Friday, 31 October 2025

"वंदे मातरम" गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करण्याबाबत आयोजन !!

"वंदे मातरम" गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त  सामूहिक गान करण्याबाबत आयोजन !!

सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

पुणे, प्रतिनिधी : शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी "वंदे मातरम" या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त  सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गानचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी "वंदे मातरम" गीताच्या सामूहिक गान प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार सर्वसाधारण, पुणे यांनी केले आहे.

या उपक्रमाचा उद्देश देशभक्तीची भावना दृढ करणे आणि "वंदे मातरम" या राष्ट्रगीतास १५० व्या वर्षानिमित्त अभिवादन करणे हा असून, जिल्ह्यात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडावा, असे आवाहनही तहसिलदार यांनी केले आहे.

Thursday, 30 October 2025

घनकचरा विभागाने आधी कचरा शुन्य कल्याण, शुन्य कचरा तक्रार करावी आणि नंतर विविध कचरा संकलन मोहीम राबवावी !!

घनकचरा विभागाने आधी कचरा शुन्य कल्याण, शुन्य कचरा तक्रार करावी आणि नंतर विविध कचरा संकलन मोहीम राबवावी !!

(नागरीकांना सक्ती आधी नियमित कचरा उचलून यंत्रणा सक्षम करावी स्फूर्ती फाउंडेशनची मागणी)

कल्याण, प्रतिनिधी - केडीएमसी घनकचरा विभागाच्या वतीने नुकतेच एक आदेश काढण्यात आलेला असून ज्यामध्ये आठवड्यातील वारां प्रमाणे विविध कचऱ्यांचे संकलन नागरिकांकडून घेण्यात येणार आहे सदर संकल्पना ही दैनंदिनी जिवनात नागरीकांना शक्य आहे का ? सदर संकलप्नेसाठी अनेक कचरा डब्यांची आवश्यकता लागेल ते उपलब्ध कसे होणार? त्याचबरोबर तक्त्यात उल्लेख करण्यात आलेला कचरा दररोज जमेलच असे नाही, आधीच कचरा उचलण्यासाठी आवश्यक संक्षम य़ंत्रणा नाही व नवीन संकल्पनेमुळे अधिक ताण पडणार त्याचे काय नियोजन ? त्यामुळे मुळे सदर संकल्पनेचे वास्तव्य जाणून घ्यावे व नागरीकांवर कचरा संकलन करण्याची सक्ती करु नये याआधी कचरा पासून कंपोस्ट खताची संकल्पनेच काय झालं याच उत्तर द्यावे, घनकचरासाठी अधिक कर घेण्यात आला त्याची नागरीकांना काय अतिरिक्त सुविधा दिली याचे उत्तर द्यावे. अशा संकल्पना राबविण्याआधी परिसरामध्ये रस्त्यावर अनेक कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस पडलेले असतात ते नियमित उचलावे व रस्त्यावरील कचर्याचे वर्गीकरण कसे करणार याची माहिती जनतेला द्यावी, कचरा उचलण्यासाठी आवश्यक गाड्यांची संख्या वाढवावी, गाड्या नादूरूस्त असल्याने अनेक वेळा ४-५ दिवस गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नाही कामगारांचा पगार, बोनस साठी संघर्ष नेहमीच पहायला मिळतो, कधी गाड्यांची समस्या कधी कामगारांची समस्या त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी असतात की गाडी कचरा उचलण्यासाठी येत नाहीये. 

याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना फोन करून गाडी बोलण्यासाठी विनवणी करावी लागते त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सदर आधी आपली यंत्रणा मजबूत व सक्षम करावा, कचरा शुन्य कल्याण आधी करावे, शुन्य तक्रार झाल्यानंतरच अशा संकल्पना राबवाव्यात असे निवेदन स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा विभागाला दिले

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे विद्यालयातील तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड !!

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे विद्यालयातील तीन खेळाडूंची  राष्ट्रीय स्तरावर निवड !!

पुजन रमेश धातकर, नंदिनी रविंद्र जाधव व धनश्री नारायण बळकटे

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या  पंधराव्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा मुली व मुलांचा संघ पुण्यातील पिंपरी चिंचवड हिंदुस्थान अँटीबायोटीक स्कूल खराळवाडी येथे सहभागी झाला होता. या दोन्ही संघांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी उत्तम काम केलेल्या केलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा पूजन रमेश धातकर मुलांच्या संघात तर मुलींच्या संघात नंदिनी रवींद्र जाधव व धनश्री नारायण बळकटे यांची निवड झालेली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा 14 ते 17 नोव्हेंबर रोजी गुजरात येथे होणार आहेत. या प्रशालेतील आतापर्यंत अनेक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. ग्रामीण भागातील या शाळेने उत्तम दर्जाचे खेळाडू तयार केलेले आहेत.या खेळाडूंना क्रीडाशिक्षिका सौ.ऋतुजा जाधव यांनी मार्गदर्शन केले. या निवड झालेल्या स्पर्धकांना मुख्याध्यापक विलासराव कोळेकर व संस्था अध्यक्ष माद्रे साहेब, सचिव रुमान पारेख सर्व संचालक, शिक्षक, पालक संघ यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मार्गदर्शक/शुभेच्छा - विलासराव कोळेकर सर 
+91 94224 20611


प्रशिक्षित कुर्मी पुरोहित अंधश्रद्धा बाजूला सारून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील !!

प्रशिक्षित कुर्मी पुरोहित अंधश्रद्धा बाजूला सारून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील !!

* कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल.पी.पटेल यांचे प्रतिपादन

(वाडा/दि.30 ऑक्टोबर) :

सध्याचे जग सर्व बाबतीत पुढारलेले असताना आपल्या समाजात आजही काही चुकीच्या प्रथा व अंधश्रद्धा आढळून येत आहेत. कुर्मी महासभेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेले पुरोहित हे समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धा दूर करून समाजाला योग्य  समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील, असा विश्वास कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल.पी.पटेल यांनी व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने वाडा तालुक्यातील मेट येथे पुरोहित सात दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप गुरुवार (दि. 30 ऑक्टोबर) रोजी पार पडला. 

तर प्रशिक्षित पुरोहित महिला या आपल्या परिवारासाठी व समाजासाठी एक आदर्श मार्गदर्शिका ठरतील, त्यामुळे समाजातील जास्तीजास्त महिलांनी पुरोहित कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कुर्मी महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर यांनी केले आहे. 

या समारोप कार्यक्रमासाठी ओएनजीसीचे महाप्रबंधक जनार्दन पटेल, कुर्मी महासभेचे कुर्मी महासभेचे सांस्कृतिक राष्ट्रीय अध्यक्ष  शाहीर गायकर, प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश महासचिव जयेश शेलार, पुरोहित प्रशिक्षक डॉ. रज्जन प्रसाद पटेल, प्रदेश संरक्षक डॉ. बाबुलाल सिंह, ॲड. गोपाळ शेळके, किसन बोंद्रे, अजित राऊत, नरेश आकरे, डॉ. राममूर्ती वर्मा, व्ही. के. वर्मा, ज्येष्ठ समाज नेते आप्पा घुडे, महासभेचे कोकण अध्यक्ष तुकाराम पष्टे, उद्योग महासभा प्रदेश अध्यक्ष समीर पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळ अध्यक्ष यदुनाथ पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर, रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदीवडे, ठाणे शहर कुणबी मंडळ अध्यक्ष पी. एन.पाटील, पुरोहित प्रशिक्षक विजय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष विजय राव, उद्योजक काशिनाथ पाटील, सचिव सीताराम पाटील, मोहन पाटील, सुभाष पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या समारोप कार्यक्रमात शिबिरात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी कुर्मी पुरोहित महासभेच्या कोकण अध्यक्ष पदावर विजय दळवी, कुर्मी महासभेच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदावर यदुनाथ पाटील, जिल्हा महासचिव पदावर जयंता पाटील तर तालुका महासचिव पदावर किशोर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव जयेश शेलार यांनी तर आभारप्रदर्शन कोकण अध्यक्ष तुकाराम पष्टे यांनी केले.
-------------------------------
प्रतिक्रिया 
१) कुर्मी महासभा आयोजित पुरोहित प्रशिक्षण शिबिरात 55 समाजबांधवांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून यापुढेही त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था केली जाईल.
-- जयेश शेलार पाटील
(शिबिर संयोजक तथा प्रदेश महासचिव)

२) शिबिरात उत्तम व्यवस्था होती, तर शिबिरात तज्ञ प्रशिक्षक मिळाल्याने सर्व प्रशिक्षण घेणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून आम्ही प्रामाणिकपणे पौरोहित्य कार्य करू.
-- रामदास घरत (प्रशिक्षणार्थी, कर्जत)

3) अशा प्रकारचं पुरोहित प्रशिक्षण महाराष्ट्रात प्रथमच झाले असून विशेष म्हणजे यामध्ये महिलांना समाविष्ट करून घेतल्याने यापुढे कुणबी समाजातील महिला पुरोहित तयार होणे, ही नवी क्रांती असेल.
-- श्रीमती संध्या पाटील
(प्रशिक्षणार्थी, आबिटघर)

कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये २ नोव्हेंबरला पायी दिंडी सोहळा !!

कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये २ नोव्हेंबरला पायी दिंडी सोहळा !!

** संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईतर्फे मुंबईतील सर्व वारकरी बंधू, भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई आयोजित वर्ष १२ वे सर्व भाविकांचे आराध्य दैवत श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तगण हातात टाळ, मृदुंग, खांद्यावर विना आणि हाती पताका घेऊन पंढरपूर ला पायी जातात.परंतु ज्या भक्तांना पंढरपूरची पायी वारी करता येत नाही म्हणून गेली १२ वर्षे संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई यांच्या वतीने दादरमध्ये दिंडीचे आयोजन केले जाते.यावर्षी सुद्धा रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दादरच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट पासून सकाळी ८.३० ला पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होईल त्याची सांगता श्री विठ्ठल मंदिर,रानडे रोड येथे होईल.
              आषाढी कार्तिकीला भाविक गण अर्थात वारकरी श्रद्धापूर्वक प्रेमाने पंढरपूरला जाऊन श्री विठू रायचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आनंद लुटत असतात.तोच आनंद तोच उत्साह, फुलांची, रांगोळीची सजावट, भक्तासाठी जागोजागी अल्पोहार ठेवला जात असतो. यावेळी मोठ्या उत्साहाने हा सोहळा याची देही, याची डोळा भक्तांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ मुंबईतील सर्व वारकरी बंधू तसेच भक्तांनी घ्यावा असे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Wednesday, 29 October 2025

डॉ. मुरहरी केळे यांची 'पॉवर ॲण्ड एनर्जी एक्सपर्ट समिती' च्या अध्यक्षपदी नियुक्ती !!

डॉ. मुरहरी केळे यांची 'पॉवर ॲण्ड एनर्जी एक्सपर्ट समिती' च्या अध्यक्षपदी नियुक्ती !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) ही राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची शिखर संस्था असून सन २०२७ मध्ये या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. भारतातील निवडक वाणिज्य चेंबर्सपैकी एक असलेल्या आणि शतकपुर्तीकडे वाटचाल करत असलेली ही संस्था राज्यातील नवीन उद्योगांना चालना देणे, त्यांना तांत्रिक, कायदेशीर मार्गदर्शन करणे, उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी यांच्या हक्कासाठी न्याय मागणे यासारखी अनेक कामे करणाऱ्या नामांकित संस्थेच्या 'पॉवर अॅण्ड एनर्जी एक्सपर्ट समिती' च्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

डॉ. मुरहरी केळे यांना उर्जा आणि विद्युत क्षेत्रातील ३५ वर्षापेक्षा जास्त अनुभव असून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, त्रिपुरा राज्यांतील विद्युत मंडळात 'संचालक' तसेच 'अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक' अशा उच्च पदांवर काम केले असून त्यांच्या कार्यकाळात उद्योग आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यांनी दहा पेक्षा जास्त मराठी आणि इंग्रजी पुस्तके लिहिली असून त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, पत्रकारिता, माहिती तंत्रज्ञान, उर्जा अंकेक्षन आणि मराठी साहित्य या क्षेत्रातील जवळपास १२ पदव्या घेतल्या असून त्यांनी दोन विषयात पीएचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. अशा नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या उच्चविद्याविभूषित आणि उर्जा आणि विद्युत क्षेत्रातील तज्ञ, तसेच वीज क्षेत्रात देशातील पहिले 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल' राबवलेल्या डॉ. मुरहरी केळे यांची श्री. रवींद्र माणगावे यांनी संस्थेच्या 'पॉवर अॅण्ड एनर्जी एक्सपर्ट समिती' च्या अध्यक्षपदी नियुक्ती करून अभिनंदन केले आहे. त्यांच्या सहकार्याने उद्योग, व्यापार आणि शेती यांच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे काम करणार असल्याचे तसेच त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर समितीमधील अन्य सदस्यांच्या समवेत नियमित बैठकांच्या मधून उपक्रमांचे नियोजन व क्रियान्वयन अपेक्षित असल्याची अपेक्षा चेंबरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी व्यक्त केली आहे.

वृत्तांत - विलासराव कोळेकर सर 

प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे' या गौरव ग्रंथाचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन' !!

प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे' या गौरव ग्रंथाचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन' !!

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ धनगर समाज अधिकारी संघ, पुणे आयोजित एका सहृदय सत्कार सोहळा आणि 'प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक व ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ डॉ. मुरहरी केळे यांचे कार्यकर्तृत्वावर आधारित गौरव ग्रंथाचे संपादन श्री. दत्ता किवणे व श्री. शिवाजी तिकांडे यांनी केले होते. त्याचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे करण्यात आले.
सदर गौरव ग्रंथावर प्रमुख भाष्यकार आणि इतिहास तज्ञ असलेले भारत महाविद्यालय, जेऊर येथील प्रा. डॉ. शिवाजीराव वाघमोडे यांनी समयोचित व अभ्यासपूर्ण भाष्य केले. पुस्तकावर भाष्य करताना डॉ. वाघमोडे यांनी पुस्तकातील अंतरंग उलगडून दाखवतांना ग्रंथातील डॉ. केळे यांनी लिहिलेले निवडक लेख, डॉ. केळे यांच्या बद्दल अभ्यासकांनी लिहिलेले लेख, डॉ. केळे यांची साहित्य संपदा, तसेच डॉ. केळे यांच्या आयुष्यपट उलगडून दाखवणारी निवडक छायाचित्रे, तसेच त्यांचा सविस्तर बायोडाटा असे असलेले, सुंदर मुखपृष्ठ, मलपृष्ठावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. रवींद्र शोभणे यांची पाठराखण असलेले पुस्तक अतिशय सुंदर आणि डॉ. केळे यांचे लौकिकाला साजेसे झाले आहे, असे मत व्यक्त केले.

सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात धनगर समाजातील प्रथमच कृषी मंत्री झालेल्या व शेतकऱ्यांसाठी चांगली कामगिरी करत असलेल्या श्री दत्तात्रय भरणे यांचा सहृदय सत्कार सोहळा व विविध वीज कंपन्यातील उच्च पदावर निवड झालेले अधिकारी श्री. अभय भरणे, श्री. दत्तात्रय पडळकर, श्री. धर्मराज पेठकर, श्री. संदीप हाके व श्री. अतुल सोनजे त्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर सत्कार महाराजा यशवंतराव होळकर यांचा पुतळा, खांद्यावर घोंगडी, डोक्याला पिवळा फेटा व एक पुस्तक देऊन करण्यात आला. सदर सत्काराला उत्तर देत सत्कारमूर्ती अधिकारी व मंत्रीमहोदय श्री. दत्ता भरणे यांनी समयोचित भाषणे केले. कृषिमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, समाजातील अधिकाऱ्याने आपापल्या क्षेत्रात काम करत असताना समाजाची सेवा करण्याची पुण्य प्राप्त करून घ्यावे, तसेच उत्तरोत्तर असेच यश संपादन करावे असे सांगितले.

प्रकाशित गौरवग्रंथावर भाष्य करत असतांना डॉ. मुरहरी केळे यांनी संपादकाचे व भाष्याकाराचे आभार मानले. पुढे आपल्या भाषणात श्री केळे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यावरील चित्रपटाचे संहिता लिहून झाली असून तो चित्रपट समाजातील व्यक्तींच्या सहकार्यानेच पूर्ण व्हावा व त्यासाठी सत्तापक्षात असलेले मंत्री, पदाधिकारी व आपले कृषिमंत्री श्री दत्ता भरणे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याला उत्तर देताना श्री भरणे यांनी डॉ. केळे यांचेवरील गौरवग्रंथाचे कौतुक तर केलेच परंतु डॉ. केळे यांच्या उत्तुंग कार्याची मी दखल घेतली असून आम्ही यापुढे तुम्हाला विसरणार नाही, असेही हसत हसत सांगितले, तसेच चित्रपट पूर्ण करण्यासाठी मी स्वतः व शासन स्तरावर नक्की सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. ज्ञानदेव पडळकर, श्री. युवराज सरग, श्री. विजय गुलदगड, श्री.धनंजय गावंडे यांचे सह पुणे, बारामती, नाशिक व जवळपासच्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व समाज बांधवातील अभियंते व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

वृत्तांत - विलासराव कोळेकर सर 

पद्मश्री जी.डी.यादव यांची व्हिजन इंडिया डॉक्युमेंटरीसाठी स्वप्निल राणी नंदकुमार यांनी घेतली सदिच्छा भेट !

पद्मश्री जी.डी.यादव यांची व्हिजन इंडिया डॉक्युमेंटरीसाठी स्वप्निल राणी नंदकुमार यांनी घेतली सदिच्छा भेट !

मुंबई (मोहन कदम/शांताराम गुडेकर)
              ज्येष्ठ संशोधक, शिक्षाविद, विद्यावाचस्पती गणपती दादासाहेब यादव यांची व्हिजन इंडिया डॉक्युमेंटरी अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार यांनी एसपीएसटी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश रासम यांच्या समवेत दिवाळीच्या शुभकामना व्यक्त करण्यासाठी भेट घेतली. या भेट प्रसंगी विजन इंडिया डॉक्युमेंटरी उपसंपादक राहुल गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली. प्रोफेसर जी.डी.यादव भारतातील शिखर प्राप्त शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक तथा संशोधन कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्थांचे संस्थापक तथा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर राधानगरीमध्ये जन्मगाव असलेल्या यादव सरांचे अतुलनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना भारत गणराज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारा मंत्रिमंडळ शिफारस पश्चात तत्कालीन महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते सर्वोच्च नागरी सन्मान, पद्म सन्मानाने अलंकृत करण्यात आले आहे. पद्मश्री अलंकृत व्यक्तींचा जीवनपट लोकांसमोर यावा या उद्देशाने निर्मित विजन इंडिया डॉक्युमेंटरीमध्ये त्यांची मुलाखत प्रसारित करण्यासाठी सदर भेट होती. सदर मुलाखती दरम्यान श्री. मंगेश रासम यांनी यादव सरांचा विशेष सत्कार केला.

मालेवाडीची किर्ती जगभर करणा-या तरुण दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा सत्कार !!

मालेवाडीची किर्ती जगभर करणा-या तरुण दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा सत्कार !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            सांगली जिल्ह्यातील मालेवाडी या छोट्या खेड्यातून उभा राहिलेला तरुण दिग्दर्शक आणि संशोधक सोमनाथ वाघमारे याने आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर मराठी मातीचा गौरव वाढवला आहे. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि वाळवा तालुक्याची सून डॉ. गेल ऑम्बेट व त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर यांच्या जीवनावर आधारित 'गेल - अ लाइट ऑफ ह्यूमॅनिटी' या माहितीपटाचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्रदर्शन झाले. त्याला संशोधक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माहितीपटाची निर्मिती वाघमारे यांनी तब्बल ८ वर्षांच्या परिश्रमानंतर पूर्ण केली आहे. पुढील काही दिवसांत या चित्रपटाचे ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि ससेक्स विद्यापीठांतही प्रदर्शन होणार आहे. गेल ऑम्बेट या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होत्या. त्यांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारून आयुष्य भारतातील सामाजिक परिवर्तन चळवळीला वाहून घेतले. महात्मा फुले, आंबेडकरवाद, ब्राह्मणेतर चळवळींचा अभ्यास आणि स्त्रीहक्क, दलित प्रश्न यावर त्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध आहे. कासेगाव येथील श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर हे त्यांचे सहकारी होते. या दोघांचे विचार, संघर्ष आणि प्रेमकथेचा वास्तवदर्शी पट या माहितीपटातून उलगडतो. 'गेल - अ लाइट ऑफ ह्यूमॅनिटी' या शीर्षकाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची सुरुवात कासेगावमधील त्यांच्या घरापासून होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, समाजातील भेदभावाच्या विरोधातील संघर्षाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रवास यात चित्रित केला आहे.सोमनाथ बाबुराव वाघमारे यांचा नुकताच शिव समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था मालेवाडीच्या वतीने सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत मालेवाडीचे माझी सरपंच रंगराव जाधव राजाराम बापू सह. बँक संचालक संभाजी पाटील, पत्रकार विलासराव कोळेकर, मिलिंद वाजे. धनाजी सूर्यवंशी, अविनाश कोकाटे, विशाल सूर्यवंशी, सुशांत जाधव, योगेश नलावडे, मंगेश कोळेकर, वैभव कोळेकर, प्रदिप बोकने आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

माहितीसाठी - विलासराव कोळेकर सर 

Monday, 27 October 2025

बळीवंश कलामंच ( ता. गुहागर, जि. रत्नागिरी ) निर्मित नमन प्रयोगात नवीन कलाकृती "संस्कार" चे होणार सादरीकरण !!

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे कोकणच्या नमन लोककलेचे आयोजन !!

बळीवंश कलामंच ( ता. गुहागर, जि. रत्नागिरी ) निर्मित नमन प्रयोगात नवीन कलाकृती "संस्कार" चे होणार सादरीकरण

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विविध लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोध करत जनजागृती करण्याचे महान कार्य अनेक लोकशाहीर, लोककलावंतांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला गौरवशाली सांस्कृतिक - परंपरा कायम आहे. महाराष्ट्रातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या असताना कोकणात अनेक गाव-वाडी कुशीत काही लोककला फक्त सणासुदीलाच सादरीकरण होत असून त्या मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत यासाठी कोकणातील बरेच लोक आपआपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. त्यापैकीचं एक कोकणात नावलौकिक मिळवलेले बळीवंश कलामंच ( ता. गुहागर,जि. रत्नागिरी )  हा कलामंच आहे. आयोजनातील अग्रेसर असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच तर्फे कोकणातील बहुप्रिय लोककला नमन कलेचा या मोसमातील शुभारंभाचा प्रयोग मंगळवार दि.११ नोव्हेंबर २०२५, रोजी रात्रौ ८.३० वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, (पूर्व) मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे.

                   कार्यक्रम दरम्यान श्री.संदीप तुकाराम सावंत, श्री.सतिश रामचंद्र जोशी यांना श्री.पाणबुडी देवी ,मुंबई पुरस्कृत स्व.शंकर ( दादा ) गोमाणे स्मृती प्रित्यर्थ नमन लोककला गौरव पुरस्कार - २०२५ तर श्री.अनंत अशोक शेनॉय यांना श्री.पाणबुडी देवी कलामंच,मुंबई पुरस्कृत स्व. शंकर ( दादा ) गोमाणे स्मृती प्रित्यर्थ भजन सम्राट पुरस्कार - २०२५ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवश्री सागर बबन डावल या नवोदित नमन कलावंत यांनी अल्पवधीत अनेक वगनाट्य लेखन केले आहे. त्यातीलच नवी कलाकृती "संस्कार" यावेळी पहायला मिळेल. समाजप्रबोधन विषयक लिखाण मधून ते कायम वेगवेगळे संदेश देण्याचे काम ते करत आले आहेत. अथक परिश्रम पूर्वक निर्मितीतून साकारलेल्या या नमन प्रयोगाला कोकणवासीय मुंबईकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दिपक कारकर- ९९३०५८५१५३, रमेश भेकरे- ९५९४३५२८६३, संतोष घाणेकर- ९८३३६८९६४२, रमेश कोकमकर - ८८५०४२२७११ यांच्याशी संपर्क साधवा.

कोकण सुपुत्र कवी अशोक लोटणकर यांना कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान !!

कोकण सुपुत्र कवी अशोक लोटणकर यांना कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा शहरामधील मुर्शी गावचे सुपुत्र, मुलुंड येथे वास्तव्यास असलेले लेखक, कवी श्री.अशोक लोटणकर यांना नुकताच कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते  मंचर पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.या वेळी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

              लोटणकर यांच्या अक्षरनामा या काव्य संग्रहास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या काव्य संग्रहाला मिळालेला हा सहावा पुरस्कार आहे. कविता, कथा, ललित, बाल साहित्य, ब्रेल लिपी इ. स्वरुपाची एकूण २१ पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या साहित्यकृतींना मानाचे ३० हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्यात कोकण साहित्य रत्न पुरस्कार, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार, एकता कल्चरल अकादमीचा नारायण सुर्वे पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार इ.चा समावेश आहे.लोटणकर हे सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत.ते बेस्ट मधून आगार व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले असून ते अनेक सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत.रत्नागिरी  जिल्ह्यातील साखरपा- मुर्शी गावचे सुपुत्र लोटणकर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, ग्रामीण मंडळ, विविध संस्था, प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sunday, 26 October 2025

“स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल ओमकार धुळप सन्मानित !!

“स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल ओमकार धुळप सन्मानित !!

प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा – निलेश खरे

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा “स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे “प्राईड ऑफ स्पंदन” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.“प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा आहे,” असे गौरवोद्गार साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे यांनी काढले. ते कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
              या वेळी व्यासपीठावर महंत आहिल्यागिरीजी महाराज, प्रेरणादायी वक्ते डा. विनोद बाबर, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, टीव्ही 9 मराठीच्या पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, ॲड. धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, तसेच ट्रस्टचे संस्थापक डा. संदीप डाकवे यांची उपस्थिती होती.
             कार्यक्रमात “महाराष्ट्रातील माणिकमोती” या पुस्तकाचे प्रकाशन व स्व. राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. या बोधचिन्हाचे रचना सुप्रसिद्ध कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे.
              निलेश खरे म्हणाले, “डॉ.संदीप डाकवे हे बहुप्रतिभावान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून समाजासाठी वेगळी वाट तयार केली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”
              डॉ.विनोद बाबर यांच्या प्रेरणादायी भाषणाने सभागृहात चैतन्य निर्माण झाले, तर गायक विजय सरतापे यांच्या सुरेल गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
             या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना “प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२५” ने सन्मानित करण्यात आले.त्यात विशेष म्हणजे उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल “ओमकार भीमराव धुळप” यांना “प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२५” ने गौरविण्यात आले.त्यांना हा पुरस्कार साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, टीव्ही 9 च्या निवेदिका सेजल पूरवार, आणि महंत महायोगी अहिल्यादेवी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यांच्या गणेशोत्सव विशेष वार्तांकनाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
              स्पंदन जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. यंदाच्या पूरस्थितीमुळे त्या रकमेचा वापर पूरग्रस्तांसाठी करण्यात आल्याची घोषणा डा. संदीप डाकवे यांनी केली — ज्यातून संस्थेचा संवेदनशीलपणा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक डा. संदीप डाकवे, सूत्रसंचालन सौ. अंजली गोडसे, तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
             दीपप्रज्वलन आणि कु. माधुरी करपे हिच्या भरतनाट्यममधील गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे (फौजी), चंद्रकांत चव्हाण, यशराज चव्हाण, गुलाब जाधव (फौजी), भिमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पुनम जाधव, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने आयोजित पुरोहित (पुजारी) प्रशिक्षण शिबिराचे भव्य उद्घाटन समारोह संपन्न !!

कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने आयोजित पुरोहित (पुजारी) प्रशिक्षण शिबिराचे भव्य उद्घाटन समारोह संपन्न !!

* प्रशिक्षण वर्गात 60 प्रशिक्षणार्थींचा सहभाग

हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी व प्रत्येक विधीसाठी पुरोहितांची आवश्यकता असते मात्र सध्या समाजात पुरोहितांची संख्या कमी झाल्याने त्याची उणीव भासू लागली आहे. अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने  कुणबी समाजातील समाज बांधवांसाठी ७ दिवसीय निवासी पुरोहित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील मेट येथील तानसा ग्लोबल स्कुल येथे होत असलेली या शिबिराचा उद्घाटन समारोह शुक्रवार (ता २४) रोजी पार पडला. यावेळी कुर्मी महासभेचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील व तानसा ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष मंगेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उद्योजक गजानन जाधव, उपजिल्हा धिकारी बी.बी.ठाकरे, महासभेचे सचिव जयेश शेलार, कोकण विभागाचे अध्यक्ष तुकाराम पष्टे, मुंबईचे डॉ. बाबुलालसिंह, ॲड. गोपाळ शेळके, सुबोध भाई, चिंचघरचे उपसरपंच मनेश पाटील, डाकिवलीच्या उपसरपंच श्रावणी पाटील, मुंबई म्युनिसिपल बँक संचालक भानुदास भोईर, वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, समीर पाटील, किसन बोंद्रे, नरेश आकरे, रोहिदास पाटील,सुभाष पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते. 

या पुरोहितांना अयोध्येहून आलेले प्रसिद्ध व जेष्ठ पुरोहित डॉ रजनकुमार पटेल व ज्येष्ठ पुरोहित विजय दळवी हे सात दिवस प्रशिक्षण देणार आहेत विशेष म्हणजे या प्रशिक्षणात दक्षिण आफ्रिकेत स्थायिक असलेले ज्ञानेश्वर शेलार हे सहभागी झाले आहेत. वेळी बोलताना महासभेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की या प्रशिक्षणातून समाजातील कर्मकांड व अंधश्रद्धा दूर होऊन कुणबी समाजातील पुरोहितांचे समाजात आदराचे स्थान निर्माण होईल व व त्यामुळे एक चांगला नवीन समाज निर्माण होईल तसेच पुरोहित झाल्यावर आपल्या आचरणात व विचारात बदल करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित पुरोहित प्रशिक्षणार्थींना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेल शैलीत मनेश पाटील यांनी केले तर आभार जयेश शेलार यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होते. 

" या प्रशिक्षणातून शिक्षण घेऊन आम्हाला धार्मिक विधी विधी करताना ब्राह्मणांची उणीव भासणार नाही समाजात एक नवी चळवळ या निमित्ताने उभी राहील"
      जयंत पाटील,
      प्रशिक्षणार्थी,
 
" या प्रशिक्षणातून मला आपल्या देशातील भारतीय संस्कृती जपण्यासाठी विदेशात उपयोग होणार आहे,या आधी आम्हाला भारतातून ऑनलाइन पुरोहित मागवावे लागत होते आता मी स्वतः प्रशिक्षण पूर्ण करून धार्मिक विधी करणार आहे"
     ज्ञानेश्वर शेलार, रहिवासी 
     दक्षिण आफ्रिका,

प्रसिद्धीसाठी - महासभेचे सचिव जयेश शेलार (जेष्ठ पत्रकार)

Saturday, 25 October 2025

मिशन बॉस मानवाधिकार युवा फाउंडेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी सर्वपक्षीय नेत्यांची घेतली भेट. !!

मिशन बॉस मानवाधिकार युवा फाउंडेशनचे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी सर्वपक्षीय नेत्यांची घेतली भेट. !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये व अन्याय झाल्यास त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन भाई शेख यांनी मिशन बॉस मानवाधिकार युवा फाउंडेशनची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्यावर आवाज उठवून गोर गरिबांना न्याय मिळवून दिला आहे. अन्याया विरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांना एकत्र करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांचे नेहमी विविध सामाजिक कार्यही सुरु असते. त्या अनुषंगाने तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून मिशन बॉस मानवाधिकार युवा फाउंडेशनचे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली आहे.

उरणचे आमदार तथा भाजपा नेते महेश शेठ बालदी ,कॅबिनेट मिनिस्टर तथा शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले ,मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीरंग आप्पासाहेब बारणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष)च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्यासह सर्वच पक्षातील विविध नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मिशन बॉस मानवाधिकार युवा फाउंडेशनचे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच विविध समस्या सोडविण्या संदर्भात चर्चा सुद्धा केली. मोहसीन शेख यांचे जनसंपर्क दांडगा असून त्यांच्या कार्याचे कौतुक सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

ईगल फौंडेशन चे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर !!

ईगल फौंडेशन चे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर !!

मुंबई, शांताराम गुडेकर :
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईगल फौंडेशनचे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वश्री श्री संजय कुंडलीक जाधव ( कृषी ), उद्योग क्षेत्रातून अस्लमभाई सय्यद, श्री संभाजी हिंदूराव माळी, ॲड.प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे (सरकारी वकील), वैद्यकीय क्षेत्रातून डॉ.राजेंद्र नामदेव कवठेकर, श्री तुकाराम बाबू बंडगर व सौ. स्वाती तुकाराम बंडगर, पत्रकार क्षेत्रातून श्री युवराज आनंदराव निकम ( दै. तरुण भारत ), पत्रकार श्री चंद्रकांत गुरव (दै. बंधुता ), सामाजिक क्षेत्रातून श्री अशोक गोरड, गोपाल जगदेव भावसार, सौ. राधिका गोपाल भावसार, श्री प्रदीप महादेव खोत, शैक्षणिक क्षेत्रातून श्री राजकुमार कांबळे,श्री प्रताप शिरतोडे,  प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम,श्री अशोक जनार्दन पाटील, श्रीमती शैला गंगाधर बैसाणे, प्रा. डॉ. दिलीप गाडे, प्रा. लहूकुमार दिनकर थोरात, प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. राम घुले, सौ. अर्चना सुधर्मा डाके, प्रा. संजय नकटू लेनगुरे, प्रा. सौ. रेखा रमेश कटके, प्रा.दिलीप हिरा बरकडे, श्री पोपट माणिकराव काटकर, साहित्य क्षेत्रातून श्री रावसाहेब अर्जुन मुरगी, श्री सुदाम दगडू धाडगे, सौ. लिना बाळासाहेब पांडे, सौ. प्रतिभा पांडूरंग थोरात, सौ. गायत्री मोहाडीकर, सौ. सुनिता गढळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर सोहळा रविवार, दि.९ नोव्हेंबर २०२५, सकाळी १० वाजता, डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनियरींग कॉलेज, आष्टा, जि. सांगली येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, पदाधिकारी सर्वश्री श्री सागर पाटील, श्री. बाबासाहेब राशिनकर, श्री दिनेश कांबळे, प्रा. महेश मोटे, श्री संजय थोरात, प्रा. दिलीप जाधव, पत्रकार प्रशांत चव्हाण, श्री विजय जगताप, श्री भास्कर सदावर्ते यांनी दिली.

माहितीसाठी अध्यक्ष - विलासराव कोळेकर सर 
+91 94224 20611

Thursday, 23 October 2025

वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप !!

वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
वनवासी कल्याण आश्रम उरण तालुक्याच्या वतीने हिंदूंचा मोठा सण दिपावली निमित्त मिठाई आणि कपडे वाटप करण्यात आले. लहूचीवाडी, कल्ले येथे मिठाई वाटप करून जनजाती बांधवांची दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लहूचीवाडी, कल्ले येथील वनवासी कल्याण आश्रम चे कार्यकर्ते सुदाम पवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ॲड आकाश शहा यांनी लहान मुलांचे खेळ घेतले,निकेतन ठाकूर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका अध्यक्ष  मनोज ठाकूर यांनी वनवासी कल्याण आश्रम बद्दल आणि आश्रमा तर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल उपस्थित वाडीवरील बांधवांना माहिती दिली आणि ज्या मुलाची आश्रमात राहून शिकण्याची इच्छा आहे त्याला पुढील अभ्यासासाठी  कल्याण आश्रम खर्च करेल असे सांगितले. पाड्यात वयस्कर आजी आजोबांना मिठाई देताना त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून सर्वांना समाधान वाटले. उपस्थित ३० भगिनींना नवीन साड्या, शाळेत जाणाऱ्या २५ मुलांना टोप्या, तसेच उपस्थित ३० बांधावाना टीशर्ट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा हितरक्षा प्रमुख सुदाम पवार, वनवासी कल्याण आश्रम उरण अध्यक्ष मनोज ठाकुर ,कार्यकर्ते ऍड आकाश शाह, अर्णव ठाकूर, निकेतन ठाकूर, सुरेश नायडू ही मंडळी वाडीवरील जनजाती बांधवांना आनंद देण्यासाठी उपस्थित होते.

भिवंडी तालुक्यात 'बळी पहाट' मोठया उत्साहात ; सांस्कृतिक कार्यक्रमातून इतिहासाची उजळणी !

भिवंडी तालुक्यात  'बळी पहाट' मोठया उत्साहात ; सांस्कृतिक कार्यक्रमातून इतिहासाची उजळणी !

भिवंडी, प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :

आपण समाजाचे देणे लागतो. समाजामध्ये वावरत असताना प्रबोधन व परिवर्तन झाले पाहिजे या उद्देशाने शेती संस्कृती, कृषी संस्कृती जपणाऱ्या, शेतकरी-कष्टकरी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा, मनोरंजनातून प्रबोधन घडविणारा व इतिहासाचा वेध घेण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ कलामंच प्रस्तूत मनोरंजनातून प्रबोधन घडविणारा सांस्कृतिक "बळी पहाट" कार्यक्रम २२  ऑक्टोबर २०२५ रोजी भिवंडी तालुक्यातील चौधर पाडा येथे  शेकडो नागरिकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक, निवेदक प्रमोद जाधव यांनी बोलताना सांगितले की “बळीराजाच्या बाबतीत भाबड कथांवर विश्वास न ठेवता खऱ्या इतिहासाचा शोध घेणे गरजेचे आहे.” तुकोबारायांच्या अभंगांचा दाखला देत त्यांनी बळीराजाच्या स्मृतींना उजाळा दिला. सादरीकरणातून शेतकरी वर्गाचे दुःख व संघर्ष, “बळीचे राज्य” येण्याची लोकांची आस, तसेच शिवराय–संभाजी महाराज, जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई, रमाई, राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य– न्याय– समता– बंधुभावाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच ओबीसी समाजाने आपले अधिकार संघटितपणे मागणे आवश्यक आहे, हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमातून ओबीसी जनजागृती हा मुख्य विषय मांडण्यात आला. ओबीसींचे आरक्षण कशाप्रकारे संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर जातनिहाय जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करत, सामाजिक न्याय आणि हक्कांच्या लढ्यासाठी ती किती आवश्यक आहे हे प्रभावीपणे मांडण्यात आले.

गेल्या दहा वर्षांपासून ओबीसी संघर्ष समिती रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर लढा देत आहे. समाजाला त्यांच्या संविधानिक हक्कांची जाणीव करून देण्यासाठी, शिक्षण–आरक्षण–राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवर सतत जनजागृती करत आहे. “बळी पहाट” हा त्याच चळवळीचा एक विस्तार ठरला.

“बळी पहाट” या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि निवेदन प्रमोद जाधव यांनी केले. निवेदक राजेंद्र पाटील, साधना भेरे, ज्योती दवणे, नीलम भोईर , साक्षी वाघेरे यांच्या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रम रंगला, तर गायक अरुण गगे, दिनेश भोईर, संतोषी जाधव आणि रुपाली जाधव यांच्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. राजमाता जिजाऊ कलामंचच्या नृत्यकलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

“बळी पहाट” हा केवळ मनोरंजन करणारा नव्हे, तर शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या संस्कृतीचा तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांचा वास्तवदर्शी दस्तऐवज ठरला. उत्कृष्ट नियोजन, विचारपूर्वक संहिता, प्रभावी सादरीकरण आणि सामाजिक आशय यामुळे हा सांस्कृतिक आविष्कार प्रेक्षकांच्या कमालीच्या पसंतीस उतरला.

 कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी जयवंत पाटील, कुंडलिक पाटील, पंडित पाटील, योगेश पाटील, विनोद भोईर, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, संदीप वाघेरे, अजय किरपण, शाम पाटील, रुपेश मांजे, दत्ता दवणे, तुषार शेलार आदी कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली.

Wednesday, 22 October 2025

मनसेची दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी !!

मनसेची दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी !!

भिवंडी, प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :

भिवंडी तालुक्यातील अपंगांसाठी कार्यरत असलेली “सरस्वती माता दिव्यांग प्रतिष्ठान” या संस्थेच्या दिव्यांग बांधवांसोबत मनसेचे विधी विभाग व जनहित कक्षाचे जिल्हा संघटक ॲड.सुनिल देवरे यांनी दिवाळी भेट म्हणुन किराणा सामानाचे वाटप करून मोठ्या आनंदात पाडावा साजरा केला. यावेळी ही दिवाळी माझ्यासाठी आनंदाची तसेच अविस्मरणीय असुन, आपण यापुढे दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सदैव लढा देणार असुन, दिव्यांग बांधवांसोबत कायमच मनसे ठाम उभी असेल असे आश्वासन यावेळी ॲड.सुनिल देवरे यांनी दिव्यांग बांधवांना दिले. यावेळी जनहित कक्षाचे भिवंडी शहर सचिव कुणाल आहिरे तसेच विभाग संघटक शुभम घोडके उपस्थित होते.

पडघ्यातील सर्पमित्रांकडून अजगराला जीवनदान !!

पडघ्यातील सर्पमित्रांकडून अजगराला जीवनदान !!

भिवंडी, प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) : 

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात सर्पमित्रांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि दक्षतेने ७ फूट लांबीच्या व अंदाजे १५ किलो वजनाच्या अजगराला सुरक्षित जीवनदान दिले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. पडघा येथील एका किराणा दुकानाच्या मालकास दुकानात अचानक भला मोठा सर्प दिसल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ सर्पमित्र सूरज गायसमुद्रे आणि रवी दांडगे यांना याची माहिती देण्यात आली.

सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत सावधगिरी बाळगत निरीक्षण केले असता, तो सर्प अजगर प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत काळजीपूर्वक त्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. आपल्या भक्ष्याच्या शोधात तो दुकानात शिरल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. यानंतर सर्पमित्र सूरज गायसमुद्रे व रवी दांडगे यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्या अजगराला पडघा परिसरातील सुरक्षित जंगलात सुखरूप सोडून दिले. या कामात पडघा वन परिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. बिनविषारी अजगर साप सुरक्षित पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात परत पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये दिलासा पसरला असून सर्पमित्रांच्या या संवेदनशील आणि पर्यावरणपूरक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा कृतीमुळे वन्यजीव संवर्धनाचा उत्कृष्ट आदर्श साकारला गेल्याचे पर्यावरणप्रेमींकडूनही मत व्यक्त करण्यात येत आहे.

दिवाळी फराळाचा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लुटला आनंद !!

दिवाळी फराळाचा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लुटला आनंद !!

**  मोठया उत्साहात साजरी झाली दिवाळी.

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :उरण विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबविले जातात. शिवसेना (शिंदे गट) चे उरण विधानसभेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिवाळी गोड व्हावी, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होता यावे, दिवाळी सणाचा सर्वांना एकत्रितपणे लुटता यावा या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी कामठा रोड उरण शहर येथील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दिवाळी फराळ च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळचा आनंद लुटला.यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदर दिवाळी फराळ कार्यक्रमाचे कौतुक केले. 

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, उरण विधानसभा सचिव हितेश नाईक, उप तालुका प्रमुख अमित ठाकूर, पनवेल उप तालुका प्रमुख गौरव गायकवाड,उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, वाहतूक सेनेचे पदाधिकारी दशरथ चव्हाण, करंजाडे शहर संघटक -स्वप्नील मोरे, वडघर शहर प्रमुख  समाधान परदेशी, वडघर विभाग प्रमुख रवि पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी वडघर विभाग, वडघर शहर, चिरनेर विभागातील अनेक  वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी विविध कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदावर नियुक्ती करण्यात आली. अधिकृतपणे नियुक्तीचे पत्रही यावेळी देण्यात आले.एकंदरीत शिवसेना तर्फे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.

Tuesday, 21 October 2025

पडघ्यात मातीच्या किल्ल्यांची परंपरा कायम - तरुणाईने उभारले ऐतिहासिक किल्ले !!

पडघ्यात मातीच्या किल्ल्यांची परंपरा कायम - तरुणाईने उभारले ऐतिहासिक किल्ले !!

** पन्हाळगड ते सिंधुदुर्गपर्यंत किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी दिवाळीचा उत्सव उजळला

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) : 

दिवाळीच्या सणात पारंपरिक मातीचे किल्ले बांधण्याची परंपरा आजही पडघा परिसरात जोमात दिसून येते. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवण्याच्या उद्देशाने पडघ्यातील तरुणाई आणि बालमंडळींनी यंदाही विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.
ब्राह्मण आळीतील मिहिर राऊत आणि निल राऊत यांनी ‘पन्हाळगड’ किल्ल्याची प्रतिकृती तयार केली असून, ध्रुवांग थोरे, दीप कांबळे, अर्पित पाठक, आयुष लोंढे, मित थोरे, जतीन लोंढे आणि संकेत राठोड यांनी ‘मुरुड-जंजिरा’ किल्ला उभारला आहे. सोनारआळीत रोहित कांबळे, गायत्री महाजन,चैतन्या महाजन, सही कांबळे,प्रिया कांबळे, तनिष्का जोशी लाभश्री जोशी, सार्थक हाडपे  शौर्य हाडपे , प्रियांश्री पातकर यांनी ‘मल्हारगड (सोनेरी किल्ला)’ साकारला. शास्त्रीनगरातील स्वराज दळवी  यश दळवी यांनी ‘सिंधुदुर्ग’ किल्ला उभारला, तर रोहिदास नगरातील वेदांत भोईरने ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची प्रतिकृती साकारली. याच भागातील श्लोक जाधव, मंथन जाधव  राज जाधव, कौस्तुभ जाधव, यज्ञेश जाधव, यश जाधव यांनी ‘राजगड’ किल्ला उभारला आहे. बालाजी नगरातील वेणुबाई मित्र मंडळाच्या वतीने अनुष्का दिनकर, गणेश मूडे, सोहम आणि सक्षम कदम, लाभेश कदम, पियुष आणि दिव्या जाधव, वेद पितांबरे, पराग तावडे, निधी दिनकर आणि संग्राम पाटील यांनी ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली. या किल्ल्यांच्या माध्यमातून तरुणाईने इतिहासाचा अभिमान जागवण्याबरोबरच देशभक्तीची भावना वृद्धिंगत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर मावळ्यांच्या मूर्तींसह सजवलेले हे किल्ले दिवाळीच्या सणाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक तेज देत आहेत.

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन !!

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन !!


** रुग्णांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन या कल्पनेचे उपस्थित मान्यवरांनी  केले कौतुक

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम म्हणून ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. या वेळी विशेषांकाचे प्रकाशन टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.

           परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टमध्ये बाहेरगावावरून आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचार काळात वास्तव्य करतात. त्यांच्या जीवनात थोडासा आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या टीमने हा उपक्रम राबविला. प्रकाशन सोहळ्यानंतर रुग्णांना दिवाळी विशेषांकाचे वाटप, तसेच लाडू वाटप करण्यात आले तसेच छोटीशी आर्थिक मदत देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
          या प्रसंगी माहीम विधानसभा निरीक्षक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) यशवंत विचले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. हेमंत सामंत, तसेच ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
          रुग्णांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन ही कल्पना उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवली. समाजातील दुर्बल घटकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र ‘धगधगती मुंबई’च्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शिवसेना(उ.बा.ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचातर्फे दीपावलीनिमित्त वसई लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आवश्यक साहित्य वाटप !!

शिवसेना(उ.बा.ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचातर्फे दीपावलीनिमित्त वसई लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आवश्यक साहित्य वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचातर्फे दीपावलीचे अवचित्त साधून वसई येथील (लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल) येथील गोरगरीब जनतेसाठी दिवाळीनिमित्त ओटाज कंपनीचे पाण्याचे मशीन, एच पी कंपनीचे टिव्ही, दिवाळी फराळ, महिलांसाठी नविन साडी खाऊ आणि आदी साहित्य वाटप करण्यात आले. प्रमुख उपस्थिती श्री दत्ता केळसकर,
श्री. सुरेश मिश्रा (विश्वस्त लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल), योगेश पाटील (सुपरवायझर), विकास परुळेकर (पॅरामेडिकल स्टॉप), मायेची सावली पदाधिकारी यशवंत विठ्ठल खोपकर, संस्थापक अध्यक्ष, दौलत बेल्हेकर हिशोब तपासणी, वसंत घडशी, राजेंद्र पेडणेकर, विश्वनाथ जाधव, संतोष चांदे, बंडू चौधरी, भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गोरगरीब लोकाचे गोड तोंड करून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवाराचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक व अन्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने शिवसेना (उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष -यशवंत खोपकर आणि अन्य पदाधिकारी, सदस्य, सभासद यांचे विभागात कौतुक होत असून त्यांना अनेकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, तर्फे दिवाळीच्या पहिला दिवा आदिवासी बांधवांसाठी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, तर्फे दिवाळीच्या पहिला दिवा आदिवासी बांधवांसाठी !!

दरवर्षीप्रमाणे मोठ्या आनंदाने उत्साहाने श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे ठाण्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील बोंडारपाडा, वागणंपाडा या गावातील जिल्हा परिषद शाळे मध्ये शिकणाऱ्या मुलांना दिवाळी निमित्ताने नवीन कपडे आणि फराळ यांचे वाटप करण्यात आले. तसेच ठाणे शहरातील कळवा ब्रीज खाली असणारे साठे नगर आणि क्रांतीनगर येथील विद्यार्थी जे पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळे मध्ये आपले शिक्षण घेत आहे. या मुलांना देखील दिवाळी फराळ आणि नवीन कपडे देण्यात आले.  

गेल्या शैक्षणिक वर्षात २०२४- २०२५ मध्ये फारसबाग या मध्ये जव्हार तालुक्यातून बोंडारपाडा मधील जिल्हा परिषद शाळेच्या पहिला नंबर आला. तर, यंदा २०२५- २०२६ या चालू वर्षात वागणंपाडा या गावाने हा मान पटकावला आहे २७० शाळे मधून या शाळेची निवड करण्यात आली आहे. या शाळेने, बागेत, सेंद्रिय खत, पेरू, गुलाब, भेंडी, मुळा, आळू, मेथी, पालक, अंबाडी, गवती चहा, असे अनेक प्रकारचे बियाणे लावून लागवड करण्यात आली आहे.

या मुलांना दिवाळी फटाके मुक्त साजरी करावी असे अहवान देखील करण्यात आले. फटाके नको पुस्तके हवे. अशी घोषणा देण्यात आले. 

या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे, सचिव अजय भोसले, खजिनदार मंगेश निकम, सदस्य भाग्यश्री गिरी, पद्मावती, शुभम कोळी, निशांत कोळी, विपुल विचारे, वैभवी दाभोळकर, अमोल पाटील, प्रभाकर पाटील, स्नेहल गुळिंग, रोहन कबुले, सोमनाथ खोमणे, इतर पदाधिकारी सदस्य आणि देणगीदार हे उपस्थित होते.

कृपया प्रसिद्धीसाठी.

आपला मित्र,
अजय भोसले,
सामाजिक कार्यकर्ता.
८१०८९४९१०२.

Monday, 20 October 2025

जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी मोठी संधी : रवींद्र माणगांवे, अध्यक्ष

जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी मोठी संधी : रवींद्र माणगांवे, अध्यक्ष

जळगाव जिल्ह्यात शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठी संधी  : संगिता पाटील, उपाध्यक्षा

जळगाव, प्रतिनिधी : 'जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे केळी निर्यातीसाठी मोठी संधी उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक इको सिस्टीम उभारणे काळाची गरज आहे. या दिशेने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरतर्फे मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर जळगाव जिल्हातर्फे नव निर्वाचित अध्यक्ष श्री. रविंद्र माणगांवे यांचा सत्कार व जळगाव जिल्ह्यातील उद्योग व व्यापार वृद्धीविषयक अपेक्षा, मार्गदर्शन, चर्चासत्र शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी हॉटेल रॉयल पॅलेस, जळगाव येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. माणगांवे म्हणाले की, ''जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान पाच व्यक्ती उद्योग सुरू करण्यासाठी निवड करावी. त्यापैकी एक व्यक्ती जरी यशस्वी उद्योग उभा करू शकली, तरी जिल्ह्यात हजारो नवे उद्योजक निर्माण होऊ शकतात. उद्योग स्थापनेसाठी इच्छुक तरुणांना चेंबरच्या माध्यमातून आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.'' ते पुढे म्हणाले की, ''देश महासत्ता व्हायचा असेल, तर लघुउद्योग आणि उद्योजकांना शासन व समाजाने पोषक वातावरण तयार करून द्यावे. उद्योग क्षेत्राचा पाया मजबूत झाला, तर आर्थिक विकासाचा वेगही वाढेल.''

महाराष्ट्राच्या सर्व उद्योजकांच्या अडचणी वर मात करण्यासाठी सर्व विभागांचा विचार करून एक ब्लु प्रिंट तयार करण्याची गरज आहे, जळगाव विभागाचा विचार केला असता फक्त तीन ते चार वर्षाच्या एवढ्या कमी कालावधीत मागच्या दहा वर्षाच्या कालावधी चे कामाची बरोबरी  उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी करून दाखविले आहे असे ठाम मत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी मांडले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे कार्य गेल्या तीन ते चार वर्षांपासून जळगाव शहरात सक्रियपणे सुरू झाले आहे. तालुकास्तरावर चेंबरची पोहोच वाढल्यामुळे सदस्यसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, आगामी काळात शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठ्या संधी उपलब्ध आहेत, जळगाव जिल्ह्यातील उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विकासाविषयी मार्गदर्शन करताना, जळगावमध्ये डाळ मिल ,चटई आणि विविध लघुउद्योग कार्यरत आहेत. वाहतुकीच्या सोयी आणि चांगल्या कनेक्टिव्हिटी असूनही औद्योगिक विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. नवीन उद्योजकांना MIDC मध्ये जागा उपलब्ध नाहीत त्या साठी नवीन एमआयडीसी मान. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MACCIA अंतर्गत जळगाव जिल्हा परिषद मध्ये नवीन जागे साठी घोषणा केल्यानुसार नवीन MIDC उभारणीसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने एक्सपोर्टसाठी मोठी क्षमता आहे व ''गोल्ड सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल. चेंबरतर्फे बिझनेस फोरम सुरू करण्याचे नियोजन असून, याचा विविध उद्योगांना निश्चितच फायदा होईल,'' असे प्रतिपादन चेंबरच्या उपाध्यक्षा संगिता पाटील यांनी केले. मासिआ विश्वस्त मंडळ चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्षा संगिता पाटील, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,  राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, गव्हर्ननिंग कौन्सिल मेंबर श्री. दिलीप गांधी आदी यावेळी व्यासपीठार उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जिंदा अध्यक्ष रवींद्र लढढा, लघुउद्योग भारतीचे सचिव सचिन चोरडिया, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष शाम अग्रवाल, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झंवर, चोपडा औद्योगिक वसाहतीचे संजय जैन, उद्योगपती, व्यापारी, कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी, तसेच चेंबरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गर्व्हनिंग कौन्सिल सदस्य श्री. अश्विनकुमार परदेशी, श्री.धनराज कासट यांनी सहकार्य केले, तर गर्व्हनिंग कौन्सिल सदस्य श्री. महेंद्र रायसोनी, श्री. अरविंद दहाड, श्री. विनोद बियाणी, श्री किरण बच्छाव, समन्वयक राहुल बैसाणे आदीनीं परिश्रम घेतले. श्री दिलीप गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीमती सरिता खचणे यांनी सूत्रसंचालन व श्री.अरविंद दहाड यांनी आभार मानले.


श्री राहुल बैसाणे - 8485086714  
समन्वयक, मसिआ, जळगाव.

आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता !!

आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता !!

** आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे गौरवोदगार

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : ``आजपर्यंतच्या आयुष्यात मी अनेक चढ-उतार पाहिले; परंतु वैरभावाने कुणाशी वागलो नाही. आमच्याकडे माणसे येत गेली आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन आणि संधी दिली. त्यामुळे अनेकांनी चांगली भरारी घेतली. त्यातीलच एक जयवंत पाटील आहेत. आमच्या कामाची पद्धत अशी आहे, की आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता आमच्यात आहे. म्हणूनच आम्ही सन्मानाने जगतोय आणि इतरांनाही सन्मान देतोय. जयवंत पाटील यांचा अमृतमहोत्सवी होणारा वाढदिवस कौतुकसोहळा हा त्याचाच एक भाग आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत जयवंत पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले. हा कार्यक्रम जेएनपीटी वसाहतीतील मैदानात सोमवारी (ता.१९) झाला.

ते पुढे म्हणाले, "जयवंत पाटील हे कुटुंबवत्सल आहेत. त्यांच्या नातवंडांनी, सुनांनी त्यांच्याविषयी बोलणे, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या सुना उच्चशिक्षित आणि सुजाण आहेत, तर मुलेही आपापल्या क्षेत्रांत भरारी घेतायत, हे आनंददायी चित्र असून जयवंत पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात कमावलेली माणसे दिवाळी सण असूनही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणे, हे अभिमानास्पद आहे. जयवंत पाटील यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आहे, म्हणूनच मी ब्राझीलवरून थेट त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमासाठी आलो आहे. त्यांनी एनएमजीकेएस संघटनेत उपाध्यक्षपदी सूत्रे घेतल्यानंतर रायगडमध्ये कामगारांसाठी उत्तम काम केले आहे, याची जाण मला आहे."

यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील म्हणाले, "ते अतिशय विनोद बुद्धीचे असून ते सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांशी मिळूनमिसळून वागतात, पण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत."
यावेळी उरण उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील म्हणाले, "जयवंत हा माझा मोठा भाऊच आहे, असे संबंध आणि मैत्री आहे. माझ्या राजकीय जीवनात माझा कायम पाठीराखा राहिला आहे."

जयवंत पाटील यांना त्यांच्या मुलांनी आलिशान गाडीतून व्यासपीठावर आणले, तेव्हा तो प्रसंग विलोभनीय होता. टाळ्यांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत झालेली एन्ट्री चार चांद लावणारी ठरली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा भव्य झेंडा घेऊन त्यांना सलामी दिली. यावेळी जयवंत पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक क्षेत्रांतील मंडळींनी जेएनपीटी वसाहतीतील मैदान खचाखच भरले होते.

बोकडवीरा काँग्रेस कमिटीचे नेते, न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंत गंगाराम पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात जेएनपीटी वसाहतीत साजरा करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड भूषण एल. बी. पाटील, शिक्षक नेते नरसू पाटील, वैभव पाटील, किरीट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून जयवंत पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला.

उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत !!

उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी संघ,आर्ट ऑफ लिविंग,मी उरणकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी पहाट हा कार्यक्रम मागील पंचवीस वर्षापासून आयोजित केला जातो. विकासापासून वंचित असलेल्या समाज घटक दिवाळी सारखा महत्त्वाचा सण आनंदाने साजरा करू शकत नाहीत त्यामुळे दिवाळीत त्यांच्या आनंदाचा भाग व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी पुनाडे आदिवासी कातकरी वाडी येथील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी तसेच आदिवासी बांधवांचे जीवन विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला असेच प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के. ए.शामा यांनी याप्रसंगी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी या उपक्रमाचा इतिहास सांगितला व विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती अंगीकारून मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन केले तसेच माजी विद्यार्थी व महाविद्यालयाने ही परंपरा टिकून ठेवावी असे सांगितले.  याप्रसंगी पुनाडे आदिवासी कातकरी वाडी वरील महिलांना एकूण बारा वारी साडी २२, सहावारी साडी ६०, पुरुषांना ८० टॉवेल्स, व एकूण ५० विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी तयार केल्या दिवाळी फराळ व गोड पदार्थ आदिवासी बांधवांना दिला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली त्यामध्ये प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, माजी प्राचार्य के.ए.शामा, टी एन घ्यार, विशाल पाटेकर, रोहित पवार, तेजस आठवले, प्रेरणा पाटील, डॉ. दत्ता हिंगमिरे, डॉ. अरुण चव्हाण, प्रा. व्हि एस इंदुलकर, प्रा.डॉ.पराग कारुलकर, डॉ. एम.जी.लोणे, डॉ. एच.के.जगताप, एस वाय बी कॉम विद्यार्थी, इतर शिक्षक अशी एकूण जवळपास ८५००० च्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वी केला गेला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, रोहित पवार, तेजस आठवले, मंगेश म्हात्रे, अनिल पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून कोरळवाडी, पुनाडे आदिवासी वाडीवरील बांधवांना दिवाळी निमित्त करण्यात आले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !!

राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून कोरळवाडी, पुनाडे आदिवासी वाडीवरील बांधवांना दिवाळी निमित्त करण्यात आले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !!
     
उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
   प्रत्येकाच्या जीवनात आनंद देणारा आनंदोत्सव म्हणजेच प्रकाशोत्सव अर्थातच दिवाळी. हा उत्सव आदिवासी बांधवांना आनंदात साजरी करता यावी यासाठी राजू मुंबईकर यांनी पनवेल येथील तारा ग्रामपंचायत हद्दीतील कर्नाळा किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कोरळवाडी आणि उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासीवाडी या आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना रवा, मैदा, साखर, गोडेतेल, बेसन, खोबरेल तेल अश्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू प्रेमाची भेट म्हणून देऊन त्यांना आपुलकी भरल्या मनाने दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. या क्षणी समाजसेवक राजू मुंबईकर, समाज सेवक अविनाश सिंग आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, प्राध्यापक स्नेहल पालकर, विलासभाऊ ठाकूर (काॅन सल्लागार), सुरेंद्रजी पाटील (काॅन वेश्वीशाखा उपाध्यक्ष), देवनदादा ठाकूर (काॅन पदाधिकारी), नितेश मुंबईकर, अनिल घरत (लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सोशल मि.रायगड जिल्हा अध्यक्ष), पिरकोन गावचे सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील, सारडे गावचे सामाजिक कार्यकर्ते नवनीत पाटील, मित्र परिवाराचे पदाधिकारी संपेश पाटील, रोशन,पाटील,क्रांती म्हात्रे, कु.मयंक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व  मंडळींच्या उपस्थितीत दिवाळी सणाच्या निमित्ताने राजू मुंबईकर यांनी या आदिवासीं बांधवां करिता दिलेली ही प्रेमाची आणि आपुलकीची भेंट मिळाल्यावर कोरळवाडी व पुनाडे आदिवासी वाडीवरील त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील ते आपुलकीचे निरागस आनंदी भाव पाहून खरचं दिवाळी सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला आणि दिवाळीच्या प्रकाशमय भावनिक रंगात न्हाऊन गेला.

Sunday, 19 October 2025

नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे !

नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे !

**सर्वच स्तरातून प्रियदर्शनी म्हात्रे यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : महाविकास आघाडी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली  ग्रामपंचायत नवघर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश राहाळकर, तालुकाप्रमुख संतोष शेठ ठाकूर, शेकापचे माजी उपसभापती महादेव बंडा, उपतालुका संघटक कृष्णा घरत, शिवसेना जिल्हा वक्ता मनीषा नितीन ठाकूर सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, नवघर चे माजी उपसरपंच  रवींद्र भोईर, सुरेश बंडा, ज्येष्ठ शिवसैनिक के डी भोईर, विजय भोईर, ज्ञानेश्वर तांडेल, मनोहर कडू, उपशाखाप्रमुख  विशाल डाके, शशिकांत तांडेल, युवासेना चेतन पाटील, रवीशेठ पाटील, सरपंच सविता मढवी, माजी उपसरपंच विश्वास तांडेल, माजी उपसरपंच दिनेश बंडा, माजी उपसरपंच संध्या पाटील, माजी सरपंच विद्यमान सदस्य आरती चौगुले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर पाटील, मंगेशशेठ चौगुले, कुंदनशेठ बंडा,  अतिशशेठ भोईर, नितीनशेठ मढवी, संतोषशेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुंदन कडू, कविता पाटील, नयना बंडा, शिवसेना शाखा नवघर चे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे, रणजीत म्हात्रे  संतोष घरत, रोहित भोईर, स्वप्निल घरत, सौरभ घरत आणि गावातील महिला शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे या गोर गरीब जनतेच्या मदतीला नेहमी धावून जातात. विविध अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत. विकासात्मक दृष्टीकोण त्यांच्याकडे आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे, जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांची निवड नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी झाली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...