Saturday, 2 January 2021

सुभाष बेलोसे भविष्य निर्वाह निधी आस्थापनमधून सेवा निवृत्त !

सुभाष बेलोसे भविष्य निर्वाह निधी आस्थापनमधून सेवा निवृत्त !


मुंबई (समीर खाडिलकर/ शांत्ताराम  गुडेकर) :

           भविष्य निर्वाह निधी या आस्थापनेतून प्रदिर्घ सेवेनंतर सुभाष बेलोसे हे ३१ डिसेंबर २०२० रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभात विभागप्रमुख आमदार मान. विलास पोतनीस यांच्यासह भ.नि.निधी आस्थापन पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. सुभाष बेलोसे, यांना निवृत्तीनंतर दीर्घ, सुदृढ, निरोगी आणि आनंदी आरोग्य सदैव प्राप्त होवो, तसेच शिवसेनेचे कार्य त्यांच्या हातून सदैव होत राहो अशा शुभेच्छा यानिमिताने त्यांना देण्यात आल्या.

नववर्षाच्या सुरूवातीलाच ए.टि.एम. फोडण्याचा घाट अंगाशी आला.. पोलिसांनी मुसक्या आवळताच चोरी करण्याचा माज उतरला..

नववर्षाच्या सुरूवातीलाच ए.टि.एम. फोडण्याचा घाट अंगाशी आला..


पोलिसांनी मुसक्या आवळताच चोरी करण्याचा माज उतरला..

ए.टि.एम. फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक..

उल्हासनगर (गौतम वाघ) :- संपूर्ण विश्व सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी आनंद व हर्षोल्हासात मशगुल असतांना काही चोर बँकेचे ए.टि.एम. फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे प्रकटीकरणाचे  पो.उप.नि.हर्षल राजपूत ह्यांच्या पथकांने यश प्राप्त केले.
१ जानेवारी च्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सतरामदास हॉस्पीटल येथील ऍक्सिस बँकेचे ए.टी.एम मध्ये प्रवेश करून सदर ए.टी.एम चे सेप्टी डोर आणि ए.टी.एम पासवर्ड किट तोडून त्या मधून अज्ञात इसमानी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ए.टी.एम अधिकारी राजेश बोरकर यांच्या फिर्यादी नुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि.नं-१/२०२१ भा.द.वी कलम ३८०,४५७,५११,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.या तक्रारी नुसार बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज वरुन आसपासच्या परिसरातील फुटेज तपासत त्यांना दोन आरोपी ए.टी.एम बाहेर फिरताना आणि दोन आरोपी ए.टी.एम बाहेर येऊन पळताना दिसले या चार आरोपींची पोलिसांनी लागलीच ओळख पटवली.बातमीदाराने दिलेल्या माहिती च्या आधारे या चौघांना आशेळेगाव परिसरात सापळा रचत २४ तासात चार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे.सागर सूर्यवंशी,आशिष गौर,केशव जगताप,रोहित कहार असे या आरोपीची नावे आहेत.सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गुन्हाचा अधिक तपास पो.शि.निलेश तायडे हे करित आहे.
वरिष्ठ पो.नि.कन्नैया थोरात यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटिकरणाचे पो.उप.नि.हर्षल राजपुत यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक जितेंद्र चित्ते, निलेश तायडे, रोहिदास बुधवंत,पांडुरंग पथवे,पोलीस शिपाई,वैजनाथ राख, हरेश्वर चव्हाण, हनुमंत सानप,कृपाल शेकडे,गणेश डमाळे, बाबा जाधव, मंगेश वीर ह्यांनी सदरील कामगिरी उत्तमरित्या बजावत आरोपींना २४ तासाच्या आत अटक केल्याने वरिष्ठानी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्याचे मनोबल वाढवुन आंनद व्यक्त केला.

Friday, 1 January 2021

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळता कामा नये - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळता कामा  नये - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


पेण मधील "त्या '' मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली सांत्वनपर भेट !

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीना जामीन मिळता कामा नये; पेण मधील चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असून या गुन्ह्यातील आरोपी हा या आधी बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी असून तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने मानवतेला काळिमा फासणारा बलात्कार आणि हत्येचा गुन्हा केला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीना जमीन मिळता कामा नये तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी या साठी गृहमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. 
       रायगड जिल्ह्याच्या पेण शहरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या कोवळ्या चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची अमानुष घटना घडली. त्या मुलीच्या कुटुंबियांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या बळीत मुलीच्या कुटुंबियांना ऍट्रोसिटी कायद्या च्या तरतुदीनुसार त्वरित ८ लाख २५ हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी; मुलीच्या वडिलांना शासकीय नोकरी द्यावी तसेच या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यावे असे निर्देश ना रामदास आठवले यांनी यावेळी प्रशासनाला दिले. बलात्कार गुन्ह्यातील पीडितेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत दिली जाते त्याची रक्कम राज्य शासनातर्फे अनेक प्रकरणांत दिली जात नसून त्याबाबत  गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.आदिवासी गावठाण भोवती संरक्षक भिंत बांधण्याची सूचना ना रामदास आठवले यांनी प्रशासनाला केली. 
      यावेळी रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल चे उपमहापौर  जगदीश गायकवाड; हेमंत रणपिसे; नरेंद्र गायकवाड; धर्मानंद गायकवाड; घनश्याम चिरणकर आदी रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच  तहसीलदार पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीच्या तीन प्रभासाठी तब्बल सव्वीस उमेदवारी अर्ज!

कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीच्या तीन प्रभासाठी तब्बल सव्वीस उमेदवारी अर्ज!


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीच्या तीन प्रभातील ९सदस्या साठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये कल्याण पंचायत समितीच्या माझी उपसभापती योगेश शेठ धुमाळ यांचाही समावेश आहे. 
टिटवाळा शहरानजीक आणि गोवेली शहापूर रस्त्याच्या बाजूला घोटसई ग्रामपंचायत आहे राजकीय दृष्टीने ही ग्रामपंचायत महत्त्वाची मानली जाते. याच गावातील उद्योजक योगेश धुमाळ यांनी कल्याण पंचायत समिती चे उपसभापती पद समर्थ पणे सांभाळले होते. ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत. तर याच गावातील चितांमण मगर यांच्या पत्नी रेश्मा मगर या ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. अशा पद्धतीने या गावाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. 
या ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील ९ सदस्यासाठी तब्बल २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये वैद्य ठरलेले वार्ड क्रमांक १ मध्ये गुरुनाथ मगर, सचिन पवार, सविता मगर, राजू मगर, मनोज धुमाळ, रोशनी धुमाळ, सुयोग मगर, वार्ड २मध्ये सोमनाथ गायकर, सूषमा मगर, उर्मिला मगर, वैशाली पानसरे, योगेश धुमाळ, संतोष धुमाळ, सविता मगर, वनिता मगर, आणि वार्ड नंबर ३ मध्ये निलिमा प्रकाश भगत, दया रविंद्र मगर आदी असे एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ९ सदस्य पदाकरिता १हजार ४२६ पुरुष तर १हजार १९४ स्त्री मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे आज पासून म्हणजे १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२१ पर्यत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून कोण उमेदवार मागे घेतात यावरून अंतिम लढत होणार आहे.
त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुरबाड मध्ये नववर्षाचे स्वागत स्वच्छता रँली आणि रांगोळ्यांनी ! !

मुरबाड मध्ये नववर्षाचे स्वागत स्वच्छता रँली आणि रांगोळ्यांनी ! !      


" स्वच्छतेसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आमदार किसन कथोरे यांचे आवाहन" !                       

मुरबाड-(मंगल डोंगरे) : २०२० हे वर्षे कोरोना महामारीत गेले यात अनेकांची कुटूंबेउध्वस्त झाली,अनेकांना आपला जिव गमवावा लागला तर अनेकांची प्रचंड आर्थिक हानी झाली त्यामुळे येणारे नविन वर्षे २०२१ हे चांगल्या पद्धतीने सुखाचे ,उत्तम आरोग्याचे जावो तसेच नविन वर्षाची सुरुवात स्वच्छतेचा मंञ व पर्यावरणाचा  समतोल राखण्यासाठी शपथ देऊन करावी यासाठी आज १ जानेवारीला सकाळी मुरबाड शहरात नगरपंचायतच्या वतिने रॕलीचे आयोजन केले होते. शहरातील रस्ते चकाचक साफ करुन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर रांगोळ्यांनी नविन वर्षाचे स्वागत केले. गेले अनेक महिने मुरबाड शहरात दर शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरत असणारा आठवडी  बाजार बंद होता व मुरबाड बाजारपेठ सुद्धा शुक्रवारी बंद असायची  ती सुरु करण्याची मागणी केली जात होती   ती सुद्धा आज नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली म्हणून आज सकाळी मुरबाड मधे" स्वच्छता रॕली "चे आयोजन केले होते या रॕलीत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे सहभागी झाले होते. 
यावेळी आमदार कथोरे यांनी मुरबाड नगरपंचायत चे कौतुक केले व भविष्यात मुरबाड नगरपंचायत राज्यात स्वच्छते मधे  नंबर १ वर आणन्यासाठी नागरिकांनी  नगरपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले. स्वच्छतेची सुरुवात स्वःता पासुन करा तरच शहर स्वच्छ राहिल भविष्यातिल मुरबाड फार वेगळा व स्वच्छते मधे नंबर १ असेल असे मत यावेळी आमदार कथोरे यांनी व्यक्त केले. दरम्यान दुय्यम शिक्षण संस्था मुरबाड येथे '' माझी वसुंधरा अभियान २०२१ "  या मोहिमे अंतर्गत प्रतिद्नेचे वाचन करण्यात आले. ही रॕली नगरपंचायतचे प्रवेशव्दार  येथुन सुरुवात होऊन छञपती शिवाजी महाराज चौक येथे  छञपतींना अभिवादन करुन संपविण्यात आली. 
या रॕलीमधे  नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ,  पोलीस निरिक्षक दत्ताञय बोराटे , भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव , सरचिटणीस नितीन मोहपे , शहराधक्ष सुधिर तेलवणे ,जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस ज्योती ताई गोडांबे'शिल्पा देहरकर ' तालुका सरचिटणीस जयवंत कराळे , दिलीप देशमुख , माजी नगराध्यक्ष मोहन सासे ,माजी उपनगराध्यक्ष-नारायण गोंधळी' शितल तोंडलीकर , छायाताई चौधरी , मा. उपनगराध्यक्षा अर्चना विशे , साक्षी चौधरी,उर्मिला ठाकरे , वसंत जाधव यांच्यासह "मी पण स्वच्छता ग्रही" कार्यक्रम राबविणारे स्वच्छता दुत यांनी सहभाग घेतला.

कोकण कला मंच मुंबई/ग्रामीणतर्फे रविवारी लांजा, देवरुख येथे महत्वपुर्ण सभेचे आयोजन !

कोकण कला मंच मुंबई/ग्रामीणतर्फे रविवारी लांजा, देवरुख येथे महत्वपुर्ण सभेचे आयोजन !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

         रत्नागिरी जिल्ह्याची ओळख म्हणजे बहुरंगी नमन.बहुरंगी नमन ही लोककला खरं तर फार प्राचीन काळापासून आपल्या करमणूकीचं प्रमुख माध्यम बनून राहीली आहे. या लोककलेत सद्या काही नमन मंडळांनी ग्रामीण तसेच मुंबई सारख्या शहरी भागात व्यसायिकता सुध्दा आणन्याचा प्रयत्न केला आहे. हे खरं तर प्रगतीचं ल‌क्षण आहे. आणि त्याचं स्वागत सुध्दा व्हायला हवं. त्याच बरोबर बहुरंगी नमन कलेचा पाया ज्या गाव मंडळं व वाडी मंडळांनी घातला त्यांच कलेच्या प्रती असणारं  निस्सीम प्रेम, निष्ठा व त्याग यामुळे बहुरंगी नमन ही लोककला आजपर्यंत टीकून राहीली आहे. याचा विचार करता त्या मंडळांना व कलावंताना खरं तर धन्यवाद द्यायला हवे. कारण त्यांच्याच या निस्वार्थी प्रयत्नांमुळे ही लोककला जिवंत राहीली आहे. त्याच बरोबर आज मुंबई सारख्या जागतिक व्यापाराचं केंद्र असणाऱ्या शहरी भागात, मुळचे रत्नागिरीकर असणाऱ्या आपल्याच मुंबईकर कलावंतांनी या कलेमध्ये परंपरा व आधुनिकता यांचा योग्य मेळ बसवून नाविन्यता आणत इतर लोककलांच्या सादरीकरणाचा बाज पहाता नमन लोककला कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे. 

             मात्र आज या लोककलेचा मान आणि सन्मान ज्या पध्दतीने शासन दरबारी व्हायला हवा होता तो मात्र झालेला दिसत नाही. त्याला करणे अनेक आहेत मात्र त्यांचा विचार करता त्याला बहुतांशी आपणच सारे  जबाबदार असल्याचं आपल्या सखोल विचारा अंती लक्षात येईल. सार्वजनिक जिवनात कोणतीही गोष्ट संघटीत होऊन संघर्ष केल्या शिवाय आज पर्यंत कुणालाच  मिळाली नाही. त्या बाबीला आपण तरी अपवाद कसे काय ठरणार... ! आणि म्हणून बहुरंगी नमन या लोककलेला व त्यातील लोककलावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शासन दरबारी बहुरंगी नमन लोककलेचा शासन मान्य लोककलेचा दर्जा मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून जे संघटीत होण्या संबंधी विचारविनिमय करत होतो त्याचाच भाग म्हणून  मुंबई आणि ग्रामीणची महत्वपुर्ण सभा घेण्यात येत आहेत. सभेत शाशन दरबारी या कलेला राजाश्रय मिळवणे,विखुरलेल्या कलाकार मंडळी एकत्र करणे,शासनमान्य महोत्सव मिळवणे,शासकीय अनुदान मिळवणे, सरकारीतर्फे कलाकार मंडळींना जी पेंन्सन मिळते ती आपल्या कलाकार मंडळींना कशी प्राप्त करता येते याचे सखोल योग्य मार्गदर्शन करुन कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहीती देणे,संघटनेचा मुख्य गाभा हा मुंबई व ग्रामीण कलाकार मंडळींचा असावा यावर चर्चा होणार आहे.

                संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक पध्दतीने सर्वांना सोबत घेऊन संघटनेची बांधणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार लांजा- राजापूर तसेच संगमेश्वर तालुका वासियांसाठी रविवार दि.०३/०१/२०२१ वेळ सकाळी १०.०० वा.गजानन  गंगाराम गुरव,सती माता मंदिर,मु पो लांजा(गुरव वाडी)लांजा  एसटी डेपो च्या  मागे ता. लांजा, जि रत्नागिरी येथे पहिला सभा दुसरी सभा हॉटेल पवार,पवार हॉटेल च्या पाठीमागे,वीर सावरकर चौक,देवरुख ता संगमेश्वर येथे सायंकाळी ०४ वाजता आयोजित केली आहे.वरील आयोजना प्रमाणे सभेचे आयोजन लांजा नमन संघटना कार्यकारणी व राजापूर नमन कलावंत, तसेच संगमेश्वर तालुका नमन मंडळांचे चालक, निर्माते, गावकर व अधिकारी मंडळी यांच्या समवेत करत आहोत, तरी सदरची नोंद संबंधीतांनी घ्यावी या महत्वपुर्ण सभेला मुंबई/ग्रामीण नमन कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे निमंत्रक कोकण कला मंचतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मानवंदना...

भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मानवंदना... 


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी मानवंदना दिली. १ जानेवारी १८१८ रोजी या ठिकाणी घनघोर ऐतिहासिक लढाई झाली होती. या लढाई मध्ये ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांचा पराभव केला होता. महापराक्रमी महार सैनिकांच्या या अलौकिक अद्वितीय ऐतिहासिक आणि शौर्याच्या चीर स्मृती कायम जपण्यासाठी आणि या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने या रणभूमीवर अर्थात पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव या ठिकाणी दगडी चीर्यांचा वापर करून भव्य अशा विजय स्तंभाचे निर्माण केले होते. आपल्या पुर्वज महापराक्रमी शूर वीरांच्या या शौर्य स्मृती स्तंभाला मोठ्या आदराने मानवंदना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी १ जानेवारी रोजी या ठिकाणी आवर्जून येत असत. 
     दरवर्षी या ठिकाणी १ जानेवारी ला संपूर्ण देशभरातून संपूर्ण बहुजन समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या विजय स्तंभाला मोठ्या अभिमानाने मानवंदना देऊन अभिवादन करत असतात. 
      या वर्षी शुक्रवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. पुणे येथील भीमा कोरेगाव येथे येऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मोठ्या अभिमानाने सन्मान पूर्वक मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, वंचितचे नेते अशोक सोनोने, प्रवक्ते अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक व प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !!

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !! *कल्याण (संजय कांबळे)...