Friday, 2 December 2022

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे मुंबई सह नवी मुंबई, सोलापूर पदाधिकारी जाहीर !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे मुंबई सह नवी मुंबई, सोलापूर पदाधिकारी जाहीर !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
                शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते व आमदार श्री. सचिन भाऊ अहिर, उपनेत्या मीनाताई कांबळी व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा. आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्षा सौ.शुभा राऊळ मॅडम, कार्याध्यक्ष डॉ.श्री.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र समन्वयक श्री.जितेन्द्र दगडूू (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शिवसेना भवन दादर येथे जाहीर करण्यात आल्या. मुंबई विभाग- १) श्री.अमोल ज्ञानदेव वंजारे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक, २) सौ. ज्योती लक्ष्मण भोसले मुंबई जिल्हा समन्वय सचिव, ३) सौ. सुप्रिया प्रकाश ठोंबरे- पाटणे मुंबई जिल्हा समन्वय सचिव, ४) श्री.प्रकाश बाबुराव वाणी मुंबई उपनगर पूर्व सहसमन्वयक, ५) श्री.शिवाजी भाऊ जोरे मुंबई उपनगर पूर्व समन्वय सचिव, ६) श्री.विनायक शंकर कानसकर घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक, ७)श्री. सिद्धेश सूर्यकांत मोहिरे घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वय सचिव, ८) श्री. मयूर नंदकुमार वाटाबळे घाटकोपर पश्चिम विधानसभा आरोग्य संघटक ९) श्री. अभिजीत शिवाजी देसाई मानखुर्द विधानसभा समन्वय सचिव, १०) श्री. प्रवीण बाळकृष्ण ढवळे भांडुप पश्चिम विधानसभा समन्वय सचिव आणि नवीमुंबई विभाग- १) श्री.प्रवीण शंकर वाघराळकर नवी मुंबई विभागीय समन्वयक, २) श्री.अक्षय पांडुरंग गोरे ऐरोली विधानसभा आरोग्य संघटक, ३) श्री.राजेश बाजीराव यादव बेलापूर विधानसभा आरोग्य संघटक तसेच सोलापूर जिल्हा- १) डॉ. रामलिंग मल्लिकार्जुन जिल्हा अध्यक्ष सोलापूर २) डॉ. सोहिलअख्तर सैपोदिन मुजावर जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर ३) डॉ. नितीन वाघमोडे सोलापूर जिल्हा सचिव ४) डॉ.अनिल पोरे सोलापूर जिल्हा सहसचिव ५) श्री.दिपक अभिमान सुर्वे जिल्हा समन्वयक सोलापूर ६) श्री. धन्यकुमार विश्वनाथ चोपडे
जिल्हा सहसमन्वयक सोलापूर ७) श्री. श्रीशैल माळी शिव जिल्हा सहसमन्वक सोलापूर ८) श्री.सागर शिंदे आरोग्य संघटक सोलापूर जिल्हा यांचा समावेश आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या आहेत.

Thursday, 1 December 2022

२० ते २५ डिसेंबर दरम्यान "द्रोणागिरी" २२वा युवा महोत्सव रंगणार !

२० ते २५ डिसेंबर दरम्यान "द्रोणागिरी" २२वा युवा महोत्सव  रंगणार !
रायगड (गुरुदत्त वाकदेकर) : द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे २२वा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात मैदानी स्पर्धांसोबतच साहित्यालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. यंदाही रायगड जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर काव्य स्पर्धा बुधवार दिनांक २१ डिसेंबर, २०२२ रोजी दुपारी ठीक ३:३० वाजता बोकडवीरा गाव, एन्. एम्. एस्. ई. झेड. मैदान, पेट्रोल पंपाजवळ, ता. उरण, जि. रायगड येथे होणार आहे, अशी माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, सचिव दिलीप तांडेल, स्पर्धा प्रमुख/सूत्रसंचालक अरुण द. म्हात्रे, संयोजक/निवेदक संजय होळकर, भ. पो. म्हात्रे यांनी कळवली आहे. 

*काव्य स्पर्धेच्या नियम व अटी:-*
रायगड जिल्ह्यातील कवींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी १८ वर्षांवरील ५० सारस्वतांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. काव्यस्पर्धेसाठी विषयाचे बंधन नाही. कविता मराठी भाषेतच, स्वरचित आणि सकारात्मक असावी. कोणत्याही प्रकारचे अश्लील/अर्वाच्य शब्द वापरू नयेत. सामाजिक/ राजकीय तेढ निर्माण करणार्‍या तसेच कुणाचेही मन दुखावणार्‍या रचना नकोत. कविता फक्त तीन मिनिटांत पाहून/वाचून/गाऊन सादर करता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील. कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकांनी अबाधित ठेवले आहेत. सूचना-नियम पाळावेत. सर्व सहभागी स्पर्धकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल तसेच बक्षिसे आणि प्रमाणपत्र स्पर्धेच्या ठिकाणी लगेचच देण्यात येतील. दिनांक १९ डिसेंबर, २०२२ पर्यंत नाव नोंदणी ९८२०४५२४२७ किंवा ९००४७६६१५८ ह्यापैकी एकाच  व्हाॅट्सअॅप क्रमांकांवर करावी. आपली नावनोंदणी झाली की नाही हे आपल्याला कळवले जाईल. कृपया दूरध्वनी करू नये. स्पर्धकांनी स्वखर्चाने येणे-जाणे करायचे आहे. सर्व सहभागींसाठी चहापाणी तसेच गाड्या पार्किंगची विनामूल्य सोय केलेली आहे.

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा !

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. , मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.

अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.

मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.

नववर्षाच्या स्वागतला रंगणार आशिष भाई तिवारी चषकाचा थरार !

नववर्षाच्या स्वागतला रंगणार आशिष भाई तिवारी चषकाचा थरार !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
             समस्त क्रीडाप्रेमी ज्या चषकाची आतुरतेने वाट पाहत असतात तो चषक अर्थात एस.पी ग्रुप आयोजित आशिष भाई तिवारी चषक-२०२३ नववर्षाच्या आगमनाला शनिवार दिनांक ७ व रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी ६ वा मजला, हायस्ट्रीट मॉल, माजिवडा, ठाणे येथे संपन्न होत आहे. नेहमी नवनवीन संकल्पना घेऊन येत राहणे आणि त्या यशस्वी करून दाखवणे हेच एस.पी ग्रुपचे वैशिष्ट राहिले आहे. सन २०२३ मध्ये आज पर्यंत महाराष्ट्र अंडर आर्म क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली क्रीडा स्पर्धा होतेय. महिला खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुरुष खेळाडूं सोबत  एकत्र खेळविण्यात येणार आहे. नामांकित १२ संघ मालक रोहित नायर (आर.सी.सी ), तनय  महाले (ग्लाडिएटर), निलेश  पालवणकर (वीर मराठा), अमरकांत जैन (सर्वश्रेष्ट), मीनल चोप्रा- अक्षय घाडी (सेन्चुरिअन), राहुल महाडिक (के.सी.आर २), सचिन चव्हाण (डी. एम स्पोर्ट्स), रंजित  पाटील (विघ्नेश ११), डॉ.कृती बाठीया (जॉय ११) ,अनिता परमार  राज गोल्लर (ए.आर सुपरस्टायकर ), संगीता  जाधव, समीर  मांजरेकर (एस एस स्मशर्स ), मिलिंद मोरे (पारसिक चॅम्पिअन्स) तब्बल १९६ खेळाडूंवर बोली लावण्यात उत्सुक असून खेळाडूंची लिलाव प्रकिया (ऑक्शन ) गुरुवार  दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४-३० वाजता सुप्रसिद्ध अशा आय.लीफ बॅंकविट्स, ठाणे येथे होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, जिलेण्ड खेळाडूं, कलाकार स्पर्धेला भेट  देणार असून विजेत्या संघाला-३१०००/- व मानाचा  चषक  तर उपविजेत्या संघाला-२१०००/-  व चषक  देऊन गौरवण्यात  येणार आहे. समस्त खेळाडूं प्रेक्षक यांच्यासाठी भोजनासह, आकर्षक लकी ड्रॉ ठेवण्यात आला असल्याचे मंडळाचे सचिव श्री. विनायक कदम यांनी कळविले  आहे. अंडर आर्म बॉक्स क्रिकेट (UBC) यु ट्यूब चॅनेल वरून सदर  स्पर्धा प्रसारित होणार आहे. सदर स्पर्धेचे  माध्यम  प्रायोजक दै. अग्रलेख (संपादक श्री. उमेश भेरे) आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार,रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा* *--जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर*

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार,रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा*
    *--जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर*

"मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम"

अलिबाग, दि.०१ : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरूप वाव देणारी सर्व समावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या स्वरुपाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार,रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.
      योजनेची ठळक वैशिष्टये:- योजना पूर्णत: ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येईल तसेच विहित निर्धारित कालावधीत प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. योजना उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल समितीकार्यरत राहील.जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय हे कार्यान्वय यंत्रणा आहेत. राष्ट्रीयकृत बँका तसेच प्रमुख खाजगी बँक व रायगड जिल्हा मध्यवर्ती  सहकारी  बँक यांच्या सहयोगाने सदर योजना राज्यात राबविण्यात येईल. 
       योजनेचे स्वरुप :- कृषी व कृषीवर आधारीत उद्योग, उत्पादन उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेंतर्गत लाभासाठी पात्र आहेत. सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु. 20 लाख तसेच उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी रु. 50 लाख गुंतवणुकीचे प्रकल्प पात्र राहतील.  राज्य शासनाकडून  अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक/ इतर मागास प्रवर्ग /विमुक्त जाती व भटक्या जमाती / अल्पसंख्याक प्रवर्गासाठी  अर्जदारांची स्वगुंतवणूक  5 टक्के  व  देय अनुदान  शहरी भागासाठी 25 टक्के  व ग्रामीण  भागासाठी 35 टक्के देय असून बॅक कर्ज शहरी भागासाठी 70 टक्के  ग्रामीण भागासाठी 60 टक्के उर्वरीत प्रवर्गासाठी स्वगुंतवणूक  10 टक्के तर  शहरी भागासाठी 15 टक्के ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान  देय असून उर्वरित प्रवर्गासाठी  शहरी भागासाठी 75 टक्के व ग्रामीण भागासाठी 65 टक्के बँक कर्ज पुरवठा करण्यात येतो. किमान 30 टक्के महिला लाभार्थी तसेच किमान 20 टक्के अनुसूचित जाती /जमाती लाभार्थी असतील. 
   पात्रता मालकी घटक :-योजनेंतर्गत पात्रता धारण करणारे वैयक्तीक मालकी, भागीदारी,वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट यांच्यासह एकल मालकी कंपनी (OPC) व मर्यादित दायित्व संस्था (LLP).
आवश्यक कागदपत्रे :- फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, प्रशिक्षण दाखला,शैक्षणिक कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट, अपंग असल्यास त्या विषयीचा दाखला इ.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने https://maha-cmegp.gov.in या संकेत स्थळावर सादर करणे आवश्यक आहे.   
       मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात रायगड जिल्हयाकरिता शासनाकडून जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या अंमलबजावणी यंत्रणेकडून 800 प्रकल्पाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून या वर्षी एकूण 1 हजार 191 प्रकरणे बँकेकडे मंजूरीकरिता पाठविण्यात आली आहेत. बँकेकडे पाठविण्यात आलेल्या प्रकरणांपैकी एकूण 144 प्रकरणास बँकेने मंजूरी दिलेली आहे. एकूण मंजूर प्रकरणात रु. 759.75 लाख इतकी प्रकल्प किंमत असून त्यामध्ये  रु. 172.79 लक्ष इतके शासन अनुदान समाविष्ट आहे.  या योजनेंतर्गत आतापर्यत एकूण 157 प्रकल्पाचे रु. 331.84 लक्ष इतके अनुदान प्रत्यक्ष वाटप करण्यात आलेले आहे.
       जिल्हयातील सर्व सुशिक्षित बेरोजगार/ रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग पत्ता- रायगड बाजार समोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, ता-अलिबाग, जि.रायगड-402201  येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्हा कांग्रेस कमिटी तर्फे पीक विमा केंद्राचे उदघाटन !

औरंगाबाद जिल्हा कांग्रेस कमिटी तर्फे पीक विमा केंद्राचे उदघाटन !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : गांधी भवन शहागंज येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व शहर अध्यक्ष युसुफ शेख यांच्या हस्ते पीक विमा केंद्राचे उदघाटन करण्यात आले औरंगाबाद जिल्ह्य मध्ये मागील काही काळास शेतकऱ्याच्या पिकाचे आतोनात नुकसान झलेले आहे, 

औरंगाबाद जिल्हा एकूण ७४८००० (सात लाख आठेचाळीस हजार) शेतकर्यांनी पिकविमा भरलेला आहे, अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला पीकविमा चा लाभ झलेला नाही, त्या अनुषंगाने शेतकर्यांना पीकविम्याचे लाभ मिळावा या साठी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी पीकविमा केंद्र सुरु करण्यास आलेला आहे, त्या दृष्टीने ज्या शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांचा आम्हीं जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने फाॅर्म भरून महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी कडे सर्व फाॅर्म जमा करणार आहेत व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने हिवाळी अधिवेश्नात प्रश्न मांडणार आहेत जर या अधिवेशनात शेतकर्यांना न्याय मिळाला नाही तर कॉंग्रेस पक्ष न्यायालयात लढाई लढून शेतकर्यांना मदत मिळून देण्याच्या भूमिकेत आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील आज रोजीची परिस्तिथी जिल्ह्यातील एकूण पीकविमा भरणा केलेल्या ची सख्या ७४८००० इतकी आहे, त्या पैकी फक्त ६५००० शेतकरी या पीकविमा योजनात बसू शकतात असे पिकविमा कंपनीने जाहीर केले. या कार्यक्रम प्रसंगी भाऊसाहेब जगताप, जयप्रकाश नरनावरे, अतिश पितळे, जगन्नाथ काळे , संदीप बोरसे, पवन डोंगरे, अनिस पटेल, अंबादास गायके, मालोदे, मुद्दसर पटेल, शिवाजीराव ढाकणे, संतोष शेजूळ, शेख कदिर, विजय पोफळे, शुभम बनकर, पुंडलिक जंगले व काही शेतकरी शामसिंघ घुसिंघे, बापूराव पोफळे, संजय पोफळे, उपस्थित होते.

समेळगावात अनधिकृत मोबाईल टॉवर चा विळखा ; टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात !!

समेळगावात अनधिकृत मोबाईल टॉवर चा विळखा ; टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात !! 

अनधिकृत मोबाईल टॉवरवर कडक कारवाई करण्याची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाची ) मागणी - 'सौ.रूचिता अमित नाईक'
*महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा शहर (प)*

वसई, प्रतिनिधी :    समेळगावात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू असताना आता समेळगावातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात ठिकठिकाणी इमारतीवर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारत असल्याने टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील शाळा, अंगणवाडीतील लहान मुलांचे तसेच  नागरीकांचे आरोग्यावद दुष्परिणाम होण्याची भिती आहे.

मोबाईल टॉवर हे दाट लोकवस्ती शाळा, अंगणवाडी पासुन 100 मी अंतर ठेवणे गरजेचे आसताना हि महापालिकेला न जुमानता अनधिकृत मोबाईल टॉवर बांधण्याचे काम सुरू आहे.

मोबाईल टॉवर चा रेडिएशन मुळे विविध प्रकारचे आजार होतात  कॅन्सर, कर्करोग, स्मरणशक्ती रोग, एकाग्रता नष्ट होणे, यासारखे आजार उध्ववु शकतात.

मोबाइल कंपनीकडून टॉवरच्या मोबदल्यात महिन्याला चांगले पैसे मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची पर्वा न करता टॉवर उभारले जात आहेत. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध असून, टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने तातडीने हे काम थांबवून अनाधिकृत टॉवर उभारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी माझ्याकडे केली असुन याबाबत मोबाईल टॉवर उभारण्याबाबत घेण्यात येणारया परवानगी या सर्वांची चौकशी करून तातडीने मोबाईल टॉवर चे काम थांबवुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी *जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाने रूचिता नाईक यांनी केली.
याबाबत आयुक्त मंत्रालयात असल्याने सहा.आयुक्त अजित मुठे यांची भेट घेतली तातडीने कारवाई करण्याबाबत प्रभाग समिती ई चे वनमाळी यांना आदेश देण्यात आले..

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...