Thursday, 19 November 2020

कोरोनाच्या नावाखाली जनतेची चाललेली लूट त्वरित थांबवा - 'दयानंद चौधरी'

कोरोनाच्या नावाखाली  जनतेची चाललेली लूट त्वरित थांबवा - 'दयानंद चौधरी'


ना.पियुष गोयल रेल्वे मंत्री भारत सरकार यांच्याकडे ईमेलवर पत्र पाठवून केली मागणी

मुंबई (समीर खाडिलकर) :
         मार्च महिण्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बरेच महिने प्रवाशी वहातुक बंद केली होती. कोरोनाचा असर जसजसा कमी होत आहे,तशा आपण लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करीत आहात. पण हे करत असताना आपण या गाड्या रेग्युलर नावाने न चालविता हॉलिडे स्पेशल नावाने चालवल्या जात आहेत. त्यामुळे  जनतेची लूट होत आहे ती त्वरित थांबवणे आवश्यक आहे असे पत्र दयानंद चौधरी यांनी ना.पियुष गोयल रेल्वे मंत्री,भारत सरकार यांना ईमेलवर पाठवून मागणी केली आहे.

            त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ट्रेन त्याच आहेत, स्टेशनचे थांबेही तेच आहेत, पण तिकीट दर भलतेच वाढवलेले आहेत.हॉलिडेच्या नावाखाली जेष्ठ नागरिकांचे कन्सेशनही बंद करण्यात आले आहे, हे कितपत योग्य आहे, बुरख्याच्या आडून जनतेची केलेली ही लूट आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.जनता  समजत असतानाही हा अन्याय सहन करतेय. ट्रेन कमी चालत असल्या तरी, चुकीच्या या धोरणामुळे, रेल्वेचं उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे,आणि जनतेचे मात्र नुकसान होत आहे.म्हणून दयानंद चौधरी यांनी  ई-मेल द्वारे जनतेच्यावतीने विंनती केली आहे की,आपण त्वरित या प्रकरणात लक्ष घालून, हॉलिडे स्पेशलच्या नावाखाली जेष्ठ नागरिकांची आणि सामान्य जनतेची होणारी लुट त्वरित थांबवावी व जनतेला दिलासा द्यावा.

तरुणांच्या मृत्यूने कल्याण तालुका हादरला, किरकोळ कारणानं मृत्यू, तालुक्यात भिंतीचे वातावरण?

तरुणांच्या मृत्यूने कल्याण तालुका हादरला, किरकोळ कारणानं मृत्यू, तालुक्यात भिंतीचे वातावरण?


कल्याण (संजय कांबळे) : ऐन तारुण्यात मांजर्ली गावातील दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा येथील  अजिंक्य गणेश पावशे या तरुणांचा देखील असाच अचानक मृत्यू झाला असून कांबा पावशेपाडा गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे हे सर्व मृत्यू किरकोळ अशा कारणांमुळे झाल्याने कल्याण तालुका ग्रामीण परिसर हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चारच दिवसांपूर्वी तालुक्यातील मांजर्ली गावातील सुभाष मदन माळी या तरुणाला किरकोळ अशा जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्याला कल्याण येथील मिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर त्याचा लहान भाऊ पवन माळी याला देखील असाच त्रास होऊ लागल्याने त्यालाही याच रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सुभाष याचा मृत्यू झाला. तर लगेच दोन तासांनी पवन याचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे ऐन दिवाळीत मांजर्ली गावावर दु खाचा डोंगर कोसळला होता. याच गावातील नारायण तुपे याचा देखील याच कारणानं जीव गेला होता. हे सर्व ताजे असतानाच कांबा पावशेपाडा गावातील कु अजिंक्य गणेश पावशे या ऐन विशीतील तरुणाचा पहाटे मृत्यू झाला. 
अजिंक्य याची पाट दुखत होती. म्हणून त्याला प्रथम खेमाणी येथील त्रिमूर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण त्याची तब्येत अधिक खालावल्याने त्याला कल्याण येथील मिरा हाॅस्पिटल मध्ये भर्ती केले होते. परंतु पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. अजिंक्य हा एकुलता एक मुलगा होता. तर त्याचे वडील हे अंपग आहेत. त्यामुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे. अजिंक्य अंत्यत प्रेमळ व गोड स्वभावाचा असल्याने तो सर्वानाच प्रिय होता. कमी वयात त्याचेवर कुंटूबाची जबाबदारी पडली होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने कांबा पावशेपाडा गावावर शोककळा आहे. 

सध्या जिवघेण्या व माणूसपण विसरायला लावणा-या कोरोना कोव्हीड १९ हा आजार कल्याण तालुक्यातून जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सवात झालेली चूक सुधारण्यासाठी प्रशासनाने कठोरपणे निर्णय घेतले. याला नागरिकांनी चांगली साथ दिली. शासनाच्या माझे कुंटूब माझी जबाबदारी या अभियानामुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र नांगरिकाच्या मागणीवरून पुन्हा शासनाने मंदिर व इतर धार्मिक स्थळे उघडली आणि भोळ्या भाबड्या  भक्तांची एकच झुंबड उडाली, जसे काय देव कुठे  पळून चाललेत या भावनेने! त्यामुळे नागरिकांनी बेफिकिर राहू नये. मास्क, सॅनिटायझर आणि सोशलडिस्टींग चे पालन करायलाच हवे. अन्यथा आपण गेल्या ७/ ८महिण्यापासून केलेले प्रयत्न, मेहनत, कष्ट निष्फळ ठरतील याचे भान ठेवून दैनंदिन जीवनात वावरायला हवे. 

Wednesday, 18 November 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वार्ड क्रमांक १२३ च्या वतीने दीपावली निमित्त फराळाचे वाटप !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वार्ड क्रमांक १२३ च्या वतीने दीपावली निमित्त फराळाचे वाटप !


मुंबई, (प्रतिनिधी) ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वार्ड क्रमांक १२३ च्या वतीने दीपावाली निमित्त विभागातील रहिवाशी व कार्यकर्त्यांना शिवाजीराव नलावडे (महाराष्ट्र उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली व घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश विठ्ठल भालेराव यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये अनेक रहिवाशी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला सदर कार्यक्रमाचे आयोजन वार्ड अध्यक्ष शंकर महाडिक यांनी केले होते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश भोसले,इंजे सर,इरफान पठाण,शहानवाज खान व प्रविण समीर सेन,ललिता पाटील, आयुब पठाण ,लता मिरगुले,नानू माने,विमल अशोक सुतार व वार्ड मधील प्रमुख पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

वृद्ध नागरिकांसाठी घाटकोपर येथे खुर्चीचे वितरण !

वृद्ध नागरिकांसाठी घाटकोपर येथे खुर्चीचे वितरण !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
        ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम जय महाराष्ट्र प्रगती मंडळातील तसेच परिसरातील वृद्ध नागरिकांना आसन(खुर्ची)चे समाजसेवक जयेश पारेख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी तरुण शर्मा , दीपक साळवी , दशरथ सांगळे आदी उपस्थित होते. दिवाळी निमित्त मंडळातील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था व्हावी यासाठी तसेच वृद्ध नागरिक फेरफटका मारण्यासाठी घरा बाहेर पडतात त्यांना बसण्याचे साधन उपलब्द व्हावे अशी काही ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत समाजसेवक जयेश पारेख यांनी आपल्या स्वनिधीतुन नागरिकांना खुर्ची वाटप केल्याचे मंडळ कार्यकर्ता मंगेश जंत्रे यांनी सांगितले.

बेवारस वाहने मालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन !

बेवारस वाहने मालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन !

ठाणे : कळवा पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे बऱ्याच वर्षापासुन बेवारस वाहने व इतर जप्त वाहने पडून आहेत.सदर वाहनाच्या मालकांनी आपली वाहने  आपली ओळख पटवून तात्काळ सोडून घेऊन जावे.अन्यता हि वाहने लिलावात काढण्यात येथील असे आवाहन  पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे कन्हैया थोरात यांनी केले आहे.

वाहनांचा तपशिल खालील प्रमाणे- बेवारस वाहन मारुती 800 कार नं एम एच 04/वाय/880 सफेद रंग,इंजिन नंबर-F8BYN3112391 चेसिस नंबर- S.B.308.IN.2097351 एम ई नंबर-150/45 असा आहे.बजाज डिस्कवर मो.सायकळ नं एम एच 01/एएफ/0848 काळया रंगाची, इंजिन नंबर-GNGBPF23910 चेसिस नंबर-MDSIN22PCF14515 एम.ई.नंबर-57/11 असा आहे.मारुती 800 कार नं एम एच 02/एन/9737 काळया रंगाची,इंजिन नंबर F8B3IN1372915 चेसिस नंबर –S.B.308.IN1040175,एम.ई.नंबर 57/11 असा आहे.होन्डा कंपनीची गेटझ मॉडेलची कार नं एम एच 02/एएल/5172 काळया रंगाची,इंजिन नंबर-NG4EA5M106156 चेसिस नंबर MALBT51HRSM411745XE,एम.ई.नंबर-108/20 असा आहे

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी – "जिल्हाधिकारी राजीव निवतकर"

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी – "जिल्हाधिकारी राजीव निवतकर"


मुंबई : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून दि. 17 नोव्हेंबर, 2020 ते 15 ‍डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय दि. 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आवश्यक आहे त्यांनी फॉर्म 6 भरुन द्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

मयत व स्थलांतरीत मतदार असतील त्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करावयाची आहेत. त्यासाठी फॉर्म 7 भरुन द्यावयाचा आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदविल्या असतील त्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. यासाठी फॉर्म 8 भरुन द्यावयाचा आहे.

या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक व निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी  1950 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येईल.

मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे

Tuesday, 17 November 2020

अयोध्येतील श्री राममंदिरासाठी नीलम गोऱ्हे यांच्याकडून एक किलो चांदीची वीट भेट !

अयोध्येतील श्री राममंदिरासाठी नीलम गोऱ्हे यांच्याकडून एक किलो चांदीची वीट भेट !


पुणे - अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पुनर्बांधणीत अर्पण करण्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीची वीट अयोध्या राम मंदिराचे पुणे येथील ट्रस्टी श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केली.

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्या वतीने देण्याची इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रगट केली होती. ही चांदीची वीट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दिपावली पर्वकलात व बलिप्रतिपदेच्या पुर्वसंध्येला, गोवर्धनपुजेच्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२०  दिवशी  अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे डॉ. गोऱ्हे यांनी सुपुर्द केली.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे.तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. अयोध्येच्या श्री राममंदिरासाठी सर्वस्व पणाला लावणारे  व सातत्याने  भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या योगदान स्मृती देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत.

यादरम्यान स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कोरोना लॉकडाऊन काळात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या येथे आयोजित केलेल्या पूजेचे दर्शन घेतले व वंदन केले. यावेळी पुणे शिवसेना महिला शहर संघटिका सविता मते, पुणे शहर महिला संघटिका तथा नगरसेविका संगीता ठोसर, उपशहरप्रमुख आनंद गोयल आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२०  रोजी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी या विटेला वंदन केले होते. या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...