Friday, 3 September 2021

कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून अशोक भवारी यांची नियुक्ती, तालुक्याचे कल्याण होणार?

कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून अशोक भवारी यांची नियुक्ती, तालुक्याचे कल्याण होणार?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या तत्कालीन बीडीओ श्रीमती श्वेता पालवे यांची विक्रमगड पंचायत समिती येथे बदली झाल्यानें रिक्त झालेल्या कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी अपेक्षेप्रमाणे शहापूर पंचायत समितीचे बीडीओ अशोक मंगलदास भवारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 'रफ अँड टप' गटविकास अधिकारी म्हणून ओळखत असल्याने आता तालुक्याचे 'कल्याण' होणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कल्याण पंचायत समिती वर सध्या शिवसेनेचे सभापती व उपसभापती विराजमान असले तरी उपसभापती हे भाजपाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाचे 'किरन' आहे. एकूण १२ सदस्य असलेल्या या पंचायत समिती मध्ये भाजपाचे ५, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे पक्षीय बलाबल आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांच्या कार्यकाळात सदस्य आणि बीडीओ यांच्यात अनेकवेळा खटके उडाले होते. याचे पडसाद सदस्यांच्या मासिक मिंटिंग मध्ये दिसून आले होते. सदस्य आणि बीडीओ यांच्या मध्ये कमालीचा वाद होता. तो विकोपाला गेला होता. आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे तक्रारी ही झाल्या होत्या. पण तरीही त्यांच्याच कार्यकाळात कल्याण पंचायत समिती ची इमारत दुरुस्ती झाली, रंगरंगोटी झाली, पंतप्रधान महाआवास योजनेत कल्याण तालुक्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता, तसेच वरप येथे कोरोना कोविड केअर सेंटर देखील सुरू झाले. हे नाकारुन चालणार नाही.

ग्रामसेवकांच्या तक्रारी, यावरून होणारे वाद, विविध विकास कामांचा प्रश्न, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रणाचा अभाव, प्रंसगी कठोर व कणखर निर्णय घेण्यात चालढकलपणा,गावा गावातील रस्ते, गटारे, कचऱ्यांचे तेच ते प्रश्न, सदस्यांमधील मतभेद याचा पंचायत समितीच्या कामकाजावर होणारा परिणाम, पंचायत समिती मधील सर्व विभागाचे प्रमुख व बीडीओ यांच्यातील समन्वय ,पंचायत समितीच्या प्रशासनातील काही हलक्या 'कानाचे नारदमुनी' आदी विविध अडचणी, समस्या, प्रश्न यांचे भिजत घोंगडे, हे नवीन गटविकास अधिकारी यांच्या समोर आव्हान ठरणार आहे.

असे असले तरी शहापूर पंचायत समिती वरून आलेले अशोक भवारी हे रोखठोक स्वभावाबद्दल परिसरात परिचित आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे व काही गैरसमजुती मुळे शहापूर पंचायत समितीच्या सदस्यांनी त्यांच्या बदलीसाठी उपोषण केले होते. काही काळ ते 'वादग्रस्त' गटविकास अधिकारी म्हणून देखील शहापूरात चर्चा होती. त्यामुळे ४ आमदार, २ खासदार, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, सदस्य, झेडपी सदस्य, विविध पक्षाचे तालुका प्रमुख, असे डझनभर लोकप्रतिनिधी कल्याण तालुक्याशी निगडित असल्याने यामध्ये नवनियुक्त गटविकास अधिकारी अशोक भवारी हे भविष्यात कसे काम करतात यावर तालुक्याचे कल्याण किंवा अकल्याण होणार आहे.

प्रतिक्रिया 'नवनियुक्त गटविकास अधिका-यानी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करावे, कामचुकारावर वेळीच कारवाई करावी, नागरीकांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, मग तक्रारींंचा प्रश्न येणार नाही, आमचे पुर्ण सहकार्य लाभेल.- किरण ठोंबरे (उपसभापती, कल्याण पंचायत समिती)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कल्पित पिंगळे यांच्या बहादुरीचे कौतुक.!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कल्पित पिंगळे
यांच्या बहादुरीचे कौतुक.!!


भिवंडी, दिं,2, अरुण पाटील (कोपर) :
          ठाण्यातील माथेफिरू फेरीलवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) कल्पिता पिंपळे यांची आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून विचारपूस केली. तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याने काही वेळ कल्पिता पिंपळे देखील गहिवरल्या. आपण लवकर बऱ्या व्हा व इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.
          त्या माथेफिरुला कडक शासन व्हावे ही इच्छा कल्पिता यांनी बोलून दाखवताच त्याची काळजी तुम्ही करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवरून हा फोन लावण्यात आला होता. यावेळी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची सानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्य केली.
            सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पिता पिंपळे प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल उचलले असून खटला लढवण्याकरता विशेष वरीष्ठ वरीलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच आरोपी अमरजीत यादवला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल याबाबत सरकार प्रयत्न करणार आहे.
           दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात भेट घेतली होती. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात राज ठाकरेंनी भेट देत कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही भेट घेत राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
         अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Thursday, 2 September 2021

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा शाखेच्या अध्यक्ष पदी धनराज गायकवाड यांची निवड !!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा शाखेच्या अध्यक्ष पदी धनराज गायकवाड यांची निवड !!


     बोरघर /  माणगांव (विश्वास गायकवाड) : गुरुवार दिनांक ०२ सप्टेंबर रोजी नियोजित वेळापत्रका नुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा या संघटनेच्या कार्यकर्त्यांची सह विचार सभा संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा तालुका अध्यक्ष पदी तळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, शेकाप सरचिटणीस, युवा नेते धनराज गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. 
      सदर सभेची अध्यक्षता शाखा अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी केली. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष विनय कुमार सोनवणे उपस्थित होते.सभेच्या सुरवातीला डॉ भगवान लोखंडे यांनी सभेच्या विषय पत्रिकेत प्रमाने असणाऱ्या अपेक्षा व शाखा विस्तार या संदर्भात मांडणी केली. तर विनय कुमार सोनवणे यांनी तळा शाखा अधिक कृतिशील होउन आपली ओळख निर्माण करेल. यासाठी 2 ते 5 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शिबीरात सर्वानी सहभागी व्हावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्य विस्तारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे, संघटना व विचार विस्तारात सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प व्यक्त केला. उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, प्रा.कसबे, श्री.शिगवण, श्री.मंगेश थिटे यांनी ही सदिच्छा व्यक्त केल्या. सभेचे संचलन व आभार डॉ दत्ता कुटेंवाड यांनी पार पाडले.

खैराची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त !! "रोहा वन विभागाने केली कारवाई"

खैराची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त !!

"रोहा वन विभागाने केली कारवाई"
 

      बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : माणगाव तालुक्यातील मौजे विघवली फाटा मुंबई-गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ खैर सोलीव लाकूड वाहतूक करीत असताना (शुक्रवार, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास) रोहा वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात ट्रक टेम्पो आणि लाकूड असे 5 लाख 78 हजार 904 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी श्री.उमेश जयसिंग ढवळे रा. बारामती वडगांव निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रोहा वन विभागाचे उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे.


      याबाबत उपवनसंरक्षक व महावनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शुक्रवारी, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी मौजे विघवली फाटा येथे उभा असलेला ट्रक क्रमांक MH 16/Q7151 तपासला असता त्यामध्ये खैर सोलीव लाकडे विनापरवाना आढळून आली तसेच आजूबाजूला तपास केला असता MH 06/BG0089 या क्रमांकाचा टाटा एस टेंपो उभा असलेला दिसून आला. हा टेम्पो तपासला असता त्यात खैर सोलीव लाकडे सापडली. संबंधित वाहनांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करीत माणगाव नाणोरे विक्री आगारावर दोन्ही वाहने मालासह जप्त केली. 
     ही कारवाई रोहा वन विभागाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहा वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक ईच्छांत कांबळी, वनक्षेत्रपाल माणगाव पी.पी.आर.पाटील, वनरक्षक अजिंक्य कदम, वनरक्षक तेजस नरे, वनरक्षक योगेश देशमुख यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरु आहे.

ठाकूरपाडा गोवेली तेथे गंगा अवतरली, अखेरीस आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी मिळाले, समाधान व्यक्त !!

ठाकूरपाडा गोवेली तेथे गंगा अवतरली, अखेरीस आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी मिळाले, समाधान व्यक्त !!


कल्याण, (संजय कांबळे : )कल्याण मुरबाड महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोवेली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा ही आदिवासी वस्ती गेल्या वर्षभर बोरवेल नादुरुस्त असल्याने इतरत्र वनवन भटकून अशुद्ध पाणी पित होते. 


परंतु पत्रकार संजय कांबळे यांचा पाठपुरावा व कल्याण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे तत्परतेमुळे अखेरीस येथील आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी आज प्यायला मिळाले असून त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.


कल्याण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोवेली ग्रामपंचायत हद्दीत ठाकूरपाडा ही आदिवासी समाजाची वस्ती आहे. ४०/५० लोकवस्तीच्या या वाडीत गेल्या वर्षी टंचाई कृती आराखडयातून एक बोरवेल खोदण्यात आली होती. सुदैवाने १५० फुटांचे आसपास पाणी ही लागले होते. परंतु एक ते दोन महिन्यातच ही बोरवेल नादुरुस्त झाल्याने ती बंद पडली, त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी इतरत्र वनवन भटकावे लागत होते. ही अडचण येथील ग्रामस्थ गणपत लुखा हिंदोळे, गुरुनाथ हिंदोळे, आदींनी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी यांना सांगितले होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. म्हणून वरील सर्व मंडळी पत्रकार संजय कांबळे यांना भेटून यामध्ये लक्ष घालण्याची विंनती केली. त्यांनी ताबडतोब ठाकूरपाडा येथे भेट देऊन तेथूनच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या कर्मचारी/अधिकारी यांना संपर्क साधून अडचण सांगितली.


या विभागाचे मदतनीस आर व्ही लव्हाटे यांनी ही तत्परतेने ठाकूरपाडा येथे भेट देऊन काम हाती घेतले. परंतु गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे काम करणे अडचणीचे होते. आज अखेरीस पावसाने उघडीप दिल्याने येथील तरुण मंडळी यांच्या सहकार्याने बोरवेल दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामध्ये मदतीसाठी ठाकूरपाडा येथील संतोष मंगल हिंदोळे, विलास हिंदोळे, राहूल बुधाची हिंदोळे, अक्षय विठ्ठल हिंदोळे, दिनेश हिंदोळे, अरुण हिंदोळे, जितू कालोखे, सुरेश हिंदोळे, राहूल हिंदोळे, विशाल हिंदोळे, महिला मध्ये रेश्मा हिंदोळे, कमल बुधाची हिंदोळे, गुलाब हिंदोळे, रंजना गणपत हिंदोळे, आदींचा समावेश होता. एकदिड तासाच्या मेहणतीनंतर बोरवेल दुरुस्ती झाली आणि गेल्या एक वर्षांपासून भूगर्भात गायब झालेले पाणी(गंगा) जमीनीवर अवतरली, हे बघून येथील वयोवृद्ध बाका हशा सांवत यांच्या डोळे पाण्याने भरले ते भारावून सर्वाचेच पाय धरुन आभार मानू लागले. हा प्रंसग मन हेलावून टाकणारा होता. पाणी व येताच त्याची अगदी विधीवत पुजा अर्चा करुन श्रीफळ फोडून महिलांनी पाणी भरण्यास सुरुवात केली.यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान अवर्णनीय होते.

यानंतर जिल्हा परिषद शाळा ठाकूरपाडा येथे एका छोटे खाणी कार्यक्रमात ठाकूरपाडा ग्रामस्थांच्या वतीने कल्याण पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे आर व्ही लव्हाटे यांना शाल श्रीफळ देऊन पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला व तत्परतेने काम केल्याबद्दल आभार माणन्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता बांबले, महिला मंडळाच्या रंजना हिंदोळे, रेश्मा हिंदोळे, गुलाब गुरुनाथ हिंदोळे, कमल हिंदोळे, सुरेश हिंदोळे व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*प्रतिक्रिया"गेली वर्षभर आम्ही अशुद्ध पाणी पित होतो पण आता बोरवेल दुरुस्ती झाल्याने शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे" -रेश्मा हिंदोळे, ठाकूरपाडा, गोवेली.

"ठाकूरपाडा येथील तरुण मंडळी च्या मदतीमुळे हे काम ताबडतोब करता आले, यामध्ये पत्रकार संजय कांबळे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे" -आर व्ही लव्हाटे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ठाणे.


Wednesday, 1 September 2021

विक्रोळी येथील यंग स्टार ग्रुपचा सामाजिक उपक्रम दहीहंडी उत्सव रद्द करुन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !!

विक्रोळी येथील यंग स्टार ग्रुपचा सामाजिक उपक्रम
दहीहंडी उत्सव रद्द करुन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !!


घाटकोपर, (केतन भोज) ; विक्रोळी पश्चिम येथील यंग स्टार ग्रुपची दहीहंडी पार्कसाईट मध्ये प्रसिद्ध आहे. पण गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं मोठं सावट आहे.कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढतो आहे. गेल्या तीन दिवसांचा आलेख पाहिला तर कोरोनाचं सावट वाढतंय असं वाटू लागलंय. तशा केसेसही समोर येऊ लागल्या आहेत.

त्यामुळे यंग स्टार ग्रुप ने सामाजिक बांधिलकी जपत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दहीहंडी उत्सव यंदा रद्द करून त्याऐवजी यंग स्टार ग्रुपचे आधारस्तंभ श्री.मनोज भाई दुबे व घाटकोपर शिवसेना विधानसभा संघटक श्री.सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या विशेष उपस्थितीत विभागातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना यंग स्टार ग्रुपचे संस्थापक श्री.तुषार निर्मळ व समीर राऊत व सर्व ग्रुपचे सदस्य, आई माऊली ग्रुप यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.

चंडिका पेट्रोल पंपाचा ६२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

चंडिका पेट्रोल पंपाचा ६२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !


      बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील चंडिका पेट्रोल पंप ( इंडियन ऑइल ) चा ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
     सदर कार्यक्रम पेट्रोल पंप चे मालक परशुराम शेठ तळेकर त्यांचे चिरंजीव समीर शेठ तळेकर, निवास तळेकर यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित तळा तालुक्याच्या नायब तहसिलदार  स्मिता जाधव, नायब तहसिलदार सुरेखा गुळे मॅडम, राविभाऊ मुंडे, चंद्रकांत रोडे, धनराज गायकवाड लहुशेठ चव्हाण, सर्कल शाम ठाकर, तलाठी प्रवीण गवई, फुलरे साहेब, राकेश नांदगावकर, राजेश खोत, पोलीस हवालदार संजय शिंदे, सरणेकर साहेब, महाडीक साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित चंडिका पेट्रोल पंपाचा ६२ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!     'शिक्षण संजीवनी' मासिका तर्फे द...