Saturday, 20 March 2021

कांबा गावाजवळील पावशेपाड्यात नऊ जंणाच्या हत्यारबंद चोराच्या टोळीचा धुडगूस, रायते पर्यंत मनसोक्तपणे लुटालूट मारहाण, पोलिस निष्क्रिय?

कांबा गावाजवळील पावशेपाड्यात नऊ जंणाच्या हत्यारबंद चोराच्या टोळीचा धुडगूस, रायते पर्यंत मनसोक्तपणे लुटालूट मारहाण, पोलिस निष्क्रिय? 


कल्याण, (संजय कांबळे) : कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पावशेपाडा गावात रात्री दिड ते अडीच च्या सुमारास ९ जणांची हत्यारबंद टोळी अगदी बिनधास्त पणे संपूर्ण गावात फिरुन जो भेटेल त्याच्या मानेवर तलवार ठेवून चैन अंगठी, मोबाईल, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गाठी, कानातील नेतात, त्यांच्या रस्त्यात जो येईल त्याला जबरदस्त मारहाण करून लुटलं असे रायते गावापर्यंत सुरू राहुनही दोन्ही टोकाला दोन पोलीस चौक्या असूनही या चोरांची ही हिंमत होते याला पोलिसांची निष्क्रियता म्हणायची का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पावशेपाडा हे गाव उल्हास नदीच्या काठावर वसले आहे. रात्री दिड ते अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण मुरबाड या मुख्य रस्त्यापासून गावात येणाऱ्या अतर्गत रस्त्याने सुमारे ९ जणांनी हत्यारा सह गावात प्रवेश केला. प्रथम गावाच्या बाहेर असलेल्या चंदकांत भगत यांच्या घराभोवतीच्या फिरले परंतु येथे काही सापडले नाही म्हणून गावात घुसले गावातील सुभाष भगत, प्रकाश भगत आणि हरिभाऊ भोईर यांच्या घरांना लक्ष केले. महेंद्र भगत यांच्या बेडरूमला बाहेरुन कडी लावून घरातील महिलांना शस्त्रांचा धाक दाखवून मंगळसूत्र, चैन, गाठी मोबाईल आदी वस्तू लांबल्या. असेच प्रकाश भगत व हरिभाऊ भोईर यांना देखील लुटले. यांनतर गावातील तरुणमंडळी जागी झाली असता हे नदीच्या काठावरुन पाचवामैल मंदिराकडे निघाले. असे भगत यांनी सांगितले. पुढे पाचवामैल येथील शिवसेनेचे दता भोईर यांचे आॅफिस फोडले. विशेष म्हणजे हे सगळे रस्त्याने पायी जात होते, पुढे पांजरपोळ येथे या चोरट्यांनी एका भैय्याला बेदम मारहाण केली. व त्याच्याकडील पैसे लुटले. येथून ही गॅग रायते येथे पोहचली. कल्याण मुरबाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या कडबा कुट्टी येथे पशुखाद्य घेण्यासाठी आलेल्या वाहोली येथील एका शेतकऱ्याला यांनी बेदम मारहाण केली व त्याला ही लुटले. यावेळी पहाटेचे ४:३० ते ५ वाजले होते.
महत्त्वाचे म्हणजे या घटनेच्या एका बाजूला म्हारळ पोलीस चौकी तर दुसरीकडे गोवेली पोलीस चोकी असताना या दरम्यान पोलिसांची नाईट पेट्रोलींग झाली नाही. ती झाली असती तर कदाचित आज हे बिनधास्त फिरणारे चोर लाॅकआफ मध्ये दिसले असते.
त्यामुळे कल्याण तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत वाढलेली गुन्हेगारी, बिनधास्त होणाऱ्या चो-या मा-या, हाणामारी, जिवघेण्या शस्त्रांचा धाक, पोलिसांचा न राहिलेला वचक यावरून पोलिसांची निष्क्रियता दिसून येते. एके काळी याच पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, आदींनी कर्तव्य बजावले होते तेव्हा अशा गुन्हेगारांची हिंमत होत नव्हती. परंतु सध्याच्या परिस्थिती पुर्ण पणे उलटी दिसू येते. यासंदर्भात ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना फोन केला असतो त्यांनी उचलला नाही. तर मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शिवपूजे यांना विचारले असता ते म्हणाले मी स्वत याकडे लक्ष देतो, परिस्थिती सुधारेल.

Friday, 19 March 2021

मुंबई महापालिकेचा प्लान ! निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर, स्वॅब द्या ; 'मॉलमध्ये प्रवेशाआधी चाचणी सक्तीची'.......

मुंबई महापालिकेचा प्लान ! निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर, स्वॅब द्या ;

'मॉलमध्ये प्रवेशाआधी चाचणी सक्तीची'.......
 

मुंबई : मुंबईत करोनाची मगरमिठी पुन्हा आवळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत. 

एकिकडे निर्बंध लागू केलेले असताना महापालिकेकडून चाचण्यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं आता गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे. मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांच्या अँटिजेन चाचण्या केल्या जाणार आहेत.
 
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून सर्व मॉल्ससाठी स्वॅब संकलन केंद्र सक्तीचे करण्यात आलं आहे.
 
यासाठी मॉलच्या प्रवेशद्वारावरच पथक नियुक्त केलं जाणार असून, याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असं,” अशी माहिती काकाणी यांनी दिली. 
लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. 

त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे,” असं काकाणी यांनी सांगितलं. 
करोनाबाधितांमध्ये नवी लक्षणे शहरात आढळणाऱ्या बहुतांश करोनाबाधित रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे फुप्फुसांशी निगडित न आढळता अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार, डोकेदुखी इत्यादी लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत.

समृद्धी महामार्ग मुरबाड - कर्जत - खोपोली मार्गाला जोडुन मुरबाडच्या विकासाला मिळणार चालना देणार - 'आमदार किसन कथोरे'

समृद्धी महामार्ग मुरबाड  - कर्जत - खोपोली मार्गाला जोडुन  मुरबाडच्या विकासाला मिळणार चालना देणार  - 'आमदार किसन कथोरे' 


मुरबाड, (मंगल डोंगरे)  कोणत्याही भागाचा विकास हा त्या विभागाला जोडणा-या रस्त्यांमुळे होत असतो. हिच संकल्पना डोक्यात ठेवून रेल्वे व रस्ते महामार्गामुळे झालेला विकास पाहून याच धर्तिवर मुरबाड सारख्या ग्रामिण भागात विकासाच्या व रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर, रस्त्यांचे जाळे महत्त्वाचे आहे. रहदारी वाढविणे महत्त्वाचे आहे. मुरबाड शहर केंद्र स्थानी असल्याने मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी विकासाची दुरदृष्टी ठेवून शहापुर शहरालगत जाणारा मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाला कर्जत - शहापुर रस्ता जोडणार असल्याचे मुरबाड येथे पञकारांशी वार्तालाप करताना सांगितले. नुकतीच त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यां सोबत बैठक घेऊन चर्चा केली असून लवकरच या कामाला गती मिळणार आहे. त्याचसोबत सरळगाव येथे नविन कृषी विज्ञानकेंद्र, माळशेज घाटात भारतातील पहिला काचेचा तरंगता पुल, पाठगाव येथिल प्रस्तावित एम. आय. डी. सी यामुळे भविष्यात मुरबाड मध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. उरण येथिल जे. एन. पी. टी. बंदरात उतरलेल्या मालाची वाहतुक या मार्गाने होणार असल्याने भिवंडी, पडघा, पूर्णा याठिकाणी ज्या स्वरुपात गोडावून उभे राहिले आहेत व त्या भागातील शेतकऱ्यांना आज त्याचा फायदा मिळत आहे. त्याच पद्धतीने मुरबाड मधिल शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच तिर्थक्षेञ शिर्डीचे अंतर कमी होऊन मुरबाडची व्यक्ती दोन तासात शिर्डीला पोहचणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले. मुरबाड शहर व तालुका अनेक महामार्गाने जोडला जाणार असल्याने भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी मुरबाड तालुक्यात निर्माण होणार होतील असा आशावाद ही यावेळी व्यक्त केला.

कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बालकलाकार हिंमाशू कांबळे याचा सत्कार, टिमला सहकार्याचे आश्वासन !

कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बालकलाकार हिंमाशू कांबळे याचा सत्कार, टिमला सहकार्याचे आश्वासन !


कल्याण, (संजय कांबळे) : जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्था संचलित एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या माध्यमातून उदयास आलेल्या आणि आपल्या अंगभूत गुण, कला जिद्द, चिकाटी मेहनत याच्या जोरावर कलाक्षेत्रात नावारूपाला येत असलेल्या बालकलाकार कु हिंमाशू संजय कांबळे याचा सत्कार भाजपाचे उपाध्यक्ष कार्यसम्राट आमदार, विकास पुरुष किसन कथोरे यांनी नुकताच पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस ला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्था ही पत्रकारितेतील आघाडीची महाराष्ट्र शासन मान्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून पत्रकार संजय कांबळे यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेची स्थापना केली. या बॅनरखाली त्यांनी ठाणे जिल्ह्यातील तसेच इतर भागातील नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली. या संस्थेला आतापर्यंत मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज स्टार अभिनेते अभिनेत्री यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद लाभले आहेत. यामध्ये अभिनेते प्रंशात दामले, जयवंत वाडकर, विजय पाटकर, नाट्यसमूहाचे आशिर्वाद मराठे, मंगेश सातपुते, जेष्ठ अभिनेते विलास रकटे, चला हवा येवू द्या फेम अभिनेते सागर कांरडे, कुशल बद्रिके,मंगेश जगताप, भूषण कडू, नाट्य निमार्ते अजय कासुर्डे, अभिनेत्री अलका कुबल, लावणी क्विन विजया पालव, प्रणव रावराणे, इरावती लागू, आदींचा समावेश आहे. स्वत टिम प्रमुख संजय कांबळे हे आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य देखील असून त्यांनी परिसरातील अनेक कलाकारांना विविध प्रकारच्या मराठी गाण्यांच्या माध्यमातून लोकांसमोर चमकावले आहे त्यांच्या टिम कलाकारांचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सन्मान ही केला आहे. यातून सर्वात उजवा ठरलेला बालकलाकार हिंमाशू कांबळे याचा सन्मान करण्याचा मनोदय कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या निकटवर्तीयाकडून व्यक्त झाल्याने त्यांनी आज वेळ देऊन बालकलाकार हिंमाशू कांबळे सह सर्व कलाकारांचे अभिनंदन करुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यामध्ये वंसत शिसवे, जयेश माजरे, रुक्साना शेख, यांचा समावेश होता. याप्रसंगी जिवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार रविंद्र घोंडविदे (सर) एस के फिल्म चे प्रमुख तथा पत्रकार संजय कांबळे, रोड रोलर पीवर संघटनेचे अध्यक्ष, समाजसेवक रशीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विकासपुरुष आमदार किसन कथोरे यांनी बालकलाकार हिंमाशू कांबळे यांचे विशेष कौतुक केले व टिम प्रमुख संजय कांबळे यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून टिम साठी लागणारी आर्थिक मदत, तसेच संस्थेसाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख व आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पत्रव्यवहार करण्यात येईल असे  सांगून भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Thursday, 18 March 2021

४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा....... "मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी"

४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा.......
 
"मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी"


मुंबई : करोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंर्त्यांनी केंद्राकडे केली. 

महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची मागणी उद्धव ठाकरे यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. राज्यातील करोनाची साथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, आणखी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. राज्यात दररोज तीन लाख जणांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे. अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रातही अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

केंद्रीय पथकांनी वेळोवेळी दिलेले सल्ले व मार्गदर्शनाप्रमाणे राज्य करोनाची लढाई लढत आहे. 
मधल्या काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती.

दीप शाल बिल्डिंग ते हिंदुहृदयसम्राट मा.स्व.बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत रस्त्याला स्वर्गीय दामोदर नारायण माळी यांचे नाव देण्यासाठी पहाणी !! महानगरपालिकेत तात्काळ प्रस्ताव सादर; 'शाखाप्रमुख सुनिल पाटील' यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.

दीप शाल बिल्डिंग ते हिंदुहृदयसम्राट मा.स्व.बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत रस्त्याला स्वर्गीय दामोदर नारायण माळी यांचे नाव देण्यासाठी पहाणी !!

महानगरपालिकेत तात्काळ प्रस्ताव सादर; 'शाखाप्रमुख सुनिल पाटील' यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/ समीर खाडिलकर) :

       "बोले  तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले" असे कायमस्वरुपी म्हटले जाते. याचे बोलके उदाहरण म्हणजे बोरीवली पश्चिम येथील शाखाप्रमुख सुनील काशिनाथ पाटील (शिवसेना शाखा क्र.१७) यांच्या रुपात बघायला मिळते. शाखाप्रमुख सुनिल पाटील यांनी स्वर्गीय दामोदर ना. पाटील यांचे आकस्मित निधन झाल्यापासून दामोदर पाटील यांचे स्मारक व्हावे अशी मनोमन इच्छा होती. आज ती खऱ्या अर्थाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत. आजपर्यंत स्थानिक लोकांची नावे आपल्या विभागातील रस्त्याना मिळावीत यासाठी सातत्याने प्रयत्न केले व त्याला यशही आलेले आहे. उदा. कै.अनंत केरु पाटील मार्ग व कै.लक्ष्मण पांडुरंग भंडारी मांर्ग ही शिंपोली गावातील समाज सुधारकांची व भूमिपुत्रांची नावे देण्यात आली आहेत.

सुनिल पाटील यांनी आज दीप शाल बिल्डिंग ते हिंदुहृदयसम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत रस्त्याला स्वर्गीय दामोदर नारायण माळी यांचे नाव देण्यासाठी पहाणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका बीना बेन दोशी, उपशाखाप्रमुख मनोज घडशी, समाज सेवक करण भदर्गे, संदीप (परब) उपस्थित होते. विशेष म्हणजे हा प्रस्ताव महानगरपालिकेत तात्काळ सादर करण्यातही आला अशी माहिती ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सावंत यांनी दिली. शाखाप्रमुख सुनिल पाटील आपण शिंपोली गावाचे सुपुत्र खऱ्या अर्थाने शोभता. एका नगरसेवकांचे काम आपण करीत आहात. तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडे. आम्हाला आपला अभिमान आहे अशा प्रतिक्रिया यानिमिताने स्थानिक रहिवाश्यांकडून देण्यात आल्या. श्री. प्रवीण शाह व श्रीमती बिनाबेन दोषी व संपूर्ण आर मध्य विभागीय नगरसेविका/नगरसेवकांचे श्री शिंपोली ग्रामस्थ मंडळ, शिंपोली, बोरिवली(प.) तर्फे आभारही व्यक्त करण्यात आले. श्री.पंढरीनाथ भंडारी अध्यक्ष व श्री. कुमार भंडारी सचिव व सुरेश लाड सदस्य यांनी शाखाप्रमुख व नगरसेविका/नगरसेवक यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस यानिमिताने शुभेच्छा दिल्या. गेल्या दोन वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश लाभल्याने अनेकांना धन्यवादही दिले.

जयेश वेल्हाळ यांना २४ टाईम्स तर्फे युथ आयकॉन पुरस्कारने सन्मानित !! "मुख्य अतिथी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र पवार यांच्या हस्ते जयेश वेल्हाळ यांचा सन्मान"

जयेश वेल्हाळ यांना २४ टाईम्स तर्फे युथ आयकॉन पुरस्कारने सन्मानित !!

"मुख्य अतिथी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र पवार यांच्या हस्ते जयेश वेल्हाळ यांचा सन्मान"


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

         आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांना नुकताच २४ टाईम्स तर्फे युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २४ टाईम्स न्यूज अँड एंटरटेनमेंट चे संस्थापक गोविंद गोलार आणि अम्माजी सेवा संस्थेचे अध्यक्ष त्रियोगी पांडे यांनी या कार्यक्रमाचे शिरोडकर हॉल परेल येथे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र पवार यांच्या हस्ते जयेश वेल्हाळ यांना सन्मान चिन्ह पुरस्कर देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये तृतीयपंथी यांच्यासाठी फेशन शो तसेच टेलेंट शो चे देखील आयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथी कडे बघण्याची नजर बदलायला हवी तसेच त्यांना सुद्धा त्यांचा आत्मसन्मान मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रस्तरावर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात चौफेर कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...