Tuesday, 10 March 2026

पंचरत्न मित्र मंडळ,चेंबर तर्फे जागतिक महिला दिन चेंबूर येथे उत्साहात साजरा !

पंचरत्न मित्र मंडळ,चेंबर तर्फे जागतिक महिला दिन चेंबूर येथे उत्साहात साजरा !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व परिसरात आपल्या कार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळातर्फे चेंबूर विभागातील वाशीग्राम सेवा मंडळ सभागृहात दि. ९  मार्च २०२६रोजी दु. २.३० या वेळेत जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. 
         उपरोक्त कार्यक्रमात व्यासपीठावर विशेष पाहुणे सूश्री सौ. नंदा कुळकर्णी मॅडम (कार्यकारी संचालकपदी आर. सी. एफ् कं लि.), सुश्री संजय पेटकर साहेब(महाव्यवस्थापक आर. सी. एफ्. कं. लि.), कॅप्टन सौ. क्षमा भालेराव मॅडम (भारतीय लष्कर)  सिने अभिनेत्री सानिका मोजर, सुश्री. सौ. कविता शिकतोडे मॅडम (एस्. एन्. डी. टी. युनिव्हर्सिटी मुख्य संचालिका) तसेच स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहल विष्णू शिवकर. माजी विभागप्रमुख संघटिका श्रीमती विजयाताई पवार  मॅडम म्हणून उपस्थित होते. 
         कार्यक्रमाच्या सुरवातीला झी.टि.व्ही फेम श्री. सूशील मेस्त्री. यांनी महिलांसाठी "साज पैठणीचा मान वहिनींचा' ह्या खेळात महिलांना खेळ खेळवून कार्यक्रमाला खूप रंगत आणली. महिला अगदी उत्साहाने खेळल्या.  विशेष पाहुण्यांचे आगमन झाल्यावर पाहुण्यांचे स्वागतव ओळख सौ. स्नेहा नानिवडेकर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. महिलांना महिला दिनानिमित्त अंत्यत मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
         विविध स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या महिलांना देखील बक्षीस देण्यात आले. पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण झाल्यावर महिलांना पंचरत्न मित्र मंडळाकडून प्रत्येक महिलेला प्रवासी बॅग भेट व अल्पोपहार चहा वाटला.पहिली पैठणी चा मान सौ. माया गौरव पाटील (वाशी गाव) या वहिनींनी पटकावला. तर दुसरा मान सौ.भावना संकेत गावंड या वहिनींनी मिळवला. तृतीय क्रमांक सौ.शेजवळ वहिनींनी मिळवला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहा नानिवडेकर आणि सुशिल मेस्त्री यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोकजी भोईर, सेक्रेटरी श्री. प्रदीप गावंड. श्री. रमेश पाटील, श्री. वैभव घरत. मंदार भोपी. मिश्राजी, पुरू पाटसावकर, रमाकांत गावंड, संदीप पाटील, प्रकाश शेजवळ, सौ. निलम गावंड, सौ, नीता पाटील सौ. स्वाती पाटील, सौ. सविता जाधव, सौ. अंजली मौर्या. व इतर मंडळींनी खूप परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे फोटोग्राफी श्री. मॅथ्यू डिसोझा यांनी केले.सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी सौ. सविता जाधव व नीता पाटील यांनी छानशी रांगोळी काढली. कु. सानिका पाटील हिने स्वहस्ते महिलांकरता वुमन्स डे लिखित चाॅकलेट बनवून वाटप केले.शेवटी आयोजकांचे, मान्यवरांचे, उपस्थितांचे तसेच मदत करण्यासाठी सहभागी कार्यकर्त्यांचे. सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळाला सहकार्य करणारे सर्व देणगीदार,हितचिंतक तसेच आर.सी.एफ प्रशासन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत यापुढेही तुम्हां सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षेसह कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !!

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !! उपसरपंच निवडीने कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान :  महेंद्रशेठ घरत  ...