Sunday, 1 September 2024

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती, चर्चा सत्र संपन्न !!

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती, चर्चा सत्र संपन्न !!

डोंबिवली, सचिन बुटाला : महाराष्ट्र शासन अंगीकृत अमृत संस्था ही खुल्या प्रवर्गातील ज्यांना कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी व उद्योजक यांच्या साठी स्थापन करण्यात आली आहे. डोंबिवली सर्वेश हॉल येथे महाराष्ट्र शासन अंगीकृत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी व उद्योजक यांनी त्याचा लाभ घ्यावा व स्वतःला सक्षम करावे यासाठी आखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या चर्चा सत्र आयोजित केले होते.

या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर व पदाधिकारी यांनी स्वागताध्यक्ष मा. निखिल लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

अमृत संस्था व तिच्या योजना या संबंधित अमृत संस्थेचे अधिकृत ध्रुव ॲकडमी चे संचालक विजय देशपांडे यांनी माहिती सांगितली. यात 

अमृत द्वारा द्वा संचलित खालील उपक्रम -
. 
*लघुउद्योग निर्मिती,
*विद्यार्थी शिष्यवृत्ती अनुदान
*स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य
*स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग 
*कृषी उत्पन्न आधारित उद्योग आणि प्रशिक्षण 
*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा.
*परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना<
*तांत्रिक रोजगार क्षम प्रशिक्षण 
*उद्योग इनक्युबॅशन सेंटर 
*C-DAC ही माहिती आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण

किशोर विकास उपक्रम
*लघु उद्योगांना 15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज*

अशा आणि इतर अनेक फायदे अमृत संस्थेचे आहेत त्याचा लाभ समाजातील लोकांनी घ्यावा असे आवाहन केले. या वेळी उपस्थित डोंबिवली नागरिक सहकारी बँक व बॅंक ऑफ इंडिया यांचे‌ अधिकारी यांनी उपस्थित राहून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी *पितांबरी समूहाचे माननीय श्री रवींद्र प्रभू देसाई* *अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री विजय जोशी* हे तसेच या कार्यक्रम करिता *माननीय सुशील कुलकर्णी, बाजीराव धर्माधिकारी, मकरंद कुलकर्णी तसेच माननीय भाऊ तोरसेकर यांची उपस्थिती विशेष होती*. याप्रसंगी फ्रेंड्स लायब्ररीचे पै, मा. नगरसेवक दीपेश म्हात्रे व महेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते. 

दीपेश म्हात्रे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला एक ऑफिस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी डोंबिवलीतील राजकीय नेते, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व शहरातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क __
जिल्हा अध्यक्ष शशांक खेर - +91 72085 19251



महिलांना रोजगार प्रशिक्षण; ‘डीआरडीए’चा अमेरिकन इंडियन फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार !

महिलांना रोजगार प्रशिक्षण; ‘डीआरडीए’चा अमेरिकन इंडियन फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार !

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना वेतनी रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) आणि अमेरिकन इंडियन फाउंडेशन संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. 

जिल्हा परिषदेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि अमेरिकन इंडियन फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख बंदना रॉय यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डीआरडीएच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू, अमेरिकन इंडियन फाउंडेशनच्या पुणे जिल्हा प्रकल्प प्रमुख तृप्ती कुचेरिया व ‘डीआरडीए’तील जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.

या करारानुसार मावळ तालुक्यातील उर्से, सांगवडे व चांदखेड या तीन गावात पुढील ३ वर्षात अमेरिकन इंडियन फाउंडेशनमार्फत शिवणकाम, मल्टी लेयर फार्मिंग, आयटी स्किल्स, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, मार्केटिंग आदीबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर महिलांना रोजगाराच्या संधी संस्थेमार्फत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिलांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उमेद अभियानाअंतर्गत महिला या उपक्रमाचे लक्ष्य घटक असणार आहे. 

या उपक्रमातील सर्व आर्थिक बाबी या अमेरिकन इंडियन फाउंडेशन संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या उपक्रमातील कोणत्याही आर्थिक बाबींवर खर्च केला जाणार नाही, अशी माहिती श्रीमती कडू यांनी दिली आहे.

भारतीय तिबेट सीमा पोलीस दलाकडून भरती !

भारतीय तिबेट सीमा पोलीस दलाकडून भरती !

पुणे, प्रतिनिधी : भारतीय तिबेट पोलीस दलातील कॉन्स्टेबल (स्वयंपाक सेवा) गट 'क' अराजपत्रित (अ-मंत्रालयी) तात्पुरत्या आधारावर रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक असून शैक्षणिक पात्रता १० वी किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून अन्न उत्पादनातील एनएसक्यूएफ स्तर- १ अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

या पदासाठीचे अर्ज उमेदवारांनी 

https://recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर करावेत. वयातील सवलत, पात्रता अटी, ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया, भरती प्रक्रिया, चाचण्या आणि वेतन आणि भत्ते याविषयीची तपशीलवार माहितीदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 2 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. 

रेल्वे भरती बोर्डामध्ये पॅरा मेडिकल पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

रेल्वे भरती बोर्डामध्ये पॅरा मेडिकल पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

पुणे, प्रतिनिधी : रेल्वे भरती बोर्ड मार्फत पॅरा- मेडिकल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी १६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरतीसाठीचे अर्ज रेल्वे भरती बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्काच्या भरणासह अर्जातील दुरुस्त्या १७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत करता येतील. यामध्ये 'खाते तयार करा' या अर्जात भरलेले तपशील आणि 'रेल्वे भर्ती मंडळ निवडले' या तपशीलात बदल करता येणार नाही याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तपशीलवार केंद्रीकृत रोजगार सूचना क्र. ०४/२०२४ पहावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

जयेश वेल्हाळ यांना स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट मध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान !

जयेश वेल्हाळ यांना स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट मध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            तायक्वादो मध्ये सिक्स डिग्री ब्लॅक बेल्ट तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक असलेले जयेश वेल्हाळ याना गॅलेक्सि बँकवेट हॉल अंधेरी साकीनाका येथे केंब्रिज डिजिटल ऑफ युनिव्हर्सिटी यांच्या तर्फे त्यांना स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट यामध्ये मानद डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आली.तसेच प्रज्ञा गोल्डन अवॉर्ड ने सन्मानीत  करण्यात आले. जयेश वेल्हाळ यांचे मुंबईत सिद्धकला तायक्वादो अकादमी आहे.या अकॅडमी मध्ये विद्यार्थांना तायक्वादोचे प्रशिक्षण देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, कास्य आणि रजद पदक मिळवून दिले आहे. आता पर्यंत वेल्हाळ यांनी ५०० हून अधिक विद्यार्थांना ब्लॅक बेल्ट घडवले आहेत. स्पोर्ट्स या क्षेत्रात प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांची या कामगिरीसाठी केंब्रिज डिजिटल ऑफ युनिव्हर्सिटी ने त्यांना स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट मध्ये मानद पदवी देऊन त्यांचा गौरव केल्याचे जयेश वेल्हाळ यांनी सांगितले.

गणित विषयात सृजनात्मक आनंद देणारी चित्रकलेची अनोखी स्पर्धा – प्राचार्या सौ. मुग्धा लेले

गणित विषयात सृजनात्मक आनंद देणारी चित्रकलेची अनोखी स्पर्धा – प्राचार्या सौ. मुग्धा लेले 

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरार पश्चिमेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष  कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विभागातर्फे चित्रांच्या माध्यमातून गणित विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून  चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य आणि विज्ञान विभागातील जवळपास १४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता आणि अत्यंत आकर्षक अशा भौमितिक आकृत्यांवर आधारित चित्रे काढली. 

या स्पर्धेसाठी प्राचार्या सौ. मुग्धा लेले, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, वरिष्ठ शिक्षक श्री. मनोज वाणी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये कनिष्ठ विभागातील गणित विषय विभागप्रमुख प्रा. सौ. भावना घरत आणि गणित विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

चोपड्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव संपन्न !!

चोपड्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव संपन्न !!

चोपडा, प्रतिनिधी : जंगलात व रानात महत्वाचे पोषणतत्त्व असणारे भाजी पावसाळ्यात उगत असते व त्या रानभाजींचे औषधी महत्व हे फक्त जंगलात किंवा खेड्यात राहणाऱ्या लोकांनाच माहिती असते परंतु शहरात उच्चशिक्षित व नोकरीसाठी आलेल्या लोकांना त्या भाजींचे महत्त्व नसते व या भाज्या  शरीरासाठी खूप उपयोगी असतात व त्या भाजी कशा तयार कराव्यात ह्या माहीत नसतात म्हणूनच तालुका कृषी अधिकारी कार्यालय चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने *रानभाजी महोत्सव १ सप्टेंबर २०२४ वार रविवार  रोजी सकाळी १०.०० वाजता बस स्टॅन्ड शेजारी चोपडा* मा. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. ह्यावेळी कृषी विभागाकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची कृषी दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला. 

तसेच या कार्यक्रमासाठी एकूण बारा गटांनी सहभाग घेतला होता व त्यात कटुरले, तांदळाची, बांबूची अंबाडी, चिवल, कीलू, घोळ, आलू यासारख्या इतर रानभाजी व औषधी भाजी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यासोबत ह्या पदार्थांना कसे बनवायचे याबाबतचे सुद्धा प्रत्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले व ह्या महोत्सवाच्या चोपड्यावाश्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने यशस्वीपने संपन्न झाला याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर रोटे, सचिव बी एस पवार रोटे, प्रकल्प प्रमुख तेजस जैन रोटे, सह प्रकल्प प्रमुख रोटे, चंद्रशेखर पाटील रोटे, नितीन अहिरराव, चंद्रकांत साखरे, विलास कोष्टी, पंकज बोरोले, चेतन टाटिया, अरुण सपकाळे, आशिष जयस्वाल, विलास एस पाटील, अमित बाविस्कर, विपुल छाजेड, प्रकाश बी पाटील, गौरव महाले व इतर सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून आर एम पाटील, महेंद्र साळुंखे, जे यु सोनवणे, एम वाय महाजन, जितेंद्र सनेर, चेतन साळुंखे हे उपस्थित होते व एसटी महामंडळाकडून आगार प्रमुख श्री महेंद्र पाटील आगार व्यवस्थापक उपस्थित होते. या महोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करनाऱ्या गटास प्रथम क्रमांकाचे बक्षीस आशा महिला बचत गट खाऱ्या पाडा, द्वितीय क्रमांकाचे वृंदावन महिला शेतकरी गट चहाडी व तृतीय क्रमांकाचे बक्षीस चक्रधर शेतकरी महिला बचत गट चोपडा यांना पारितोषिक मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भालचंद्र शिवाजी पवार यांनी केले

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...