Sunday, 27 November 2022

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा !

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा !

पालघर,: दि.२७ ( ऑनलाईन वृत्तसेवा) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. 
     ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे, प्रा. बाळासाहेब माने व ठाणे जिल्हा सचिव प्रा. मंजिरी गजरे, प्रा. सुषमा जगदाळे, जिल्हा/विभागीय प्रतिनिधी प्रा. भास्कर मयेकर, प्रा. संजय पाटील, प्रा. महादेव इरकर, प्रा. भाग्यदेवी चौगले व प्रा. भाऊसाहेब महाडदेव यांनी केले आहे.
     कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कोणत्याही माध्यमाची शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय असो, त्यांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तसेच शिक्षक बंधु-भगिनींच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे सहकार्य, अथक व अविरतपणे शिक्षकांची सेवा करण्याचा ज्यांनी मनापासून घेतला आहे वसा व अहोरात्र शिक्षकांसाठी झटत राहण्यात ज्यांना मनापासून आनंद वाटतो असे ज्ञानेश्वर म्हात्रे सरच शिक्षकांचे आमदार झाले पाहिजेत यासाठी सर्वांनी मिळून प्रण करण्याचा निर्धार ही यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने केला.

माणकोली ते मोठागाव जोडरस्ता लवकरच सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका !

माणकोली ते मोठागाव जोडरस्ता लवकरच सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका !

             मोठागव - मानकोली पुल होणार रहदारीस खुला

भिवंडी, दीं,२७, अरुण पाटील (कोपर) :
        माणकोली ते मोठागाव यांना जोडणारा पूलाचे काम लवकरच  पूर्ण होणार आहे, त्यामुळे आता या परिसरातील  वाहतूकदरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या प्रकल्पात जलवाहतूक आणि मासेमारी होड्या यांना गैरसोय होऊ नये यासाठी पुलाच्या खांबांमधील अंतर आणि उंची योग्य प्रमाणात राखण्यात आलेली आहे
        ठाणे जिल्ह्यातील उल्हास खाडी (नदी) वर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या स्पॅनचे काम ७६.५८ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील हा आव्हानात्मक भाग असल्यामुळे, हा भाग पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
          कल्याण-डोंबिवली वरून ठाणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुसह्य करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए मार्फत बांधण्यात येणाऱ्या, १.३ किमी लांबीच्या माणकोली ते मोठागाव जोडरस्ता प्रकल्पात मानकोली पोहोच रस्त्याचे काम प्रगतीथावर असून मोटागाव पोहोच रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
         या प्रकल्पामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रात प्रवेश न करता मुंबईच्या दिशेने थेट प्रवास करता येईल. त्यामुळे कल्याण डोंबिवली वरून ठाणे - मुंबई दरम्यान वाहतुकीच्या वेळेत सुमारे ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाने ८२.०५ टक्के प्रगती केली आहे.
         आम्ही आगरी - कोळी सातत्याने समुद्रात उभे राहणाऱ्या प्रकल्पाच्या संदर्भात ओरड करत होतो की, ब्रिजची उंची आणि दोन पिलर खांबा मधील अंतर हे व्यवस्थित असले पाहिजे अन्यथा त्यामुळे धोका उत्पन्न होतो. जेणेकरून मासेमारी करणाऱ्या बोटी यांना त्याचा अडथळा होऊ नये व विना अडथळा मासेमारी करता यावी ही सूचना आम्ही अनेक वर्षापासून शासनाला सांगत होतो.
            वांद्रे वरळी सी लिंक समुद्रामध्ये पूल बांधताना दोन पिलर मधील अंतर किती असावे ? व कसे असावे या बाबत आम्ही शासनाला सूचना केल्या होत्या. त्या वेळेला शासनाने ऐकले नाही. त्यामुळे बऱ्याचदा समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी ये-जा करत असतात तेव्हा त्या बोटी या पिलरवर जाऊन आदळतात, सोसाट्याचा वारा - तुफान या मुळे बोटी या पिलर वर जाऊन आदळतात.
        पुढे ते नमूद करतात की, यामुळे आर्थिक नुकसान होते, जीवित हानी देखील होते. मात्र मानकोली ते मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पा दरम्यान या चुका शासनाने टाळलेल्या आहेत. त्याबद्दल त्याचे स्वागतच आहे, परंतु मच्छीमारांवर संकट उडवणारे कोस्टल रोड प्रकल्प असेल वांद्रे वरळी श्री लिंक असेल ट्रान्सफर लिंक प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प राबवतांना मासेमारी करणाऱ्या आगरी कोळी जनतेचे हित शासनाने त्यामध्ये पाहिले पाहिजे.
             या प्रकल्पांसाठी समुद्रामध्ये मोठ्या पद्धतीने ड्रिलिंग केल्या जात मोठ्या पद्धतीने पिलर उभारण्यासाठी खोलवर जाऊन जमीन खुदाई केली जाते त्यामुळे मासेमारी साठी मासे उपलब्ध होत नाही कारण जे मासे खाजण जागेमध्ये येत असतात तसेच या जागेत प्रजनन करत असतात ती जागाच यामुळे नष्ट होते त्यामुळे शासनाने याचा देखील विचार करायला हवा.असे आगरी - कोळी समाजाचे मत आहे.

Saturday, 26 November 2022

सिल्लोड_येथे 26 / 11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली !

सिल्लोड_येथे 26 / 11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : सिल्लोड येथे मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली . बाळासाहेबांची शिवसेना - युवासेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज, ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय सीताराम म्हेत्रे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, बबलू पठाण, महिला आघाडीच्या वर्षा पारखे, आशा कांबळे, राधिका साळवे, सावित्री सुरडकर, करुणा सुरडकर, अल्का बोराडे,मानसिंग राजपूत, पंजाबराव चव्हाण, सचिन पाखरे, दीपकसेट अग्रवाल,गौरव सहारे, फहिम पठाण, शिवा टोम्पे, आशिष कटारिया, आनंदा दुधे, संदीप पाटील,संजय शिंदे, गणेश शेलार, गणेश चंदनसे, प्रताप बदर, संतोष देशमुख, सुनील गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

ठाण्यात गुन्हे शाखा, युनिट -१ ने, दोघांकडून केले आमली पदार्थ व जिवंत काडतूस जप्त !

ठाण्यात गुन्हे शाखा, युनिट -१ ने, दोघांकडून केले आमली पदार्थ व जिवंत काडतूस जप्त !

भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील (कोपर) :
         ठाण्यातील - मुंब्रा वाय जंक्शनवर  अंमली पदार्थ (एमडी पावडर) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्यातील  गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) युनिट-१ ला मिळाली असता  गोपनीय माहितीच्या आधारावर शुक्रवारी दुपारी पोलीस पथकाने दोघा आरोपींना सापळा रचून अटक करून त्यांच्याकडून ४ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १०७ ग्रॅम  आमली पदार्थ (एमडी  पावडर), १ अग्निशस्त्र आणि ९ जिवंत काडतुसे आणि ३ चॉपर असा मुद्देमाल जप्त केला आहे .
        शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा वाय जंक्शन  ठाणे - मुंब्रा येथे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून सावजाची पोलीस पथक वाट पाहत होते. काही वेळातच वाय जंक्शन उड्डाण पुलाच्या खाली, मुंबा शिळफाटा रोड, मुंब्रा, ठाणे येथे आरोपी अभिषेक कुमार गुप्तेश्वर महतो,( वय ३२, रा. रूम नंबर २, ओम साई लिला चाळ), विष्णु पाटील (नगर टाटा पॉवर रोड, साबे गांव, दिवा पुर्व, ठाणे),  विजय बहादुर मडे, (२० रा. गणराज पॅलेस, ए विंग, रूम नं. ४०८, एन आर नगर, दिवा (पश्चिम) ता जि. ठाणे ),येथे  दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने दोघा  आरोपींना अटक  केली.
      त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे ३ लाख २१ हजाराचे १०७ ग्रॅम एमडी, अंमली पदार्थ सापडला. तर सोबत एक अग्निशस्त्र, ९ जीवंत काडतूस आणि १ चॉपर असा ४ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपी अभिषेक कुमार महंतो याच्या घराची झडती घेतल्यानंतर दोन चॉपर आढळले. या दोन्ही आरोपीच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणे, प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
       अटक केलेल्या आरोपींपैकी अभिषेक कुमार महंतो हा यापूर्वी भादंवि ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी होता. तर न्यायालयाने त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न प्रकरणी गुन्ह्यात शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून अभिषेक बाहेर पडला होता. पुन्हा गुन्हेगारी कारवायात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे.

द. ग. तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा...

द. ग. तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा... 

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे विद्यालय माणगाव रायगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आयोजित भारतीय संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या संविधान दिवसाचे औचित्य साधून सर्वप्रथम भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनी कु. दिव्या शिंदे कु. संस्कृती मोहिते. कु. सिद्धी जाधव. कु. मीनल कदम यांनी संविधानविषयी माहिती दिली. त्याचबरोबर संविधानाविषयी घोषवाक्य, कविता, सादर केली. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख व्याख्याते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र आचार्य यांनी भारतीय संविधानाविषयी माहिती दिली. ७२ वर्षाचा प्रवास, डॉ. बाबासाहेबांचे कार्य, संविधानपूर्व कालखंड, कलमे, परिशिष्ट, रचना संविधानातील भाग, विचार, अभिव्यक्ती, मसुदा समिती, समाजातील एकात्मता, या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. संविधान दिना बरोबरच मुंबईवर झालेल्या २६/११/२००८ अतिरेकी हल्ल्याचाही आढावा घेण्यात आला. २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांवर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदेश गावडे सर यांनी गीत गायन केले. व सर्वांनी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली.
      सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदेश गावडे, प्रा. अंजुम लोखंडे, समिती सदस्य प्रा. नेहा गावडे प्रा. दीपेश केकाने आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. भानुप्रसाद विश्वकर्मा सर्व समिती सदस्य ग्रंथपाल संगीता उतेकर, डॉ. बबन सिनगारे, प्रा. पांडे सर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, महाविद्यालय कर्मचारी, विद्यार्थी, यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदेश गावडे व आभार प्रदर्शन प्रा. अंजुम लोखंडे यांनी केले.

कॉ. अमृत महाजन यांची आय टक च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड शुभेच्छांचा वर्षाव..

कॉ. अमृत महाजन यांची आय टक च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड शुभेच्छांचा वर्षाव..

चोपडा, प्रतिनिधी....
कोल्हापूर येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे 19वे राज्यअधिवेशन नुकतेच पार पडले. त्यात जिल्ह्यातील कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन यांच्या यांची पुढील तीन वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा  निवड करण्यात आली.

त्यावेळी त्त्यांच्या चाळीस वर्षातील  कामगार व सामाजिक चळवळीतील योगदानाचा गौरवही भाकपाचे राष्ट्रीय नेते काँ भालचंद्र कांगो यांचे हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरवही करण्यात आला करण्यात आला  त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल व गौरवाबद्दल भाकपाचे नेते लक्ष्मण शिंदे, गोरख वानखेडे, शांताराम पाटील, वासुदेव कोळी, वाल्मीक मैराले, एकनाथ माळी तसेच कामगार नेते  सर्वश्री का राजेंद्र झा, अशोक कुट्टी, जे एन बाविस्कर, वीरेंद्र पाटील पि वाय पाटील,  दिनेश राजगिरे आशिष मोरे, अशोक कुट्टी ,प्रसन्ना उटगी ,जे डी ठाकरे, यांचे सह शेकडो अंगणवाडी आशा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना किसान सभा शेतमजूर युनियन आदिवासी महासभा चे पदाधिकारी सभासद यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

संविधान दिना निमीत्त्त पक्ष कार्यलय गांधी भवन शहागंज येथे संविधान वाचन व शहीद विरांना श्रध्दांजली !

संविधान दिना निमीत्त्त पक्ष कार्यलय गांधी भवन शहागंज येथे संविधान वाचन व शहीद विरांना श्रध्दांजली  !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : आज रोजी संविधान दिना निमीत्त्त संविधान वाचन पक्ष कार्यालय गांधी भवन येथे जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व औरंगाबाद शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने वाचन करण्यात आले तसेच २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहीद विरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  
यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.डॉ.कल्याण काळे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, इब्राहीम पठाण, जगन्नाथ काळे,किरण पाटील डोणगांवकर, योगेश मसलगे, भाऊसाहेब जगताप, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, सरोज मसलगे, अरुण शिरसाठ, कैसर बाबा, शेख अथर, महेंद्र रमंडवाल, एकबालसिंग गिल, शफीक शहा, शिरीष चव्हाण, संतोष भिंगारे, मिनाक्षी, देशपांडे, स्वाती सरवदे, रेखा राऊत, माधवी चंद्रकी, दिपाली मिसाळ, अनिता भंडारी, अरुणा लांडगे, सय्यद फयाजोददीन, रवि लोखंडे, श्रीकृष्ण काकडे, मंजु लोखंडे,  उमाकांत खोतकर, साहेबराव बनकर, सलीम खान, प्रकाश वाघमारे, मुददस्सिर अन्सारी,  विनायक सरवदे, सुशिला मगरे, चक्रधर मगरे, उमर सौदागर,  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ;  लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !! *नवी मुंबई, प्रतिनिधी* लेख...