Monday, 20 April 2020

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" च्या वतीने गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

*"अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" च्या वतीने गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप...*

महेंद्र (अण्णा) पंडित, पनवेल
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक-डाऊन मुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या वतीने कम्युनिटी किचन व शिवभोजन थाळी इत्यादींच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु उपासमारीच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक कोरोना आपत्कालीन परिस्थितीत कोणीही उपाशी पोटी राहू नये या शासनाच्या हाकेला साद देत संपुर्ण राज्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी सामाजिक संघटना अर्थात "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांचे आदेशाने व संघटनेचे राज्य-सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. यांच्या मार्गदर्शनाखाली अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील आदिवासी भागात व इतर गावांमधील विस्थापित कामगार, रिक्षाचालक, हातावर पोट असणारे मजुर व गरीब गरजु कुटुंबीयांची चुल पेटावी या सामाजिक जाणीवेतुन तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मसाले व कांदे-बटाटे इ. जिवनावश्यक वस्तुंचे पाकीट बनवून आतापर्यंत शेकडो कुटुंबीयांना त्याचे वाटप करण्यात आले आहे.
संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांनी राज्य सचिव अण्णा पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जयंतीदिनापासुन ते लॉक-डाऊनचा कालावधी पुर्ण होईपर्यंत गरीब विस्थापित मजुर व गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याचा संकल्प केला असुन या कामी "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" या संघटनेचे विशाल कांबळे, संदेश गायकवाड, परेश भोईर इत्यादींचे सहकार्य लाभत आहे. 
लॉक-डाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याने याचा विपरित परिणाम झोपडपट्टीत राहणाऱ्या व मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणा-या जनतेच्या मानसिकतेवर होत आहे. त्यांची चिंता कमी व्हावी व आपणही समाजाचे देणेकरी आहोत या जाणिवेतून "अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने" नासिक मध्ये निफाड, चांदवड, दिंडोरी व इतर अनेक तालुक्यांसह धुळे जळगाव जिल्ह्यांमध्येही समितीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशाने तेथील स्थानिक जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध दानशूरांच्या मदतीने विस्थापितांना व गरजवंतांना जिवनावश्यक वस्तुंची मदत करण्याचे काम अविरतपणे चालू आहे.

Friday, 17 April 2020

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले गरजूंना भाजीपाला वाटप

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले गरजूंना भाजीपाला वाटप
प्रतिनिधी, कल्याण.
कल्याण पश्चिम मिलिंद नगर येथील रहिवासी नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (कामगार नेते) यांनी त्यांच्या प्रभाग नंबर १६ मध्ये गोर गरीब कुटुंबांना केले भाजीपाला वाटप.
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे हात होऊ नये याकरिता काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती गोरगरिब कुटुंबांना सढळ हस्ते मदत करीत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची उपासमार होऊ नये याकरिता सामाजिक कार्य समजून समाजामध्ये दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात त्यांच्या त्यांच्या विभागात मदत केली जात आहे. असेच कल्याण शहरात मिलिंद नगर प्रभाग नंबर १६ मधील नागरिकांना कोणत्याही अडचणीत सतत मदतीला धावून येणारे दानशूर व्यक्तिमत्व नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी सुध्दा आपल्या स्वखर्चाने गोरगरिब तसेच गरजवंत कुटुंबांना रोजच्या आहारातील भाजीपाला जो लॉकडाऊन मुळे महाग व गायब झाला आहे त्याचे वाटप केले.
नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील हे आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून नेहमीच सामाजिक कामामध्ये अग्रेसर होऊन आपल्या प्रभागात काम करीत असतात. असेच राज्यावर आलेले कोरोनाचे संकट यामुळे भरडली गेलेली गोरगरीब नागरिक यांना ज्ञानेश्वर पाटील यांनी भाजीपाला वाटप केले. यांच्या सोबत यांचे सहकारी मा. नगरसेवक सुरेंद्र आढाव, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, आर्किटेक्ट गणेश नाईक, जेष्ठ समाजसेवक सुनील उतेकर, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, गणेश पाटील, रवी भोईर उपस्थित होते
नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत तसेच पुढे सुध्दा आमच्या प्रभागात गरजूंना मदत करणार.

Tuesday, 14 April 2020

ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांची १२९ वी जयंती माणगांव तालुक्यातील घराघरात साजरी बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )

ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांची १२९ वी जयंती माणगांव तालुक्यातील घराघरात साजरी
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव, बोधिसत्व, परम पूज्य, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमण प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाच्या लाॅकडाऊन संचारबंदी नियमांचे तंतोतंत पालन करून माणगांव तालुक्यातील प्रत्येक घराघरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य संसदेचे, भारतीय संविधानाचे वाचन करून आणि त्यांच्या राष्ट्रहितैषी विचारांचे पूजन करून ते आत्मसात करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून अत्यंत शांततामय वातावरणात बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील आणि बौद्ध संस्कार विधी ग्रहण करून साजरी करण्यात आली. 
      १४ एप्रिल अर्थात विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, प्रज्ञासूर्य , प्रकांडपंडित, सिम्बॉल ऑफ नाॅलेज ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस दरवर्षी आपल्या भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतू या वर्षी आपल्या भारतासह संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे महाभयंकर संकट कोसळले आहे. या महाभयंकर संसर्गजन्य विश्वव्यापी रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या रोगाची संक्रमण साखळी खंडीत करून संपूर्ण जगातून याचा नायनाट करण्यासाठी भारतासह संपूर्ण जगात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीची ही वैश्विक लढाई लवकरात लवकर जिंकण्यासाठी आणि कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश विदेशातील नागरिकांवर संचारबंदी लावण्यात आली आहे. या संबंधीच्या सर्व महत्वपूर्ण सूचना देशातील सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. या वर्षी १४ एप्रिल अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व देशवासीयांनी कोरोना व्हायरसमुळे आपापल्या घरांतच साजरी करुन कोरोना मुक्तीच्या या राष्ट्र हिताच्या लढ्यात शासनाला सहकार्य करा असे शासनाने सांगितले आहे. 
      कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवरील शासनाने नागरिकांना दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन देशासह, राज्यातील व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण माणगांव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा सर्व तालुका आणि विभागीय शाखा, सर्व सामाजिक व धार्मिक संघटना आणि तमाम आंबेडकर वादी बहुजन समाजाने या वर्षी मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती शासनाच्या लाॅकडाऊन संचारबंदीचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून आपापल्या घरात, आणि जवळच्या बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून, दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व बौद्ध पुजापाठ संस्कार विधी ग्रहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट मौल्यवान ग्रंथ संपदेचे आणि भारतीय संविधानाचे वाचन करून त्यांचे राष्ट्रहितैषी महान विचार आत्मसात करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून अत्यंत मंगलमय आणि शांततामय वातावरणात साजरी केली.

Monday, 13 April 2020

महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या कामगिरीचा नागरिकांना वाटतोय अभिमान

महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या कामगिरीचा नागरिकांना वाटतोय अभिमान
संपूर्ण जगासमोर कोरोनाचे संकट उभे राहिले असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात २२ मार्च पासून २१ दिवसांचा  लॉकडाऊन घोषित केला. याला राज्य सरकारने पाठिंबा देताना सर्व नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी घरातच रहाण्याचे व काही कारणांमुळे बाहेर जाण्याची गरज असल्यास सुरक्षित अंतर ठेवणे, चेहऱ्यावर मास्क वापरणे निश्चित केले, अशा वेळी आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासन या दोघांवर फार मोठी जबाबदारी आली. यातील पोलिस प्रशासनावर हा आजारामुळे इतर देशांत जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्या देशात निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांना जागरूक करणे व वेळप्रसंगी खंबीर पावले उचलून लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणे.
भारतातील सर्व पोलीसांनी ही जबाबदारी जशी समर्थ पणे हाताळली तशीच जबाबदारी हाताळताना कल्याण येथील महात्मा फुले पोलिस स्टेशन चे ‌वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण बनकर, क्राईम पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, तसेच पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, पोलिस सहायक आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहाड, वल्लिपीर नाका, शिवाजी चौक, सहजानंद चौक, वालधुनी या ठिकाणी नाकाबंदी केली, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना समजून सांगणे, तरीही न ऐकणाऱ्यांवर कारवाई करणे, विनाकारण गाड्या फिरवणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी  १०० च्या आसपास टु व्हिलर, ५/६, पोरं व्हिलर, १० च्या आसपास ऑटो यांच्या वर जप्तीची व १२५ विनाकारण फिरणारे आरोपी यांच्या वर कारवाई केली, तसेच स्वतः पोलिस स्टेशन व सामाजिक संस्था मार्फत गरजूंना अन्न धान्य वाटप केले, मुके प्राणी सुध्दा उपाशी रहाणार नाहीत अशी काळजी  स्वतः पोलिस स्टेशन व संस्था मार्फत घेत आहेत. ज्या दुकानात नियमांचे पालन जसे वेळेचे बंधन न पाळणे, तसेच गिऱ्हाईक यांना सुरक्षित अंतर ठेवणे यासाठी अधोरेखित न करणे यांवर सुध्दा कारवाई केली. 
महात्मा फुले पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना विरूद्ध ‌लढाईत नागरिकांना साथ दिली व देत आहेत यामुळे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी आम्हाला आमच्या पोलिस स्टेशनचा अभिमान वाटतो असे सांगितले.

Friday, 10 April 2020

बदलापूर मधील श्री कॉम्प्लेक्स सारख्या ४०० सदनिका धारकांकरिता भाजीपाला स्टॉलची अभिनव योजना

*बदलापूर मधील श्री कॉम्प्लेक्सछ्या  400 सदनिका धारकाकरिता  भाजीपाला स्टॉलची अभिनव योजना* 
बदलापूर :-अरूण ठोंबरे 

21 दिवसाचा लॉकडाऊन असूनसुध्दा काही ठिकाणी लोक गर्दी करतात आणि सरकारच्या वतीने वारंवार सांगून सुद्धा काही कारण काडून  घराबाहेर पडतात. याबाबत श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणारे जुने रहिवाशी अविनाश देशमुख यांनी आपली कल्पना सोसायटीत मांडली. त्यांच्या या कल्पनेला श्री कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी साथ दिली आणि सदनिका धारकाकरिता  भाजीपाल स्टॉलची व्यवस्था करण्यात आली.
कॉम्प्लेक्सच्याआतील बाजूस लोकांसाठी ही व्यवस्था करून देण्यात आली असल्याने बाहेर जाण्याचे प्रमाण काहीतरी कमी होईल. यावेळी बदलापूरचे नगराध्यक्ष  प्रियेश जाधव ह्यांनी आज या भाजीपाला स्टॉलला भेट देऊन  श्री कॉम्प्लेक्स मधील जनतेचे कौतुक केले , अश्या प्रकारच अनुकरण हे बदलापूर शहरातील सर्व मोठ्या गृहनिर्माण संकुल ह्यांनी करावे असे आवाहन अविनाश देशमुख व प्रियेश जाधव यांनी केले. असे केल्याने  बाहेर पडण्याची लोकांची संख्या कमी होईल आणि प्रशासन आणि पोलिसांवर ताण पडणार नाही.

एनयुजेने मिडिया जगतासाठी आर्थिक पॅकेजची मागणी

एनयूजेने मीडिया जगतासाठी आर्थिक पॅकेजची मागणी
एनयुजेमहाराष्ट्रची केंद्रासह राज्यसरकारला आर्थिक पँकेजसह ,विमा सुरक्षेची मागणी
           सिद्धांत गाडे
मुंबई  - नवी दिल्ली नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (इंडिया) यांनी म्हटले आहे की कोरोना साथीच्या साथीमुळे मीडिया जगताचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच जाहिराती नसलेल्या वृत्तपत्रांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने मोठ्या संख्येने बंद करावे लागत आहे. जिल्हा व ग्रामीण भागात काम करणा-या पत्रकारांना उपजीविका करण्यात खूप अडचणी येत आहेत. सर्व वर्तमानपत्रांनी कर्मचा .्यांना पगार देण्याचे सोडून दिले आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारी जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी दोन वर्षांसाठी मान्य केल्यास मोठ्या संख्येने वर्तमानपत्रे आणि वाहिन्या बंद केल्या जाऊ शकतात. यामुळे हजारो पत्रकार बेरोजगार होतील.
एनयूजेचे अध्यक्ष रास बिहारी आणि सरचिटणीस प्रसन्ना मोहंती म्हणाले की गेल्या काही वर्षांत टीव्ही चॅनेल्स आणि वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात टाळेबंदी झाली आहे. मोठ्या संख्येने वर्तमानपत्रे बंद झाली आहेत. छोटी आणि मध्यम वर्तमानपत्रे आर्थिक संकटामुळे बंद होत आहेत. मोठ्या वर्तमानपत्रांनी आर्थिक संकटाच्या बहाण्याने अनेक पत्रकारांना काढून टाकले आहे. संघटनेचे म्हणणे आहे की केंद्र व राज्य सरकारच्या वृत्तपत्रे आणि प्रादेशिक वाहिन्यांना पूर्वीच्या तुलनेत फारच कमी जाहिराती मिळत आहेत. सोनिया गांधींच्या अवास्तव मागणीनंतर मीडिया जगताला मोठा धक्का बसू शकेल.
श्री. रासबिहारी आणि श्री. मोहंती म्हणाले की कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची माहिती देण्यात माध्यमांनी मोठी भूमिका बजावली आहे. केंद्र व राज्य सरकारने पत्रकारांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. ते म्हणाले की दिल्लीसह सर्व राज्यांतील पत्रकारांसमोर आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दिल्ली जर्नालिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष राकेश थापलियाल आणि सरचिटणीस पीके मलिक यांनी सरकारने मध्यम व लहान वृत्तपत्रांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली. पत्रकारांसाठी शासकीय स्तरावर विमा योजना सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
एनयुजेमहाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेद्रकुमार आणि  अध्यक्ष शीतल करदेकर यांनीहीछोट्या व मध्यम वृत्तपत्रे,साप्ताहिके व इतर सर्व प्रसारमाध्यमे, जी या कठीण परिस्थितीत लढत आहेत, काम करत आहेत,अशांना आर्थिक पँकेज व पत्रकांरांना सुरक्षा विमा कवच धोरण केंद्राने जाहीर करावे  व राज्य सरकारनेही असेच धोरण निश्चित करण्याचे आवाहन केद्रासह महाराष्ट्र सरकारलाही केले आहे.

Sunday, 5 April 2020

काविळ, हिपोटायटस-B, H1N1, डेंग्यू साठी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस सारखा आजार निच्छितच बरा केला जाऊ शकतो- डॉक्टर जितेंद्र पाटील

*काविळ, हिपोटाईटीस- B, H1N1, ड्येंगु  साठी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस सारखा आजार निश्चितच ठिक केला जाऊ शकतो. --- डॉ जितेंद्र पाटील*

संपुर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे, जगात मेडिकल उपचारासाठी दोन नंबर वर असणारा इटली सारखा देश, जागतिक महासत्ता अमेरिका, प्रगत अशी राष्ट्र इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, असे देश, तसेच जगातील २०० च्या जवळपास देश त्रस्त असताना. अजूनही यावर यशस्वी उपचार पद्धती नसताना, कल्याण येथील एक डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले की संपूर्ण मानवजातीला, विज्ञानाला निसर्गाने दिलेले हे आव्हान याला अजूनही कोणाकडे उत्तर नाही, मी असा विचार केला प्रश्न‌ आहे तिथे उत्तर असणारच, आज संपूर्ण जगासमोर एकच प्रश्न आहे कोरोना व्हायरस त्यावर निश्चित व ठोस असा उपाय माझ्या कडे आहे, ते आणखीन पुढे म्हणाले की जग ज्याला व्हायरस म्हणत आहे तो मुळात व्हायरस नसून प्रोटीन मालेक्युल (अनुकण) आहे, जो जिवंत नसून तो कण त्याला चरबीचा थर आहे. जसे थंडीत तूप घट्ट होते तसेच हा प्रोटीन मालेक्युल चरबीयुक्त असल्याने घट्ट होतो. जेव्हा थंड वातावरणात हे अनुतत्व घशात प्रवेश केल्यानंतर ‌घट्टपणा निर्माण ‌करतात व घशात प्रवेश केल्यानंतर ज्याप्रमाणे अमीबा हा पेशींचा समुह असतो तसा हा अनुकण पेशींच्या संपर्कात ‌आल्यानंतर यांची वाढ होते व घशाचा मार्ग अवरुद्ध होऊन श्र्वास घ्यायला त्रास होतो, पुढे फुफ्फुसात गेल्यानंतर कफाचे प्रमाण वाढत जाते व दम्या सारखे लक्षण तयार होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
 
या सर्व लक्षणांवर अॅंटीव्हायरल किट या हर्बल आयुर्वेदिक औषधांचा ‌चांगला फरक पडतो, पहिल्या स्टेज पासून शेवटच्या स्टेज पर्यंत हे औषध दिले जाऊ शकते विशेष म्हणजे हे किट काविळ, हिपोटाईटीस- B, H1N1, ड्येंगु साठी सुध्दा उपयोगी आहे मी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस सारखा आजार निश्चितच ठिक केला जाऊ शकतो.

डॉ जितेंद्र पाटील यांनी आधी मेल व्दारे पंतप्रधान, स्वास्थ मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय यांना कळविले आहे, व अशी मागणी केली या औषधाविषयी मी भारत सरकार, राज्य सरकार, किंवा या साठी नेमणूक करण्यात आलेले तज्ञ डॉक्टर यांच्या सोबत चर्चेची तयारी आहे, या सर्वांना सामोरे जाताना कोरोना (कोविड-१९) वर यशस्वी उपचार करण्याची खात्री आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...