Tuesday, 26 May 2020

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि परिक्षेचे राजकारण !!!

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि परीक्षेचे राजकारण !!!



महेंद्र (अण्णा) पंडित, मुंबई
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने भारताला आणि महाराष्ट्राला ही सोडले नाही , कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 4 वेळा लॉकडाउन वाढवल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था , विद्यापीठे बंद करण्यात आले. ज्याचा फटका सर्व सामान्य जनतेला व विद्यार्थ्यांना बसला. ज्यात अनेक लहान व मोठ्या मुलांचे समावेश होतो. ज्यात हे विद्यार्थी मुंबई किंवा महाराष्ट्रातील विविध भागात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.अशातच राज्यभर परीक्षा कधी होणार अशी चर्चा सुरू झाली. कारण शाळा आणि महाविद्यालये केव्हा सुरू होणार असा प्रश्न पालकांना व विद्यार्थ्यांना पडला होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जाणार ? परीक्षा घेण्याचे स्वरूप काय असेल? याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना फटका तर बसणार नाही ?  असे एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. म्हणून शैक्षणिक संस्था सुरू झाल्या तर लाखों मुलांच्या परीक्षेबाबत कशाप्रकारे व्यवस्थापन व नियोजन करायचे याबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि युनियन ग्रांट कमिशन (UGC) यांच्यात चर्चा व बैठका सुरु झाल्या. त्याच वेळी देशात आणि महाराष्ट्रात विध्यार्थी,पालक आणि शैक्षणिक संस्था या सुद्धा गोंधळाच्या परिस्थितीत होते व त्याचा सामना करत आहेत. कारण परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे ठोस पावले तोपर्यंत उचलली गेली नव्हती, म्हणून पालक व विद्यार्थी वर्गांसह महाराष्ट्रातील जनता चिंतेत व ताणतणाव खाली होते. 
म्हणूनच युनियन ग्रांट कमिशन (UGC) ने देशभरातील विद्यापीठांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केले. त्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने परीक्षा घेण्यासंदर्भात  समिती स्थापन करत राज्यपाल नियुक्त कुलगुरूंच्या राज्य समितीचे प्रमुख म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री.सुहास पेडणेकर , तसेच राज्य समिती सदस्य कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री. देवानंद शिंदे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री.नितीन करमळकर आणि SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती.शशिकला वंजारी यांचा समावेश करण्यात आला होता. जेणेकरून ही राज्य समिती परीक्षा घेण्याबाबतचे धोरण, उपाय योजना आणि त्याचे व्यवस्थापन कसे असेल?याबद्दलचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर केला. त्याच दरम्यान *महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन* आणि राज्यातील अनेक विविध विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून उच्च तंत्र शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारला निवेदनाद्वारे, मेलद्वारे आणि काहींनी शिक्षणमंत्री यांच्याशी फोनवर चर्चा करून सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कारण राज्यभर आपात्कालीन व भीषण परिस्थिती असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नये म्हणून  राज्य सरकारवर दबाव वाढत होता. कारण राज्य समितीचे अहवाल आल्याशिवाय सरकार कोणतेही पावलं उचलणार नव्हते आणि एप्रिल महिन्यात राज्य समितीचे अहवाल प्राप्त झाल्यावर उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून परीक्षेबाबत पुढील प्रमाणे धोरणात्मक निर्णय जाहीर केले. यामध्ये त्यांनी अंतिम वर्षाचे अंतिम सेमिस्टर (सत्र ) परीक्षा सोडून इतर सर्व परिक्षाला ग्रेड देऊन पास करणार. , 50% सरासरी गुणांच्या आधारे ग्रेडिंग देण्यात येईल,ज्या विद्यार्थ्यांना वाटते आपल्याला कमी गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा असेल, ग्रेडेशन मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविणार परंतु जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल.ज्या विद्यार्थ्यांना ATKT लागली असेल त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर 120 दिवसात त्यांची परीक्षा घेण्यात येईल., UGG नियमाप्रमाणे अंतिम वर्ष व अंतिम सत्राची परीक्षा 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात येईल., उन्हाळी सुट्टी बाबत निर्णय संबंधित विद्यापीठे UGC नियमाप्रमाणे घेतील., UG/PG/Diploma चे प्रॅक्टिकल परीक्षाबाबत ऑनलाईन जर्नल द्वारे घेण्यात येईल., UG आणि PG च्या कॉमन इन्ट्रन्स टेस्ट ( CET ) बाबत निर्णय येत्या 8 दिवसात घेण्यात येईल., लॉकडाउनचे 45 दिवस हे हजेरी म्हणून ग्राह धरण्यात येतील आणि जरी हे दिवस पकडून काही मुलांचे हजेरी पूर्ण झाली नाही तर संबंधित विद्यापीठाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी सूचना देण्यात आली. येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचे परीक्षेबाबत प्रश्न सोडवण्यासाठी सेल स्थापन करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना देण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक दिलासा आणि सर्व शंकेचे निरसन करण्यासाठी समुपदेशन केंद्र जिल्ह्याप्रमाणे चालू करण्याचे सांगितले आहे. स्वायत्त विद्यापीठांनी UGC शी नियमाप्रमाणे राज्य शासनाच्या वेळापत्रक प्रमाणे सुसंगत निर्णय घ्यावा., डिप्लोमा कोर्सेसच्या 6th सेमिस्टर परीक्षा घेण्यात येणार आहे., ग्रीनझोन मध्ये असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने स्वतःचे परीक्षा वेळापत्रक तयार करून परीक्षा घ्यावे., 15 ऑगस्ट पर्यंत सर्व परीक्षेचे निकाल जाहीर होतील.आणि 1 सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू हॊणार अशी भूमिका घेत शिक्षणमंत्री यांनी ऑनलाईन संवादाद्वारा घेतलेल्या कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली.
परंतु असे असताना राज्यातील लाखों विद्यार्थी आणि पालक हे प्रचंड ताणतणाव खाली व चिंतेत होते व परीक्षा देण्याबाबत मानसिकरीत्या तयार नाहीत असे चित्र आहे. कारण जर परीक्षा देताना मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण असेल व मुलांचा जीव धोक्यात का घालायचे अशी भीती पालकांना सतावत आहे , मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, जर उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी हीत केंद्रित ठेवून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्याचा काम केले आहे व राज्य समितीच्या अहवालाचा दाखला घेत त्यांनी निर्णय जाहीर केले असल्याने त्यावर आता राजकारण करण्याची काय आवश्यकता आहे ? कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की, जर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग राज्यभरात वाढत गेला आणि राज्यात Covid-19 च्या परिस्थितीत काही बदल न झाल्यास 20 जूनला राज्य समिती अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल अशी भूमिका घेतली होती. 
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, काय आपल्याकडे परीक्षा घेण्याबाबत तेव्हढी सक्षम यंत्रणा आहे ? अध्यापक वर्ग आणि महाविद्यालयीन कर्मचारी काम करण्यास तयार होतील ? याचे व्यवस्थापन व नियोजन कसे केले जाईल हे अजून प्रश्न अनुत्तरीत आहेत. असे असताना राज्यपाल , विरोधक आणि काही शिक्षण क्षेत्रातील मान्यवर लोक परीक्षा घेतली पाहिजे अशी भूमिका का घेत आहेत. यात जी मंडळी परीक्षा घेण्याबाबत आग्रही भूमिका घेत आहेत त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का? अशी शंका उपस्थित होते. कारण आपण लाखों विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून त्यांना वेठीस कसे धरणार? याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसेल व कोरोना बाधितांची संख्या वाढत असेल तर अशा वेळी परिस्थितीत पूर्ण नियंत्रणात आल्यावर परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य सरकारने केले पाहिजे व यावर जे कोणी राजकारण करत असेल तर त्यांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन राजकारण थांबवले पाहिजे. 

आपला ,
सुनील शिरीषकर 
पीएचडी संशोधक (टिस मुंबई)
महासचिव (महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन)
M - 8097585304

बुध्द विहार समन्वय समितीचे दखल घेण्यासारखे सामाजिक कार्य

बुध्द विहार समन्वय समितीचे दखल घेण्यासारखे सामाजिक कार्य! 


कल्याण (संजय कांबळे) कोणत्याही प्रकारची प्रसिद्ध नाही, फोटो सेशन नाही किंवा बडेजाव  नाही केवळ त्याचे कार्यकर्त्यांच्या नजरा असतात त्या कोणी उपाशी पोटी आहे, का कुणाला जेवण मिळत नाही का किंवा कोणाच्या घरी चुल न पेटण्यामागचे काय कारण अशा विविध घटना वर प्रत्यक्षात कृती करुण आज मितीस हजारो गोरगरिबांची व भटक्या आणि भिकारी लोकांची "आधारवड संस्था" बनली आहे म्हारळ गावातील बुध्द विहार समन्वय समिती.


गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून देशात लाॅकडाऊण सुरु आहे अनेकांचे कामधंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्या ची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वाधिक परप्रांतीय, मजूर, निराधार लोक, मनोरुग्ण, कष्टकरी कामगार, भिकारी, याचे वास्तव्य आहे. लाॅकडाऊण मध्ये यांच्या वर उपासमारीची वेळ आली होती. हे बघून बुध्द विहार समन्वय समिती म्हारळ, उल्हासनगर, कल्याण यांच्या वतीने सर्वानी एकत्र येऊन सर्वच समन्वयक आर्थिक - श्रमिक दानातून माणूसकी जपत यांना एक वेळचे जेवण, तसेच इतरांना धान्याचे किट, तसेच कल्याण येथील पोलीसाना चहा बिस्कीट वाटप करण्यात येत आहे. हे झाले माणसांच्या बाबतीत पण समितीने मुक्या प्राण्यांची देखील काळजी घेतली आहे गाई म्हशी, बकरी, भटकी कुत्री यांना चारा पाणी दिले जाते आहे. हे काम गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू आहे पण त्यांनी कुठेही सोशल मीडिया किंवा पेपरबाजी केली नाही. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या मागे सर्व कार्य विहारे व संघटना एकत्र येऊन करित असून यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले ते धार्मिक विंग प्रमुख नवीन गायकवाड यांचे, असे बुध्द विहार समन्वय समितीने सांगितले. 

Monday, 25 May 2020

डोंबिवलीतील मनसेच्या सहकाऱ्यांने रक्तदान शिबीर संपन्न !

डोंबीवलीत मनसेच्या सहकार्याने  रक्तदान शिबीर संपन्न*



डोंबीवली - कोरोना विषाणुच्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने मनसे गोग्रासवाडी,डोंबिवली शहर व प्लाझ्मा ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २५ मे २०२० रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


सामाजिक बांधिलकीतून या संकटकाळात आपल्याच समाजबांधवांसाठी आपण मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन शिबीराचे संयोजक व माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी केले होते. सदर आवाहनास डोंबिवलीकर नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल १०५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.रक्तदान शिबीराची सुरुवात सौ.विणा कटारे या महिलेने रक्तदान करुन केली व शिबीरात १२ महिलांनी रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन नेहमी रक्तदान करणाऱ्या प्रमोद काका काणे व पाथर्लीकर रोहिदास शेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शिबीर स्वयंवर हाॅल,गोग्रासवाडी,डोंबिवली (पुर्व) येथे सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत राबविण्यात आले

या शिबीराला मनसेचे स्थानिक आमदार राजु दादा पाटील उपस्थित होते.त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भोईर,हर्षद पाटील,प्राजक्त पोतदार,सागर जेधे,दिपक शिंदे,संदिप म्हात्रे,सागर तांबे,शितल लोके,सुमेधा थत्ते,ओम लोके व अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी रविंद्र गरुड,संदिप शिंदे,केदार चाचे,महेश खताते,सूर्यकांत पारधे,बाळकृष्ण उतेकर,अविनाश शिर्के,दिपेश पाटील,भूषण म्हात्रे यांनी खुप मेहनत घेतली.शिबिरासाठी प्लाझ्मा रक्तपेढी ची संपुर्ण टिम व स्वयंवर हाॅलचे स्वप्निल किरकिरे यांनी विशेष सहकार्य केले.

इचलकरंजीतल्या मुस्लीम समाजाच्या योगदानातून,अतीदक्षता विभाग ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

इचलकरंजीतल्या मुस्लीम समाजाच्या योगदानातून,अतीदक्षता विभाग ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
समाजाने आदर्श निर्माण केला - मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे



कोल्हापूर - कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून  कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.

इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. बोलत होते. यावेळी सार्वजनिक  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रक्कम कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिली. या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकापर्ण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्याने आणि संयमाने रोखून ठेवले आहे. इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे. सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचे कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रारंभी सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केले. 

यावेळी आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डाॕ अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाधिक्षक गणेश बिरादार, तहसिलदार प्रदिप उबाळे आदी उपस्थित होते.

अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी कैश बागवान, रफिक मुजावर, इरफान बागवान, अजीज खान, कुतबुद्दीन मोमीन, सलीम अत्तार, तौफिक मुजावर, अबु पानारी, इम्रान मकानदार, तौफिक हिप्परगी, फिरोज जमखाने, आयुब गजबरवाडी, समीर शेख, दिलावर मोमीन, फिरोज बागवान, फारूक मकानदार, डॉ. जावेद बागवान, डॉ. राहमतुल्लाह खान, डॉ. अर्शद बोरगावे, डॉ. हिदायतुल्लाह पठाण, इम्तियाज म्हैशाळे यांचे  सहकार्य लाभले.

लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेची केंद्रीय कोअर कमिटी प्रस्थापित

लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेची केंद्रीय कोअर कमिटी प्रस्थापित



       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर तसेच ग्रामीण भागातील सर्वत्र कानाकोपऱ्यात निस्वार्थ आणि निर्मोही भावनेने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात मानवतेच्या व सामाजिक उत्तरदायीत्व जाणिवेतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तीमत्व, सुप्रसिद्ध उद्योजक   डॉ. संजय सोनावणे संस्थापित लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या बहुचर्चित सामाजिक संस्थेच्या केंद्रीय कोअर कमिटीच्या कार्यकारी मंडळात पुढील प्रमाणे दिग्गज व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. 
      डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे अध्यक्ष , 
श्री. मिलिंद शेट उपाध्यक्ष.श्री.सुधाकर पालकर सचिव , श्री. प्रशांत पाटील  सचिव, श्री. निलेश सोनावणे जनसंपर्क अधिकारी, श्री. धम्मशिल सावंत जनसंपर्क अधिकारी ,श्री. स्वराज सोनावणे मुख्य विश्वस्त, ॲड. श्री. प्रथमेश जावळे  विधी सल्लागार, श्री. सुदेश जूईकर वरीष्ठ सल्लागार, श्री. विनोद सापळे वरीष्ठ सल्लागार,श्री. खेमराज रावळ निमंत्रक , श्री. प्रदीप सोनावणे सदस्य, श्री. मनोहर कांबळे सदस्य, श्री. राजेंद्र वाढवळ सदस्य , 
 श्री.  बाजीराव गायकवाड सदस्य, श्री. गौतम जाधव सदस्य , 
श्री. मिलन तेंडुलकर  प्रसिद्धी प्रमुख, श्री. संजय कदम प्रसिद्धी प्रमुख या प्रमाणे केंद्रीय कोअर कमिटी जाहीर करण्यात येत आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. 
डाॅ. संजय अनुसया राजाराम सोनावणे अध्यक्ष. 
      सदर माहिती लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक, नामवंत उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व , वंचित, शोषित, गोरगरिबांचे तारणहार तथा कैवारी डॉ संजय राजाराम सोनवणे साहेब यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रसिद्धी साठी दिली आहे.

बिर्ला उद्योग समुहाची शहाड येथील सेंच्युरी कंपनी अडिच महिन्यांनंतर पुन्हा सुरू प्रारंभी फक्त एका शिफ्ट मधे उत्पादन !

बिर्ला उद्योग समुहाची शहाड येथील सेंच्युरी कंपनी अडिच महिन्यांनंतर पुन्हा सुरू प्रारंभी फक्त एका शिफ्ट मधे उत्पादन !




कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश लाॅकडाऊण झाला आणि देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या बिर्ला समुहाची कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी शहाड येथे असलेली सेंच्युरी कंपनी बंद झाली. धगधगता बाॅयलर थंडावला पण पुन्हा एकदा आज ही कंपनी सुरू झाली असून सोशलडिस्टींग चे पालन करित केवळ जनरल या एकाच शिफ्ट मध्ये अडिज महिन्यानंतर कंपनी च्या चिमणीमधून धुर निघू लागलाय.
सुमारे ५० /६० वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती बिरला यांनी कल्याण मुरबाड महामार्गावर शहाड येथे सेंच्युरी कंपनी सुरू केली. शेकडो एकर जागेत ही कंपनी विस्तारलेला असून कपड्यांचा धागा आणि टायर चा धागा येथे तयार होत असून आजुबाजुला असलेल्या आयडिया, एन आर सी या कंपन्या बंद पडल्याने ही कंपनी एकमेव कामगारांचा आधार आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते, आपटी आणे भिसोळ, नांलिबी, गोवेली पिंपळोली दहागाव, बापसई मामणोली, खडवली फळेगाव मानिवली टिटवाळा मोहना आंबिवली या गावासह शहाड गावठाण, धाकटेशहाड, उल्हासनगर येथील कामगार येथे काम करत आहेत.



कंपनीमध्ये ५/६ हजार कामगार कायमस्वरूपी आहेत, २००० पर्यत तात्पुरत्या स्वरुपात तर ४ हजाराच्या आसपास ठेकेदारी पद्धतीने काम करीत आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लाॅकडाऊन झाला आणि २४ मार्च २०२० रोजी कंपनी बंद झाली. अशा परिस्थितीत इतर उद्योग व्यवसायातील कामगारांची जी उपासमार झाली व जो त्रास सहन करावा लागला तो त्रास आपल्या कामागारांना सहन करावा लागु नये यासाठी कामगार संघटना व कंपनी यांनी विचार विनिमय करून कामगारांना गेले दोन महिने पुर्ण पगार दिला. आता लाॅकडाऊन मध्ये थोडी शिथिलता आली असल्याने कंपनी व्यवस्थापनाने आज पासून कायमस्वरूपी कामगारांना ज्याच्या गावात किंवा परिसरात कोरोनाचा पेंशंट नाही, ज्यांचा एरिया कंटेन्मेंट झोन नाही अशा भागातील मर्यादित कामगारांना कामावर बोलावले आहे. पुर्वी तीन शिफ्ट मध्ये काम सुरू होते पण आता केवळ जनरल एकच शिफ्ट सुरू करण्यात आली आहे कंपनीने सोशलडिस्टन्स साठी राउंड मारले असून सॅनिटायझर व मास्क वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कंपनीला लागणारा कच्चा माल कोळसा व पल यांच्या शेकडो गाड्या कंपनी गेटसमोर उभ्या राहिल्या आहेत. सेंच्युरी हाॅस्पिटल मधील नर्स कोरोना पाॅझिटिव आल्याने हाॅस्पिटल सध्या सील करण्यात आले आहे त्यामुळे येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कंपनीत देखील सोशलडिस्टींग चे पालन व्यवस्थित होते किंवा नाही, तसेच कामगारांची सुरक्षितता यासाठी कंपनीच्या आत पोलीस कर्मचारी व शासकीय कर्मचारी तैनात असणे अतिशय गरजेचे आहे कारण काही चुकीच्या प्रवृत्तीच्या टारगट कर्मचाऱ्यांकडून कंपनीने कितीही दबाव टाकला तरी आत मध्ये पालन होणे कठीण आहे या साठी कंपनीच्या आत पोलीस बंदोबस्त असावा असे कामगारांचे म्हणने आहे.

बिर्ला उद्योग समुहाची शहाड येथील सेंच्युरी कंपनी अडिच महिन्यांनंतर पुन्हा सुरू प्रारंभी फक्त एका शिफ्ट मधे उत्पादन !

बिर्ला उद्योग समूहाची शहाड येथील सेंचुरी कंपनी अडिज महिन्यानंतर पुन्हा सुरू, प्रारंभी फक्त एका शिफ्ट मध्ये उत्पादन!



कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश लाॅकडाऊण झाला आणि देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या बिर्ला समुहाची कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी शहाड येथे असलेली सेंच्युरी कंपनी बंद झाली. धगधगता बाॅयलर थंडावला पण पुन्हा एकदा आज ही कंपनी सुरू झाली असून सोशलडिस्टींग चे पालन करित केवळ जनरल या एकाच शिफ्ट मध्ये अडिज महिन्यानंतर कंपनी च्या चिमणीमधून धुर निघू लागलाय.
सुमारे ५० /६० वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती बिरला यांनी कल्याण मुरबाड महामार्गावर शहाड येथे सेंच्युरी कंपनी सुरू केली. शेकडो एकर जागेत ही कंपनी विस्तारलेला असून कपड्यांचा धागा आणि टायर चा धागा येथे तयार होत असून आजुबाजुला असलेल्या आयडिया, एन आर सी या कंपन्या बंद पडल्याने ही कंपनी एकमेव कामगारांचा आधार आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते, आपटी आणे भिसोळ, नांलिबी, गोवेली पिंपळोली दहागाव, बापसई मामणोली, खडवली फळेगाव मानिवली टिटवाळा मोहना आंबिवली या गावासह शहाड गावठाण, धाकटेशहाड, उल्हासनगर येथील कामगार येथे काम करत आहेत.


कंपनीमध्ये ५/६ हजार कामगार कायमस्वरूपी आहेत, २००० पर्यत तात्पुरत्या स्वरुपात तर ४ हजाराच्या आसपास ठेकेदारी पद्धतीने काम करीत आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लाॅकडाऊन झाला आणि २४ मार्च २०२० रोजी कंपनी बंद झाली. अशा परिस्थितीत इतर उद्योग व्यवसायातील कामगारांची जी उपासमार झाली व जो त्रास सहन करावा लागला तो त्रास आपल्या कामागारांना सहन करावा लागु नये यासाठी कामगार संघटना व कंपनी यांनी विचार विनिमय करून कामगारांना गेले दोन महिने पुर्ण पगार दिला. आता लाॅकडाऊन मध्ये थोडी शिथिलता आली असल्याने कंपनी व्यवस्थापनाने आज पासून कायमस्वरूपी कामगारांना ज्याच्या गावात किंवा परिसरात कोरोनाचा पेंशंट नाही, ज्यांचा एरिया कंटेन्मेंट झोन नाही अशा भागातील मर्यादित कामगारांना कामावर बोलावले आहे. पुर्वी तीन शिफ्ट मध्ये काम सुरू होते पण आता केवळ जनरल एकच शिफ्ट सुरू करण्यात आली आहे कंपनीने सोशलडिस्टन्स साठी राउंड मारले असून सॅनिटायझर व मास्क वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कंपनीला लागणारा कच्चा माल कोळसा व पल यांच्या शेकडो गाड्या कंपनी गेटसमोर उभ्या राहिल्या आहेत. सेंच्युरी हाॅस्पिटल मधील नर्स कोरोना पाॅझिटिव आल्याने हाॅस्पिटल सध्या सील करण्यात आले आहे त्यामुळे येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कंपनीत देखील सोशलडिस्टींग चे पालन व्यवस्थित होते किंवा नाही, तसेच कामगारांची सुरक्षितता यासाठी कंपनीच्या आत पोलीस कर्मचारी व शासकीय कर्मचारी तैनात असणे अतिशय गरजेचे आहे कारण काही चुकीच्या प्रवृत्तीच्या टारगट कर्मचाऱ्यांकडून कंपनीने कितीही दबाव टाकला तरी आत मध्ये पालन होणे कठीण आहे या साठी कंपनीच्या आत पोलीस बंदोबस्त असावा असे कामगारांचे म्हणने आहे. 

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !!

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !! *कल्याण (संजय कांबळे)...