Tuesday, 5 May 2020

कल्याणमध्ये टायगर गृपने उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्य केले अन्नदान वाटप

कल्याणमध्ये टायगर गृपने उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्य केले अन्नदान वाटप
कल्याण :-प्रतिनीधी
जगभरात कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे. आता भारत  सरकारने लॉकडाऊन 17 मे पर्यन्त केला असल्याने अनेकजण रोजगार नसल्याने हताश झाले आहेत. यामध्ये मराठवाडा टायगर गृपचे अध्यक्ष पै.उमेशभाऊ पोखरकर यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून काहीतरी वेगळे करण्याचा घाट त्यांच्या चाहत्यांनी रचला आणि कल्याण शहराचे अध्यक्ष आकाश लोकरे व मित्र परिवार यांनी 1200 ते 1500 लोकांना मोफत जेवण दिले. तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला आणि एकदिवस पोटभर जेवण करता आल्याने टायगर गृपचे व मित्र परिवाराचे मनापासून आभार मानले.कारण टायगर ग्रुप मराठवाड्यचे अध्यक्ष पै.उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्य अन्नदान वाटप करण्यात आले होते.

Monday, 4 May 2020

अंबरनाथ येथील रिक्षाचालक कुटुंबियांना मदतीचा आणि कर्तव्याचा_हात देत आजपासून मोफत अन्नधान्य_वाटप.

अंबरनाथ येथील रिक्षाचालक कुटुंबियांना #मदतीचा आणि कर्तव्याचा_हात देत आजपासून मोफत अन्नधान्य_वाटप…
अंबरनाथ, प्रतिनिधी,
 गेल्या ४४ दिवसांहून अधिक काळ राज्यात अवलंबलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालवून आपल्या कु़टुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसाय बंद करावा लागल्यामुळे त्यांना देखील अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना कोणाही समोर हात पसरायला लागू नये यासाठी, शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आणि  खासदार श्रीकांत जी शिंदे त्यांच्या सोबतिने व श्री. प्रकाश पेणकर यांच्या पुढाकाराने रिक्षा चालक बांधवांना मदतीचा आणि कर्तव्याचा हात देत आजपासून  अंबरनाथ मधे रिक्षा चालक कुटुंबियांना मोफत धान्य वाटप   सुरु करण्यात आले आहे.याप्रसंगी
 रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री.रामदास पाटील. श्री. संजय फुलोरे, श्री दिलीप पाटील, श्री.नरेश कलाल,श्री. कुमार मुदलियार, आदी मान्यवर उपस्थित होते।
 

चौदाव्या वित्त आयोगाच्या विकास कृती आराखड्याला कोरोना पार्श्र्वभूमीवरील लॉकडाऊनची खीळ

चौदाव्या वित्तआयोगाच्या विकास कृती आराखड्याला कोरोना पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊनची खीळ ! 
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) संपूर्ण जगासह भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे. या महाभयंकर रोगाने भारतासह संपूर्ण जगातील हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. संपूर्ण भारतात सुद्धा या रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरू आहे. भारतातील  कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात लाॅकडाऊन च्या माध्यमातून संचारबंदी आदेश लागू केला असून नागरिकांना या संदर्भात जाणीव जागृती करून कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडण्याच्या आणि  खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कोरोना संक्रमण पार्श्वभूमी पूर्वी तयार केलेल्या चौदाव्या वित्त आयोग कृती आराखडा आणि त्या अनुषंगाने निर्धारित विकास कामांना कोरोना पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊनची खीळ बसली आहे. 
      कोरोना व्हायरसची संक्रमण साखळी खंडीत करून कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी शासनाने पोलीस, आरोग्य सेवा, महसूल इत्यादी विभागातील सर्व प्रकारची सरकारी निमसरकारी यंत्रणा त्या त्या ठिकाणी कामाला लावली आहे. 
      कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर देखील शासनाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निर्बंध आले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार त्या त्या ग्रामपंचायतीने कोरोना संक्रमण पार्श्वभूमी पुर्वी तयार केलेल्या पंचवार्षिक कृती विकास आराखड्यानुसार अंमलबजावणी विकास कामांना सद्या कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे सर्वार्थाने खीळ बसली आहे. असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरणार नाही.

Saturday, 2 May 2020

मुंबईतील प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्याला आग

मुंबईतील प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्याला आग
मुंबई - येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्याला आज संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भीषण आग लागली.
चिंचपोकळी येथील अनंत मालवणकर मार्गावरील बावला कंपाऊंड येथे हा कारखाना आहे.
प्रथम एका झाडाजवळ आग लागली. त्यानंतर ती विजय खातू यांच्या कारखाना परिसरात पसरली. 
यावेळी प्रसंगावधान दाखवत जे लोक होते त्यांनी बाहेर धाव घेतली. 
या आगीत विजय खातू यांच्या कारखान्याचे नुकसान झाले आहे. तसंच रेश्मा खातू यांच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. 
अनंत निवास या इमारतीच्या रहिवाशांना प्रचंड धुराचाही सामना करावा लागला.
अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेतली आणि ही आग नियंत्रणात आणली. 
कुलिंग प्रक्रियाही तातडीने सुरु करण्यात आली आहे.

लाॅकडाऊनमुळे सर्वत्र सुकटीचा तुटवडा - कोळी समाज आर्थिक संकटात, तर सुकटप्रिय मंडळींना आगोटची चिंता

लाॅकडाऊनमुळे सर्वत्र सुकटीचा तुटवडा - कोळी समाज आर्थिक संकटात, तर सुकटप्रिय मंडळींना आगोटची चिंता 
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सुकट अर्थात सुकी मच्छी म्हणजे कोकणातील जनतेच्या दैनंदिन आहारातील एक अविभाज्य घटक, या मध्ये प्रामुख्याने बारीक सुकट, अंबाडी, मासे सुकट, बोंबील, वाकटी , म्हाकळी,बगी, खारे मासे इत्यादींचा खाद्य संस्कृती मधील खजाना म्हणजे सुकट.  लाॅकडाऊनमुळे या सुकटीचा सद्या बाजारात सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणातील तमाम सुकटप्रिय खाद्य रसिकांची खाण्याची मोठी गोची निर्माण झाली आहे. तर सुकटीचा व्यवसाय करणारा कोळी समाज आर्थिक संकटात.  कोकणातील तमाम सुकटप्रिय मंडळी पावसाळ्यातील चार महिन्यां साठी म्हणजे आगोटीला या सुकटीचा ग्रामीण भागातील सर्व लोक आपापल्या घरात साठा करून ठेवतात. मात्र कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे सद्या सर्व ठिकाणच्या बाजारात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणातील सर्व सुकटप्रिय खवय्यांना आगोटीसाठी सुकटीचा साठा करता येणार नाही त्यामुळे तमाम सुकटप्रिय मंडळी सद्या चिंतेत आहे. तर दुसरीकडे सुकटीचा व्यवसाय करणारा कोळी समाज आर्थिक संकटात सापडला आहे. 
      मुंबईसह कोकणातील ग्रामीण भागात सुकटीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो. या व्यवसायातून दररोज लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मुंबई मध्ये भाईंदर, मरोळ , शिवडी आदी ठिकाणी सुकटीचा किरकोळ आणि घाऊक स्वरूपातील मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असतो. तर कोकणातील अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन येथील दिघी, भरडखोल, जिवना बंदर, महाड, रत्नागिरी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुकटीचा व्यवसाय चालतो. या ठिकाणाहून देश विदेशात सर्वत्र सुकटीचा अर्थात सुक्या मच्छीचा पुरवठा होत असतो. 
       या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सर्वत्र सरकारने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे वरील सर्व ठिकाणचा सुकटीचा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला आहे. त्यामुळे तमाम सुकटप्रिय मंडळींची मोठी गोची निर्माण झाली आहे. त्यांना बाजारात मुबलक प्रमाणात कुठेही सुकट मिळत नसल्यामुळे आगोटीसाठी अर्थात पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी आपापल्या घरात दरवर्षी प्रमाणे सुकटीचा साठा करून ठेवता येणार नाही. यामुळे तमाम सुकटप्रिय खवय्ये चिंतेत आहेत. तर दुसरीकडे या सुकटीचा व्यवसाय करणारा कोळी समाज लाॅकडाऊन मुळे सुकटीचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

उल्हासनगर पोलिसांतर्फे पत्रकार, पोलिस, होमगार्ड, आर.पी.एफ साठी आरोग्य चाचणी अभियान - महाराष्ट्रात प्रथमच अशा शिबिराचे आयोजन

विठ्ठलवाडी पोलीसांतर्फे पत्रकार, पोलीस, होमगार्ड व  आर. पी. एफ. साठी प्राथमिक आरोग्य चाचणी अभियान
महाराष्ट्रात प्रथमच अशा शिबिराचे आयोजन
सिद्धांत गाडे उल्हासनगर - 
कोरोना महामारीच्या संकटात, २४ तास जनहितार्थ कर्तव्यास तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासन, पत्रकार, होमगार्ड व सी आर पी एफ च्या शिलेदारां साठी आयोजित प्राथमिक आरोग्य चाचणीस चांगला प्रतिसाद मिळाला व त्यामुळे आपण सुरक्षित तर परिवार सुरक्षित, ही व्याख्या त्यानिमित्ताने अधोरेखित झाली.
     कोव्हिड - १९ च्या प्रादुर्भावाने पोलीस व पत्रकार अनेक ठिकाणी विळख्यात सापडल्याचे आढळून आल्याने, त्याच बचावात्मक धोरणास अनुसरून, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. डी. डी. टेळे. यांच्या मार्गदर्शनास्पर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भामे व त्यांच्या कर्मचार्यांनी आयोजिलेल्या प्राथमिक आरोग्य शिबीराचा अनेकांनी लाभ घेतला. एकूणच १५५ जणांनी भाग घेतलेल्या ह्या शिबिरात पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस, एस. आर. पी. , होमगार्ड आणि पत्रकारांचा समावेश होता.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक दिलीप मालवण कर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. डी. डी. टेळे यांनी तपासणी करून करण्यात आले.
 शिबिरात शरीराचे तापमान, रक्तदाब, मधुमेह च्या चाचण्या घेवून, कॅल्शियम वर्धक गोळ्या देण्यात आल्या. ह्या सगळ्या चाचण्या हिंदुजा रुग्णालयातून पाचारण करण्यात आलेल्या डॉ चंदर रोहरा आणि टीम  यांनी केल्या व त्यांना स्थानिय डॉक्टर्स डॉ प्रशांत पवार, डॉ तुलसी यांनी देखील मदत केली.
    पत्रकार मुरलीधर शिर्के यांनी सोशल मीडिया वर पत्रकारांच्या आरोग्य विषयक सर्वच स्तरातून होणारे दुर्लक्षा विषयी व्यक्त केलेली खंत आणि त्याच अनुषंगाने वरिष्ठ पत्रकार काका भोसले यांनी केलेल्या सूचने नुसार, ह्या गंभीर बाबीस ओळखून, तत्काळ ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले व असे शिबिर हे महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आल्याचे, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे ह्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.
 सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यंत आयोजिलेल्या शिबिरात, शहरातील २५० हून अधिक पत्रकार, जे विविध कार्यक्रमात व पत्रकार कक्षात तासंतास गर्दी करतात, त्यातील फक्त ४५ जणांनीच ह्या आरोग्य शिबीरात हजेरी लावल्याने, सामाजिक भान व आरोग्य विषयक सदर मंडळींची असलेली जागृतता, ह्या विषयी पोलीस खात्या सह शहरातील नागरिकां मध्ये चर्चा सध्या जोरात आहे.

Friday, 1 May 2020

माणगांव पोलीसांनी तालुक्यातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला मानवतेचा संदेश

माणगांव पोलीसांनी तालुक्यातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला मानवतेचा संदेश
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणू प्रतिबंधक लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद आणि कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले तसेच त्यांचे सर्व पोलीस सहकारी यांच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावातील गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्य किराणा वस्तूंच्या कीटचे  वाटप करण्यात आले. 
     शुक्रवार दिनांक ०१/०५/२०२० रोजी अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिनी  माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद व कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले आणि त्यांचे पोलीस सहकारी यांच्या माध्यमातून माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवी, मुठवली, उमरोली, कशेने, पेन तर्फे तळे, भादाव, विहुले कोंड, रानवडे, नळेफोडवाडी, कडापे, मांजुर्णे आणि ताम्हाणे इत्यादी गावातील संजय गांधी निराधार योजनेतील गरजू कुटुंबीयातील वयोवृद्ध महिला व पुरुषाना आम्ही प्रत्येकी ४ किलो तांदुळ, १ किलो कांदे व १ किलो बटाटे असे १०० अन्नधान्य पॅकेटचे  वाटप केले. त्यामुळे पुन्हा एकदा माणगांव तालुक्यातील सर्व नागरिकांना पोलीसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्या प्रमाणे खाकी वर्गातील माणुसकीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या मनात माणगांव पोलीसांच्या विषयी एक आदरयुक्त भावना निर्माण होऊन पोलीसांच्या मानवतावादी परोपकारी सद्भावनेचा प्रत्ययकारी साक्षात्कार झाला. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व जनतेतून पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...