Tuesday, 2 November 2021

जमाते इस्लामी हिंदतर्फे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात जनजागृती हुंडा प्रथा.. "स्त्री भ्रूण हत्या, अश्लीलता या विषयांवर चर्चासत्र"

जमाते इस्लामी हिंदतर्फे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात जनजागृती हुंडा प्रथा..
"स्त्री भ्रूण हत्या, अश्लीलता या विषयांवर चर्चासत्र"


कल्याण, ऋषिकेश चौधरी :
कल्याण येथे जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने समाजातील महिलांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.


या संघटनेने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात जमाते इस्लामी हिंद, डॉ.इकराम कटावला, शाईस्ता खाटीक, ॲड. क्रांती रोटे, सागर वाघेला आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या लोकांनी सांगितले की, या झपाट्याने बदलत्या युगात महिला अजूनही वंचित आहेत. जुन्या चालीरीतींचे ओझे मात्र हुंड्यासाठी महिलांचा छळ करण्यासारखे अन्याय अत्याचार केले जात आहेत. 


याशिवाय मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून समाजात अश्‍लीलता वाढत आहे, सरकारने त्यांच्यावर बंदी घातली असली तरी आपण स्वतःही अश्लीलता टाळण्याची गरज आहे, यासोबतच स्त्री भ्रूणहत्या आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी महिलांनी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे. या विषयावर चर्चा झाली.
या चर्चा सत्राच्या आयोजनात जमात इस्लामी हिंदच्या वेलफेअर युनिटचे अध्यक्ष अख्तरुल इमान, मोईन डॉन, अशफाक शेख, मिशाल चौधरी, नासिर खान, नईम काझी आदींचा सहभाग होता.



सयोंग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी मानले पत्रकारांचे आभार !!

सयोंग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी मानले पत्रकारांचे आभार !!


कल्याण, ऋषिकेश  चौधरी :
कल्याण पुवैतील विठ्ठलवाडी तलाव परिसरात घाणीचे सामाज्य पसरले होते, कोंबडी वाले तसेच आजूबाजूचे नागरिक येवून तेथे घाण टाकीत होते, त्यामुळे परिसरात घाणीचे सामाज्य पसरले होते, सदर बातमी पेपर मध्ये प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ तळाव परिसर साफ सफाई केली, याबाबत सयोंग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी पत्रकारांचे आभार मानले आहेत, बातमी प्रसिद्ध झाली मुळे महापालिका प्रशासन जागे झाले.


Monday, 1 November 2021

जांभूळ ग्रामस्थांची दिवाळी गोड, सरपंच परिक्षित पिसाळ यांना 'नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड पुरस्कार! कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा!

जांभूळ ग्रामस्थांची दिवाळी गोड, सरपंच परिक्षित पिसाळ यांना 'नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड पुरस्कार! कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रुप
ग्रामपंचायत जांभूळ चे तरुण तडफदार सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जागतिक किर्तीच्या नेल्सन मंडेला नोबल पीस अँवार्ड अँकेडमी तर्फे सन २०२१ या वर्षासाठीचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड, हा पुरस्कार जाहीर झाला असून नुकताच मुंबई येथे झालेल्या एका शानदार समारंभात विविध मान्यवरांच्या हस्ते तो प्रधान करण्यात आला. त्यामुळे समस्त जांभूळ ग्रामस्थांची दिवाळी गोड झाली आहे. तर हा पुरस्कार म्हणजे कल्याण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे बोलले जात आहे.


कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभूळची स्थापना २७ मार्च १९९२ रोजी झाली आहे. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे,सुरुवातीचे काही वर्षे ही कुरघोडी च्या राजकारणात गेली असली तरी १५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली, ८ फेब्रुवारी ला सरपंच उपसरपंच निवड होऊन सरपंच पदी, तरुण, सुक्षिशीत, सकारात्मक विचारांचे परिक्षित हिराजी पिसाळ, तर उपसरपंच पदी सुनिता सुरेश गोरे यांची निवड झाली. तसेच सदस्य म्हणून सुमन पिसाळ, ज्योती जाधव, गुलाब मुकणे, रेखा गायकवाड, अशोक शिंदे, अक्षय सावंत आणि राजाराम मुकणे हे निवडून आले.


सरपंच परिक्षित पिसाळ हे मागील पंचवार्षिक मध्ये उपसरपंच होते, तसेच राजकारणातील धुंरदर तसेच समाजसेवक नाना पिसाळ यांच्या कुटुंबातील ते असल्याने ते सामाजिक जिणीवेतूनच सरपंच पदावर विराजमान झाले होते.


साधारण पणे २ हजारच्या आसपास लोकवस्ती असलेल्या जांभूळ गावातील अतंर्गत रस्ते, गटारे, शौचालय, फेवरब्लाँक, आदी कामे प्राधान्याने केली. २५० च्या आसपास असलेल्या आदीवासी समाजासाठी ठक्कर बाप्पा योजनेतून मंगल कार्यालय, २०० लोकवस्ती असलेल्या मागासवर्गीयासाठी, समाजहाल, बांधले, गावातील तरुण मंडळीना व्यायामाची सवय लागावी, ते व्यसनाधीनतेकडे वळू नयेत म्हणून ३ सुसज्ज जिम बांधण्यात आली तर  वयोवृद्धासाठी ओपनजिम तयार करण्यात आली. ऐवढेच नव्हे तर तालुक्यातील पहिली मँटवरील कबड्डी ही याच गावात सुरू झाली. गावातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून महिला भवन, तीन कलामंच निर्माण केले.


सरपंच परिक्षित पिसाळ, उपसरपंच सुनिता गोरे व सदस्य आणि प्रशासनाची बाजू उत्तम पणे सांभाळणारे ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी २०१८ पासून गावाला वाहून घेतले जेष्ठ नेते नाना पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावविकासाचा विडा उचललेल्या सरपंच पिसाळ यांनी संपूर्ण गाव सीसीटीव्ही युक्त केले, ग्रामपंचायतीची स्वतः ची वेबसाईटवर निर्माण करणे संपूर्ण व्यवहार पारदर्शक ठेवला, लोकसहभागातून कित्येक वर्षे रखडलेल्या स्मशानभूमी व गणेश घाट बांधून हा प्रश्न सोडविला, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कच-यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना जांभूळ गाव मात्र कचरामुक्त गाव म्हणून ओळखले जाते. देशाचे भावी नागरिक घडविणा-या शाळेसाठी व मुलासाठी वाचनालय तयार करून आजमितीस त्यामध्ये अडीच ते ३ हजार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. गावात १०० टक्के नळजोडणी केली असून २४ तास पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच भविष्यात सर्वांना मिटर व्दारे पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा या गावाच्या सरपंचाच्या सामाजिक कार्याची दखल नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड अँकेडमी चे अध्यक्ष राजकुमार तक यांनी घेतली. व सन २०२१चा नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड पुरस्कार सरपंच परिक्षित पिसाळ यांना जाहीर केला. तो पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी इजराईल चे जनरल काँन्सुलेट कोब्बी शोशानी, डॉ गुल क्रिपलानी, अध्यक्ष राजकुमार तक,यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सिनेअभिनेत्री डॉ आदीती गोवित्रीकर, संगीतकार अनू मलिक, उत्तरप्रदेशचे आमदार ब्रीजभूषण राजपूत, गायिका महालक्ष्मी अय्यर, आदी मान्य वर उपस्थित होते.

दरम्यान हा पुरस्कार अंत्यत मानाचा मानला जातो, मागील वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाला जाहीर झाला होता. तर या वर्षी तो सरपंच परिक्षित पिसाळ यांना लाभला आहे, त्यामुळे ही समस्त जांभूळ ग्रामस्थांनसाठी अभिमानास्पद बाब असून ऐतिहासिक कल्याण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक बाळू कोकणे, जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

खऱ्या अर्थाने दिवाळी कशी साजरी करावी? - संत राजिन्दर सिंह जी महाराज

खऱ्या अर्थाने दिवाळी कशी साजरी करावी? - संत राजिन्दर सिंह जी महाराज


दिवाळी हा आनंदाचा सण आहे. इतिहास पाहिल्यास कळते की, आजच्या दिवशी मोठमोठ्या संत-महात्म्यांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपण आपल्या घरांची साफ-सफाई करतो.

आपल्या घराची साफ-सफाई करताना आपण त्या वस्तूंना बाहेर काढतो ज्या आपल्याकरिता उपयुक्त नसतात. जर आपण आपल्या बरोबर बरेचसे अनावश्यक सामान बाळगत असू अथवा त्या वस्तूंकडे लक्ष देण्यात आपला वेळ वाया घालवत असू, ज्या आपणांस काही लाभ मिळवून देत नाही, तर याचा अर्थ असा आहे की, आपण असे जीवन जगत आहोत ज्यामध्ये आपले लक्ष जीवनाच्या उद्देशा  प्रति नाही. अशा अवस्थेत आपल्या अंतरी सदैव एक संघर्ष चालू असतो, ज्यामध्ये एकीकडे आपले मन या बाह्य संसारात लिप्त राहू इच्छिते तर दुसरीकडे आपला आत्मा अंतरात परमात्म्याला प्राप्त करू इच्छितो. आपला आत्मा मनाद्वारे उत्पन्न झालेल्या मलिनतेला साफ करण्याचा प्रयत्न करत असतो. आपले मन- काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकाराच्या या ५ चोरांच्या मदतीने आपल्या अंतरी मलिनता निर्माण करते.
आपण स्वतःला तोपर्यंत शांत करू शकत नाही जोपर्यंत आपणांस कोण्यापूर्ण सद्गुरुंची मदत मिळत नाही. एक पूर्ण सद्गुरु आपली मदत कशी करतात? सर्वप्रथम ते आपणांस पवित्र नामाशी जोडतात. जेव्हा आपण ध्यानाभ्यासा दरम्यान आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण करतो, त्यामुळे आपले मन शांत होते. ज्यामुळे आपण आपल्या अंतरिच प्रभूच्या ज्योति व श्रुति अनुभव करतो. दुसरे असे की, सद्गुरू आपणांस हे ही समजावितात की, निष्काम सेवा करण्यानेच आपण मनाच्या दुष्प्रभावांपासुन मुक्तता मिळवु शकतो आणि मनावर नियंत्रण ठेवू शकतो, ज्यामुळे आपला आत्मा सुद्धा शुद्ध होतो. आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनातच आपण आपल्या जीवन योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यानेच खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण आपण साजरा करू शकतो.

सर्व धर्मांच्या मूलभूत शिकवणुकींत आपणास समजाविले आहे की, जशी आपण बाहेर दिवाळी साजरी करतो, ठीक त्याच प्रकारे आपण आपल्या अंतरी सुद्धा दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळीच्या सणात आपण जे दिवे प्रज्वलित करतो आणि फटाके फोडतो ते सर्व आपल्या अंतरी विद्यमान प्रभूच्या ज्योति व श्रुति चे प्रतीक आहे. 

चला तर! दिवाळीच्या या सणाला आपण सुद्धा बाह्य सफाई बरोबरच आपली आंतरिक सफाई करूया आणि सर्वात महत्त्वाचे की आपण ध्यानाभ्यासास वेळ देऊया, जेणेकरून आपणास प्रभूच्या ज्योति आणि श्रुतिचा अनुभव व्हावा, ज्या मुळे आपण खऱ्या अर्थाने दिवाळीचा हा सण साजरा करू शकू.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण पुन्हा वाढले : एस.एम.देशमुख !!

कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण पुन्हा वाढले : एस.एम.देशमुख !!


     बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील पत्रकारांवर पुन्हा एकदा चिंता वाटावी अशा प़माणात हल्ले वाढल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केला आहे.. उदया जागतिक स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी दिवस पाळला जात आहे.. त्याच्या पुर्वसंधेला माध्यमांशी संवाद साधताना एस.एम.देशमुख यांनी हा आरोप केला.. 

एस एम देशमूख म्हणाले, महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत होते.. त्याविरोधात पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना केली होती.. समितीच्या वतीने सतत बारा वर्षे, संघर्ष, आंदोलनं केल्यानंतर ७ एप़िल २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याचे एक विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले.. ते एकमताने संमत झाले.. त्यावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.. कायदा झाल्यानंतर पहिल्या सहामाहीत पत्रकारांवरील हल्ल्यांचे प़माण घटले होते.. 

मात्र पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हेच दाखल होत नाहीत असे वास्तव समोर आल्यानंतर राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याचे प़माण पुन्हा वाढले आहे.. राज्यात सध्या १० दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे.. 

एस.एम.देशमुख म्हणाले, पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे.. त्याचे नक्कीच कौतूक असले तरी हा कायदा केवळ कागदोपत्रीच आहे, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही. या कायद्याखाली गुन्हे दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात अनेक ठिकाणी तर असा काही कायदा आहे हेच पोलिसांना माहिती नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.. मात्र काही ठिकाणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत हे देखील देशमुख यांनी मान्य केले.. 

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी या मागणीची निवेदन वारंवार मुख्यमंत्र्यांना पाठविली पण त्याचा उपयोग होत नाही.. त्यामुळे नुकतीच आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पाटील यांची भेट घेऊन पत्रकारांवरील वाढत्या हललयाबददल चिंता व्यक्त करीत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी त्यांच्याकडे मागणी केल्याचे देशमुख यांनी सांगितले.. 

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा असून गुन्हा सिध्द झाल्यास हललेखोरांना ३ वर्षाच्या शिक्षेची आणि पन्नास हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.. तसेच पत्रकार किंवा माध्यमाच्या कार्यालयाचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान हल्वोखोरांकडून वसूल करण्याची तरतूद देखील या कायद्यात केलेली आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून चिपळूण व खेडमधील पूरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत !!

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून चिपळूण व खेडमधील पूरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत !!

संदीप शेंडगे / बातमीदार,
ठाणे : २२ जुलै २०२१ रोजी कोकणात मुसळधार पाऊस पडल्याने चिपळूण, खेड, कराड या भागात महापूर आलेला होता. त्याचबरोबर काही भागात भूस्खलन झालं होतं. अनेक शाळांमध्ये व विद्यार्थ्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे वह्य़ा दप्तर पुस्तक, शाळेतील भौतिक सुविधांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळांना "महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रेसर" यांच्यावतीने  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या माध्यमातून आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
        चिपळूण आणि खेड व कराड मधील सदर पूरग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर तसेच ६ शाळांना प्रत्येकी ५००० रु. आर्थिक मदत देण्यात आली. तसेच साखरे गावात भूस्खलनात जीव गमावलेल्या  सतरा लोकांना श्रद्धांजली वाहिली व कुटुंबातील सर्व व्यक्ती गमावलेल्या कुमारी. राणी वसंत मोहिते या विद्यार्थिनीला ५ हजारांची आर्थिक मदत दिली.
       "ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश संकपाळ"  यांच्यावतीने दप्तर ,वह्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या. शाळांना आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्य वाटप करताना रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाची अध्यक्ष विजय पाटील, रत्नागिरी जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष संदीप कांबळे, प्राध्यापक सेनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मानेसर, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष खेडेकर, खेड तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष शिरसाठ, ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे सचिव नांदूरकडे, संचालक यादवसर, ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष विलास आंग्रे, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष देसाई रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यकारिणी सदस्य साळवी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी माहिती विष्णू विशे "संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना" यांनी दिली.

अमेझिंग ऍक्टिव्ह महिला ग्रुपच्यावतीने दीपावली निमित्त महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे समाजसेविका सौ.पल्लवी कुणाल सरमळकर यांच्या हस्ते सुभारंभ !!

अमेझिंग ऍक्टिव्ह महिला ग्रुपच्यावतीने  दीपावली निमित्त महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे समाजसेविका सौ.पल्लवी कुणाल सरमळकर यांच्या हस्ते सुभारंभ !!


मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :
       पश्चिम उपनगर मधील उल्लेखनीय असे काम करणाऱ्या समाजसेविका मा.सौ.पल्लवी कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते वांद्रे पूर्व विधानसभेतील विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी अमेझिंग ऍक्टिव्ह महिला ग्रुपच्यावतीने आयोजित दीपावली निमित्त महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल शुभारंभ कार्यक्रम, तसेच खार पूर्व संजीवनी हौसिंग सोसायटी येथील "विठू साई स्पोर्टस क्लब" भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा व ज्ञानेश्वर नगर कबड्डी सामान्यांचा देखील शुभारंभ सौ.पल्लवी कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते पार पडला. या सर्व कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल सौ.पल्लवी सरमळकर यांनी आयोजक सर्व  मंडळांचे आभार मानले व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...