Tuesday, 27 September 2022

पर्यटन विकासासाठी जनसामान्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक ; - डॉ. मिलनकुमार चावले

पर्यटन विकासासाठी जनसामान्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक ;
     - डॉ. मिलनकुमार चावले 
 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७: पर्यटन हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय असून भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्नामध्ये ९ टक्के त्याचा वाटा आहे. तो जर वाढवायचा असेल तर, जनसामान्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय पुरातत्व खात्याचे औरंगाबाद परीमंडळाचे अधिक्षक पुरातत्त्वविद डॉ. मीलनकुमार चावले यांनी केले.
     जागतिक पर्यटन दिनानिमित्त्तडॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. चावले म्हणाले की औरंगाबाद परीमंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पुरातत्वीय व ऐतिहासिक स्थळांचा पर्यटन स्थळ म्हणून कसा विकास करता येईल याचे पीपीटीच्या माध्यमातून उदाहरणासह सादरीकरण केले. अंजिठा, वेरुळ, दौलताबाद, खुलताबाद, औरंगाबाद लेणी, बीबी-का- मकबरा येथील पुरातत्त्वीय स्थळांचा औरंगाबाद परीमंडळाने कसा विकास केला याबाबत माहिती दिली. ऐतिहासिक स्थळाच्या संरक्षण व जतन-दुरुस्ती कामात येणाऱ्या समस्या व त्यावर कशा प्रकारे उपाययोजन करावे याबाबात सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर अजिंठा व पितळखोरा लेणी येथील रोप -वे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. राजकीय पाठींबा, प्रशासनातील समनव्यातुन व सामान्य जनतेचा सहभाग आवश्यक आहे. पुरातत्त्व पर्यटनामध्ये आगामी काळामध्ये अनेक संधी आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावीत असे मार्गदर्शन करताना सांगितले.
     अध्यक्षीय समारोपात बोलतांना इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी इतिहास, पुरातत्व व पर्यटन क्षेत्राचा आढावा घेऊन भविष्यकाळामध्ये नव-नवीन संशोधनातून इतिहास मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. औरंगबाद शहर हे प्राचीन ते आधुनिक कालखंडातील अनेक संशोधनाची दालने उपलब्ध आहेत. त्यावर नव्याने प्रकाश टाकावा असे संशोधक विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया व्यक्त केली.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. संजय पाईकराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास लांडगे यांनी केले.
     या कार्यक्रमाला डॉ. उमेश बगाडे, डॉ. गणी पटेल डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. कामाजी डक, श्री. श्रीकांत उमरीकर, श्री. लक्ष्मीकांत सोनवटकर, श्री. सुधीर बंलखंडे, श्री. कुमार भवर, श्री. अर्जुन पटेकर, श्री. सुरेश मादळे, श्री. डॉ. सुनिता सावरकर, श्री. जगदीश शेळके, मधुरा जगताप, तसेच इतिहास विभागातील विद्यार्थी, शहरातील मान्यवर व पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सिल्लोड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र बन्सोड तर व्हाईस चेअरमन पदी टेकचंद दुधे यांची बिनविरोध निवड !

सिल्लोड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र बन्सोड तर व्हाईस चेअरमन पदी टेकचंद दुधे यांची बिनविरोध निवड !


      औरंगाबाद दि २७ सप्टेबंर: सिल्लोड शहर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन , व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी राजेंद्र भीका बन्सोड तर व्हाईस चेअरमनपदी टेकचंद बाबुराव दुधे यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते नूतन चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला. 

      यावेळी दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक शेख सलीम हुसेन, सुनील दुधे , पांडुरंग डवणे, फहिम पठाण, संदीप हाडोळे, संतोष धाडगे, यांच्यासह सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक नंदकिशोर विठ्ठलराव सहारे, विठ्ठल म्हतारजी सपकाळ, किशोर हरीलाल अग्रवाल, पठाण जाफरखान तैवरखान, अब्दुल रहेमान शेख भिकन, सुरेश अंबादास प्रशाद, मोहंमद युसूफ गुलाम जीलानी, प्रभाकर कोंडीबा दुधे, मीराबाई पांडुरंग पाटील, संगीताबाई रामेश्वर भाग्यवंत यांच्यासह आदींची उपस्थिती होती

वस्त्रनगरी ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’च्या नूतन वास्तूला 'महापौर सौ. जयश्री महाजन' यांची सदिच्छा भेट !!

वस्त्रनगरी ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’च्या नूतन वास्तूला 'महापौर सौ. जयश्री महाजन' यांची सदिच्छा भेट !!


जळगाव, अखलाख देशमुख : शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील ८० फुटी कानळदा रिंगरोडवर राधाकृष्ण नगर चौक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’च्या भव्य ७ मजली वास्तूचा घटस्थापनेच्या शुभमूहूर्तावर शुभारंभ झाला. यानिमित्ताने मंगळवार, दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी सदिच्छा भेट देऊन संचालक मुकेश ग्यानचंदजी हासवानी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी महापौर सौ. महाजन यांनी दालनातील सर्व मजल्यावर साकारलेली विविध वस्त्रांच्या श्रृंखलेचे अवलोकन करीत सोयी-सुविधा तसेच उत्पादनांची माहिती सविस्तर जाणून घेतली. 

शहरवासियांसोबतच जिल्ह्यातील सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रूंसाठी उपयुक्त अशे दालन हासवानी परिवाराने साकारले असल्याचे मनोगतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’च्या सहकारी वैशाली सपकाळे यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे शॉल देऊन यथोचित स्वागत केले. या प्रसंगी मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्यासह श्री.विनय पारख व ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’चे सहकारी उमेश बाविस्कर उपस्थित होते.

"आज झालेले मंत्रीमडळाचे निर्णय"

"आज झालेले मंत्रीमडळाचे निर्णय" 


मुंबई, अखलाख देशमुख, दि २७ : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय....

✅ राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार. 

✅ विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.

✅ नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणारी योजना.

✅ पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरणार.

✅ इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.

✅ इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार.

✅ अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीच्या रकमेत ५० हजारापर्यंत वाढ. 

✅ वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार

✅ राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू.

✅ दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय 

✅ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.

✅ महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय. दुरुस्तीसह पुन्हा लागू होणार.

✅ एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ.

✅ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार

अदानी अंबानीला सवलती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष !!

अदानी अंबानीला सवलती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष !!

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची केंद्र सरकारवर टीका*


जुन्नर, अखलाख देशमुख, दि. २७ - पिकाला योग्य हमी भाव द्या या शेतकऱ्यांच्या मागणी व त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं, मात्र अदानी अंबानीला मोठया प्रमाणात सवलती दिल्या जातात, असा भेदभाव केला जात असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेवर केली. 
      पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवशीच शुभेच्छा देऊन आपल्या जीवनाचा शेवट केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिली. जुन्नर तालुक्यातील बनकर येथील निवासस्थानी अंबादास दानवे यांनी केदारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात मोठया संख्येने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे खेदजनक असल्याचे दानवे यांनी म्हटले. राज्यातील अतिवृष्टीबाबत असलेले नियम हे इंग्रज्यांच्या काळापासून लावले आहेत ते आजही सुरू आहेत. एका मंडळात ६५ एमएम पाऊस 
होणे आवश्यक असतं, मात्र अनेकदा अतिवृष्टी झाली की त्या मंडळात पर्जन्यमापक यंत्रक नसत, त्यामुळे त्या भागाला अतिवृष्टी पासून वंचीत राहावं लागतं असल्याचे त्यांनी म्हटले.

एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे साठवलेला कांदा सडतोय अशा दुहेरी मार जुन्नरमधील कांदा उत्पादक शेतकरी सहन करतोय. यातूनच दशरथ केदारी या शेतकऱ्याने पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवशीच शुभेच्छा देत आत्महत्या करत प्रातिनिधीक स्वरूपात केंद्राचा निषेध केला आहे. मात्र या घटनेकडे राज्याचे व पर्यायी केंद्र सरकारचेही दुर्लक्ष झाले हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.


यावेळी तहसिलदार रविंद्र सबनीस, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, माजी आमदार बाळासाहेब दांगट, मार्केट कमिटी सभापती दिलीप डुंबरे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, उदापूरचे सरपंच रवी आंबेकर, बबन कुलुडे, प्रसन्ना डोके, राहुल सुकाळे, प्रभाकर शिंदे,अशोक शिंदे, शरद डमढेरे, राजू नारुडकर,विशाल बनकर व अन्य प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

आनंद नगर येथे "मनसे" शाखेचे उदघाटन !!

आनंद नगर येथे "मनसे" शाखेचे उदघाटन !!


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : वार्ड क्रमांक ११३ प्रभाग क्रमांक ३७ आनंदनगर येथे "मनसे" शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला... मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांच्या मार्गदर्शनात शहर उपाध्यक्ष शुभम बोराडे यांनी केले होते... याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, , महानगर अध्यक्ष बिपीनजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला माता-भगिनींचा मोठा सहभाग शाखेच्या उद्घाटनप्रसंगी होता लवकरच प्रभागातील पाण्याच्या समस्येवर आंदोलन घेण्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले...

उपशहराध्यक्ष शेखर रणखांब पाटील, अमित जैस्वाल, विभाग अध्यक्ष प्रशांत आटोळे, प्रशांत इंगळे शहरसचिव सागर राजपूत, सोशल मीडिया सेलचे हेमंत जाधव, प्रशांत दहिवाडकर, शहर सचिव रामकृष्ण मोरे, चिन्मय कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.. यावेळी राहुल सुरडकर, हनुमान जाधव, अर्जुन मुळे यांची पदावर नियुक्ती करण्यात आली.. शुभम बोराडे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

भिवंडीत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या ; तर एकीची आत्महत्या !

भिवंडीत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या ; तर एकीची आत्महत्या !


भिवंडी, दिं,२७, अरुण पाटील (कोपर )
         भिवंडी हे शहर यंत्रमाग नगरी व गोदामांचे शहर म्हणून ओळखले जात असून या शहरात रोज चोऱ्या, घरफोड्या, खून, या घटना घडत असतात. अश्यातच भिवंडी पोलीस उपयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात गेल्या ११ दिवसांत अनैतिक संबधातून ३ महिलांची हत्त्या तर एकीने आत्महत्त्या केल्याची घटना समोर आली आहे.या पैकी दोन प्रेयसी एक पत्नी तसेच आईचा समावेश मृत महिलांमध्ये आहे.
         पहिल्या घटनेतील मृत महिला पतीला सोडून उल्हासनगरमधील तिच्या ओळखीचा संतोष चौरसिया याच्या सोबत राहत असताना तिला कामाची गरज होती. त्यामुळे संतोषने तिला भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे गावात राहणाऱ्या आरोपी राजकुमार पासवान याच्याकडे आणून सोडले. चार महिन्यांपूर्वीच त्यांची पत्नी मूळ गावी बिहारला निघून गेली होती. त्यानंतर मृत व आरोपीमध्ये सूत जुळून अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यातच गेल्या चार महिन्यापासून दोघेही लग्न न करता एकत्र संभधात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. मात्र त्यांच्यात काही कारणांवरून वारंवार वाद होत असल्याने मृत ममतादेवीने दोघातील अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला व पोलिसांना देईन, अशी धमकी राजकुमारला देत होती. त्या कारणाने १३ सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद होऊन आरोपी राजकुमारने ममतादेवीचे डोके राहत्या घरात जमिनीवर आदळून तिची हत्त्या केली. त्यानंतर त्याच दिवशी तो दाराला कडी लावून फरार झाला.      
              तर दुसरी घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल्हेर गावात घडली. यात एक मृत आई मृत आई ही काल्हेर गावातील एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होती. तर आरोपी मुलगा कृष्णा हा अविवाहित असून त्याचे घटस्फोट झालेली चुलत बहिण बबिता सोबत मागील ३ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण मृत आईला लागल्याने तिने कृष्णाच्या या अनैतिक संबंधास विरोध करीत होती. त्यामुळे पोटच्या मुलानेच आईची हत्त्या केली. 
            तिसरी घटना भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी येथे घडली.यात आरोपी सद्दाम आणि मृत कविता या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याने दोघेही गेल्या ५ ते ६ वर्षांपासून भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. तर मृत महिला रेडलाईट एरियात देह विक्रीचा व्यवसाय करत होती. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजताया दोघात भांडण होऊन वाद विकोपाला गेल्याने सद्दाम याने राहत्या घराच्या बेडरूममध्ये कविताचा गळा आवळून खून केला व गुन्हा लपवण्यासाठी त्याने कविताच्या नातेवाईकांनाही फ़ोनद्वारे सदर घटनेची माहिती कळवली व रुग्णवाहिकेतून मृतदेह विजापूर (कर्नाटक) नेऊन विल्हेवाट लावल्याचा प्लॅन रचला होता. पण तो फसला गेला. पोलिसांनी अटक करून सद्दाम याच्यावर भादवि कलम ३०२, २०१ अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
            चौथी घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंबडं पाडा येथे घडली असून यात पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. रेणूका सुनिलकुमार थालोर (२४) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. येथील सोमेश्वर अपार्टमेंटमध्ये तिच्या पतीसोबत राहत होती.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...