Friday, 16 May 2025

मोहने गाळेगाव विभागात दोन दिवसात तीन बलात्काराच्या घटना !!

मोहने गाळेगाव विभागात दोन दिवसात तीन बलात्काराच्या घटना !!

 *कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण**

संदीप शेंडगे.

*मोहने गाळेगाव, १६ मे* – मागील दोन दिवसांत मोहने गाळेगाव टिटवाळा विभागात तीन बलात्काराच्या गंभीर घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन घटना धम्मदीप नगरमध्ये तर तिसरी घटना आटाळी गावात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

कल्याण तालुक्यातील मोहने टिटवाळा गाळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी अवैध दारूचे धंदे राजरोसपणे चालविले जात हे दारूचे गुत्ते अड्डे गुन्हेगारीचे पोषण केंद्र बनत चालले असून व्यसनाधीन युवक अधिक व्यसनाधीन होत असून मुलींच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे.

मोहने गाळेगाव विभागात सर्रासपणे गावठी हातभट्टीची दारू विकली जात आहे. रस्त्याच्या कडेला आणि काही झोपड्यांमध्ये उघडपणे दारू बनवली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. मुलं रात्रीपर्यंत घराबाहेरच असतात. दारूच्या नशेत तरुण गुन्हे करण्यास मागेपुढे पाहत नाहीत असे धम्मदीपनगर मधील महिलांनी सांगितले आहे.

*चायनीज गाड्यांखाली गैरप्रकारांची रात्र*

मोहने गाळेगाव टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात चायनीज फास्टफूडच्या गाड्या रात्री बे रात्री सुरू असतात. रात्री बे रात्री कोणत्याही वेळी देशी विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्याने  येथे तरुण रात्रभर धिंगाणा घालतात. तसेच रात्रीच्या वेळेस या गाड्यांवर दारू पिणं, मारामाऱ्या, गैरकृत्ये सर्रासपणे सुरू असते संध्याकाळी सातनंतर आम्ही मुलींना घराबाहेर काढतच नाही, सांगताना आटाळी गावातील एका मुलीच्या वडिलांनी संतप्तपणे प्रतिक्रिया दिली.

**राजरोस गुत्ते, पोलीस गप्प**

राजरोसपणे देशी व विदेशी दारू विकली जात आहे. अनेक गुत्त्यांवर पूर्वी कारवाई झाली, पण काही दिवसांत तेच गुत्ते परत सुरू होतात. असा आरोप एका तरुण कार्यकर्त्याने केला.

**जनतेचा संताप – उठावाची भावना उफाळून आली**

या घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण केला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. आज जर आम्ही आवाज उठवला नाही, तर उद्या आमच्या घरातीलच एखादी मुलगी या नराधमांच्या बळी ठरेल अशी भेदरवणारी भावना एका आईने व्यक्त केली आहे.
मुलींना जन्माला घालून आम्ही चूक केली काय असा संतप्त सवाल त्यांनी पोलीस प्रशासनाला विचारला आहे. शासन मुलींसाठी विविध योजना आणते आणि कार्यक्रम मुलींसाठी घेतात परंतु जर मुली सुरक्षित नसतील तर या कार्यक्रमांना या योजनेला काय अर्थ उरतो असे एका आईने सांगितले.

*शासनाकडून ठोस पावलं उचलणे अपेक्षित*

या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ ठाणे पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे .

विशेष मोहीम राबवून मोहणे अटाळी, गाळेगाव, बल्यानी आदी परिसरातील सर्व दारूचे मटक्याचे अड्डे उध्वस्त करून टाकले पाहिजेत. असे अड्डे चालविणाऱ्यांची तडीपरीची कारवाई केली पाहिजे रात्री गस्त वाढवणे, अवैध गुत्त्यांवर कायमस्वरूपी बंदी, आणि महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके स्थापन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल आणि कायदा हातात घेण्याची वेळ येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

तरी महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन काय निर्णय घेते काय कारवाई करते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Thursday, 15 May 2025

दहावी बोर्ड परीक्षेत कु. हर्षराज हितेंद्र म्हात्रे याचे सुयश !!

दहावी बोर्ड परीक्षेत कु. हर्षराज हितेंद्र म्हात्रे याचे सुयश !!

पेण (प्रतिनिधी) : पेण येथील के ई एस लिटल एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी कु .हर्षराज हितेंद्र पाटील याने  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC दहावी बोर्ड) परीक्षेत ७९.८० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
  त्याने मिळवलेल्या या यशात त्याची चिकाटी, मेहनत, शिक्षकांसह पालकांचा देखील मोठा वाटा आहे. या यशाबद्दल कुटुंब, नातलग परिवार, मित्रमंडळी यांच्याकडून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. हर्षराज यास पुढील उज्ज्वल भविष्यासाठी  हार्दिक शुभेच्छा..!!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

*कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन, कामगार नोंदणीचे गौतम बरडे यांचे आवाहन**

कल्याण, (संदीप शेंडगे) :
ता. १४ मे — टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कल्याण तालुक्यातील २५० महिला व पुरुष बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक अशा भांड्यांचा संच भेट म्हणून वाटप करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम बरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कामगारांनी शासनाच्या विविध लाभ योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगारांनी त्यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “नोंदणी झालेल्या कामगारांनाच शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळतो. अनेक योजना कामगारांसाठी आहेत अनेक फायदे कामगारांना होत आहेत त्यामुळे अधिकाधिक बांधकाम कामगारांनी पुढे येऊन नोंदणी करावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात २५० बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असलेले स्टीलचे भांडे संच वाटप करण्यात आले. यामध्ये तांब्या, वाटी, ताट, वाटप्या, डबे इत्यादींचा समावेश होता. उपस्थित कामगारांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला व संघटनेचे आभार मानले.

हा उपक्रम म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप नसून, कामगारांच्या आयुष्यातील एक सकारात्मक पाऊल ठरला असून, भविष्यात असेच विविध उपक्रम राबवून कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे गौतम बरडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्याध्यक्ष प्रवीण तायडे सौरव बरडे खजिनदार केशव पाटील सचिव माया बरडे दीपक ओवाळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठेकेदार शिवाजी देशमाने उपस्थित होते.

Wednesday, 14 May 2025

कु. अर्पण कमलाकर पाटील याचे दहावी परीक्षेत सुयश !!

कु. अर्पण कमलाकर पाटील याचे दहावी परीक्षेत सुयश !!

पेण, (प्रतिनिधी) : येथील फणस डोंगरी येथे राहणाऱ्या गुरुकुल विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्पण कमलाकर पाटील ह्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC दहावी बोर्ड) परीक्षेत ७०.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
  त्याने मिळवलेल्या या यशात  त्याची चिकाटी, मेहनत, शिक्षकांसह पालकांचा देखील मोठा वाटा आहे. या यशाबद्दल कुटुंब, नातलग परिवार, मित्रमंडळी यांच्याकडून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. पुढील उज्ज्वल भविष्यासाठी अर्पणला हार्दिक शुभेच्छा..!!

दहावी बोर्ड परीक्षेत कु.निधी संदेश पाटीलचे सुयश !!

दहावी बोर्ड परीक्षेत कु.निधी संदेश पाटीलचे सुयश !!

पेण, (प्रतिनिधी) : पेण येथे राहणाऱ्या निधी संदेश पाटील  हि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी)च्या परिक्षेत ८१.८०% गुणाने उत्तीर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत पेण येथील के. ई. एस इंग्लिश  मिडीयम सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी कु. निधी संदेश पाटील हिने ८१.८०% गुण मिळवत सुयश संपादन केले आहे.
    निधीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच शालेय अभ्यासात  हुशार आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत तसेच पालकांचे व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे तिने सांगितले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल  शाळेचे मुख्याध्यापक सह सर्व शिक्षकवृंद, मित्र परिवार तसेच नातलग व कुटुंबातील सदस्यांनी अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday, 12 May 2025

दुषित गटारात मरण पावलेल्या ऋतिक कुरकुटेच्या वारसांना नुकसान भरपाई द्या. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारी निदर्शने.

दुषित गटारात मरण पावलेल्या  ऋतिक कुरकुटेच्या वारसांना नुकसान भरपाई द्या. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारी निदर्शने.

ठाणे दि. १२ मे २०२५
  २२ जून २०२३ रोजी कल्याणमधील तिसगाव येथे दुषित गटारात साफसफाईचे काम करताना २२ वर्षीय सफाई कर्मचारी ऋतिक कुरकुटे हा आदिवासी तरूण मरण पावला. वारंवार अर्ज विनंत्या करूनही नियमानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने, ठाणे जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाने दुर्लक्ष केल्याचे निषेध करण्यासाठी बुधवारी १४ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऋतिक कुरकटेच्या कुटुंबियांसमवेत श्रमिक जनता संघ व म्युज फाऊंडेशन आणि ठाण्यातील विविध संघटनांचे वतीने निदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत..
मुंबई उच्च न्यायालयात श्रमिक जनता संघ युनियनने जनहित याचिका (१५७०/२०२३) दाखल केली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने पुणे येथील सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला व ठाणे जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊनही, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे, त्यामुळे ऋतिक कुरकटेच्या कुटुंबियांसमवेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात येणार आहे. 

ठाण्यातील न्यायप्रिय नागरिक आणि संस्था संघटनांनी ऋतिक कुरकटेच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि म्वुज फाऊंडेशनचे  राकेश घोलप यांनी केले आहे.

संपर्क __
जगदीश खैरालिया, 
सरचिटणीस -श्रमिक जनता संघ 
9769287233.

१३ मे २०२५ रोजी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाणेकरांसाठी खास 'प्री-वेडिंग' शो चे आयोजन……

१३ मे २०२५ रोजी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाणेकरांसाठी खास 'प्री-वेडिंग' शो चे आयोजन…… 

ठाणे, प्रतिनिधी : लव मॅरेज? की अरेंज मॅरेज? लग्न करून पहावं? की लग्न करूच नये? पती पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं. अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं. आणि मग एक वेळ अशी येते की आता थांबून चालायचं नाही. लग्न उशिरा झालं तरी चालेल, पण जोडीदार आयुष्यभर सोबत हवा... लग्न हा केवळ जीवनातला एक कार्यक्रम नव्हे तो दोन जीवांमधील गहिरा संवाद आहे..पदरात पडेल त्याच्याशी विवाह केलाच पाहिजे अशी वेळ तरुणांवर येते. याच मुद्द्यावरच येवनेट मल्टिमीडिया प्रा.लि. प्रस्तूत 'प्री-वेडिंग' हे मयूर योगी लिखित आणि डॉ. गणेश जनार्दन घुगरे दिग्दर्शित नाटक, लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट सोसायटी, ठाणे आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, ठाणे यांच्या सहयोगाने रंगभूमीवर येत आहे.प्रीती आणि प्रशांत. दोघेही असेच. एकमेकाला जाणून घेण्यासाठी भेटले आहेत. काय होतं या भेटीत? हे जाणून घेण्यासाठी जरूर पहा. मंगळवार, दि १३  मे २०२५, सकाळी ११ वा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे.मराठी नाटक 'प्री वेडिंग'. हा नाटकाचा स्पॉन्सर शो असल्याने मोफत तिकीट उपलब्ध आहेत.

महत्वाचे आपण १००% नाटकाला येणार असाल तरच पासेस घ्यावे, अन्यथा घेऊ नये, पासेस घेऊन जर आपण न आल्यास, सीट रिकामी - फुकट जाईल व दुसरा कोणीतरी नाटकाचा आनंद घेऊ शकतो.

मोफत पासेससाठी संपर्क: 9321183785, 8828992268

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...