Tuesday, 3 May 2022

लालबावटा शेतमजूर युनियन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २० मे रोजी राज्यभर आंदोलने.. 'जळगाव जिल्ह्यातही १९ मे ते २२ मे काळात आंदोलने होणार'

लालबावटा शेतमजूर युनियन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २० मे रोजी राज्यभर आंदोलने.. 'जळगाव जिल्ह्यातही १९ मे ते २२ मे कालात आंदोलने होणार'


चोपडा, बातमीदार.. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची राज्य कौन्सिल बैठक नुकतीच ‌अमरावती येथे युनियनचे राज्य अध्यक्ष कॉ. नामदेव‌ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस कॉ. शिवकुमार गणवीर तसेच भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या उपस्थितीत दिनांक २६ एप्रिल रोजी अमरावतीत झाली. त्या बैठकीतील निर्णय नुसार.... येत्या २० मे रोजी राज्यभर शेतमजुरांची रोजगार- वान गायरान जमीन-घरबांधणीसाठी ३ लाख रु अनुदान मिळणे, तसेच ज्यांची घर बांधली जात आहेत. त्यांच्या घराचे रखडलेल्या हप्त्यांचे पैसे मिळावेत. राहण्यासाठी जागा मिळावी राहत असलेली जागा नावावर करावी. व निवारा बांधून द्यावा , १४ जीवनावश्यक वस्तू, कामगार कुटुंबाच्या रेशन कार्ड वाटप सुरु करा. किमान तीन हजार रुपये मानधन श्रावणबाळ संजय गांधी इंदिरा गांधी योजना आदीमार्फत मिळावेत, कुटुंब अर्थसाह्य नॉन बी पि एल, बीपीएल महिलांना मिळावे उत्पंनाची अट १ लाख असावी या प्रश्न बरोबर..

पेन्शनप्रश्र्नी आंदोलन.. तसेच रोजगार हमीची कामं शहरातही मिळावीत आदी मागण्यांसाठी २० मे रोजी राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांवर आंदोलने मोर्चे आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
तसेच येत्या १३ जून रोजी : मुंबईत राज्यव्यापी बैठक व मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे.

*येत्या २६ जून रोजी : बीड येथे वनजमीन, जंगल, गायरान हक्क परिषद आयोजित करणे येणार* या सर्व निर्णय बरोबर येत्या १६ मे रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असून देशातील सर्व शेतमजूर संघटना एकत्र येणार आहेत *तेथून देशभर आंदोलन सुरू करण्याची हाक दिली जाणार आहे*

*या बैठकीत औरंगाबादेतील मनीष आव्हाड या मातंग युवकाच्या खूनाचा तीव्र निषेध निषेध करण्यात आला पोलीस खात्याला आवाहन करण्यात आले की, कोणत्याही पक्षाच्या दबावास बळी न पडता आरोपींना अटक करा. शासनाने मृताच्या पत्नीस तातडीची आर्थिक मदत द्यावी, नोकरी, व घर देण्याची व दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी* करण्यात आली आहे झालेल्या निर्णयानुसार जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय चोपडा अमळनेर जळगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून त्या आंदोलनाची तयारी सर्वश्री कॉम्रेड अमृत महाजन लक्ष्मण शिंदे, वाल्मीक महिराळे, निर्मला शिंदे, सुखदेव व्हील, सुरसिंग भिल, हिराबाई सोनवणे, प्रेम सिंग, बारेला, अरमान तडवी, जिजाबाई राणी, बळीराम धीवर, बाळू लोहार, गुरुदास मोरे, किशोर पाटील, संगीता पाटील, गणेश माळी, वासुदेव कोळी, पंडित महाजन, भिका महाजन, रेखा भालेराव, शांताराम पाटील, बाळू कोळी, रेखा पाटील, विश्वास पाटील, एकनाथ पाटील, ताराबाई भील, इरफान मण्यार, ताराबाई हेमाडे, चंद्रकांत माळी, अंबा लाल राजपूत, तमाशा पावरा, किशोर भिल्ल, आनंदा भील, आदी करीत आहेत असे लाल बावटा शेतमजूर युनियन ने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Monday, 2 May 2022

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे, मला शांतता बिघडवायची नाही, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले गेलेत महाराष्ट्रात का नाही?-- राज ठाकरे

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे, मला शांतता बिघडवायची नाही, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले गेलेत महाराष्ट्रात का नाही?-- राज ठाकरे


भिवंडी, दिं,२, अरुण पाटील (कोपर) :
            भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही, तर हा समाजिक विषय आहे. मला शांतता बिघडवायची नाही, जर उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले गेलेत तर महाराष्ट्रात का नाही? तुम्ही जर भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावू. मशिदी बरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढा. पण मशिदी वरचे काढल्या नंतरच. पोलिसांची परवानगी घेऊन हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केले.
           या आधी पण लाऊड स्पीकरवर बोललो, अनेक जण बोलले, मी फक्त पर्याय दिला. आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगीतले.
हे सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, त्यांना प्रेमाने विनंती करून जर समजत नसेल तर एकदाचे होऊन जाऊ द्या, महाराष्ट्रातील मनगटा मध्ये किती ताकत आहे ते त्यांना दाखवून द्यायला लागेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
          छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. झाला अन महाराष्ट्राचे दार उघडले. छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती नसून एक विचार आहे. त्यांनी महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा लवला. पवार साहेबांनी कधीही भाषणात  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीय द्वेष वाढला असे राज ठाकरे यांनी सांगितले.
         माझे आजोबा भट भिक्षूकीच्या विरोधात होते, मात्र आस्तिक होते. पवार त्यांच्या कामापुरते पुस्तक वाचतात. त्यांनी पूर्ण पुस्तक वाचले असते तर कळले असते. आता नाटक करत आहेत. नास्तिक आहे म्हणले की त्यांना लागले, आणि पूजा करतानाचे फोटो काढले. त्यांचीच मुलगी लोकसभेत म्हणते की "माझे वडील नास्तिक आहेत. अजून काय पुरावा हवा, असा घणाघात राज ठाकरे यांनी शरद पवार यंच्यावर केला.

कामगारांची स्थिती १८८६ पर्यंत मागे नेण्याचे सरकारचा प्रयत्न.. "मे दिनी आयोजित भाषणातील सूर"

कामगारांची स्थिती १८८६ पर्यंत मागे नेण्याचे सरकारचा प्रयत्न.. "मे दिनी आयोजित भाषणातील सूर" 


भुसावळ, बातमीदार.. येथील आयुध निर्माणी  कामगार युनियन द्वारा दोन वर्षे कोरोना काळानंतर या वर्षी १ मे जागतिक कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले,. सुरक्षेच्या कारणावरून सकाळी इस्टेट एरियात होणारी रैलीस पोलिस प्रशासनाने आयोजक यांना १४९ ची नोटीस दिलेने रद्द करण्यात आली. 


तथापि कामगार दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सकाळी ९ वा प्रथम लाल झेंड्याला सलामी, नंतर कामगार आंदोलनात शहीदांच्या प्रतीकात्मक स्मारकाला श्रद्धांजली, अर्पण करण्यात आल्यानंतर पदाधिकारी चा मेळावा घेण्यात कामगार युनियन अध्यक्ष काॅ. निलेश देशमुख व सहकारी यांचे पुढाकारात झालेल्या या कार्यक्रम साठी आयुध निर्माणी भुसावळ चे महाप्रबंधक श्री वसंत निमजे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते, त्यांचे सह फॅक्टरीचे उप- महाप्रबंधक श्री बी देविचांद तसेच एशियन गोल्ड मेडल विजेते मोहम्मद आरिफ व विशेष कॉ. सुरक्षा इन्चार्ज आर एस मेढे हेही मान्यवर अधिकारी तसेच विशेष मार्गदर्शक म्हणून राज्य आयटकचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष कामगार नेते काॅ. अमृतराव महाजन हे आवर्जून उपस्थित होते. कार्य क्रमाच्या सुरुवातीला आयुध निर्माणी बोर्ड चे जे सी एम श्री दिनेश राजगिरे यानी आपल्या प्रास्ताविकात कामगार दिनाच्या इतिहास थोडक्यात मांडून जुन्या पेंशन योजनेसाठी एकत्र येण्याचे व चार कामगार संहिता व खाजगीकरण धोरणाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. एससी एसटी ओबीसी संघाचे श्री राजू निकम यांनी संघटनांची बदलत चाललेली स्थिती, मागण्या व कार्यपद्धती बाबत मनोगत व्यक्त करतांना संसदेत आपले बाजू मांडणारेची संख्या वाढली तरच कामगारवर्ग वरचे हल्ले थांबतील असे आपल्या भाषणात विचार मांडले. 


या सभेत मार्गदर्शन करताना कामगार नेते कॉ. अमृतराव महाजन यांनी मे दिवसाचा इतिहास व सध्याचे सरकारचे कामगार धोरण मांडताना सांगितले की सरकार ने कामगारांनी गेली १०० वर्षापासून लढून मिळवलेले ४६ कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांना अनुकूल चार कामगार सहिता लादण्याचा प्रयत्न करत आहे व कामगार चळवळ १८८६ पर्यंत मागे रेटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे म्हणून शिकागो येथील कामगार  शहिदांचे स्मरण व त्यांच्या ध्येयाची प्रेरणा घेऊन आपली हक्काची लढाई सुरू ठेवली पाहिजे. असे प्रतिपादन केले. फॅक्टरीचे महानिबंधक श्री नीमजे यानीं आपल्या समारोप पर भाषणात कामगार दिनाच्या कामगारांना शुभेच्छा दिल्या व कामगारांनी एकजूट तर करावी व आपल्या फॅक्टरीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्याकडे ही लक्ष द्यावे असे आवाहन केले. 


कामगार दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष काॅ. निलेश देशमुख, उपाध्यक्ष काॅ. आशिष मोरे, कार्य चेअरमन को ऑप सोसायटी किशोर बढे, योगेश अंबोडकर सेक्रेटरी कार्यसमिति, खजिनदार संतोष बाविस्कर, मिलिंद ठोंबरे, प्रविण बोईत, रोशन चौधरी, राजू तडवी, नितीन देशमुख आदींनी परिश्रम घेतले.  *या कार्यक्रमात महानिबांधक निमजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व ३१ मे रोजी त्यांच्या होणाऱ्या सेवा निवृत्ती निमित्त कामगार व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचेसह मान्यवरांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला*

Sunday, 1 May 2022

*शाश्वत शेती विकासासाठी इस्कॉनचे 'हरी बोल'* *सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी*

*शाश्वत शेती विकासासाठी इस्कॉनचे 'हरी बोल'*

*सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी*


मुंबई, आजाद श्रीवास्तव : सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम इस्कॉनच्या 'हरी बोल' उपक्रमाच्या माध्यमातून केले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 


राज्यपाल कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन सभागृहात 'सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना' या उपक्रमाचा शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. 


सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, जैव विविधता टिकेल तसेच मृदा आरोग्य चांगले राहील असे सांगून नागरिकांनी सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य, दुग्ध उत्पादने, मध आदी जिन्नस खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 


यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली. 



कल्याण शाळेतील विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्काराने गौरव !

कल्याण शाळेतील विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्काराने गौरव !


कल्याण, बातमीदार -  आज दिनांक १ मे महाराष्ट्र दिन रोजी साकेत मैदान, ठाणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये माननीय पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल नांदिवली कल्याण या शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्काऊट गाईड च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य पुरस्कार या परीक्षेमध्ये शाळेतील ६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केले त्यामुळे मा. पालकमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट अश्विन अर्जुन नायर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

तसेच राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुजित चौधरी, प्रथमेश ढोणे, आदित्य होळकर, हर्ष निंबाळकर, यश पाल या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर विजेता रहाटे व मुख्याध्यापिका यशोदा नाईक मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हा परिषद स्थापना हिरक महोत्सव समारंभ कल्याण पंचायत समितीच्या वतीने उत्साहात साजरा, पत्रकारांचा गौरव !

जिल्हा परिषद स्थापना हिरक महोत्सव समारंभ कल्याण पंचायत समितीच्या वतीने उत्साहात साजरा, पत्रकारांचा गौरव !


कल्याण, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद स्थापनेस १ मे २०२२ रोजी ६० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर हिरक महोत्सव साजरा करण्याच्या शासनाकडून सूचना मिळताच कल्याण पंचायत समितीच्या वतीने सभागृहात मोठ्या उत्साहाने हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यांच्या सह माजी सभापती, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या ही सन्मान करण्यात आला.


सकाळी प्रथम सभापती रेश्मा मुकेश भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात सन्मान, सत्कार, गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिप प्रज्वलन व राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण केल्यानंतर कल्याण माझी सभापती माधुरी वाळिंबे, सदाशिव गायकर, व्याखाते संदिप पाटील.


सेवानिवृत्त अधिकारी, देसाई नाना, राजश्री दोंदे, सुलभा सातपुते, प्रविण माळोदे, नितीन घोडके, सामाजिक कार्यकर्ते मधूकर वाळिंबे, शिपाई, राहूल कांबळे, आदी कर्मचारी व अधिका-याचा सन्मान करण्यात आला. तर कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तसेच जि.प. व कल्याण पंचायत समितीच्या विविध योजना, कार्यक्रम यांना सदैव, प्रसिद्धी व सहकार्य करणा-या संजय कांबळे यांचा गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी शाल, श्रीफळ गुलाब पुष्ष व तूळशीचे रोप देऊन विशेष  गौरविण्यात आले.


व्याखाते संदिप पाटील यांनी महाराष्ट्र निर्मिती चा इतिहास सांगितला, राष्ट्रसाठी हुतात्मे झालेल्या वीरांची आठवण व्हायलाच हवी असे सांगून महाराष्ट्र ही साधूसंताची, समाजसुधारकांची, नररत्नांची, वीरांची भूमी आहे, त्यांच्या मुळे आपण हे सुवर्ण दिन पाहतोय, असे ते म्हणाले, यावेळी त्यांनी काही ओळी सादर करुन वातावरण निर्मिती केले.


कल्याण पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोईर, माझी सभापती माधुरी वाळिंबे, दर्शना जाधव, आदी नी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


गटशिक्षणाधिकारी सुनिता मोटघरे यांनी जिल्हा परिषदे बाबत माहिती दिली तर पत्रकार संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना अत्यंत चांगली लिहिली आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ते यशस्वी कसे होतील असे सांगून आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया असे सांगितले. 


शेवटी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले, ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये १ मे १९६२ मध्ये त्रिस्तरीय कार्यपध्दती अस्तित्वात येवून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली, त्यास आज १ मे २०२२ रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून च आपण आज या दिवशी अनेकांचा सत्कार केला, यावेळी कामाचा आढावा देखील घेण्यात आला.


या अतिशय सुंदर देखण्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यक्ती, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनावणे सर यांनी अंत्यत काव्यात्मक रुपाने महाराष्ट्राचे वर्णन करत या सोहळ्याचे सुत्रसंचालन केले त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या २५ व्या  वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या  कासार कोळवण गावातील सरकार मान्य श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचा २५ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ हे सामाजिक ,शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत मंडळाच्या वतीने गेली २५ वर्ष अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले व ह्या मंडळास ४ राज्यस्तरीय व १ नॅशनल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत व एक उत्तम सामाजिक संघटना म्हणून नावलौकिक आहे.मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक १० मे २०२२ ते १२ मे २०२२ दिन दिवस साजरा करण्यात येणार असून विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा , बॉक्स क्रिकेट टूरनामेन्ट , विध्यार्थी गुणगौरव, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, महिलांसाठी हळदीकुंकू, धार्मिक विधी काकड आरती, होम हवन, साई बाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक, साई भंडारा महाप्रसाद, रेकार्ड डान्स, व सांस्कृतिक कार्यक्रम लोकांच्या मनोरंजनासाठी श्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडळ, रत्नागिरी, खेडशी अश्या विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या  कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रेरणास्थान उद्योगपती विश्वजित चिंदरकर साहेब व विद्यमान आमदार शेखरजी निकम साहेब, सामाजिक कार्यकर्ते युयूस्तू आर्ते, साहेब, पत्रकार शांतारामजी  गुडेकर,  मा.श्री. अविनाशजी लाड (राष्ट्रीय कांग्रेस, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर, नवी मुंबई), गावचे उप सरपंच प्रकाश तोरस्कर, मा.श्री. प्रमोद अधटराव (भाजप जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी), मा.श्री.रुपेश कदम(भाजप युवा अध्यक्ष), मा. श्री रमेशजी कानावले (समाजसेवक ), मंडळ अध्यक्ष रवींद्र सि. करंबळे, सचिव शैलेश दळवी, खजिनदार राजेंद्र शं. करंबळे व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद, महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य, युवा मंडळ पदाधिकारी, सदस्य यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...