Wednesday, 27 January 2021

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !


विरार (दीपक मांडवकर / शांत्ताराम गुडेकर) :

           रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मानले गेले आहे तसा संदेशही दिला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ५६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी शताब्दी ब्लड बँकने सहकार्य केले. तर या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून गुहागर अडुर मुंबई मंडळाचे सचिव दिलीप हळवे, जनशक्ती दबावचे विषेश प्रतिनिधी (पत्रकार) दीपक मांडवकर, गुहागर पाटपन्हाळे मुंबई जागृती विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भालचंद्र भेकरे, गुहागर अडुरवावडगाणेश्वर मिरुल विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप मांडवकर, साई एकदंत रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश नाडकर व प्रतिष्ठाचे सर्व सभासद उपस्थिती होते. सुरवातीला मिलिंद पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. तर गुहागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सचिव गणेश हळये यांच्या अस गुहागर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण भवैदिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला. गुहागर वाशीयांसाठी खंबीरपणे उभे राहू आणि कधीही रक्ताची गरज भासल्यास ते त्वरित त्यांच्या पर्यंत पोचवू असे मत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांनी व्यक्त केले.

नालासोपारा पूर्व मोरेगाव विभागात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !

नालासोपारा पूर्व मोरेगाव विभागात  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !


नालासोपारा (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :                            नालासोपारा पूर्व येथील नागीनदास पाडा मोरेगाव विभागामधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कोरोना काळात विभागातील रहिवाशांना अन्नधान्य पुरवठ्यापासून ते अत्याआवश्यक  सेवा देणाऱ्या प्रत्येकांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले .महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर मा.तालुका अध्यक्ष नितीन मोरे आणि शहर अध्यक्ष अमित नारकर, विभाग अध्यक्ष सुमित पवार, उपविभाग अध्यक्ष मंगेश भालेराव आणि संदीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सर्वं मनसे सैनिकांचे आणि नागरिक यांचे आयोजकांनी मनापासून आभार  मानले.या भव्य रक्तदान शिबिराला  १३५ रक्त दात्यांनी रक्तदान केले. तर विभागातील रहिवाशांना कधीही रक्ताची गरज भासल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असून, कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही अशा ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन अमित नारकर यांनी मत व्यक्त केले.

Tuesday, 26 January 2021

शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट" चे उद्घाटन संपन्न !

शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट" चे उद्घाटन संपन्न  !


 मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) : 

          शिवसेना नगरसेविका सौ अर्चना ताई भालेराव यांच्या प्रयत्नाने व तसेच माजी नगरसेवक व घाटकोपर पश्चिम समन्वयक शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेले आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप तसेच ग्राहक संरक्षण कक्ष च्या वतीने संजय भालेराव यांचा सत्कार  सुनील बागवे, यशवंत खोपकर, राजु केलशीकर , सुरेश पांचालकर यांच्याहस्ते करण्यात आला.

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित !!

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित !! 


कल्याण (संजय कांबळे) : नदी आमच्या उशाला, पण कोरड पडली घशाला, अशी ओळख असलेल्या जेमतेम ५०/६० घरे दिसणा-या कल्याण तालुक्यातील आपटी या छोट्याशा खेडेगावाला राज्यात नव्हे तर देशात व देशाबाहेर पोहोचवणारे डॉ रविंद्र अंनता शिसवे या पहिल्या आगरी समाजातील भारतीय पोलीस सेवा अर्थात (IPS) परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सुपूत्राला प्रशासनातील उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित करण्यात येणार असल्याने हा ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मानला जात असून या सन्मानाने संपूर्ण कल्याण तालुका व आपटी गावात दिवाळी साजरी केली जात आहे.


कल्याण पासून अवघ्या ८ते १० किलोमीटर अंतरावर आपटी हे छोटेसे खेडेगाव वसले आहे. उल्हास नदीच्या काठावर हे गाव वसल्याने शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय. दुसरा याला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय!
गावाच्या बरोबर मध्यभागातून मुख्य रस्ता जात असल्याने खालची आळी व वरची आळी असे दोन भाग झाले आहेत. मुख्य पिक भात तर उन्हाळ्यात कारली, भेंडी, मिरची, काकडी, अशी भाजीपाला पिके घेऊन ते बोजे उल्हासनगर बिर्लागेट किंवा कल्याण येथे विकणे. व यातून येणाऱ्या पैशातून घरखर्च चालवणे हा दिनक्रम, आपटी हे खेडेगाव असल्याने येथे सोयीसुविधा ची पूरती बोंबाबोंब, रस्ते, गटारे, दिवाबत्ती शिक्षण याची दैणी अवस्था.?
पण याच गावातील अंनता शिसवे यांनी गरीबीवर मात करुन उच्च शिक्षण पूर्ण करून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मॅनेजर पर्यंत मजल मारली तर त्यांच्या पत्नी १६७९ मध्ये सरपंच, १९९० मध्ये झेडपी सदस्य, नंतर कल्याण पंचायत समितीच्या सभापती आणि शेवटी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे मिळाल्याने गावाचा चेअरा मोहरा बदलला, गावात रस्ता, गटारे, दिवाबत्ती, गणेशघाट, समाजहाॅल आदी सुविधा निर्माण केल्या.
याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत  रविद्र शिसवे यांचे इयता ४थी पर्यंत शिक्षण झाले. पुढे शिक्षणासाठी ५/७ किलोमीटर अंतरावरील रायते विभाग हायस्कूल रायते किंवा मग इतर ठिकाणी. शाळा लाब असल्याने अनेकांनी पुढील शिक्षण थांबविले. परंतु रवि यांनी प्राथमिक शाळा कळवा, ठाणे, यांनतर वझे ज्युनियर कॉलेज मुंलूड, व बारावी उत्तीर्ण  झाल्यानंतर बेळगाव येथील मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तेथे बी एम एस उर्तीर्ण केल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या डोळखांब येथे वैद्यकीय सेवेसाठी रुजू झाले. काही काळ येथे सेवा देत असले तरी तेथे त्यांचे मन रमेना आणि अशातच त्यांच्या जिवनाला कलाटणी देणारी घटना घडली. त्यांचा अंत्यत जवळचा भाऊ, सखा, सोबती, मित्र दिनेश पांडुरंग शिसवे याचे अपघातात निधन झाले हा मृत्यू त्यांनी तसेच पत्रकार संजय कांबळे यांनी अंत्यत जवळून पाहिला. व एक मोठा निर्णय घेतला.यापुढे वैद्यकीय सेवा बस्स झाली असे ठरवून डॉ शिसवे यांनी यूपीएससी अभ्यास सुरू केला. दिवसांचे कित्येक तास अभ्यासात घालवले. प्रथम अपयश आले. पण त्यावर मात करून दुसऱ्या प्रयत्नात २००२ मध्ये संपूर्ण भारतात ते ५३ वे व महाराष्ट्रातून दुसरे आले. हा आनंद सर्वांसाठी इतका मोठा होता की शब्द अपुरे पडत होते. त्यांना प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जावे लागले. तेथे आय पी एस निवड करुन देशातील नामांकित सरदार वल्लभाई पटेल इन्स्टिटय़ूट मध्ये ट्रेनिंग सुरू केले. ते संपल्यानंतर त्यांना पहिली पोस्ट मिळाली ती सांगली जिल्ह्य़ातील जत येथील. 
यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली, पोलिस अधीक्षक गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा, सांगली आणि सांगलीवरुन मुंबई अतिरिक्त पोलीस कमिशनर, मुंबई दक्षिण, मुंबई मध्य अशी उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर त्यांची पुणे शहरातील सह आयुक्त म्हणून बदली झाली. 
कारण हा काळ त्यांच्यासाठी अंत्यत कठीण व त्यांची परीक्षा घेणारा ठरला. याच काळात पुणे शहरात कोरोनाच्या भयानक संकटाने डोके वर काढले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे व प्रसंगी कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. पण अशाही परिस्थितीत ते कुंटूबापासून दूर राहून देशसेवा करीत होते. अखेरीस यात ते यशस्वी झाले. आज पुणे शहर, जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे यामध्ये सह आयुक्त डॉ रविंद्र अनंता शिसवे यांचा सिंहाचा वाटा आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आणि याच प्रशासनातील अतुलनीय व उत्तुंग कामगिरी बद्दल भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांना सर्वोच्च असे राष्ट्रपती पदक जाहीर झाले हे ठाणे जिल्ह्यासाठी पर्यायाने कल्याण तालुक्यासाठी अभिमानाची घटना आहे. त्यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तसेच आपटी गावचे ग्रामस्थ, सदस्य शाम शिसवे, गजानन शिसवे, ठिडीसीचे म्हारळ शाखा अध्यक्ष सुभाष मार्के, जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस कल्याण चे प्रमुख संजय कांबळे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, तहसीलदार दिपक आकडे, उपसभापती रमेश बांगर, माझी सभापती रंजना केतन देशमुख, पांडुरंग म्हात्रे आदींने आयपीएस डॉ रविंद्र शिसवे यांचे अभिनंदन केले आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या हस्ते तळबीड या ऐतिहासिक भूमित झेंडावंदन !

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या हस्ते तळबीड या ऐतिहासिक भूमित झेंडावंदन !


कल्याण, (संजय कांबळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलाचे प्रमुख सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या ऐतिहासिक जन्मभूमीत त्यांचे वंशज लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते तळबीड येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात प्रचंड अशा सैन्य दलाचे प्रमुख कराड पासून १३ किमी अंतरावर असलेल्या तळबीड या गावचे हंबीरराव मोहिते हे होते. संभाजी मोहिते यांचा मुलगा ब्रम्हाणजी /हंसाजी म्हणजेच हंबीरराव होय. यांची बहीण सोयराबाई चा विवाह शिवाजी राजाबरोबर झाला होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी मोहित्यांना तहहयात तळबीड व बालाघाटाची देशमुखी मिळवून दिली होती. १लाख ५ हजारांचे घोडदळ ३० सरदार आणि ३६ समशेरबहाद्दर योध्दे व १२ गजसेना होती. वाई प्रांतात आदिलशाही सरदार सर्जाखान घुसणार असल्याची खबर हंबीरराव मोहिते यांना मिळाली. पाचवडच्या पुढे आणि वाईच्या दक्षिणेस विचित्र गडाच्या विशाल मैदानावर युध्दाला सुरुवात झाली. तोफेचा एक गोळा थेट रावांच्या देहावरचं येवून फुटला. शरीराचे असंख्य तुकडे आसमंतात विखरले. तो दिवस होता आक्टोंबर १६८७,मराठ्यांच्या आधारस्तंभ निखळला होता हे मराठ्यांनी जिंकले पण सरसेनापती हंबीरराव मोहिते हा धगधगता अग्नीकुंड शांत झाला होता अशा या वीरपुरुषांची शौर्य गाथा सर्वसामान्यांना माहिती व्हावी. यातून त्यांना एक नवी प्रेरणा, प्रखर उर्जा मिळावी या हेतूने रांवाच्या जन्मगावी म्हणजे तळबीड येथे समाधी बांधण्यात आली आहे. माझी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून येथे सर्वांग सुंदर प्रेक्षणीय व ऐतिहासिक वास्तू व स्फूर्ती स्थान निर्माण झाले.
अशा या ऐतिहासिक भूमित रांवाचेच वंशज लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, महाराणी ताराराणी विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी, जिप शाळेचे मुख्याध्यापक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूतकर, तलाठी ढालाईत, उपसरपंच लालासो वाघमारे, सदस्य दिलीपराव मोहिते, अभीजीत गायकवाड, बबन पाडळे, दुर्गेश मोहिते, सदस्या वैशाली मोहिते, रुपाली चव्हाण, संजीवनी कुंभार, हौसाबाई फाळके, पूनम वाखळे, शोभा चव्हाण, आदी ग्रामस्थ व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Monday, 25 January 2021

गर्व हिंदूत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !

गर्व हिंदूत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त  प्रतिसाद !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

              शिवसेनाच्या माध्यमातुन आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुपच्या माध्यमातुन एक हात मदतीचा हा महत्वपुर्ण उपक्रम गोरगरिबांसाठी सुरु करुन कोवीड-१९ काळात या समुहाने अनेकांना मदतीचा हात दिला. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या समुहातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहन नुसार श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजे शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर पुर्व येथे पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिराला राक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरास उद्घाटन प्रसंगी मराठी सिने अभिनेत्री दीपाली जगताप खासदार विनायक राऊत, मुंबई उपमहापौर सुहास वाडकर, माजी महापौर महादेव देवळे, नितिन नांदगांवकर यांची उपस्थिती लाभली. रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे कमेटी मेंबर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. संतोष पाटील, सूर्यकांत कडू, रवींद्र जाधव, यशवंत खोपकर, अवि राऊत, दिलीप गावडे, अनिल कांबळे, वसंत सोनावणे, रमेश वागावकर, दत्तात्रय घुले, सुरेश कोरगावकर , सौ समिता बागकर, विशाल कोर्लेकर यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या अगोदरही ग्रुपतर्फे डोंबिवली येथील जोशी काका यांना २१,०००/- रु.मदत कोरोना काळात करण्यात आली. आता मुंबई मध्ये रक्तपुरवठा कमी असल्या मुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचे ग्रुपचे पदाधिकारी संस्थापक संतोष पाटील, संचालक सुर्यकांत कडू, अध्यक्ष रविंद्र जाधव, उपाध्यक्ष यशवंत खोपकर यांनी सांगितले. कारण रणभूमीवर जाऊन देशासाठी रक्त साडणे प्रत्येकाला शक्य नाही. मात्र तेवढेच पुण्यकार्य सहज शक्य आहे रक्तदान केल्याने मिळू शकते. शिवाय जी लहान मुले थँलिसिमीया या आजाराने त्रस्त आहेत त्यांना आयुष्यभर दर १५ दिवसांनी रक्त घ्यावे लागते. त्यांना हे रक्त प्राप्त झाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ शकतो. म्हणून "रक्तदान...सर्व श्रेष्ठ दान.."रक्तदान करा..जीवन वाचवा.. असा संकल्प करत हे शिबिर आयोजकांतर्फे घेण्यात आले.

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर !

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगाव तालुक्याच्या गोरेगाव विभागातील हरकोलकोंड नदीवर आमदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या प्रयत्नाने मंजूर करून आणण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. 
      यावेळी माननीय लोकप्रिय कार्यसम्राट आमदार गोगावले यांनी पुढे बोलताना सांगितले की ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणखी बंधारे या विभागात मंजूर करून आणण्यात येतील. आपण पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करावा या बंधाऱ्यामुळे या भागातील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.     
      शासनाच्या घर तिथे नळ या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे या योजनेमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे आणि जनतेला मुबलक पाणी मिळणार आहे. आपण ही योजना जनतेच्या सहकार्याने व्यवस्थित रित्या पूर्णत्वाकडे सर्वजण मिळून काम करूया असे आमदार भरत शेठ गोगावले म्हणाले. या विभागाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे त्यामुळे कायमच या भागाला आम्ही विकास कामांच्या बाबतीत सर्वात जास्त झुकते माप देण्याचा प्रयत्न करत आहोत. 
       आपण संघटनेच्या पाठीवर कायमच असे ठाम राहाल त्याची अपेक्षा करतो तसेच    कोरोना काळात रखडलेली उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी खास करून महिलांनी आमदार साहेबांचे आभार मानले. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत समिती सदस्य माजी सभापती सुजित शिंदे आणि या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...