Friday, 9 October 2026

वालधुनी नदी स्वच्छ व पुनर्जीवित करण्याची मागणी; नगरसेवक राहुल कोट यांचे महापालिकेला निवेदन !!

वालधुनी नदी स्वच्छ व पुनर्जीवित करण्याची मागणी; नगरसेवक राहुल कोट यांचे महापालिकेला निवेदन !!

*कल्याण :* वालधुनी नदी स्वच्छ व पुनर्जीवित करण्यासाठी तसेच नदीतील गाळ काढून नदीची रुंदी आणि खोली वाढवण्याची मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक राहुल सुनंदा मुकुंद कोट यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व संबंधित विभागाकडे निवेदन दिले आहे. या निवेदनाची एक प्रत त्यांनी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था, कल्याण पश्चिमचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर यांच्याकडेही सुपूर्द केली.

दिनांक 06/10/2026 रोजी देण्यात आलेल्या या निवेदनाबद्दल संस्थेच्या पदाधिकारी सुनिता खेताडे, विशांत कांबळे, सुरेश भिवाजी अहिरे, नंदा म्हमाणे, दैवशीला झिरपे आणि दीपाली आमडोस्कर यांनी नगरसेवक राहुल कोट यांचे आभार मानले आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वळवा; ॲड. आकाश वेदक यांची मागणी !!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वळवा; ॲड. आकाश वेदक यांची मागणी !!

        ॲड. आकाश वेदक (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय) 

*डोंबिवली :* महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पावसाची कमतरता, पाणीटंचाई आणि पीक नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करून उपाययोजना सुरू केल्या असतानाच, डोंबिवली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी अशी मागणी ॲड. आकाश वेदक (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय) यांनी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मागणीद्वारे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला, नवरात्रोत्सवाला किंवा देवीच्या भक्तीला विरोध नाही. उलट नवरात्रोत्सवाचे धार्मिक व पारंपरिक स्वरूप कायम राहावे, हीच भूमिका आहे.

मोठ्या खर्चाच्या AC Dome मध्ये गरबा-रास आयोजित करण्याऐवजी देवीची मूर्ती विधिवत आणून प्रतिष्ठापना करावी आणि नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज आरती करून धार्मिक परंपरा जपावी. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून तो निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

*प्रमुख मागण्या :*

*1.* AC Dome मधील गरबा-रासचा कार्यक्रम रद्द करून नवरात्रोत्सव साध्या व धार्मिक स्वरूपात साजरा करावा.
*2.* देवीची मूर्ती विधिवत आणून प्रतिष्ठापना करावी व दररोज आरती करावी.
*3.* कार्यक्रमासाठी होणारा खर्च व जमा होणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी द्यावा.
*4.* सदर निधीचा वापर पीक नुकसान भरपाई, चारा, पिण्याचे पाणी, बियाणे व शेती साहित्यासाठी पारदर्शक पद्धतीने करावा.

"आज महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना डोंबिवलीने उत्सवाबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करावा. देवीची भक्तीही राहू द्या आणि संकटात असलेल्या अन्नदात्याची मदतही होऊ द्या," असे आवाहन ॲड. आकाश वेदक यांनी केले आहे.

Thursday, 8 October 2026

कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !!

कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !!

*कल्याण :* कांबा, कल्याण येथे नियोजित महिला मेळाव्यासाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे कल्याणमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले.

प्रवासादरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, प्रदेश प्रवक्ते व कल्याण-भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख महेश तपासे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, कल्याण पश्चिम अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रूपेश थळे, तुषार वैद्य, निखिल कदम, ओम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याव्यतिरिक्त ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, बजरंग तांगडकर, शिल्पा तांगडकर, शांताराम झावरे, मल्लिकार्जुन बिराजदार, विरेंद्र जाधव, संकेत नरसाळे, सुनील दुबे, बजरंग ढोकरे, शशिकांत पात्रे, लक्ष्मण शिंपी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेरीवाला हटाव सह पथक प्रमुखावर हप्तेखोरीचा आरोप !!

फेरीवाला हटाव सह पथक प्रमुखावर हप्तेखोरीचा आरोप !!

*डोंबिवली, विनोद गिरी:* 'फ' प्रभाग क्षेत्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत स्टेशन परिसर ते 90 फूट रोड, ठाकुर्ली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

छोटे फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि इतर फेरीवाल्यांनी सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल शेटे यांच्याकडे तक्रार केली आहे. 'फ' प्रभागात कार्यरत असलेले फेरीवाला हटाव सह पथक प्रमुख वेदपाल तीसांबर हे दरमहा ठराविक रकमेची मागणी करतात. पैसे न दिल्यास माल जप्ती आणि तोडक कारवाईची धमकी देऊन पुन्हा धंदा करू दिला जाणार नाही, अशी भीती दाखवून आर्थिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.

तसेच ठाकुर्ली येथे बांबूचे शेड उभारून अनधिकृत चिकन सेंटर सुरू आहेत. त्यांच्याकडून रोज मोफत चिकन घेऊन जाणे आणि दरमहा मोठ्या रकमेचा हप्ता मागितला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. उपजीविकेच्या भीतीने फेरीवाले उघडपणे तक्रार करण्यास धजावत नसल्याचे सांगण्यात आले.

वेदपाल तीसांबर हे मूळचे सफाई कामगार असून सध्या त्यांची नेमणूक 'फ' प्रभागात फेरीवाला सह पथक प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. या पदाचा गैरवापर करून ते हप्ते मागत असल्याची लेखी तक्रार विशाल शेटे यांनी 'फ' प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.

वेदपाल तीसांबर यांना तातडीने या पदावरून हटवून कमी जबाबदारीच्या विभागात बदली करावी आणि त्यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे. प्रशासनाने लवकर कायदेशीर पावले उचलली नाहीत तर सामान्य डोंबिवलीकरांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.

"डोंबिवली स्टेशन परिसरातील फुटपाथ मोकळे करायचे असतील तर असे हप्तेखोर अधिकारी नेमून कसे चालेल? हेच पैसे घेऊन अभय देत असतील तर अशा कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे," अशी ठाम भूमिका विशाल शेटे यांनी मांडली आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !!

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !!

*पुणे, विनोद गिरी:* ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार भाई जगताप, हेमंत पाटील, अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, अमित गोरखे, भिमराव तापकीर, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, महापौर मंजुषा नागपुरे, सभापती युवराज काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अंत्यसंस्कारापूर्वी डोणजे येथे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिक, कलाकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार; लक्ष घालण्याचे आश्वासन !

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार; लक्ष घालण्याचे आश्वासन !

*कल्याण (संजय कांबळे) :* शहापूर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या खरांगण (सोगाव) येथील वयोवृद्ध महिला शेतकरी सोनूबाई वाळकू हरड यांनी गावालगत शाई नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे आपली संपूर्ण भातशेती वाहून गेल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

सोनूबाई हरड यांची 6 ते 7 एकर शेती शाई नदीलगत असून त्यात त्या भात, भुईमूग, उडीद, मूग, नागली आदी पिके घेत होत्या. मात्र 5-6 महिन्यांपूर्वी कोणालाही न विचारता सुमारे 98 लाख रुपये खर्चून बंधारा बांधण्यात आला. कागदोपत्री ठेकेदार शशिकांत गायकवाड असला तरी प्रत्यक्ष काम एका वनपालाच्या मुलाने केल्याचा आरोप आहे. या बंधाऱ्यामुळे भातशेती वाहून जाऊन जमीन नापीक बनल्याने उपासमारीची वेळ आल्याचे हरड यांनी सांगितले.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, वनविभाग आणि जलसंधारण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. दबाव वाढल्याने संबंधित ठेकेदार प्रत्येक कार्यालयात जाऊन "आमचं मिटलंय" असे सांगत असल्याचा आणि काही अधिकाऱ्यांकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर सोनूबाई हरड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत भारती हरड, निता हरड, कल्याणी हरड, भूमिका हरड, ललिता हरड, छाया हरड, दुर्गा हरड, करुणा हरड, संजना हरड आणि आकांक्षा हरड आदी महिला उपस्थित होत्या.

खासदार सुळे यांनी संपूर्ण माहिती घेऊन या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडू, असे आश्वासन दिले.

वरप-कांबा येथील राष्ट्रवादीचा महिला मेळावा प्रचंड यशस्वी; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल !!

वरप-कांबा येथील राष्ट्रवादीचा महिला मेळावा प्रचंड यशस्वी; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल !!

*कल्याण (संजय कांबळे) :* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भरतभाऊ गोंधळे आयोजित कल्याण तालुक्यातील वरप-कांबा येथील महिला मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी झाली. या मेळाव्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्र शासनावर चौफेर टीका केली.

व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई वेखंडे यांच्यासह उल्हासनगर, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाचे जिल्ह्यातील नेते भरतभाऊ गोंधळे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविकात ते म्हणाले, "मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. साहेबांना आणि ताईंना मानणारा मोठा वर्ग या परिसरात आहे, त्यांच्या आग्रहाने हा मेळावा घेतला."

याप्रसंगी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "या सरकारमधील आमदार-खासदार हे कॉपी करून पास झाले आहेत. महागाई इतकी वाढली की साध्या बिस्किटाचा आकार कमी झाला, पण किंमत वाढली. लाडक्या बहिणीचा मतासाठी वापर केला गेला. 2029 पर्यंत महिला आरक्षण लागू केले नाही तर आम्ही प्रचंड विरोध करू." महिलांची ही मोठी उपस्थिती भविष्यातील बदलाची नांदी असल्याचे भाकीतही त्यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, "सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे. शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. या सरकारला 2029 ला घालवायचे आहे." तर कल्याणमधून हजारो मतदारांची नावे गायब केल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला.

या मेळाव्यात संगीत मैफलीने रंगत आणली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हारळ, वरप, कांबा परिसरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत पाटील, तर सेक्रेटरीपदी सुरज कडू !!

जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत पाटील, तर सेक्रेटरीपदी सुरज कडू !! उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे ) : सर्वांचे लक्ष ला...