Friday, 11 April 2025

मोहने येथील विजय मोरे आत्महत्या प्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल !!

मोहने येथील विजय मोरे आत्महत्या प्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल !!

 *व्याजाच्या पैशासाठी घरी जाऊन केली होती शिवीगाळ*

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. मयत विजय मोरे यांच्या भावाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सचिन दळवी व एका महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन दळवी या सावकाराने विजय मोरे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण व शिवीगाळ केली होती, असा आरोप मयत विजयची पत्नी व भाऊ राजू  केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोरे यांनी काही दिवसांपूर्वी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घरी येऊन शिवीगाळ करणाऱ्या सावकारावर संशय व्यक्त केला होता. विशेषतः विजय मोरे यांचे भाऊ राजू मोरे यांनी खडकपाडा पोलिसात सातत्याने जाऊन पाठपुरावा करून तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत राजू मोरे यांनी मिलिंद नगर येथील सचिन दळवी आणि एका महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हा सावकार अवाजवी व्याज आकारून जबरदस्तीने माझ्या भावाकडून पैशाची वसुली करत होता. आत्महत्या करण्याच्या चार दिवसापूर्वी सावकार आणि घरी येऊन शिवीगाळ तसेच मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी सावकाराच्या दबावामुळे विजय मोरे यांनी आत्महत्या केली असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
राजू मोरे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. प्राथमिक तपासात कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित सावकार व महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात मारहाण, शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे कल्याण-मोहने परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून या भागातील नागरिक सावकारांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी करत होते. विजय मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे आता या सावकारांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घस्ते मॅडम करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे. विजय मोरे यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोहने शहर अध्यक्ष माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न !

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न !

विरार, पंकज चव्हाण : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या शेवटी वर्षभर शैक्षणिक उत्तम कार्य, जिल्हा तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभ शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या  प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून प्रा. स्वाती जयकर, डॉ. महेंद्र घरत, डॉ. महादेव इरकर ह्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वसई विरार जिल्हा क्रीडा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. योगेश चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. संशोधन क्षेत्रात डिस्प्ले टेक्नॉलॉजी पेटंटबद्दल प्रा. अवधूत अमृते आणि आंतरराष्ट्रीय पेपर प्रसिद्धीबद्दल डॉ. शुभम पाटील या शिक्षकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव करण्यात आला.

ह्या समारंभासाठी प्राचार्या मुग्धा लेले उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित उपप्राचार्य रमेश पाटील आणि हेमा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनघा तुळजापूरकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अनिकेत सूर्यवंशी आणि प्रा. संदीप जाधव तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख खोडीदास गोहील यांच्या वतीने मानण्यात आले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शिका कल्पना राऊत आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 10 April 2025

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल !

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल !

मुंबई, प्रतिनिधी :-  उन्हाळी सुट्टीला सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह बाहेरगावी फिरायला जातात. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. 
       कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी १२ एप्रिल ते २४ मे या कालावधीत करमाळी येथून सुटणार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.
      ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी या स्थानकांवर थांबणार आहे.
      या गाडीचे एकूण २२ एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल. यातील लो. टिळक टर्मिनस ते करमाळी या फेरीसाठीचे आरक्षण आजपासून म्हणजेच ८ एप्रिल २०२५ पासून खुले होणार आहे.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा १३ एप्रिलला !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा १३ एप्रिलला !!

** गावक-यांकडून जय्यत तयारी; यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
            देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो, खरे पाहिले तर मनात भाव व देवापरी भक्ती मनापासून जोपासली तर मनुष्याच्या ह्दयातच देवाचे स्थान आहे. असे म्हटले जाते.या बाबी श्रद्धाळू माणसांना पटण्याजोगा नसतात. म्हणूनच ते जेथे देवाचे मंदिर आहे तेथेच देव दर्शनाला जातात.देशभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्यातही महाराष्ट्रात तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे.न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
           या गावाधील गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ रविवार दि.१३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळा सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी झाली आहे. ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे श्री. विजेंद्र गणेश पाटील (सरपंच), शैलेश विठ्ठल पाटील (उपसरपंच), योगेश कुंडलीक पाटील (अध्यक्ष), जयेंद्र जनार्दन पाटील (उपाध्यक्ष), निलेश हरिश्चंद्र भोईर (उपाध्यक्ष), विनोद एकनाथ पाटील (उपाध्यक्ष), सतीष दत्ताराम भोईर (उपाध्यक्ष), प्रेमनाथ नामदेव म्हात्रे (खजिनदार), अनंत लहु म्हात्रे (सहखजिनदार), चंद्रकांत बालाराम पाटील (सहखजिनदार), सदानंद पाटील - (सहखजिनदार), मनोरथ लक्ष्मण कडू - (सहखजिनदार) आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी- कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पहावे. असे आवाहन पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक दामू भोईर यांनी केले आहे.

Wednesday, 9 April 2025

डॉक्टर काका सांभाळा !

डॉक्टर काका सांभाळा !

लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याही दुखण्या खुपण्यावर तेच उपचार करायचे. फारसे स्पेशालिस्ट त्यावेळी नसायचे अन त्याची फार मोठी गरज भासल्याच कांही आठवत नाही. ऑपरेशन वगैरे साठी साधारणपणे जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. तरीही फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते चालत असे. फॅमिली डॉक्टर म्हणजे काका मामाच ! आम्ही त्यांना डॉक्टरकाकाच म्हणायचो. डॉक्टरना मारणे तर दूरच पण सगळे डॉक्टरकाकांच्या नजरेच्या धाकात असायचे. डॉक्टरांचा सूरही नेहमी आश्वासक, चेहरा हसरा, वाणी मधुर, कधी कधी आम्हा मुलांना दटावणारी सुद्धा ! पण हे खूपच छान कौटुंबिक संबंधांचं नातं असायचं. अगदी आम्हाला मुलं होई पर्यंतच्या वेळेपर्यंत हे असं चांगल्या कौटुंबिक संबंधांचं वर्तुळ होतं. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नव्हता. कांही वाईट घडल्यास डॉक्टरांना नव्हे दैवाला दोष दिला जायचा. 

असे छान दिवस चालले होते. आम्ही मोठे झालो आमचे मित्रही डॉक्टर झाले. आणि एके दिवशी आमच्या डॉक्टर मित्राकडून ती बातमी समजली. कोर्टाच्या एका निकालाने वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणली. खरं म्हणजे तिथंच या सर्व संबंधाची फाटाफूट झाली असावी. कौटुंबिक नाती कायदेशीर झाली. विश्वास जाऊन कायदा आला.. 

समजुतदारपणा जाऊन कोर्ट कचे-या आल्या. आपली ट्रीटमेंट बरोबर होती हे कायद्याने सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आली. त्यासाठी कायदेशीर रेकॉर्ड्स आली. मग ऑपरेशन पूर्व तपासणी ऑपरेशन नंतर  तपासणी, ट्रीटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व सर्व आवश्यक ठरू लागलं. त्यासाठी स्टाफ, रुग्णालयांची अद्ययावत कार्यालये,, असिस्टंट्स, लॅबोरेटरीज वेगवेगळ्या टेस्ट्स, अद्यायावत यंत्रसामुग्री, मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल्स, कोट्यावधीची यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी आवश्यक म्हणून वातानुकूलन यंत्रणा, या सर्वांचा देखभाल खर्च आणि त्या साऱ्यांसाठी लागणारा प्रचंड पैसा. वाढती महागाई व वाढलेले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग या सर्वाना आवश्यक असणाऱ्या प्रचंड पगार व मानधनाच्या रकमा. एक एक वाढतच गेले. आणि शेवटी या सर्व रकमांची भरपाई करण्याची जबाबदारी पेशंटवर !

एवढ्या प्रचंड रकमा भरताना पेशंट सुद्धा मग त्या पैशातून पंचतारांकित सुविधा मागू लागले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून यांना आकर्षित करण्यासाठी मार्केटींग यंत्रणा, कमिशन्स. एवढ्या मोठ्या रकमा भरताना घडून येणारे कटू प्रसंग. मग आधी पैसे भरा, डिपॉझिट भरा, मगच ऍडमिट असा ट्रेंड सुरु झाला.  पेशंट साठी वापरल्या गेलेल्या मटेरियलच्या  हिशोबात सुरुवातीला योग्य वाटणाऱ्या हॉस्पिटलना सुद्धा आकार वाढल्यावर स्टाफवर  कंट्रोल ठेवता येईनासा झाला. मग स्टाफ कडून होणारे गैर प्रकार, कधी कधी डॉक्टर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण प्रशिक्षित स्टाफ दुर्मिळ काय करणार ?  त्यातूनच नव्या नव्या प्रकारचे रोग आणि लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे वाढणारी पेशंटची संख्या. हा वाढीचा फुगा फुगतोच आहे. या सर्वात डॉक्टरांचा दोष कुठे ?  पण जबाबदारी मात्र डॉक्टरांवर !  व्यवसाय वाढला कि गैरप्रकार वाढतात.  जसं सरकारचा व्यवसाय सर्वात मोठा म्हणून त्यात गैरप्रकार सर्वात जास्त कारण कंट्रोल ठेवणे अवघड.  नंतर काही खासगी हॉस्पिटलची अवस्थाही सरकारी हॉस्पिटलसारखी झाली पण पैसे मात्र सरकारी हॉस्पिटल पेक्षा प्रचंड जास्त. या दुष्टचक्राची व्याप्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें आरोग्यमंडळा अशी होत गेली.
 
आता या सर्वांचेच दुष्परिणाम दिसू लागलेत. व्यापारी आणि ग्राहक हा नाते संबंध सतत लुटणारा आणि लुटला जाणारा असेच समीकरण फार पूर्वीपासून मनावर ठसवले गेले आहेच, त्यात डॉक्टर व पेशंट या नातेसंबंधांची भर  पडली. डॉक्टरांचे अनुभव जसे खरे तसेच पेशन्टचेही अनुभव खोटे नव्हते. यातूनच वाढती आहे दरी. 

डॉ अरुण लिमयेचें  ‘क्लोरोफॉर्म ‘ वाचले आणि आम्हीच तोंडात बोटे घातली  हे असं असतं ?  खरं  तर त्याच वेळेला सरकार व डॉक्टर्स यांनी अशा गैरप्रकारांना कसा आळा घालता येईल ? याचा विचार केला असता तर आज चाळीस वर्षानंतर वेगळेच चित्र दिसले असते. दुर्दैवाने तसे घडले नाही.  त्यातून डॉक्टर हॉस्पिटल्स यांचे गैरप्रकार कमी न होता वाढतच गेले.  समाजातील दोन घटकांमधील दरी वाढतच गेली. 

समाज मनातील संशयाच्या भुताने आज उग्र रूप धारण केले आहे. कायदा व कोर्ट हे कोणत्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर असू शकत नाही. कायद्याला भावना नसतात पण माणसांना असतात. कोर्टामध्ये  निर्णय मिळतो न्यायाबद्दल खात्री देता येत नाही. समोर आलेले पुरावे व त्याचा अन्वयार्थ लावण्यामागची तार्किकता यात माणसामाणसात फरक असतो. एका कोर्टाने फाशी दिलेला माणूस दुसंं-या कोर्टात निर्दोष सुटू शकतो. खरं काय ? न्याय कोणता ?  आपण सर्वसामान्य  माणसं ! आपण नातेसंबंध सुधारू शकलो तरच यातून उत्तर मिळू शकेल.  आमच्या लहानपणीची डॉक्टरशी असलेल्या नातेसंबंधांची व कौटुंबिक संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकेल का ? आमची नातवंडे नव्या डॉक्टरांच्या अंगाखांद्यावर डॉक्टरकाका म्हणून खेळू शकतील का ?  आज तरी भविष्य धूसर दिसतंय !

डॉक्टरकाका सांभाळा  स्वतःला !!!
------------- सुनील देशपांडे  (९६५७७०९६४०)

आ. किसन कथोरे यांच्या घरासमोर "प्रहार" चे आंदोलन !

आ. किसन कथोरे यांच्या घरासमोर "प्रहार" चे आंदोलन !

मुरबाड, (प्रतिनिधी) : नैसर्गिक असमतोल, पाण्याच्या नियोजनातील अक्षम्य दुर्लक्ष, बाजारपेठेच्या हेलकाव्यांनी घायकुतीला आलेला शेतकरी प्रखर विपरीत परिस्थितीतून जगत असतानाच "शंभर टक्के कोरा सातबारा" या आपल्या आश्वासनापासून महायुती सरकारने घुमजाव केल्याने किंबहुना किमान पुढील तीन वर्ष कर्जमाफी शक्य नसल्याची  स्पष्टोक्ती अर्थमंत्र्यांनी दिल्याने प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 11 एप्रिलच्या रात्री ठीक 12 वा. राज्यातील सर्वच आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

    त्यानुसार, आ. किसन कथोरे यांच्या बदलापुरातील घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील हे आपल्या प्रहारचे पदाधिकारी, स्थानिक शेतकरी व दिव्यांगजणांच्या साथ - संगतीने आंदोलन करणार असल्याचे मुरबाड पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.
    विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेती उत्पादित मालाला हमी भावाच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र सत्तेनंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. शिवाय मुरबाडचे आमदार कथोरे यांनी कर्जमाफीबाबत विधानसभेत एक चकार शब्द काढला नाही अथवा स्थानिक पातळीवर त्यासंबंधात दीर्घकालीन उपाय योजनेबाबत प्रयत्न केले नाहीत. याशिवाय दिव्यांग तालुका समन्वय समिती, आमदार निधीतून पाच टक्के दिव्यांग निधी, दिव्यांग भवन, मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, एमआयडीसीतील दिव्यांग कामगार भरती आदी मागण्या घेऊन तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील हे प्रस्तुत आंदोलनाद्वारे जाब विचारणार आहेत.
    यावेळी, तालुकाध्यक्ष पाटील यांच्यासोबत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेघना जोशी, तालुकाध्यक्ष किसन भंडारी, मूकबधिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र सुरोसे, तालुकाध्यक्ष प्रशांत तेलवणे, सचिव मोहन खुणे, मिलिंद जगताप, यांच्यासह दिव्यांगजन सहभागी होणार आहेत.     विश्वासघातकी सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या मनातील असंतोष प्रहार च्या माध्यमातून प्रकट होणार असल्याने या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यानुसार महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने आ. कथोरे यांच्या घरासमोर 11 एप्रिल ला रात्री 12 वा. आंदोलक गळ्यात निळा पट्टा व हातात भगवा झेंडा घेऊन व मशाली पेटवून आंदोलन होणार आहे. दरम्यान, धगधगत्या मशालीच्या ज्वालाने शेतकरी व दिव्यांगजणांच्या समस्या लोकनियुक्त आमदारांना पटतील - समजतील व त्याचा प्रकाश विधानसभेत पडेल, हाच आशावाद आंदोलक व्यक्त करत आहेत.
आमच्या जाई 'भाल बाई

प्रतिभा प्रभाकर भालेराव मंडग

आजही आईबी ओळख आहे ती मुळे आणि शाळाही ऑफखली जाते ती भालेराव बाईची शाळा म्हणूनच. शाळा व आई एकाच नाण्याच्या दोन बाजू कधीही एकमेकापासून वेगळ्या न करता येण्यासारख्या,

१९६६ साली गुडीपादश्याच्या मुहूतांबर सुरु करण्यात आलेल्या शाळेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आईनी उपसलेल्या फटामा पतीराज प्रभाकरानी तितक्याच तोलामोलाबी साथ दिली, नौकरी, एकत्रित कुटुप लहान भावडांचा सांभाळ शिक्षण, आई गेल्यामुळे समर्थपणे सांभाळले,

ती. दाय-आईची जिद्द, मेहनत, आत्मविश्वास, पडेल ते काम करण्याची मानसिक तयारी पामुळे शाळेच्या इमारतीसाठी मिळवलेली पाठाने मैदानाची जागा, त्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध दिलेला २० वर्षीया तुका म्हणजे सेन हर्षक संग्रामको

आईची संस्थापिका, संचालिका मुख्याध्यापिका अध्ययात्याने शची प्रगतीपथावरील वास्थ्चेच्या युगात यशस्वी ठरली,

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सनशेरपूर या डॉटयाशा खेोक्यात १९३७ साली त्यांचा जन्म पूर्वाश्रमीयी लीला पंढरीनाथ जोशी, परात एकूण सात भाव अतिशय गरीब हारी पती, शिक्षण घेण्यास अत्यंत प्रतिकूल या भावंडाचे शिक्षण व लीलाचेोगी फायनल मॅट्रिक, एस. टी सी. पर्यंत शिक्षण नाशिक पुण्याच्या नातेवाईकांकडे राहून झाले, स्वातंत्र्य चलीत भावांना तुरंगास के दास्था सावरकरांनीचर अंदमानात,

१९५७ साली लीलाचा चिजन कल्याणस्थित श्री. प्रभाकर भालेराव यांच्याशी झाला. लीलाची प्रतिभा झाली, सासरे, दीर मांदा असे एकत्र कुटूंब अशात प्रतिभाने घेतल कातून शिवणकाम, भरतकाम, हसाला, कोर्समध्ये निपुणता मिळवली,

दिवसा मासांनी १९६४ पर्यंत प्रतिभा प्रभाकर या दांपत्याला तीन मुले झाली, मुलांना शाळेत ने-आपा करणे, घरातील व्याप संभाळणे, यातून 'आपणय का शाळा सुरु करू नये? या विचाराला श्री. प्र. र. भालेराव यानी तात्काळा पार्टिका दिला. ती. सासरे व परमालक यांनीही परात साळा भरवण्याची परवानगी दिली. 'शिशु विहार प्राथमिक साळा अत्ता फलक राहत्या घरावर लावला, मुढीपाडवा मुहुर्त साधून सरस्वती रात ३/४/२० विधार्थी वाइत साका आकाराला आली.

मध्यंतरीच्या काळात आईनी डी. एड., पंडीत, पी. टी. इत्यादी परीक्षा दिल्या रात श्रेष्ठ गजाननाजांच्यावरील अपा श्रध्दा यांची कास धरून शालेय नार्गक्रमण सुरु झाली ती आजतागायत रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव कर हीरक महोत्सवासाठी रापारी चालू आहे. ध्येयासक्त, ध्येयनित्र, ध्येयवेडया प्रतिभाताईसारख्या शिक्षिकेसोया कामाला लागलेले सर्व अध्यापक, सेवक तळमळीने झटणारे निघाले, स्कॉलरशिप, गणित, हिंदी, चित्रकला, परीक्षांने निकाल नागलन लागू लागले. इ. १० वी रिझल्टही १७ते १०० टक्के लागत आहे, त्यामुळे शाळेचा लौकिक चाइत आहे. शाळेचे नाच शिद्ध विहान बदलून श्री गजानन विद्यालय ठेवले आहे. एस. एस. सी. बोर्डातही वरच्या नंबरने आली आहेत.

विशेष मानेवेतील शिक्षकांना 'दर्शक्षक पुरस्कार मिलाले आहेत. शाळेलाही "आदर्श शाळा" पुरस्कार मिळाला आहे. स्काऊटये शिक्षण देत असताना स्वततर्फ आतरराष्ट्रीय महिला योजलेबी अंमलबजावणी करण्यासाठी तर प्रदेश बिहार, बंगाल, सिल्कीम राज्याना भेट देऊन त्यांनी सर्व माहिती प्रतिभाताईंनी पैसामध्ये दिली, सांगितली. आईना द्वीगरमाथा, सहलीची आवड असल्यामुळे १२ दिवस "कालास मानस पात्रा पायी वेली; त्यावर अनेक व्याखाने झाली. स्थांनी निशा झाल्यानंतर नात्यांच्या उन्न शिक्षणासाठी १४ वर्षे पुण्यात वारत्तय केले तरी शाळेसाठी कल्याणकारी असेन पुण्यात असताना पंकरपुर चारी सफल इटली, तसे आईचे काका के, दाजी ना. जोशी पांच्या दर्शनासाठी अदनानला जाऊन स्वा. सावरकरांचेही इतिवृत्त समजले पहिले, डोळे भरून आले. गमन केले.

पुणे येथे निसर्ग रोक्क' समवेतर्फे शाळातून पर्यावरण विषयक कामे केली. विश्व हिंदू परिषदेच्या दीन बालवाडयाना सक्रिय मार्गदर्शन केले. परात ३ ते १२ वर्षांच्या मुलाने सस्कार गर्ग पेतारे महिलांसाठी 'भं करोति कालगालर, सगदासी मंडळाने त्याची उत्खल घेतली, मुलाचे कौतुक केले. महाराष्ट्र राज्य बाल शिक्षण प्यौषद पुणे वर्ष अध्यक्ष माणून काम, केले, पंढरपूर पात्रा केली, दोन नातू अमेरिकेत असल्याने नायगराच्या पाण्याचा योग आला

कल्याण वेचील याज्ञवल्क संस्थेत ५ महिला अध्यक्ष महणून काय केले. प्रीड शिक्षण वर्ग २ व चालविला. गुजराथी बालवाडी ८ वर्षे चालविली, ठाणे जिल्हा ग्रा. प्राथ. शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामे केले

वानणे, लिहिणे हा त्यांना कंद १) कैलास मानस पाथ प्रवास वर्णन २) श्री गजानन विजय यंगसार ३) योग वशिष्शातील रत्रीकी ४) पंचकन्यांचा दिपाकार ५७ अंदमानच्या स्मृती लहरी ६) पर्याव्यान मातीचा दीपत्र संका संकीर्तन सुभेचे प्राजक्त ९) शाळेलाही इशस्तवने १०) पंढरपूर यात्रा दर्शन ११) मुलांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा तुमने ११२१२) गर्म बंधातील शाळा १३३ स्वतःच्या ६१ निमित्त नातवंडांना ६१ शुभेच्छा पत्रे त्यात मोठ्या नातवास गीलेवर २१ पत्रे, त्याचे संकलन १४) स्फुट लेखन पेपर व दिवाळी अंकात १९) ७५ व्या वर्षी ७५ सुचिचार दर्शन संकलन,

પ્રતિત ભાડેથી મૂળેટી ગુજ્ઞાાલ નિયાની શિરીષ શ્રી. સ. સી. / પૂર, 15 votes, 119 14. ફણ ફરિનિયર, પ્રભી મ છે. क्यू (कल्पना ही जाई डॉक्टर कोरोनाने शांकला गिळले आणि सर्वांना दुःख सागरात हकलले

आईचं वय आता ८० वर्षे, त्या प्रसंगानुरुप शाळेत जातात जातीने सर्व पाहतात. पण त्यांची मुले सुना नातवंडे, नातेवाईक त्यांना शाळेत जाण्यास मनाई करतात तेव्हा त्या म्हणतात:

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...