Thursday, 23 April 2020

'परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडा' - अजित पवार

'परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडा' - अजित पवार 
केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची आणि त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात तसेच त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले असून, परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबिरव्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूरबांधव राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम. सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत. पहिल्या देशव्यापी टाळेबंदी समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे. रेल्वे मंत्रालयाने सदर वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे लागू टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी किंवा केंद्राने ठरविल्याप्रमाणे टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरु होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजुरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल.
महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने, तसेच येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तरप्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या देशात सर्वाधिक आहे. हे मजूर असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात. टाळेबंदीमुळे दिड महिन्यांपासून ते शिबिरात आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. शिबिरांमध्ये निवास, भोजनाची, वैद्यकीय उपचारांची सोय राज्यशासन आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली आहे ती यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल. परंतु, जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत ते टाळेबंदी संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. या शक्यता गृहित धरुन रेल्वेमंत्रालयाने मुंबई व पुणे येथून, या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सेक्स वर्कर यांना आधार फौंडेशनच्या वतीने मदतीचा हात

सेक्स वर्कर यांना आधार फौंडेशनच्या वतीने मदतीचा हात
प्रतिनिधी, कल्याण. 
कल्याण पुर्व चिंचपाडा, लक्ष्मीनगर येथील महिला सेक्स वर्कर आणि त्यांच्या परिवाराला आधार फौंडेशनच्या वतीने जेवण तसेच राशन सामुग्री देण्यात आली.
आधार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चिराग आनंद यांनी सांगितले की देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य कुटुंबाचे हाल होऊ नये याकरिता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या आधार फौंडेशनकडून सतत कल्याण व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात लहान मुले ते वयोवृद्ध गरजवंत नागरिकांना जेवण व राशन सामुग्री पुरवली जात आहे यामध्ये अनेकांचा सहभाग लाभला आहे. 
याचप्रमाणे कल्याण पुर्व चिंचपाडा लक्ष्मीनगर येथील महिला सेक्स वर्कर व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जाऊन जेवण व राशन सामुग्री पुरवली त्यावेळी महिला समाज सेविका कल्पना साळवी, डॉक्टर सविता चिराग आनंद, राजेंद्र साळवी व संस्थेचे इतर सदस्य सुध्दा होते. यावेळी त्या वस्तीतील एका महिलेला कुत्रा  चालल्यामुळे ती अस्वस्थ होती तीला डॉक्टर सविता चिराग आनंद यांनी मेडिकल स्टोरमधून इंजेक्शन आणले व औषधे देऊन तिच्यावर उपचार केले.

अन्नदान ही सर्वश्रेष्ठ दान है , कोई गरीब खाली पेट सो नही पाए

अन्नदान ही सर्वश्रेष्ठ दान है , कोई गरीब खाली पेट सो नही पाए।
प्रतिनिधी, कल्याण
       पूरा देश कोरोना जैसी भयंकर महामारी के वायरस से संघर्ष कर रहा है । कोरोना को हराने के लिए सरकार ने लाकडाऊन -2 घोषित कर दिया है । वही दूसरी ओर गरीब मजदूर, आदिवासी निम्न स्तर के लोग भुखमरी के कगार पर पहुँच गए हैं इस विकट परिस्थितियों मे गरीब बेसहारा लोगों का रास्ट्रीय सहसचिव राकेश शेट्टी जी ( रास्ट्रीय कांग्रेस सेवा दल) व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवा दल ( अध्यक्ष) विलास औतारे साहेब   के मार्गदर्शक मे अरुण रमाकांत तिवारी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवा दल सचिव एवंम जनतंत्र संस्था संतोष जियालाल यादव व पूर्वांचल चैरिटेबल ट्रस्ट( मुख्य  ट्रस्टीे ) व भदोही विकास संघ के अध्यक्ष (अरुण रमाकांत तिवारी) के सहयोग से गरीब व जरूरत मंद लोगो के घर घर जाकर खाने के सामान मे उपयोग आने वाली जरूरत चीजों को हमारे कार्यकर्ताओं के द्वारा मुहैया कराने मे सहयोग कर रहे हैं । अरुण रमाकांत तिवारी ने संवाददाता से बात करते हुए कहा कि  हमारा यही प्रयास है कि कोरोना जैसी भयंकर महामारी से लड़ने के लिए डिसटेनटिग का पालन करते हुए लोगों तक यह बीमारी नही फैले इसलिए हमारे कार्यकर्ताओं के द्वारा घर घर जाकर सामग्री को पहुंचाया जा रहा । और कार्यकर्ताओं से अपील की फोटो खिंचवाने के चक्कर मे भीड़ नही करे निस्वार्थ भाव से सेवा करे ।

Monday, 20 April 2020

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधील गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना भाजीपाला वाटप

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधील गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना भाजीपाला वाटप
प्रतिनिधी, कल्याण
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक-डाऊन मुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या वतीने कम्युनिटी किचन व शिवभोजन थाळी इत्यादींच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु उपासमारीच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक कोरोना आपत्कालीन परिस्थितीत कोणीही उपाशी पोटी राहू नये व सर्वांना सकस आहार मिळावा या शासनाच्या हाकेला साद देत नंदीकेश्वर सामाजिक संस्था व या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी परत एकदा आपल्या स्वःखर्चाने त्यांचे मार्गदर्शक गजानन पाटील (मा.विभाग प्रमुख) व सहकारी सामाजिक नेते सुरेंद्र आढाव, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, रवी भोईर, संदिप मोरे, गणेश पाटील, उन्मय पाटील, ललिता पाटील, स्वाती पाटील यांना सोबत घेऊन प्रभाग क्रमांक १६ या परिसरातील कामगार, रिक्षाचालक, हातावर पोट असणारे मजुर व गरीब गरजु कुटुंबीयांना सकस आहार मिळावा यासाठी भाजीपाला वाटप केले नंदिकेश्वर सामाजिक संस्था व अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी या माध्यमातून आतापर्यंत ४०० च्या वर कुटुंबांना सर्व प्रकारच्या गरजेच्या भाजीपाल्याचे वाटप केले. 
लॉक-डाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याने याचा विपरित परिणाम गरिब व मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणा-या जनतेच्या मानसिकतेवर होत आहे. त्यांची चिंता कमी व्हावी त्यांना सकस आहार मिळावा व आपणही समाजाचे देणेकरी आहोत या भावनेतून नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांचे बंधु गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांना सोबत घेऊन गरजवंतांना सकस आहार भाजीपाल्याचे वाटप केले तसेच प्रभागातील गरजवंत नागरिकांना आपण,  व आपले सहकारी नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत करत रहाणार असे सांगितले.
-

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" च्या वतीने गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

*"अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" च्या वतीने गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप...*

महेंद्र (अण्णा) पंडित, पनवेल
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक-डाऊन मुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या वतीने कम्युनिटी किचन व शिवभोजन थाळी इत्यादींच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु उपासमारीच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक कोरोना आपत्कालीन परिस्थितीत कोणीही उपाशी पोटी राहू नये या शासनाच्या हाकेला साद देत संपुर्ण राज्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी सामाजिक संघटना अर्थात "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांचे आदेशाने व संघटनेचे राज्य-सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. यांच्या मार्गदर्शनाखाली अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील आदिवासी भागात व इतर गावांमधील विस्थापित कामगार, रिक्षाचालक, हातावर पोट असणारे मजुर व गरीब गरजु कुटुंबीयांची चुल पेटावी या सामाजिक जाणीवेतुन तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मसाले व कांदे-बटाटे इ. जिवनावश्यक वस्तुंचे पाकीट बनवून आतापर्यंत शेकडो कुटुंबीयांना त्याचे वाटप करण्यात आले आहे.
संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांनी राज्य सचिव अण्णा पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जयंतीदिनापासुन ते लॉक-डाऊनचा कालावधी पुर्ण होईपर्यंत गरीब विस्थापित मजुर व गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याचा संकल्प केला असुन या कामी "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" या संघटनेचे विशाल कांबळे, संदेश गायकवाड, परेश भोईर इत्यादींचे सहकार्य लाभत आहे. 
लॉक-डाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याने याचा विपरित परिणाम झोपडपट्टीत राहणाऱ्या व मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणा-या जनतेच्या मानसिकतेवर होत आहे. त्यांची चिंता कमी व्हावी व आपणही समाजाचे देणेकरी आहोत या जाणिवेतून "अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने" नासिक मध्ये निफाड, चांदवड, दिंडोरी व इतर अनेक तालुक्यांसह धुळे जळगाव जिल्ह्यांमध्येही समितीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशाने तेथील स्थानिक जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध दानशूरांच्या मदतीने विस्थापितांना व गरजवंतांना जिवनावश्यक वस्तुंची मदत करण्याचे काम अविरतपणे चालू आहे.

Friday, 17 April 2020

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले गरजूंना भाजीपाला वाटप

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले गरजूंना भाजीपाला वाटप
प्रतिनिधी, कल्याण.
कल्याण पश्चिम मिलिंद नगर येथील रहिवासी नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (कामगार नेते) यांनी त्यांच्या प्रभाग नंबर १६ मध्ये गोर गरीब कुटुंबांना केले भाजीपाला वाटप.
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे हात होऊ नये याकरिता काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती गोरगरिब कुटुंबांना सढळ हस्ते मदत करीत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची उपासमार होऊ नये याकरिता सामाजिक कार्य समजून समाजामध्ये दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात त्यांच्या त्यांच्या विभागात मदत केली जात आहे. असेच कल्याण शहरात मिलिंद नगर प्रभाग नंबर १६ मधील नागरिकांना कोणत्याही अडचणीत सतत मदतीला धावून येणारे दानशूर व्यक्तिमत्व नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी सुध्दा आपल्या स्वखर्चाने गोरगरिब तसेच गरजवंत कुटुंबांना रोजच्या आहारातील भाजीपाला जो लॉकडाऊन मुळे महाग व गायब झाला आहे त्याचे वाटप केले.
नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील हे आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून नेहमीच सामाजिक कामामध्ये अग्रेसर होऊन आपल्या प्रभागात काम करीत असतात. असेच राज्यावर आलेले कोरोनाचे संकट यामुळे भरडली गेलेली गोरगरीब नागरिक यांना ज्ञानेश्वर पाटील यांनी भाजीपाला वाटप केले. यांच्या सोबत यांचे सहकारी मा. नगरसेवक सुरेंद्र आढाव, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, आर्किटेक्ट गणेश नाईक, जेष्ठ समाजसेवक सुनील उतेकर, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, गणेश पाटील, रवी भोईर उपस्थित होते
नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत तसेच पुढे सुध्दा आमच्या प्रभागात गरजूंना मदत करणार.

Tuesday, 14 April 2020

ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांची १२९ वी जयंती माणगांव तालुक्यातील घराघरात साजरी बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )

ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांची १२९ वी जयंती माणगांव तालुक्यातील घराघरात साजरी
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव, बोधिसत्व, परम पूज्य, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमण प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाच्या लाॅकडाऊन संचारबंदी नियमांचे तंतोतंत पालन करून माणगांव तालुक्यातील प्रत्येक घराघरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य संसदेचे, भारतीय संविधानाचे वाचन करून आणि त्यांच्या राष्ट्रहितैषी विचारांचे पूजन करून ते आत्मसात करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून अत्यंत शांततामय वातावरणात बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील आणि बौद्ध संस्कार विधी ग्रहण करून साजरी करण्यात आली. 
      १४ एप्रिल अर्थात विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, प्रज्ञासूर्य , प्रकांडपंडित, सिम्बॉल ऑफ नाॅलेज ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस दरवर्षी आपल्या भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतू या वर्षी आपल्या भारतासह संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे महाभयंकर संकट कोसळले आहे. या महाभयंकर संसर्गजन्य विश्वव्यापी रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या रोगाची संक्रमण साखळी खंडीत करून संपूर्ण जगातून याचा नायनाट करण्यासाठी भारतासह संपूर्ण जगात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीची ही वैश्विक लढाई लवकरात लवकर जिंकण्यासाठी आणि कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश विदेशातील नागरिकांवर संचारबंदी लावण्यात आली आहे. या संबंधीच्या सर्व महत्वपूर्ण सूचना देशातील सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. या वर्षी १४ एप्रिल अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व देशवासीयांनी कोरोना व्हायरसमुळे आपापल्या घरांतच साजरी करुन कोरोना मुक्तीच्या या राष्ट्र हिताच्या लढ्यात शासनाला सहकार्य करा असे शासनाने सांगितले आहे. 
      कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवरील शासनाने नागरिकांना दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन देशासह, राज्यातील व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण माणगांव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा सर्व तालुका आणि विभागीय शाखा, सर्व सामाजिक व धार्मिक संघटना आणि तमाम आंबेडकर वादी बहुजन समाजाने या वर्षी मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती शासनाच्या लाॅकडाऊन संचारबंदीचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून आपापल्या घरात, आणि जवळच्या बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून, दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व बौद्ध पुजापाठ संस्कार विधी ग्रहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट मौल्यवान ग्रंथ संपदेचे आणि भारतीय संविधानाचे वाचन करून त्यांचे राष्ट्रहितैषी महान विचार आत्मसात करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून अत्यंत मंगलमय आणि शांततामय वातावरणात साजरी केली.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...