Wednesday, 9 April 2025

आ. किसन कथोरे यांच्या घरासमोर "प्रहार" चे आंदोलन !

आ. किसन कथोरे यांच्या घरासमोर "प्रहार" चे आंदोलन !

मुरबाड, (प्रतिनिधी) : नैसर्गिक असमतोल, पाण्याच्या नियोजनातील अक्षम्य दुर्लक्ष, बाजारपेठेच्या हेलकाव्यांनी घायकुतीला आलेला शेतकरी प्रखर विपरीत परिस्थितीतून जगत असतानाच "शंभर टक्के कोरा सातबारा" या आपल्या आश्वासनापासून महायुती सरकारने घुमजाव केल्याने किंबहुना किमान पुढील तीन वर्ष कर्जमाफी शक्य नसल्याची  स्पष्टोक्ती अर्थमंत्र्यांनी दिल्याने प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 11 एप्रिलच्या रात्री ठीक 12 वा. राज्यातील सर्वच आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

    त्यानुसार, आ. किसन कथोरे यांच्या बदलापुरातील घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील हे आपल्या प्रहारचे पदाधिकारी, स्थानिक शेतकरी व दिव्यांगजणांच्या साथ - संगतीने आंदोलन करणार असल्याचे मुरबाड पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.
    विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेती उत्पादित मालाला हमी भावाच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र सत्तेनंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. शिवाय मुरबाडचे आमदार कथोरे यांनी कर्जमाफीबाबत विधानसभेत एक चकार शब्द काढला नाही अथवा स्थानिक पातळीवर त्यासंबंधात दीर्घकालीन उपाय योजनेबाबत प्रयत्न केले नाहीत. याशिवाय दिव्यांग तालुका समन्वय समिती, आमदार निधीतून पाच टक्के दिव्यांग निधी, दिव्यांग भवन, मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, एमआयडीसीतील दिव्यांग कामगार भरती आदी मागण्या घेऊन तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील हे प्रस्तुत आंदोलनाद्वारे जाब विचारणार आहेत.
    यावेळी, तालुकाध्यक्ष पाटील यांच्यासोबत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेघना जोशी, तालुकाध्यक्ष किसन भंडारी, मूकबधिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र सुरोसे, तालुकाध्यक्ष प्रशांत तेलवणे, सचिव मोहन खुणे, मिलिंद जगताप, यांच्यासह दिव्यांगजन सहभागी होणार आहेत.     विश्वासघातकी सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या मनातील असंतोष प्रहार च्या माध्यमातून प्रकट होणार असल्याने या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यानुसार महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने आ. कथोरे यांच्या घरासमोर 11 एप्रिल ला रात्री 12 वा. आंदोलक गळ्यात निळा पट्टा व हातात भगवा झेंडा घेऊन व मशाली पेटवून आंदोलन होणार आहे. दरम्यान, धगधगत्या मशालीच्या ज्वालाने शेतकरी व दिव्यांगजणांच्या समस्या लोकनियुक्त आमदारांना पटतील - समजतील व त्याचा प्रकाश विधानसभेत पडेल, हाच आशावाद आंदोलक व्यक्त करत आहेत.
आमच्या जाई 'भाल बाई

प्रतिभा प्रभाकर भालेराव मंडग

आजही आईबी ओळख आहे ती मुळे आणि शाळाही ऑफखली जाते ती भालेराव बाईची शाळा म्हणूनच. शाळा व आई एकाच नाण्याच्या दोन बाजू कधीही एकमेकापासून वेगळ्या न करता येण्यासारख्या,

१९६६ साली गुडीपादश्याच्या मुहूतांबर सुरु करण्यात आलेल्या शाळेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आईनी उपसलेल्या फटामा पतीराज प्रभाकरानी तितक्याच तोलामोलाबी साथ दिली, नौकरी, एकत्रित कुटुप लहान भावडांचा सांभाळ शिक्षण, आई गेल्यामुळे समर्थपणे सांभाळले,

ती. दाय-आईची जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, पडेल ते काम करण्याची मानसिक तयारी पामुळे शाळेच्या इमारतीसाठी मिळवलेली पाठाने मैदानाची जागा, त्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध दिलेला २० वर्षीया तुका म्हणजे सेन हर्षक संग्रामको

आईची संस्थापिका, संचालिका मुख्याध्यापिका अध्ययात्याने शची प्रगतीपथावरील वास्थ्चेच्या युगात यशस्वी ठरली,

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सनशेरपूर या डॉटयाशा खेोक्यात १९३७ साली त्यांचा जन्म पूर्वाश्रमीयी लीला पंढरीनाथ जोशी, परात एकूण सात भाव अतिशय गरीब हारी पती, शिक्षण घेण्यास अत्यंत प्रतिकूल या भावंडाचे शिक्षण व लीलाचेोगी फायनल मॅट्रिक, एस. टी सी. पर्यंत शिक्षण नाशिक पुण्याच्या नातेवाईकांकडे राहून झाले, स्वातंत्र्य चलीत भावांना तुरंगास के दास्था सावरकरांनीचर अंदमानात,

१९५७ साली लीलाचा चिजन कल्याणस्थित श्री. प्रभाकर भालेराव यांच्याशी झाला. लीलाची प्रतिभा झाली, सासरे, दीर मांदा असे एकत्र कुटूंब अशात प्रतिभाने घेतल कातून शिवणकाम, भरतकाम, हसाला, कोर्समध्ये निपुणता मिळवली,

दिवसा मासांनी १९६४ पर्यंत प्रतिभा प्रभाकर या दांपत्याला तीन मुले झाली, मुलांना शाळेत ने-आपा करणे, घरातील व्याप संभाळणे, यातून 'आपणय का शाळा सुरु करू नये? या विचाराला श्री. प्र. र. भालेराव यानी तात्काळा पार्टिका दिला. ती. सासरे व परमालक यांनीही परात साळा भरवण्याची परवानगी दिली. 'शिशु विहार प्राथमिक साळा अत्ता फलक राहत्या घरावर लावला, मुढीपाडवा मुहुर्त साधून सरस्वती रात ३/४/२० विधार्थी वाइत साका आकाराला आली.

मध्यंतरीच्या काळात आईनी डी. एड., पंडीत, पी. टी. इत्यादी परीक्षा दिल्या रात श्रेष्ठ गजाननाजांच्यावरील अपा श्रध्दा यांची कास धरून शालेय नार्गक्रमण सुरु झाली ती आजतागायत रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव कर हीरक महोत्सवासाठी रापारी चालू आहे. ध्येयासक्त, ध्येयनित्र, ध्येयवेडया प्रतिभाताईसारख्या शिक्षिकेसोया कामाला लागलेले सर्व अध्यापक, सेवक तळमळीने झटणारे निघाले, स्कॉलरशिप, गणित, हिंदी, चित्रकला, परीक्षांने निकाल नागलन लागू लागले. इ. १० वी रिझल्टही १७ते १०० टक्के लागत आहे, त्यामुळे शाळेचा लौकिक चाइत आहे. शाळेचे नाच शिद्ध विहान बदलून श्री गजानन विद्यालय ठेवले आहे. एस. एस. सी. बोर्डातही वरच्या नंबरने आली आहेत.

विशेष मानेवेतील शिक्षकांना 'दर्शक्षक पुरस्कार मिलाले आहेत. शाळेलाही "आदर्श शाळा" पुरस्कार मिळाला आहे. स्काऊटये शिक्षण देत असताना स्वततर्फ आतरराष्ट्रीय महिला योजलेबी अंमलबजावणी करण्यासाठी तर प्रदेश बिहार, बंगाल, सिल्कीम राज्याना भेट देऊन त्यांनी सर्व माहिती प्रतिभाताईंनी पैसामध्ये दिली, सांगितली. आईना द्वीगरमाथा, सहलीची आवड असल्यामुळे १२ दिवस "कालास मानस पात्रा पायी वेली; त्यावर अनेक व्याखाने झाली. स्थांनी निशा झाल्यानंतर नात्यांच्या उन्न शिक्षणासाठी १४ वर्षे पुण्यात वारत्तय केले तरी शाळेसाठी कल्याणकारी असेन पुण्यात असताना पंकरपुर चारी सफल इटली, तसे आईचे काका के, दाजी ना. जोशी पांच्या दर्शनासाठी अदनानला जाऊन स्वा. सावरकरांचेही इतिवृत्त समजले पहिले, डोळे भरून आले. गमन केले.

पुणे येथे निसर्ग रोक्क' समवेतर्फे शाळातून पर्यावरण विषयक कामे केली. विश्व हिंदू परिषदेच्या दीन बालवाडयाना सक्रिय मार्गदर्शन केले. परात ३ ते १२ वर्षांच्या मुलाने सस्कार गर्ग पेतारे महिलांसाठी 'भं करोति कालगालर, सगदासी मंडळाने त्याची उत्खल घेतली, मुलाचे कौतुक केले. महाराष्ट्र राज्य बाल शिक्षण प्यौषद पुणे वर्ष अध्यक्ष माणून काम, केले, पंढरपूर पात्रा केली, दोन नातू अमेरिकेत असल्याने नायगराच्या पाण्याचा योग आला

कल्याण वेचील याज्ञवल्क संस्थेत ५ महिला अध्यक्ष महणून काय केले. प्रीड शिक्षण वर्ग २ व चालविला. गुजराथी बालवाडी ८ वर्षे चालविली, ठाणे जिल्हा ग्रा. प्राथ. शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामे केले

वानणे, लिहिणे हा त्यांना कंद १) कैलास मानस पाथ प्रवास वर्णन २) श्री गजानन विजय यंगसार ३) योग वशिष्शातील रत्रीकी ४) पंचकन्यांचा दिपाकार ५७ अंदमानच्या स्मृती लहरी ६) पर्याव्यान मातीचा दीपत्र संका संकीर्तन सुभेचे प्राजक्त ९) शाळेलाही इशस्तवने १०) पंढरपूर यात्रा दर्शन ११) मुलांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा तुमने ११२१२) गर्म बंधातील शाळा १३३ स्वतःच्या ६१ निमित्त नातवंडांना ६१ शुभेच्छा पत्रे त्यात मोठ्या नातवास गीलेवर २१ पत्रे, त्याचे संकलन १४) स्फुट लेखन पेपर व दिवाळी अंकात १९) ७५ व्या वर्षी ७५ सुचिचार दर्शन संकलन,

પ્રતિત ભાડેથી મૂળેટી ગુજ્ઞાાલ નિયાની શિરીષ શ્રી. સ. સી. / પૂર, 15 votes, 119 14. ફણ ફરિનિયર, પ્રભી મ છે. क्यू (कल्पना ही जाई डॉक्टर कोरोनाने शांकला गिळले आणि सर्वांना दुःख सागरात हकलले

आईचं वय आता ८० वर्षे, त्या प्रसंगानुरुप शाळेत जातात जातीने सर्व पाहतात. पण त्यांची मुले सुना नातवंडे, नातेवाईक त्यांना शाळेत जाण्यास मनाई करतात तेव्हा त्या म्हणतात:

'विरंगुळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न |

'विरंगुळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न |

ठाणे, पंढरीनाथ पाटील : ज्येष्ठ कवि रामचंद्र परब यांच्या ‘विरंगुळा' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ५ एप्रिल रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर राज्याचे माजी गृह राज्य मंत्री बाळा नांदगावकर, सिनेदिग्दर्शक, लेखक केदार शिंदे, राज्याचे माजी मोटार वाहन विभाग आयुक्त डी.जी. जाधव, लेखक-पत्रकार राजेंद्र घरत उपस्थित होते.

   आपण गेली अनेक वर्षे श्री परब यांना ओळखत असून त्यांनी विविध विषयांवर कविता केल्या आहेत. विषयांचे वेगळेपण दर्शवणे, सर्वसामान्यांना भावणाऱ्या कविता लिहीणे ही त्यांची आवड असून त्यांनी याहीपुढे काव्यलेखनात सातत्य ठेवावे अशा शब्दात नांदगावकर यांनी कविवर्यांना शुभेच्छा दिल्या. आपण लेखक, नाटककार झालो; कवि होणे काही जमले नाही असे आपल्या मनोगतात केदार शिंदे म्हणाले व कवितांमधील वैविध्यांबद्दल त्यांनी परब यांचे कौतुक केले. लेखक-पत्रकार राजेंद्र घरत यांनी कवि परब यांच्या अनेक कविता, पत्र, लेख आपण संपादित करत असलेल्या अंकांमधून प्रसिध्द केल्याच्या स्मृती आपल्या भाषणातून यावेळी जागवल्या व पराकोटीचा साधेपणा; निष्पाप, निरागस वागणे व प्रसंगी पसरट वाटले तरी अगत्याचे, विनम्र बोलणे व तन्मयतेने  लिहीणे याचे आपणास आकर्षण असल्याची भावना मांडली. कवि परब यांनी ज्या राज्य मोटार वाहन  विभागात काम केले तेथील माजी आयुक्त डी. जी. जाधव यांनी कवि परब ही तरल, कविमनाची व्यवती आमच्यासारख्या रुक्ष-व्यवहारी विभागात काम करण्यास ‘अनफिट' असल्याचे मजेशीर निरीक्षण नोंदवत त्यांनी नोकरीत असताना व आताही जे संवेदनशील मन, तरल वृत्ती जोपासली आहे याकडे लक्ष वेधून परब यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन परब कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याातील बांभुळी गावचे अनेक हितचिंतक तसेच मुंबईत माझगाव येथे त्यांच्या वास्तव्यात जोडलेले शेजारी, परिवहन विभागातील नोकरीतील सहकारी, ठाणे, मुंबई-नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेले अनेक रसिक, श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वैशाली केतकर यांनी केले.

Tuesday, 8 April 2025

समता पंधरवड्यानिमित्त जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ |

समता पंधरवड्यानिमित्त जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ |

पुणे, प्रतिनिधी : समता पंधरवड्यानिमित्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या; परंतु, मुदत संपूणही जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज न दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता सीइटी, जेईई, नीट आदी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच पदवीनंतर एम.बी.ए. एम.सी.ए. एल.एल.बी. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. त्याकरीता ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://ccvis.barti.in किंवा https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन त्याची मूळ प्रत (हार्ड कॉपी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, आळंदी रोड, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या ठिकाणी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणेचे सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.

कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन !

कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन !

कल्याण, प्रतिनिधी - रविवार दिनांक.१३ एप्रिल २०२५, टर्फ महाराष्ट्र ढाबा जवळ, छत्री बंगला, चिकनघर कल्याण प. येथे आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटचा आनंद लुटावा, एकमेकांचा परिचय व्हावा या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये आय पि एल ची थिम देण्यात आली असून संघांना नावे त्याप्रमाणे दिली आहे.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व खेळाचा आनंद लूटण्यासाठी उपस्थित रहावे असे निमंत्रण आम्ही नगरकर मुंबई संघाचे मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, प्रशांत आहेर, विरेंद्र जाधव, विक्की फापाळे, तानाजी करपे, हिरा आवारी, रामनाथ भोजने, अमोल वाकळे, नितिन भराट, वतीने देण्यात आले आहे.

उत्कर्ष महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान !

उत्कर्ष महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान !

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

मुंबईतील कॉलेजच्या गर्दीत आपले स्वतःचे वेगळेपण कायम सिद्ध करणाऱ्या आणि सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी एप्रिल महिन्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प म्हणून 'सर्वंकष विकास व अर्थप्राप्तीसाठी भाषेचे योगदान' या विषयावर विस्तृतपणे प्रकाश टाकणारे प्रा. संदीप संजय जाधव यांचे व्याख्यान पार पडले.  

भाषा ही मानवाला मिळालेली एक अनमोल भेट आहे. तिच्या मदतीने लोक एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद साधतात. संवादासाठी बोलणे, लिहिणे, वाचणे, हावभाव, इशारे किंवा मूक अभिनय अशी अनेक साधने वापरली जातात, पण भाषा हे त्यातले सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आपले विचार, भावना, मते आणि अनुभव व्यक्त करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. याचा वापर जाहिरात, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन, संवाद लेखन, वृत्तनिवेदन, रेडिओ जॉकी अशा अनेक क्षेत्रात कसा करता येतो याची मुद्देसूद माहिती जाधव यांनी आपल्या व्याखानातून दिली. व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. 

व्याखानाच्या सुरुवातीला प्रा. संदीप जाधव यांचे प्राचार्या मुग्धा लेले यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे उपप्राचार्य रमेश पाटील आणि उपप्राचार्या हेमा पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सर्व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिकेत सूर्यवंशी तर सांस्कृतिक विभागप्रमुख खोडीदास गोहील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रा. राजदेव यादव यांचे 'आधुनिक तंत्रज्ञान' या विषयावर व्याख्यान येत्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर !

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर !

**तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार

पुणे, प्रतिनिधी : राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील  कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत केली जाईल. 

फेलोंच्या निवडीचे निकष** :- अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा. 

अनुभव : किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. 

भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. 

वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे. 

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा असून अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/- आहे

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !!

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !! *उल्हासनगर / सुरेश जगताप...