Thursday, 1 December 2022

शिवाई बालक मंदिर -डोंबिवली आयोजित विज्ञान व कलागुणांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न !

शिवाई बालक मंदिर -डोंबिवली आयोजित विज्ञान व कलागुणांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न !
 

ठाणे- उदय दणदणे

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा व विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता जोपासण्यासाठी शिवाई बालक मंदिर, डोंबिवली (पूर्व) शाळेत विज्ञान आणि मुलांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते. 

सदर प्रदर्शन पूर्व प्राथमिक (छोटा शिशु ते बालवर्ग),  प्राथमिक विभाग- इयत्ता १ ली ते ४ थी व  ५ वी ते ७ वी, आणि माध्यमिक विभाग - इयत्ता ८ वी ते १० वी अशा ४ गटांमध्ये संपन्न झाले.

सदर प्रदर्शनामध्ये विज्ञान प्रदर्शन, भाज्यांची सजावट, फुलांची सजावट कृत्रिम फुलांची सजावट, रांगोळी प्रदर्शन, किल्ले बांधणी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. 

विज्ञान प्रयोगाचे परीक्षण रेखा पुणतांबेकर मॅडम (टिळक नगर) शाळेच्या माजी- प्राचार्या ) , कुमार हर्ष गांधी,  मेघना फोंडके व  सविता बावकर (अध्ययन संस्थेच्या -सदस्या) आदी परीक्षकांनी केले. त्याचप्रमाणे रांगोळी प्रदर्शन ,भाज्यांची सजावट, फुलांची सजावट, या स्पर्धांचे परीक्षण स्मिता वीरकर व कु.श्रद्धा भोसले यांनी केले. किल्ले बांधणी स्पर्धेचे परीक्षण  महेश पाटील व रवी पाबळे आणि त्यांचे सहकारी यांनी केले.
 पुणतांबेकर मॅडम यांनी महत्वपूर्ण माहिती देत सदर विज्ञान प्रदर्शन हे आधुनिकतेवर आधारित होते. अगदी लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी याकरिता शिशु बालवर्गापासूनच विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे उत्तम सादरीकरण केले होते. ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले, त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सखोल ज्ञान होते आणि त्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरे दिली. प्रदर्शनाचे आयोजन उत्तम होते. 

बालवर्गाच्या विद्यार्थ्यांनी  *"ळ व ळी'*  या अक्षरापासून अनेक शब्दखेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले, असे त्यांनी सांगितले व विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर केला .

स्मिता वीरकर मॅडम या बालक मंदिर विद्यालय कल्याण येथे कला शिक्षक म्हणून त्या कार्यरत असून त्यांनी भाज्यांची आणि फुलांची सजावट अप्रतिम होती असा अभिप्राय देऊन निकाल जाहीर केला.  स्पर्धेमध्ये माता पालकांनी  आई आणि गृहिणी ही जबाबदारी सांभाळतानाच आपल्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता वेळ काढून स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 

महेश पाटील - इतिहास अभ्यासक आणि माजी संचालक- अभिनव सहकारी बँक लिमिटेड डोंबिवली तसेच रवी पाबळे (जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे- अध्यक्ष) आणि त्यांचे सहकारी यांनी किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार सांगून विद्यार्थ्यांना किल्ले बांधणी कशी करावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना कलाकृती करण्यास दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल शाळेचे आभार मानले.   

प्रत्येक स्पर्धेचे प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग या प्रदर्शनामध्ये होता. अशा उत्साही वातावरणात सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी रीत्या संपन्न झाला.

सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगांव यांच्या वतीने युवा गट कार्यशाळा संपन्न !

सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगांव यांच्या 
वतीने युवा गट कार्यशाळा संपन्न !

जळगांव, अखलाख देशमुख,  दि.०१ :  रोजी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने  अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळा दि.०१ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन, जळगांव येथे नरेंद्र डागर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नेहरू युवा केंद्र, जळगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मा. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात दि.२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ०६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वाण या कालावधीत समता पर्व – २०२२ साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत समता पर्व -२०२२ अंतर्गत अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळेत ग्रामीण व तालुका पातळीवरील युवकांना “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” या विषयावर विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सदरील कार्यशाळेत माहिती देण्यात आली. 

यावेळी मंचावर योगेश पाटील सहायक आयुक्त, समाजकल्याण जळगांव,  जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नाबार्ड श्रीकांत झांबरे,  शास्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र  किरण मांडवडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कार्यक्रम समन्वयक राहुल संदानशिव, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. दर्शना पवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जिल्हा व्यवस्थापक श्रीमती. श्रुती चौधरी, महाराष्ट्र उद्योजकता केंद्र जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. विजय सैंदाणे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, युनूस तडवी बार्टी, आदी उपस्थित होते.
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करून समता पर्व -२०२२ अंतर्गत अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना  योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव  यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना व युवकांसाठी विविध रोजगार संधी आणि उद्योजकता विकास याबाबत माहिती दिली.  सदरील सदरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक नरेंद्र डागर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नेहरू युवा केंद्र, जळगाव यांनी नेहरू युवा केंद्राचे विविध उपक्रम या विषयावर मार्गदर्शन करतांना युवकांनी उद्योजाकताची कास धरावी आणि देशाच्या विकासाठी हाथभार लावावा याबाबत युवकांना मार्गदर्शन केले. तसेच श्रीकांत झांबरे यांनी नाबार्ड अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन करतांना नाबार्डच्या विविध योजना व प्रशिक्षण याबाबत आपले मत मांडले. शास्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र  किरण मांडवडे  यांनी नैसर्गिक शेती व तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतांना कृषी पूरक व्यवसायात मधमक्षिका पालन, कुकुटपालन इ. बाबत मत मांडले. श्रीमती. दर्शना पवार यांनी स्री-पुरुष सक्षमीकरण व वैचारिक प्रगल्बता या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. राहुल संदानशिव, श्रुती चौधरी, विजय सैंदाणे यांनी संबंधित विभागातील योजना व प्रशिक्षणांची माहिती दिली.

सदर कार्यक्रमात योग्य पद्धतीने युवकांनी गाव व तालुका पातळीवर शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय व दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. योगेश पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित युवकांना कार्यक्रमांती कृषी विज्ञान केंद्र, जळगांव येथे अभ्यास दौरा घेण्यात आला असून कृषी क्षेत्रासंबंधी विविध प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांनी केले तर आभार  युनूस तडवी बार्टी, यांनी मानले.

तरी सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे यांचे सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व तालुका समन्वयक, समतादूत यांनी परिश्रम घेतले.

*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बहाल करा - आप 'पालक संघटना*

*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बहाल करा - आप 'पालक संघटना*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय आणि समाज कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यादेश काढून अल्पसंख्याक समाजातील म्हणजेच मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आणि जैन या समाजातील पहिली ते आठवीपर्यंत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अल्पसंख्या संवर्गातील शिष्यवृत्ती अचानकपणे 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्याचा निर्णय निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून याचा परिणाम अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यावर पडणार आहे , आधीच 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे गरीब समाजातील मुले शिक्षणापासून वंचित होण्याच्या कागारावर पडलें आहेत आणि आता शिष्यवृत्ती बंद चा निर्णय,  दोन्ही निर्णय दुर्भाग्यपूर्ण असून, केंद्र शासनाने सदर निर्णय तत्काळ रद्द करून उलट अल्पसंख्याक समाजातील शिष्यवृत्ती वाढवून देण्याची गरज आहे, असे आम आदमी पालक संघटनाच्या वतीने आज दिलेल्या केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि केंद्रीय अल्पसंख्याक  कल्याण मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.

आम आदमी पालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इसाक अंडेवाला, प्रदेश अध्यक्ष अशिर जयहिंद यांनी तीव्र निषेध नोंदवला, विशेष उपस्थिती म्हणून आपचे नेते जालिंदर ढाकणे, जिल्हा महिला अध्यक्ष मेघा रायकर, ज्योती जाधव, शहर अध्यक्ष रूपाली धनेधर, श्रीमती ताज खान,  मजास खान , प्रशांत निकम, ज्ञानेश्वर बोरसे, सोहेल खान, शेख जाकीर, शेख हबीब, शेख मुस्ताक , अब्दुल हाई, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली विरोधात शिवसेना आक्रमक !

शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली विरोधात शिवसेना आक्रमक !

*विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात*

औरंगाबाद/ गंगापुर, अखलाख देशमुख, दि १ : शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल केली जात आहे व पीकविमा कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे, शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही या शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात  शिवसेना आक्रमक झाली असून आज गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा रस्त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज (१ डिसेंबर) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच आंदोलक शिवसैनिकांनी "शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळालीच पाहिजे", "सक्तीची वीज वीज बिल वसुली थांबलीच पाहिजे", "शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करा नाहीतर शेतकरी विरोधी सरकार चालते व्हा" या घोषणा देत मींधे सरकारचा निषेध केला.

अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

*यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी अस्मानी संकटात शेतकरी त्रस्त असताना शिंदे - फडणवीस सरकार कोणत्याही शेतकऱ्याची वीज कनेक्शन तोडणार नाही, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळेल, असे सांगण्यात येत असून मुळात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार कायम खोटी आश्वासन देत असून हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या झोपलेल्या शेतकरी विरोधी सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरली आहे. शिंदे फडणवीस सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या नसता संपूर्ण राज्यभरात याहीपेक्षा तीव्र आंदोलन या सरकारच्या विरोधात करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.*

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे,अविनाश पाटील,अंकुश सुंभ, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, मनोज पिंपळे, पोपट गाडेकर, ज्ञानेश्वर नवले, रमेश निचीत, विश्वंभर शिंदे जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर, सभापती रवींद्र पोळ, मा. उपसभापती संपत छाजेड, किशोर मगर, ज्ञानेश्वर बोरकर, मनोज जयस्वाल, शहरप्रमुख भाग्येश गंगवाल,अमोल शिरसाठ, नंदू राऊत, बाबासाहेब मोहिते, कैलाश हिवाळे, नारायण ठोळे, पोपट गाडेकर, लक्ष्मण सुपेकर, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब चंनघटे, गणेश राऊत, कारभारी दुबिले, पोपट नरवडे, प्रवीण दुबिले, कांता साळुंखे, राधेश्याम कोल्हे, गोकुल तांगडे, नितीन कांजूने, गोविंद वल्ले, लक्ष्मण बहिर, गणेश राजपूत, कारभारी दुबिले, रावसाहेब टेके, भिमराव ठोकळ, रवी पोळ, नारायण जाधव, बाळासाहेब एटकर, सुरेंद्र सूर्यवंशी, विश्वनाथ तांगडे, शुभम जाधव, राजेंद्र गावडे, अर्जुन मुळे, विजय जैस्वाल, सखाहरी सुकासे,शिवाजी शिंदे, विनोद इथापे, शरद गवादे, गणेश राऊत ,भास्कर रोडगे, विष्णू पोटे, जालिंदर राऊत, अंकुर निकम, उपशहरप्रमुख भगवान साळुंके, ग्रा. सदस्य संदीप मनोरे, राजेश उनोणे, आप्पासाहेब जाधव राहुल जाधव, निलेश शिंदे महिला आघाडी तालुका संघटिका अर्चना सोमासे गेलोत ताई ,नंदा पगारे, शोभा बनकर, ईले ताई, अनिता वाघचौरे आधी शिवसैनिक, पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत दिली २ डिसेंबर पर्यंत वाढवून, भिवंडी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची धावपळ !

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत दिली २ डिसेंबर पर्यंत वाढवून, भिवंडी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची धावपळ !

भिवंडी, दि,१, अरुण पाटील (कोपर) :
             ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे. आयोगाची वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अडचणी होत असून विलंब होतो आहे. नामाकंन अर्ज ऑफलाईन पध्दतीने भरण्यास परवानगी आणि वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली जात होती. राज्य निवडणूक आयोगाने ही बाब लक्षात घेत, २ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दीली असून भिवंडी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्याने उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.
            ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार धावपळ करताना दिसतायेत. मात्र, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी दिली आहे.
            विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज दिली.
            राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ह जार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२0 (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा'चे उद्घाटन !

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा'चे उद्घाटन !

विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत - जिल्हाधिकारी निमा अरोरा 
 
अकोला, अखलाख देशमुख, दि. १ :  विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने कलागुणांना झळाळी मिळते आणि व्यक्तिमत्व विकासात त्याने मोलाची मदत होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी केले .
              येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर अकोला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीच्यावतीने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितिच्या अध्यक्ष ॲड अनिता गुरव  आदि उपस्थित होते. 
             यावेळी आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी म्हणाल्या, आजच्या या बालमहोत्सवातून यश मिळविलेले मुल-मुली  क्रीडा व अन्य कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीच्यामाध्यमातून विभाग स्तर, राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  स्तरावरही आपली  छाप सोडू शकतात. अशा स्पर्धा व उपक्रमांतून व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत होत असते. हा महोत्सव एक उत्तम संधी समजून यात सहभागी सर्व स्पर्धकांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशा सदिच्छाही त्यांनी  यावेळी दिल्या. 
              जिल्हा स्तरावरील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या निराधार,उन्मार्गी,एकल पालक व कोवीड  महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व  त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने 'जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.  
            दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुक्रवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी  ५ वाजता समारोप होणार असून या कार्यक्रमातच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदाण करण्यात येणार आहेत.

विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा !

विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा !

अकोला, अखलाख देशमुख, दि.१ - जिल्ह्यात गोवरची साथ, लम्पि आजार, पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार पुनरिक्षण कार्यक्रम अशा विविध विषयांचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी घेतला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपवनसंरक्षक अर्जुना के आर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी,डॉ. तुषार बावने, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनी आढावा घेतांना साथीचे आजार गोवर व कोविड बाबत माहिती घेतली. जिल्ह्यात रुबेलाचे ४१ तर गोवरचे १७ असे एकूण ५८ रुग्ण असुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत. हा आजार विषाणूजन्य असून संसर्गजन्य आहे. त्यादृष्टीने अधिक खबरदारी घेण्यात यावी. या संदर्भात आवश्यक औषधांच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात लम्पि चर्मरोगामुळे ३२ हजार गुरे बाधीत झालीत. त्यात उपचारानंतर २८ हजार ८६० जनावरे पूर्ण बरी झाली असून जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ६३१ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. १९१४ जनावरे मृत्युमुखी पडले असून आतापर्यंत म्हणजे १४२० मृत जनावरांच्या पशुमालकांसाठी ३ कोटी ४४ लक्ष रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली असून ३ कोटी ४३ लाख रुपयांच्या भरपाई रकमेचे पशुपालकांच्या बॅंक खात्यात प्रत्यक्ष वितरण झाले आहे. 

अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावाही घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार मतदारांची नोंदणी झाली असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात होत असलेला मतदार पुनरिक्षण कार्यक्रम, तसेच गांधीग्राम पुलासंदर्भात अकोटकडे जाणाऱ्या वाहतुकीचा पर्यायी मार्ग याबाबतही माहिती देण्यात आली. पुरवठा विभागामार्फत होत असलेले धान्य वितरण, ई- पॉस मशिन बाबत प्राप्त तक्रारी याबाबतही आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार वाहनाला त्यांच्या हस्ते झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...