Wednesday, 27 October 2021

संघर्ष समितीचा एल्गार .. "२७ गावातील अवाजवी मालमत्ता कराच्या बिलाची निषेधार्थ पालिका प्रवेशद्वारावर बिलाची होळी करण्याचा निर्धार" ....

संघर्ष समितीचा एल्गार .. "२७ गावातील अवाजवी मालमत्ता कराच्या बिलाची निषेधार्थ पालिका प्रवेशद्वारावर बिलाची होळी करण्याचा निर्धार" .... 


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ठ केलेल्या २७ गावाच्या मालमत्ता करात दहा पटीने वाढ केली असून अन्यायी मालमत्ता करातील वाढ कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन दंडेलशाही सुलतानी झिझिया कर लादून करीत असलेल्या लुटमारीच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने दंड थोपटले आहे. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत पालीका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा वरच मालमत्ता कराच्या बिलाची होळी करण्याच्या परवानगीसाठी ना पत्र देत प्रशासनाला कात्रीत पकडले  आहे .


या भागातील नागरिकांना उध्वस्त करण्याचा डाव पालिका प्रशासनाने रचला असल्याचा आरोप सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने  केला आहे. पालिका प्रशासनाच्या दंडेल शाहीच्या विरोधातील निषेध नोंदविण्यासाठी संघर्ष समितीने पालीका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा वरच मालमत्ता कराच्या बिलाची होळी करण्याच्या परवानगीसाठी  पालिका आयुक्तांना पत्र देत प्रशासनाला कात्रीत पकडले असल्याने २७ गावातील मालमता कराचा प्रश्न अधिकच चिघळत चालला असल्याचे दिसून येत आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट होण्यास २७ गावातील जनतेचा प्रखर विरोध असतानाही सदरची गावे जबरदस्तीने महापालिकेत समाविष्ट करण्यात आली
असून या गावातील मालमत्ता करात पालिका प्रशासनाने दहा पटी पेक्षा वाढ करण्याचा अन्यायी निर्णय लागू केल्याने अवाजवी व सुलतानी झिझिया कर कमी करून पूर्ववत ग्रामपंचायत दरानुसारच आकारण्यात
यावा यासाठी ह्या अगोदर आम्ही अनेक अर्ज विनंत्या महापालिका प्रशासन आणि शासन दरबारी सादर केलेल्या आहेत. दंड जनतेला मान्य नसल्यामुळे ह्या करिता सनदशीर मार्गाने येथील जनतेचे आंदोलन सुरू आहे.परंतु आजपर्यंत महापालिकेने त्याची दखल घेतलेली नसल्याने २७ गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे .
सर्व हक्क संरक्षण पक्षीय अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे ,सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दत्ता वझे, गजानन मांगरूळकर, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर आदी प्रमुख पदाधिकाऱयांनी पालिका आयुक्त डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी भेट घेतली.

मालमता कर कमी करण्याबाबत आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडले. व अन्यायी करामुळे २७ गावातील जनता अत्यंत प्रक्षुब्ध झालेली असून पालीका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा वरच मालमत्ता कराच्या बिलाची होळी करण्याच्या निर्णय जनतेने घेतला असून सनदशीर मार्गाने ९ नोव्हेंबरला आंदोलन केले जाणार असून या आंदोलनासाठी  परवानगी द्यावी असे ना पत्र शिष्ठमंडळाने पालिका आयुक्तांना देत प्रशासनाला कात्रीत पकडले.

Tuesday, 26 October 2021

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी श्री.मदन बल्लाळ यांची नियुक्ती.!!

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी श्री.मदन बल्लाळ यांची नियुक्ती.!!


"भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ यांना पुष्पगुच्छ देताना" : अरुण पाटील, भिवंडी -(कोपर)
-------------------------------------------------------------------------------

भिवंडी, दिं,26, अरुण पाटील (कोपर) : 
          ठाणे जिल्ह्यात सर्वात सक्रिय पोलीस ठाणे म्हणून भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची ख्याती असून या नारपोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नुकतीच श्री. मदन मनोहर बल्लाळ यांची नियुक्ती झाली आहे.
           श्री. मदन बल्लाळ यांनी आपल्या पोलीस कर्तव्याची सुरुवात नागपूर शहर पोलीस ठाण्यातून केली. त्या नंतर पुणे, नासिक, येथे कर्तव्य पार पाडून  क्राईम ब्रँच-ठाणे येथे सहा वर्ष, अँटी करप्शन -ठाणे येथे आठ वर्ष असा आपला तीस वर्षाचा कर्तव्यकाळ पार पाडला.
          वपोनि श्री. बल्लाळ यांच्या आपल्या तीस वर्षाच्या कामाच्या अनुभवाचा फायदा नक्कीच गुन्हेगारांनवर व गुन्ह्यांनवर आळा घालण्यासाठी होणार आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंद करण्यासाठी "पत्रकार सुरक्षा समितीचे" भिवंडी तालुका अध्यक्ष तथा " दैनिक बातमीदार" चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. अरुण पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.


विविध विकासकांमाच्या विषयांवर मनसे आमदार राजू पाटील आणि केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यात बैठक...

विविध विकासकांमाच्या विषयांवर मनसे आमदार राजू पाटील आणि केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यात बैठक...


कल्याण, बातमीदार : मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेत विविध विकासकांमाच्या विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी शासन पुरस्कृत ‘अमृत योजने'ला गती द्या, 27 गावांना पाणी पुरवठा करा, बीएसयुपी प्रकल्प व पत्रीपुल विकास योजनेमध्ये बाधित झालेल्या रहिवाशांच्या  पुनर्वसन करा, मोहनसृष्टी फेज-२ च्या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किंग आरक्षणानुसार पार्किंग तयार करा.


श्रीमलंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, एमआयडीसी व डोंबिवली विभागातील सर्व रस्ते प्राधान्याने दुरुस्त करा, डोंबिवली पूर्व नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या काम करा, आडीवली-ढोकळी रस्ता करा, लोढा पलावा चौक ते निळजे स्टेशन रस्त्याचे सिमांकन करावे, शिळ रस्त्यावरील लोढा हेवन येथील चौकातील अनधिकृत बांधकामे हटवून डि.पी. प्रमाणे रस्ता तयार करावा, डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या २७ गावांमध्ये सुधारीत मालमत्ता कर करावा.


कल्याण-शिळ रोड ते कासा रिओ मार्गावरील अनधिकृत मार्केट बंद करावे, पलावा चौक डोंबिवली (पू) येथील अनधिकृत बांधकामावर संयुक्त कारवाई करावी, २७ गावातील कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कायम करून घ्यावे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातील रिक्त पदे तत्काळ भरणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अपुऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो सोडवावा. तसेच  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या स्टेशनबाहेर फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे दिडशे मीटरच्या अंतरामध्ये फेरीवाले बसवू नयते अश्या विविध मागण्या व सूचना मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना कडे केल्या आहेत. यावेळी आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत योजने'ला गती देणार, २७ गाव, सागांव, नांदिवली अपुरा पाणी पुरवठा सुरळीत होण्यापर्यंत मोफत टँकर पुरवठा करू, कल्याण पूर्व भागातील मोहनसृष्टी ते पत्रीपूल विकास योजनेतील २४.०० मिटर रस्ता बाधित रहिवाशांच्या पूनर्वसनाबाबत  येत्या १ महिन्यात घराचा ताबा देणार, मोहनसृष्टी फेज-२ च्या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किंग आरक्षणानुसार पार्किंग सोसायटीच्या ताब्यात देणार आहोत, कल्याण (पूर्व) चेतना शाळा ते नेवाळी नाका श्रीमलंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या एमआयडीसी व डोंबिवली विभागातील सर्व रस्ते प्राधान्याने दुरुस्त करु, डोंबिवली पूर्व नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कामाबाबत तात्काळ निधी मंजूर करू, लोकग्राम स्कायवॉक संधर्भात निविदा पुन्हा लवकरात लवकर काढत आहोत, लोढा पलावा चौक ते निळजे स्टेशन रस्त्याचे सिमांकन (Demarcation) करून DP प्रमाणे रास्ता तयार करण्याबाबत चे निर्देश दिले आहेत, डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या २७ गावांमध्ये सुधारीत मालमत्ता कर आकारण्याबाबत ठीक ठिकाणी एक खिडकी योजना राबवू, निळजे-काटई नाका ते पत्रीपूल दरम्यान मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेज व अनधिकृत वाहनांवर कारवाई करू, २७ गावातील कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कायम करण्याबाबत प्रस्ताव महाराष्ट्र शासना कडे तात्काळ पाठवू, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अपुऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आयुक्तांनी सांगितले. सदर बैठकीला मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हासंघटक हर्षद पाटील, केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि केडीएमसी अधिकारी उपस्थित होते....

लासूरचे शेतकरी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सुलतानी संकटात शेतीपंपांची कनेक्शने तोडली जोडा ... "भारतीय कम्युनिस्ट पक्ष चा आंदोलनाचा इशारा"

लासूरचे शेतकरी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सुलतानी संकटात शेतीपंपांची कनेक्शने तोडली जोडा ...
"भारतीय कम्युनिस्ट पक्ष चा आंदोलनाचा इशारा"


चोपडा, बातमीदार.. राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयाने लासुर येथील गरीब शेतकऱ्यांची विजेचे बिल भरले नाहीत विज कनेक्शन तोडून त्यांची खरीप वजा रब्बी हंगामाची पिके धोक्यात आणली आहेत पावसात विसरायचे की चोपडा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री टेकाडे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कालपासून कनेक्शन कट कर याचे आदेश दिले आहेत. असे सांगितले परंतु लासुर येथील वीजतंत्री याने चार दिवसापासून शेतकऱ्यांची कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे

यावर्षी अति पावसामुळे त्यांच्या खरिपाचा हंगाम गेला त्यामुळे त्यांना वीज कनेक्शन भरता आले नाही तरीपण काही शेतकऱ्यांनी आगस्ट महिन्यामध्ये त्यांच्या यापैकी काही रक्कम भरलेले आहेत. असे असताना त्यांची वीज कनेक्शन तोडणे हे अन्यायकारक आहे तरी आपणास विनंती की ताबडतोबीने त्यांची वीज कनेक्शन जोडून त्यांच्या शेतातील उभे पीक कांदा कपाशी मक्का व येणारे रब्बी पीक यांचे होणारे नुकसान टाळावे.

अशी मागणी 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभे'ने केलेली आहे  शेतकऱ्यांची नावे अशी...   
१) सुभाष मार्तंड माळी यांचे गट नंबर 38 चे कनेक्शन तोडले दीड महिन्यापूर्वी १० हजार रुपये बिल भरून सुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने कनेक्शन तोडले चार दिवसापासून कनेक्शन तोडलेने कांद्या चे उभे पीक जळत आहे. 
२) शांताराम धनगर महाजन यांच्या गटनंबर 637 वरील ही  कनेक्शन कट केले आहे. 
३) रतिलाल सुकलाल माळी गट नंबर 640 यांचेही कनेक्शन तोडले त्यांच्यावर किती थकबाकी वगैरे काही माहिती देण्यात आली नाही.
४)युवराज निंबा महाजन (जगन्नाथ भिला पाटील यांचे नावे कनेक्शन)
५) उषाबाई शांताराम माळी
६)सुनीता मनोहर महाजन सिन्नरकर यांचे यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे त्यांचे खरिपाचा हंगाम गेल्यानंतर सध्याचे पीक व पुढील रब्बी हंगाम याचे नुकसान होत आहे या नुकसानीस महाराष्ट्र राज्य वीज मंडळ जबाबदार राहील कारण हे शेतकरी खरीप हंगाम आता गेल्यामुळे कर्जबाजारी झालेले आहेत तेव्हा या बाबतीत आपल्या कार्यालयाने निर्णय घेऊन त्यांचे कनेक्शन त्वरित जोडावीत अन्यथा शेतकरी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा किसान सभेने दिला आहे भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते अमृत महाजन, काँग्रेस शांताराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश महाजन, रमेश महाजन, वनामाळी यांनी महाराष्ट्र वीज मंडळातर्फे शेतकऱ्यांवर लाभलेल्या सुलतानी संकटाचा घटनेचा निषेध केलेला असून आंदोलनाचा वरीलप्रमाणे इशारा दिलेला आहे.

कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा अध्यक्ष प्रदिप घाणेकर यांचा वाढदिवस निराधार, अनाथ मुलांच्या समवेत साजरा !!

कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा अध्यक्ष प्रदिप घाणेकर यांचा वाढदिवस निराधार, अनाथ मुलांच्या समवेत साजरा !!


मुंबई, बातमीदार : 

रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी, राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा, तालुका कल्याण या संस्थेचे 'अध्यक्ष प्रदिपजी घाणेकर' यांचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने सामाजिक उपक्रम म्हणजेच "अंकुर बाल विकास केंद्र व अनाथ आश्रम" टिटवाळा येथील निराधार लेकरांच्या समवेत साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून या चार भिंतीच्या बाहेरील जीवनाचा, जगाचा आनंद देऊन "जरी होता नाही आलं अनाथांची माय.. तरी छोटासा प्रयत्न करू या होऊ मायेची दुधावरील साय" या उक्तीप्रमाणे वाढदिवस साजरा केला. 


      गेली कित्येक वर्ष कोंकण प्रतिष्ठान  ही संस्था टिटवाळा- कल्याण मध्ये नेहमीच आगळ्या वेगळ्या संकल्पना, उपक्रम राबविले आहेत. यामध्ये वाढदिवसाचे सुवर्णयोग साधून नागरिकांना पाणीपुरवठा जलवाहिनी उदघाटन, रक्तदान शिबीर, कापडी पिशिवी वाटप व आज हा वाढदिवस निराधाराला आधार देण्याचे कार्य करून एक अनोखा उपक्रम व बदलत्या युगासोबत सामाजिक  परिवर्तन या विचारसरणीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला.या उपक्रमाला सामाजिक विचार परिवर्तन चळवळीत खऱ्या अर्थाने सहभाग घेतला तो म्हणजे ज्यांचा वाढदिवस एक दिवस आधी होता अशा संस्थेच्या रणरागिणी सौ. प्रांजलताई प्रभात घाणेकर व संस्थेचे संपर्क प्रमुख राजूजी झोरे यांचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता पण दोघांनीही वाढदिवस हा ह्या निराधार लेकरांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि या उपक्रमाचा आनंद हा वाढला. 


      या उपक्रमाची सुरवात या तिघांनी या चिमुकल्या लेकरांसोबत केक कापून केली त्यानंतर बालशिवव्याख्याता रुद्र रविंद्र पालकर यांनी शिवव्याख्यानातून महापुरुषांचे विचार दिले. नंतर सर्व लेकरांसमवेत सामूहिक मनोरंजनाचे विविध खेळ, स्पर्धा घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलवला की तहानभूक हरपून ती लेकरं खेळात मग्न झाली हाच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांच्या डोळे आनंदाने भरून आले. खेळ व स्पर्धेचे बक्षिस देण्यात आले. वाढदिवस मूर्ती प्रदिपजी घाणेकर, राजूजी झोरे, प्रांजलताई घाणेकर यांना वाढदिवस भेट वस्तू मनभावे कलाविष्कार या संस्थेच्या वतीने लेकरांच्या शुभहस्ते देण्यात आले. नंतर या निराधार लेकरांना कोंकण प्रतिष्ठानच्या वतीने ऊबदार ब्लॅंकेट, टिफिन बॉक्स, सुनीलजी भुवड यांच्या वतीने वही पेन पेन्सिल, संदिपजी बाने यांनी पेन्सिल सेट, प्रफुल्लजी धुळप यांनी खाऊ वाटप केला. त्यानंतर अध्यक्ष प्रदिपजी घाणेकर यांनी स्वतः या लेकरांना भोजन करताना मायेचा घास भरवून एक वेगळाच आनंद होऊन साजरा केलेला वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. ह्या उपक्रमाला कोंकण प्रतिष्ठानची, सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, विद्यार्थी, लहान बाळ यांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली व खऱ्या अर्थाने संस्थेच्या एकजुटीची ताकद दिसली असा उपक्रम घेणारी संस्था ही पहिलीच असावी कारण या सामाजिक उपक्रमाची व वाढदिवसाची चर्चा सर्वत्र होत असून संस्थेचे गुणगाणं तोंड भरून कौतुक होत आहे. शिवसेना कल्याण ग्रामीण सचिव नामदेवजी बुटेरे, प्रसादजी फर्डे, विठ्ठलजी भांबळे,  जनसेवक विजयभाऊ देशेकर, योगेशजी गायकवाड, संतोषदादा देशेकर, दिलीपजी राठोड, नितीनजी सिंग, कुणबी युवाध्यक्ष मंगेशजी मांडवकर,  प्रविणजी शिबे, दिनेशजी मांडवकर, शैलेशजी शिगवण, संतोषजी दोडकडे, संतोषजी घाणेकर, केशवजी व्यापारी, प्रविणजी मोहने आदी अनेक मान्यवर मंडळी यांनी या उपक्रमाला सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्वच शिलेदार, उपाध्यक्ष राजेंद्रजी चव्हाण, योगेशजी नाचरे, सहसचिव निलेशजी जाधव, खजिनदार गणेशजी वागजे, कायदेविषयक सल्लागार जीवनजी हिवराळे सर, संपर्क प्रमुख सतीशजी गायकर, रमेशजी जाधव, लवजी कदम, ओमकारजी चिनकटे, नरेशजी सकपाळ, गणेशजी निकम, प्रदिपजी शिवगण, महेशजी चव्हाण, दिपकजी लोंढे, रविंद्रजी पालकर, अरविंदजी शिगवण, राजेशजी शिगम, रमेशजी करबेले, सचिनजी पोवार, मनोजजी जाबरे, विकासजी गुरव, विलासजी मिशाळ, शशिकांतजी मालप व जय महाराष्ट्र क्रिकेट संघ, वैद्यकीय समिती प्रमुख तसेच  महिला मंडळ यांच्या मेहनतीने यशस्वी झाला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन मुलांचे मनोरंजन सरचिटणीस मनीषजी लोंढे यांनी केले.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन.!!

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन.!!


कल्याण, बातमीदार :

साईनगर जाईबाई शाळा पुणे लिंक रोड या रस्त्याच्या उर्वरित राहिलेल्या काॅक्रिटकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.  


रमेश जाधव नगरसेवक माजी महापौर यांनी मागणी करण्यात आल्याने २० लक्ष रुपयांचे निधी मधुन सदरचे काम होणार असून संरक्षण भिंत, समाज मंदिर, व ईतर ही कामासाठी खासदारांना मागणी केल्याने निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.कार्यक्रमास श्री गोपाल लांडगे,शरद पाटील, महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे,सौ कांचन हुमणे,सौ पालव, चंदू प्रसाद, प्रमोद ओव्हाळ.उमेश अमोलीक,व अनेक महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.


शेतकऱ्यांना वेठीस धरणा-या तलाठ्यांचा संप अखेर अप्पर मुख्य सचिवांच्या 'बोळवणानंतर' स्थगित?

शेतकऱ्यांना वेठीस धरणा-या तलाठ्यांचा संप अखेर अप्पर मुख्य सचिवांच्या 'बोळवणानंतर' स्थगित?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या संकटामुळे बेजार झालेल्या बळीराजाचे ,पूर, अतिवृष्टी, चक्री वादळ या नैसर्गिक आपत्ती ने पुरते  कंबरडे मोडले आहे. अशा वेळी त्यांना शासनाच्या मदतीची गरज असतानाच नेकम्या अशा वेळी राज्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांनी संप पुकारला व कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय राज्याचे अप्पर सचिवांच्या जुजबी बोळवणानंतर हा संप स्थगित करण्यात आला. त्यामुळे यातून काय साध्य झाले. अशी चर्चा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यामध्ये ऐकायला मिळत आहे.


महसूल विभागाचे कान व डोळे म्हणजे तलाठी होय, त्यामुळे यांंना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. अगदी ऐतिहासिक काळापासून 'आण्णासाहेब' यांना भलताच मान होता व आजही आहे, काळानुरूप तो बदलत चालला आहे.


राज्यात २ हजार १०६ मंडळ अधिकारी व १२ हजार ६३६ तलाठी सजे आहेत, राज्यातील तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, महसूल उत्पन्नात वाढ करुन राज्याचा विकासाचा मार्ग प्रशस्त करणे, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम हे करत असतात. महसूल लेखे जोखे संगणकीय करण करणे, ७/१२ ई फेरफार, ई चावडी, या विविध योजना तलाठी, पटवारी,मंडळ अधिकारी, यांनी स्वखर्चाने रात्रदिवस काम करून महत्त्वकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेले आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य तलाठी संघ,पटवारी,मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष श्री डुब्बल यांनी सध्या राज्यात नैसर्गिक आपत्ती, ई पिक पाहणी व मोफत ७/१२ व ८ अ खातेदारांना वितरण या संदर्भात मंगळवारी तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन पर राज्य कार्यकारिणी या व्हाट्सअप ग्रुपवर मँसेज पाठवला होता. तो अन्य ग्रुप द्वारे रामदास जगताप, आयुक्त, राज्य समन्वयक जमावबंदी, यांना मिळाला. यावर त्यांनी या ग्रुपवरच 'मुर्खासारखे मेसेज पाठवू नका'असा मेसेज पाठवला, बस्स!

इकडे लगेचच महाराष्ट्र राज्य तलाठी संघ,पटवारी, आणि मंडल अधिकारी यांचा" इगो"हर्ट झाला, या मेसेज मुळे राज्यातील तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, निवासी नायबतहसिलदार, यांचा अपमान झाल्याची भावना यांच्या मध्ये निर्माण झाली आणि जगताप यांची बदली करण्याची मागणी होऊ लागली, तसे संघटनेने पत्रच महसूलमंत्री,बाळासाहेब थोरात, अप्पर सचिव महसूल डाॅ. नितीन कर्रीर यांना दिले.

७/८ आँक्टोबरला काळ्या फिती लाऊन, कामकाज, ११ ला निदर्शने, तर १२ आँक्टोबरला डी एस जी जमा करणे, मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देणे व १३ आँक्टोबर पासुन संपूर्ण कामकाजावर बहिष्कार ,असे संपाचे नियोजन केले होते. त्यानुसार गेली १२ दिवस संप सुरू होता, या काळात सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालये बंद होती. या संपाबाबत महसूल विभागाच्या वरीष्ठांनी चर्चेसाठी कार्यकारिणी सदस्यांना बोलावले. परंतु चर्चा फिस्कटली.

दरम्यान या वेळी राज्यातील बळीराजावर पुर, अतिवृष्टी, चक्रीवादळे यांचे मोठे संकट ओढवले होते, त्यांचे नुकसान भरपाई चे पंचनामे करून जगाच्या पोशिंद्याला ताबडतोब मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र नेमक्या अशा वेळी तलाठी संपावर गेले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांसह ,नागरिकांमध्ये कमालीचा संताप पसरला होता. अनेक शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते हे तलाठी कार्यालयात जात ,मात्र ते बंद असल्याने तलाठ्यांना शिव्याशाप देऊन परत येत, असे चित्र सर्वत्र दिसत होते.

तसे पाहिले तर ज्या कारणांसाठी संप पुकारला होता, तशी कारणे दररोज तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, यांच्या बाबतीत घडतात, तलाठ्यांना शिव्याशाप, मारहाण, जमीन मोजणीच्या वेळी मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या वर हल्ले, काही कामात चुका झाल्या तर वरीष्ठांच्या अश्लील शिव्या, अपमानास्पद वागणूक, असे प्रकार रोजच घडतात, तेव्हा तर मग रोजच संप, अंदोलन, करावे लागेल याचा अर्थ राज्य अध्यक्ष डुब्बल यांचा अपमान समर्थणीय आहे असे मुळीच नाही पण काळ, वेळ प्रंसग, याचा विचार करून संप करायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. आणि तसेही इतके दिवस संप करून काय हाती लागले? तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आणि अप्पर सचिव महसूल नितीन करीर यांच्याशी झालेल्या जुजबी चर्चेत कोणत्याही ठोस, लेखी आश्वासना शिवाय केवळ करतो, बघतो, अशा तात्पुरत्या बोळवण वर काल सांयकाळी संप स्थगित करण्यात आला. त्यामुळे या संपाविषयी महसूल विभाग, व कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया- अप्पर सचिव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप स्थगित करण्यात आला. कोणतेही लेखी आश्वासन दिले नाही.'- ज्ञानदेव डुब्बल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.

-आम्ही कार्यक्षेत्रात काम करताना आम्हाला रोज अपमानाला सामोरं जावं लागतं, कधी कधी तर जीवघेणे हल्ले ही होतात- एक तलाठी.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...