Thursday, 27 January 2022

भिवंडीत कोळशाचा ट्रक मजुराच्या झोपडीवर उलट ल्याने तीन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू !!

भिवंडीत कोळशाचा ट्रक मजुराच्या झोपडीवर उलटल्याने तीन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू !!


भिवंडी, दिं,27, अरुण पाटील (कोपर) :
              आदिवासी वीटभट्टी मजुरांच्या परिवारावर काळाने घात घातला असून असून वीटभट्टीच्या बाजूला बनविलेल्या गवताच्या झोपडीत झोपलेल्या मुलींच्या अंगावर कोळशाने भरलेला ट्रक उलटल्याने झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना सायंकाळी टेंभिवली गावात घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून या घटनेला जबाबदार धरुण वीटभट्टी मालकांबरोबरच ट्रक चालकासह चौघांवर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              वीटभट्टी व्यवसायाला  लागणारा दगडी कोळसा हायड्रॉलीक हायवा ट्रक (डंपर) मधून खाली केला जात असताना ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने संपूर्ण मागील ट्रॉली कोळशासह वीटभट्टी मजुराच्या गवताच्या झोपडीवर पडल्याने झालेल्या अपघातात आदिवासी मजुराच्या झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्यां मुलींचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दाबल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बाळाराम कान्हा वळवी या आदिवासी वीटभट्टी मजुराच्या लावण्या वय ७ वर्ष, अमिषा वय ६ वर्ष आणि प्रीती वय ३ वर्ष या तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
           अपघातामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने इतर कामगार त्या ठिकाणी धावून येत कोळशाच्या ढिगा-या खालुन सर्वांना बाहेर काढले परंतु तो पर्यंत या चिमुरडींचा जीव गेला होता. भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील मोहिली येथील बाळाराम वळवी हा आपल्या पत्नी व चार मुलींसह वीटभट्टी मजुरी साठी आपल्या मुळगावाहून स्थलांतरीत होऊन भिवंडी तालुक्यातील टेंभिवली या गावात गोपीनाथ मढवी व त्यांचा मुलगा महेंद्र मढवी यांच्या वीटभट्टी वर मजुरी साठी आले आहेत . 
            वीटभट्टी परिसरतच गवताच्या झोपडीत हे मजूर कुटुंब राहात  होते .त्याच्या झोपडी लगतच्या मोकळ्या जागेत वीटभट्टी पेटविण्यास लागणारा दगडी कोळसा साठविला जात असे. नेहमी प्रमाणे कोळसा घेऊन आलेला भलामोठा हायड्रोलीक हायवा ट्रक खाली करण्यासाठी मागील बाजू कडील ट्रॉली उचलली असता त्याखालील कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने ट्रॉली मधील कोळशासह ट्रॉली बाळाराम वळवी याच्या झोपडीवर पडल्याने झोपडीत एका कोपऱ्यात जमिनीवर झोपलेल्या तिघी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने बाहेर गेलेले बाळाराम व झोपडी बाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली दोन वर्षांची कीर्ती हे तिघे जण या अपघातातून बचावले आहेत.
            या दुर्घटने नंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या फिर्यादी वरून वीटभट्टी मालक गोपीनाथ मढवी, मुलगा महेंद्र मढवी, व्यवस्थापक सुरेश रामदास पाटील, ट्रक चालक तौफिक शेख या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी गोपीनाथ मढवी व व्यवस्थापक सुरेश पाटील यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली असून दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

गुहागर प्रतिष्टान (रजि) कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणतर्फे राजेंद्र स.भुवड यांचा सत्कार !!

गुहागर प्रतिष्टान (रजि) कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणतर्फे राजेंद्र स.भुवड यांचा सत्कार !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ ग्रामीण आयोजित वर्धापन दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर  विरार येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मनवेल पाडा तलाव जवळ विरार पुर्व येथे संपन्न झाला.मंडळाच्या वतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र स.भुवड यांचा शाळ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणचे पदाधिकारी, सदस्य व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

राहिला पार्क एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा !!

राहिला पार्क एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            राहिला पार्क एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी देवीदास पुरोहित यांनी देशभक्तीपर गीत गायले. तर सौ.मनीषा कदम यांनी लोकांच्यामध्ये प्रेम भावना जागृत झाल्या पाहिजेत यासाठी गीत गायले. हर्ष साली यांनी या कार्यक्रम बाबत उल्लेखनिय असे भाषण केले. याशिवाय राहिला पार्क चषक सिजन- २ बॉक्स क्रिकेटचे आयोजनही करण्यात आले होते. सर्वांना यावेळी मास्क वाटप करण्यात आले. तर मुलांना पेन्सिल वाटप केले. एक आगळा वेगळा आनंदउत्सव यनिमित्ताने साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने जावेद मुंबईकर युट्युब चॅनल यांचे मोलाचे योगदान होते. सर्व देणगीदार यांच्यामुळे हे सर्व कार्यक्रम शक्य झाले त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समितीचे मुंबई जिल्हा सदस्य/ पत्रकार मोहन कदम यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने या सर्व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गणेश हिरवे यांनी जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात !!

गणेश हिरवे यांनी जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
                  कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. जोगेश्वरी पूर्व  येथील सामाजिक कार्यकर्ता आदर्श शिक्षक गणेश हिरवे हेही  याला अपवाद नाहीत. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. स्वतःच्या वाढदिवसाच्यानिमित्त आज(दि.२७ जाने.) ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना  व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. 
         जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ वृत्तपत्रलेखक, अनेकदा रक्तदानासारखे पवित्र कार्य साकारणारे आमच्या जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री गणेश हिरवे सरांचा वाढदिवस. हिरवे सरांचे इतक्या वर्षांतील कार्य हे हेवा वाटण्याजोगेच आहे. गरीब लोकांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठी सातत्याने ते धडपडत असतात. इतरांसाठी काहीतरी करायची त्यांची वृत्ती माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे. शिक्षकी पेशा आणि कौटुंबिक जीवन सांभाळून सतत काही ना काही सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची धडपड गेली कित्येक वर्षे अविरतपणे कशी सुरू आहे व इतकी इच्छाशक्ती त्यांच्यात कशी जागृत होते हा मला नेहमीच पडणारा प्रश्न. कारण आज नोकरी - प्रपंच सांभाळून सामाजिक जीवनात सक्रिय राहणे म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही.तरी सुद्धा हिरवे सर सतत वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत आहेत.यातुनच त्यांच्या सामाजिक भावनेने झपाटलेल्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते. हिरवे सरांसारखी आसामी समाजात अपवादानेच आढळते व अनेकांना आदर्शवत ठरते.
मूर्ती छोटी पण कार्य आणि मेहनत महान.सरांना सुरवातीपासूनच ग्रुपमधे राहून कार्य करायला आवडते. अगदी रस्त्यावरच्या माणसांपासून, खेडेगावातील लोकांपर्यंत जरूरी वस्तू  पोहोचवणारा समाजसेवक. वृत्तपत्रातून आपले परखड विचार मांडणारा वृतपत्रलेखक. संसाराची सुरळीत गाडी चालवणारा पती आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करणारे वडील.रक्तदान  करणारे  रक्तदाता. लोकांना वाचनाची गोडी लावणारे  पुस्तके उपलब्ध करून देणारे.. शाळेतील मुलांना चांगली मूल्य देणारे आणि अनेकांना सामाजिक कार्याची आवड निर्माण करणारे.. अशा विविध पैलूने संपन्न असलेले सन्मा. गणेश हिरवे यांना अनेकांकडून उदंड आयुष्य लाभो आणि असेच चांगले कार्य होत राहो  अशा शुभेच्छा सदिच्छा देण्यात आल्या आहेत. हिरवे यांनी जेष्ठ नागरिक यांना मदतीचा हात दिल्याबद्दल अनेकांनी  गणेश हिरवे  यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून हिरवे यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

टिटवाळयातील सिद्धिविनायक गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव सोहळा ओमायक्रोनमुळे रद्द !! *टिटवाळा सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा निर्णय*

टिटवाळयातील सिद्धिविनायक गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव सोहळा ओमायक्रोनमुळे रद्द !!

*टिटवाळा सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा निर्णय*


टिटवाळा, संदिप शेंडगे : टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडणारा माघीगणेशोत्सव यावर्षी  मायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.


गेल्या दोन वर्षापासून कोव्हीड - १९  च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. काही अंशी मर्यादित भाविकांना प्रवेश देऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्यात परवानगी दिली आहे. त्यातच ओमायक्रोनचे नवे संकट आल्याने पुन्हा राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे यावर्षीचा यावर्षीचा माघी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. परंतु श्री चा जन्मोत्सव मंदिरातील विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. कीर्तनास सर्वसामान्य ५० भाविकांना प्रवेश असणार आहे श्रींची पालखी दुपारी साडेचार वाजता निघणार असून मंदिराच्या प्रांगणात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने दिली आहे 

अभिजात मराठी साहित्य सेवा संघाची 'काव्य मैफिल' संपन्न !!

अभिजात मराठी साहित्य सेवा संघाची 'काव्य मैफिल' संपन्न !!


वाडा / बातमीदार :
      भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिजात मराठी साहित्य सेवा संघाच्या, वाडा शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर 'गाथा स्वातंत्र्याची - काव्य मैफिल' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, वाडा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वाडा, भिवंडी, कल्याण, शहापूर येथील कवींनी हजेरी लावून आपले स्वलिखीत काव्य सादरीकरण केले. 


     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक मा. तु. खैरकर, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्या भक्ती वलटे, कोमसापचे जिल्हा खजिनदार जयेश शेलार, रंगतदार प्रकाशनचे विजय जोगमार्गे, जेष्ठ कवी भिमराव बोकंद, ज्ञानदा प्रकाशनचे युवराज ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोतारणे व तुषार ठाकरे  यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज डोहाळे, ऋषिकेश सावंत, अमोल गोतारणे यांनी विशेष मेहनत घेतली. या कवी संमेलनात पालघर व ठाणे जिल्हयातील कवी सहभागी झाले होते.


'ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, वाचन चळवळ समृद्ध करणे व बोलीभाषांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अभिजात सेवा संघ काम करते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त देशभक्त, शहिद जवान व राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे अभिजातचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी सांगितले.


डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर !!

डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर !!


कल्याण, हेमंत रोकडे : डोंबिवली पत्रकार संघ २०२२-२३ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महावीर बडाला, सचिवपदी प्रशांत जोशी, उपाध्यक्षपदी शंकर जाधव आणि खजिनदारपदी सोनल सावंत-पवार यांनी एकमताने नियुक्ती करण्यात आली. 


यावेळी मावळते अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी नवनियुक्त अध्यक्ष बडाला यांच्या हाती संघाची सूत्रे दिली. बडाला यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यावर आपल्या पुढील कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. नवीन कार्यकारणीत पत्रकारांसाठी नवनवीन उपक्रम राबविणार असून त्यासाठी पत्रकार संघातील पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याची विनंती केली. सचिव जोशी आणि उपाध्यक्ष जाधव वृत्तपत्राबाबत आपली मते मांडली. 


तर खजिनदार सोनल सावंत-पवार यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...