Monday, 3 July 2023

विभागातील मुलांना पावसाळी रेनकोट वाटप !

विभागातील मुलांना पावसाळी रेनकोट वाटप !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             दादा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थे मार्फत घाटकोपर पश्चिम विभागातील मुलांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले. पश्चिम भीमनगर परिसरात राहणाऱ्या एकूण ५०० मुलांना यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू पवार यांच्या हस्ते हे रेनकोट वाटप करण्यात आले. दादा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उपनगरसह राज्यात आदिवासी भागात गरजू तसेच अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच वस्तू वाटप करण्यात येते. कोरोनाच्या महामारीत देखील या प्रतिष्ठानने रस्त्यावरील तसेच फूटपाथवर गुजराण करणाऱ्यांना महिनाभराचे राशन किट, औषधे सलग चार महिने वाटप करण्यात येत होते.

श्री गणेशनाथ महाराज संस्थान तर्फे श्री गुरुपौर्णिमा महोत्सव !

श्री गणेशनाथ महाराज संस्थान तर्फे श्री गुरुपौर्णिमा महोत्सव !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            श्री गणेशनाथ महाराज संस्थान ट्रस्टच्या वतीने आज गुरू पौर्णिमा निमित्त सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत हरिपाठ , भजन सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वामी श्री अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लालबाग येथील हनुमान थियेटर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुरुकुल श्री क्षेत्र शेंदूर मलई दत्ताश्रमातील श्री गुरुदेवांच्या निर्गुण पादुका व श्री समर्थ रामदास स्वामींच्या पंढरीची वारी करून आलेल्या पादुका देखील दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. यावेळी सकाळी 7 ते 9 श्री च्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. सकाळी 9 ते 10 श्री च्या पादुकांची मंगल प्रदक्षिणा व मंदिर भेट , सकाळी 10 ते 12 संवाद बैठक घेण्यात आली तर रात्री 8 वाजता दर्शन व अखंड अभंग गायन कार्यक्रम पार पडला. यावेळी महाड पोलादपूर माणगाव चे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी गुरू पौर्णिमा निमित्त आज सद्गुरु श्री अरविंदनाथ महाराज यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.

Sunday, 2 July 2023

अजित पवारासह शपथ घेतलेल्या ८ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याचे जयंत पाटीलानी दीले संकेत !!

अजित पवारासह शपथ घेतलेल्या ८ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याचे जयंत पाटीलानी दीले संकेत !!

*श्री.जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड*

भिवंडी, दिं,३,अरुण पाटील (कोपर)
       काल  महाऱाष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी शपथ घेतली. शपथ घेतल्या नंतर आम्हाला माहीत झालं. त्याच क्षनी ते अपात्र ठरले. त्यामूळे अपात्रतेची याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे काही वेळेआधी आम्ही इमेलद्वारे पाठवली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .तसेच श्री.जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष श्री.जयंत पाटील यांनी काढले आहे.

     विधानसभा अध्यक्षांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. त्यांना मेसेज केलाय. व्हॉट्सअॅपवरही कॉपी पाठवली आहे. अपात्रतेची याचिका प्रत्यक्ष देण्याची व्यवस्था केली आहे.निवडणूक आयोगालाही आम्ही पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची कृती मान्य नाही. पक्ष ताबा घेण्याचे सांगेल पण आम्ही आहोत. राष्ट्रवादी अस्तित्वात आहे असं आधीच सांगितलं आहे.
      शिस्तपालन समितीलाही पत्र लिहिलं होतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात सांगितलं. आम्ही त्यानुसार नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्या ( दीं,३) सकाळी लवकर आम्हाला सुनावणीसाठी बोलावलं पाहिजे. ज्या ९ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शपथ घेतली. त्यांच्या विरोधात आम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
      जितेंद्र आव्हाड यांना व्हीपचा अधिकार दिला आहे. त्यांचा व्हीप सर्वांना लागू असेल. ते स्वतः विधासभा अध्यक्षांकडे प्रत्यक्षपणे अपात्रतेची याचिका देण्याचा प्रयत्न असेल. पक्षविरोधी कृती ज्या क्षणी पवार आणि प्रदेशाध्यक्ष अर्थात मला कोणतीही कल्पना न देता कृती केली आहे. आमच्या धोरणां विरोधात जाऊन त्यांनी शपथ घेतली. ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणी ते अपात्र ठरले आहेत.
      शपथ विधीसाठी गेलेल्या अनेक आमदारांनी माहीत नसतानाही सह्या केल्या आहेत.ते आमच्या संपर्कात आहेत. आम्ही श्री .शरद पवार यांच्या सोबत असल्याचे त्यांनी फोनवरून कळविले आहे.त्या सर्वांना परत यायचंय  त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही. त्यांना थोडा वेळ देऊ. त्यांना काहीच माहीत नाही. कोणत्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या याची कल्पना नाही. शरद पवार हे उद्या (दीं,३) रोजी साताऱ्याला जात आहेत. तेथून ते महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करतील. ते पुन्हा योद्धा म्हणून जनतेसमोर जात आहेत.

अजित पवार पाचव्यांदा व पंचवार्षिक मध्ये तिसऱ्यांदा उप मुख्यमंत्री !

अजित पवार पाचव्यांदा व पंचवार्षिक मध्ये तिसऱ्यांदा उप मुख्यमंत्री !

ईडीची नोटीस देऊन सत्तेत सामील करून घेऊन  सिंचन घोटाळ्यातून मुक्त केले - शरद पवार

भिवंडी, दिं, २, अरुण पाटील (कोपर) :
        अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा धक्का देताना रविवारी उप मुख्य मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच अजित पवार पाचव्यांदा व पंच वार्षिक मध्ये तिसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडला आहे. अजित पवार व छगन भुजबळ यासह अनेकांना पंत प्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी काही दिवस पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्या आरोप करत  ईडीच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नंतर आता भाजपने अजित पवारांना सत्तेत घेऊन त्यांना या घोटाळ्यातून मुक्त केले आहे अशी उपरोक्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांनी दिली आहे.
        तसेच पुढे बोलताना श्री.शरद पवार म्हणाले की,राष्ट्रवादी पक्षावर श्री.मोदींनी काही दिवसापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग त्याच लोकांना पुन्हा राज्याच्या मंत्री मंडळात स्थान दिले.याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते, त्यामुळे मी पंतप्रधानांचा आभारी आहे त्यानीं पक्षावरील आरोपाला मुक्त केले असे ते पुढे म्हणाले
         तसेच श्री.शरद पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, ज्यांना जायचे नाही ते थांबले नाही,आमच्या पक्षाची नवीन टीम तुम्हाला दिसेल शापत्विधी नंतर मला कोणाचाही फोन आला नाही, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. प्रफुल्ल पटेल सुनिल तटकरे यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही.उभी करू शकतो कर्तुत्वाची नवीन पिढी असे मत शरद पवार यांनी व्यक्त केला आहे 
          अजित पवार यांनी ११ नोव्हेंबर २०१० रोजी सर्वप्रमथ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तब्बल १ वर्ष  ३१९ दिवस या पदावर राहिल्यानंतर २५ सप्टेंबर २०१२  रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.
            यानंतर तीनच महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात ७ डिसेंबर २०१२ रोजी अजित पवार यांनी पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कायम राहिले. एकाच पंचवार्षिकमध्ये दोन वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
             अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ती २३ नोव्हेंबर २०१९ रोजी. त्यांचा हा शपथविधी संपूर्ण देशभरात चांगलाच चर्चेत राहिला. सकाळीच घेतलेल्या या शपथेला पहाटेचा शपथविधी म्हणून संबोधले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवल्याने अजित पवार यांचे हे बंड तीनच दिवसांत फोल ठरले.
             देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर अजित पवारही पुन्हा महाविकास आघाडीसोबत आले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ३० डिसेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत २ वर्षे १८१ दिवसांसाठी ते या पदावर कायम राहिले.
            ..आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी आज म्हणजेच २ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पाचव्यांदा या पदावर विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे एकाच पंच वार्षिक मधील हे त्यांचे तिसरे उपमुख्यमंत्रीपद आहे.

Saturday, 1 July 2023

समाजाची अपेक्षापूर्ती हेच रोटरीचे ध्येय ; चोपड्यात डायलिसिस मशीन लोकार्पण प्रसंगी - डॉ.आनंद झुंनझुनवाला

समाजाची अपेक्षापूर्ती हेच रोटरीचे ध्येय ; चोपड्यात डायलिसिस मशीन लोकार्पण प्रसंगी - डॉ.आनंद झुंनझुनवाला

चोपडा, ( वार्ताहर ) - परिवारातील एक सद्स्य जर किडनी विकाराने त्रस्त झाला तर संपूर्ण परिवाराचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात येत असते, जवळ पैसा असेल तर उपचार होऊ शकतात पण जर का आर्थिक स्थिती नाजूक असेल तर घरातला सदस्य आपल्या डोळ्या देखत मारतांना बघावे लागते यापेक्षा दुसरे दुर्दैव नसावे, याच गोष्टींचा विचार करून रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे, समाजाची अपेक्षापूर्ती हेच रोटरी चे ध्येय असल्याचे मत आज डायलिसील सेंटर लोकार्पण प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंनझुनवाला यांनी व्यक्त केले.

चोपडा रोटरी क्लब आणि हरताळकर हॉस्पिटल, चोपडा यांच्या वतीने आज दि.२९ रोजी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत दोन डायलिसिस मशीन लोकार्पणाचा महत्वकांक्षी सामाजिक उपक्रम पार पडला. या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्याकळून एक डायलिसिस मशीन देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.आनंद झुंनझुनवाला ( प्रांतपाल रोटरी ) तर उद्घाटक म्हणून डॉ.विजय पोतदार, डॉ.विकास हरताळकर उपस्थित होते. अतिथी म्हणून डॉ.अमित भंगाळे,जळगाव येतील डॉ.राजेश पाटील, संदीप काबरा, चंद्रकांत सत्रा हजर होते. सदर डायलिसिस सेंटरचे प्रकल्प प्रमुख म्हणून संजीव गुजराथी, नितीन अहिरराव काम बघणार आहेत.
    
यात गरजू रुग्णांना नाममात्र सेवाशुल्क आकारून उपचार मिळणार आहेत, तसेच ज्या रुग्णांना ते ही शक्य नसेल त्यांचा खर्च रोटरी उचलणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी आशिष गुजराथी, चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, माजी गटनेते जीवन चौधरी, ऍड.रवींद्र जैन, सुनील जैन, डॉ.विकास हरताळकर, डॉ.राजेंद्र भाटिया, डॉ.प्रेमचंद महाजन, डॉ.अमित हरताळकर, डॉ.विनीत हरताळकर, डॉ.लोकेंद्र महाजन, डॉ.सौ.नीता हरताळकर, सौ.जोत्स्ना हरताळकर, डॉ.मंगेश वैद्य, डॉ.दुर्गेश जैस्वाल, डॉ.दिपक चौधरी, डॉ.पराग पाटील, डॉ.आर.टी.जैन, डॉ.रवींद्र पाटील, डॉ.वैभव पाटील, रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील, सचिव गौरव महाले, पंकज बोरोले, प्रवीण मिस्तरी, चेतन टाटीया, सौ.मोनिका झुंनझुंनवाला आदी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.अमित हरताळकर, डॉ.विकास हरताळकर, डॉ.राजेश पाटील, डॉ.अमित भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक ॲड रुपेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.

महाराष्ट्र में 'खोका' राजनीति का एकमात्र विकल्प राष्ट्रीय आम आदमी पार्टी हि है - गोपाल इटालिया (सह-प्रभारी - आप महाराष्ट्र)

महाराष्ट्र में  'खोका' राजनीति का एकमात्र विकल्प राष्ट्रीय आम आदमी पार्टी हि है - गोपाल इटालिया (सह-प्रभारी - आप महाराष्ट्र)

आप-गुजरात में निरंतर प्रयासों के साथ, गोपाल इटालिया को सूरत नगर निगम में 27 नगरसेवक, गुजरात विधानसभा में 5 विधायकों और  14 प्रतिशत वोट शेयर के साथ सफलता मिली और AAP को राष्ट्रीय पार्टी का दर्जा मिला । गोपालजी की इन्हीं खूबियों के दम पर आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल ने उन्हें पूरे महाराष्ट्र में संगठन को मजबूत करने के लिए भेजा है । इसके साथ ही गोपालजी ने पूरे महाराष्ट्र के हर जिले का दौरा किया और जिला टीमों के साथ सक्रिय रूप से बातचीत की ।
गोपालजी के नेतृत्व में सर्वप्रथम 28 मई से 6 जून तक स्वराज्य यात्रा का सफल आयोजन किया गया। विठोबा के आशीर्वाद से, यह यात्रा पंढरपुर से शुरू हुई, महाराष्ट्र के अंदरूनी गांवों से होकर गुजरी और 6 जून को शिवाजी के राज्याभिषेक दिवस पर रायगढ़ में समाप्त हुई। इस यात्रा में पूरे महाराष्ट्र से बड़ी संख्या में स्वयंसेवकों ने बड़े उत्साह के साथ भाग लिया।

फिर, गोपालजी की अपील के अनुसार, 12 जून से 18 जून के बीच, तालुका स्तर पर, महाराष्ट्र के हर जिले में, स्वराज्य संवाद कोने की बैठकें और सदस्यता पंजीकरण आयोजित किए गए, इन कोने की बैठकों को महाराष्ट्र के हर कोने से भारी प्रतिक्रिया मिली और सदस्यता पंजीकरण  भी बड़े पैमाने पर हुआ ।

इसके बाद, गोपालजी ने प्रभावी प्रबंधन के लिए पूरे महाराष्ट्र की टीमों को विदर्भ-पूर्व, विदर्भ-पश्चिम, मराठवाड़ा-पश्चिम, मराठवाड़ा-पूर्व, कोल्हापुर, पुणे, नासिक, नवी मुंबई और कोंकण में विभाजित किया। फिर उन्होंने प्रत्येक मंडल से प्रत्येक जिले की प्रबंध समितियों की उपस्थिति में 23 जून से 30 जून तक प्रत्येक मंडल पर स्नेहभोजन बैठक आयोजित करने की अपील की। पूरे महाराष्ट्र के सहभोजन सभा श्रृंखला के अंतिम दिन, शुक्रवार 30 जून को, नवी मुंबई और कोंकण डिवीजनों के प्रत्येक क्षेत्र से जिला, तालुका और नगरपालिका समितियां यानी ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगढ़ और रत्नागिरी के साथ-साथ पनवेल, वसई विरार, मीरा भयंदर, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, मुरबाड तालुका, शाहपुर तालुका ने अनुराधा मंगल कार्यालय - ठाणे में सभी प्रबंध समिति के सदस्यों की उपस्थिति में एक स्नेहभोजन बैठक आयोजित की ।

महाराष्ट्र में सभी समिति सदस्य जोर-शोर से आगामी चुनाव की तैयारी कर रहे हैं. राष्ट्रीय आम आदमी पार्टी, महाराष्ट्र में 'खोका' राजनीति का आम आदमी हि एकमात्र विकल्प है । अब सभी जिला पदाधिकारी अपने-अपने क्षेत्र के प्रत्येक वार्ड में समितियां बनाने की तैयारी करें - गोपाल इटालिया (सह प्रभारी - आप महाराष्ट्र) ।

ठाणे टीम द्वारा परिश्रमपूर्वक आयोजित और गोपाल भाई इटालिया के मार्गदर्शन में स्नेह भोजन सभा ने सभी समिति सदस्यों के बीच सकारात्मक ऊर्जा पैदा की है। आने वाले समय में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर हम सब मिलकर संगठन को और तेजी से खड़ा करके आगामी चुनावों का सामना करेंगे और दिल्ली में आम आदमी पार्टी की तरह काम करने का ईमानदार प्रयास करेंगे - धनंजय शिंदे - प्रदेश सचिव आप महाराष्ट्र

दीपक दुबे - 9773282367
मीडिया विभाग, आम आदमी पार्टी

समृध्दी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, खासगी बसच्या भीषण अपघात २५ जणांचा होरपळून मृत्यूने महाराष्ट्र हादरला !!



समृध्दी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, खासगी बसच्या भीषण अपघात २५ जणांचा होरपळून मृत्यूने महाराष्ट्र हादरला !!

*मदत वेळेवर मिळाली असती तर वाचले असते जीव प्रवाशांचा आरोप*

भिवंडी, दिं,१, अरुण पाटील, (कोपर) :
           समृध्दी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आतापर्यंत कित्येकांना आपला जीव गमावावा लागला असतानाच नागपूरहून पुण्याकडे समृध्दी महामार्गा वरून निघालेल्या एका खासगी लक्झरी बसला शुक्रवारी मध्यरात्री १,३० वा, बुलढाणा जिल्ह्यातील पिंपलखुटा गाव लगत भीषण अपघात होउन अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते, त्यातील ४ प्रवासी अपघाता नंतर बाहेर पडले. मदत वेळेवर मिळाली असतीतर काही प्रवाशांचा जीव वाचला असता असा आरोप वाचलेल्या प्रवाशांनी केला आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्रीश्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री .देवेंद्र फडणवीस यांनी घटना स्थळी भेट दिली व मृतांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे.

                  शिंदे व फडणवीस घटनास्थळी दाखल

         नागपूरहून  समृद्धी महामार्गावर  पुण्याकडे निघालेल्या या बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. 

        या अपघाता नंतर समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची भीषणता जाणवली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते सध्या घटनास्थळाची पाहणी करत असून घटनेची माहिती घेत आहे.
        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते घटनास्थळाची पाहणी केली आहे.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हे चालकाच्या हातात असते. या प्रकरणी सविस्तर चौकशी होईलच आणि त्यावेळी सत्य समोर येईलच. मात्र २५ प्रवशांचा मृत्यू झालाय, ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटल आहे.ते घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
        प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर बस प्रथम उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकल्याने बस पलटी झाली. बस डावीकडे वळली, त्यामुळे बसचा दरवाजा खाली आला. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता.
          अपघातानंतर बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली. पोलिसांनी बसमधून २५ मृतदेह बाहेर काढले आहेत. गंभीर भाजल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले असून आता डीएनए चाचणीची मदत घेणार आहेत.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...