वीर वाजेकर महाविद्यालयात मुलींसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम !!
उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे च्या हेल्थ क्लब व तु. ह. वाजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल यांच्या सयुंक्त विद्यमाने मुलींच्या विविध आरोग्य समस्या संदर्भात जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्र.प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर, प्राचार्य साळुंखे बी बी, थोरात मॅडम, श्री.पाटोळे तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रणाली नामदेव दांडेकर, एम.डी. (स्त्रीरोग व प्रसूती – आयुर्वेद),सहाय्यक प्राध्यापक,प्रसूती तंत्र व स्त्री रोग विभाग, डॉ.जी.डी.पोल फाउंडेशन,YMT आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खारघर, नवी मुंबई हे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांनी मुलींच्या समस्या महत्वाच्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नये व जनजागृती वाढवणे गरजेचे असल्याचे मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रणाली दांडेकर यांनी PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) ही पुनरुत्पादक वयातील महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य हार्मोनल स्थिती बद्दल माहिती दिली. अनियमित किंवा अनियंत्रित मासिक पाळी, चेहऱ्यावर/शरीरावर अतिरिक्त केस येणे, मुरुमे येणे, केस गळणे, वजन वाढणे आणि वंध्यत्व या प्रकारची लक्षणे PCOD मध्ये आढळतात असे नमूद केले. खराब जीवनशैली, ताणतणाव, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिक घटक यामुळे PCOD होण्याची शक्यता बळावते. वेळीच उपचार न केल्यास टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग (endometrial cancer) यांचा धोका वाढू शकतो. कमी कर्बोदके, फायबरयुक्त आहार घेणे, नियमित व्यायाम, योगासने आणि वजन नियंत्रण करणे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊन यावर नियंत्रण मिळवता येते असे नमूद केले. तसेच कॅन्सर सारखे गंभीर आजार आणि त्यांची लक्षणे, कारणे, प्रतिबंध, उपचार याबद्दल सखोल माहिती दिली. चर्चा सत्रात देण्यात आली. विद्यार्थिनींच्या आरोग्याबद्दलच्या शंकांचे निरसन केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.योगेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमालाश्री किशोर पाटीलश्री.धुरी, श्री देवरे, खेडकर, सुहास नाईक १५० पेक्षा जास्त विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
No comments:
Post a Comment