Saturday, 28 January 2023

अखंड हरिनाम सप्ताहला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट !

अखंड हरिनाम सप्ताहला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २८ : सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय रामायण कथेस कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. यावेळी आयोजकांच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. तर रामानाचार्य रामराव महाराज ढोक यांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी सन्मान केला.* 

      
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, उपसरपंच दादाराव काकडे, सोसायटीचे चेअरमन संजय काळे, दिगंबर टाकसाळे, लक्ष्मण जंगले, श्रावण निकम यांच्यासह भाविक भक्तांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

ठाण्यात महिलेला सोशल मीडियावर जॉबची पोस्ट बघण पडले महागात,५ लाख ३८ हजारांचा घातला गंडा !

ठाण्यात महिलेला सोशल मीडियावर जॉबची पोस्ट  बघण पडले महागात,५ लाख ३८ हजारांचा घातला गंडा !

भिवंडी, दि,२८, अरुण पाटील (कोपर) :
       सोशल मीडियाचा वापर करून नोकरी देण्याच्या बहाण्यानं एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील चीतळसर तेथे हा प्रकार घडला असून. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिलीय. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करू तपास सुरू केला आहे.
        आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त फोटो आणि मेसेज शेअर करण्यापुरता मर्यादित नाही. तर आता फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखे प्लॅटफॉर्म आभासी केंद्र बनले आहेत. व्यवसाय, नोकरी शोधणं, पैसे मिळवणं या साठीदेखील हे प्लॅटफॉर्म वापरले जातात. मात्र, आता याचाच फायदा गुन्हेगार घेऊ लागलेत. सोशल मीडियाचा वापर करताना एक छोटीशी चूक महागात पडल्याची अनेक उदाहरणं आता समोर येतात. 
               नोकरी शोधणाऱ्यांसाठीसुद्धा हे प्लॅटफॉर्म आता सुरक्षित राहिलेले नाहीत. येथे नोकऱ्या देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे घेऊन गायब होत आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय. मुंबईतील एका महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
               ठाणे _चीतळसर येथील एका २६ वर्षीय महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. तिला नोकरी देण्याच्या नावाखाली ५,३८,१७३ रुपयांना गंडा घालण्यात आला. संबंधित महिला इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत असताना एका पेजवर तिनं नोकरीची जाहिरात पाहिली. त्यानंतर तिनं संबंधित नोकरीच्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यामुळे ती इन्स्टाग्रामच्या पेजवरून एका वेबसाइटवर गेली.                               त्या नंतर महिलेनं वेबसाइटवरील सूचनांचं पालन करीत सर्व तपशील भरले. त्यानंतर महिलेला ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित महिलेनं या वेबसाइटवर ६ दिवसांत एकूण ५,३८,१७३ रुपये भरले.इतके पैसे दिल्यानंतर महिलेनं नोकरीसाठी संबंधित वेबसाइटवर असलेल्या नंबरवर फोन केला, पण तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
              जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर नोकरीची पोस्ट पाहाल, तेव्हा प्रथम संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट शोधा. तसंच पोस्ट खरी आहे की नाही, ते तपासा.
           सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्लिक बाइट हेडलाइन देऊन लोकांना आमिष दाखवतात आणि पैसे कमवतात, हे लक्षात ठेवा.
              कंपनीचे नाव ऑनलाइन शोधा. ही कंपनी अस्तित्वात आहे किंवा नाही, हे तपासा. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क करा.
              सोशल मीडियावर असणारी जाहिरात बारकाईने पहा. त्यात व्याकरणाची चूक असू शकते. अनेकदा गुन्हेगार फार शिकलेले नसतात, आणि इंग्रजी लिहिण्यात चुका करतात. त्यामुळे सावधानता पाळण्याचे आवाहन पोलीस नेहमी करत असतात.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सततच्या बदलत्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम, युती न केल्यास जबर फटका ?

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सततच्या बदलत्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम, युती न केल्यास जबर फटका ?

कल्याण,(संजय कांबळे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचित आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी युती केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वंचित सह बहुजन समाजात आनंदाचे व प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता दस्तुरखुद्द प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह शिवसेनेचे खासदार तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू संजय राउत यांच्या वर जहरी टिका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेशी वंचित ची झालेली युती तुटते की काय? अशी शंका निर्माण होत असतानाच अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मिडिया समोर विविध वक्तव्ये करत असल्याने कार्यकर्त्यामध्ये कमालीचा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर युती तुटल्यास याचा 'जबर फटका' वंचितला बसू शकतो.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी व्हा, असे सांगितले होते. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत स्वतःच्या ताकतीवर राज्यात किंवा देशात सत्ता काबीज करता आली नाही. हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही.अशातच भीम अनुयायांच्या शेकडो संघटना, पक्ष, गट तट, याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील बहुजन समाजाला बसला.

सुदैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटूंबातील अँड प्रकाश आंबेडकर यांनी अठरापगड जातींना एकत्र करून वंचित बहुजन विकास आघाडी स्थापन केली. यामध्ये एम आय एम देखील सहभागी झाली. वंचितच्या रुपाने महाराष्ट्रात प्रबळ असा तिसरा पर्याय लोकांना मिळाला. यावेळी वंचितने भाजप सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याशी युती करावी असे जवळपास सर्वानाच वाटत होतं. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी याला साफ नकार दिला. यावेळी रिपब्लिकन जनता सगळे गटतट विसरून वंचित च्या अर्थात प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. याचा जबरदस्त फटका काँग्रेस व राष्ट्रवादी ला बसला, वंचितांच्या अनेक उमेदवारांनी कमीत कमी १ लाख व जास्तीत जास्त साडेतीन ते चार लाखावर मते घेतली होती.

सध्या महाराष्ट्रातील राजकारण भयावह झाले आहे. सुडाच्या राजकीय खेळीने केव्हांच पातळी ओलांडली आहे. अशातच गद्दारी, खोके, उद्योग बाहेर जाणे, महागाई, बेरोजगारी, अशा आरोपांनी भलतीच पातळी गाठली आहे. शिंदे फडणवीस सरकारवर जनता कमालीची नाराज आहे. हे अनेकांच्या भाषणातून स्षट होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्ता कायम ठेवणे अवघडच नाही तर कठीण जाणार आहे.

अशा वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत काही गोष्टींचा त्याग करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर युतीची घोषणा केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. उलट आंबेडकरांनी महाविकास आघाडीत सामिल व्हावे अशीच इच्छा अनेकांनी बोलून दाखविली. सध्या वंचित मध्ये एम आय एम नाही, तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात, गावा गावात वंचितची ताकत आहे. अगोदरच बहुजन समाजाच्या फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारे या संकटकाळात उध्दव ठाकरे यांच्या पक्षात सामिल झाल्याने त्यांची ताकत वाढली आहे, शिवाय त्यांनी काढलेल्या महाप्रबोधन यात्रेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे.अशा सकारात्मक परिस्थितीत वंचितची युती नक्कीच परिणाम कारक ठरणार आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी आहे, या युतीचे शिल्पकार शरद पवार असले तरी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू  कठ्ठर शिवसैनिक खासदार संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना वंचित चे अध्यक्ष, प्रकाश आंबेडकर हे शरद पवारासह संजय राऊत यांच्या वर कडवट टिका करत आहेत. मधेच,, भाजपाने मनुस्मृती सोडली तर त्यांच्याशी देखील युती करु ,असे वक्तव्य करत आहेत. या सगळ्या वक्तव्यामुळे वंचित शिवसेना यांच्या युतीमुळे आंनदी झालेले कार्यकर्ते व बहुजन समाज मात्र पुरता गोंधळून गेला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत वंचित ने युती तोडू नये अशी भावना प्रत्येकाने बोलून दाखवली आहे.

मागील वेळी वंचित मित्रपक्षात सामिल न झाल्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला झाला. पण यामध्ये वंचित कुठे? हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आता सुदैवाने संधी आली आहे. याचा अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वक्तव्ये करावीत असे सगळ्यांना वाटते. तसे न झाल्यास आम्ही वंचित मधून बाहेर पडू असे काही जबाबदार वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सौ. अनिता नितीन वानखडे यांचे विविध मागण्यासाठी उपोषण !

सौ. अनिता नितीन वानखडे यांचे विविध मागण्यासाठी उपोषण !

औरंगाबाद दि २८ : सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनीता वानखडे हया २५ जानेवारी पासुन खालील विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषणास बसल्या आहेत "आज उपोषणाचा चौथा दिवस" आहे 

1) पैठण तालुक्यातील *पिंपळवाडी येथील मधील x24x25 भुखंड* तत्काळ जप्त करून भुखंड धारकावर फसणुकीचा गुन्हा दाखल करणेबाबत........

2) पैठण तालुक्यात *पूर्ण वेळ तहसीलदार नियुक्ती* करणेबाबत.

3) पैठण तालुक्यात *पूर्ण वेळ गटविकास अधिकारी* यांची नियुक्त करणेबाबत.

4) जायकवाडी धरण नजीक *भुंकप्रमापनयंत्र* बसविणेबाबत.

5) पैठण ते औरंगाबाद या रोडवरील चित्ते गाव या ठिकाणवरील *टोल बंद करणेबाबत*.

6) पैठण तालुक्यातील सर्व कार्यालयात *नागरीकांची सनद* प्रथम दर्शनी भागात लावणे बाबत.

7) पैठण तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या बांधकामासाठी *वाळू धोरणाची* अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आदेशित करणेबाबत.

8) श्री राजु काशीनाथ सुरे मुख्य अग्निशमन अधिकारी महानगरपालिका औरंगाबाद यांचा *पदभार* काढून त्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करणेबाबत.

9)  *आर्थिक गैरव्यवहार* करणारे   अधिकारी  *चंद्रकांत प्रकाश शेळके तत्कालीन तहसीलदार पैठण यांची विभागीय चौकशी करताना त्यांना सहकार्य करणारे उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री *डॉ.स्वप्नील मोरे* या दोघांचे *विभागीय चौकशी* करून कारवाई करण्यात यावी 

१०)पैठण धरणातील *गाळ* आधुनिक यंत्राच्या साहाय्याने काढणे बाबत....

११)अब्दुल्लापुर तांडा या *तलावाच्या* कामासह  सोबत असलेल्या ६ कामाचा  केलेल्या कामाचा पंचनामा करून दोषींवर गुन्हा दाखल  करणेबाबत ...

१२)पैठण तालुक्यातील *मनेरेगा अंतर्गत* त्रयस्थ समितीने चुकीचा, दिशाभूल करणारा खोटा  अहवाल वरिष्ठांना पाठवला असून तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची पुन्हा फेर चौकशी करून *समितीचे अध्यक्ष डॉ स्वप्नील मोरे उपविभागीय अधिकारी पैठण- फुलंब्री* तसेच सर्व समितीचे सदस्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

१३) पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना *अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान भरपाई* मिळतेबाबत....

Friday, 27 January 2023

मुंबई सिटीझन्स फोरम तर्फे TISS च्या सहकार्याने मुलुंड येथे नागरिकांच्या सहभागाबद्दल सर्वेक्षण !

मुंबई सिटीझन्स फोरम तर्फे TISS च्या सहकार्याने मुलुंड येथे नागरिकांच्या सहभागाबद्दल सर्वेक्षण !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
            मुंबई सिटीझन्स फोरम तर्फे TISS च्या सहकार्याने नागरिकांच्या सहभागाबद्दल सर्वेक्षण केले जात आहे.देशपांडे नाईट कॉलेज,मुलुंड येथील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच  सर्वेक्षणाचे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्याना मुंबई सिटीझन्स फोरमचे ईस्ट रिजन हेड असलेले डॉ. विवेक देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.विवेक देशपांडे सर शाळा आणि नाईट कॉलेजचे व्यवस्थापन करणाऱ्या या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत.

औरंगाबाद मध्ये ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे आगमन !

औरंगाबाद मध्ये ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे आगमन ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि  २७ : आज औरंगाबाद महानगरी मध्ये ईतिहासिक धम्म पदयात्रेचे आगमन झाले. या यात्रेत 110 थायलंड तरुण भंतीजी तसेच 25 माताजी यांचा समावेश होता 2500 हजार वर्षानंतर पहिल्यांदा तथागत गौतम बुद्धचे अस्थिकलश भारतात आले. 

या अस्थिकलश दर्शनासाठी तसेच भन्तेचा आशिर्वाद घेण्या करिता औरंगाबाद शहरातील लाखो भाविकांनी तुफान गर्दी केली. शहराच्या मुख्य रस्ता जालना रोड वरुण ही पदयात्रा काढण्यात आली. 

ज्या ज्या भागातून व चौकातून ही पदयात्रा गेली भाविकांनी पुष्प वर्षाव केला व अस्थिकलशाचे तर रांगा लावून दर्शन घेतले. या धम्म पदयात्रेत प्रमुख उपस्थिती सिने अभिनेता भगवान गौतम बुद्ध मालिकेचे गौतम बुद्ध यांची भूमिका केलेले अभिनेता गगन मलिक यांची होती. या धम्म पदयात्रेचे मुख्य आयोजक सिद्धार्थ हातीअंभेरे, औरंगाबाद महानगराचे मुख्य समन्वयक डॉ. पवन डोंगरे व राजेश लाडे, ॲड राहूल साळवे, सह समन्वयक कृष्णा भंडारे, जयप्रकाश  ननावरे, योगेश थोरात, महिला मुख्य समन्वयक कु.दिपाली मिसाळ, शहरातील विविध पक्ष्याचे समन्वयक जालिंदर शेंडगे, गौतम खरात, संजय जगताप, प्रकाश सोनवणे, महेंद्र सोनवणे , अंजन साळवे व इतर मान्यवरांनी या धम्म पदयात्रेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

उद्या दामोदर नाट्यगृहात साजरा होणार "कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा "हिरक महोत्सव" सोहळा !

उद्या दामोदर नाट्यगृहात  साजरा होणार "कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा "हिरक महोत्सव" सोहळा !

ठाणे, उदय दणदणे -

गेली सहा दशक कोकणातील कलगी-तुरा (शक्ती-तुरा) लोककलेचं जतन संवर्धन करण्याबरोबरच शाहिरी कलाकारांच्या उन्नतिसाठी सदैव कार्यरत असणारी "कलगी-तुरा" समाज उन्नती मंडळ (मुबंई) संस्थेला, ६० वर्ष पूर्ण होत असून संस्था ६१ व्या वर्षात अभिमानास्पद पदार्पण करत आहे.गौरवशाली परंपरा असणाऱ्या कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ - मुबंई, (महाराष्ट्र) या संस्थेचा "हिरक महोत्सवी वर्ष" रविवार, दिनांक -२९ जानेवारी- २०२३ रोजी, रात्रौ -८ वा. दामोदर नाट्यगृह परेल (मुंबई) येथे सन्मा.आमदार- भरतशेठ गोगावले, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सन्मा.आमदार उदय सामंत (रायगड- रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य), शालेय शिक्षण मंत्री सन्मा.दिपक केसरकर  मा. प्रमोद गांधी- ( उद्योजक /समाजसेवक ), मा.विठ्ठल चिविलकर- (चेअरमन- कुणबी बँक), मा.भूषण बरे (कुणबी समाजोउन्नती संघ), मा.जितेंद्र सावंत- (सदस्य- रा. जि. प.) मा.सुशांत जाबरे- (उद्योजक), मा.इकबाल चांदले- (महाड तालुका संपर्क प्रमुख), मा. एकनाथ सुकुम- ( महाड तालुका- सहसंपर्क प्रमुख- शिवसेना-शिंदे गट,) अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

सदर "हिरक महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेला आणि विशेषतः कलगी-तुरा लोककलेला योगदान देणाऱ्या महान आणि जेष्ठ शाहिरांना "कलगी-तुरा कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर सोहळ्यानिमित्त उपस्थितांच्या मनोरंजनार्थ "भेदीक शाहिरी" सादरकर्ते -शाहीर तुषार पंदेरे तसेच "तमाशा"-सादरकर्ते शाहीर अनंत माळी याचे शिष्य-  सुनील, महेंद्र सह प्रकाश ,रामचंद्र आणि मंडळी "कलगी-तुरा" ( जाखडी नृत्य) सादरकर्ते-शाहीर मधुकर यादव व शाहीर प्रकाश पांजणे अशा त्रिवेणी लोककलांचे सादरीकरण होणार असून मातृसंस्थेच्या "हिरक महोत्सव" सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून ह्या आनंदी सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे असे आवाहन उपरोक्त संस्थेचे सरचिटणीस- संतोष धारशे यांनी केले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...