Saturday, 3 April 2021

श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम !! 'चिपळूण तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.२ शाळेला दिले कपाट भेट'

श्री पाणबुडी देवी कलामंच सह शाहिर दिपक भुवड तर्फे अनोखा शैक्षणिक उपक्रम !!

'चिपळूण तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.२ शाळेला दिले कपाट भेट'


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक कारकर) :

                देशाचं उद्याचं भवितव्य म्हणजे विद्यार्थी होय. प्रत्येकालाच आठवणीत राहणारी, जेथ आपली खऱ्या अर्थाने शैक्षणिक जडणघडण झाली अर्थातच "ही आवडते मज मनापासूनी शाळा, लावीते लळा ही जसा माऊली बाळा" अशी ती प्राथमिक शाळा अनेकांनाच न विसर पडणारी आहे. 


या शाळेतून शालेय शिक्षणाचे धडे गिरवत आज विविध क्षेत्रात चमकणारी अनेक मंडळी ही कोकणच्या लाल मातीतील आणि खेडेगावातून शिक्षण घेऊन मोठी झालेली असते. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोसरे नं.२ या शाळेचे माजी विद्यार्थी व पोसरे गावचे सुपूत्र असणारे शाहिर दिपक भुवड यांच्या संकल्पनेतून व श्री पाणबुडी देवी कलामंचाच्या विशेष सहकार्याने नुकताच या शाळेच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळावी म्हणून शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन कोव्हिड - १९ च्या पार्श्वभूमीवर देखील शाळेला भेट वस्तू


म्हणून "कपाट" देत हा उपक्रम गुरुवार दि.०१ एप्रिल २०२१ रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुप्रिया सावर्डेकर मॅडम, सह शिक्षिका वर्षा देसाई मॅडम, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अविनाश आदवडे, शालेय शिक्षक मंगेश पाडेकर सर, सदस्य - निलेश आंबेडे, श्रध्दा चांदीवडे, नंदा आदवडे, श्री पाणबुडी कलामंचाचे सदस्य शाहिर दिपक भुवड, तसेच सौ. चित्रा दिपक भुवड, पोसरे ग्रामस्थ मंडळ व विद्यार्थी पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ही भेटवस्तू सुपूर्त करण्यात आली. मुंबई रंगभूमीवर अल्पवधीत कोकणातील नमन/जाखडी नृत्य/नाटक या लोककलेचं आयोजन करणारे, शिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री संतोष घाणेकर यांचे श्री पाणबुडी देवी कलामंच व कोकण सुपूत्र शाहिर दिपक भुवड यांच्या प्रयत्नांतुन राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या २१ गावांमधील पाणी समस्या होणार पूर्णपणे दूर !!

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या २१ गावांमधील पाणी समस्या होणार पूर्णपणे दूर !!


         बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : पाच वर्षांपूर्वी राज्याच्या विविध भागांत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येसंदर्भात कामे करण्यात आली. त्या  कामाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड परिसरातील आगामी दोन महिन्यांत दोन गावांत योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. आगामी दीड ते दोन वर्षांत एकवीस गावांमधील पाणी समस्या पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास नाम फाऊंडेशनचे सर्वेसर्वा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्य़क्त केला. ते पाचाड येथे आयोजित जलसंवर्धन परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी किल्ले सिंहगडाच्या तुलनेत किंवा किल्ले रायगड परिसरातील गावांमध्ये असलेली स्वच्छता कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
         देशाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावर परिसरातील एकवीस गावांच्या नैसर्गिक जलस्रोतांची तपासणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरकार रायगड प्राधिकरण व नामच्या मदतीने रायगडाला अधिकाधिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. 
       स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी किल्ले रायगड परिसरातील विविध समस्यांची पूर्तता नामच्या मदतीने अधिक वेगात होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर माजी आमदार माणिकराव जगताप यांनी याप्रसंगी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची कामे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शक्य झाल्याचे रोखठोक स्पष्टोक्ती याप्रसंगी केली. एकूणच गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेल्या नाम फाऊंडेशनच्या मदतीच्या किल्ले रायगड परिसरातील जलसंवर्धन परिषद पूर्णपणे यशस्वी झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले. या परिषदेला किल्ले रायगड परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, सभापती सौ. सपना मालुसरे, जि प सदस्य संजय कचरे, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी सौ. प्रतिभा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, डीवायएसपी नीलेश तांबे, शहर पोलिस निरीक्षक शैलेश सणस आणि सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी तसेच रायगड प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सातपुते, बुरले उपस्थित होते.
         मागील आठ दिवसांपासून नाम फाऊंडेशनच्या मदतीने रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेला प्रस्तावाचे ग्रामस्थांमध्ये अत्यंत कौतुक आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून किल्ले रायगड परिसरात गेल्या दोन दशकांपासून असलेली पाणीटंचाई कशा पध्दतीने दूर होऊ शकते, याकडे या परिषदेमधील निर्णयाबाबत सर्वांनीच लक्ष वेधले होते  .
          नाना पाटेकर यांनी आगामी दोन महिन्यात २१ गावांपैकी दोन गावांतून या योजनांची सुरुवात केली. आगामी दीड ते दोन वर्षांमध्ये सर्व २१ गावांतील पाणी समस्या पूर्णपणे दूर करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांची राजधानी असणारा हा परिसर पाणीयुक्त असणार असा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी नैसर्गिक स्त्रोत यांची तपासणी तातडीने करण्यात येईल. येथील समस्या मार्गी लावण्याकरिता तज्ज्ञ मंडळींची सहकार्य घेऊ असेही त्यांनी सांगितले. किल्ले रायगड परिसरातील पाणी समस्या करता अशा प्रकारचा समारंभ आयोजित करावा, ही खेदजनक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
        छत्रपती संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या या जलसंवर्धन परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, छत्रपती हे वंशपरंपरेने राजे असले तरीही आपण सगळेच स्वयंघोषित राजे असल्याचे ते म्हणाले. या विकासकामांसाठी आपणास कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कार आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
        नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे म्हणाले, आम्ही  नाम फाउंडेशनचे प्रतिनिधींपेक्षा एक शिवभक्त म्हणून या परिसरात आलो. राजांनी तीनशे वर्षांपूर्वी निर्माण केलेले कार्य काळाच्या ओघात बाजूला गेले असल्याने ते शोधून काढून या परिसरातील जनतेला पुन्हा एकदा पाणी समस्येतून बाहेर काढू. राज्यातील विविध भागांत काम करत असताना कोकणातील मालवण, रत्नागिरी येथून आपण कामे सुरू केली. पोलादपूर तालुक्यातील आडवळे येथे एक तलाव नामच्या मदतीने सुरू झाला. महाडमधील काही आदिवासी वाडय़ांवर  नामच्या माध्यमातून विविध योजना सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली. या पाण्याच्या योजनांबरोबर प्रत्येक शिवभक्तांनी एक झाड लावणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  त्याची निगा संबंधित शिवभक्तांनी घ्यावी, असेही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. 
         छत्रपती शिवरायांच्या काळातील अनेक समरप्रसंग विविध किल्ल्यांवर दाखविले. स्थानिक शूरवीरांना याबाबतची संधी प्राप्त होऊन आगामी पिढीतील शालेय बालकांनादेखील आपला इतिहास पुन्हा कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातील गडकिल्ले हे शौर्याचे प्रतीक असून त्यांचे रक्षण करणे आपली कर्तव्यपूर्ती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एकवीस गावातून नाममधून होणारे काम हे दीर्घकालीन सुरु होणार असल्याने आगामी काळात पायलट प्रोजेक्ट म्हणून काही योजना आपण सुरू करणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले.
         रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. रायगड परिसरातील एकवीस गावांना हेरिटेज व्हिलेज म्हणून निर्माण करण्याचा मनोदय आहे, असे त्यांनी जाहीर केले. या मार्गावर होणारे महामार्गदेखील अशाच ऐतिहासिक पध्दतीने निर्माण व्हावेत, यासाठी स्थानिक प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना व्हावी. त्यांच्याकडे याबाबतचे सर्वाधिकार द्यावेत, अशी विनंती रायगडच्या पालकमंत्री नामदार अदिती तटकरे यांना केली.
       छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी किल्ले रायगड व परिसरात निर्माण केलेले नैसर्गिक स्त्रोतचा वापर आगामी काळात शोधून काढले जातील. शास्त्रोक्त पध्दतीने या गावांतील लोकांना सुविधा देण्याकरिता आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करून सरकार रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
       खासदार सुनील तटकरे म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाम फाउंडेशन करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. देशाचा मानबिंदू असणाऱ्या किल्ले रायगड परिसरातील २१ गावातील एकवीस गावांचा पाणीप्रश्न करता एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गावांतील नैसर्गिक पाण्याचे स्रोत शोधून काढणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
        आगामी काळात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरून हजारो लोक किल्ले रायगडच्या परिसरात येणार असल्याने येथील विविध असणाऱ्या समस्यांची पूर्तता विहित काळामध्ये करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे अर्थमंत्री म्हणून पाचाड परिसरात शिवसृष्टी योजना मंजूर केली होती, याची आठवण करून दिली. किल्ले रायगडासाठी नियोजित नियोजन प्राधिकरणातून विविध कामे व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
       आदिती तटकरे यांनी किल्ले रायगडाच्या पुनर्वैभवाची स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न एकत्रितपणे झाल्यास हे काम सोपे होईल  असे स्पष्ट करतानाच याबाबत सरकारने पहिल्या कॅबिनेट बैठकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड प्राधिकरणाकरीता सुमारे २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता याची आठवण करून दिली. रायगडच्या उत्तर म्हणून अभिमानास्पद असलेली घटना तसेच रबाडाचे संवर्धनासह एकवीस गावांच्या विकासासाठी स्थानिकांचे सहकारी अत्यंत महत्त्वाचे आहे. या परिषदेला परिसरातील विविध सरपंच, लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. 
       किल्ले रायगड ही आपली अस्तित्वाची बाब आहे. शिवभक्तांमध्ये आगामी काळात होणारी वाढ लक्षात घेता पाचाड परिसरात एमटीडीसीच्या असलेल्या जागेमध्ये ऐतिहासिक पध्दतीने निर्मिती करण्यासाठी रायगड प्राधिकरणाने आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाचाड परिसरामध्ये येत्या सहा महिन्यांत हेलिपॅड निर्माण करण्यात येईल, असे त्यांनी घोषित केले. आगामी काळात किल्ले रायगडाला अधिकाधिक वैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न सर्वांच्या मदतीने करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
         महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी किल्ले रायगड परिसरातील विकासात्मक गावाकरिता सरकार रायगड प्राधिकरण काम करीत आहे. आता नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या मदतीमुळे या भागातील असणाऱ्या समस्या वेगाने पूर्णत्वास जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याकामी अपेक्षित असणारी सर्व मदत देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
       माजी आमदार माणिकराव जगताप यांनी कोल्हापूरहून येऊन छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून येथे सुरू केलेले काम हे कौतुकास्पद आहे. रायगड प्राधिकरणाची स्थापना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाली आणि त्यांनीच तीनशे कोटी रुपयांचा निधी यासाठ दिला होता, याचे स्मरण दिले. 
        आपण रायगड किल्ल्याच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त असून सांदोशी या गावचे रहिवासी असल्याचे सांगून या परिसरात सन २००५ साली काळकुंभे जलविद्युत प्रकल्प गेल्या सोळा वर्षांपासून बंद पडला आहे, असा खेद त्यांनी व्यक्त केला. पाणी हे जीवन असून सरकार पलीकडे काम करणारी माणसे म्हणून नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य अधिकच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आम्ही राजकीय मंडळी स्वार्थी असून आम्हाला पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जावयाचे असते. जनतेच्या या प्रश्नांकरिता नाम फाऊंडेशनच्या मदतीने केवळ २१ गावातीलच नव्हे तर अशाच पध्दतीने महाड तालुक्याचा पाणीप्रश्न संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल. नाम फाऊंडेशननेदेखील जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
       केवळ आठ दिवसांच्या सूचनेवरून रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी या जलसंवर्धन परिषदेचे आयोजन पाचाड येथील धर्मशाळा परिसरामध्ये केले होते. या कार्यक्रमाला सरकारच्या विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच २१ गावातील सरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी राजिप पंचायत समिती सदस्य सभापती उपस्थित होते. यामुळे रायगड प्राधिकरणाला अपेक्षित असलेली जलसंवर्धन परिषद यशस्वी झाल्याचा विश्वास उपस्थित असलेल्या विविध सरपंच तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त  केला.

Friday, 2 April 2021

ठाणे जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची सभापतीची मागणी !

ठाणे जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची सभापतीची मागणी !


कल्याण, (संजय कांबळे) : अंबरनाथ तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार 'लेटरबांम्ब' व्दारे उघडकीस आणलेल्या निलंबित विस्तार अधिका-यांनी केलेल्या आरोपांमुळे बालविकास विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागाचे जिल्हा सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी केली आहे.


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पंचायत समितीच्या बालविकास विभागातील भ्रष्टाचार याच कार्यालयात काम करणाऱ्या एका विस्तार अधिका-यांनी जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवला होता. प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, गटविकास अधिकारी, यांना कसे 'पाॅकिट' दिले जाते, न दिल्यास कारवाईचा दम कसा दिला जातो? विविध अनुदानित शासकीय योजनांमधून कसा भ्रष्टाचार सुरू आहे. मदतनीस सेविका यांच्या कडून पैसे कसे घेतले जाते, यातून नियुक्ती कशी नियमबाह्य केली जाते? हा सर्व प्रकार या पत्रात व आॅडियो मध्ये असून याची चौकशी न करता मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे व महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले यांनी या विस्तार अधिका-यांलाच निलंबित करुन भ्रष्टाचार करणा-यांना अभय दिले.
काही महिन्यांपूर्वी कल्याण विभागातील मुख्य सेविकेला 'पोषण आहार' घोटाळा प्रकरणी याच डेप्युटी संतोष भोसले यांनी रंगेहाथ पकडून तिच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व स्वतः ची पाठ थोपटून घेतली. परंतु येथे मात्र वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याहूनही विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून हे उजेडात आले. पण असा किती भ्रष्टाचार होत असेल की त्या विरोधात कोणीही 'भ्र' काढीत नाही. तर हे अधिकारी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना काही कळूनच देत नाहीत. असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या अंबरनाथ तालुक्यातील बालविकास अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि याबाबतीत प्रसिद्ध झालेल्या बातम्या यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचा बालविकास विभागाची 'बेअब्रू' झाली आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल विचार करून दोषींवर कारवाई कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बालविकास सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी मुख कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या कडे केली आहे. त्याच प्रमाणे या विभागातील वाढता भ्रष्टाचार पाहता गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या खर्च व इतर बाबींची माहिती घेत असल्याचे सभापती तारमळे मॅडम यांनी सांगितले आहे. तर याबाबत झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आणि इतर जिल्हा परिषद सदस्य काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Thursday, 1 April 2021

चरई खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली !!

चरई खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली !!


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : तळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला चरई बुद्रुक या गावातील ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला. आणि खऱ्या अर्थानी धुळवड साजरी केली. अनेक वर्ष या गावावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती पण विकास काही होत नाही. खोटी आश्वासने देऊन काम अर्धवट सोडून देणे. कामाच्या नावाखाली बिलं पास करुन घ्यायची मात्र काम झालेलीच नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थ आणि मुंबई करांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
       या शिवसेना प्रवेशासाठी श्री मनोहर महादेव काप, श्री सुचित सहदेव पतारे, श्री बाळाराम तुकाराम काप, श्री.किरण गणपत ढऊळ यांनी अथक परिश्रम घेतले. त्या प्रसंगी उपस्थित दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. अनिल नवगणे साहेब, दक्षिण रायगड जिल्हा महिला संघटक व कांजूरमार्ग मुंबई नगरसेविका मा.सौ.सुवर्णाताई करंजे, तळा तालुक्याचे डॅशिंग तालुका प्रमुख मा.श्री. प्रद्युम्न ठसाल साहेब, तळा तालुका सहसंपर्कप्रमुख मा. श्री. अशोक करंजे साहेब, शहर प्रमुख वडके साहेब, मा. श्री. सारगे साहेब, मा. श्री.अशोक राणे साहेब, भगवान शिंदे साहेब, श्री.मनोहर काप व चरई बुद्रुक मधील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

आ.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते चेतनसिंह पवार यांच्या “तालुकाध्यक्ष सरकारी कार्यालयात“ उपक्रमाची सुरूवात...

आ.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते चेतनसिंह पवार यांच्या “तालुकाध्यक्ष सरकारी कार्यालयात“ उपक्रमाची सुरूवात...


मुरबाड, (मंगल डोंगरे) : गुरूवार दि.१ एप्रिल २०२१ रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते मुरबाड तालुक्यांचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या “तालुकाध्यक्ष सरकारी कार्यालयात“ उपक्रमाची सुरुवात मुंबई येथील निवासस्थानी करण्यात आली.


यावेळी जिल्हाउपाध्यक्ष संजय शेलार, नेताजी लाटे, बालाजी नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदरच्या उपक्रमामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी तालुक्यांतील तहसील कार्यालय स.११:०० ते ११:४५ वा पर्यंत, वीजवितरण स.११:४५ ते दु.१२:०० पर्यंत, पंचायत समिती दु.१२:०० ते दु.१२:३० पर्यंत, पोलीस स्टेशन दु.१२:३० ते दु.१२:४५ पर्यंत, सरकारी दवाखाना दु.१२:४५ ते दु.१:०० पर्यंत व तालुका कृषी कार्यालय दु.१:०० ते दु.१: ३० पर्यंतची वेळ ठेवण्यात आली आहे. तालुक्यांतील सामान्य नागरिकांना शासकीय कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी परंपरेतून चालत आलेल्या पध्दती बदलुन लोकाभिमुख राजकारणाची सुरवात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वामध्ये सोमवार दि. ५ एप्रिल २०२१ पासुन करत असल्याचे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले. जनमाणसांमध्ये सहजगतीने उपलब्ध राहुन नागरिकांची शासकीय कामे सोडविण्याच्या ह्या नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल चेतनसिंह पवार यांचे कौतुक आ.नाना पटोले यांनी केले.

संतोष अबगुल प्रतिष्ठानतर्फे दापोली मंडणगड खेड व रत्नागिरी जिल्हा विभाग- नालासोपारा - विरार व वसई येथे रविवारी ४ एप्रिल २०२१ ला पुन्हा महा रक्तदान शिबिराचे आयोजन !!

संतोष अबगुल प्रतिष्ठानतर्फे दापोली मंडणगड खेड व रत्नागिरी जिल्हा विभाग- नालासोपारा - विरार व वसई येथे रविवारी ४ एप्रिल २०२१ ला पुन्हा महा रक्तदान शिबिराचे आयोजन !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक मांडवकर) :

        संपूर्ण जगभर गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू महामारी रोगाने थैमान घातलेला आहे. या महामारी च्या काळात अनेक सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन हे विस्कळीत झाले असतानाच संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा  निदर्शनास आले की, अनेक रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. यावर उपाय म्हणून, या देशाचे, राज्याचे सुज्ञ नागरिक या नात्याने थोडासा का होईना हातभार लावावा या हेतूने प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या साथीने दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपरा नगरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदरचे रक्तदान शिबिर हे अपेक्षेप्रमाणे जास्त प्रमाणात यशस्वी ठरले व आमच्यासाठी दैवत असलेल्या  ४१० रक्तदात्यांनी याठिकाणी येऊन रक्तदान केले."समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे" या ब्रीद वाक्य प्रमाणे आम्ही गेले दीड वर्षभर कार्यरत आहोत. असे असताना रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर, ठाणे, नवी मुंबई व मुंबई या ठिकाणी राहणाऱ्या तसेच गावावरून उपचारासाठी मुंबईत आलेल्या रुग्णाला एक रक्ताची बॉटल ही मोफत दिली जात आहे.
नोव्हेंबर २०२० पासून महिन्याला सरासरी  २० रक्त बॉटल या उपलब्ध करून देण्यासाठी या प्रतिष्ठान हे "महात्मा गांधी सेवा मंदिर हॉस्पिटल ब्लड बँक" व "नवी मुंबई ब्लड बँक" यांच्या साथीने यशस्वी ठरले आहे. 

परंतु प्रतिष्ठानची जबाबदारी वाढल्याने व रुग्णांचा विश्वास वाढत चालल्याने प्रतिष्ठानवरच्या विश्वासाला तडा जाऊ नये व रुग्णांची सेवा सदैव घडत राहो यासाठी पुन्हा एकदा प्रतिष्ठान च्या वतीने नालासोपारा नगरीत रक्तदान शिबीर घेण्याचे आयोजन केले आहे. विशेषतः वर्षाचे ३६५ दिवस व दिवसाचे २४ तास" आपण आमच्या प्रतिष्ठानला रक्तासाठी कधीही साद घाला, शंभर प्रतिषद रक्त उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रतिष्ठाण कटिबद्ध आहे.

म्हणूनच संतोष अबगुल प्रतिष्ठान विनंती सर्व रक्त दाताना विनंती आहे की, रविवार, दिनांक ०४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपल्या वेळेनुसार आपण वेळ काढावा व अमूल्य असे रक्तदान करून  प्रतिष्ठानला साथ द्यावी. असे आवाहन संतोष अबगुल प्रतिष्ठान सभासद व संस्थापक श्री. संतोष अगबुल यांनी आवाहन केले आहे.

प्रतिष्ठान च्या वतीने आज पर्यंत केलेल्या सहकार्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबई भागात  तसेच करणाऱ्या रक्तदात्यांच्या ओळखीपैकी कोणालाही रक्त लागल्यास ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. दापोली मंडणगड व खेड तालुका तसेच रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण ठिकाणी १०० उद्योजक व व्यावसायिक उभारण्यासाठी प्रयत्न करीत असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबईत उपचारासाठी आलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तसेच के.ई.एम. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत टिफिन सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. रुग्णाच्या आजारपणात त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी,  सिद्धिविनायक ट्रस्ट तसेच इतर सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील बांधवांना मंत्रालय स्तरावर किंवा अन्य शासनदरबारी काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत असून तालुका दापोली व खेड येथे प्रशासकीय मार्गदर्शन समित्या सज्ज झाले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा नुकसान झालेल्या परंतु नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच प्रतिष्ठानची संलग्न असलेल्या सर्व सदस्यांची भविष्यातील पिढी उत्तम घडावी यासाठी प्रयत्नशील आहे. लॉकडाऊन काळात मुंबई सीएसटी ते पनवेल- बदलापूर व चर्चगेट ते विरार स्टेशन पर्यंत राहणार रत्नागिरी जिल्ह्यातील  गरजूंना अन्न धान्य वाटप करण्याचे कार्य केले आहे. १०० निराधार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे व ३०० निराधार आईबाबांना आधार देणे आमचा मानस असून लवकरच याची सुरुवात देखील होईल.

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाच्या वतीने पूर्ण प्रार्थमीक शाळा नाखरे नं १ ने पटकावला आदर्श शाळा पुरस्कार !!

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाच्या वतीने पूर्ण प्रार्थमीक शाळा नाखरे नं १ ने पटकावला आदर्श शाळा पुरस्कार  !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक मांडवकर) :

      जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग यांचेमार्फत दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान समारंभ कोरोना परिस्थितीमुळे मोजक्या उपस्थितीत शामराव पेजे सभागृहात नुकताच संपन्न झाला. पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीने आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सभापती संजना माने यांनी भूषवले. याप्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी तुकाराम जाधव,  गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यामध्ये सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन २०१९-२० मध्ये वरिष्ठ गटातून रत्नागिरी तालुक्यातून आदर्श शाळा पुरस्कार पटकावणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाखरे  नं. १ ला ज्येष्ठ पंचायत समिती सदस्य सुनील नावले यांचे हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
          शाळा मानकांची पूर्तता, भरघोस शैक्षणिक उठाव, भव्य दिव्य दिशादर्शक शिक्षण परिषद, शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा यश, जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, पालक- ग्रामस्थ -समाज उत्कृष्ट सहभाग, स्वच्छ सुंदर गावासाठी  योगदान तसेच राष्ट्रीय कार्यातील सहभागाचा विचार करून शाळा नाखरे नं. १ ची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये आजी-माजी शिक्षकवृंद, केंद्रप्रमुख महंमद  सय्यद,  तत्कालीन सरपंच विजय चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन जाधव, शशिकांत जाधव त्याचबरोबर आदर्श शिक्षक सुहास वाडेकर, सहशिक्षक शशिकांत घाणेकर, अमोल साळुंखे, अंगणवाडीताई मंगला चव्हाण, पूजा धुळप यांचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक गोपाळ रोकडे यांनी दिली.
         दरम्यान प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांचेमार्फत आयोजित कोरोना काळातील  शिक्षणाची यशोगाथा वेबिनार मध्ये देखील आदर्श शाळा नाखरे नं१ ने  जिल्ह्याचे नेतृत्व करीत रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात  ठसा उमटविला आहे.
           विविध उपक्रमांचे आयोजनाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या यशाप्रित्यर्थ खासदार विनायक राऊत, नामदार उदय सामंत, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी विशेष अभिनंदन केले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, डायट प्राचार्य डॉ. गजानन पाटील, शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, विस्तारअधिकारी उत्तम भोसले, सरोज आखाडे यांनीही नाखरे परिवाराचे कौतुक केले आहे. कोरोना परिस्थितीत सोहळा आयोजित करून शाळेला पुरस्कार प्रदान केल्याबद्दल नाखरे सरपंच शुभदा नार्वेकर यांनी विशेष ऋण व्यक्त केले. शाळेच्या यशस्वी घौडदौडीत योगदान देणारे नाखरेवासीय, हितचिंतक यांनाही त्यांनी धन्यवाद दिले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...