Wednesday, 2 February 2022

भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी, संतोष परब हल्ल्याप्रकरणी कारवाई !!

भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी, संतोष परब हल्ल्याप्रकरणी कारवाई !!


भिवंडी, दिं,03, अरुण पाटील : नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने त्यांना 4 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंना रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे.
        दरम्यान, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणे दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.
           काल कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर तैनात होते.
           सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते

नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार !!

नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार !!


भिवंडी, दिं,०२, अरुण पाटील (कोपर) : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या नितेश राणेंना आता आणखी एक झटका बसला आहे. 

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत येताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा नितेश राणे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. १११ पानांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. 

सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी थांबवली. यावेळी नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना अडवलं. यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले. 

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. ते आपले वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टाबाहेर पडले आणि गाडीत बसले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांचा मोठा ताफा आजूबाजूला जमा झालेला बघायला मिळाला. पोलीस नितेश राणे यांना आता अटक करतील, अशी शक्यता होती. पण नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे धावून आले. त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. पोलिसांना अटक करण्याचा अधिकार नाही, असं निलेश राणे ठामपणे म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांसमोर तीच भूमिका मांडली. अखेर मानशिंदे यांना कोर्टात जाऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जाण्यास परवानगी दिली. 

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

विरोधामुळे वाईन संधर्भातील निर्णय बदलला तर वाईट वाटणार नाही _शरद पवार.

विरोधामुळे वाईन संधर्भातील निर्णय बदलला तर वाईट वाटणार नाही _शरद पवार.


भिवंडी, दिं, ०२, अरुण पाटील (कोपर) : सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला, तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. 

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप तुलनेने अत्यंत कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये १८ वाईनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. 

वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल, तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

लहुजीनगर येथील अण्णाभाऊ साठे शाळेच्या जागेवर पार्किंगला रहिवाशांचा विरोध !! "शाळेला वाचविण्यासाठी मालनबाई साठे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले."

लहुजीनगर येथील अण्णाभाऊ साठे शाळेच्या जागेवर पार्किंगला रहिवाशांचा विरोध !!

"शाळेला वाचविण्यासाठी मालनबाई साठे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले."


मोहोने,संदीप शेंडगे : लहुजी नगर येथील अण्णाभाऊ साठे शाळेच्या जागेवर पार्किंग उभारण्याला लहुजी नगर येथील रहिवाश्यांनी जोरदार विरोध केला असून शाळेच्या जागेवर पार्किंग कदापि होऊ दिली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. 


लहुजी नगर ही वस्ती सुमारे ७० ते ७५ वर्षांपासून एन आर सी कंपनीच्या रेल्वे पटरीच्या बाजूला लागून असलेल्या एन आर सी कंपनीच्या जमिनीवर वसलेली आहे. या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अण्णाभाऊ साठे प्राथमिक विद्यालय नावाची शाळा अस्तित्वात होती, परंतु गेल्या काही वर्षापासून या शाळेतील पटसंख्या कमी झाल्याने तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे सध्या ही शाळा बंद पडली आहे. येथील समाजसेवक ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या शाळेच्या पटांगणामध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी नियमितपणे ध्वजारोहण करीत असतात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होतात. 


परंतु मंगळवारी अचानक काही इसमांनी शाळेच्या मैदानात खोदकाम करण्यास सुरुवात केली येथील रहिवाशांनी खोदकाम करणाऱ्यांना तुम्ही या ठिकाणी काय करत आहात असे विचारले असता त्यांनी सांगितले आम्ही या ठिकाणी पार्किंग उभी करणार आहेत. शाळेच्या मैदानात पार्किंग उभी करणार ही बातमी वाऱ्यासारखी लहूजी नगर मध्ये पसरली थोड्यावेळात लहुजी नगर येथील सर्व समाजसेवक ३०० ते ४०० नागरिक व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक या मैदानात जमा झाले रहिवाश्यांनी पार्किंगला जोरदार विरोध करीत पार्किंगचे काम थांबवले. 


थोड्याच वेळात खडकपाडा पोलीस ठाण्याची गाडी आणि मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा मैदानात उपस्थित झाला जमा झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मागे हटण्यास सांगितले. या जागेत पार्किंग करायचे असून तुम्ही पार्किंगला विरोध करू नका तुम्ही इथून निघून जा असे पोलिसांनी सांगितले परंतु रहिवाशांनी मागे हटण्यास जोरदार विरोध केला. येथील समाज सेवक मालनबाई साठे यांनी पोलिसांसमोरच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले तसेच तुम्ही इथून निघून गेले नाहीत तर मी स्वतःला जाळून घेईल अशी आक्रमक भूमिका घेतली. 


शेकडोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने पोलिसांना जोरदार प्रतिकार करत कारवाई थांबवली. आम्ही शाळेच्या जागेत बेकायदेशीर पार्किंग कदापि होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला होता. रहिवासी आक्रमक होत असल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख राहुल कोट यांनी पोलिसांना कारवाई थांबविण्याची विनंती केली. पोलीस आयुक्त आणि सहा. पोलिस उपायुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी कारवाई थांबवली.

Tuesday, 1 February 2022

म्हारळ गावचे निलेश देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती, परिसरात उत्साह !!

म्हारळ गावचे निलेश देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती, परिसरात उत्साह !!


कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या लोकहितवादी सामाजिक कार्याने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करणाऱ्या म्हारळ ग्रामपंचायतीचे माझी सरपंच कै शिवाजीराव देशमुख यांचे सुपूत्र सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक ग्रामपंचायतीचे माझी उपसरपंच निलेश शिवाजी देशमुख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी ही निवड करून त्यांच्या कार्याची जणू पोचपावतीच दिली आहे, अशा भावना परिसरातून व्यक्त होत आहे.


कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद कै शिवाजी देशमुख यांनी भूषविले होते. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांचा पुत्र निलेश देशमुख यांना मिळाले, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळणे तसे अवघड होते. परंतु ती निलेश देशमुख यांनी लिलया पेलली.


२००५च्या महापूरात पुरग्रस्तांना मदत, त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकखाते, यासह त्यांच्या वसाहती मध्ये गटारे, रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी, सडलेले, गंजलेले लाईटचे पोल बदलने, अपघात ग्रस्तांना मदत, आदी सामाजिक कार्यात कायमच आघाडीवर असलेल्या निलेश देशमुख यांनी सामाजिक, सांकृतिक वसा देखील तितक्याच आपुलकीने जपला, सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी आदी उत्सव म्हारळ गावात मोठ्या संख्येने साजरे केले. रात्री अपरात्री नागरिकांच्या मदतीला धाऊन जाण्याच्या परोपकारी वृत्ती मुळे त्यांना नागरिकांनी म्हारळ सारख्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बसवले, इतकेच नव्हे तर मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ सदस्यांमध्ये आख्ये पँनेल सर्वाधिक मतानी निवडून आणण्याचा चमत्कार निलेश देशमुख यांनी केला होता. आज त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी निलेश देशमुख या उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.


त्यामुळे अशी सामाजिक बांधिलकी जपणारे,सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे निलेश शिवाजी देशमुख यांची राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने म्हारळ गावासह तालुक्यात तरुण आणि नागरिकांमध्ये आंनदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपण पक्षवाढीसाठी कल्याण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात तरुणांसाठी विविध रोजगार मेळावे, महिलांना सक्षमीकरण, नागरिकांचे विविध प्रश्न, अडचणी, समस्या, सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर त्यांच्या या नियुक्ती बद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षात होत आहे.

भिवंडीत इको कारमध्ये सापडला स्फ़ोटकांचा मोठा साठा !!

भिवंडीत इको कारमध्ये सापडला स्फ़ोटकांचा मोठा साठा !!


भिवंडी, दिं,02, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालूक्यात मोठ्या प्रमाणावर दगड खाणी असल्या कारणाने या परिसरात कायदेशीर व  बेकायदेशीररित्या सुरुंग स्फ़ोटासाठी जिलेटीन व डिटोनेटरचा वापर केला जात आहे. या पूर्वी देखील कारिवली गावात अशाच प्रकारे जिलेटीन व डिटोनेट रचा साठा जप्त केला होता. अशाच प्रकारे पुन्हा भिवंडीमध्ये एका इको कारमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटीन व डिटोनेटरचा स्फोटक साठा  सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
                तब्बल 1 हजार जिलेटीन आणि डिटोनेटर  जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीनाका इथं ही कारवाई करण्यात आली आहे.
               अल्पेश पाटील, पंकज चव्हाण, समीर वेडगा अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून 1 हजार जिलेटीन नग, 1 हजार डीटोनेटर नग आणि इको कार जप्त केली आहे. पोलिसांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचे स्फोटक सामुग्री जप्त केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
           भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं कुणी आणली, या मागे कुणाचा काय हेतू आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना अर्थसहाय्याकरिता अर्ज करण्याचे अवाहन !!

कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना अर्थसहाय्याकरिता अर्ज करण्याचे अवाहन !!


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील पुर्णवेळ कलेवर गुजराण असणारे कलाकार यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार तालुक्यातील कलाकारांनी विहित नमुन्यात तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावे असे अवाहन कल्याण पंचायत समितीने केले आहे.


कोविड १९ या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, बहुतेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामध्ये कलाकारांचाही समावेश होता. प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या यामध्ये तमाशा, खडीगंमत, वासुदेव, पोतराज, चित्रकथा, बहुरूपी, किर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी संप्रदायाचे तसेच स्थानिक  ठिकाणी आढळणारे प्रयोगात्मक कलाप्रकारातील केवळ कलेवर उदरनिर्वाह असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कलाकार यांचा समावेश आहे.


त्यामुळे शासनाने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता विहित नमुन्यात अर्ज १५ वर्षे वास्तव्य, वार्षिक उत्पन्न ४८ हजारचा दाखला, आधारकार्ड, बँकेचे पासबुक छांयाकित प्रत, आदी कागदपत्रे सह कलाकारांनी सादर केलेल्या कलेची सविस्तर माहिती, ठिकाण, साहित्य, कलाक्षेत्रातील पुरावे, प्रकाशित साहित्य, कात्रणे, कलावंताच्या कार्यक्रमाची छायाचित्रे, वृतपत्रे बातम्या, आकाशवाणी, दुरदर्शन वरील कार्यक्रमाचे पुरावे,निमंत्रण पत्रिका, प्रशिस्तीपत्रक ज्यात अर्जदाराचा उल्लेख, अशा शासकीय अभिलेख च्या छांयाकित प्रती, इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडून तहसीलदार कल्याण यांच्या कडे १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावे असे अवाहन कल्याण पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाने केले आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...