Wednesday, 6 May 2020

म्हारळ,वरप,कांबा येथे परराज्यात जाणा-या नागरिकांची तूफान गर्दी,तिन्ही ग्रामपंचायतीचे शर्तीचे प्रयत्न!

कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या धसक्याने वाढलेल्या लाॅकडाऊण मध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर व नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि त्यांची जबाबदारी तालुक्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार कल्याण ग्रामीण भागातील अशा लोकांची आरोग्य तपासणी तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत घेण्याचा निर्णय झाला आणि या परिसरात हजारो नागरिकांनी तूफान गर्दी केली अशाही परिस्थितीत महसूल विभाग, वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करुन नोंदणी व तपासणी अंतिम टप्प्यात नेली. त्यामुळे या सर्वांचे कौतुक व्हायलाच पाहिजे.
कोरोनाने जगात हाहाकार उडवला आहे. देशात लाॅकडाऊण लागू करण्यात आला रुग्ण वाढले त्यामुळे लाॅकडाऊण वाढले आज दिड ते दोन महिन्यापासून परराज्यातील मजूर व नागरिक महाराष्ट्रात अडकून पडले. तसेच आपले काही नागरिक इतर राज्यांत अडकले आहेत. त्यामुळे सरकारने या नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. व याची सुरुवात कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप आणि कांबा या ग्रामपंचायतीच्या परिसरातून करण्यात आली. म्हारळ येथील गुरु गोविद शाळा, वरप मधील जिल्हा परिषद शाळा आणि कांबा मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू झाली. लगेचच म्हारळ आणि कांबा येथे परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची तूफान गर्दी झाली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा कल्याण संपर्क प्रमुख डि वाय जाधव यांच्या सूचनेनुसार कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण स्वत या तीन गावात उपस्थित राहून ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करित होते. 
पहिल्या दिवशी म्हारळ येथे सुमारे 566,परराज्यात नागरिकांना तपासणी करण्यात आली तर वरप येथे 292 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये झारखंड 24,उत्तर प्रदेश 36, बिहार 23, पश्चिम बंगाल 23, कर्नाटक 52, महाराष्ट्र 74, राज्यस्थान3, आणि छत्तीसगढ 2,तर कांबा ग्रामपंचायत हद्दीत 427 लोकाची तपासणी केली असून यामध्ये उतर प्रदेश220, बिहार 82,झारखंड 127 अशी एकूण तिन्ही गावात बाराशे ते पंदराशे नागरिकाची नोंद झाली आहे. आजच्या दिस-या दिवशी देखील सकाळ पासून तूफान गर्दी झाली होती. या तीन गावात 3/4नागरिकांची नोंद होईल असा अंदाज तहसीलदार दीपक आकडे यांनी व्यक्त केला आहे. 
तर कांबा येथे तूफान गर्दी असताना येथे तलाठी जनार्दन सुर्यवंशी, सरपंच मंगेश बनकरी, ग्रामविकास अधिकारी ए जे इंगोले, वरिष्ठ लिपिक गुरुनाथ बनकरी, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, लोकांची गर्दी नियंत्रित ठेऊन सोशलडिस्टींग ची काळजी घेत होते. या सर्व आरोग्य तपासणी कामात गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याने तहसीलदार दीपक आकडे यांनी त्यांचे कौतुक केले आहे तर कोरोनोच्या वाढत्या काळात तीन गावातील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. (फोटो आहेत)

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोलम गावाशेजारील परिसर शील, घरोघरी तपासणी, गटविकास अधिकारी ऑफिसमध्ये,? तहसीलदारांची दोन वेळा भेट !

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोलम गावाशेजारील परिसर शील, घरोघरी तपासणी, गटविकास अधिकारी आॅफिस मध्ये? तहसीलदारांच्या दोन वेळा भेट!
कल्याण (संजय कांबळे कोरोनोच्या. वेश्विक महामारि पासून आतापर्यंत अलिप्त राहिलेल्या कल्याण ग्रामीण भागातील कोलम गावापासून कोरोनाने ग्रामीण भागात प्रवेश केला असून यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने या परिसरातील नागरिकांची तपासणी सुरू केली असून हा भाग पोलीसांनकडून शील करण्यात आला आहे या गावास कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी दोन वेळा भेट देऊन कर्मचारी व पोलीस यांना सूचना व मार्गदर्शन केले तर ग्रामपंचायतीच्या कुंटूब प्रमुख असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप या गावाला भेट दिली नसल्याने ग्रामसेवकास, कर्मचारी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण देशात कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खळबळ उडाली असताना प्रत्येक राज्यात आपापल्या परीने यावर मात करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत मात्र जिल्हायातील ग्रामीण भागाचा विचार केला तर शहापूर, वाशिंद, कसारा आदी काही भागाचा अपवाद वगळता कल्याण ग्रामीण भाग कोरोनोच्या प्रादुर्भाव पासून दूर राहिला होता. परंतू कल्याण तालुक्यातील कोलम गावातील मुंबई महापालिकेचा कर्मचारी कोरोनाचा रुग्ण ठरला व परिसरात खळबळ उडाली आहे आतापर्यंत थोडे फार उसंत घेतलेले आरोग्य अधिकारी तातडीने कामाला लागले.
या मतदारसंघांचे आमदार किसन कथोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण प्रांताधिकारी, नितीन महाजन, तहसीलदार दीपक आकडे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांना फोन करून घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ खामकर, वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवक सरिता धोरडे, सरपंच, सदस्य पोलीस  आदीनी कोलम, केळणी, मामणोली हा परिसर शील केला. तसेच घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला असून हायरिस्क मधील लोकांना अंबरनाथ येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे व इतरांना घरीच होमकोरोंटाईंग करण्यात येणार आहे तसेच येथे चार टिम तयार करण्यात आल्या आहेत सुमारे ४५०/५०० लोकांची पाहणी केली जाणार असल्याचे . वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड यांनी सांगितले
तर कल्याण ग्रामीण लागण झालेल्या कोलम गावास परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुरबाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे, तहसीलदार दीपक आकडे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे यांनी भेट दिली व पाहणी केली मात्र कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या गावास भेट देऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवायला हवा होता पण तसे झाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे (फोटो आहेत)

कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती गंभीर ! तरीही जगाचा पोशिंदा बळीराजा आहे खंबीर !!

कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती गंभीर  ! 
तरीही जगाचा पोशिंदा बळीराजा आहे खंबीर  !! 
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगासह भारतात सर्वत्र हाहाकार माजला आहे. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण जगासह भारतातील सर्व प्रकारच्या यंत्रणा कंबर कसून अहोरात्र कामाला लागल्या आहेत. कोरोना मुक्तीच्या वैश्विक लढ्यामुळे भारतासह संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कोरोना मुक्तीच्या वैश्विक लढ्यात रुतलेले अर्थचक्र पुनःश्च पुर्ववत करण्यासाठी देश विदेशातील अर्थ तज्ञ अहोरात्र चिंतन करत आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देश विदेशातील शासन प्रशासन गंभीर झाले आहे. तर दुसरीकडे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी आपल्या शेतात आणि शेती व्यवसायात पुर्ण पणे खंबीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
      देशातील कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे संपूर्ण देशातील उद्योग धंदे, नोकरी, व्यवसाय आणि सर्व प्रकारचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रातील अवस्था बिकट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाला वारंवार लाॅकडाऊन संचारबंदी कालावधी वाढवावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सरकारी निमसरकारी यंत्रणेवर ताण निर्माण होतो आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर झाली आहे. तर दुसरीकडे या सर्व गंभीर परिस्थितीशी संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी आपल्या शेतात अहोरात्र प्रचंड मेहनत घेऊन परिस्थितीशी दोन हात करून देशासह जगभरातील बाजारपेठेत कृषी मालाचा निरंतर पुरवठा करत आहे. त्यामुळे सर्व जनतेची क्षुधा शांती होते आहे. त्यामुळे कोरोनामुळे जरी संपूर्ण देश विदेशातील परिस्थिती गंभीर असली तरी संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी आपल्या कृषी व्यवसायात खंबीर असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

Tuesday, 5 May 2020

अंबरनाथ मध्ये राबवला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबर भरारीचा महत्वाचा उपक्रम.

अंबरनाथ मध्ये राबवला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबर भरारीचा महत्वाचा उपक्रम

अंबरनाथ :- अरूण ठोंबरे 
कोरोना ग्रस्त रुग्णाची वाढती संख्या बघून तातडीची उपाययोजना करण्याची गरज असताना, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची अंबर भरारी या संस्थेने दिनांक 5 th May दुपारी 2 वाजता 
शिवकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ.गणेश राठोड यांच्या सहकार्याने जळगाव खान्देश येथील 300 मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना मेडिकल सर्टिफिकेट  वाटप  आमदार डॉक्टर बालाजी किणीकर  यांच्या हस्ते करण्यात आला. जेणेकरून हे सर्व मजूर बंधू भगिनी आपापल्या गावात सुरक्षितपणें जाऊ शकतील.  अंबर भरारी टीम कडून नियोजन करण्यात येत आहे. कोणीही  मजूर बंधू भगिनी अडकलेले असतील आणि त्यांना आपापल्या गावाकडे जायचे असेल तर  त्या सर्वांची आरोग्य तपासणी आणि मेडिकल सर्टिफिकेट डॉ गणेश राठोड यांच्या माध्यमातून मोफत  (विनामूल्या) देण्याची व्यवस्था  करण्यात आली असल्याचे सुनील चौधरी यांनी सांगितले.

आमदार भरत शेठ गोगावले यांचा मागासवर्गीय , बुरुड समाजाला जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात !

आमदार भरत शेठ गोगावले यांचा मागासवर्गीय , बुरुड समाजाला जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात  ! 
      
    
      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड 
जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूीवर अडचणीत सापडलेल्या व बुरुड काम करून आपली उपजीविका करणाऱ्या तसेच हातावर पोट असणाऱ्या  मागासवर्गीय बुरुड समाजाला  आमदार भरत शेठ गोगावले यांच्या सौजन्याने नेते प्रमोदभाई घोसाळकर यांच्या सहकार्यने व उपस्थित तळेगांव, वाघोसे, खडकोली, लोणेरे, गोरेंगांव, टोळ,करंबेली, हरवंडी, येलावडे, भाले, निजामपूर, इंदापूर, निळज, खरवली, अामडोशी आणि माणगांव शहर या ठिकाणी जीवनवश्याक अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
     यावेळेस तालुका अध्यक्ष श्री.मंदार साळुंके, शहर संघटना अध्यक्ष - श्री.रवींद्र मोरे, कार्याध्यक्ष-किशोर डोंगरे,रायगड उपजिल्हाध्यक्ष- दीपक खैरे, रामदास भवरे, राजेश सोंडकर,मंगेश मोरे,संतोष सोंडकर आणि सामाजिक कार्यकर्ते- डॉ. अजय मोरे हे उपस्थित होते,यावेळेस सोशल डीस्टनचे नियम वापरण्यात आले.

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या सुनबाई सौ.आम्रपाली हिची धाडसी कामगिरी.

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या सुनवाई सौ.आम्रपाली हिची धाडसी कामगिरी

अरूण ठोंबरे ,बदलापूर :- 
बदलापूरची स्नुष्या म्हणून गौरवोद्गार काढण्यात यावे अशी कामगिरी करणारी आम्रपाली खरच ग्रेट आहे. कारण नुकताच तिचा विवाह काही महिन्यापूर्वी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या मुलाबरोबर मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर कोरोनाचे संकट उभे राहिले. संपूर्ण देश व जग संकटात असताना  कॅप्टन आम्रपाली पराग पातकर यांनी स्वतः प्रमुख वैमानिक म्हणून काम केले  .प्रत्यक्षात विमान सेवा बंद असताना परंतु औषधांची संपूर्ण देशात आवश्यकता आहे  तातडीची सेवा लक्षात घेऊन दिल्ली - मुंबई - सुरत - दिल्ली असे उडाण केले यशस्वीपणे काम केलेल्या या कन्येचा सर्व थरातून कौतुकाची थाप व अभिनंदन केले जात आहे..त्या विमानाची तिच्यावर संपूर्ण जबाबदारी होती. ती यशस्वीरीत्या पार पाडून सुरक्षित दिल्ली येथे परत आली.

खाजगी वैदकीय प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवासाला परवानगी मिळावी यासाठी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे नगरविकास मंत्र्याना निवेदन.

खाजगी वैदकीय प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवासाला  परवानगी मिळावी यासाठी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे नगरविकास मंत्र्याना निवेदन

अंबरनाथ :-अरुण ठोंबरे 
शहरातील वाढती गर्दी व शासकीय यंत्रणेला कुठेतरी सवलत मिळावी. कामाचा इतका ताण असताना कोणतेही काम सोपे व्हावे या उद्देशाने माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी गेल्या दिड महिन्याच्या लॉकडाऊन मुळे अनेक मजूर, नागरिक, विद्यार्थी आपल्या राज्यात अडकून पडले आहेत, त्यांना आपापल्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी सशर्त परवानगी मिळाली असली तरी या सर्व प्रक्रियेत त्यांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे, त्याच बरोबर ही प्रक्रिया बरीच किचकट स्वरूपाची असल्याने पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन यावर याचा ताण पडत आहे. परिणामी नागरिकांचे घोळके बाहेर दिसत आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्गसिंग चा नियम पायदळी तुडवले जात आहेत.
१) वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर सवलत-
आपल्या राज्यातून परराज्यात किंवा आपल्याच राज्यात प्रवास करायचा झाल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या खाजगी डॉक्टरांकडून आपण फिट असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि प्रवासात ज्या ठिकाणी पोलीस कागदपत्रांची मागणी करतील तेव्हा ते प्रमाणपत्र आणि जिथे जाणार आहेत त्या पत्त्यावरील आधारकार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र दाखवून प्रवास करता येईल.
2) वैदकीय प्रमाणपत्रावर पोलिसांचा सहीशिक्का-
आपल्या राज्यातून परराज्यात किंवा आपल्याच राज्यातील एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या खाजगी डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जाऊन त्या प्रमाणपत्रावर पोलिसांचा सही शिक्का घेऊन प्रवासात पोलीस ज्या ठिकाणी कागदपत्रांची मागणी करतील त्यावेळी सदरचे कागदपत्र आणि आपले आधारकार्ड किंवा शासकीय ओळखपत्र दाखवून प्रवास करता येईल.अशाप्रकारे लिहून निवेदन अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी  नगरविकास मंत्र्याना  दिले आहे. याबाबत प्रशासन यांच्या निवेदनाचा नक्की विचार करेल.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...