Sunday, 29 January 2023

सावकाराच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्म हत्त्या, आत्महत्ये पूर्वी केला व्हिडिओ व्हायरल !

सावकाराच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्म हत्त्या, आत्महत्ये पूर्वी केला व्हिडिओ व्हायरल !

भिवंडी, दि२९, अरुण पाटील (कोपर) :
         सावकारांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगर मधिल एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृताने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे कारण स्वतःच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
            गिरीश नंदलाल चूबे (वय ३५;रा.उल्हासनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो उल्हास नगरमधील कॅम्प नंबर पाच परिसरात पत्नी आणि दोन मुलासह राहत होता. लॉकडाऊन पासून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने त्याने काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. 
          मृतक गिरीश हा उल्हासनगर मधील एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र दोन महिन्यापूर्वी या कंपनीत काम करणाऱ्या जय आणि विनोद या दोघांनी त्या कंपनी मालकाला गिरीश बद्दल उलटसुलट सांगितल्याने मालकाने गिरीशला नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरी गेल्याने आपल्यावर एक लाखापर्यंत कर्ज झाले असल्याचे मृत गिरीशने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. बेरोजगारी आणि कर्जाच्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओत नमूद केले.
         गिरीशने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने रेल्वे रुळावर लोकल येण्याआधीच स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून ते नातेवाईक आणि मित्राला पाठवले होते. त्या घटनेमुळे सावकारी जाच एखाद्याच्या जीवावर कसा बेतू शकते याचा प्रत्यय या व्हायरल व्हिडीओ मधून समोर आला आहे.
          गिरीशने सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये ४० टक्के व्याजाने पैसे देणाऱ्या सावकरांसह चार ते पाच सावकरांना कंटाळून आणि बेरोजगारीमुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
            तत्त्कालीन दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात सावकार विरोधी कायदा अंमलात आणला होता. त्यामुळे त्यावेळी व्याजाने पैसे देणारे राज्यभरातील अनेक सावकारांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती. 
            हीच संधी साधून पुन्हा राज्यभरात बेकायदा व्याजाचा गोरखधंदा करणाऱ्या सावकरांचे पेव फुटल्याचे गेल्या दोन वर्षांत सावकारी जाचाला कंटाळून झालेल्या आत्महत्यांच्या घटनेवरून दिसून येते. दुसरीकडे घराचा एकमेव कमावता व्यक्ती गेल्याने चुबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

कल्याण, नारायण सुरोशी : जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शैक्षणिक, वयक्तिक व सांघिक गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी ठाण्याचे आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या घडीला यश मिळविण्यासाठी प्रयत्नही वेगवान असायला हवेत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीवर प्राचार्य डॉ. के.बी. कोरे यांनी सादरीकरण केले. यानंतर विविध सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के.बी. कोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रिया जाधव व प्रा.पौर्णिमा एगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.दौलतराव कांबळे यांनी केले. यावेळी अभिनेते समीर पाटील, सागर पगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे,  प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने* व *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था* यांच्या सहकार्याने नालासोपारातील दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न...

*श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने* व
 *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था* यांच्या सहकार्याने नालासोपारातील दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न...

दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे योग्य साधने उपलब्ध नसल्याने त्यांना अनेकदा दुखापती होत असतात.

दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना नालासोपारा शहरात भव्य असा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिव्यांग बांधवांनाही सक्षम करून त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ संस्था मदत करत असते.

यावेळी श्री आदि जीन युवक  चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक अर्चना पाटील व अमित नाईक यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला....

औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी विदेशी पर्यटकाचे पासपोर्ट, व्हिसा भारतीय तसेच परकीय चलन असलेले पॉकेट केले परत !

औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी विदेशी पर्यटकाचे पासपोर्ट, व्हिसा भारतीय तसेच परकीय चलन असलेले पॉकेट केले परत !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि  २९ : दिनांक २८/०१/२०२३ रोजी औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गुलाब राठोड हे  जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे कर्तव्य बजावत असताना त्यांची नजर रोडवर पडलेल्या पॉकेट वर गेली त्यांनी ते पॉकेट तपासले असता  त्यात Kamil नावाच्या  परदेशी व्यक्तीचा पासपोर्ट व व्हिसा सापडला तसेच त्यात परकीय चलनाच्या नोटा व भारतीय 26500 रुपये तसेच 7 एटीएम कार्ड असे वस्तू मिळून आले परंतु त्यात त्यांना संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर न मिळाल्याने त्यांनी पूर्ण लेणी परिसर शोधून काढले परंतु गर्दी खूप असल्याने त्यांना kamil नावाचा परकीय व्यक्ती भेटला नाही. 

त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील पर्यटक कार्यालयास संपर्क करून सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली त्यांनी सदर परकीय व्यक्तीस माहिती दिल्याने ते वेरूळ येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गुलाब राठोड संपर्क करून भेटून आपली ओळख दाखऊन सदरचे पॉकेट व साहित्य घेतले त्या वेळी त्यांची तोंडून एक शब्द निघाला जो नमस्ते इंडिया व वाकून हात जोडून नमस्कार केला व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गुलाब राठोड यांचे नाव घेत तसेच वेल औरंगाबाद पोलीस इंडियन पोलीस असे उच्चरले तसेच संपूर्ण पोलिस यंत्रणेबाबत माहिती घेऊन धन्यवाद मानले.

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपिलीय सुनावणी जनतेची फसवणूक !

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपिलीय सुनावणी जनतेची फसवणूक !

भिवंडी, मनोहर शिंदे : भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून, आर्थिक घोटाळे उघडकीस येऊ नये यासाठी उपविभागीय अभियंता श्री.एस.डी.चौधरी यांना अधिकार नसतानाही अपिलीय सुनावणी घेऊन, माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग कुंभार यांना अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून देण्यात आले व त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे.

दिनांक २६ मे २०२२ च्या शासन निर्णया नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागात उपविभागीय अभियंता हे जनमाहिती अधिकारी असून विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता हे नियमाप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी आहेत. असे असतानाही आर्थिक घोटाळ्यांची माहिती द्यावी लागू नये व थातूरमातूर उत्तरे देऊन अपिल व माहिती अधिकार अर्ज निकाली काढता यावा यासाठी बोगस अपिलीय सुनावण्या घेऊन शासन निर्णयाला व आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे.

पांडुरंग कुंभार हे अपिलीय सुनावणी साठी भिवंडी उपविभागात गेले असता त्यांना उपविभागीय अभियंता  एस.डी. चौधरी यांनी अरेरावीची भाषा वापरून अपमानित करून हाकलून देण्यात आले.

एवढेच नाहीतर असंवैधानिक भाषा वापरली असा ठपका ठेऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. संबंधित घटणे विरूद्ध कुंभार यांनी वरिष्ठ कार्यालयास ठाणे विभाग क्रमांक १ कार्यकारी अभियंता पाटील यांना वारंवार रितसर तक्रार देऊनही जाणिवपूर्वक चौधरी यांना पाठीशी घालत गैरप्रकार दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला. व उलटपक्षी कुंभार यांचेवरच खोटे व बिनबुडाचे आरोप केले.

या संदर्भात पांडुरंग कुंभार यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह ठाणे समोर एकदिवसीय उपोषण देखील केले.

या नंतर कुंभार यांनी उपविभागीय अभियंता एस.डी.चौधरी यांना लिगल नोटीस देखील पाठवली पण यावर देखील एक महिना उलटून कोणतेही उत्तर संबंधित कार्यालयाकडून व चौधरी यांचे कडून देण्यात आले नाही.

भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व ठाणे विभाग क्रमांक १ हे आपले आर्थिक घोटाळे उघड होऊ नयेत यासाठी वरील गैरप्रकार करत आहेत व संबंधित फसवणूक करणाऱ्या अधिकार्याची चौकशी लागून त्यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल व्हावेत व त्वरीत निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी पांडुरंग कुंभार व प्रकाश संकपाळ हे करत आहेत.

Saturday, 28 January 2023

मौजे गोद्री (जामनेर) येथे आयोजित “अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...

मौजे गोद्री (जामनेर) येथे आयोजित “अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...

जळगांव, अखलाख देशमुख, दि २९ :  जिल्ह्यातील *मौजे गोद्री (जामनेर)* येथे *“अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लाबना - नायकडा समाज कुंभ २०२३”* मेळाव्याचे दि.२५ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आलेले असून, आज सदर कुंभ मेळाव्यास *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांची भेट यांनी भेट देऊन आयोजनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच उपस्थित संत मंडळी यांचे दर्शन घेऊन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह अखिल भारतीय धर्म जागरण समन्वय प्रमुख श्री.शरदराव ढोले, श्री.बाळासाहेब चौधरी, पश्चिम क्षेत्र कार्यवाह, परम श्रधेय श्री.गोपाल चैतन्य बाबाजी वृदवन धाम पाल, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, रामेश्वर नाईक,नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी जि.प.सदस्य अमित देशमुख, राहुल महाजन, चंद्रकांत बोलणे, बबलू भंसाली, राजू मानकर, विठ्ठल खवळे, राजू तायडे, शुभम पाटील ई. उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन !

प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन !

* खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सादर

बुलडाणा, प्रतिनिधी : दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनी आज दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरवी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्यासह विरमाता, विरपिता, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदनानंतर डॉ. तुम्मोड यांनी परेड निरीक्षण केले. पोलिस दल, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, राजीव गांधी सैनिकी शाळा, मुलींची सैनिकी शाळा, सेंट जोसेफ शाळा, पोलिस बँड पथक, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग यांच्या परेड संचलनानंतर त्यानंतर कृषि विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगर विकास शाखा, सामाजिक वनीकरण विभाग, निवडणूक विभाग यांच्या चित्ररथाने मार्गक्रमण केले.

यावेळी सॅन्डो बटालियनमध्ये कार्यरत असताना शहिद झालेले कैलास पवार यांच्या विरमाता उज्ज्वला भारत पवार यांना ताम्रपट देऊन गौरव करण्यात आले. तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस दलातील पंकज सपकाळे, मोहम्मद शफीक अब्दुल रहिम, केशव नागरे, गजानन नाटेकर, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त श्रीनिल बेलोकार, अदिती राणे, हर्ष कुंभारे, आदिनाथ इंगळे, वृंदा राठी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे, डॉ. यास्मिन चौधरी, एस. जी. सोळंकी, कैलास बेंडवाल, आयुष्मान भारतच्या डॉ. रिया चोपडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे अविनाश महाले, फुल सिंह, धीर वाकोडे, पराग गवई, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्रीकांत हाके यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बाल शिवाजी कॉन्व्हेंट, कराटे प्रशिक्षण केंद्र, महिला स्वसंरक्षण स्वयंसिद्धा, मर्दाणी खेळ, शिवाजी विद्यालय, शारदा कॉन्व्हेंट, एडेड हायस्कूल, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, उर्दू हायस्कूल,भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, श्री. शिंदे गुरूजी कन्या विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, रूखाबाई कन्या विद्यालय, सेंट जोसेफ हायस्कूल, सहकार विद्या मंदिर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आहारतज्ज्ञ साहेबराव सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...