Sunday, 29 May 2022

महापालिकेच्या पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत " दि.५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर या फोटोग्राफी स्पर्धेचे " आयोजन !!

महापालिकेच्या पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत " दि. ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी बाग, माझा परिसर या फोटोग्राफी स्पर्धेचे " आयोजन !!


कल्याण : दि.०५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे " माझी बाग माझा परिसर " या विषयाच्या अनुषंगाने फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

ही स्पर्धा मुख्यतः हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि शहराचे हरित आच्छादन वाढवण्यासाठी आयोजित केली जात आहे. तरी सर्व नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होऊन ,ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपला पाठिंबा दर्शवावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित / आवाहन करण्यात येत आहे .

सदर स्पर्धेमध्ये आपल्या बाल्कनी / बंगल्याचे आवार/सोसायटीच्या टेरेसवर तसेच सोसायटीच्या आवारामधील बागेचे फोटो, लोकेशन व स्वत:च्या फोटोसह दि २३ /०५/२०२२ पासून ते दि. २९ /०५/२०२२ पर्यंत पाठवायचे आहेत.

सदरील स्पर्धेमधील विजेत्यास महानगरपालिकेतर्फे स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

यात प्रथम - स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक
द्वितीय - स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक
तृतीय - स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रकाचा समावेश असेल.

हे फोटो पालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर देखील प्रकाशित केले जातील.

फोटो/फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख: २९ मे २०२२, १७.०० वाजेपर्यत असेल.

स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत: -
१. बाग ही कल्याण डोंबिवली क्षेत्रातील असावी.
२. प्रति व्यक्ती नोंदींची संख्या एक पर्यंत मर्यादित राहील.
३ . सार्वजनिक उद्यान, रोपवाटिका, रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीच्या सहभागाच्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील.
४. ज्युरी सदस्यांनी / परिक्षकांनी घेतलेले सर्व निर्णय अंतिम असतील.

सूचना: -
१. अपलोड करता येणार्‍या चित्रांची कमाल संख्या प्रति एंट्री फक्त ०३ असेल.
२. अपलोड करता येणार्‍या चित्रांची कमाल क्वालिटी १० मेगा बाईट असेल. सदर फोटोग्राफी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कृपया खालील दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
https://forms.gle/CH2ZgRTiWJmFAXMFA

तसेच काहि शंका /अधिक माहितीसाठी, कृपया
kdmc.cc2021@gmail.com वर मेल करावा.

सौजन्य - KDMC Facebook page

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर !! "नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत"

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर !!

"नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत"


पालघर, दि.29(प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा कार्यकारी मंडळाच्या शनिवारी सायंकाळी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या विशेष सभेत परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष, तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी नवनियुक्त कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे आणि सर्व जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करून, परिषदेच्या कार्यासाठी नव्या जिल्हा मंडळाला शुभेच्छा यावेळी दिल्या. 

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा सौ  नमिता कीर, परिषदेच्या केंद्रीय नियामक मंडळाच्या सदस्य, तथा राज्याच्या महिला विकास मंडळाच्या (राज्यमंत्री दर्जा ) अध्यक्षा सौ. ज्योती ठाकरे, महिला साहित्य संमेलन समितीच्या कार्याध्यक्षा प्रा. सौ. स्मिता पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, तसेच जिल्ह्यातील सर्व शाखांचे अध्यक्ष व शाखा प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तांत्रिक कारणास्तव बरखास्त असलेल्या नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत करण्यात आला. तसेच पालघर येथे दि.11 व 12 जून 2022 रोजी होऊ घातलेले कोमसापचे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन अधिक जोमाने यशस्वी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

दि. 12 डिसेंबर 2021 रोजी मालगुंड येथे कवी केशवसूत स्मारकात झालेल्या कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या सर्वसाधारण सभेत पालघरचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रवीण दवणे यांचे नांव घोषित करण्यात आले होते. त्याबद्दल जिल्हा कार्यकारी मंडळाच्या कालच्या पहिल्या बैठकीत दवणे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात येऊन, जिल्हा मंडळाची अन्य कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात जिल्हा शाखेचे नवे कार्याध्यक्ष म्हणून वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांचे नांव श्री दवणे यांनी सुचवताच त्यास सर्वांनी एकमुखाने अनुमोदन दिले. त्याच बरोबर जिल्हा शाखेचे सचिव म्हणून उमाकांत वाघ (विरार ), कोषाध्यक्ष म्हणून जयेश शेलार (वाडा ), केंद्रीय समितीसाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुहास राऊत (पालघर ), तसेच जिल्हा कार्यकारीणी सदस्य म्हणून सौ. अंजली मस्करणीस (डहाणू ), रमाकांत पाटील (पालघर ), संजय घरत (बोईसर-तारापूर ), रवी बुधर (जव्हार ) यांच्या निवडी एकमताने यावेळी करण्यात आल्या. त्याचबरोबर तांत्रिक कारणास्तव बरखास्त असलेल्या नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव यावेळी संमत करून, नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीसाठी अनुक्रमे अनिलराज रोकडे आणि जयेश शेलार यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले. यावेळी वसई शाखा प्रतिनिधी आनंद गदगी आणि डहाणू शाखेच्या माजी अध्यक्षा  विणा माच्छि आवर्जून उपस्थित होते.

 

Saturday, 28 May 2022

मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची केंद्रीय सचिवपदी बढती !!

मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची केंद्रीय सचिवपदी बढती !!


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
            मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल  यांना केंद्र सरकारने  सचिवपदी बढती दिली आहे. “आयएएस अधिकारी म्हणून माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे,” असे इक्बाल सिंह चहल म्हणाले. विशेषत: इक्बाल सिंह चहल हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात. मोदी सरकारने इक्बाल सिंह चहल यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. हा टप्पा आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा मानला जातो.
          मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा विशेष उल्लेख करायला हवा, ज्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. चहल यांनी पोलीस आणि शासनाच्या इतर विभागांच्या 800 हून अधिक इनोव्हा वाहनांचे तात्पुरत्या रुग्णवाहिकेत रूपांतर करून हजारो लोकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्याचा अनोखा पुढाकार घेतला होता. तसेच कोरोना संकटात गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईत ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही.
         इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. चहल हे यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. तसेच  जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. चहल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही त्यांनी काम केले असून, औरंगाबाद आणि ठाण्याचे जिल्हाधिकारीही होते.
               केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्ये सोपवली होती. गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्ये भरीव योगदान दिलेल्या चहल यांनी जलसंपदा खात्यामध्ये केलेल्या कामगिरी आधारे जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट जलसिंचन व्यवस्थापनाचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ ची आरटीई २५ टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ ·३ जून अंतिम मुदत !

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ ची आरटीई २५ टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ ·३ जून अंतिम मुदत !


बुलडाणा, बातमीदार, दि. २८ : जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- २००९ नुसार दरवर्षी प्रमाणे सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२- २३ या वर्षांच्या आरटीई २५ टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) ३० मार्च २०२२ रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आलेली आहे. 

निवड यादीतील बालकांचे प्रवेश शाळेत जावून घेण्याची मुदत २७ मे २०२२ पर्यंत देण्यात आलेली होती. या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला ३ जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून अलॉयमेंट लेटरची प्रिंट काढून विहीत मुदतीत तालुका स्तरावरील कागदपत्रे पडताळणी समिती केंद्रावर जावे. कागदपत्र पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. तरी याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक व तालुकास्तरावरील संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी. जास्तीत जास्त बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर पागोरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी !!

महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी !!


नवी दिल्ली, बातमीदार, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. 


कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक !

महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक !


नवी दिल्ली, बातमीदार : महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंत‍िम दिनांक ९ जून आहे. 

महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून ०६.०७.२०२२ ते २१.०७.२०२२ या कालावधी  दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे १० सदस्य तसेच  उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण २० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. या रिक्त होणा-या जागांसाठी येणा-या‍ १० जून रोजी निवडणूक होणार आहे. 

महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या ०७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ ०२ जानेवारी २०२२ रोजी संपूष्टात आलेला आहे. सदरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम : 

विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना दि. ०२ जून २०२२ रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख ०९ जून २०२२ पर्यंतची आहे. अर्जांची छाननी १० जून २०२२ रोजी होणार असून, १३ जून २०२२ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान २० जून २०२२ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत होणाार असून, त्याचदिवशी सायंकाळी ५.०० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी संबंधित अधिका-यांना  सर्व आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाकडून दिले गेलेले आहेत. निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे़ याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनासोबत कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक !

रेल्वे प्रशासनासोबत कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक !


कल्याण, बातमीदार : कल्याण कसारा कर्जत (के३) रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे कल्याण ते कसारा व कल्याण ते कर्जत या मार्गावर प्रवाशांना भेडसाविणा-या समस्या रेल्वे प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासन यांच्यात दीर्घ बैठक झाल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.

संघटनेतर्फे वेळवेळी मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक व विविध विभागातील संबधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पञव्यवहार आणि दुरध्वनीवरून संघटनेतर्फे पाठपुरावा करण्यात आला. तसेच नुकतेच टिटवाळा रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३३ ची नियमित लोकल एसी लोकल केल्यानंतर स्थानिक प्रवाशांचा आक्रोशाबाबतही डीएमआर शलभ गोयल यांना माहिती देण्यात आली.

या संदर्भात एक बैठक बुधवारी सायंकाळी ५ वा झाली. या बैठकीला के३ रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष- राजेश घनघाव, सरचिटणीस- श्याम उबाळे, विभागिय उपाध्यक्ष विजय देशेकर, प्रमुख सल्लागार चंद्रकांत जाधव आणि वासिंद रेल्वे स्थानक प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित होते. तर रेल्वे प्रशासनातर्फे डीआरएम शलभ गोयल, सिनियर डीसीएम श्री वंजारी सिनियर डीओएम, आरपीएफ आयुक्त श्रीवास्तव आणि डीआरएम यांचे स्वीय सहाय्यक उपस्थितीत होते.

यावेळेस कल्याण- कसारा- कर्जत मार्गावरील प्रत्येक समस्येबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले, यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी जी कामे सुरू आहेत त्या बद्दल सांगितले तर ज्या ठिकाणी स्थानिक अडचणींबाबत चर्चा केली व बाकी समस्यांवर लवकरच मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले.


मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...