Tuesday, 10 March 2026

पृथ्वीराज चव्हाण आणि रामशेठ ठाकूर अकरा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार

शेलघर येथे 'यमुना स्त्री सन्मान' पुरस्काराचे वितरण 

** पृथ्वीराज चव्हाण आणि रामशेठ ठाकूर अकरा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार.
  
उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशा समाजाशी निगडित विविध  क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना गेल्या अकरा वर्षांपासून 'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'तर्फे 'यमुना स्त्री सन्मान' पुरस्कार दिला जातो. हा समारंभ बुधवारी (ता. ११ मार्च), उलवे नोड येथे शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्याच्या गार्डनवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. यंदा पुरस्काराचे बारावे वर्षे आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील १२ महिलांना या वेळी गौरविण्यात येईल. त्यात नवी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील, पनवेलच्या उपमहापौर प्रमिला पाटील, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर अशा राजकीय क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर सुमारे अकरा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवा अध्यक्ष शिवराज मोरे, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, तसेच सिनेअभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहाणार आहेत.

No comments:

Post a Comment

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !!

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !! उपसरपंच निवडीने कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान :  महेंद्रशेठ घरत  ...