Saturday, 3 October 2020

माळशेज घाटमार्गे झेंडु फुलांच्या आडुन गोमांसाची तस्कर !!

माळशेज घाटमार्गे झेंडु फुलांच्या आडुन गोमांसाची तस्कर !!                 


मुरबाड (मंगल डोंगरे) : लॉकडाऊन संपल्यानंतर माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला . जीवनावश्यक वस्तू मधील तरकारी, फळे, दुध, इत्यादींच्या गाड्या माळशेज घाट मार्गे वाशी मार्केट कडे रवाना होऊ लागल्या. 


याचा गैर फायदा गोमांस तस्करी करणाऱ्यांनी चांगलाच उठवला असुन रात्री साडेआकरा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत पांच ते सहा टेम्पो मधुन गोमांस भिवंडी, अंबरनाथ, कल्याण ईंत्यादी शहारां मध्ये रवाना केला जातो.याचे वैशिष्ट्य म्हणजे गोमासाची तस्करी करताना पकडले जाऊ नये म्हणून गोमांस तस्करांनी नामी शक्कल शोधून काढली असून टेम्पो मधील गोमासाच्या वरील भागात झेंडुची फुले पसरण्यात येतात .त्यामुळे टेम्पो मधुन झेंडुच्या फुलांचा सुगंध दरवळतो परिणामी झेंडूच्या फुलांच्या आडुन बेमालूमपणे गोमांसाची तस्करी यशस्वी होते.गोमांस शहराकडे पोच केल्यानंतर परतीच्या प्रवासात झेंडूची फुले माळशेज मार्गा लागत असलेल्या. मामनोली, कांबा, वरप, पोटगाव,या गावाशेजारी खुलेआम पणे फेकून देण्यात येतात आणि फेकून दिलेली फुले परीसरांतील गोरगरीब नागरीक हार तुरे बनविण्यारांना विकतात .आणि मग त्याच पुलांचे हार नंतर देवाला अर्पण करण्यात येतात .वास्तविक कल्याण ते माळशेजघाटा पर्यंत एक एक किलोमीटर वर पोलिस चेक पोस्ट असुन सुद्धा बेमालूमपणे झेंडुच्या फुलांच्या आडुन गोमांसाची तस्करी यशस्वी पणे करीत असल्याने परीसरातील जाणकार नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

Friday, 2 October 2020

मुरबाड मध्ये विद्यार्थ्यांनी काढला कँडल मार्च.. **छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहिली बहीण मनीषाला श्रद्धांजली **

मुरबाड मध्ये विद्यार्थ्यांनी काढला कँडल मार्च..


**छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहिली बहीण मनीषाला श्रद्धांजली **


मुरबाड {मंगल डोंगरे} : उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मीकी या दलीत तरूणीवर झालेला सामुहिक बलात्कार आणी हत्या प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व उत्तर प्रदेश पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेचा निषेध संपुर्ण भारतभर होत असतांना आज मुरबाड मध्ये तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने कँडल मार्च काढून पिडीत मनीषाला न्याय देण्याची मागणी केली. व आपल्या सदभावना व्यक्त करीत भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
  यूपी मधील ही अत्याचाराची घटना तमाम भारतीयांच्या व दलितांच्या भावनांना ठेच पोहचवणारी आहे.त्याच प्रमाणे मानवतेच्या दृष्टीने निंदनीय आहे.या घटनेचा जाहीर निषेध मुरबाड मध्ये  रिपाइं सेक्युलरने करून आरोपीना फाशीची मागणी केली आहे.काल मुरबाड तालुक्यातील सर्व विद्यार्थी वर्गाने एकत्र जमून कल्याण -मुरबाड तीनहात नाक्या पासून मुरबाड शहर मुख्य बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत कँडल मार्च काढून आपल्या सदभावना व्यक्त केल्या.
  या प्रसंगी 'जस्टीस फॉर मनीषा' या बॅनरखाली सुयश कॉलेज, मुरबाडच्या अनेक विद्यार्थ्यी आणि विद्यार्थिनींनी तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कँडल मार्च मध्ये सेक्युलरचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने, नगरसेवक रविंद्र देसले, भारीपचे शंकरभाई गोहिल, राष्ट्रवादीचे हरेशभाई पुरोहित, आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, युवा नेते अतुल देशमुख, विद्यार्थी संघटनेचे निखील अहिरे व बहुसंख्य पत्रकार मंडळी आणी तालुक्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.

शाश्वत शेती अभियान अंतर्गत बोंडशेत येथे माणगांव तालुका कृषी कार्यालया मार्फत जमीन आरोग्य पत्रिका वाटप व शेतकरी प्रशिक्षण !

शाश्वत शेती अभियान अंतर्गत बोंडशेत येथे माणगांव तालुका कृषी कार्यालया मार्फत जमीन आरोग्य पत्रिका वाटप व शेतकरी प्रशिक्षण !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आज गुरुवार दिनांक ०१/१०/२०२० रोजी मौजे बोंडशेत येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत मृद चाचणी व एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धती याविषयी शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास माणगांव तालुका कृषी अधिकारी श्री. पवार सर,  व कृषिसहाय्यक श्री. सुयश नलावडे सर, श्री संतोष उगले, श्री राम कदम श्री कृष्णा शिंदे श्री अमोल गावडे श्री मधुकर शेंडे व स्वदेश फौंडेशनचे श्री गणेश शिंदे तसेच बोंडशेत गावातील शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते. 
     सदर प्रशिक्षणामध्ये श्री. पवार सर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना जमिनीचे आरोग्य व तिची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री.संतोष सुरडकर  व श्री. कृष्णा शिंदे, यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचे व शंकांचे निरसन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ४६ शेतकरी  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वानी भोजनाचा लाभ घेऊन प्रशिक्षणाची यशस्वीरीत्या सांगता करण्यात आली.

महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत - नई तालीम जिल्हाधिकारी निधी चौधरींनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद

महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत - नई तालीम जिल्हाधिकारी निधी चौधरींनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद
     
 
       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्.कॉलेज व मुंबई विद्यापीठ, ठाणे उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज "महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत-नई तालीम" या विषयावर ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्वपूर्ण आहेत, हे स्पष्ट करीत महात्मा गांधींच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखविले. या माध्यमातून समाजाचा चिरंजीवी विकास कसा साधता येईल व या विचारांच्या आधारावर बेरोजगारीसारख्या समस्यांवर कशी मात करता येईल, हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना एक नवी दिशा दाखविली. 
      महात्मा गांधी नॅशनल काैन्सिल ऑफ रुरल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या श्रीम.मनिषा करपे यांनी महात्मा गांधी व नई तालीम यातील संबंध स्पष्ट केला. 
      मुंबई विद्यापीठ, ठाणे उपकेंद्राच्या संचालिका डॉ.सुनिता मगरे यांनी विद्यापीठाची यातील भूमिका स्पष्ट केली.      
        महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या प्रास्तविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत सर्वांचे स्वागत केले. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष व आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष श्री.धनराज विसपुते यांनी महात्मा गांधी यांच्या  विचारप्रणालीनुसार व आदर्श समूहाचे कसे कार्य करते, याचे थाेडक्यात विवेचन करीत भविष्यातही या कार्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.    
       आभासी दीपप्रज्वलन, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा माहितीपट, नई तालीमवरील कार्याची ध्वनिचित्रफीत, वैष्णव जन हे भजन यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना नव्याने गांधीजी व शास्त्रीजी समजले.
       या कार्यक्रमासाठी झूम वर १०० विद्यार्थी कनेक्ट झाले हाेते तर फेसबुक पेजवर ३ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह पाहिला. शेवटी प्राचार्य डॉ.सीमा कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शर्वरी शेडगे यांनी केले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून : "महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . उमेश पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणार ! तानाजी कांबळे"

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून :
"महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . उमेश पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणार ! तानाजी कांबळे"


भुईबावडा । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एका महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश पाटील यास पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी केली आहे. 

या बाबत बोलतांना आरपीआय जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी सांगितले की डाँ पाटील यांनी महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी केलेले वर्तन धक्कादायक आहे. डॉक्टर उमेश पाटील यांनी केलेले गैरवर्तन लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. पाटील यांच्या या दृकृत्यामुळे संपुर्ण वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाले आहे.

डाँ. उमेश पाटील यांच्या गैरकृत्यामुळे महिला वैद्यकीय अधिका-यांचे जीवन आणि त्यांचा संसार उद्वस्त होणार होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन डॉ उमेश पाटील याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी केली आहे.

वैभववाडी पोलीसांनी डॉ उमेश पाटील यास तात्काळ ताब्यात घेवून विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करुन पदाँपाश करावा. अधिकाराचा गैरवापर करून योजनाबद्ध पद्दतीने महिला डॉक्टरला जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा डॉ. उमेश पाटील यांचा डाव होता. असा आरोपही तानाजी कांबळे यांनी केला आहे. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश पाटील यांच्या कडुन महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी केलेले गैरवर्तन असा कुणावर प्रसंग ओढवला असेल आणि भीतीमुळे, बदनामीला घाबरुन कुणी तक्रार द्यायला पुढे येत नसेल तर डाँ उमेश पाटील यांच्यासारखे गैरकृत्य करणारे समाजात उथळ माथ्याने फिरत राहतील. तेव्हा कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अशा स्वरुपाच्या तक्रारी पुढे येवून कराव्यात असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी केले आहे.

राज्याचे गृहमंत्री ना. अनिलजी देशमुख तसेच आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची आपण लवकरच भेट घेणार असून महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिका-यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी सांगितले .

वैभववाडी पोलीसांनी डॉ उमेश पाटील यांना तात्काळ अटक करुन ताब्यात घ्यावे असे आवाहन तानाजी कांबळे, प्रकाश सावंत यांनी केले आहे.

Thursday, 1 October 2020

स्वच्छता मोहिमेत मुरबाड नगर पंचायत पुन्हा एकदा ठरली अव्वल !!

स्वच्छता मोहिमेत मुरबाड नगर पंचायत  पुन्हा एकदा ठरली अव्वल !!                      


शहरात **मि पण स्वच्छताग्रही मोहिमेचा शुभारंभ **


मुरबाड (मंगल डोंगरे) : मा.पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत भागीदारी वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. नुकताच स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेत मुरबाड नगरपंचायतीने *देशात पश्चिम विभागात 54 वा व राज्यात 37 वा* क्रमांक पटकाविला आहे. 2 ऑक्टोबर 2020 हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 151 वी जयंती साजरी होत असतानाच त्या सोबतच स्वच्छ भारत मिशनचा ६ वा  वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे . त्या अनुषंगाने नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत *कचर्‍याचे वर्गीकरणाबाबत जनजागृती उपक्रम* मुरबाड नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुरबाड नगरपंचायत कार्यक्षेत्रात घरोघरी भेट देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे व स्वच्छतादूत/ स्वच्छताग्रही यांनी प्रभागनिहाय स्थानिक नगरसेवकांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन स्वच्छता विषयक मार्गदर्शनपर माहितीपत्रकाचे वाटप करणे योजिले आहे.त्यात  *‘मी पण स्वच्छताग्रही’* या मोहिमेचा शुभारंभ मा.आमदार किसन कथोरे साहेब,नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी, मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ, उपनगराध्यक्ष सौ. अर्चना विशे, आरोग्य सभापती श्री.नारायण गोंधळी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर स्वच्छता मोहिमेस सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.

स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न !!

स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न !!


      बोरघर / माणगांव रायगड (विश्वास गायकवाड) -दिनांक  ०१ ऑक्टोबर “राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान” दिनानिमित्त सी.आय. एस.एफ.थळ, पोलीस पाटील संघटना आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
       राष्ट्रीय स्वैच्छिक दिनानिमित्ताने रक्तदात्यांमध्ये रक्तदानाविषयी जागृती व्हावी, तसेच रुग्णालयात तातडीच्या शस्रक्रिया, प्रसूती, थँलेसिमिया, हिमोफिलिया, अपघात अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते.यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन गरजू रुग्णांना तातडीच्या वेळेस रक्ताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ.दिपक गोसावी यांच्या पुढाकाराने “स्वेच्छेने रक्तदान करु या आणि कोरोना लढ्यात सहभागी होऊ या!” याउद्देशाने स्वैच्छिक रक्तदान शिबीर रक्तपेढीत आयोजित करण्यात आले होते .
     या शिबिरात सीआयएसएफ,थळ, रक्तपेढी प्रमुख डॉ. दिपक गोसावी, डॉ. अमोल भुसारे, डॉ पोटे, रक्तपेढी तंत्रज्ञ सुनील बंदिछोडे आदी सर्वांनी मिळून एकूण 33 जणांनी स्वैच्छिक रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्यात आला होता.
    हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी डॉ.दिपक गोसावी, हेमकांत सोनार, सुनील बंदिछोडे, पुनम पाटील, चेतना वर्तक,मनिषा नवाळे, प्रज्ञा पवार, उमेश पाटील, संकेत घरत आदींनी परिश्रम घेतले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...