल्या गेल्यात आणि फक्त आता यांच्या पाट्या लागल्यात आणि त्यांच्या वर फक्त सुशोभीकरण केलं आणि निधी पास झालाय कामाच्या नावाने शून्य अशी टिका त्यांनी भाजपचे उमेदवार आमदार राम कदम यांच्यावर केली.यावेळी संजय भालेराव यांनी जाहीर सभेत बोलताना म्हटले की घाटकोपर पश्चिम मधील गावदेवी, आनंदनगर याठिकाणासाठी एसआरए प्रोजेक्ट आहे, रिझव्ह फ्लॉट आहे शाळेसाठी पण किती दिवस झाले आहेत पण हे काम रखडलेले आहे रामनगर, हनुमान नगर येथे गेली १८ वर्ष संक्रमण शिबिरामध्ये लोक राहत आहे, मागे मी मानखुर्द याठिकाणी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी गेलो असता अजून पर्यंत त्यांना स्वतःची हक्काची घरे मिळालेली नाहीत, महिला रडत आहेत असे ते आपल्या भाषणात बोलले तसेच मागे दामोदर पार्क येथे साई सिध्दी बिल्डिंग पडली होती त्यामध्ये १७ लोक दगावली होती पण आज पर्यंत ती लोक बेघर आहेत. जेव्हा तिथे ही घटना घडली तेव्हा मोठे नेते येऊन गेले तरी आज पर्यंत त्याजागी त्या बिल्डिंगच पुनर्निर्माण झाले नाही त्याजागी आता गवत उगवले आहे. गेल्या  पंधरा वर्षांपासून आज पर्यंत घाटकोपर पश्चिम येथील डोंगराळ भागात तेच- तेच मुद्दे आहेत त्याच समस्या आहेत. पाणी प्रश्न, शौचालय प्रश्न जैसे तेच आहे मग निधी येतो कशासाठी मग मंजूर निधी जातो कुठे? घाटकोपर मध्ये यात्रा, साड्या वाटप हे आपल्याच पैसे मधून होत आहे. याठिकाणी  खुले आम पैसे वाटप चालू आहे तेव्हा मी माझ्या कार्यकर्ते यानां संगितले स्थानिक संबंधित विभागाला तत्काळ फोन करून तक्रार करा असे बोलले असे ही संजय भालेराव बोलले. येथील माझ्या सोबत फिरणाऱ्या लोकांना फोन केला जातो, धमक्या दिल्या जात आहेत हिंमत असेल तर मला दम द्या मी उमेदवार आहे गोरगरीब जनतेला धमक्या का देता, जर कोण तुम्हाला धमकी देत असेल तर मला फोन करा त्यावेळी काय झाले तर पहिली केस मी घेईन एक नाही तर मी शंभर केस तुमच्यासाठी घेण्यासाठी तयार आहे असे ही ते आपल्या भाषणात बोलत कार्यकर्त्यांना विश्वास दिला आपल्याला घाटकोपर मध्ये बदल घडवावाच लागेल.मी मागे १० वर्ष नगरसेवक असताना जी कामे केली आहेत आणि आमदार राहिलेल्यांनी १५ वर्षात जी कामे केली आहेत हे त्यांनी घेऊन जाहिर माझ्यासोबत चर्चेला बसावं. मी घाटकोपरच्या देव्हाऱ्यात देव बसवला आहे याठिकाणी ग्रंथालय बांधलय हॉस्पिटलचे काम हाती घेतलय शाळेसाठी आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सीबीएसई बोर्ड चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, कृत्रिम तलाव चालू केले आहे मी घाटकोपर पश्चिम मध्ये अनेक ठिकाणी स्वतः लक्ष घालून अनेक कामे चालू केली आहेत. पंधरा वर्ष घाटकोपर पश्चिम चे आमदार असून आणि मुख्यमंत्री तुमचा असून ही एक ही कामे झाली नाहीत असे ही त्यांनी आपल्या भाषणातून राम कदम यांना सवाल केला. यावेळी संजय भालेराव यांनी मतदारांसमोर महाविकास आघाडीची पंचसुत्री मांडली.
तरी घाटकोपर पश्चिमच्या विकासासाठी २० तारखेला मला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले.

डॉक्टर काका सांभाळा !

डॉक्टर काका सांभाळा ! लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याह...