Saturday, 3 July 2021

रोटरी क्लब चोपडा तर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिटकवून लसीकरण जनजागृती.!

रोटरी क्लब चोपडा तर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिटकवून लसीकरण  जनजागृती.!


चोपडा वार्ताहर,:

लोकांना लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रोटरी क्लब चोपडा कडून ऑटो रिक्षा व एसटी बसेस वर बॅनर लावण्यात आले आहे.
 
जेव्हापासून देशात सर्वत्र कोरोना साथीचा रोग सुरू झाला तेव्हापासून रोटरी क्लब चोपडा केंद्र सरकारने जारी केलेल्या कोरोनाव्हायरस मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे, कोरोना काळात रोटरी क्लब तर्फे ५००० मास्क चे वाटप, कोविड १९ पासून संरक्षण व उपाययोजना संदर्भात चौकात बॅनर्स लाऊन जनजागृती, मागील वर्षी ऑक्सिजन पाइप लाईन साठी केलेली भरीव मदत, ३ ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर मशिन्स चे मा.तहसीलदार अनिल गावित साहेबांचा हस्ते लोकार्पण केले, कोरोनातून डिस्चार्ज झालेल्या पेशंट साठी चोपडा रोटरी च्या माध्यमातून फाऊलर बेड, वाकर, एअर बेड, वॉटर बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर, ट्रायपॉड, ट्रायपॉड स्टिक,ऑक्सिजन मशिन्स  आदी साहित्य उपलब्ध करून दिले. कोरोना काळात सुध्धा अशा अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब चोपडा अग्रेसर राहिली आहे.

प्रशासनातर्फे सर्वत्र लसीकरण सुरू झाले आहे परंतु सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या चुकीच्या संदेशांमुळे मोठी लोकसंख्या लसी घेण्यास अजूनही तयार नसल्यामुळे, रोटरी क्लब  चोपडा यांनी लोकांना व्हायरसची लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठीच नव्हे तर कोविड -१९ विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून "आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!", "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !" या आशयाचे घोषण वाक्य असलेले रोटरी क्लब चोपडा तर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिकटवून लसीकरण बाबत जनजागृती करीत आहे, जेणेकरून कोरोनाव्हायरस चा प्रसार होण्यास आळा बसेल. 

कार्यक्रमास चोपडा शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. अवतरसिंह चौहान व चोपडा बस आगार चे व्यवस्थापक मा.संदेश क्षीरसागर साहेब  यांचा हस्ते ३ रिक्षांवर व बसेस वर पोस्टर लावून या अभिनव उपक्रम सुरवात करण्यात आली. सादर कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, मानद सचिव ॲड.रूपेश पाटील, प्रफुल गुजराथी, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, चेतन टाटिया व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.

शालेय पोषण आहार अनुदान डी बी टी द्वारे पालकांच्या खात्यात जमा करावी : राजेश सुर्वे

शालेय पोषण आहार अनुदान डी बी टी द्वारे पालकांच्या खात्यात जमा करावी : राजेश सुर्वे


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : उन्हाळी सुट्टीतील एप्रिल व मे महिन्यातील  शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना दिले असलेले अनुदान डीबीटी द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्या ऐवजी पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे लेखी निवेदन राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने मान. शिक्षण संचालक साहेब (प्राथमिक) पुणे यांना दिले असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी दिली. 
        मागील वर्षी कोविड 19 काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून न देता कोरडा शिधा वाटप करण्यात येत होता. भारत सरकारच्या निर्देशानुसार सन 2020 -21या वर्षातील सुट्टीच्या कालावधीतील पोषण आहार अंतर्गत कोरडा शिधा वाटप न करता त्या ऐवजी सुट्टीतील कालावधीतील म्हणजे एप्रिल व मे महिन्याचे शालेय पोषण आहाराचे अनुदान डी.बी.टी. द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्याबाबत मान. शिक्षण संचालक साहेब प्राथमिक पुणे यांनी निर्देश दिले आहेत.       
       कोरोनाची तिसरी लाटेचा प्रामुख्याने प्रभाव लहान बालकावर मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे वारंवार आरोग्य मंत्रालयाकडून सूचित केले असताना, बँकेत प्रत्यक्षात खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेऊन जाणे, बँकेत गर्दी निर्माण करणे, आधार कार्ड संलग्न करण्यासाठी आधार केंद्रावर गर्दी निर्माण करणे, आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक आहे, कोविड19 काळात पालकांचा रोजगार बुडालेला असताना मानधना करिता नव्याने विद्यार्थ्यांची बँक खाते उघडणे व ते आधार शी लिंक करणे हे आर्थिक दृष्ट्या पालकांनाही न परवडणारे आहे, बँक खाते उघडण्यासाठी आधार लिंक करण्यासाठी आपला रोजगार बुडवून दुर्गम भागातील पालकांना विध्यार्थी घेऊन बँक व आधार केंद्र असलेल्या मोठ्या गावात प्रवास करून जावे लागणार आहे, ही परिस्थिती विचारात घेऊन  विध्यार्थ्या ऐवजी डी बी टी योजनेने रक्कम पालकांच्या बँक खात्यावर जमा करावी असा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मान. श्री राजेश सुर्वे सर यांच्या नेतृत्वात, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के कोषाध्यक्ष संजय पगार, संघटन मंत्री सुरेश दंडवते, कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, राज्य सहसंपर्कप्रमुख दिलीप पाटील राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार डॉ सतपाल सोवळे प्रकाश चतरकर संजय शेळके राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर पुरुषोत्तम काळे कार्यालयीन मंत्री भगवान घरत, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाये, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन देवके आदींनी केल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

Friday, 2 July 2021

राज्यात रुग्णसंख्येचा आकडा स्थिर ! मृत्यूदर २.०१ टक्के ! "शनिवार रविवार कडक लाॅकडाऊण"

राज्यात रुग्णसंख्येचा आकडा स्थिर ! मृत्यूदर २.०१ टक्के ! 

"शनिवार रविवार कडक लाॅकडाऊण"


मुंबई : राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आज 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजारांच्या जवळ आली आहे. याच दरम्यान राज्यात 156 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 60 लाख 79 हजार 352 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 58 लाख 36 हजार 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.01 टक्के इतके झाले आहे. कोरोनामुळे आजपर्यंत 1 लाख 22 हजार 353 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.01 टक्के एवढे आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 867 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत,दुबार पेरणीचे संकट?

वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत,दुबार पेरणीचे संकट?                                       


कल्याण, (संजय कांबळे) : तोक्ते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्हात पावसाला सुरुवात झाली,यांनतर पावसाचा हुकमी जुलै महिना सुरु झाला ,त्यामुळे या सर्व घटनांचा विचार करुन बळीराजाने भातपेरणी उरकून घेतली, पंरतू यानंतर वरुणराजाने दडी मारल्याने मात्र बळीराजा पूरता हादरुन गेला आहे, अजून पाऊस लांबला तर मात्र शेतक-यावर दूबार पेरणीचे संकट येवू शकते, अशी भिती व्यक्त केली जातेय.                                          


कोरोनाच्या सततच्या संकटामुळे शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, भाजीपाला पिकवूनही लाँकडाऊण मुळे बाजारपेठा न उपलब्ध झाल्याने शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यात आला होता, आता काही प्रमाणात कोरोनाचे संकट कमी झाले आहे.त्यामुळे यंदा पिक चांगले येईल या आशेवर बळीराजा होता, ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतक-यांच्या मदतीसाठी सुमारे १ हजार ३४० क्विंटल भात बियाणे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले यामध्ये सुवर्णा, जया म्हसोरी ,कर्जत ३,७, कोयम्टूर ५१, आदी जातींचा समावेश असून सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते, त्यामुळे जमीनीत थोडा ओलावा झाल्याने शेतक-यांनी पेरणी केली, पंरतू आता पावसाने ओड दिल्याने शेतक-यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे,ज्या ठिकाणी सखल जमीन आहे, किवा जेथे ओल आहे तिथे कसेतरी भातरोपे उगवली आहेत ,परंतू इतर ठिकाणचे काय?दिंवसेदिवस कडक ऊन पडत असल्याने चिंतेत भरच पडत आहे, त्यामुळे कोरोनाने मारले ,पण निसर्गाने तारले असे म्हणायचे असेल तर वरुणराजाची कृपा अत्यावश्यक आहे.

भिवंडीतील दुगाड फाटा ते वावली रस्त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. कडून दोन कोटी रुपये मंजूर.!

भिवंडीतील दुगाड फाटा ते वावली रस्त्यासाठी एम.एम.आर.डी.ए. कडून दोन कोटी रुपये मंजूर.!


अरुण पाटील, भिवंडी, दिं.2 :
         भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा ते वावली या चाळण झालेल्या रस्त्यासाठी एमएमआरडीए कडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सदर हा  रस्ता काँक्रीटीकरणाचा होणार असल्याने येथील नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातून मुक्तता मिळणार  आहे.
           भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अस्नोली, वावली, मानिवली ते दुगाड फाटा या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक,विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,आणि युवासेवा उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रभाकर पाटील यांनी सतत पाठपुरावा करून एमएमआरडीए क्षेत्रातील बाह्य रस्ते विकास योजने अंतर्गत दुगाड फाटा ते वावली मानिवली या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.त्यामुळे सदर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा होणार आहे.मात्र या कामाचा शुभारंभ कधी होणार व काम पुर्ण होण्यास किती महिने, वर्ष लगगील या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी यामुळे मात्र येथील  नागरिकांची होणारी मोठी गैरसोय टळणार असल्याने नागरिकांनमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई !

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई !


अरुण पाटील, भिवंडी, दिं.2 :
           राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीनं केलेल्या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का दील्याचं बोललं जात आहे.
         जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं दिलेल्या माहितीनुसार कारखाना विकत घेणारी कंपनी "गुरु कमोडिटीज" मध्ये सुनेत्रा पवार यांच्या "जय ॲग्रोटेक" या कंपनीतून सुमारे 20 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवण्यात आलेलं होतं. तर अजित पवारांचे मामेभाऊ असलेले राजेंद्र घाडगे जरंडेश्वर विकत घेणाऱ्या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे एकाच वेळी अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना कारखाना कमी किंमतीत मिळवून तो आपल्याच नातेवाईकांच्या नावे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कारण त्यातली गुंतवणूक ही त्यांच्या पत्नीचा म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नावे असलेल्या "जय ॲग्रोटेक" या कंपनीतून करण्यात आली होती.
         तसंच गुरु कमोडिटीजनं हा कारखाना "जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड"ला भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत.दरम्यान ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं 2010 मध्ये या कारखान्याचा लिलाव केला आणि गुरु कमोडिटीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
           मात्र माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील यांनी या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं होतं. थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाला असला तरी या प्रकरणी गैरव्यवहार झाला आहे. अजित पवारांनी आपल्या कडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनी ताईंकडून करण्यात आला होता. शालिनीताई या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.

ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते डॉक्टरांचा सत्कार.!

ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते डॉक्टरांचा सत्कार.!


अरुण पाटील, भिवंडी, दिं.2 :
       १जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवसाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती कुंदन तुळशीराम पाटील यांनी गुरुवार दि १जुलै २०२१ रोजी भिवंडीतील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवे- अंजूर येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे.
         सन 2020-2021 या कालावधीत कोरोना या जागतिक महामारी व राष्ट्रीय आपत्कालीन संसर्गजन्य, साथरोग काळात कोव्हिड - 19 बाधित व इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि कोव्हिड -19 या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन रुग्ण सेवेचे उत्कृष्ट काम करुन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेत अहोरात्र योगदान दिलल्या सर्वांचे सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले व राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना भिवंडी तालुका  सचिव दिपक पाटील, राजेंद्र काबाडी, शिवसैनिक शेखर मामा फरमान उपस्थित होते.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...