सामाजिक कार्यकर्त्या सौ.रसिका राजेंद्र बागवे यांचा पुरस्काराने सन्मान !!
कल्याण, प्रतिनिधी :
उल्हासनगर येथील शिवशक्ती महिला मंडळ, उल्हासनगर यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ.रसिका राजेंद्र बागवे यांचा सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सौ.रसिका राजेंद्र बागवे या मागील वीस वर्षांपासून उल्हासनगर शहरामध्ये महिला बचत गट, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी अनेक सर्वसामान्य महिलांना वैद्यकीय सेवा, शासकीय व निमशासकीय कार्यालयांची माहिती देणे तसेच बचत गटांद्वारे योग्य मार्गदर्शन करून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.
तसेच त्या रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण–सावंतवाडी यांच्या प्रमुख मार्गदर्शक असून वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांच्या प्रमुख सदस्य म्हणून पर्यावरण संवर्धनाबाबतही सक्रिय कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय कार्याचा गौरव म्हणून शिवशक्ती महिला मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवर सुनील सिताराम उतेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला रेखा दिविलकर, सुनिता खेताडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment