Wednesday, 1 February 2023

निवडणुका डोळयासमोर ठेवुन सादर केलेलं बजेट - शेख युसूफ लिडर

निवडणुका डोळयासमोर ठेवुन सादर केलेलं बजेट - शेख युसूफ लिडर 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणुन पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पावर औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी पाच ट्रिलिअन डॉलर चे काय झाले असा सवाल मोदी सरकारला केला व केद्र सरकारचा निषेध केला. खास करुन महाराष्ट्रसाठी या बजेट मध्ये निराशा झाली. यामध्ये युवकाना नोक-या, रोजगार, उदयोग, महिलांना गॅस दर वाढ, पेट्रोल डिजेल, सी.एन.जी यामध्ये वाढ करुन निराशा बघण्यात आली. युवकांच्या शिक्षणासाठी सुध्दा हि निराशा दिसुन आली. कृषी क्षेत्र, आरोग्य सेवा व तरुणांना सक्षम बनविण्यासाठी आजच्या जगात कृत्रिम बुध्दीमत्त्ता हे महत्वाचे साधन आहे तरी पण यांच्या हाती या बजेटमध्ये काही येतांना दिसत नाही. अशी प्रतिक्रीया औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी दिली.

हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प - "विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे* यांची टीका

हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प - "विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे* यांची टीका

मुंबई, अखलाख देशमुख, दि १ : -  सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात शेतीच्या  दृष्टीने विचार केल्यास फलोत्पादन, सहकार सारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. कापूस उत्पादकांना भरघोस मदत करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात केली, मात्र सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करण्याचा निर्णय का घेतला असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असे जाहीर करायचे आणि दुसरीकडे कापूस आयातीचे धोरण राबवायचे  हा मोदी सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही दानवे यांनी केली.

२०१४ पासून मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे. २०१४च्या तुलनेत आता पाहिल्यास मोठया प्रमाणात वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झाली असल्याचे दानवे यांनी म्हटले.

कर्नाटकमध्ये जलसिंचनासाठी साडेतीन हजार कोटी देताना इतर राज्यात खास करून महाराष्ट्राला तसा निधी का दिला जात नाही ? - मा. जयंतराव पाटील

कर्नाटकमध्ये जलसिंचनासाठी साडेतीन हजार कोटी देताना इतर राज्यात खास करून महाराष्ट्राला तसा निधी का दिला जात नाही ? -  मा. जयंतराव पाटील 

आगामी निवडणुकांकडे लक्ष ठेवून आपली घसरलेली लोकप्रियता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. एका सर्वेक्षणाप्रमाणे देशाच्या जनतेचे मत सत्तारूढ पक्षासोबत होते ते आजच्या अर्थसंकल्पानंतर विरोधात गेले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. 

पुढे जयंत पाटील म्हणाले की, देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असताना कोरोनानंतर परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर ८.३ टक्क्यांवर गेला. २०२४ च्या निवडणुका होण्यापूर्वीचा मोदी सरकारकडून हा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये नव्या घोषणांपेक्षा जनतेचे लक्ष देशात राबवल्या जाणाऱ्या आधीच्या योजनांच्या प्रगतीकडे लागले होते. मात्र सत्तारूढ पक्षाला ते करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निवडणुकांना संबोधून केलेला आहे, याव्यतिरीक्त दुसरा विचार करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया जयवंतराव पाटील यांनी दिली.

कर्नाटकमध्ये जलसिंचनासाठी साडेतीन हजार कोटी देताना इतर राज्यात खास करून महाराष्ट्राला तसा निधी का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्रातील उत्पन्न हे दुप्पट होणे दूरच राहिले ते दरवर्षी दीड टक्क्याने खालवत चालले आहे. २०२२ पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार अशी घोषणा २०१८ साली केली होती. मात्र ही तारीख सतत पुढे जात आहे. देशाचे अर्थमंत्री सभागृहात जे सांगतात ते घडायला हवे, पण ते सत्तारूढ पक्षाकडून ते घडू शकत नाही, ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.

सत्तारूढ पक्षाची अनेक कामे केवळ कागदोपत्री आहेत. सगळ्या योजनांना पंतप्रधानांचे नाव देऊन त्यांची छबी कानाकोपऱ्यात पोहचवायची याशिवाय अर्थसंकल्पाचा दुसरा कोणताही फायदा नाही. अर्थसंकल्पात राज्याला काही मिळाले नाही याचे शल्य राज्यातील जनतेला कायम राहील, असे जयंतराव पाटील म्हणाले.

lसर्वसामन्यांचे उत्पन्न घटले, करमर्यादा वाढवून फायदा काय ? - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

सर्वसामन्यांचे उत्पन्न घटले,  करमर्यादा वाढवून फायदा काय ? - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे 

*मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १  :  यापूर्वीचा अर्थसंकल्प ज्या राज्यात निवडणूका तिथे जास्त निधी दिला होता, त्यामध्ये कामे केलीच नाही. आता दोन वर्षांपासून सर्वसामन्यांचे उत्पन्न घटले, ते वाढवणे गरजेचे आहे. मग ५ लाखावरून ७ लाख करमर्यादा वाढवून उपयोग काय? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे. शेतकरीविरोधी व  भांडवलदारधार्जिणे केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्यावर अन्याय केला आहे. २. ४० लाख कोटी रुपयांचा खर्च रेल्वे करतील, महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पाकडे कानाडोळा केला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाच्या पदरी पुन्हा निराशा पडली असून केंद्रीय अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

कोट्यवधी रुपयांची आकडेमोड बंद करणे गरजेचे आहे. आता बेरोजगारी, महागाई आणि उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न करा, कर्ज काढून व कर्जपुरवठा करून केंद्राच्या संस्था मोडकळीस आल्या, त्या वाचवा, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

पावशेपाडा येथील महिलेचे'आयकार्ड,धारक चोरट्यांने दिवसाढवळ्या लांबवले गंठन, म्हारळ वरप कांबा परिसरात कायदा व सुव्यवस्थेची ऐसी तैसी ?

पावशेपाडा येथील महिलेचे'आयकार्ड,धारक चोरट्यांने दिवसाढवळ्या लांबवले गंठन, म्हारळ वरप कांबा परिसरात कायदा व सुव्यवस्थेची ऐसी तैसी ?

कल्याण, (संजय कांबळे) : एन एच २०० ब्लॅक कलरची न्यू गाडी, गळ्यात आयकार्ड ची आँरेज पट्टी, आणि डोक्यावर हेल्मेट अशा अनोख्या स्टाईल च्या चोरट्यांने दिवसाढवळ्या पावशेपाडा गावातील महिलेचे दोन तोळयांचे गठंन खेचून धूम ठोकून पळून गेला. त्यामुळे म्हारळ वरप कांबा परिसरात कायदा सुव्यवस्थेची गुन्हेगारांकडून ऐसीतैसी सुरु आहे का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आतापर्यंत म्हारळ परिसरातून मागील अनेक गुन्ह्यातील ८/१० आरोपी अटक केली असून या परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढविली असल्याचे कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा गावातील सरिता एकनाथ पावशे वय ३७ वर्षे या रायते येथून घरी पावशेपाडा येथे येत असताना दुपारी ४:३० च्या दरम्यान गावात पोहचत असताना वरील वर्णन केलेला मोटारसायकल स्वार जवळ येवून २ तोळयांचे गठंन घेऊन कल्याण मुरबाड रस्त्याच्या बाजूला पळून गेला. कोणाला संशय येवू नये म्हणून त्यांनी गळ्यात आँरेज कलरची आयकार्ड पट्टी घातली होती. तो इतक्या वेगात गेला की सरिता पावशे यांनी आरडाओरडा केला परंतु त्याचा काय उपयोग झाला नाही. हा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

एक दिड वर्षांपूर्वी याच गावात ५/६ जणांच्या टोळीने शस्त्रत्र दरोडा टाकला होता. तसेच चेन, मंगळसूत्र खेचून नेण्याची ४थी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान म्हारळ, वरप कांबा येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे विविध अनाधिकृत धंदे यातून होणारे.हानामा-या, मारामारी, खुनी हल्ले, महिलांची छेड, विनयभंग, टपोरीगिरी, धमकावने, ओव्हरशिट, अश्लील चाळे, बेशिस्त व बेदकारपणे गाड्या चालवणे, कर्कश आवाज यातून होणार वाद, याचे प्रमाण भयानक वाढले आहे. काही दिवसांपूर्वी म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य अँड दिपक आहिरे यांच्या गाडिवर हल्ला झाला, म्हारळ परीसरात तोडफोड झाली. यासंदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. म्हारळ गावाच्या शेजारी असणारी झोपडपट्टी, उल्हासनगर शहराचा भाग, हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे तसेच आता नव्याने बनलेला मोहिली पुल हा गुन्हेगारासाठी येण्याजाण्यासाठी मोठा सोईचा झाला आहे.

तथापि म्हारळ वरप कांबा या परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी जितेंद्र ठाकूर यांनी ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी ग्रामस्थांची एक बैठक घेऊन विचारविनिमय व प्रत्यक्षात कृती केली, रात्रीचे पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवले, शिवाय आंबेडकर चौकात पोलीस तैनात केले. मागील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेले ८/१० आरोपी  अटक केली आहे. त्यामुळे लवकर परिस्थिती सुधारेल असा विश्वास व्यक्त केला. तर वाढणारी लोकसंख्या व त्या मानाने अपुरे पोलीस बळ यासाठी म्हारळ येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली असल्याचे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले आहे.

चोपडा रोटरी तर्फे भारतातील पहिल्या पर्यावरण पूरक ई बाईक रॅलीचे आयोजन !

चोपडा रोटरी तर्फे भारतातील पहिल्या पर्यावरण पूरक ई बाईक रॅलीचे आयोजन !

चोपडा, प्रतिनिधी - आज जगभरात पर्यावरण विषयक चिंता केली जात आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत तर मानवाचे आणि पृथ्वीचे भविष्य अंधकारमय आहे, असा इशारा जगभरातील शास्त्रज्ञांनी पर्यावरणवाद्यांनी दिलेला आहे. त्या दृष्टीने विविध स्तरावर पर्याय शोधले जात आहेत.
       जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपली जबाबदारी ओळखून चोपडा येथील रोटरी क्लबने ई-बाइक रॅलीचे आयोजन करून एक अनोखा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. रोटरी क्लब चोपडा तर्फे आयोजित रोटरी उत्सव २०२३ च्या प्रचारासाठी भारतातील पहिली पर्यावरण पूरक इलेक्ट्रॉनिक बाईक रॅली चे आयोजन करण्यात केले. जळगाव येथील सीका कंपनीच्या पुढाकाराने रॅलीसाठी सीका कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक बाईक उपलब्ध करून देण्यात आल्या. 
         धरणगाव रस्त्यावरील आनंद सुपर शॉपी येथून सुरु झालेल्या ई बाईक रॅलीचा धनवाडी फाटा, पंकज नगर, बस स्टॅन्ड, ग्रामीण पोलीस स्टेशन, थाळनेर दरवाजा, चिंच चौक, गोलमंदिर, चावडी, डॉ. आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक या मार्गे पुन्हा आनंद सुपर शॉपी येथे समारोप करण्यात आला. कस्तुरबा विद्यालयातील एन. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थींनीचे लेझीम पथक या रॅलीत सहभागी झाले होते.
          या रॅलीमध्ये चोपडा रोटरीचे अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख चेतन टाटिया, उप-प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे, तेजस जैन, पृथ्वीराज राजपूत, अर्पित अग्रवाल, खजिनदार पवन गुजराथी, उप-प्रांतपाल नितीन अहिरराव तसेच सीका बाईकचे संचालक राजू दादा पाटील, कस्तुरबा शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक एन आर पाटील तसेच रोटरी आणि सीका बाईकचे सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

लांजा एस.टी स्थानकमध्ये एस.टी प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या प्रसाधन गृहाची दुरवस्था !

लांजा एस.टी स्थानकमध्ये एस.टी प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या प्रसाधन गृहाची दुरवस्था !

'कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजा'च्या वतीने लांजा 'एस.टी स्थानक व्यवस्थापक' यांना निवेदन

मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
           लांजा बस स्थानक मध्ये एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या प्रसाधन गृहाची दुरवस्था लवकरात लवकर दूर करून ते वापरण्यायोग्य करावे यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजाच्यावतीने लांजा बस स्थानक व्यवस्थापक यांना दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी निवेदन देण्यात आले.

            यावेळी लांजा बस स्थानक व्यवस्थापक यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत लवकरच या प्रसाधन गृहाची आवश्यक ती डागडुजी करून ते व्यवस्थित स्वच्छ, वापरण्यायोग्य करण्यात येईल असे सकारात्मक आणि जबाबदारी पूर्वक आश्वासन दिले. या प्रसंगी लांजा शाखा उपाध्यक्ष श्री.सुभाष पालकर ,विलास आग्रे, विनेश बाणे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजाचे समस्त पदाधिकारी, सभासद, समाज बांधव यांनी समस्या लक्षात घेऊन निवेदन दिल्याबद्दल स्थानिक नागरिक, प्रवाशी यांनी यनिमित्ताने कु.स.संघ मुंबई शाखा लांजा चे आभार व्यक्त केले आहेत.

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...