Sunday, 30 November 2025

पंचरत्न मित्र मंडळ आर.सी.एफ चेंबूर व यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथे शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ आर.सी.एफ चेंबूर व  यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथे शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप !!

**शाळेसाठी कपाट, खुर्च्या, टेबल यांची दिली भेट

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड (भारत सरकार चा उपक्रम)आणि पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) (आर.सी. एफ, चेंबूर, मुंबई- ४०० ०७४) यांच्या संयुक्त विद्यमाने संत अग्रसेन हायस्कूल अँड न्यू कॉलेज, कळवा, ठाणे येथेशनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी शैक्षणिक साहित्य वह्या वाटप तसेच शाळेसाठी कपाट, खुर्च्या टेबल, सतरंज्या, खेळाचे साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. अनुपम सोनवणे साहेब महाप्रबंधक-क्रय, संविदा अनुभाग, राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लि., चेंबूर, मुंबई,मा.श्रीमती कविता शिकतोडे मॅडम संचालिका-प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निकल, एस.एन.डी.टी. महिला युनिव्र्व्हसिटी, सांताकृझ (प), मुंबई, मा.डॉ. पवन गिरीधारीलाल अग्रवाल साहेब आंतरराष्ट्रीय व्याख्याते,अध्यक्ष कमलाबाई शैक्षणिक संस्था, मुंबई, तर विशेष पाहुणे म्हूणन मा.श्री.संतोष शिकतोडे साहेब उप अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका, मा.श्री.भालचंद्र पाटे साहेब अध्यक्ष - स- मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, मुंबई, पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष-अशोक भोईर, सचिव- प्रदीप गावंड, रमेश पाटील- उपाध्यक्ष, सचिन साळुंखे (खजिनदार), वैभव घरत, मॅथ्यू डिसोजा (सहसचिव), सह सचिव -सौ. स्नेहा नानिवडेकर, सदस्य - नीलम गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. 

समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
                मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भौइर,  सचिव प्रदीप गावंड, रमेश पाटील, सचिन साळुंखे ,वैभव घरत, सुशील मिस्त्री , रहीम शेख , सचिन राखाडे, सूर्यकांत वासुदेव ,डिसोजा  सौ. स्नेहा नानविडेकर  व नीलम गावंड,श्री मंदार  भोपी मॅथ्यू डिसूझा या पदाधिकारीनि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

नागरी संरक्षण दल, क्षेञ-१, बृहन्मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित नागरी संरक्षण क्षमता, बांधणी व विकास (ToT) पाठ्यक्रम क्र.०६/२०२५ या प्रशिक्षणाचा समारोप संपन्न !!!

नागरी संरक्षण दल, क्षेञ-१, बृहन्मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित नागरी संरक्षण क्षमता, बांधणी व विकास (ToT) पाठ्यक्रम क्र.०६/२०२५ या प्रशिक्षणाचा समारोप संपन्न !!!

बृहन्मुंबई प्रतिनिधी : ता . 30, मा. संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार उपनियंञक, नागरी संरक्षण दल, क्षेञ-१, बृहन्मुंबई अंतर्गत, मा.अतिरिक्त नियंञक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई यांच्या आदेशाने व उपनियंञक श्री.विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  दि. १८ ते २५/११/२०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते १७.४५ या वेळेत AIKC D.Ed, B.Ed. काॅलेज खिलाफत हाऊस, भायखळा पोलिस स्टेशनजवळ, मुंबई येथे Capacity Building of CD Volunteer Course No. 06/2025 हा एकूण 30 स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण सुरु करण्यांत आला होता.

      प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी श्री. धर्मेंद्र जाधव (सउनि), मास्टर ट्रेनर व मुख्यक्षेञरक्षक, बृहन्मुंबई श्री.रविंद्र वाडेकर यांनी विविध विषयांवरील व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. तसेच स्वयंसेवकांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

     समारोप कार्यक्रमास उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्य, उपप्राचार्य, इतर विभाग प्रमुख, मुख्यालय मधिकारी श्री.शहेजाद लाहेरी, अग्नी सुरक्षाचे श्री.समीर झा व त्यांची संपुर्ण टीम, विभागीय क्षेत्ररक्षक श्री. रफीक शेख, श्री.नसीर सय्यद अब्बास, सामाजिक कार्यकर्ते इमरान मुल्ला, शायना, स्वयंसेविका प्रिती काटवटे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. उपनियंत्रकांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून पुढील कार्यासाठी प्रेरित करुन नागरी संरक्षणच्या स्थानिक, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रशिक्षण पाठ्यक्रमात सहभागी व्हावे व इतरांना सुद्धा नागरी संरक्षण दलात सामील होण्यांस प्रवृत्त करावे असे आवाहन केले.

Saturday, 29 November 2025

६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास येणाऱ्या लाखो संख्येने भीम अनुयायी करिता रस्ता केला दुरुस्त !!

६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास येणाऱ्या लाखो संख्येने भीम अनुयायी करिता रस्ता केला दुरुस्त !!

" *ॲड प्रशांत भानुदास चंदनशिव यांच्या कामाला यश*..

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णकृती पुतळा परिसर, सुभाष टेकडी उल्हासनगर ४ येथील सांडपाणी चे पाइपलाइन टाकण्या करिता रस्ता खोदून त्यावर परत माती टाकून बुजविण्याचे काम सुरू होते, परंतु खोदकाम केलेला रस्ता हा काँक्रीटिकरन व्हावे ह्या करीता *ॲड प्रशांत भानुदास चंदनशिव* ह्यांनी दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी उल्हासनगर महानगरपालिका कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग ह्यांचा कडे सदर बाबत लेखी तक्रार केली होती ह्या तक्रार ची दखल कार्यकारी अभियंता तसेच प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मिडिया नी देखील घेतली होती ह्यामुळे काल शुक्रवार दिनांक २८/११/२०२५ रोजी सायंकाळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळा चा परिसरात खोदकाम केलेल्या रस्त्याचे शेवटी काँक्रिटीकरण करण्यात आले...

अर्ज केलेला पत्र तसेच पेपर आणि न्यूज चॅनेल वर आलेले फोटो व्हिडिओ ह्यासोबत जोडत आहे...

रस्त्याचे काम पाहणी करतांना स्वतः *ॲड प्रशांत भानुदास चंदनशिव, अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव,महेंद्र काशिनाथ अहिरे*...


आपला,
*अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव*
     09359861168
अध्यक्ष - उल्हासनगर शहर 
*भारतीय मानवाधिकार परिषद*
*विशेष कार्यकारी अधिकारी SEO*

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 29 नोव्हेंबर रोजी ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रम !!

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 29 नोव्हेंबर रोजी ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रम !!

कल्याण दि.२९ नोव्हेंबर :
पोलीस अधिकारी आणि पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये असणारी अनावश्यक भिती कमी करण्यासह समाजातील पोलिसांबद्दलचे नकारात्मक चित्र बदलण्याच्या उद्देशाने आज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात "व्हिजिट माय पोलीस स्टेशन" उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना पोलीस ठाण्याची माहिती, येथील कार्यपद्धती आणि इतर महत्वाची माहिती देण्यात आली.

हा उपक्रम विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन चे *वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.अशोक कोळी साहेब* ह्यांचा तर्फे *व्हिजिट माय पोलीस स्टेशन* या अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात आला. दरम्यान याचा प्रमुख उद्देश पोलिस तसेच जनतेमध्ये चांगला संवाद निर्माण व्हावा, जनतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करणे, पोलिसांच्या कामाच्या पद्धतीची माहिती देणे, तसेच जनतेला भारतीय कायद्याची माहिती देऊन जागरूकता वाढवणे. येणाऱ्या आगामी सण उत्सव यासाठी पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय साधणे. हे सदर अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट होते... वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.अशोक कोळी साहेब, गोपनीय कक्ष पोलिस हवालदार दिनेश शिर्के साहेब,पोलिस हवालदार चेतन खांबेकर साहेब ह्यांनी अतिशय नम्रपणे व कायदेशीर कारवाई पासून जनतेने कसे सतर्क राहून कायदा सुव्यवस्था न बिघडवता कायद्यात राहून कसे चालावे ह्याची चांगली माहिती दिली..

यावेळी बहुसंख्येने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शालेय शिक्षण विभाग, समाजसेवक, नगरसेवक, पत्रकार, व्यापारी आदि अभियान मध्ये उपस्थित होते..

तसेच सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा संरक्षणासाठी तेथील पोलिस चौकी चालू करण्याची मागणी केली व ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पोलिस पेट्रोलिंग वाढवावी ही विनंती केली... 

यावेळी *भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष - अभिजित भाऊसाहेब चंदनशिव, अध्यक्षा - विनीता वाघ,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी टाले,वंचित बहुजन उल्हासनगर शहर महिला अध्यक्षा - रेखाताई उबाळे,उल्हासनगर शहर पूर्व उपाध्यक्ष - महेंद्रजी अहिरे,महिला उपाध्यक्ष - वंदनाजी अवचार,धम्मउपासिका - लताजी पडघाण* उपस्थित होते..

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये मुरबाडच्या "भांडे कराटे" क्लासेसचे घवघवीत यश !!

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये मुरबाडच्या "भांडे कराटे" क्लासेसचे घवघवीत यश !!

**39 मेडल सह तिसऱ्या क्रमांकाची बेस्ट टिम ट्रॉफीवर मिळविला ताबा **

मुरबाड, { मंगल डोंगरे } : दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अंधेरी स्पोट्स काॅम्पलेस मुंबई येथे झालेल्या ४ चौथ्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये मुरबाडच्या भांडे कराटे क्लासेस  मधिल विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन तब्बल ३९ मेडल सह तिसऱ्या क्रमांकाची बेस्ट टिम ट्रॉफी जिंकुन आपला दबदबा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुध्दा कायम ठेवला आहे.

यावेळी भांडे कराटे क्लासेस मधिल फक्त २० विद्यार्थांनी सहभाग घेवुन २३ गोल्ड मेडल, १० सिल्वर मेडल, ६ ब्राॅंझ मेडल असे एकुण ३९ मेडल सह तिसऱ्या क्रमांकाची बेस्ट टिम ट्रॉफी जिकल्याबद्दल त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेत सत्व तेजस शाह २ गोल्ड मेडल, निल अनंत वालकोळी २ गोल्ड मेडल, ओम रवींद्र म्हारसे २ गोल्ड मेडल, सई रवींद्र म्हारसे २ गोल्ड मेडल, सृष्टी मारुती डांगे २ गोल्ड मेडल,आझाद अनिल प्रसाद २ गोल्ड मेडल, सृष्टी वैभव बांगर १ गोल्ड मेडल,१ सिल्वर मेडल, देवार्ष रजनीकांत काकडे १ गोल्ड मेडल,१ सिल्वर मेडल, नवीधा दिलीप तबले १ गोल्ड मेडल,१ सिल्वर मेडल, विराज जगदीश सूर्यराव १ गोल्ड मेडल, १ सिल्वर मेडल, गणेश सुनील चव्हाण १ गोल्ड मेडल,१ सिल्वर मेडल, प्रणित प्रविणकुमार पडवळ १ गोल्ड मेडल,१ सिल्वर मेडल, कनक तेजस शाह १ गोल्ड मेडल,१ ब्राँझ मेडल, भार्गवी रामचंद्र भांडे १ गोल्ड मेडल,१ ब्राँझ मेडल,सार्थक मारुती डांगे १ गोल्ड मेडल,१ ब्राँझ मेडल, तन्मय रत्नाकर माळी १ गोल्ड मेडल,१ ब्राँझ मेडल, श्रीजल सचिन भोईर १ गोल्ड मेडल, वैष्णवी अमित आंबवणे १ सिल्वर मेडल,१ ब्राँझ मेडल, भालचंद्र नंदकुमार टेकडे २ सिल्वर मेडल, रहमत अन्वरली खान १ सिल्वर मेडल,१ ब्राँझ मेडल,असे एकुण ३९ मेडल विद्यार्थ्यांनी मिळवुन भांडे कराटे क्लासेसचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ केल आहे .

भांडे कराटे क्लासेस मध्ये विद्यार्थांना कराटे प्रशिक्षणा सोबत आयुर्वेदीक आहार, पोषण योगा, मेडिटेशन, फिटनेस ट्रेनिंग, सेल्फ डिफेंन्स इ. प्रशिक्षण दिले जात आहे. पालकांनी आपल्या मुलांचे भांडे कराटे क्लासेस मध्ये प्रवेश घेवुन मुलांचे आरोग्य निरोगी बनवावे असे मास्टर :- विवेक भांडे व  मास्टर :- महेंद्र भांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

भारत-श्रीलंका व्यापार, उद्योगांचा विकास संयुक्तरीत्या करू - रवींद्र माणगावे


भारत-श्रीलंका व्यापार, उद्योगांचा विकास संयुक्तरीत्या करू - रवींद्र माणगावे 

*महाराष्ट्र चेंबरतर्फे श्रीलंका दूतावासासोबत चर्चासत्र संपन्न* 

मुंबई, राहुल बैसाणे -  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री  ॲण्ड ॲग्रिकल्चर  (MACCIA) आणि श्रीलंका दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबरच्या मुख्य कार्यालय मुंबईत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली व  श्रीलंका वाणिज्य दूतावासच्या प्रियांका विक्रमसिंघे यांच्या प्रमुख उपस्थित चर्चासत्र संपन्न झाले. 

या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,  उपाध्यक्ष एस. डी. परब, उपाध्यक्ष शंकर शिंदे, उपाध्यक्ष दिलीप गुप्ता, आंतरराष्ट्रीय व्यापार समितीचे अध्यक्ष गगन महोत्रा, श्रीलंका निर्यात विकास मंडळाच्या सहाय्यक संचालक श्रीमती कुमुदिनी इरुग्गलबंदारा, काऊन्सिल व्यावसायिक श्रीमती शिरानी अरियाराथने, श्रीलंका वाणिज्य दूतावासच्या कॉन्सुलेट जनरल श्रीमती प्रियांका विक्रमसिंघे उपस्थित होते. 

सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावास (Consulate General) Ms. प्रियांगा विक्रमसिंघे यांचा सत्कार केला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांनी महाराष्ट्र चेंबरची माहिती देऊन राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या कार्याची माहिती दिली. भारत व श्रीलंका दोन्ही देशांदरम्यान उत्पादन, सेवा, कृषी, लॉजिस्टिक्स आणि उदयोन्मुख क्षेत्रात संयुक्तरीत्या विविध उपक्रम करून व्यापार, उद्योगांचा विकास करण्यावर भर देण्यात येईल असे सांगितले. श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासच्या कॉन्सुलेट जनरल श्रीमती प्रियांगा विक्रमसिंघे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचे कौतुक करून अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले. भारतासोबतचे व्यापारी, औद्योगिक व आर्थिक संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांसाठी उपस्थित उद्योजकांनी मांडलेल्या चिंता आणि सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून हे मुद्दे सोडविण्यात येतील असे आश्वासन श्रीमती विक्रमसिंघे यांनी दिले. 

या चर्चासत्रात  श्रीलंकेतील १४ प्रस्थापित उद्योजकांनी सहभाग घेतला. या प्रतिनिधींनी महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांशी थेट संवाद साधून संभाव्य भागीदारी, संयुक्त उपक्रम आणि व्यापार विस्ताराच्या नवीन संधींवर विचारविनिमय केला. दोन्ही प्रदेशांतील उद्योगांना लाभ होईल असे दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यात या प्रतिनिधींनी विशेष रस दाखवला.संवादात्मक सत्रांमध्ये उत्पादन, सेवा, कृषी, लॉजिस्टिक्स आणि उदयोन्मुख क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चासत्रामुळे सकारात्मक व्यावसायिक वातावरण निर्माण झाले, ज्यातून दोन्ही देशांदरम्यान सहकार्याचे परस्पर फायदे अधोरेखित झाले.व्यावसायिक नेटवर्किंग व्यतिरिक्त, कार्यक्रमात धोरणात्मक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. यामध्ये भारत-श्रीलंका मुक्त व्यापार करारातील (India–Sri Lanka Free Trade Agreement) नकारात्मक यादी (negative list), द्विपक्षीय व्यापारातील सध्याची आव्हाने आणि श्रीलंकेतील बँकांनी जारी केलेल्या लेटर ऑफ क्रेडिट (LC) संबंधित चिंता यावर विचारमंथन झाले. महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांनी व्यापार, उद्योग सुलभ करण्यासाठी आणि भारतीय निर्यातदारांसाठी आर्थिक विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

Friday, 28 November 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचा उल्लेखनीय निकाल – मान्यवरांकडून गौरव !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचा उल्लेखनीय निकाल – मान्यवरांकडून गौरव !!

मुंबई प्रतिनिधी: ता. २८
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग चेंबूर (पूर्व) तसेच एल-वार्ड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा समूह यांच्या विद्यमाने आयोजित सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार व एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२५ मधील ९० ते १०० टक्के निकाल प्राप्त शाळांचा सन्मान सोहळा दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अल बरकत इंग्लिश स्कूल, कुर्ला (प.) येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला शिक्षण निरीक्षक मा. डॉ. मुस्ताक शेख, शिक्षण उपनिरीक्षक श्रीमती गोरे मॅडम, श्री खाडे सर, श्री कंठे सर, सहा. कार्यक्रम अधिकारी श्री दीपक दिनकर सर, CRC श्री राठोड सर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमात यावर्षी निवृत्ती प्राप्त मुख्याध्यापकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच १०० टक्के निकाल पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

एल-वार्ड विभागातील दोन रात्र शाळांपैकी सतत उल्लेखनीय निकाल देणाऱ्या रात्र शाळांमध्ये अग्रस्थान संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिमचे आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित ही रात्र शाळा मागील पाच वर्षांपासून सलग उत्तम निकाल देत आहे. मार्च २०२५ मध्ये शाळेचा निकाल ८७.५% लागल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारला.

उत्कृष्ट निकालामुळे अनेक विद्यार्थी आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्र शाळेत प्रवेश घेत आहेत. शाळेला ‘मासूम’ संस्थेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेले असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन तसेच एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.

मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत म्हणाले -
“रात्र शाळेचा सातत्यपूर्ण चांगला निकाल, संस्थेचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले करिअर घडवावे,” असे आवाहन करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा लढणार ‌ !!


कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा लढणार ‌ !!
दि : २७ नोव्हेंबर २०२५ रोजी आम आदमी पार्टी डोंबिवली चे निवडणूक कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे प्रदेश सचिव डॉ अभिजित मोरे यांच्या हस्ते  करण्यात आले.‌सदर कार्यालय वाशी बस स्टॉप समोर, डोंबिवली (प ) येथे आहे .

सदर उदघाटन सोहोळ्या दरम्यान राज्याचे प्रदेश सचिव डॉ मोरे यांनी येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे जाहीर  केले. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एखादा पक्षाचे हे पाहिले नवडणूक कार्यालय आहे .

आम आदमी पक्ष  सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उम्मेदवार देऊन कल्याण डोंबिवली ला दिल्ली आणि पंजाब सरकार प्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य,चांगले रस्ते अश्या मूलभूत मुद्द्यांवर निवडणूक लादणार असल्याचे पक्षाचे मुख्य निवडणूक सल्लागार ऍड आकाश वेदक यांनी सांगितले .

आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला विचारून आपला जाहीरनामा बनवणार असे पक्षाचे  कल्याण डोंबिवली महिला आघाडी अध्यक्षा सौ  रेखा रेडकर यांनी या दरम्यान जाहीर केले .

कल्याण डोंबिवलीत विरोधी पक्षाचे अनेक नेते सत्ताधारी  पक्षात गेले आहेत, जनता आता नवीन विकल्प च्या शोधात आहे, तरी येणार निवडणुकीत मतदाता आम आदमी पार्टी नक्की यश  देईल असे पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष ऍड धनंजय जोगदंड यांनी सांगितले .

सदर सोहळ्या दरम्यान आम आदमी पक्ष चे राज्य सचिव डॉ अभिजित मोरे, प्रदेश सह सचिव अमोल मोरे, प्रदेश महिला संघटक सौ नीलम व्यवहारे, कल्याण जिल्हा अध्यक्ष ऍड धनंजय जोगदंड, कल्याण जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ रेखा रेडकर, मुख्य निवडणूक सल्लागार ऍड आकाश वेदक राज्य सोसिअल मीडिया टीम चे निलेश व्यवहारे, निवडणूक समिती चे अजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते .


ऍड आकाश वेदक 
९९३००१३९२६

वाडा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमांगीताई पाटील यांचा जोरदार प्रचार....

वाडा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमांगीताई पाटील यांचा जोरदार प्रचार....

*नालासोपारातील शिवसेना महिला आघाडीचा प्रचारात सहभागने उत्साह*

नालासोपारा, प्रतिनिधी, ता, २८ :- वाडा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे शिवसेना उमेदवार हेमांगीताई  पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या नेतृत्वात नालासोपारातील शिवसेना महिला आघाडीने प्रचारात सहभाग घेतल्याने प्राचारत उत्साह दिसुन येत आहेत.

हेमांगीताई पाटील यांच्या प्रचारास माता – भगिनी तसेच जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळत असून, माता भगिनी ह्या शिवसेना उमेदवार हेमांगीताई पाटील यांनाच विजयी करतील असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे. नालासोपारातील शिवसेना महिला आघाडीचा पदाधिकारी आपल्या शेकडो महिला सैनिकाच्या सोबत अंत्यत नियमितबद्ध प्रचार यंत्रणा सुरु असून वाडा नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना उमेदवार हेमांगीताई पाटील यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे.

आजच्या शिवसेना  महिला आघाडीच्या प्रचार दौऱ्यास जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, हेमांगीताई पाटील विजयी होतील असा विश्वास जनतेतून दिसत असल्याचे चित्र आहे, या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत नालासोपारा पश्चिम मधिल शिवसेना महिला आघाडी व वाडा येथील सर्व महिला आघाडी युवासेनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक !!

जी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ रायगड आयोजित बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र  4th बॉक्स लंगडी राज्य स्तरीय चॅम्पियनशिप -२०२५ चे आयोजन केले होते.या स्पर्धांचे आयोजक श्री.मारुती हजारे सर यांनी उत्तम रीतीने स्पर्धा आयोजन केले.या स्पर्धा एम.एन.आर. स्कूल ऑफ एक्सेल कामोठे येथे पार पडल्या.

                या स्पर्धेत मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस. कॉलेज कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय खडवलीतील विद्यार्थी कु.रोहित ठाकरे, कु.कौस्तुभ शेवाळे, कु.प्रणव डहाळे, कु.सुजल फुलमाळी, कु.दर्शन किसले, कु. देवांश तिवारी, कु. पारस चेखलिया, कु. रोहित कविथिया, कु.जिशान शेख, कु. ईशांत घोडके यांनी  १९ वर्ष वयोगट खालील गटात भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकाविल्यानंतर पनवेल येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धात निवड झाली आहे.
               महाविद्यालयच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालय चे क्रीडा शिक्षक सौ.हर्षला विशे मॅडम व श्री.बाळाराम चौधरी सर यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याचा सत्कार केला.

Thursday, 27 November 2025

'लोकधारा प्रतिष्ठान' ट्रस्टतर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा !!

'लोकधारा प्रतिष्ठान' ट्रस्टतर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा !!

संविधानातील मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख; पोस्टरच्या माध्यमातून संदेश देत जनजागृती

भिवंडी, प्रतिनिधी :

भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या “घर-घर संविधान” या उपक्रमाचे पालन करत ‘लोकधारा प्रतिष्ठान’ ट्रस्ट तर्फे समतानगर, पडघा येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन एकत्रितपणे केले.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे आकर्षक पोस्टर सादर करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी संविधानातील मूळ तत्त्वांचा सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला.

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्ये रुजणे अत्यंत गरजेचे आहे. संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत; प्रत्येकाने संविधान वाचण्याची आणि समजून घेण्याची सवय लावावी. असे मत लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी व्यक्त केले. त्यांनी कवितेद्वारेही संविधान जनजागृती केली. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका विद्या जाधव, सोनाली जाधव, मदतनीस सीमा जाधव, सर्पमित्र सुरज गायसमुद्रे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक,पालक , मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकधारा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, संविधान जागृतीसाठी हा उपक्रम परिणामकारक ठरला आहे.

वृत्त सौजन्य - मिलिंद जाधव (कवी/पत्रकार)

मिल्हे केंद्रीय क्रीडा स्पर्धेत जि.प.शाळा खोपिवलीच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी !!

मिल्हे केंद्रीय क्रीडा स्पर्धेत जि.प.शाळा खोपिवलीच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी !!  

**प्रथम क्रमांकाची  तब्बल 14 पारितोषिके मिळवुन विजयी साजरा **.  

मुरबाड  ( श्री.मंगल डोंगरे ) : सन 2025-26 या आगामी कालासाठी  होऊ घातलेल्या मिल्हे केंद्र अंतर्गत क्रीडा स्पर्धांमध्ये  खोपिवली जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावुन प्रथम क्रमांकाची तब्बल १४ पारितोषिके जिंकली ! एकूण ११ जिल्हा परिषद शाळेनी सहभाग घेतला होता, यामध्ये जिल्हा परिषद शाळा खोपिवली या शाळेचा वर्चस्व ठरला, यामध्ये जिल्हा परिषद शाळा खोपीवली, जिल्हा परिषद शाळा पाडाले, जिल्हा परिषद शाळा मिल्हे, जिल्हा परिषदेला गणेशपुर, जिल्हा परिषद शाळा खोटारवाडी, जिल्हा परिषद शाळा दुधनवली, जिल्हा परिषद शाळा सावरीचीवाडी, जिल्हा परिषद शाळा खपाचीवाडी, जिल्हा परिषद शाळा बेंढार वाडी, जिल्हा परिषद शाळा कोलोशी, जिल्हा परिषद शाळा वडाचीवाडी या जिल्हा परिषद शाळा नी सहभाग घेतला होता, यामध्ये जिल्हा परिषद शाळा खोपिवली या शाळेची नेत्र दीपक कामगिरी, लंगडी मुली प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक, ५० मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक, रिले स्पर्धा मुले प्रथम क्रमांक, रिले स्पर्धा मुली प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे मुली प्रथम क्रमांक, लांब उडी मुलें प्रथम क्रमांक, लांब उडी मूली प्रथम क्रमांक, कबड्डी मुले प्रथम क्रमांक, कबड्डी मुली प्रथम क्रमांक, खोखो मुले प्रथम क्रमांक, खोखो मुली प्रथम क्रमांक, संगीत खुर्ची मुली प्रथम क्रमांक, संगीत खुर्ची मुले प्रथम क्रमांक, अशी पारितोषिके घेऊन खोपिवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामनावीर म्हणून या अखंड स्पर्धेत आपले नाव कोरले आहे. या कार्यक्रमासाठी मिल्हे केंद्रातील केंद्रप्रमुख सौ भावना गोरले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रीडा स्पर्धांचे सामने आयोजित केले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद शाळा खोपिवली शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड, खोपिवली शाळेचे माजी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य श्री मुकुंद दादा कराळे, खोपिवली शाळेचे मुख्याध्यापक सुधीर घिगे, शशिकांत डोहले, विनोद चौधरी, महेश भुडेरे, गौतम रातांबे, भालचंद्र भोईर, वाळकोली मॅडम, खाटेघरे सर, भाऊ ठाकरे सर,आढारी सर, आदी शाळेचे शिक्षक उपस्थित होते, खोपिवली शाळेचे विजयाचे शिल्पकार भालचंद्र भोईर सर, घिगे सर, रातांबे सर ठरले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा पार पडल्या. पालक वर्गातुन सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले जात आहे.


कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई - संलग्न कुणबी युवा तर्फे संविधान दिन साजरा !!

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई  - संलग्न कुणबी युवा तर्फे संविधान दिन साजरा !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

    26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच अनुषंगाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, संलग्न कुणबी युवा तर्फे संविधान दिनी 

प्रसिद्ध व्याख्यानकर्ते :अँड. जयमंगल धनराज सर (B.S.L., LL.M.(Gold Medal), M.B.A.(HR), Advocate & Notary – Gov. of India, Former I/C Principal, Dr. Ambedkar Law College, Wadala, Mumbai) 

यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या दरम्यान ५० ते ६० कुणबी बांधवांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा केला गेला. कुणबी युवाने नेहमीच संविधानाच्या अपेक्षित हक्क-अधिकार, वैज्ञानिक दृष्टिकोन, ओबीसी आणि समाजाच्या प्रबोधनावर लक्ष केंद्रित केले आहे. याचीच प्रचिती या कार्यक्रमातून आली.

ऍड. जयमंगल सरांनी काल, आज आणि उद्या या दृष्टिकोनातून संविधानावर मांडणी केली. किचकट वाटणारे संविधान समजून घेण्यासाठी संविधानकर्त्यांनी एक मोठी सोय करून ठेवली आहे, ते म्हणजे संविधानाची प्रास्ताविका. या प्रास्ताविकेतील मूल्यांच्या खोलात जाऊन सरांनी खेळीमेळीच्या वातावरणात संविधानाचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचवला.

गौतम बुद्धांनी जगाला ओळख करून दिलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची पेरणी सम्राट अशोक, छ. शिवाजी महाराज, ते फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांनी केली म्हणून आज जगातील घटनांचे सरासरी वय १७ वर्ष असताना भारतीय संविधान ७५ वर्षे पूर्ण करू शकले हे त्यांनी प्रामुख्याने मांडले. आरक्षणाची संकल्पना महात्मा जोतिबा फुलेंनी मांडली - छत्रपती शाहू महाराजांनी ती अमलात आणली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवून संविधानामार्फत देशातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय मागास असलेल्या जनतेला बहाल केले.

समता, समानता, बंधुता आणि न्याय — या लोकशाहीच्या मूलभूत मूल्य आहेत. ही चारही मूल्ये मिळून एक न्याय्य, समतामूलक आणि शांततापूर्ण समाजाची पायाभरणी करतात.

यादरम्यान ओबीसींसाठी तरतूद असणाऱ्या संविधानातील कलम ३४० वर सरांनी अधिक प्रकाश टाकला. बाबासाहेबांची ओबीसींबाबत सुरुवातीपासून असणारी साकारात्मकता वेगवेगळ्या दाखल्यांद्वारे स्पष्ट केली. कलम ३४० नुसार ओबीसींसाठी आयोग स्थापन करणे, राष्ट्रपतींच्या आदेशाने आयोग गठीत करून ओबीसींबाबत अधिक माहिती गोळा करणे यासंदर्भातील तरतूदही सविस्तर सांगितली. १९५३ मधील काका कालेलकर आयोग ते १९७९ मधील मंडल आयोग यादरम्यान घडलेल्या राजकीय घटनांचा उल्लेख करून सध्याच्या मिळालेल्या ओबीसी आरक्षणावर प्रकाश टाकला. 

संविधानाविषयीची ही जागरूकता, अभ्यास आणि संवाद समाजाला अधिक सक्षम आणि प्रगत दिशेने नेणारा आहे. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीत मूल्यांची जपणूक होऊन समाज अधिक सजग बनतो. पुढील काळातही अशीच एकजूट, जाणीव आणि संविधानिक बांधिलकी टिकून राहो ही अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.

मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी.के.एस. कला, वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय खडवली येथे विद्यार्थ्यांनी केला संविधान गौरव दिन साजरा !

मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी.के.एस. कला, वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय खडवली येथे विद्यार्थ्यांनी केला संविधान गौरव दिन साजरा !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                 २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे याही वर्षी जी.के.एस. महाविद्यालयात संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम याच्या मार्गदर्शनाखाली संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी सागर सर, उपप्राचार्य प्रा.प्रशांत तांदळे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा.रसिका लोकरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले.तसेच डॉ.एस.जी. सागर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजून सांगितले व मार्गदर्शन केले.

Tuesday, 25 November 2025

श्रीराम वैद्य यांना "कोकण रत्न पदवी-२०२५ " जाहीर !!

श्रीराम वैद्य यांना "कोकण रत्न पदवी-२०२५ " जाहीर !!

**स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच "कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी केली अधिकृत घोषणा

मुंबई (शांताराम गुडेकर) :
           विक्रोळी पार्क साईट येथील गुणवंत कामगार पुरस्कार- महाराष्ट्र शासन विजेते तसेच त्यांच्या पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. श्रीराम विष्णू वैद्य यांची स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच "कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे. वैद्य यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे होणारा हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
             श्रीराम वैद्य हे गेली ४५ वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. अनेक संघटनांवर पदाधिकारी,सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांना आजवर विशेष कार्यकारी अधिकारी, गणुवंत कामगार पुरस्कार, आदर्श मित्र पुरस्कार, राष्ट्रीय सामाजिक एकता गौरव पुरस्कार, मुंबई रत्न पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, कोकण दिप सामाजिक सेवा पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रयत सेवक पुरस्कार, आदर्श मुंबईकर महापौर सन्मान पत्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे गौरव पत्र, नशाबंदी मंडळ नागरिक समिती गौरवपत्र, रक्तदान शिबिर प्रशस्तीपत्र, कामगार सभा आकाशवाणी मुलाखत, नागरी संरक्षण दल, बृहनमुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप, स्वकुळ वैभव पुरस्कार व संकल्प कृतार्थ जीवन गौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत. ते कार्यकारी सदस्य महाराष्ट्र गुणवंत कामगार संघटना मुंबई, रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई चे सदस्य आहेत. नेत्र तपासणी व चष्मा वाटप, एडस जनजागृती अभियान, पोलीओ डोस अभियान, बाल माता संगोपन शिबीर, शारीरिक वैद्यकिय तपासणी, मार्गदर्शन व उपचार केंद्र आदी शिबीर मध्ये त्याचा मोलाची कामगिरी आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण मंच, गुरूदत्त मंडळ (कला, क्रिडा, शैक्षणिक) वि. पा. शा. मुंबई सल्लागार, वि. पा. सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - सदस्य आहेत. श्री.श्रीराम विष्णू वैद्य (विशेष कार्यकारी अधिकारी / डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलो शिप विजेता) यांना सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाची पदवी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनसह शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित Capacity Building of CD Volunteers Course No. 09/2025 प्रशिक्षणाचा समारोप संपन्न !!!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित Capacity Building of CD Volunteers Course No. 09/2025 प्रशिक्षणाचा समारोप संपन्न !!!

अंबरनाथ प्रतिनिधी, ता. २५ : मा. संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत, मा. उपनियंत्रक,नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने दि. 18/11/2025 ते 24/11/2025 या कालावधीत सकाळी 10.00 ते 17.45 या वेळेत नागरी संरक्षण प्रशिक्षण हॉल, अंबरनाथ जि. ठाणे येथे Capacity Building of CD Volunteer Course No. 09/2025 हा एकूण 29 स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण चालू ठेवण्यात आला होता.

प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी श्री. अनिल गावित (सउनि), मास्टर ट्रेनर डॉ. प्रकाश ठमके, डॉ. घाटवळ, तसेच कु. अमृता राय यांनी विविध विषयांवरील व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. तसेच स्वयंसेवकांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

समारोप कार्यक्रमास उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव यांच्यासह २ उपमुख्य क्षेत्ररक्षक, विभागीय क्षेत्ररक्षक उपस्थित होते. उपनियंत्रकांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून पुढील कार्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमास श्री कमलेश श्रीवास्तव, उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र–३), श्री करमबीरसिंग भुर्जी, उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र–४), श्री संजय मगर, विभागीय क्षेत्ररक्षक (अंबरनाथ–बदलापूर), तसेच श्री मुरुगन सुब्रमन्यम, प्रभारी (मीरा–भाईंदर विभाग) हेही उपस्थित होते.
– DCCD, Thane

Monday, 24 November 2025

चिराडपाडा ग्रामस्थांचा विकासासाठी एल्गार! स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावाला बहुमताने मंजुरी !!

चिराडपाडा ग्रामस्थांचा विकासासाठी एल्गार! स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावाला बहुमताने मंजुरी !!

विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांची मोठी उपस्थिती; गावाच्या सर्वांगीण विकासाला मिळाला भक्कम पाठिंबा

ठाणे प्रतिनिधी (मिलिंद जाधव) :

गावाच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाचे ध्येय ठेवत भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा येथिल ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी एकमुखी निर्णय घेतला आहे. सरपंच रिंकल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शाळेत आयोजित विशेष ग्रामसभेत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. एकजुटीने विशेष ग्रामसभा पार पडली, सोमवारी झालेल्या या सभेत ग्रामविकास अधिकारी काशीनाथ माळी आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गावाच्या भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या महत्वाच्या निर्णयाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजूट दाखवली. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी उत्स्फूर्त समर्थन देण्यात आले चिराडपाडा सध्या पिसे–चिराडपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचा भाग आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर गावाला थेट निधी उपलब्ध होईल, विकासकामांची गती वाढेल, तसेच पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. प्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याला मंजुरी दिली. ग्रामविकास अधिकारी काशीनाथ माळी यांनी हा प्रस्ताव तातडीने उच्च प्रशासनाकडे पाठविण्याची माहिती दिली असून मंजुरीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेगाने केली जाईल, असे आश्वासन दिले. ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील तरुण आणि महिलांनी केलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या एकजुटीचा हा निर्धार आता तालुक्यातही चर्चेचा विषय ठरला आहे.स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठीचा चिराडपाडा ग्रामस्थांचा हा ‘एल्गार’ पुढे प्रशासनाकडून किती वेगाने पूर्ण होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पाच वर्षांपासून न्याय नाही? मुलांच्या शिक्षण, घरचा त्रास सुरेखा गोरेगावकर याचं माणगाव, रायगड येथे आमरण उपोषण...

पाच वर्षांपासून न्याय नाही? मुलांच्या शिक्षण, घरचा त्रास सुरेखा गोरेगावकर याचं माणगाव, रायगड येथे आमरण उपोषण...

दि. २५ नोव्हेंबर २०२५ | रायगड प्रतिनिधी

पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात न्याय न मिळाल्याचा आरोप करत सुरेखा गोरेगावकर यांनी २४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा देऊन उपोषण सुरू केले. त्यांच्या निवेदनानुसार, मुलाला शाळेत मानसिक त्रास दिल्याचा तसेच स्वतःवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गोरेगावकर यांनी पुढे म्हटले की, त्यांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, सामाजिक बदनामी आणि लाच मागितल्याचे प्रकार घडल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र योग्य कारवाई न झाल्यामुळे उपोषणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपोषणाबाबत प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Sunday, 23 November 2025

मालेगाव येथील घटनेचा निषेध व पिडीत मुलीला श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम !!

मालेगाव येथील घटनेचा निषेध व पिडीत मुलीला श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम !!

उल्हासनगर, प्रतिनिधी :
मालेगाव येथील डोंगराळे गावात ३ वर्षीय लहान चिमुकली चा बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली, ह्या घटनेचा निषेध म्हणून रविवारी (दि. २३/११/२०२५) रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी, उल्हासनगर - ४ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नराधामी आरोपीला फाशी ची शिक्षा व्हावी अशी मागणी करत पिडीत मुलीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष - अभिजीत चंदनशिव, कार्यरत अध्यक्ष तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी टाले, उपाध्यक्ष - चारुलता विश्वकर्मा, सचिव - सत्यशील उमाळे, सचिव - शैलेश डोंगरे, सदस्य - उज्वला गायकवाड, सदस्य - सुनिल जाधव, सदस्य - सुमेध दाभाडे, सदस्य - रोहित शिरसाठ, शिवनेरी फाऊंडेशन सचिव - ॲड प्रशांत चंदनशिव, रविंद्र मिंडे, भास्कर गाडे, सुरेश वीर, बहुजन समाज पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्षा - निवेदिता जाधव, प्राध्यापक - विकास जाधव सर, स्वराज्य संघटना अध्यक्ष - ॲड जय गायकवाड, वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर उपाध्यक्ष - महेंद्र अहिरे, भारतीय जनता पक्ष - स्वप्नील पगारे, धम्म उपासिका - लता पडघाण, प्रफुल्लता मोहड, विजया घाटविसावे, प्रशांत ढोणे, भालचंद्र निकुंभ, कमलजीत त्यागे व सिख समाज महिला उपस्थित होते..

एस. आर ए चे उपजिल्हाधिकारी "शिवाजी धावभट" यांच्या अन्यायाविरुद्ध रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष व ऑल इंडिया ब्लॅक पॅंथर आक्रमक !!

एस. आर ए चे उपजिल्हाधिकारी "शिवाजी धावभट" यांच्या अन्यायाविरुद्ध रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष व ऑल इंडिया ब्लॅक पॅंथर आक्रमक !!

घाटकोपर, प्रतिनिधी : "चोर मचाये शोर हमारी झोपडी खा गया डायनोसॉर".. अशा घोषणा देत "माता रमाबाई नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रोजेक्टची जबाबदारी असणारे एस आर ए चे उपजिल्हाधिकारी "शिवाजी धावभट ".. यांचा निषेध केला.

उपजिल्हाधिकारी शिवाजी घनवट यांनी पूर्ण निष्कर्ष न बघता अनेक "गरीब नागरिकांचे झोपडे अपात्र केले आहेत" व झोपडी दादा दलाल तसेच विभागातील धनदांडगे यांची घरे व दुकाने पात्र केली आहेत .. अशा दलाल व धनदांडग्यांच्या झोपडींवर कोणतीही योग्य तपासणी न करता निव्वळ जागेवरती नंबर टाकून झोपडी पात्र केली ... अशी दाट शक्यता आहे... तरी संबंधित झोपडपट्टी पुनर्वसन प्रोजेक्टची योग्यरीत्या शहानिशा करून "शिवाजी दावभट" या "अधिकाऱ्याला "बडतर्फ" करून चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे "रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष" व "ऑल इंडिया ब्लॅक पॅंथर सेना" यांच्या वतीने "जाहीर इशारा पत्रक" मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी "व "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री "देवेंद्र फडणवीस साहेब" यांना देण्यात आले आहे... 

आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून द्यावा व लवकरात लवकर "झोपडी धारकाला संपूर्ण पात्र" करून घरं देण्यात यावी... अशी मागणी करत जर योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत "उपोषण" करण्यात येईल.‌‌.. असे लोकसेवक मिलिंद रायगांवकर यांनी सांगितले.


प्रसिद्धीसाठी -
मिलिंद भाऊ रायगांवकर (राष्ट्रीय अध्यक्ष)...मो नं - 90004785761...

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा चिपळूणतर्फे दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा चिपळूणतर्फे दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा चिपळणतर्फे दिनदर्शिका २०२६ चे  प्रकाशन सोहळ्याचे बुधवार दि. १०/१२/२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे सायं. ७.००वा. मान्यवर, जाहिरातदार, आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. शिवाय  त्या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून  कोकणात अविरत गाजत असलेले श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण यांचे नमनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी शाखांच्या मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०३ वर्ष ही सामाजिक मातृसंस्था काम करीत आली आहे. संघटना जरी जातीची असली तरी काम समतेचे  आणि मानवतेच्या विचारांचे करत आहे.  समाजात पसरलेली अंधश्रद्धा निर्मुलन,  व्यसनमुक्ती, जमीन कुळकायदा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यावसायिक घडवणे, ओबीसी आरक्षण  तसेच राजकीय अवस्था यावर जनजागृती, कुणबी जोडो अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. 

याच शाखा चिपळूणच्या दिनदर्शिका सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय सामाजिक  कार्य करणाऱ्या युवा शिलेदारांचा तसेच जेष्ठ मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.  

या विचारांची दिशा बदलणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखा अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर सरचिटणीस रणजित वरवटकर, खजिनदार अमेय खापरे आणि कार्यकारणी सदस्य यांनी केले आहे.

Saturday, 22 November 2025

पडघा बस स्टँडजवळील सार्वजनिक मुतारीची दयनीय अवस्था !!

पडघा बस स्टँडजवळील सार्वजनिक मुतारीची दयनीय अवस्था !!

** नागरिकांत संताप; अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

ठाणे प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :

भिवंडी तालुक्यातील पडघा बस स्टँडलगत असलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पडघा परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी अत्यावश्यक सुविधा मात्र पूर्णपणे जोपासल्या जात नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. ही मुतारी पडघा बाजारपेठेतील एकमेव सार्वजनिक मुतारी असल्याने दररोज प्रवासी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुकानदार यांच्यासह शेकडो लोक ती वापरतात. मात्र मुतारीची मोडकळीस आलेली अवस्था, दरवाजे नसणे, चारही बाजूंना पसरलेला कचरा, अस्वच्छता आणि सतत जाणवणारी तीव्र दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेकांनी पडघा ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी केल्या असूनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. “मुतारीत शिरायलाही धाडस होत नाही, प्रवासी तर आत जातानाच माघारी फिरतात,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून मिळत आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

पडघा सारख्या महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रात अशी दुरावस्था   राहणे ही गंभीर बाब असल्याने ग्रामपंचायतीकडून तात्काळ कारवाईची नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया -
मुतारी ग्रामपंचायत वेळोवेळी स्वच्छ करते. स्वतंत्र कर्मचारी नसल्यामुळे अडचणी येतात; मात्र आता आठवड्यातून दोनदा साफसफाईसाठी व्यक्ती नेमली आहे. नागरिकांनीही पाण्याच्या बाटल्या तिथे टाकू नयेत. उद्या मुतारीची साफसफाई करण्यात येईल.
-पडघा ग्रामपंचायत अधिकारी, भास्कर घुडे  

सध्या मुतारीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना यातून सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू शकते, त्यामुळे ग्रामपंचायतीने नियमित साफसफाई करून या समस्येकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. 
-सामाजिक कार्यकर्ते, अशोक शेरेकर

*नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित प्राथमिक प्रशिक्षणाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न* !!!

*नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित प्राथमिक प्रशिक्षणाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न* !!!

     *कल्याण जिल्हा ठाणे प्रतिनिधी (२२ नोव्हेंबर २०२५) : नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार दिनांक १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.*

     *दोन ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन -*

     *या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नागरी संरक्षणाने एकाच दिवशी दोन स्वतंत्र ठिकाणी प्रशिक्षणांचे आयोजन केले होते.*—
     *रायते विभाग विद्यालय व ज्युनियर कॉलेज, रायते-गोविली व नागरी संरक्षण प्रशिक्षण हाॅल, कल्याण कार्यालय, जिल्हा ठाणे.*

     *रायते येथे प्राथमिक पाठ्यक्रम क्र. २४/२०२५ राबवण्यात आला. येथे एकूण ३० सामान्य नागरिक व ज्युनिअर महाविद्यालयीन विद्याक्षर्थ्यांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक उपचार, बचाव कार्य, अग्निसुरक्षा, तसेच विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके देण्यात आली.*

     *कल्याण येथील कार्यालयात पाठ्यक्रम पाठ्यक्रम क्रमांक २३/२०२५, मध्ये २६ प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या.*

     *सांगता समारंभ व शपथविधी.*
     *दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी, पाचव्या व अंतिम दिवशी दोन्ही प्रशिक्षण केंद्रांवर सांगता समारंभ संपन्न झाला. या वेळी मा.उपनियंत्रक श्री.विजय जाधव सर हे विशेषतः उपस्थित होते. त्यांनी नवीन स्वंयसेवकांना नागरी संरक्षण सभासदत्वाची शपथ देत समाजसेवा, उत्तरदायित्व आणि आपत्तीतील तत्परतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षणार्थ्यांना नागरी संरक्षण दलाची भूमिका प्रत्यक्ष समजून घेण्यास मोठी मदत झाली.*

     *मान्यवरांची उपस्थिती.*

     *रायते-गोविली येथे आयोजित समारंभास खालील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली : श्री.पी.एस.शिंदे, मुख्याध्यापक, रायते विभाग, हायस्कूल, सौ. माया शिरोशी, ग्रामपंचायत सदस्य श्री. कमलेश श्रीवास्तव, उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेञ-३, श्री. आनंदसिंग गढरी, सहाय्यक उपनियंत्रक, श्री. रामबरन यादव, विभागीय क्षेत्ररक्षक, टिटवाळा विभाग यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनात  सहकार्य केले तर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.*

     *प्रशिक्षणातील प्रत्यक्ष अनुभव.*

      *पाच दिवस चाललेल्या प्रशिक्षणात विविध प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नागरी संरक्षण दलाची जबाबदारी जाणून घेतली. बर्‍याच प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कु.देवकर यांनी उत्कृष्ट सुञसंचालन केल्याने उपनियंञक, ना.सं.नवीमुंबई समुह, ठाणे यांनी समाधान व्यक्त केले.*

     *कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करुन समारंभानंतर प्रशिक्षणाची निवडक छायाचित्रे माननीय अधिकाऱ्यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आली.*

टिटवाळा, संदीप शेंडगे : भाजपला जोरदार धक्का — माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश !!

टिटवाळा, संदीप शेंडगे : भाजपला जोरदार धक्का — माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश !!

टिटवाळा आणि आसपासच्या राजकीय वर्तुळात मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.

सध्या टिटवाळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भाऊबंदकी दिल जमाई होत असून आगामी निवडणुकीत नवी समय करणे तयार होत आहेत टिटवाळ्यामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक नगरसेवक असून त्याचीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला साथ मिळणार असल्याने सर्वात मजबूत पॅनल म्हणून पॅनल नंबर तीन कडे पाहिले जाते. किशोर भाई शुक्ला यांची राजकीय खेळी सर्वांनाच परिचित आहे त्यामुळे आगामी काळात या पॅनलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सरशी पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

त्यामुळे भाजपच्या पॅनल क्रमांक तीनमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.

भाजपमध्ये 'इनकमिंग'मुळे नाराजी शिगेला

भाजपमध्ये कोणतीही पडताळणी किंवा चर्चा न करता नव्या चेहऱ्यांना दिला जाणारा प्रवेश आणि जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा होती.

या पार्श्वभूमीवरच सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून कळते.

“५० वर्षे पक्षासाठी काम केले पण… ” — सुरेश भोईर यांची खंत प्रवेशावेळी बोलताना माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या. 

भावनिक होऊन सुरेश भाऊ म्हणाले “राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आम्ही पक्षासाठी काम केले. टिटवाळ्यात भाजपचा पाया तयार करण्यापासून ते उपमहापौर पदापर्यंतची वाटचाल केली. पालिकेच्या अप्रभाक्षेत्रात कुठेही नगरसेवक नसताना आम्ही टिटवाळ्यातून नगरसेवक उपमहापौर पद मिळविले. पन्नास वर्षे पक्षाची निष्ठेने सेवा केली. पण आज जुन्या, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य स्थान दिले जात नाही. त्यामुळे पक्ष सोडताना वाईट वाटत असले तरी आज घेतलेला निर्णय योग्यच आहे.”

त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.


किशोरभाई शुक्ला यांची रणनीती — पॅनल ३ मध्ये समीकरणे बदलणार

या प्रवेशामुळे पॅनल क्रमांक तीनमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. या प्रवेशाचे नियोजन आणि समन्वय किशोर भाई शुक्ला यांनी केल्याचे समजते. त्यांचा शांत संयमी स्वभाव अनेकांना भावून जातो आकर्षित करतो. त्यामुळेच किशोर भाई शुक्ला आगामी निवडणुकीमध्ये टिटवाळा मध्ये गेम चेंज ठरू शकतात.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते “हा प्रवेश म्हणजे पॅनल क्रमांक तीनच्या विजयाचा पाया आणि हा निर्णय आगामी नगरपालिका निवडणुकांमध्य भाजप विरोधी लाट निर्माण होऊन निष्ठावंत त्यांना डावलण्याचा परिणाम निर्णायक ठरणार आहे.”

शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या प्रवेशाचे स्वागत केले असून, “टिटवाळ्यात आता खरी शिवसेना मजबूत होत आहे,” असा दावा करण्यात आला.

एकूणच या प्रवेशामुळे टिटवाळ्यात भाजपला धक्का तर शिवसेनेला मोठा राजकीय फायदा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा नक्कीच मोठा परिणाम दिसून येणार  आहे.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...