Saturday, 3 May 2025

बांधकाम व्यावसायिकांसाठी गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक !!

बांधकाम व्यावसायिकांसाठी गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक !!

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरू असलेले विकास प्रकल्प व बांधकामांसाठी वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम-२०१३ नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बांधकामांसाठी बांधकाम नकाशे व आराखडे मंजूर झाल्यानंतर बांधकामांच्या तळघर खोदाईकरिता उत्खनन व वाहतूक करावयाची असल्यास तसेच बांधकामासाठीही गौणखनिजाची आवश्यकता असल्यास अशी परवानगी घेणे आवश्यक आहे. ५०० ब्रासपर्यंत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदारांना असून उपविभागीय अधिकाऱ्यांना ५०१ ते २ हजार ब्रासपर्यंत आणि २ हजार १ ते २५ हजार ब्रासपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

परवानगीसाठी https://mahakhanij.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ऑटो डीसीआर प्रणाली ही महाखनिज प्रणालीशी एपीआयद्वारे जोडणी करण्यात आली असल्याने महानगरपालिका हद्दीतील प्रकल्पांसाठी पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

१ मे जागतिक कामगार दिनी कामगार कष्टकर्यांचा मेळावाकल्याण येथे उत्साहात साजरा !!

१ मे जागतिक कामगार दिनी कामगार कष्टकर्यांचा मेळावा
कल्याण येथे उत्साहात साजरा !!

कल्याण, दि. ३ मे २०२५
    महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती कल्याण जिल्हा ठाणेच्या वतीने दिनांक १ मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृह कल्याण येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात कॉम्रेड कृष्णा भोयर हे  अध्यक्षस्थानी होते. . या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कॉम्रेड उदय चौधरी उपाध्यक्ष (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस), कॉम्रेड जगदीश खैरलिया (सरचिटणीस, श्रमिक जनता संघ), कॉम्रेड उमेश बोरगावकर (मुन्सिपल कामगार कर्मचारी सेना), कॉम्रेड ज्ञानेश पाटील (महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार युनियन) यांची मेळाव्यात भाषणे झाली.

         कामगार मेळाव्याचे प्रास्ताविक करताना *कॉम्रेड उदय चौधरी* यांनी जागतिक व भारतीय कामगार चळवळीचा इतिहास सांगितला, कामगार चळवळ टिकवून ठेवण्यसाठी कामगारांनी एकत्रित संघर्ष कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये नवीन जन सुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे. तो कामगार चळवळीतील कार्यकर्त्या करीता कसा मारक आहे याबाबत त्यांनी विश्लेषण केले. केंद्र सरकारने तयार केलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्याला जबरदस्त विरोध कामगारांनी एकत्रितपणे केला पाहिजे व कामगार चळवळ टिकवली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

         *कॉम्रेड गिरीश भावे* सचिव कामगार एकता कमिटी संबोधित करताना म्हणाले की,कामगाराच्या संघर्षातून एक मे हा कामगार दिन निर्माण झालेला आहे.कामगारांनी संघर्ष करून कामाचे आठ तास निश्चित केलेले आहे. कामगाराचा लढा हा खरा भांडवलशाहीच्या विरोधात आहे.ऑक्टोंबर क्रांतीचा इतिहास हा जगातील भांडवलशाहीच्या विरोधात होता.आज भांडवलशाही प्रबळ होत चाललेली आहे. तिला रोखण्याकरीता कामगार कष्टकऱ्यांच्या हातात सत्ता आली पाहिजे व त्याकरिता आपण रस्त्यावर संघर्ष केला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.
       
        *कॉम्रेड जगदीश खैरालिया* मेळाव्यास संबोधित करताना म्हणाले की, कष्टकऱ्यांच्या श्रमामुळे हा देश उभा आहे. श्रमिकांनी आपले श्रम वेचून या देशाच्या संपत्तीची निर्मिती केलेली आहे. सध्या सत्तेत असलेल सरकार श्रमिकांनी निर्माण केलेली संपत्ती भांडवलदारांना विकत आहे व ती विकण्यासाठी भांडवलशाहीला पूरक असे कामगार कायदे तयार करत आहे.त्यामुळे कामगार चळवळ अधिक मजबूत करून भांडवलशाहीच्या विरोधात लढा उभाराला पाहिजे. यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 

    
        *कॉम्रेड उमेश बोरगावकर* संबोधित करताना म्हणाले की, आपण ज्या उद्योगात काम करतो तो उद्योग टिकवणे, त्याची भरभराटी करणे, ते उद्योग भांडवलदाराच्या ताब्यात जाणार नाही याकरिता सतत संघर्ष करणे याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. एक मे कामगार दिवस हा कामगाराच्या संघर्षाचा अस्तित्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे.
 
       *कॉम्रेड ज्ञानेश पाटील* घरेलू कामगाराचे नेते संबोधित करताना म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटित क्षेत्रातील कामगारांनी पुढे आले पाहिजे. त्याचीच आज गरज आहे असे ते म्हणाले.
   
      *कॉम्रेड कृष्णा भोयर* संबोधित करताना म्हणाले की, आपल्या देशामध्ये कामगार दिवस हिंदुस्तान कामगार किसान पक्षाने दि.१ मे १९२३ साली प्रथम चेन्नई येथे साजरा केला. जगातील कामगारांनी भांडवलशाहीच्या विरोधात संघर्ष करून रक्तरंजित क्रांतीनंतर कामाचे ८ तास व जगण्याचा हक्क कामगारांना मिळवून दिला. स्वातंत्र्या पूर्वकाळात इंग्रजांनी काही कामगार कायदे केले, स्वातंत्र्यानंतर काही कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमाने निर्माण केले तर काही कामगार कायदे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियननी वेळोवेळी सरकारशी संघर्ष करून निर्माण केले. हे सर्व कामगार कायदे सत्तेत असलेल्या सरकारने बदलेले आहे. बदललेले कामगार कायदे लागू करण्याकरीता केंद्र सरकार सध्या धडपड करत आहे. कामगार कायदे बदलल्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्काचे हनन होणार आहे. सरकारने कामगार संघटनांना विश्वासात न घेता कामगार कायद्यामध्ये बदल करून ४ नवीन लेबर कोड तयार केलेले आहे. हे लेबर कोड कामगार विरोधी आहे व भांडवलदारांना कामगारांचे शोषण करण्यास मुक्त परवाना देण्यासारखे आहे.
      
         महाराष्ट्र सरकारने नवीन जनसुरक्षा विधेयक पास करण्याकरीता प्रयत्न सुरू केला आहे. या विधेयकामुळे संविधानाने सरकारच्या धोरणावर बोलण्याचा दिलेला अधिकार संपुष्टात येणार आहे. देशातील व राज्यातील सरकारचे धोरणे हे कामगाराच्या विरोधात असून भांडवलदारांच्या बाजूने आहे. सर्व सरकारी संस्था मधील कायम स्वरूपाचा रोजगार संपुष्टात आणून कंत्राटी पद्धतीने कामगार भरती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे. स्थायी स्वरूपाची रिक्त पदे ठेवल्या जात आहे.त्या ठिकाणी कंत्राटी कामगाराची नेमणूक आर्थिक शोषण करण्यात येत आहे. देशातील जनतेच्या श्रमातून निर्माण झालेली संपत्ती केंद्र सरकार खाजगी भांडवलदारांना कवळीमोल भावाने विकत आहे. ही फार मोठी धोक्याची घंटा भारतीय कामगार चळवळीसाठी आहे. श्रमिका साठी तयार केलेल्या कामगार कामगार कायद्याच्या रक्षणासाठी १० केंद्रीय ट्रेड युनियनने २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये भागीदारी करावी असे आव्हान त्यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले.

Friday, 2 May 2025

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील भांबेड गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वाघजाई तरुण विकास मंडळ- नार्डेकरवाडी (रजि.क्र.जी.बी.बी.एस.डी. ९७८) तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिन आणि श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन वैशाख शु.१४, रविवार दि. ११ मे २०२५ रोजी मु.पो.भांबेड (नार्डेकरवाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की, शुक्रवार दि.९ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता वाडी मर्यादित किर्केट चे सामने, शनिवार दि १० मे २०२५ रोजी दुपारी ३ वा.महिलांसाठी हळदी -कुंकू आणि रात्री ९ वा.लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स / नाटक तर रविवार दि.११ मे २०२५ रोजी स. ५ ते ६ वा.काकड आरती, स.९ ते ११ वा. सत्यनारायण महापुजा, ११ ते १२ वा. सार्वजनिक आरती, दु.१२ ते २ वा. महाप्रसाद (भंडारा), दु.३ ते ६ वा. सांस्कृतिक स्पर्धा, संध्या.६ ते ७ वा. आरती, रात्री ७ ते ८ वा. सुसंगीत भजन, रात्री ९ ते १० वा. गुणगौरव व सत्कार समारंभ, रात्रौ १०.०० वा. लोकनाट्य बहुरंगी नमन-सोबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे, गवळीवाडी वग नाट्य - राज गादिचा लालसा (सख्खा भाऊ पक्का वैरी)चे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रम साठी स्वागतोत्सुक म्हणून श्री. देवराम पांडुरंग नार्डेकर (वाडीप्रमुख), श्री. सुरेश मनोहर मोसमकर (अध्यक्ष), श्री.सुनिल शांताराम नार्डेकर (सचिव), श्री.योगेश उमाजी नार्डेकर (खजिनदार) आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, वाडीतील सर्व महिला-पुरुष, युवक-युवती, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि सभासद तसेच किलबिल कंपनी सज्ज रहाणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमचा गावातील नागरिक, माहेरवाशिनी, पाहुणे मंडळी यांनी लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण श्री वाघजाई तरुण विकास मंडळ - नार्डेकरवाडी, समस्त मुंबई व ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे. सर्व सन्माननीय देणगीदार आणि हितचिंतक यांचे मंडळने आभार व्यक्त करत आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा (भंडाऱ्याचा) लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ तर्फे करण्यात आले आहे.

कोकण कन्या सृष्टी कुळ्ये चे 'यूपीएससी'त यश !!

कोकण कन्या सृष्टी कुळ्ये चे 'यूपीएससी'त यश !!

**** आई- वडील, माझे मार्गदर्शक शिक्षक, मला प्रोत्साहन देणारे हितचिंतक यांचे पाठबळ मिळाले. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी हे यश मिळवू शकले. - सृष्टी कुळ्ये

कोकण, (शांताराम गुडेकर) :

           सृष्टी कुळ्ये ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील शिरवली (पलीकडचीवाडी) येथील राहणारी, सध्या ती मुंबईत राहते. तिचे वडील सुरेश कुळ्ये हे मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. सृष्टी हिला दोन भावंडे असून, ती या सर्वात मोठी आहे. घरची परिस्थिती बेताची आहे, तरीही सृष्टी हिने केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर सृष्टी हिने यूपीएससीमध्ये यश संपादन करत देशात ८३१ रँक मिळवली.
            लेकीने (सृष्टी) मिळविलेल्या यशानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कु. सृष्टी कुळये हिचे तिच्या मानखुर्द येथे राहत्या घरी जाऊन लांजा तालुक्यातील भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ- नार्डेकरवाडी यांच्याकडून पुष्पगुछ, शाल आणि भारताचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तिच्याशी आणि तिच्या परिवाराशी सुसंवाद साधण्यात आला. तिच्या UPSC स्पर्धा परीक्षेबद्दलचा प्रवास, तिने केलेली मेहनत इ. गोष्टीची माहिती घेऊन उपस्थित सभासदांनी तिला मंडळातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. हा कार्यक्रम श्री. संतोष नार्डेकर यांच्या माध्यमातून पार पडला. त्यामुळे मंडळातर्फे आणि उपस्थित सभासद यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले. श्री वाघजाई माता तिला यश, कीर्ती आणि दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थनाही या सत्कार दरम्यान करण्यात आली.
              सध्या सृष्टी मुंबईतील मानखुर्द शिवनेरीनगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याने या ठिकाणी तिचा अभ्यास होत नव्हता. त्यामुळे तिने सन २०२२ मध्ये गोवंडी येथील एम.पॉवर लायब्ररीत प्रवेश घेतला. घरात कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वातावरण नाही. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे कोणतीही शिकवणी नाही. अशा परिस्थितीतही सृष्टी हिने केवळ इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या जोरावर गरुडझेप घेतली. तिने मिळविलेल्या या यशानंतर शिरवली युवक मंडळ आणि कुळ्ये परिवारातर्फेही तिचा सत्कार करण्यात आला.
            लांजा तालुक्यातील भांबेड गावातील नार्डेकर वाडी श्री वाघजाई तरुण विकास मंडळ मुंबईचे श्री.संतोष नार्डेकर, पांडुरंग दैत, सुनील नार्डेकर, यशवंत जाधव, पंढरीनाथ शिगम, मनोहर दैत, राजाराम दैत, नरेश दैत, नागेश नार्डेकर, अनिल नार्डेकर आणि सिध्दी नार्डेकर तसेच अन्य पदाधिकारी आणि वाडकरी उपस्थित होते.
            घरच्या परिस्थितीची कल्पना होती.आई-वडिलांचे कष्ट पाहत होते. त्यामुळे चांगले शिकायचे आणि मोठे व्हायचे हे मनाशी ठरविले होते. त्यासाठी आई- वडील, माझे मार्गदर्शक शिक्षक, मला प्रोत्साहन देणारे हितचिंतक यांचे पाठबळ मिळाले. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी हे यश मिळवू शकले असे सृष्टी कुळ्ये यांनी सत्कारला उत्तर देताना स्पष्ट केले. या यशा बद्दल लांजा तालुका मधील अनेक मंडळ, समाज शाखा यांच्या तर्फे सृष्टी यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Thursday, 1 May 2025

भारतात पहिल्यांदाच जपान तंत्रज्ञानाचे क्रशर मशीन ठाण्यातील गिरीराज कन्ट्रक्शन कंपनीच्या मालकीचे !!

भारतात पहिल्यांदाच जपान तंत्रज्ञानाचे क्रशर मशीन ठाण्यातील गिरीराज कन्ट्रक्शन कंपनीच्या मालकीचे !!

***धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकाम 12 व्या मजल्यापर्यंत करता येईल कारवाई 

कल्याण, संदीप शेंडगे : भारतात प्रथमच जपान तंत्रज्ञानाचे हाय जॉ क्रशर मशीन गिरीराज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे झाले असून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या भव्य मशीनचे उद्घाटन नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी कंपनीचे संपूर्ण कामगार उपस्थित होते.

जपान ते भारत असा अनेक मैलाचा प्रवास करून प्रथम चेन्नई येथे त्याचे सुटे भाग एकत्र जोडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील  ठाणे जिल्ह्यात अतिशय अवाढव्य असे मशीन आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या राहिलेल्या संपूर्ण भागांची जोडणी गोवेली येथे पूर्ण करण्यात आली. आपल्या नव नवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये अव्वल असणाऱ्या जपानने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक मशीन हत्यारे अवजारे तयार केले आहेत. ज्या कामाला जास्त मनुष्यबळ तसेच जास्त कालावधी लागतो ते काम अगदी कमी वेळात होते वेळ आणि श्रम वाचत असल्याने या मशीनला महत्व निर्माण झाले होते.

हाय जॉ क्रशर मशीन हे जपान मधील कोबेल्को कंपनीचे मशीन असून 350 (एचपी)त्याची इंजिन क्षमता आहे.
या मशीनच्या साह्याने बाराव्या मजल्यापर्यंत सहज पोहोचता येते धोकादायक इमारती जुन्या पाण्याच्या टाक्या मोडकळीस व धोकादायक इमारती बारा मजल्यापर्यंत तयार झालेल्या अनधिकृत इमारती या मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येतात.

गिरीराज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका या  हद्दीतील  गिरीराज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत ठेकेदार म्हणून काम करीत आहेत या कंपनीच्या माध्यमातून उल्हासनगर कल्याण पनवेल या महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती अनधिकृत बांधकामे जुन्या पाण्याच्या टाक्या काही क्षणातच जमीन दोस्त करण्यात येतात तसेच ही मशीन हाताळताना अतिशय काळजी घेतली जात असून चालकाच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत या मशीनच्या सहाय्याने दिवस-रात्र बाराव्या मजल्यापर्यंत 35 मीटर पर्यंत काम करता येते तसेच या मशीनला चार कॅमेरे व चालकाला बसण्यासाठी 40 डिग्री फिरणारे कॅबिन जोडले आहे लावलेले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका मध्ये या अगोदरही सात मजल्यापर्यंत कामे होत होती परंतु या मशीनच्या सहाय्याने आता बाराव्या मजल्यापर्यंत काम करता येणार आहे.

महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त कामगार पुतळ्याला मानवंदना !!

महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त कामगार पुतळ्याला मानवंदना !!

अंबरनाथ, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ में १९६० रोजी करण्यात आली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो, सालाबादप्रमाणे कष्टकरी व कामगारांचे प्रतिक म्हणून अंबरनाथ शहरांतील मोरीवली गार्डन येथे उभारण्यात आलेल्या कामगार पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
बंजारी वस्ती येथे आजच्या दिवसी बंजारा संस्कृतीची ओळख राहावी म्हणून बंजारा संस्कृती दिन साजरा करण्यात येतो, कष्टकरी समाज हा विकासाचे द्योतक असून समाजाचे योगदान भारत भूमीच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे, इतिहासात ज्या बंजारा समाजाची नोंद रसद पोहचविण्याचे काम करीत असत अशी आहे, जुन्या काळातील अवघड मार्गातून वाट काढत रसद पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम बंजारा समाज करत होता. आपले योगदान अधोरेखित करण्यासारखे जरी असले तरी आजपर्यंत कुठल्याही शासनाने यांची दखल घेतली नाही अशी खंत याप्रसंगी बोलतांना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केली.

बंजारा समाजाला आपल्या समाजाने सर्वोच्च शिखर गाठले पाहिजे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी बोलतांना भटके विमुक्त समाजाचे अभ्यासक प्रा धनराज दशरथ डांगे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष रोशन जाधव, सचिव मनीलाल डांगे, बंजारा मित्र मंडळ चे पदाधिकारी श्याम डांगे,अरूण जाधव,शिवा डांगे,संजय डांगे, देवा जाधव, महेश डांगे, प्रशांत जाधव, रूपेश जाधव, जतिन डांगे आदी उपस्थित होते.

नोकरीबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच !!

नोकरीबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच !!

कोकण, (शांताराम गुडेकर) :

       रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कोंडगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेला नोकरी करता करता आपल्या कलागुणांनी विविध स्पर्धा गाजवलेला अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच राहिला. प्राथमिक शिक्षण कोंडगाव येथे पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठलं. शिकता शिकता शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव दिला. बघता बघता कोल्हापूर सांगली सातारा अशा ठिकाणी यश संपादन करून पारितोषिके मिळवली. कोल्हापूर श्री सारखा बहुमान मिळवीला. बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केले. असा हा गुणी प्रतिभावान बुद्धिवंत प्रसिद्धीपासून दूर राहिलेला युवक मुबंई येथे अभिलेखा विभागात कार्यकारी सहाय्यक पदावर कार्यरत आहे. त्याची शैक्षणिक पात्रता तर थक्क करणारी आहे. त्याची शैक्षणिक पात्रता बी.एस सी केमेस्ट्री शाहू कॉलेज कोल्हापूर, बी.ए इंग्लिश महावीर कॉलेज कोल्हापूर, एम.ए इंग्लिश नाईट कॉलेज कोल्हापूर, बी.एड कराड कॉलेज अशी त्याची शैक्षणिक पात्रता असून कोणतेही प्रसिद्धीचे वलंय नसलेला गुणवंत बुद्धिवंत प्रतिभावंत अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच राहिला. मात्र त्याच्या या योगदानाबद्दल अनेकांनी अनिकेत यास सलाम केला आहे. तर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...