Friday, 2 June 2023

भिवंडी महसूल कार्यालयातील नायब तहसीलदार यांना लाच घेताना अटक !!

भिवंडी महसूल कार्यालयातील नायब तहसीलदार यांना लाच घेताना अटक !!


भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी महसूल कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या सिंधू खाडे या 52 वर्षीय महिलेला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली. फेरफार आक्षेप नोंदविण्याचा अंतिम अहवाल देण्याच्या बदल्यात त्यांनी मागितलेल्या 1.50 लाख रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना पकडण्यात आले. 

एसीबीचे ठाणे अधीक्षक सुनील लोखंडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तक्रारदार हा वकील आहे. सिंधूच्या अखत्यारीत असलेल्या त्यांच्या फेरफारावर आक्षेप नोंदवण्यासंबंधीचे प्रकरण प्रलंबित होते. अंतिम अहवाल देण्यासाठी सिंधू खाडे यांनी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने गुरुवारी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली आणि पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील आमच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सिंधूच्या लाचेच्या मागणीची पुष्टी केली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले, तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 'पन्नास हजार रुपये' स्वीकारताना सिंधूला रंगेहात अटक करण्यात आली.

राज्यात बंदी असलेली गोवा बनावटीची एक कोटी ८९ हजार ५५७ विदेशी दारू जप्त !!

राज्यात बंदी असलेली गोवा बनावटीची एक कोटी ८९ हजार ५५७ विदेशी दारू जप्त !!


पनवेल, प्रतिनिधी : राज्यात विक्री करण्यास बंदी असलेला लाखोंचा बेकायदेशीर विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने गोवा मुंबई महामार्गावर कल्हेगाव, ता. पनवेल येथे पकडला. या मार्गावरून जाणाऱ्या एका कंटेनरची पथकाने तपासणी केली असता त्यात मद्याचे तब्बल १ हजार ५५७ बॉक्स आढळून आले.

या सर्व मुद्देमालाची किंमत एक कोटी ८९ हजार ३६० रुपयांच्या मद्यासह १ कोटी १८ लाख ९४ हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी, कंटेनर चालक राजशेखर सोमशेखर परगी (४१, हुबळी, कर्नाटक) आणि खजाहुसेन दवलसाब हितलमनी (५८, हुबळी, कर्नाटक या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली.

ग्रामपंचायत उमराठने केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्काराने श्रीम. वासंती आंबेकर व सौ. सविता गावणंग यांचा गौरव !!

ग्रामपंचायत उमराठने केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्काराने श्रीम. वासंती आंबेकर व सौ. सविता गावणंग यांचा गौरव !!

■ कोकण/गुहागर : उदय दणदणे

        महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आलेल्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात यावा असे सांगण्यात आले होते. त्यानुसार बुधवार दि. ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील  ग्रामपंचायत उमराठ तर्फे गावाच्या विकास कामांत सक्रिय सहभाग आणि योगदान असलेल्या उमराठ खुर्दच्या विद्यमान पोलीस पाटील श्रीम. वासंती पांडुरंग आंबेकर आणि उमराठ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सविता भिकू गावणंग यांचा गौरव करण्यात आला. 

         कार्यक्रमाची सुरुवात सरपंच जनार्दन आंबेकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन तसेच अहिल्यादेवीना विनम्र अभिवादन करून करण्यात आली तर उपस्थितांनी पुष्प अर्पून अहिल्यादेवीना  आदरांजली वाहिली. 

      तद्नंतर  ग्रामपंचायत क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोधैर्य, मनोबळ वाढावे आणि इतर महिलांना सुद्धा प्रोत्साहन मिळावे या हेतूने शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे आलेल्या आदेशानुसार बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला स्वयं सहायता बचतगट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार तसेच स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मुलन इत्यादी क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या उमराठ खुर्दच्या विद्यमान पोलीस पाटील वासंती आंबेकर आणि उमराठच्या माजी सरपंच सौ. सविता गावणंग यांचा ग्रामपंचायत उमराठतर्फे गौरव करण्यात आला. 

        सदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्काराचे स्वरूप होते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रू. ५००/- चा धनादेश. श्रीम. वासंती आंबेकर यांना सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते तर सौ. सविता गावणंग यांना ग्रामपंचायत सदस्या सौ.अर्पिता गावणंग यांच्या हस्ते देण्यात आला. 

       सदर छोट्याखानी कार्यकमाला ग्रामस्थांसह अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, सारीका धनावडे, वर्षा पवार, आशा सेविका वर्षा गावणंग, रूचिता कदम, महिला बचत गट सीआपी वैष्णवी पवार, बचतगटांच्या अध्यक्षा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत कदम, प्रतिष्ठित ग्रामस्थ सुरेश पवार, शशिकांत पवार, नामदेव पवार, शांताराम गोरिवले, महेश गोरिवले तसेच बचत गटाच्या बहुसंख्य महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित होती.
        सदर कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना गौरव मुर्ती वासंती आंबेकर, सविता गावणंग, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत कदम, नामदेव पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्या विषयी गौरवोद्गार काढले. तर सरपंच जनार्दन आंबेकर  यांनी स्त्रीमुक्तीच्या न्याय-हक्कांसाठी लढा देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करून गावातील महिलांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन सक्षम व स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावेत, ग्रामपंचायत आपणांस सहकार्य करेल असे सांगून ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायतीला सहकार्याची साथ द्या, आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांबाबत हात देऊ असेही सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आश्वाशीत केले.
    कार्यक्रमाची प्रस्तावना ग्राम सेवक सिद्धेश्वर लेंडवे यांनी केली तर सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सदर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कारकून नितीन गावणंग, डाटा ऑपरेटर साईस दवंडे यांनी मोलाचे योगदान व सहकार्य दिले.

दहावीच्या निकालात परत मुलींनीच मारली बाजी !!

दहावीच्या निकालात परत मुलींनीच मारली बाजी !!

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 95.87 टक्के लागला. विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 92.05 टक्के तर एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या एक वा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे 'एटीकेटी'ची सुविधा लागू राहील.

एकल पालक विद्यार्थांना समाजसेवक शरद भावे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!

एकल पालक विद्यार्थांना समाजसेवक शरद भावे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखाध्यक्ष आणि रस्ते आस्थापना व साधन सुविधा प्रभाग संघटक शरद भावे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज एस जी टूटोरियल क्लासेस येथे एकल पालक असलेल्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी क्लासेसचे संचालक मारुती जाधव, सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते. शरद भावे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध सामाजिक उपक्रम घेतात. गेली दहा वर्ष ते वाढदिवशी गरजू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत. वाढदिवशी कोणताही केक व पार्टी अशा कार्यक्रमाचे नियोजन न करता केवळ सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करतो असे शरद भावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
                 समाजात भेडसावत असल्या अनेक समस्या सोडवणे, आपली युवा पिढी चांगले उच्चशिक्षण घेऊन मोठं मोठे हुद्यावर असणे.मोठया कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत राहून स्वतः ला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, दरवर्षी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे, दरवर्षी गावी वृक्षारोपण करणे, स्वच्छता अभियान राबविणे असे अनेक उपक्रम राबवत समाजाला नवप्रेरणा देण्याचे काम मा.शरद भावे साहेब सातत्याने करत आहेत.

Thursday, 1 June 2023

भिवंडीतील नारपोली उपवाहातुक शाखेतील पी एस आय श्याम पाटील यांचा सेवापुर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न !!

भिवंडीतील नारपोली उपवाहातुक शाखेतील पी एस आय श्याम पाटील यांचा सेवापुर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न !!

निवृत्ती नंतरही आमच्या बरोबरच ---डॉ.विनयकुमार राठोड

(सेवा निवृत्त श्री.श्याम पाटील यांना श्री.साई बाबांचा फोटो देताना पोलीस उपायुक्त श्री. डॉ.विनयकुमार राठोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ कर्णवार पाटील, पोलीस उपनरीक्षक श्री. सचिन खताळ, बिपिन भोसले, व इतर मान्यवर अधिकारी)

भिवंडी, दिं,१, अरुण पाटील, (कोपर) :
         भिवंडीतील नारपोली उपवाहतूक शाखा, अंजूर फाटा येथे कार्यरत असलेले श्री.श्याम सखाराम पाटील यांची काल दिं, ३१/५/२०२३ रोजी सेवा पूर्ती कार्यक्रम मोठया उत्साहात पार पाडला.या वेळी परीसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पोलीस उपायुक्त (वाहतूक), ठाणे, श्री.विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, श्री.श्याम पाटील हे निवृत्त झाले असले तरी ते आमच्या बरोबरच आहेत, त्यामुळे त्यांनी निवृत्त झाले आहेत असे समजू नये, त्यांच्या साठी माझ्या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतील असेही त्यांनी पुढे सांगीतले.या वेळी शाल, पुष्पहार देऊन श्री.श्याम पाटील यांचे स्वागत केले.

(पोलीस उपनिरिक्षक श्री.श्याम सखाराम पाटील यांच्या सेवापूर्ती समारंभात पुष्प गुच्छ देताना श्री.अरुण पाटील व त्यांचे चिरंजीव दुर्गेश पाटील)

         तर वाहतूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्री.श्याम पाटील यांना श्री. साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मानित केले. या सेवापूर्ति कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, पूर्व विभागाचे श्री.किशोर खैरनार, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ, कोन गाव उपवाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अण्णासाहेब जानकर, भिवंडी उपवाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.मनीष पाटील व ईतर मान्यवर उपस्थित होते.
         तर श्री.श्याम पाटील यांनी देखील आपले भाषण केले, त्यांनी आपल्या भाषणात  सांगितले की, मी जेव्हां पोलीस भरतीसाठी गेलो तेव्हां घरातल्यांना सांगितले नव्हते पण जेव्हां घरातल्यांना माहीत पडले तेव्हां त्यांनी मला विरोध केला. पण मला पोलीस बनून सेवा करायचे असल्याने ट्रेनिंग देऊन मी पोलीस सेवेत भारती झालो व आज या पदापर्यंत पोहोचलो. मला जेव्हां पाहिले पोलीस हवालदाराचे प्रमोशन मिळाले तेंव्हा देखिल डॉ.राठोड सर माझ्याबरोबर होते आणि आज मी निवृत्त होताना देखिल सर मझ्याबरबर आहेत ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असेही त्यांनी पुढे सांगीतले. 
        या सेवापूर्ती कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली भाषणे केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ कर्णवर पाटील यांनी केले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेस !!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेस !!

नालासोपारा, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांचे वडील श्री भगवान महादेव सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथे महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेसचे उध्दघाटन करण्यात आले.

महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या  कलागुणांना वाव मिळावा या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेस समेळपाडा येथे  सुरू करण्यात आला आहे. प्रशिक्षण पुर्ण करणारया महिलांना  प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ संस्था नेहमी मदत करत असते.

हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षक महिला  नोकरी करू शकेल अथवा स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने हे कोर्सेस सुरू करण्यात आले आहे.

यावेळी जिजाऊ संस्थेचा तालुकाप्रमुख हर्षाली खानविलकर, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, महिला आघाडी शहर संघटक वंशिका नर, महिला उपशहर संघटक आशा सातपुते व स्थानिक महिला उपस्थित होते.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...