Tuesday, 17 November 2026

पत्रकार जीवन गौरव मंचाच्या वतीने ‘चतुर्थ स्तंभाचा गौरव सोहळा’ उत्साहात संपन्न; लक्ष्मीकांत पोपळे यांच्यासह पत्रकारांचा सन्मान !!!

पत्रकार जीवन गौरव मंचाच्या वतीने ‘चतुर्थ स्तंभाचा गौरव सोहळा’ उत्साहात संपन्न; लक्ष्मीकांत पोपळे यांच्यासह पत्रकारांचा सन्मान !!!

तळोजा, प्रतिनिधी : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पत्रकार जीवन गौरव मंचाच्या वतीने सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘चतुर्थ स्तंभाचा गौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. तळोजा एमआयडीसी, पनवेल येथील आनंद हॉस्पिटल येथे हा सोहळा दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये VMW NEWS चे ज्येष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन आनंद हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले होते. पत्रकार बांधवांचा सन्मान, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन आणि माध्यम क्षेत्रातील एकोपा अधिक दृढ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. यावेळी पत्रकार बांधवांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही विशेष काळजी घेण्यात आली. उपस्थितांसाठी अल्पोपहार, स्नॅक्स, थंड पाणी तसेच कार्यक्रमाच्या सांगतेनंतर स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी आयोजकांच्या वतीने बोलताना, पत्रकार हे एकाच कुटुंबाचे घटक असून त्यांच्या सुख-दुःखात एकमेकांनी सहभागी व्हावे, परस्परांना सहकार्य करावे आणि विश्वासाने पुढील वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय किंवा त्रुटी जाणवल्यास पत्रकार बांधवांनी तत्काळ सूचना कराव्यात, जेणेकरून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येईल, अशी भूमिका आयोजकांनी मांडली.

'सर्वांचा सन्मान हाच आमचा ध्यास' ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच माध्यम क्षेत्रातील बंधुभाव, एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करणारा हा उपक्रम ठरला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अक्षय कांबळे (आदर्श लाईव्ह न्यूज व तळोजा आदर्श न्यूज वृत्तपत्र) यांनी विशेष पुढाकार घेतला. पत्रकार बांधवांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या विश्वासाला अधिक बळकटी देण्यासाठी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यातही सहकार्य सुरू ठेवण्याचा विश्वास हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *(दिपक मागाडे- प्रतिनिध...